भाषा

मराठीतील शुद्धलेखनः थोडासा गुंतागुंतीचा प्रश्न

तितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:| या धाग्यात मराठी शुद्धलेखनावरून सुरू झालेली चर्चा इथे हलवली आहे. धाग्याचे शीर्षक धनंजय अथवा इतर कोणाला मिसलीडींग वाटल्यास कळवावे/बदलावे.

याबाबतीत डॉ. अशोक केळकरांनी १९६५ साली मत व्यक्त केले होते. (लेख त्यांच्या "वैखरी" संग्रहात आहे.) त्या लेखातील मुद्द्यांचा मी पुढे उल्लेख करेन.

- - -

अनवट मराठी शब्द, वाक्प्रचार, संदर्भ

गविंनी काढलेला इंग्रजी शब्दांसाठी धागा वाचला. माझी समस्या उलट आहे, म्हणून हा मिरर धागा काढतेय - मराठीतले काही खास शब्द, जे इंग्रजी माध्यमात शिकलेल्यांच्या परिचयात फार उशीरा येतात, असे एकमेकांना सांगणार्‍यांसाठी. त्यांनी म्हटल्यासारखेच शब्दांपेक्षा शब्द समूह, वाक्प्रचार आणि कोलोक्वियल भाषा इडियमॅटिक लेखनात कशी वापरावी हा प्रश्न नेहमी मला पडतो. मराठी दहावीपर्यंत शिकले असले, आणि बोलता-वाचता चांगले येत असले तरी अलिकडेच सीरियस मराठी लेखनाला सुरुवात केली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अडगळीत गेलेल्या वस्तु आणि शब्द.

काळ पुढे जातो आणि नवनवीन संशोधनामधून नवनवीन चिजा बाजारात आणि वापरात येऊ लागतात. वागण्या-बोलण्याच्या रीती बदलतात. त्याबरोबरच जुन्या गोष्टी आणि शब्द अडगळीत आणि विस्मरणात जाऊन पडू लागतात. अशा चीजा, कल्पना, शब्द अशांची जर जंत्री केली तर ते मोठे मनोरंजक ठरेल. अशी जंत्री किती लांबेल आणि त्यामध्ये किती प्रकार आणि उपप्रकार असतील ह्याला काही मर्यादा नाही आणि कल्पक वाचक त्या जंत्रीमध्ये मोलाची भरहि घालू शकतील.

ह्या जंत्रीचा प्रारंभ म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये अदृश्य होऊ लागलेल्या काही गोष्टी मला सुचतात तशा लिहितो. (काहीजण मराठी भाषेचा येथे पहिल्याप्रथम उल्लेख व्हावा असे म्हणतील, पण मी इतक्या टोकाला जात नाही!) ही यादी मुख्यत: शहरी आयुष्याशी संबंधित आहेत कारण मला स्वत:ला तेच आयुष्य़ माहीत आहे.

गट १ वापरातील यान्त्रिक वस्तु - जुन्या प्रकारचे घडी घालून खिशामध्ये ठेवण्याचे सेलफोन्स, रोटरी फोन, प्रॉपेलरवर उडणारी प्रवासी विमाने, कोळशाच्या इंजिनांच्या आगगाडया, किल्ली द्यायला लागणारी गजराची घडयाळे, हाताच्या हालचालीवर चालणारी बिनकिल्ली-बॅटरीची घडयाळे, कोळशाच्या इस्त्र्या, कटथ्रोट वस्तरे, जिलेटसारखी ब्लेडस आणि ती घालण्याची खोरी, दाढीचा केकस्वरूपातील साबण आणि ब्रश.

गट २ वापरातील घरगुती वस्तु - स्वयंपाकघरातील अनेक भांडी (तांबे-पितळ्याची भांडी, वाटी, गडू, फुलपात्र, तांब्या, प्रवासासाठी फिरकीचा तांब्या, घागर, गुंड, आंघोळीचा बंब, तामली, सट, सतेले, ओघराळे, कावळा, बसायचे फुल्यांचे पाट, चौरंग, पूजेच्या वस्तु (पळी, ताम्हन, अडणीवरचा शंख, सहाण आणि गंधाचे खोड, रक्तचंदनाचे खोड, गंगेच्या पाण्याचे भांडे, पंचामृतस्नानाचे पंचपाळे, मुकटा.)

गट ३ कपडे - पुरुषांचे लंगोट आणि बायकांच्या बॉडया - झंपर, कोपर्‍या-अंगरखे-टापश्या-पगडया अशी वस्त्रे, बायकांच्या नायलॉन साडया आणि पुरुषांच्य़ा टेरिलिन पॅंटी, बुशकोट, सफारी, नऊवारी लुगडी आणि करवती धोतरे, अंग पुसण्याचे पंचे, मुलींची परकर-पोलकी.

गट ४ सामाजिक आचार - 'ती.बाबांचे चरणी बालके xxx चे कृ.सा.न.वि.वि' असले मायने आणि एकुणातच पोस्टाने पाठवायची पत्रे, तारा, 'गं.भा., वे.शा.सं.. ह.भ.प., चि.सौ.कां., रा.रा.' असले पत्रांमधले नावामागचे उल्लेख, 'लिप्ताचा स्वैपाक, धान्यफराळ, ऋषीचा स्वैपाक, निरसे दूध, अदमुरे दही, तीसतीन ब्राह्मण, अय्या-इश्श' अशा प्रकारचे विशेषतः बायकांच्या तोंडातील शब्द. जुन्या लग्नपत्रिका (सौ.बाईसाहेब ह्यांस असे डाव्या बाजूचे बायकांचे निमंत्रण, लेकीसुनांसह), शरीरसंबंध, चि.सौ.कां. इत्यादि, पानसुपारीचे समारंभ, सवाष्ण, मुंजा मुलगा जेवण्यास बोलावणे, गणपतीमध्ये आवाज चढवून म्हणायचे देवे, जेवणाआधी चित्राहुती आणि जेवणानंतर आपोष्णी.

गट ५ वजने, मापे, नाणी इत्यादि. - आणे, पै, पैसा, अधेली, चवली. पावली, गिन्नी अशी नाण्यांची नावे. खंडी, पल्ला, मण, पायली, पासरी, धडा, शेर, अदशेर, पावशेर, छटाक, रति, गुंज अशी वजने. गज, फर्लांग, कोस, वीत, हात ही लांबीची मापे. अडिसरी, पायली, रत्तल, अठवे, निठवे, चिपटे, मापटे, निळवे, कोळवे इत्यादि धान्यांची मापे. खण, चाहूर, बिघा अशी क्षेत्रफळाची मापे, पाउंड, स्टोन, हंड्रेडवेट ही इंग्रजी वजनी मापे.

असे गट आणि त्यातील वस्तूंच्या याद्या मारुतीच्या शेपटासारख्या कितीहि वाढविता येतील. ऐसीकरांनी यथास्मृति ह्यामध्ये भर घालावी हे विनंति. क.लो.अ.

आपला नम्र,

धागाकर्ता

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

भरपूर 'र' (देवनागरी लिपीतली एक मजा + आय.पी.ए. कार्यशाळेची माहिती)

नमस्कार मंडळी,

अनेक ऐसीकरांशी वेळोवेळी जाहीरपणे आणि खाजगीत झालेल्या चर्चांमधून 'आय.पी.ए. लिपी आणि भाषांतील ध्वनींचा अभ्यास' या विषयांवर एक कार्यशाळा आयोजित करण्याची कल्पना पुढे आली होती. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या भाषाविज्ञान विभागातले व्याख्याते, विद्यार्थी आणि 'बोली भाषाभ्यास मंडळ' हे एकत्र येऊन अशी एक कार्यशाळा आयोजित करत आहेत. ही कार्यशाळा १०-११ जानेवारी (शनिवार-रविवार) अशी दोन दिवस (पूर्ण दिवस) चालेल. याची अधिक माहिती मी काही दिवसांनी 'आगामी कार्यक्रम/उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय?' या धाग्यावर देईनच.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

माहिती - शब्दकोष कसा वापरावा?

माझ्या मुलीला जास्वंदी, घटपर्णी व अमरवेल या वनस्पतींची माहिती हवी होती. या वनस्पतींचे अन्न काय, ते त्या कसे मिळवतात, त्यांचा वर्ग कोणता (परोपजीवी इ.) व अन्नग्रहण कसे करतात इ. माहिती तिला एका प्रकल्पासाठी गोळा करायची आहे. ही माहिती जरी मराठीत आंतरजालावर उपलब्ध नसली, तरी ईंग्रजीत नक्कीच असेल असे वाटले. पण त्यासाठी त्यांचे ईंग्रजी प्रतीशब्द माहिती हवेत. म्हणून ऐसीच्या मुखपृष्ठावर दिलेले मोल्सवर्थ व दाते कर्वे कोष वापरायचा प्रयत्न केला. तिथे हे शब्द 'jAswandI, ghataparnI' असे टंकन केले असता काहीच माहिती मिळाली नाही. शब्दकोषात हे शब्द असावेत अशी खात्री आहे, पण मला नीट शोधता आले नाहीत असे वाटले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

जुन्या मराठीचे नमुने

कलकत्त्याजवळील सेरामपूर छापखान्यामध्ये मिशनरी कामाचा भाग म्हणून अनेक पुस्तके देशी भाषांमधून छापली जात. मराठी शब्दकोश, व्याकरण अशी काही पुस्तके १८०५ ते १८२५ च्या काळामध्ये तेथे छापण्यात आली. 'A Grammar of the Mahratta Language' नावाचे एक पुस्तक १८०५ साली W. Carey, Teacher of the Sungskrit, Bengalee and Mahratta Languages in the College at Fort William ह्यांनी तेथे छापवून घेतले. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये Vidyunath, Cheif Mahratta Pundit in the College at Fort William ह्यांनी लेखकास साहाय्य केले असा उल्लेख आहे. (इंग्रज सत्ताधारी कामास उपयुक्त म्हणून शिक्षक नेनून त्यांच्याकडून देशी भाषा शिकत असत. संस्कृत, मराठी, बंगाली अशा भाषांसाठीच्या शिक्षकांस 'पंडित' आणि फारसी, उर्दू, अरेबिक ह्यांच्या शिक्षकांस 'मुन्शी' असे म्हणत असत. 'हॉब्सन-जॉब्सन' अशा मजेदार नावाच्या शब्दकोशात इंग्रजांच्या वापरातील पण हिंदुस्तानी भाषांपासून निर्माण झालेल्या शब्दांचा संग्रह आहे. तेथे 'मुन्शी',चा उगम अरेबिक 'मुन्सिफ'पासून दाखविला आहे. साधारणतः ह्याच दर्जाचे एतद्देशीय लोक न्यायखात्यातील सर्वात खालच्या पातळीवरच्या 'मुन्सिफ' ह्या हुद्द्यावर नेमले जात.) व्यापारी पत्रव्यवहारासाठी Moorh लिपीचा उपयोग सर्वत्र केला जात असला तरी Devu Nuguri लिपि सर्व वरच्या दर्जाच्या पुस्तकांसाठी वापरली जाते आणि व्याकरणातील बारकावे दाखविण्यासाठी ती अधिक उपयुक्त आहे म्हणून पुस्तक त्या लिपीमध्ये आहे असाहि उल्लेख प्रस्तावनेमध्ये आहे. पुस्तक books.google.com येथे e-book ह्या स्वरूपात येथे उपलब्ध आहे.

पुस्तकाच्या अखेरीस काही पानांवर भाषा कशी बोलली आणि वापरली जाते ते कळावे म्हणून काही संवाद छापले आहेत. मोल्सवर्थ-कँडी आणि त्यांचे पंडित ह्यांनी वळण लावण्यापूर्वी मराठी भाषा कशी होती हे दिसावे, तसेच तत्कालीन व्यवहारांची माहिती व्हावी अशासाठी त्यातील दोन संवाद खाली चित्ररूपाने चिकटवीत आहे.












धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

दिल्या घेतल्या वचनांची...

काही दिवसांपूर्वी बसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघातांचा’ हे वाक्य लिहिलेलं वाचलं आणि अचानक लक्षात आलं, की ‘शून्य’ हे संख्यावाचक विशेषण वापरलं की त्याचे विशेष्य अनेकवचनात वापरले जाते.

हे नेहमीच होते असे नाही. जसे, काही बसेसमध्ये ‘आजचा दिवस शून्य अपघाताचा’ हे वाक्य मी वाचले आहे. परंतु जास्त करून शून्यचे विशेष्य
एकवचनात वापरले तर खटकते, असे माझ्या लक्षात आले.
उदा.
* आज शून्य मूल आले होते. (* चा अर्थ- हे वाक्य व्याकरणदृष्ट्या चुकीचे आहे)
आज शून्य मुले आली होती.
* मी आज शून्य पोळी खाल्ली.
मी आज शून्य पोळया खाल्ल्या.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

पाने

Subscribe to RSS - भाषा