सामाजिक

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ४ : 'आप' च्या मर्यादा

मागील भागः समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - ३ : राजकीय धारेत सामील होण्याने येणार्‍या जबाबदार्‍या नि मर्यादा

ढोबळ मानाने पाहिलं तर एकचालकानुवर्तित्व, अननुभवी सहकारी, पक्षसदस्यांना एकत्र बांधणार्‍या कोणत्याही समान धाग्याचा, धोरणाचा अथवा विचारसरणीचा पूर्ण अभाव, आपल्या कुवतीबाबत फाजील आत्मविश्वास या 'आप'च्या काही मर्यादा म्हणता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

गंमत जंमत!

स्वाती व प्राची (दोघीं, सुमारे चार वर्षाचे असावेत) रोज काहीना काही खेळ खेळत असतात. समोर दिसेल त्या वस्तूंचा वापर करत खेळाच्या प्रकारात विविधता आणत असतात. परंतु त्यांचे खेळ नेहमीच नावीन्यपूर्ण असतात. कधी खोटा खोटा स्वयंपाक, कधी शाळा, कधी प्रवासाचे ठिकाण, कधी आजी आजोबांची, शेजार्‍यापाजार्‍यांची हुबेहूब नक्कल, आगगाडी, विमान, बाग इ.इ कुठलाही विषय असो, दोघी मनापासून खेळतात. त्यांच्या खेळात काही वेळा प्रत्यक्ष कृतीपेक्षा बडबड जास्त असते. व ती बडबड इतर कुणी ऐकत असल्यास त्यातील एक अवाक्षरही कळत नसते. तसे पाहता त्यांच्या संवादात नेहमीचेच शब्द असतात. परंतु त्यातून काहीही अर्थबोध होत नाही.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने - १ : प्रस्तावना आणि भूमिका

(सदर लेखाची प्रेरणा ज्या व्याख्यानामुळे मिळाली ते व्याख्यान 'श्रावण मोडक' यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. श्रावण ऐसीअक्षरेचा सदस्य होता नि इथल्या अनेकांचा मित्रही. समाजवादी विचारांची प्राथमिक ओळख त्याच्यामुळेच झाली. तेव्हा ही लेखमालिका त्याच्यासाठी.)

भूमिका:

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

प्रश्न शौचालयांचा

अलीकडील द न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात गार्डिनर हॅरिस या पत्रकाराने भारतातील शौचालयाच्या समस्येला पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बिहारमधील एका खेडेगावातील घटनांचा आढावा घेत असताना बालकांचे कुपोषण आणि सार्वजनिक स्वच्छता (सॅनिटेशन) यांच्यातील परस्पर संबंधावर त्यानी प्रकाश टाकला आहे. दृष्ट लागू नये म्हणून एका वर्षाच्या बाळाच्या डोळ्यात काजळ, गालावर तीट लावून मांडीवर झोपविणार्‍या आईला आपले बाळ कुपोषित आहे हे कसे काय लक्षात येत नाही याचे त्याला आश्चर्य वाटते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

सामान्याचे असामान्य कर्तृत्व: कॅथी हॅरिस

स्वत:च्या आयुष्यात असे काही तरी घडू शकेल याची कॅथी हॅरीस कल्पनाही करू शकली नसती. प्राप्त परिस्थिती व अन्यायाविरुद्धचा मनस्वी संताप व चीड यामुळेच बलाढ्य अमेरिकन प्रशासनाच्या विरोधात दोन हात करण्यास ती उद्युक्त झाली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - सामाजिक