अनेक चित्रपटांत तो दिसतो. कधी पार्टीमध्ये हातात चषक घेऊन, तर कधी सगळं रामायण घडून गेल्यावर एण्ट्री मारणारा पोलिस ऑफिसर म्हणून. त्यातल्या त्यात उल्लेखनीय म्हणजे, ‘दामिनी'मध्ये ज्या जज साबला सनी देओल ‘तारीख पे तारीख’वरचं लेक्चर सुनावत असतो, तो जज साब ‘तो'च होता. किंवा ‘इश्क'मध्ये जॉनी लिवर एका पार्टीमध्ये एका आगंतुक पाहुण्याची मजा उडवतो, तो आगंतुक पाहुणा म्हणजे ‘तो'. ‘तो'ला नाव गाव काही नाही. ‘तो’ बहुतेक इथे हिरो बनायला आला असेल. आता तर तो डायनॉसॉरसारखा नामशेष झाला असेल.