मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का? - व्यवसायाची सद्यस्थिती

(संपादक : चित्रपट वितरणाच्या रूढ मार्गांनी 'पुणे - ५२'ला प्रेक्षकांपर्यंत पोहोचता न आल्यामुळे अखेर निर्मात्यांनी स्वतःच अधिकृतरीत्या चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध करून दिला. त्या निमित्तानं सुरू झालेली मराठी चित्रपटांच्या सद्यस्थितीविषयीची चर्चा 'पुणे - ५२'वरच्या धाग्यात अवांतर होऊ लागल्यामुळे वेगळी केली आहे.)

अपरिमेय ह्यांचं उद्धृत :

>> युट्युबवर चित्रपट टाकून पैसे कमवता येऊ शकतात याची मराठी चित्रपटनिर्मात्यांना कल्पना आहे का? चित्रपटादरम्यान जाहिराती दाखवून किंवा सरळसरळ २-४$ ला एक वेळा बघण्याचे हक्क विकून. जर मला हा चित्रपट पैसे देउन घ्ररबसल्या बघण्याचा पर्याय उपलब्ध असता तर मी नक्कीच बघितला असता.<<

काही लोकांसाठी असा पर्याय शक्य आहे, पण मराठी अन् त्यातदेखील व्यावसायिक गणितांत न बसणारे चित्रपट पाहायला पुरेसे लोक तयार नसतात आणि वितरक/जाहिरातदारांनादेखील रस नसतो.

एक ताजी बातमी : एका नव्या मराठी चित्रपटाला मुंबई-पुण्यात वितरक मिळाला, पण कोल्हापूरमध्ये मिळाला नाही. कारण काय, तर 'सिनेमात नाचगाणी नाहीत; बाया नाहीत (म्हणजे 'स्टार', कारण सिनेमात स्त्री व्यक्तिरेखा आहेत आणि त्याही 'फू बाई फू' किंवा तत्सम कार्यक्रमांतून लोकांना परिचित असलेल्या, पण इथे त्या अभिनय करतात, नाचत-गात नाहीत!); मग असले सिनेमे पाहणार कोण? जो थोडा वर्ग अशा सिनेमांना जातो त्यांना ते फेस्टिव्हलमध्ये नाही तर आणखी कुठे (पक्षी : पायरेटेड वगैरे) पाहायला मिळतातच. थोडक्यात, आमच्याकडे पुन्हा येऊ नका.'

दुसरी ताजी बातमी : मराठी सिनेमात 'बूम' आल्याकारणानं आता वर्षाकाठी ६०-७० सिनेमे तयार होतात. इतक्या सिनेमांमध्ये पैसे घालायला टी.व्ही. चॅनलसुद्धा तयार होत नाहीत. 'बालक पालक' किंवा 'दुनियादारी' हे त्यांच्यासाठी जाहिरातींद्वारे पैसे कमावणारे सिनेमे. बाकी अनेकांना कुणी वाली नाही.

मी ह्यांचं उद्धृत :

>>नितीन महाजन जर असे चित्रपट देऊ शकत असेल तर खरच दिवस चांगले आले आहेत. <<

किंचित तपशीलाची दुरुस्ती : निखिल महाजन. 'चांगले दिवस' : वरच्या बातम्या पाहा. अखेर सिनेमा हे तंत्राधिष्ठित आणि म्हणून खर्चिक माध्यम आहे. स्वतःचे पैसे घालून सिनेमे करत राहाणं अव्यावहारिक आहे. त्यामुळे हे मॉडेल 'सस्टेनेबल' नाही.

ह्या विषयाशी संबंधित पूर्वी झालेली एक चर्चा -
मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का?
मराठी चित्रपटांना बरे दिवस आले आहेत का? (उत्तरार्ध)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

>>वरच्या बातम्या पाहा.
>>अखेर सिनेमा हे तंत्राधिष्ठित आणि म्हणून खर्चिक माध्यम आहे. स्वतःचे पैसे घालून सिनेमे करत राहाणं अव्यावहारिक आहे. त्यामुळे हे मॉडेल 'सस्टेनेबल' नाही.

मान्य, पण हे तर वास्तव आहे, त्याला स्विकारून लोकप्रिय आणि मग निश अशा चित्रपटांची निर्मिती करणं शक्य का नाही? हिच गत आशयपूर्ण कंटेंट देणार्‍या मासिक प्रकाशकांची आहे, 'तत्त्वाला' मुरड घालणं शक्य नाही असं म्हणत अनेक वर्ष त्याच स्केलवर काम करत रहाणं ह्यात कुठलं भुषण आहे ते नक्की समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकप्रिय आणि मग निश अशा चित्रपटांची निर्मिती करणं शक्य का नाही?

https://www.youtube.com/watch?v=hot8sW38we4
ही व्हीडो पहा. अनुराग कश्यपचं भाषण आहे. त्यात त्यानी हेच म्हटलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> 'तत्त्वाला' मुरड घालणं शक्य नाही असं म्हणत अनेक वर्ष त्याच स्केलवर काम करत रहाणं ह्यात कुठलं भुषण आहे ते नक्की समजत नाही.<<

सध्या गंमत अशी आहे की जे तत्त्वाला मुरड घालून सुवर्णमध्य साधू पाहात आहेत त्यांनाही वितरक मिळायला अडचण येते आहे. 'बालक पालक' आणि 'दुनियादारी' ही दोनच सस्टेनेबल मॉडेल्स आहेत. Smile

>> अनुराग कश्यपचं भाषण आहे. त्यात त्यानी हेच म्हटलं आहे. <<

हा पाहा अनुराग कश्यपनं निर्मिलेला मराठी सिनेमा. तो तुम्ही म्हणता तसा आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचला का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण "७२ मैल एक प्रवास " हा परवा कोणत्यातरी च्यानलवर लागला होता.
बर्‍यापैकी जाहिरातीही होत्या. थेट्रात मात्र कमी गर्दी होती, मी पहिल्याच आटह्वड्यात गेलो होतो तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

'७२ मैल'ची केस स्टडी रोचक आहे. अक्षय कुमारची पहिली मराठी निर्मिती होती. सिनेमा २०१२च्या अखेरीला तयार होता. पण चित्रपटगृहात लागेपर्यंत जवळपास वर्ष गेलं. त्यातच दिग्दर्शक राजीव पाटील ह्यांचं निधन झालं. दरम्यान, चित्रपटाला बहुतेक काही पुरस्कारही मिळाले असावे. स्मिता तांब्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. तरीही, थिएटरमध्ये चालायला हे पुरेसं झालं नाही. अगदी मुंबई-पुण्यात पहिल्या आठवड्यातही त्याला कमी गर्दी लाभली. चित्रपट लहान मुलांभोवती फिरत असूनही अजिबात गोडगोड नव्हता हे कदाचित त्यामागचं कारण असावं. आता चॅनलला विकताना मात्र गेल्या वर्षीच्या ६०-७० चित्रपटांमध्ये तो ह्या कारणांनी कदाचित उजवा ठरला असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मागील आठवड्यात फँड्री एका च्यानलवर लागला होता.
आसपासच्या मंडळींमध्ये तो चित्रपट थेटरात न पाहिलेलीच मंडळी अधिक होती.
त्यांना टीव्हीवरही पाहण्यात रस नसेल असं वाटलं. पण प्रत्यक्षात माझ्या अपेक्षेहून खूपच अधिक लोकांनी तो पाहिला.
(आता नक्की क्वांतिफाएबल करता येणार नसल्यामुळं हा मुद्दा सोडून देउ.)
पण शहरात काही ठिकाणी त्या चित्रपटाच्या टीव्हीवरील प्रसारणाच्या जाहिरातीचे फ्लेक्स बोर्ड्ही लागले होते.
मग पिच्चरचं गणित दुनियादारी - बालक पालक मॉडेल सोडल्यास जमणं कठीण आहे; ते म्हटलय ते नेमकं का म्हटलय असा प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

त्या चॅनेलवरच्या 'जाणिव झाली बदल हवा' ने वात आणला होता त्यामुळे चित्रपट पाहिला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेम हियर.
पण मी थेट्रात पाहिला होता; त्यामुळे चित्रपट हुकला म्हणून फार वाईट वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>> मग पिच्चरचं गणित दुनियादारी - बालक पालक मॉडेल सोडल्यास जमणं कठीण आहे; ते म्हटलय ते नेमकं का म्हटलय असा प्रश्न पडला. <<

खालच्या माझ्याच प्रतिसादातून उद्धृत -

'पुणे ५२' आणि 'फँड्री'मध्ये एक मोठा फरक आहे. 'फँड्री'नं (किमान मुंबई-पुण्यात) काही कोटींचा धंदा केलेला आहे; त्याला अनेक पारितोषिकं मिळाली आहेत; त्याची एक हवा झाली आहे. त्यामुळे त्याला अधिकृत वितरणपद्धतीचा (टी.व्ही. हक्क, डीव्हीडी हक्क) वगैरे फायदा मिळेल असं वाटतं.

हवा झालेली असल्याचा असा फायदा 'फँड्री'ला खरंच मिळाला. पण ज्याला रसिकमान्यताही मिळाली आणि ज्याची हवा झाल्यामुळे वितरणाला फायदाही झाला असा एखादाच अपवाद असतो. ते सस्टेनेबल मॉडेल म्हणून उभं राहिल्याचं सध्या तरी दिसत नाही, किंवा हवं तर ते एक प्रकारे 'बालक-पालक' मॉडेलमध्येच समाविष्ट करता येईल. 'बालक-पालक'ला तेवढी रसिकमान्यता नव्हती, पण अजिबातच नव्हती असंही नाही; विषय जिव्हाळ्याचा असल्यामुळे लोक आकर्षित झाले असावेत. 'फँड्री'च्या बाबतीतही जातीयता हा विषय अनेकांच्या जिव्हाळ्याचा होता. टीव्ही चॅनलतर्फे त्याची व्यवस्थित पब्लिसिटी केली गेली. त्याला एक सामाजिकतेची झालर लावून त्याच्या जोरावर ती केली गेली. अगदी डेली सोपमध्ये तसे प्रसंग घुसवून सिनेमाची पब्लिसिटी केली गेली. सेलिब्रिटींना वापरलं गेलं. त्या सगळ्याचा जोर इतका होता की हे सगळं काहींना आक्षेपार्हही वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हं
हे पटतय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला या चर्चेतून मिसळपाव.कॉम वरचा (बहुदा) मेघनाचा 'अग्रलेख' आठवतो.
चांगली कमळ जन्माला यायला भरपूर चिखलही असावा लागतो किंवा बरेच टुकार चित्रपट निघोत पण भरपूर संख्येने (कसेही चांगले/वाईट) चित्रपट निघाल्याशिवाय चांगले चित्रपट निघायची शक्यता वाढत नाही, असे काहिसे म्हणणारा.

मेघना, दुवा आहे? मी ही शोधतोय, मिळाला की देतो.
दुवा मिळाला.. हा घ्या .. ऐश करो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी चित्रपटांचे किंवा एकंदरीतच चित्रपटांचे अर्थकारण कसे चालते आणी वितरणप्रक्रिया काय असते याची मला माहिती नाही. माझा अंदाज आहे की वितरणाचे हक्क सामान्यतः एका भूभागापुरते मर्यादित असतात. मराठी चित्रपट अमेरिका किंवा युरोपमधील (मेनस्ट्रीम) चित्रपटगृहात लागण्याची तर काहीच शक्यता नाही. त्यामुळे तेथील वितरणाचे हक्क घ्यायला कोणी उत्सुक असेल असे मला वाटत नाही.
तुमच्या प्रतिसादातील हे वाक्य समजले नाही

काही लोकांसाठी असा पर्याय शक्य आहे, पण मराठी अन् त्यातदेखील व्यावसायिक गणितांत न बसणारे चित्रपट पाहायला पुरेसे लोक तयार नसतात आणि वितरक/जाहिरातदारांनादेखील रस नसतो.

निर्माता स्वतः टाकू शकतो की. युट्युबवर रीजन ब्लॉक करता येते. भारतात व्यवसायिक वितरणासाठी चित्रपट दिला असल्यामुळे भारतात ब्लॉक करायचा. भारताबाहेर जर कोणाला विकत घेउन (किंवा जाहिराती बघत) चित्रपट बघावासा वाटला तर निर्मात्याचा फायदा. कोणी नाही बघितला तर नुकसान काहीच नाही, युट्युबवर टाकायला खर्च काहीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातल्यांनी बाहेरच्यांना सांगून डौन्लोडवला पिच्चर तर??? भारतीय तेवढे हरामी नक्कीच आहेत. त्यात परत गूगल डाईव्ह सारख्या सुविधेमुळे १-२ जीबी इज़ चिंधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपरिमेय यांचा मुद्दा वेगळा असावा.
सध्या ज्या भागात चित्रपट वितरीत होत नाही, त्यातही विशेषतः भारताबाहेर व ज्या चित्रपटांची डिव्हिडी निघण्याची व ती आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरीत व्हायची शक्यता नाही - अश्या चित्रपटांना बाहेर अधिकृतपणे बघणारा पेक्षक सध्या शुन्य आहे

युट्युबवर पैसे/जाहिराती लाऊन दाखवला तर अधिकृतपणे बघणार्‍या प्रेक्षकाला संधी मिळेल व चित्रपटाला शुन्यपेक्षा अधिक इन्कम खचितच होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ते आहे म्हणा, पण मराठी पिच्चरचं मार्केट्ट बघता ते ० पेक्षा जास्त असले तरी उल्लेखनीय खचितच नसेलसे वाटते. असो. हा निराशावाद अस्थानी ठरला तर त्यासारखे सुख नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हो, हाच मुद्दा आहे. चित्रपट तर तयार आहे आणी आंतरराष्ट्रीय स्तरावर वितरीत करण्याची किंमत शुन्य आहे तर का करू नये? झालाच तर फायदा होइल, नुकसान होणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी चित्रपट विकत घेऊन पहाणार्‍यांची संख्या बघता ते आर्थिक गणित फारसे आकर्षक नाही, त्यापेक्षा फुकट दाखवल्यास जास्त प्रेक्षक लाभतील आणि 'कदाचीत' प्रेक्षकाची आस्वादकता पुढच्या वेळेस कणभर का होईना वाढली असेल ज्याचा फायदा पुढच्या रिलीजला होऊ शकेल.

सई ताम्हणकरच्या नावाखाली मात्र गल्ला गोळा करण्याची क्षमता चित्रपटामधे होती, एरवी कुठल्याही मुख्य धारेतल्या निर्मात्याने तेच केलं असतं पण इथे उच्चभ्रुपणापायी ते टाळलं असावं का?

किंवा वरच्या दोन विधानातच ह्याचं उत्तर आहे, व्यवसायिक यशासाठी चित्रपट बनवलाच नाही असे वाटण्याचीच हि कारणे आहेत, म्हणजे कुठल्याच अर्थी रुढ चित्रपट व्यवसायिकता ह्या चित्रपटाच्या बाबतीत आढळत नाही किंवा फारच कमी आढळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> भारताबाहेर जर कोणाला विकत घेउन (किंवा जाहिराती बघत) चित्रपट बघावासा वाटला तर निर्मात्याचा फायदा. कोणी नाही बघितला तर नुकसान काहीच नाही, युट्युबवर टाकायला खर्च काहीच नाही. <<

अनुभव नाही, त्यामुळे ह्यावर मी फारसं मत देऊ शकत नाही. मात्र, आतापावेतो परदेशस्थ मराठी माणसांच्या आणि त्यांनी चालवलेल्या बृहन्महाराष्ट्र वगैरे मंडळांच्या सांस्कृतिक रुचीविषयी जे ऐकून आहे ते पाहता असं वाटतं की असा वर्ग (ज्यांना वेगळा मराठी सिनेमा पाहायचा आहे, आणि जे त्यासाठी पैसेही मोजतील) फार मर्यादित आहे. त्यामुळे निर्माते त्याविषयी विचारही करत नसावेत. 'फँड्री'चे काही खेळ नुकतेच अमेरिकेत आयोजित केले गेले होते. त्याच्या आर्थिक गणिताविषयी आणि त्याला मराठी माणसांच्या मिळालेल्या प्रतिसादाविषयी इथले काही सदस्य अधिक सांगू शकतील. त्यावरून कदाचित अंदाज येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

स्वानुभवाप्रमाणे असा मराठी वर्ग जे पैसे देऊन मराठी सिनेमे पहायला उत्सुक असतील असा वर्ग मोठा आहे. त्या वर्गाला 'पुणे ५२' सारखे चित्रपट आवडतील का, रुचतील का हा वेगळा प्रश्न आहे पण त्याबद्दलच्या कुतुहलापोटी तरी पैसे देऊन मराठी सिनेमे पहाणारे लोक बरेच आहेत. हे लोक सध्या भारतातून डीव्हीडीज (उपलब्ध असल्यास) आणून मग एकमेकांना उसन्या देतात असा अनुभव आहे. देऊळ, विहीर वगैरे सिनेमे अशा गटांमधून फिरत असलेले पाहिलेय आणि त्यावर मुबलक चर्चा घडतात असे दिसतेय. यूट्यूबवर जाहिरातींच्या मार्गाने किंवा जालावर पैसे देऊन पहाण्याच्या उपलब्धतेने निर्मात्यांना नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो असे वाटते.
मुळातच मराठी माणसे उत्तर अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की त्यात वेगवेगळ्या अभिरुचीची माणसे दिसतात, त्यांच्या अभिरुचीबद्द्ल केलेल्या सरसकटीकरणाचा निषेध :-)!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेचदा टॉरेंट, कॅमद्वारे चित्रित केलेली पायरेटेड प्रत अशा गोष्टी केवळ नाइलाजाने बघाव्या लागतात.
जर उत्तम (HD) दर्जाची प्रत जालावर मिळाली, आणि त्यासाठी पैसे मोजावे लागले, तरी लोक नक्की बघतात असा अनुभव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर उत्तम (HD) दर्जाची प्रत जालावर मिळाली, आणि त्यासाठी पैसे मोजावे लागले, तरी लोक नक्की बघतात असा अनुभव आहे.

सहमत आहे. टोरंटवाली दळिद्री प्रिंट पाहिल्यानंतर चित्रपट आवडला असेल तर चांगल्या प्रतीसाठी पैसे मोजायची तयारी असते.

नपेक्षा नेटफ्लिक्सवर चित्रपट आला तर फार पैसे खर्च करता चित्रपट बघता येतात, असं वाटतं. त्यातून निर्मात्यांना किती पैसे मिळतात याची मात्र कल्पना नाही. 'विहीर' नामक चित्रपट आहे हे नेटफ्लिक्सला माहित आहे, पण त्यांच्याकडे तो उपलब्ध नाही. 'पुणे ५२' आणि 'फँड्री'चं अस्तित्त्व नेटफ्लिक्सला माहितही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

@टोरंटवाली दळिद्री प्रिंट ... बरेचदा चांगल्या चित्रपटाची वाईट प्रिंट पाहून त्याबद्दलचे मत खराब झाले आहे. न पेक्षा उत्सुकता ताणून ठेवून नंतर उच्च दर्जाची प्रिंट बघणे केव्हाही श्रेयस्कर.
मराठी चित्रपट आणि नेट्फ्लिक्स - कल्पना नाही. तिथे हिंदी आणि तामिळ चित्रपट दिसले आहेत. कदाचित मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर ते नवे चित्रपट आणत असतील का? म्ह्णजे बर्याच जणांनी "पुणे ५२" साठी request केली तर तो चित्रपट नेट्फ्लिक्सवर येऊ शकेल का? निदान पब्लिक लायब्ररीत तरी ह्या तत्वावर पुस्तकं मिळतात असा अंदाज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्याच जणांनी "पुणे ५२" साठी request केली तर तो चित्रपट नेट्फ्लिक्सवर येऊ शकेल का?

माझ्या मते होय. नेटफ्लिक्सच्या यादीत नसणाऱ्या चित्रपटांची, उदा - पुणे ५२, फँड्री, इ, मागणी कशी करावी, याचं समाधानकारक उत्तर सापडलं नाही. इथे जे उत्तर दिलेलं आहे ते मला अंमलात आणता आलं नाही. पण 'विहीर' बघायचा आहे असं बऱ्याच लोकांनी सांगितलं तर फरक पडेल, अशी आशा आहे.

(आमच्याकडे, पब्लिक लायब्ररीत, पुस्तक किंवा चित्रपट हवा आहे हे एखाद्या सदस्याने सांगितलं तरी पुरतं. आत्तापर्यंत कोणता विचित्र सिनेमा, पुस्तक सुचवून पाहिलेलं नाही. पण आता विषय निघालेलाच आहे तर 'विहीर' सुचवून पाहिला पाहिजे. अर्थात त्याची डीव्हीडी बाजारात असली पाहिजे. मला आत्ता गुगलून काही सापडलं नाही. कदाचित नेटफ्लिक्सची तीच अडचण होत असेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी नेटफ्लिक्सवर पाहिला आहे. आणखी १ मराठी चित्रपट दिसला होता पण आता नाव आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसता "पाहिला आहे" असे का म्हणता ?
कसा वाटला तेही सांगा की जरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चित्रपट चांगला मनोरंजक वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांना वेगळा मराठी सिनेमा पाहायचा आहे, आणि जे त्यासाठी पैसेही मोजतील

हे का ते समजले नाही. तद्दन गल्लाभरू चित्रपट पण चालतील की. तुम्ही बृहन्महाराष्ट्र वगैरे मंडळांच्या सांस्कृतिक रुचीविषयी जे काही ऐकले आहे ते जर खरे असेल तर उलट असे चित्रपट जास्त चालतील की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तद्दन गल्लाभरू चित्रपट पण चालतील की. तुम्ही बृहन्महाराष्ट्र वगैरे मंडळांच्या सांस्कृतिक रुचीविषयी जे काही ऐकले आहे ते जर खरे असेल तर उलट असे चित्रपट जास्त चालतील की. <<

तद्दन गल्लाभरू चित्रपट पैसे मोजून किंवा न मोजता पाहायला मिळणं परदेशस्थ मंडळींना आजदेखील दुरापास्त नसावं असा माझा अंदाज आहे. परदेशस्थ मंडळींच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठी चित्रपट पैसे मोजून अधि़कृतपणे बघण्याचे कुठलेही मार्ग अमेरिकेत उपलब्ध नाहीत. बाकिच्या देशांतही नसावेत असा अंदाज आहे. बरेच व्यवसायिक हिंदी चित्रपट चित्रपटगृहात लागतात. अत्यंत मर्यादित प्रेक्षकसंख्येमुळे मराठी चित्रपटांच्या बाबतीत हे होइल असे वाटत नाही. पैसे न मोजता अनधिकृतपणे बघण्याचे काही मार्ग उपलब्ध आहेत.

एक उदाहरण द्यायचे झाले तर या इथे राजश्री ने "तो मी नव्हेच" उपलब्ध करून दिले आहे. मला बघायला फुकट आहे, फक्त काही जाहिराती बघाव्या लागतात, सुमारे १३ मिनिटांनी एक जाहिरात. पुणे ५२ युट्युबवर टाकल्यापासून आतापर्यंत ७०४१ लोकांनी तो बघितला आहे. त्यांनाही हे करता आले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> अत्यंत मर्यादित प्रेक्षकसंख्येमुळे मराठी चित्रपटांच्या बाबतीत हे होइल असे वाटत नाही. पैसे न मोजता अनधिकृतपणे बघण्याचे काही मार्ग उपलब्ध आहेत.
एक उदाहरण द्यायचे झाले तर या इथे राजश्री ने "तो मी नव्हेच" उपलब्ध करून दिले आहे. मला बघायला फुकट आहे, फक्त काही जाहिराती बघाव्या लागतात, सुमारे १३ मिनिटांनी एक जाहिरात. पुणे ५२ युट्युबवर टाकल्यापासून आतापर्यंत ७०४१ लोकांनी तो बघितला आहे. त्यांनाही हे करता आले असते. <<

तुमचा नेमका मुद्दा काय आहे ते समजण्यात मी बहुधा अपयशी ठरतो आहे. माझा मुद्दा एवढाच आहे -

  1. तद्दन गल्लाभरू मराठी चित्रपटांना परदेशस्थांमध्ये मर्यादित, पण 'पुणे-५२'सारख्या वेगळ्या वाटेवरच्या चित्रपटांहून अधिक प्रेक्षकसंख्या आहे.
  2. त्या (आणि आंतरदेशीय) मागणीच्या जोरावर गल्लाभरू चित्रपटांच्या पायरेटेड अनधिकृत आवृत्त्या आजही उपलब्ध होतात, किंवा मोजके परदेशस्थ आपल्या भारतवारीत त्यांच्या डीव्हीड्या वगैरे घेऊन जातात.
  3. त्यामुळे गल्लाभरू चित्रपटांसाठीसुद्धा परदेशस्थांसाठी अधिकृत आणि पैसे मोजून चित्रपट उपलब्ध करण्यात वितरकांना रस कमी असावा.
  4. 'पुणे-५२'सारख्या चित्रपटांना तेवढीही प्रेक्षकसंख्या नसल्यामुळे त्याची पायरसी करण्यातदेखील लोकांना कमी रस असावा. त्यातून परदेशस्थांकडून अधिकृतरीत्या उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करण्यात तर त्याहून कमी रस असावा.
  5. त्यासाठी श्रम-वेळ-निधी किती खर्च होतो हा मुद्दा नाही; तर त्याचा आरओआय किती असा हा मुद्दा असावा.
  6. त्यापेक्षा फुकटात आणि सबटायटल्ससह उपलब्ध करून दिला, तर भौगोलिक आणि भाषिक सीमारेषा भेदून चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल तरी, असं तर्कशास्त्र असावं. पैसे मोजायला लागत असते तर ७,००० प्रेक्षकसंख्या लाभली नसती हे उघड आहे.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

युट्युबवर पुणे ५२ चे जवळपास ३३००० लोकांनी बघितला आहे. हा चित्रपटात जर युट्युब मार्फे जाहिराती टाकल्या असत्या तर निर्मात्यांना जवळपास ३००$ मिळाले असते (हा माझा अंदाज आहे). या जाहिराती टाकायला फक्त एक क्लिक करायला लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> हा चित्रपटात जर युट्युब मार्फे जाहिराती टाकल्या असत्या तर निर्मात्यांना जवळपास ३००$ मिळाले असते (हा माझा अंदाज आहे). या जाहिराती टाकायला फक्त एक क्लिक करायला लागते. <<

चित्रपटाची निर्मिती बहुधा श्रीरंग गोडबोल्यांच्या 'इंडियन मॅजिक आय'ची होती. ही सूचना तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता. मात्र, ३००$ ही रक्कम त्यांच्यासाठी फारच किरकोळ असली तर मला नवल वाटणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'फँड्री'चे काही खेळ नुकतेच अमेरिकेत आयोजित केले गेले होते. त्याच्या आर्थिक गणिताविषयी आणि त्याला मराठी माणसांच्या मिळालेल्या प्रतिसादाविषयी इथले काही सदस्य अधिक सांगू शकतील.

यातला एक खेळ मी ऑस्टीनमध्ये पाहिला.

मला त्याबद्दल माहिती समजली फेसबुकावरून. पुण्यात राहणाऱ्या मित्राने ऑस्टीनमध्ये खेळ आहे आणि कोणत्या दिवशी आहे ते सांगितलं. पुढे नागराज मंजुळेच्याच फेसबुक पानावरून कुठे आहे ते समजलं. जिथे खेळ आयोजित केला होता ते ऑडीटोरियम २०० पेक्षा जास्त क्षमतेचं नसावं. पैकी साधारण १/३ खुर्च्या भरलेल्या होत्या. ऑस्टीनमध्ये किती भारतीय आणि मराठी लोक आहेत याची मला कल्पना नाही. महाराष्ट्र मंडळाच्या गणसंख्येबद्दलही काही कल्पना नाही. पण (उपनगरं, सॅटेलाईट टाऊन्स वगळता) खुद्द ऑस्टीनमध्ये माझ्या माहितीची निदान १० भारतीय रेस्टॉरंट्स आहेत, त्यावरून भारतीयांची संख्या फार कमी नसावी असा तर्क आहे.

हा खेळ आयोजित केला होता विद्यापीठाच्या 'साऊथ एशियन स्टडीज' विभागाने. विभागप्रमुख मूळचा पाकिस्तानी (आणि पोटापाण्यासाठी मानववंशशास्त्रज्ञ). विभागाचं काम करणारे बाकीचे लोकही मराठी वाटले नाहीत, निदान मी ज्यांच्याशी बोलले त्यांच्यापैकी कोणीच मराठी नव्हते, चेहेरेही टिपीकल मराठी म्हणावेतसे नव्हते, सर्वसाधारण भारतीय चेहेरे. 'फँड्री' अमेरिकेत आणण्यात सगळ्यात मोठं काम केलं ते आंबेडकर मिशन या संस्थेने. चित्रपट बघायला आलेल्या लोकांपैकी फार कोणी लोक मराठी होते असं वाटलंही नाही, खेळ संपल्यावर नंतर ज्या गप्पा झाल्या त्यावरून हा अंदाज. काही आज्या एका शिक्षिकेसोबत आल्या होत्या, आज्यांच्या कपड्या-दागिन्यांवरून त्या दक्षिण भारतीय आहेत एवढंच माझ्या लक्षात आलं. बाकीचे बहुतांश प्रेक्षकांबद्दल त्यांचे कपडे, चेहेरे पाहून हे लोक 'युनिव्हर्सिटीवाले' वगळता अन्य कोणी असणं शक्य नाही असा समज झाला. (पण हा माझा स्टीरीओटाईप.)

ठराविक ठिकाणी लोकांचा इन्स्टंट हशा ऐकायला आल्यामुळे प्रेक्षकांमध्ये मराठी समजणारे बरेच असावेत असं आधी वाटलं. पण नंतरच्या गप्पांमध्ये, मूळच्या गयेच्या जवळ राहणाऱ्या एका पोस्टडॉकची प्रतिक्रिया बोलकी वाटली, "हे खेडं असंच्या असं बिहारमध्ये उचलून ठेवलं तरीही वस्तुस्थिती दाखवली असंच म्हणावं लागेल."

साधारण महिनाभर आधी कार्यक्रम ठरूनही स्थानिक भारतीय वाण्याकडे याबद्दल काहीही माहिती नव्हती. (इतर बऱ्याच दांडीया, भांगड्यांच्या तिकिटविक्रीच्या जाहिराती तिथे पाहिल्या आहेत.) खेळाची वेळ एका गुरूवारी संध्याकाळी ७-९ अशी होती. त्यामुळे हा सगळा एकूणच हौशी मामला असावा असा माझा समज झाला. चित्रपटानंतर झालेली प्रश्नोत्तरं भारत आणि इंडियात अजूनही फरक आहे, तो कसा आहे, अशा प्रकारचीच होती. (त्यात नागराज तिथे नसणं हे ही एक मुख्य कारण असेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फँड्री बघण्यासाठी कायपण करायची तयारी होती. पण आमच्या चेंब्याला(खुर्द) काही नागनाथ येउ शकला नसावा. असो.
म्हणून जालावर पहायचा असं ठरवलं. "आपली मराठी" ह्या संस्थळावर एक जाहिरात दिसली - कदाचित अजूनही असेल- संस्थळाला देणगी द्या आणि चित्रपट पहा.
आता इथे या संस्थ़ळाने काय केलं? तर यूट्यूबवर हा चित्रपट एका private link द्वारे उपलब्ध करून दिला.
संस्थळाला भुर्दंड - शून्य.
संस्थ़ळाला फायदा - किमान १०$, जी किमान देणगी आहे.
नागनाथ मंजुळे/ फँड्री टीमला फायदा - शून्य.

संस्थ़ळाची चूक नाही. त्यांना देणगी मागायचा पूर्ण हक्क आहे.
वाईट वाटलं, ते टीम नागनाथ आणि चित्रपटाच्या खर्या निर्मात्यांना माझे पैसे न गेल्यामुळे.
जर पुणे ५२ सारखा चित्रपट यूट्यूबवर येउ शकतो, तर फँड्रीसुद्धा येउ शकावा. जर निर्मात्यांनीच असे चित्रपट यूट्यूबवर किंवा जालावर कुठेही टाकले (सशुल्क) तरीही परदेशस्थित लोक नक्कीच बघतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> संस्थ़ळाची चूक नाही. त्यांना देणगी मागायचा पूर्ण हक्क आहे.
वाईट वाटलं, ते टीम नागनाथ आणि चित्रपटाच्या खर्या निर्मात्यांना माझे पैसे न गेल्यामुळे. <<

ह्यात एक मूलभूत गोंधळ आहे. चित्रपटाचे हक्क ज्याच्याकडे आहेत त्याच्या संमतीविना अशी देणगी मागून चित्रपट दाखवणं बहुधा बेकायदेशीर आहे.

>>जर पुणे ५२ सारखा चित्रपट यूट्यूबवर येउ शकतो, तर फँड्रीसुद्धा येउ शकावा. जर निर्मात्यांनीच असे चित्रपट यूट्यूबवर किंवा जालावर कुठेही टाकले (सशुल्क) तरीही परदेशस्थित लोक नक्कीच बघतील. <<

'पुणे ५२' आणि 'फँड्री'मध्ये एक मोठा फरक आहे. 'फँड्री'नं (किमान मुंबई-पुण्यात) काही कोटींचा धंदा केलेला आहे; त्याला अनेक पारितोषिकं मिळाली आहेत; त्याची एक हवा झाली आहे. त्यामुळे त्याला अधिकृत वितरणपद्धतीचा (टी.व्ही. हक्क, डीव्हीडी हक्क) वगैरे फायदा मिळेल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सबटायटल किंवा डब करून जोरदार मार्केटींग शक्य आहे का? मला वाटतं अनाहत साठी हेच केलेलं ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशामुळे चित्रपटातिल चांगलि गाणि पण उशिराने आपल्या पर्यन्त पोह्चतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0