येथे कुठला मराठी शब्दप्रयोग चपखल बसेल? - २
'अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ' हा धागा लांबल्यामुळे दुसरा धागा काढला आहे.
hostile ला मराठीत नेमकं काय म्हणतात ?
हॉस्टाइल टेक्-ओवर
अलीकडे हॉस्टाइल टेक-ओवर,हॉस्टाइल मर्जर असे शब्द अर्थविषयक वार्तापत्रांतून पुष्कळदा वाचायला मिळतात. मराठीतही त्यांचे छानसे प्रतिशब्द रूढ झाले आहेत. पण गेले दोन दिवस ते काही केल्या आठवत नाहीयत. लोकसत्तेतली अर्थवार्तापत्रे वाचणारे कुणी इथे असतील तर त्यांना हा शब्द आठवावा. खुशीचे/मैत्रीपूर्ण अधिग्रहण, नाखुशीचे अधिग्रहण असे काहीतरी असावे का? ('अधिग्रहण' साठी अॅक्विज़िशन हा शब्द असतो. मला वेगळा शब्द आठवला नाही. मर्जर म्हणजे अर्थात विलीनीकरण.)
तुझे विचार माझ्याबरोबर शेअर
तुझे विचार माझ्याबरोबर शेअर कर - इन जनरल, शेअर कर ला काय म्हणाल?
इंग्लिशमध्ये 'अ पेनी फॉर युअर थॉट्स' असा छान शब्दप्रयोग आहे. लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरही मी माझ्या बायकोला खरोखर एक पेनी द्यायचो ते आठवलं. विचार मांडण्याच्या प्रक्रियेत 'हिअर इझ माय टुप्पेन्स' हाही शब्दप्रयोग प्रचलित आहे.
प्रत्यक्ष मराठीत बोलताना 'शे्अर कर'च्या भाषांतरापेक्षा 'सांग ना' किंवा 'बोल...' किंवा 'काय म्हणायचंय तुला?' असे साधे प्रश्नच उपयुक्त ठरतात. बऱ्याच वेळा संभाषणात भाषा हे दुय्यम अंग असतं. स्वरामधून, देहबोलीतून बराच संवाद साधता येतो. दुर्दैवाने भाषांतरांमध्ये देहबोलीचं भाषांतर होत नाही. भाषिक दौर्बल्य, दुसरं काय?
वि/क्रि.वि.
समर्पक हे विशेषण आणि चपखल हे (बव्हंशी) क्रियाविशेषण असल्याने हा उपमा/विशेषण निकष योग्य वाटतो. अर्थात, प्रत्यक्ष वापरात नियमापेक्षा सवयीचा भाग अधिक असावा.
बाकी चपखलचे मूळ बहुतेक अरेबिक व्हाया फारसी असावे, असे वाटते. (बखल = stinginess, stricture, tightness --> चबखल --> चपखल)
च्यायला, मी चपलख
च्यायला, मी चपलख म्हणायचो.
http://www.aisiakshare.com/node/2739?page=1#comment-53684 पहा.
अतिअवांतर
संगमरवर हा संगेमर्मर अर्थात संग-ए-मर्मर चा अपभ्रंश आहे. फारसीत संग = दगड. मर्मर चा अर्थ काय असावा? मार्मारा प्रदेश?
त्यामुळे मी आत्ताच इंग्लिश टु
त्यामुळे मी आत्ताच इंग्लिश टु फारसी गूगल ट्रान्सलेट चेकवलं. marble असा शब्द देताच औटपुट आला سنگ مرمر.
https://www.google.co.in/?gws_rd=ssl#q=marble+in+persian+translation
उच्चार आहे संग-ए-मर्मर. मूळ फारसीतच हा शब्द असल्याने मारवाडवरून त्याचे कनेक्शन असणे योग्य वाटत नाही - शिवाय तुर्कीतही मार्मरा प्रदेशात हा दगड मिळतोच. आणि पर्सेपोलिसमध्ये दोन-अडीच हजार वर्षांपूर्वीही संगमरवरी शिल्पे सापडलेली असल्याने इराण्यांना इंड्यन संपर्काअगोदरही तो दगड ज्ञात होता हे सिद्ध होते.
इराणातही संगमरवर मिळतो हे खालील बातमीवरून दिसून येते.
http://www.wsj.com/articles/SB10001424052748703678404575635981796965438
तस्मात मारवाडशी संबंध नसावा.
संग-ए-मर्मर
संग-ए-मर्मर म्हणजे शब्दशः मर्मरचा दगड. इस्तन्बूलपासून डार्डानेल्सच्या सामुद्रधुनीपर्यंतच्या समुद्राला Sea of Marmara असे नाव आहे. त्यामध्ये अनेक लहानमोठी बेटे आहेत आणि त्यामधील सर्वात मोठया बेटाला 'मार्मारा' असे नाव आहे. प्राचीन काळापासून 'हेलेस्पाँट' ह्या नावाने प्राचीन जगात ओळखल्या जाणार्या ह्या भागात ग्रीक लोकांचे येणेजाणे आणि वसाहती होत्या. (ट्रॉय शहराची उत्खननामध्ये सापडलेली जागा डार्डानेल्सच्या सामुद्रधुनीपर्यंतच्या पूर्व किनार्यावर गॅलीपलीच्या समोर आहे. ग्रीक कथांमधील ऑलिंपस पर्वत ट्रॉयपासून फार दूर नाही. पहिल्या महायुद्धातील एक गाजलेली लढाई गॅलीपलीच्या - टर्किशमध्ये गेलिबोलू - आसपास लढली गेली.)
मार्मारा बेट त्यावरील पांढर्या दगडासाठी प्रसिद्ध आहे. कोरीव कामाला अतिशय उपयुक्त असा हा दगड ग्रीकांना तेथे प्रथम मिळाला. त्याचे ग्रीक नाव μάρμαρον मार्मारोन. असा दगड मिळण्याची जागा ह्यावरून बेटाला 'मार्मारा' हे नाव मिळाले आणि समुद्रालाहि तेच नाव मिळाले. नंतर जगात अनेक जागी हा दगड आहे असे कळले पण मूळचे ग्रीक नाव त्याला कायमचे चिकटले. आता जगातील बहुतेक भाषांमधील ह्या दगडाचे नाव मूळ ग्रीकपासून आलेले आहे असे जाणवते.
इंग्लिशमधील मार्बलची
इंग्लिशमधील मार्बलची व्युत्पत्तीही ग्रीक मार्मारोस वरूनच आलेली आहे असे दिसते.
संपर्क! हं...ठीक हे सगळे शब्द
संपर्क! हं...ठीक
हे सगळे शब्द इतर अनेक वेळी वापरता येतील.
मी एका वेगळ्या छटेने तो शब्द वापरु इच्छितो
पारंपारिक माध्यमांच्या तुलनेत इंटरनेचा प्रभाव व 'रीच' मानवी आयुष्यावर अधिक असेल का?
या वाक्यात इंटरनेटचा पल्ला , वट वगैरे नै बसत.
इंटरनेचा 'संपर्क' हा त्यातल्या त्यात योग्य वाटतो आहे. पण अजून काही पर्याय/सुचवणी?
around about
दुतर्फाऐवजी द्विधा अधिक योग्य वाटतो.
मुळात अॅम्बिवॅलन्समध्ये शब्दशः 'दोन्ही' अवस्था अभिप्रेत असल्या, तरी भाषांतरात चलबिचल/संभ्रम/दोलायमान असे अनिश्चिततादर्शक शब्द अधिक नेमके ठरावेत.
अवांतर - 'ambi', 'amphi' आणि 'अभि-'चे मूळ एकच असल्याचे पाहून गंमत वाटली
word-forming element meaning "both, on both sides," from Latin ambi- "around, round about," from PIE *ambhi "around" (cognates: Greek amphi "round about;" Sanskrit abhitah "on both sides," abhi "toward, to;
(दुवा)
द्विधा, दुग्धा
द्विधा योग्य आहे.
---
मेघना बरेचदा वापरते तो 'दुग्धा'. उदा - मी दुग्ध्यात आहे.
दाते-कर्वे:
दुग्धा—स्त्रीपु. १ अनिश्चितता; शंका; भ्रांति. (क्रि॰ असणें; दिसणें; वाटणें). 'हे जिवंत असतां त्यांचे राज्यांतील माणसांस दुग्धा पडेल.' -मराचिसं २५. २ कासकूस; धरसोड; कांकू; द्विवि- धता. 'त्यांची जाण्याची अद्यापि दुग्धा दिसते.' -क्रिवि. (सामा) अनिश्चितपणें; संदिग्धपणें; मोघम; अळमटळम. [सं. द्विधा]
मोल्सवर्थः
दुग्धा [ dugdhā ] f m (द्विधा) Doubt or uncertainty. v अस, दिस, वाट. 2 Hesitation, fluctuation, suspense. 3 Gen. used as ad and without inflection, signifying Dubiously, undecidedly, vaguely, indeterminately.
-----------
जवळपास जाणारा वाक्प्रचार हवा असल्यास -
१. मन सारखं तळ्यात-मळ्यात होत होतं.
२. त्याची सारखी धर-सोड चालू होती.
-----------------------------
अवांतर :
द्विधा (हिंदी : दुविधा) = दु + विधा, आंतरजालीय मराठीत विधा = genre
डिक्शनअर्या चाळल्या. पॉर्न
डिक्शनअर्या चाळल्या.
पॉर्न आणि पॉर्नोग्राफी हे दोन वेगळे शब्द आहेत. पॉर्नोग्राफी हे लैंगिक क्रियांचे भडक/प्रत्यक्षाहून अधिक उत्कट आभास देणारे चित्रण असे म्हणावे लागेल. तर पॉर्न हे "to cater to an excessive, irresistible desire for or interest in something" असे ढोबळ मनाने म्हणता येईल.
तेव्हा पॉर्नोग्राफीसाठी एक आणि जनरल 'पॉर्न'साठी एक असे दोन वेगळे मराठी शब्द / शब्दसमुच्चय शोधावेत असे सुचवतो
---
मला दोन्हीसाठी नेमके शब्द सुचत नाहीयेत हे ही खरं!
ऐसीकरांनो शब्द सुचवा!
अंमळ अवांतर
या बाबतीत हिंदी मला उजवी वाटते. टेक्निकचं तकनीक करून त्याला हिंदी शब्द बनवून टाकलं. स्लँग बंगालीमध्येही पॉर्नला पानू असे म्हणतात. तसं मराठी करताना दिसत नाही. एक तर तत्सम नैतर सरळ प्रतिशब्द असाच खाक्या दिसतोय. एकोणिसाव्या शतकात तद्भव तयार केले असतीलही, पण अलीकडे तरी तद्भवांचं वावडंच दिसतंय. हे कै बरोबर नाही.
हो ना
आणि तद्भव म्हणायचे तर
शोल्डर(सोल्डर), शिमिट,मुन्सिपाल्टी,शॅम्पल्,टेष्टिंग वगैरे. इलेक्ट्रिशियन, वायरमन यांचा शब्दसंग्रह फार भारी असतो. पिन तर मराठीच बनून गेलाय. पिना मारणे वगैरे. इंच,(च पूर्ण) फुट, मैल हे सुद्धा.गनी- गोणी,बिगुल, काडतूस,गर्नळ,(गुर्नळ) पाटलोण, ग्यास,माचिस,बक्कल्,पाद्री,पाइप्(पायपातून)बटण, मटण, गरादी,बंगला,अकादमी, मास्तर, दिपोटी,कंदिल (कँडल? शंकास्पद),खाट, बीडिंग्-बिडिंग्(फॉल्-बिडिंग),गटार,(संडास शब्द कुठून आला असेल?)वगैरे.
अगदी बरोबर. उच्चभ्रू मराठी
अगदी बरोबर. उच्चभ्रू मराठी समाजाला तद्भवांचे वावडे दिसून येते. कामगारांची भाषा रूढ होत नाही, रूढ होते ती हुच्चभ्रूंची भाषा. त्या वर्गाबद्दल बोलतोय.
बाकी कामगारवर्गाच्या शब्दसंग्रहाबद्दल काय बोलावे? शॉकाप्सर, शॉक अब्सर, शाकाप्सर, हे शब्द खास मराठीच अशी माझी कोणे एके काळी समजूत होती.
बाकी संडासाच्या व्युत्पत्तीबद्दल मलाही कुतूहल आहे. व्युत्पत्तिकोश पाहिला पाहिजे.
उच्चभ्रूंचा डिलेमा
उच्चभ्रू मराठी समाजाला तद्भवांचे वावडे दिसून येते.
सहमत.
कारण तद्भव शब्द वापरणे म्हणजे गांवढळपणा हा गैरसमज. पण म्हणून तत्सम वापरावेत तर, मराठी भाषेचे काय होणार ही भिती!
सावरकरपूर्व काळातील मराठी उच्चभूंना हा त्रास नसावा. नंतर मात्र तसा व्हायला लागला तसे, संस्कृतला वेठीला धरून शब्द 'पाडले' गेले!
porn
>> porn या शब्दाला मराठीत अचूक प्रतिशब्द आहे का? नाम म्हणून आणि विशेषण म्हणूनही. विशेषण म्हणून बटबटीत / भडक / अश्लील (जरी याला vulgar सापडतो) असे प्रतिशब्द आठवतात. पण नाम म्हणून तर मराठीत काही नाहीच. शृंगारसूचक असा एक शब्द सुचला. पण तो eroticaच्या जवळ जाणारा आहे..
लैंगिक उद्दीपक किंवा कामोद्दीपक (साहित्य, चित्रपट, वगैरे)?
@मनोबा - hostile
होस्टिलिटी = वैरभाव. म्हणून होस्टाइल = वैरभावाने वागणारा.
तत्कालिक परिस्थितीनुसार 'अरेला कारे म्हणणारा', 'उरफाट्या स्वभावाचा', 'दात धरून असणारा' वगैरे वापरता येतील.