'दिल चाहता है'च्या निमित्ताने

>> दिल चाहता है मधलं ते "सिध" चं किरदार आठवा. की जो चित्रं काढतो, (एकतर्फी का होईना पण) प्रेम करतो, मित्रांबरोबर पार्टीला (डिस्को मधे)/गोव्याला जातोच, गप्पाटप्पा करतोच, मौजमजा करतोच. पण तरीही व तेव्हाही काहीसा तनहा असतो. <<

मला हे पात्र हिंदी सिनेमावाल्यांच्या डोक्यातल्या संवेदनशील रोमॅन्टिक कलावंत वगैरे पुरुषांविषयीच्या महाप्रचंड आणि अडाणी ठोकळेबाज कल्पनांचं (क्लीशेंचं) प्रातिनिधित्व करणारं वाटलं होतं. जिच्या प्रेमात पडलोय त्या बयेला समोर बसवून तिचं चित्र काढण्याची इच्छा तिच्यापाशी व्यक्त करणं म्हणजे (होमवर्कमध्ये मदत करण्यासारखा) फ्लर्टिंगचा एक खूपच जुना नुस्खा आहे हे वेगळं सांगायला नको. त्यातच, त्यानं काढलेलं चित्र म्हणून जे काय दाखवलं होतं त्यामुळे आणि त्या नरपुंगवाच्या अभिनयकौशल्यामुळे थिएटरमध्ये मी पोट धरून लोळलो होतो. पण असो; कुणाला त्यात आपण स्वतः वगैरे दिसत असेल, तर असेल बुवा ते तसं.

व्यवस्थापकः
या प्रतिसादाच्या निमित्ताने सुरू झालेली चर्चा अधिक विस्ताराने व विविधांगाने व्हावी या उद्देशाने वेगळी काढत आहोत.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

सहमत. (चिंतातुर जंतू यांच्याशी आज चक्क दोन वेळा सहमत). मला दिल चाहता है हा चित्रपटच ओवररेटेड वाटला. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आईशप्पत...!!! मला तर सिद च पात्र महापकाउ वाटलं होतं...पण बर्‍याच जणांना त्यात बरच काही काही आढळून आल्यामुळे असं लिहायला बाकबुक होत होतं....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Nobody is perfect. समजु शकतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मला हे पात्र हिंदी सिनेमावाल्यांच्या डोक्यातल्या संवेदनशील रोमॅन्टिक कलावंत वगैरे पुरुषांविषयीच्या महाप्रचंड आणि अडाणी ठोकळेबाज कल्पनांचं (क्लीशेंचं) प्रातिनिधित्व करणारं वाटलं होतं.

सहमत, अगदी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधल्या नसिर पर्यंत सगळे ऑल्मोस्ट तसेच आहेत.

धोबी घाट मधल्या आमीर/पात्रा बद्दल तुमचं काय मत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे पात्र मला अंबादास या रिअल टाईम पेंटरची आठवण देते, त्यामुळे मला तद्दन बेगडी वाटत नाही. पात्र म्हणून ते बेगडी वाटत नाही उलट अभिनय विचारात घेता नसीरचाच प्रभाव जास्त वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिंजं, तुमच्यासारख्या कलासाक्षर लोकांसाठी सिदचं पात्र अडाणी ठोकळेबाज वगैरे असणारच. असो. पण त्याआधी कुठल्या मेनस्ट्रीम हिंदी सिनेमात मुळात चित्रकाराचंच पात्र रंगवलेलं होतं, तर त्यामागचं तांबंपितळ ओळखायला सर्वसामान्य माणसांच्या कलाजाणिवा पाजळलेल्या असणार?

मला वाटतं, 'दिल चाहता है'च्या आधीचे मुख्य धारेतले हिंदी सिनेमे बरेच साचलेले होते. एक तर शाहरुख खान+करण जोहर/आदित्य चोप्रा आणि तेचे ते प्यारदोस्तीमोहोब्बतीचे घोळ होते. नाहीतर सलमान खान आणि त्याचा आचरटपणा होता. ('लगान'ही डीसीएचच्या मागेपुढेच आलेला आहे. आधी नाही.) भरपूर पैसे हातात खेळत असलेले, इंग्रजी हीच मातृभाषा असलेले, शहरी आयुष्याच्या पलीकडे न गेलेले तरुण लोक होते आणि त्यांच्याकरता हिंदी सिनेमात काही नव्हतंच. त्यांच्या भाषेला मेनस्ट्रीममध्ये पहिल्यांदा 'डीसीएच'मध्ये प्रतिनिधित्व मिळालं. थोडं चाकोरीतलं प्रेम, थोडी चाकोरीबाहेर गेल्यागत वाटणारी कलाबिला, आपली वाटणारी भाषा, आपल्या वयाचे भासणारे नट आणि हे विकत घ्यायला उत्सुक असलेले लोक - असं सगळं एकत्र आल्यावर 'दिल चाहता है' इतका हाइप होणं क्रमप्राप्तच होतं.

पण म्हणून तेव्हाच्या मेनस्ट्रीममधल्या हिंदी चित्रपटनायकांच्या पार्श्वभूमीवर - चित्र रंगवणारा, आपल्याहून मोठ्या घटस्फोटित बाईच्या प्रेमात पडणारा, त्याला लग्नाचं परिमाण न देऊ बघणारा - नायक (तरी तिघांतला एक, एकटा नव्हेच! तिघांतला एक सेफली भर लग्नात पोरीला तथाकथित जिगरबाजपणे प्रपोज मारणारा वगैरे!) रंगवणं हे ताजं होतंच. तितकं श्रेय तरी त्या सिनेमापासून हिरावून घेऊ नये कुणी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लै भारि. डिट्टो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

मलाही प्रतिसाद फार आवडला. चल मी ही 'मम" म्हणते. तीच पद्धत रुढ आहे ना, एकानी बोलायचं अन मग १० जणांनी री ओढायची Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिघांतला एक सेफली भर लग्नात पोरीला तथाकथित जिगरबाजपणे प्रपोज मारणारा वगैरे

यग्जॅक्टली! दिल चाहता है चा शेवट बघून तो सिनेमा जो काय डोक्यात गेला, त्याला तोडच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पूर्ण सहमत! प्रतिसाद लाय आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तुमच्यासारख्या कलासाक्षर लोकांसाठी सिदचं पात्र अडाणी ठोकळेबाज वगैरे असणारच. असो. पण त्याआधी कुठल्या मेनस्ट्रीम हिंदी सिनेमात मुळात चित्रकाराचंच पात्र रंगवलेलं होतं, तर त्यामागचं तांबंपितळ ओळखायला सर्वसामान्य माणसांच्या कलाजाणिवा पाजळलेल्या असणार? <<

१९७०च्या ह्या राजेश खन्नाइतकाच तो चित्रकार बेगडी आहे -

आणि माझा मुद्दा त्याहीपलीकडचा आहे. व्यवसायानं वकील, पोलीस, न्यायाधीश, डॉक्टर असे कुणीही निवडा. त्यांना हिंदी सिनेमातलं त्यांच्या व्यवसायाचं चित्रण बेगडी वाटेल. ह्याला छेद ह्याच सुमाराला दिला जाऊ लागला. सत्या १९९८ ची फिल्म होती (दिल चाहता है २००१ची). 'सत्या'मधलं गँगस्टरांचं चित्रण 'शाकाल' किंवा 'मोगॅम्बो'पेक्षा कमी बेगडी आणि अधिक वास्तववादी होतं. 'दिल चाहता है'नंतर जवळजवळ लगेचच (२००३) विशाल भारद्वाजची 'मकबूल' आली. २००४च्या मराठी 'श्वास'मधलं हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं चित्रण अधिक वास्तववादी होतं. ह्या पार्श्वभूमीवर 'दिल चाहता है' अतिशय फिल्मी, भडक, बेगडी आणि कालबाह्य वाटतो. 'आपल्या वयाचे भासणारे नट' असं तू म्हणतेस. प्रत्यक्षात हे सगळे हीरो तेव्हा चांगलेच घोडे दिसत होते, पण कोवळ्या मुलांची कामं करत होते. २००२ साली आमिर खान ३७ वर्षांचा होता, सैफ ३२ वर्षांचा. हे बेगडी वाटत नाही?

>> तितकं श्रेय तरी त्या सिनेमापासून हिरावून घेऊ नये कुणी. <<

मी पात्राच्या वास्तवदर्शी चित्रणाच्या अभावाबद्दल बोलतोय, तर तू शहरी तरुण पिढीवरच्या त्या फिल्मच्या प्रभावाबद्दल बोलते आहेस. ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

माझ्या मते प्वाईंट "वेगळेपणा"चा आहे.
तुम्ही कशाशी कशाची तुलना करताय त्याचा. २००१ सालच्या चित्रपटाची तुलना २००३/२००४ शी करणं जरा कठीण आहे, नाही का?
१९९९ पर्यंतची गिजबिज बघा, आणि त्या पार्श्वभूमीवर दिल चाह्ता है बघा- फरक प्रचंड आहे.
वास्तववादी वगैरे लेबलं जाऊ दे एका मिण्टासाठी- पण दिल चाहता है ने २००१ मध्ये त्या आधीच्या हिंदी सिनेमाशी फारकत घेउन एक टकलू मनुश्य जो चित्र काढतो आणि त्याला तेवढंच येतं- असा नायक रंगवला
हे मला तरी खूप मस्त वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> २००१ सालच्या चित्रपटाची तुलना २००३/२००४ शी करणं जरा कठीण आहे, नाही का? <<

पण मी तर १९७० सालच्या सिनेमातल्या चित्रकाराइतकाच तो २००१ सालचा चित्रकार बेगडी वाटतोय असं म्हणतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चित्रकार अस्स्ल दाखवावा- म्हणजे नक्की कसा? प्रचंड वास्तववादी नाही तर हिंदी सिनेमात दाखवता येईल असा.
ह्याबद्दल काही उदाहरणं/अपेक्षा काय आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"टकलू मनुश्य" हा ( जरी साचेबद्ध नसला) criterion काढला तर प्रभाकर कोलते, रवी परांजपे ह्यांचा चान्स गेला. (यांची तुलना अस्सलत्वाचा मानदंड van gogh यांच्यासारख्यांशी होणार नसेल तर अस्सल चित्रकार मानायला हरकत नसावी)पर्यायाने अनुपम खेर देखील पेंटरची एखादी अविस्मर्णीय भूमिका देऊ शकणार नाहीत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजा गोसावीने एक चित्रकार रंगवलाय की माझी स्मरणशक्ती माझा घात करतेय Sad
बहुतेक एका चित्रपटात त्यांनी चित्रकाराचे काम केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाखाची गोष्ट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

असावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> १९७०च्या ह्या राजेश खन्नाइतकाच तो चित्रकार बेगडी आहे.
> ... त्यांना हिंदी सिनेमातलं त्यांच्या व्यवसायाचं चित्रण बेगडी वाटेल.
> .. कमी बेगडी आणि अधिक वास्तववादी होतं.
> अतिशय फिल्मी, भडक, बेगडी आणि कालबाह्य वाटतो
> हे बेगडी वाटत नाही?

ह्यात बरीक तथ्य आहे. हिंदी सिनेमात बेगडसुद्धा अस्सल वापरत नाहीत. बेगडीच वापरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

खरंय, आपण दोन निराळ्या गोष्टींबद्दल बोलतोय.

'दिल चाहता है' किंवा सिदचं पात्र बेगडी असेल. ते लक्षात येणं वा न येणं हे प्रेक्षकाला त्या त्या क्षेत्राबद्दल नक्की किती माहिती आहे, त्यावर अवलंबून. पण त्यातली पात्रं, त्यांची भाषा, त्यांचा एकमेकांसोबतचा वावर तोवरच्या मेनस्ट्रीम सिनेमाच्या तुलनेत पुष्कळ ताजातवाना होता, वेगळा होता. तितकं (तरी) श्रेय 'दिल चाहता है'ला द्यायला पाहिजे.

अभिनेत्यांची वयं! त्यांची खरी वयं काय होती हा काय मुद्दा आहे का? तेव्हाच्या तरुण लोकांना हे नट तोवरच्या मेनस्ट्रीम सिनेमाच्या तुलनेत जवळचे वाटले, हे महत्त्वाचं.

पुन्हा एकदा: 'दिल चाहता है' थोर / वास्तववादी सिनेमा आहे असं म्हणणं नाही. तो तुलनेनं वेगळा होता आणि हे वेगळेपण (पथ्यावर पडणारं असल्यामुळेही असेल. प्रायोगिकला चमकदार वाटलेली आणि व्यावसायिकच्या दृष्टीनं 'हमखास मापातली' एकांकिका लग्गेच उचलली जाते, तसं) लोकांनी लगेच नोंदून घेतलं, असा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+१
माझ्यासाठी डीसीएचचं महत्त्व हे की वेगळ्या धाटणीचा, (अगदी डबिंगही न करता काढलेला) झटपट सिनेमासुद्धा व्यावसायिक यश कमावु शकतो हा विश्वास दण्णे!
एक हिरो एक हिरॉईन आणि त्यांच्या भोवतीची इतर पात्रे यापेक्षा किंचित वेगळी धाटणी (जी याआधीही आली आहे पण इथे त्यांच्यात फुकटचा भावनिक गोंगाट नाही)
भावना नी मेलोड्रामा, भडक ध्वनी/संगीत/प्रकाश/संवाद याशिवायही चित्रपट यशस्वी करता येतो हे दाखवणे..

हा चित्रपट कसा आहे हे दुय्यम आहे. याने व्यावसायिक चित्रपटांना जी बदलेली वाट दाखवली ते महत्त्वाचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अभिनेत्यांची वयं! त्यांची खरी वयं काय होती हा काय मुद्दा आहे का? तेव्हाच्या तरुण लोकांना हे नट तोवरच्या मेनस्ट्रीम सिनेमाच्या तुलनेत जवळचे वाटले, हे महत्त्वाचं.

+१०००

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आपल्या वयाचे भासणारे नट' असं तू म्हणतेस. प्रत्यक्षात हे सगळे हीरो तेव्हा चांगलेच घोडे दिसत होते, पण कोवळ्या मुलांची कामं करत होते. २००२ साली आमिर खान ३७ वर्षांचा होता, सैफ ३२ वर्षांचा. हे बेगडी वाटत नाही?

दिल चाहता है नंतर सुमारे दशकभरानं (म्हंजे आमिर पन्नाशीला टेकल्यावर) "थ्री इडियट्स " आला.
बॉक्स ऑफिसवर हिट्ट झाला.
त्यात आमिर प्रथम वर्ष अभियांत्रिकीपासूनच्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत. तरी पिच्चर हिट्ट.
अभियांत्रिकी पोट्ट्यांना तो "आपल्या वयाचा भास"ला असू शकेल का ?
(त्या-त्या क्षेत्रातील तज्ञांना पात्र रंगवतानाचा खुळचटपणा वगैरे वाटतो, ठीकय. पण आम पब्लिकचं काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सहमत - थ्री इडियट मधे अमीर खान एक कॉलेज-वयिन म्हणून खूप खटकला.
पण दिल चाहता मधे अमीर अजिबात खटकला नव्हता, त्याचं जे कॅरेक्टर होतं त्यात तो अगदी फिट वाटला - वयाच्या बाबतीत. अर्थात दिल चाहता मधे कॉलेज चं आयुष्य असं दाखवलंच नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटायला तर 'कुछ कुछ होता है' मधलं कॉलेज वातावरण ती कोवळी मुलं हे सुद्धा बेगडी वाटेल, मला तर ते मेन-स्ट्रीम सिनेमाच्या तुलनेत फार आवडलं, आपलं कॉलेज अस नसलं तरी असं कॉलेज असु शकतं हे पाहुन फार भरुन आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घ्या! कधीपासून हातबोटं शिवशिवत होती 'सिडं इज सो बोअरींग' म्हणायला ROFL
आपल्याला तर सैफ आवडला होता.
अजून प्रतिसाद वाचते आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी.

बोअरिंग पात्र होते सिड म्हणजे.

मेल्या तोंड नीट उघडून बोल की मोठ्यांदा असं म्हणावंसं वाटे. पूर्ण सिनेमा ओठाला शिवण बसल्यासारखी पुटपुट..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
शिणमा बराच बरा वाटला. आवडलाही.
पण सिड नावाचं पात्र काही फार खास वगैरे वआटलं नाही.
(चित्रकलेतली जाणकारी वगैरे नसल्याने तितकसं भयंकर/हास्यास्पदही नाही.)
साधारणतः कथेचा नायक महत्वाचा/हिट्ट वगैरे डायलॉग बोलत असताना मागच्या दगड्-धोंडे भिंतींबद्दल जे काही आपल्याला वाटतं; तेच सगळं सिड बद्दल वाटलं.
म्हणजे ...
काहिच वाटलं नाही.
आहे आपला एक दगड पडलेला बाजूला किंवा साधी सरळ भिंत उभी असलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

दिल चाहता है मधल्या पात्रांच्या टाईपच्या पात्रांमधे मला फरहान अख्तर जिंदगी ना मिलेगी दोबारामधे जास्त आवडला होता. एकूण फरहान अख्तर सहज अभिनयामधे अव्वल वाटतो. त्याच्या तुलनेत (तुलनेतच) आमिर खानसुद्धा कृत्रिम आणि एका टाईपचा वाटतो.

जिंदगी ना मिलेगी दोबारामधे समहाउ हृतिक रोशन हा अधिक प्रचलित हीरो असल्याने कतरिनाचे त्याच्याशी बंध जुळवले गेले असं वाटत राहिलं अदरवाईज फरहान अख्तरचे पात्र जास्त आवडणेबल होते असं वाटत होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहिणीने काढलेला होता पिक्चर. फरहानसाठी चांगले क्याची डायलॉग आणि चमचमीत पात्ररचना होती.
खरं तर घशात चिकनचं हाड अडकलेल्या आवाजात त्याने म्हटलेल्या कविता जास्त डोक्यात गेल्या होत्या. त्यापेक्षा अभय बरा- कुणाच्या अध्यात ना मध्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला आमीर खान (आकाश) ओव्हर-बेअरींग, सैफ चाइल्डीश अन सिड अति स्वप्नाळू वाटला होता. पण सिड बरा त्यातल्या त्यात असं वाटलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बादवे दिल चाहता है" हा सुरुवात उत्तम आणि शेवटी गंडत गेलेला सिनेमा होता. नायिकेचं दुसर्‍याच व्यक्तीशी लग्न ठरलेलं असणे. तो दुसरा मनुष्य ग्रे शेडचाच कंपल्सरी दाखवून मूळ नायकाला उठाव आणणे , ऐन लग्नात शेवटी येऊन मागणी घालणे यापैकी एकूणएक घिसेपिटे फॉर्म्युले न चुकता वापरले गेले. शेवटाची गाठ बांधून नीट बंद करणं कथेबाबत अवघड असतं हेच दिसतं.

शेवटच्या सीनमधे तर ती आमिर खानवर क्रश असणारी पण आता एकटी पडलेली मुलगी चापोर्‍याच्या किल्ल्यावर आता एकट्या अतएव उपलब्ध असलेल्या सिडशी जोडून दिली आहे. म्हणजे जे काही आहे ते फुकट जाता कामा नये हा हिंदी सिनेमाचा अ‍ॅटिट्यूडही सोडलेला नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि, ती 'ती' मुलगी नाहीये. वेगळी आहे. आम्ही अनेक वेळा भांडून, पैजा लावून खातरी करून घेतली होती. तुम्ही पुन्हा पाहा.

अर्थात हा दोष नाही असं नाही. 'आहे ते फुकट जाता कामा नये' नसलं तरी 'याला एक मुलगी आणून याला कम्प्लीट करायला हवा' आहेच! बाकीही मुद्द्यांबाबत सहमतीच आहे. विशेषतः आमीर खाननं ऐन लग्नात फिल्मी स्टाइलनं मागणी घातलेली पाहिल्यावर पहिल्यांदा बघतानाच डोक्यात गेलं होतं. पण चिंजं जितका घिसापिटा ठरवताहेत डीसीएचला तितका तो नाहीय, इतकंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय सांगतेस काय ? वेगळी मुलगी आहे? मला वाटलं तीच. कारण चेहरा तसाच एरंडेलछाप होता आणि शरीर कुपोषित.

पण तिसरीच कोणी मुलगी एकटीच या जोडप्यांसोबत चापोर्‍याची सहल करायला कशापाई आली असावी ?

कथेची गरज म्हणून असेल.

कोणताही फ्री इलेक्ट्रॉन शिल्लक नको.. लगेच प्रोटॉन-इलेक्ट्रॉन मीलन करुन ब्यालन्स ऊर्फ शांतम निर्वाणम झाले की हिंदी लेखकदिग्दर्शकांना समाधान लाभते हे खरेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणताही फ्री इलेक्ट्रॉन शिल्लक नको.. लगेच प्रोटॉन-इलेक्ट्रॉन मीलन करुन ब्यालन्स ऊर्फ शांतम निर्वाणम झाले की हिंदी लेखकदिग्दर्शकांना समाधान लाभते हे खरेच.

अगदी अशीच चिडचिड 'दिल तो पागल है'च्या शेवटी अक्षयकुमार आणि करिश्माला बोलताना बघून झाली होती. असो. मेनस्ट्रीम सिनेमे इतके ऑब्वियस नसावेत, अशी अपेक्षाच करणं गैर आहे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"दिल तो पागल है"ची प्लीज आठवण काढू नको.

गाळ बहासा येईल तोंडातून माझ्या त्या पिच्चरसाठी.. तिडीक निव्वळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बोला ना प्लीज, मजा येते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्ही बोला गविशेट.
लागलं तर प्रतिसाद वाचायचं तिकिट लागलं तर तिकिट काढून प्रतिसाद वाचायची तयारी आहे आपली.
तुम्ही बोलाच.
तसंही दिल तो पागल है काय किंवा हम आपके है कौन काय; हे पिच्चर म्हणजे फारएण्ड वगैरे सारख्या खविसांना खजिनाच.
त्यांनी अजून कशी काय चिरफाड केली नाही ते समजत नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कोणताही फ्री इलेक्ट्रॉन शिल्लक नको.. लगेच प्रोटॉन-इलेक्ट्रॉन मीलन करुन ब्यालन्स ऊर्फ शांतम निर्वाणम झाले की हिंदी लेखकदिग्दर्शकांना समाधान लाभते हे खरेच.

हाहाहा, डोईवर 'भार' नको असतो म्हणजे! Smile

बाकी कणेकरांच्या फिल्लमबाजीतला तो गिरणी कामगारांचा ("ती फुकट नसती गेली") वाला किस्सा आठवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
-------/\-------
कहर विनोदी आणि मार्मिक.
नायिकेचं दुसर्‍याच व्यक्तीशी लग्न ठरलेलं असणे. तो दुसरा मनुष्य ग्रे शेडचाच कंपल्सरी दाखवून मूळ नायकाला उठाव आणणे , ऐन लग्नात शेवटी येऊन मागणी घालणे यापैकी एकूणएक घिसेपिटे फॉर्म्युले न चुकता वापरले गेले. शेवटाची गाठ बांधून नीट बंद करणं कथेबाबत अवघड असतं हेच दिसतं.

+१
.
.
म्हणजे जे काही आहे ते फुकट जाता कामा नये हा हिंदी सिनेमाचा अ‍ॅटिट्यूडही सोडलेला नाहीच.

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मी तो कॉमेंट का लिहिला ? तुम्ही लोकांनी त्या एका वाक्याची अन त्या सिद ची एवढी चिरफाड चालवलिये .... अमेरिकेने इराक वर एवढे "ढोकळे" सुद्धा टाकले नसतील... जितके "ध्वम" तुम्ही त्या सिद वर टाकलेले आहेत ...

... अब पछतानेसे क्या होगा .... वोही होगा जो तकदीर मे लिखा होगा.

आणि आमची ही असे प्रतिसाद लिहिण्याची सवय जायची नाही....

उंगलीयोंको तराश दूं ... फिर भी
आदतन तुम्हारा नाम लिखेंगी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किती वाजलेत तिकडे ?? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीकाय झोपतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

नाही हो.. अशी रंगलेली मैफिल सोडून जाऊ नका. बोला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे हा धागा वेगळा काढलाय, हे अवांतर/समांतर त्या निमित्ताने सुरू झाले इतकेच.
तुझा प्रतिसाद मुळ धाग्यावरच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>> तो तुलनेनं वेगळा होता आणि हे वेगळेपण (पथ्यावर पडणारं असल्यामुळेही असेल. प्रायोगिकला चमकदार वाटलेली आणि व्यावसायिकच्या दृष्टीनं 'हमखास मापातली' एकांकिका लग्गेच उचलली जाते, तसं) लोकांनी लगेच नोंदून घेतलं<<

मी हे थोडंसं असं मांडेन -

जागतिकीकरणानंतरच्या काळातली शहरी 'तरुणाई' 'फ्रेंड्स'वगैरे अमेरिकन मालिका पाहून प्रभावित झाली होती. आपल्या 'लाइफस्टाइल'विषयी (किंबहुना, ज्या लाइफस्टाइलची आपल्याला आस आहे, अशा लाइफस्टाइलविषयी) काही तरी म्हणणारा सिनेमा उचलून धरण्याच्या मनःस्थितीत होती. शेवटी प्रेक्षकांपैकी बहुतेकांना स्थळंबिळं पाहूनबिहूनच लग्नं करायची होती, पण कॉलेजकाळात थोडं स्वप्नरंजन काय वाईट आहे? पार मराठी नवकथेच्या काळापासून तरुणाईला अशी कथानकं आवडतात असं दिसतं. किंबहुना, तो त्या वयाचा एक गुणधर्मच म्हणता येईल. ह्या सिनेमातला 'फ्रेशनेस' हा मुख्यत: नव्वदोत्तर शहरी लाइफस्टाइलविषयी होता - डिस्कोथेकमध्ये जाऊन नाचणं, एकापाठोपाठ एक गर्लफ्रेंड्स बदलणं (सगळं कथानक पुरुषांना केंद्रस्थानी ठेवून आहे हे लक्षात घ्या), त्यातले ब्रेक-अप्स, घरचं सगळं सुस्थितीत असणं आणि मग आयुष्याविषयीचं (पक्षी : मुलींविषयीचं) थोडं चिंतनबिंतन जरा फोडणीला. बाकी स्त्री-पुरुष नातेसंबंधांविषयीची चर्चा किंवा भाष्य म्हणाल, तर त्यात फार काही गहन नव्हतं. थोड्या आधीच्या काळातल्या अशाच एका थोड्या वेगळ्या, आणि तेव्हाच्या तरुण पिढीनं उचलून धरलेल्या फिल्मची त्या तुलनेत इथे आठवण होते -

बदलत्या शहरी तरुणाईनं असंच काहीसं ह्यापूर्वी १९७४ साली आलेल्या 'रजनीगंधा'ला उचलून धरलं होतं. त्या वेळच्या शहरी मध्यमवर्गीय तरुणाईला त्यातल्या अनेक गोष्टी एकदम फ्रेश वाटल्या होत्या : त्यातली नायिका (अजिबात ग्लॅमरस नसणारी, साध्या साड्या नेसणारी विद्या सिन्हा) चक्क पीएच.डी. करत असते. बहिणीकडे राहात असते, पण स्वतःचे निर्णय स्वतःच घेत असते. बहीण वगैरे कुणीच सिनेमात दिसत नाहीत; किंबहुना, कुटुंब हा घटकच कुठे येत नाही - प्रत्येक पात्र आपापले निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. नायिकेला आधी एक बॉयफ्रेंड असतो (दाढी-चष्माधारी कलात्मक/इंटुक वगैरे दिसणारा दिनेश ठाकुर), पण त्यांचा 'ब्रेक-अप' झालेला असतो (हा शब्द भारतीय शब्दकोशात येण्यापूर्वीच). आता ती (कारकुनासारख्या बावळट, पण साध्या, गोडमिट्ट) अमोल पालेकरबरोबर 'स्टेडी' असते. अचानक, दिनेश ठाकुर पुन्हा आयुष्यात आल्यामुळे आणि दोन पुरुषांच्या स्वभावांमधल्या ढोबळ फरकांमुळे तिला 'कोणता झेंडा घेऊ हाती?' असा प्रश्न पडू लागतो. ज्या काळात हीरो-हिरॉइन आरे कॉलनीजवळच्या फिल्म सिटीतल्या झाडांभोवती पिंगाबिंगा घालत गाणीबिणी म्हणत, त्या काळात ह्यातली गाणीसुद्धा वेगळी होती. पार्श्वभूमीवर वाजतावाजता एक मूड क्रिएट करतं आणि कथानकातला तिढा दाखवतं असं हे गाणं पाहा -

नायिका तिच्या 'एक्स'बरोबर शहरातून एक टॅक्सी राइड घेते आहे, एवढ्याच घटनेतून ते गाणं उभं राहतं - ती त्याच्याकडे बघते; त्याच्या हाताकडे बघते; वाऱ्यानं तिचा पदर त्याच्या हाताभोवती उडतोय; तिला तिचा सध्याचा बॉयफ्रेंड आठवतो आणि पूर्वीच्या काळातला 'एक्स' आठवतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात स्त्री-पुरुष संबंधांबाबत कसलीही भुक्कड, बेगडी मूल्यात्मक चर्चाबिर्चा नाही. नायिकेला स्पष्टपणे निवडस्वातंत्र्य आहे, आणि त्यामुळेच तिची अडचण झाली आहे. हे एक प्रकारचं स्वत:च्या भविष्याविषयीचं आणि जगण्याविषयीचं अस्तित्ववादी चिंतन आहे. आणि हे सगळं केव्हा, तर जेव्हा एकीकडे अमिताभच्या 'अॅन्ग्री यंग मॅन'चा उदय होत होता (जंजीर – १९७३) आणि राजेश खन्ना टॉपवर होता (मुमताझसोबतचं 'जय जय शिव शंकर' हे हिट गाणं असलेला 'आप की कसम' १९७४चा सुपरहिट सिनेमा होता) तेव्हा. एक सिनेमा म्हणून 'रजनीगंधा' धाडसी होता, आणि त्यानं तेव्हाच्या सुशिक्षित शहरी तरुण वर्गाची नस बरोब्बर ओळखली होती. अगदी शेवटची नायिकेची निवडही सावध, 'सेफ' आयुष्याची असते इथपर्यंत! म्हणजे तरुणपणी थोडं स्वच्छंदबिच्छंद वागा, पण मग सेटलबिटल व्हा असाच सरधोपट (पक्षी : 'दिल चाहता है'सारखा) संदेश इथे होता, तरीही प्रयोगशीलता अधिक होती असा माझा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हं. मान्य.

कथानकाच्याच दृष्टीनं पाहायला गेलं, तर मारे बंडखोर म्हणवला जाणारा 'डीडीएलजे'ही अजिबातच बंडखोर वगैरे नव्हता. उलट 'घे की पड आईबापाच्या पायाशी' स्टाईलच्या सिनेमांचं पेवच फुटलं त्यानंतर. पळून गेलेले हिरोहिरवीण पालकांच्या विचारानं परत येतात तो 'डोली सजा के रखना' काय, 'कभी खुशी कभी गम' नावाचा गिडगिडाहटपट काय, गुरू, बाप आणि नवरा काहीही बोलला तरी थोरच असं मानणारा 'हम दिल दे चुके सनम' काय... एकाचढ एक सरंजामी, पुरुषप्रधान आणि प्रोकुटुंब मानसिकता असलेले सिनेमे होते.

कुणीतरी (बहुतेक तांबे किंवा कर्णिक. चूभूदेघे.) याचं मोठं मार्मिक विश्लेषण केलं आहे. जमिनीच्या वाढत्या किंमती आणि चढते वेतनाआयोग यांसह आईबापांची पिढी जसजशी अधिकाधिक श्रीमंत होत गेली, तसतशी तरुण लोकांची हिंदी सिनेमातली पालकांविरुद्धची बंडखोरी लोप पावत गेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आँ? डीडीएलजे बंडखोर? कोण म्हणतं बॉ असं? मी तर नाय ऐकलं बॉ कंदीबी.

(अज्ञानी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथे डीडीएलजेला बंडखोर नाही, पण 'वेगळा, ताजा, आयुष्यावर परिणाम करणारा' सिनेमा म्हटलं आहे. माझ्या प्रतिसादातलं तेवढं विशेषण तू बदलून वाच. कारण आता प्रतिसादात बदल शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हम्म असेल बॉ. मला त्यातली गाणी आवडतात इतकं सोडल्यास परिणाम इ. नाय झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जमिनीच्या वाढत्या किंमती आणि चढते वेतनाआयोग यांसह आईबापांची पिढी जसजशी अधिकाधिक श्रीमंत होत गेली, तसतशी तरुण लोकांची हिंदी सिनेमातली पालकांविरुद्धची बंडखोरी लोप पावत गेली
-------/\---------
तरी "डर" पाहून खुनशी होण्यापेक्षा तरुणांनी ddlj पाहून निर्बुद्ध झालेलं परवडलं असं मला वाटतं.
त्या माध्यमाची तितकी ताकत आहे.
डर नंतर सडक्या, नालाय्क पोट्ट्यांनी खुनाखुनी सुरु केली होती. मुलींवर अ‍ॅसिड हल्ला वगैरे.
त्यापेक्षा ddlj दाखवून ह्यांना निर्बुद्ध बनवूया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

डर नंतर सडक्या, नालाय्क पोट्ट्यांनी खुनाखुनी सुरु केली होती. मुलींवर अ‍ॅसिड हल्ला वगैरे.

कै च्या कै!
अ‍ॅसिड हल्ला अगदी हल्ली हल्लीही तितकाच ऐकु येतो की! आता तर नायक कित्ती कित्ती सोज्वळ असतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

डर - बाजीगरचा प्रबहव मॅग्नेटिक होता. आजच्याहून कैक जास्ती केसेस डर नंतरच्या पाच सात वर्सहत झलया.
रिंकू पातिल वगैरे.( आठ दहा केसेस सेम धर्तीवर/प्याटर्नमध्ये झाल्या.)
प्रमाण निश्चितच जास्त होतं.
तेव्हाचे नव्याने उदय होत असलेल्या शाहरुखचे इंटरव्यू पहा,
दरवेळी त्याला नकारात्मक भूमिकांबद्दल उत्तर द्यायला लागे.
आता हे चित्रपट म्हणून कसे होते; दर्जा कय होता;
हे मी सांगू शकत नाही.
पण त्यानं भलत्याच बाबतीत inspire वगैरे होणारा एक कल्ट होता.
बाउंडरीवरल्या केसेसची माणसं तिकडं जातात ना.
त्यांना असं संस्कारांचं छान छान गोड मिट्ट अफू देउन झोपवलेलच बरं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जमिनीच्या वाढत्या किंमती आणि चढते वेतनाआयोग यांसह आईबापांची पिढी जसजशी अधिकाधिक श्रीमंत होत गेली, तसतशी तरुण लोकांची हिंदी सिनेमातली पालकांविरुद्धची बंडखोरी लोप पावत गेली.

जबरदस्त निरीक्षण! याचा दुवा मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाही हो, बहुतेक साधनेच्या दिवाळी अंकातला लेख होता. वर्ष-लेखक काहीही आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जंतूंना इतकं छान लिहायला लावण्यासाठी इथे धागा वेगळाअ काढावा लागला.
त्या फॅनीच्या धाग्यावर तुम्हाला लिहितं करण्यासाठी काय करावं लागेल हो, जंतू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'दिल चाहता है'च सादरीकरण थोडं वेगळं होतं, म्हणजे रडणारा आणि घरी फोन करणारा नायक त्याआधी दाखवल्याचं स्मरणात नाही, त्याच फरहानच्या लक्ष्यमधल्या हृतिकचं वडलांना फोन करणं आणि रडणं ह्या सिनची तुलना करता अमिरचं काम उजवं वाटलं. अशा छोट्या-छोट्या गोष्टी थोड्या वास्तवाजवळ जाणार्‍या होत्या हे फरहानचं श्रेय आहे, त्याचबरोबर चित्रपटाला एकच असा हिरो नाही, म्हणजे प्रत्येकाची कथा आहे आणि प्रत्येकाला वाव आहे हे जरा नविन होतं, त्यात नंतर अमिरला जास्त भाव देऊन कमर्शिअल गणित करताना माती खाल्ली वगैरे आहेच.

पण थोड्या/किंचित फरकाने बेख्डेल टेस्टवर(पुरुषांसाठीच्या) गुण कमावणारा होता असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जागतिकीकरणानंतरच्या काळातली शहरी 'तरुणाई' 'फ्रेंड्स'वगैरे अमेरिकन मालिका पाहून प्रभावित झाली होती. आपल्या 'लाइफस्टाइल'विषयी (किंबहुना, ज्या लाइफस्टाइलची आपल्याला आस आहे, अशा लाइफस्टाइलविषयी) काही तरी म्हणणारा सिनेमा उचलून धरण्याच्या मनःस्थितीत होती. शेवटी प्रेक्षकांपैकी बहुतेकांना स्थळंबिळं पाहूनबिहूनच लग्नं करायची होती, पण कॉलेजकाळात थोडं स्वप्नरंजन काय वाईट आहे? पार मराठी नवकथेच्या काळापासून तरुणाईला अशी कथानकं आवडतात असं दिसतं. किंबहुना, तो त्या वयाचा एक गुणधर्मच म्हणता येईल. ह्या सिनेमातला 'फ्रेशनेस' हा मुख्यत: नव्वदोत्तर शहरी लाइफस्टाइलविषयी होता - डिस्कोथेकमध्ये जाऊन नाचणं, एकापाठोपाठ एक गर्लफ्रेंड्स बदलणं (सगळं कथानक पुरुषांना केंद्रस्थानी ठेवून आहे हे लक्षात घ्या), त्यातले ब्रेक-अप्स, घरचं सगळं सुस्थितीत असणं आणि मग आयुष्याविषयीचं (पक्षी : मुलींविषयीचं) थोडं चिंतनबिंतन जरा फोडणीला. बाकी स्त्री-पुरुष नातेसंबंधांविषयीची चर्चा किंवा भाष्य म्हणाल, तर त्यात फार काही गहन नव्हतं.

इचार करायला मज्बूर केलत. हे खर असु शकत अशी साधार भिती वाटत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

या प्रकारचं हिंदी सिनेमे आणि सामाजिक परिस्थिती यांचे अन्वयार्थ लावणारं लिखाण हर्षदा भुरे (परत एकदा चूभूदेघे) साप्ताहिक सकाळमध्ये करत असत. तेही सदर भारी होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'दिल चाहता है'मध्ये डिंपल हे एकमेव स्त्री पात्र उथळ दाखवलं नव्हतं. नोकरी करणारी, स्वतःच्या कामात प्रवीण (मोठं घर ऑफीसाने देणं) असणारी आचरट श्रीमंत नसणारी बाई आरामात दारु पित पित काम करते हे फार आवडण्यासारखं होतं. 'सिद'ची आईसुद्धा कुठेतरी नोकरी करणारी, स्वतःची गाडी असणारी दिसते. या दोन्ही स्त्रिया सिदच्याच जवळच्या दाखवल्यामुळे सिद वेगळा ठरतो.

डिंपलला शेवटी मारल्यामुळे 'दिल चाहता है' घिसापिटापट वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> नोकरी करणारी, स्वतःच्या कामात प्रवीण (मोठं घर ऑफीसाने देणं) असणारी आचरट श्रीमंत नसणारी बाई आरामात दारु पित पित काम करते हे फार आवडण्यासारखं होतं. <<

पण ही बाई डिप्रेस्ड अल्कॉहॉलिक वगैरे दाखवून स्वतंत्र स्त्री 'असलीच' असणार आणि तिची अखेर एकटी दु:खात बुडून वगैरे होणार हा ठोकळेबाजपणा त्यात होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जसं पाहावं तसं दिसतं, हे निदान इथे तरी लागू पडावं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>> जसं पाहावं तसं दिसतं, हे निदान इथे तरी लागू पडावं. Wink <<

सगळे पुरुष अखेरीला एक एक पोरगी मिळवून सुखी होताना दाखवणारे, पण स्वतंत्र बाईला दु:खात बुडवून मारणारे हे असले स्त्रीद्वेष्टे आणि स्त्रीस्वातंत्र्यद्वेष्टे सिनेदिग्दर्शक! त्यांच्या घरावर खळ्ळ-फट्याक मोर्चा नेणार नसाल, तर आम्ही तुम्हाला महिषासुरमर्दिनी कसं ठरवणार ह्या नवरात्रीत? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अहं! असं नाहीये ते. "सगळ्या बाया एक एक चिकना बाप्या मिळवून सुखी झालेल्या दाखवणारा, शिवाय दारू पिणारी, स्वतंत्र बाण्याची आणि लग्नाबिग्नाच्या फंदातून सुटून घटस्फोट घेणारी बाई दाखवणारा फरहान अख्तर..." असंय ते.

नि फरहान अख्तरच्या घरावर मोर्चा? त्याऐवजी त्याच्याशी चार प्रेमाचे बोल करता आले, तर मी या नवरात्रापुरती 'युगायुगांची बंदिनी'ही म्हणवून घ्यायला तयार आहे. 'महिषासुरमर्दिनी'चं काय घेऊन बसलात?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डिंपलला मारणं तिच्या अल्कोहोलिक असण्यातूनच येतं... (म्हणून त्याचा स्वतंत्र उल्लेख केला नव्हता.)

आणि मर्यादित स्वतंत्र बाई, सिदची आई, विधवा दाखवण्याबद्दल तुमचं काय मत? त्यांच्या दृष्टीने ती दुःखी दाखवल्ये, बाऊंड सिस्टममध्ये असली तरी फ्री चार्ज (रॅडिकल हा रसायनशास्त्रातला शब्द आहे म्हणून गाळलेला नाही.) अाहे ना ती.

अवांतर - आठवणीनुसार दिचाहै बेख्डेल चाचणीत नापास होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> डिंपलला मारणं तिच्या अल्कोहोलिक असण्यातूनच येतं... <<

हो, पण मुळात एकटी स्वतंत्र बाई सुखी असू शकत नाही हा साचा (पक्षी : स्टीरिओटाइप) आहे.

>> मर्यादित स्वतंत्र बाई, सिदची आई, विधवा दाखवण्याबद्दल तुमचं काय मत? <<

त्याच्या आयुष्यात आलेल्या, त्याच्याहून वयानं मोठ्या असलेल्या स्त्रीबद्दल आणि तिच्याशी त्याच्या तथाकथित नात्याबद्दल तिचं काय मत असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याच्या आयुष्यात आलेल्या, त्याच्याहून वयानं मोठ्या असलेल्या स्त्रीबद्दल आणि तिच्याशी त्याच्या तथाकथित नात्याबद्दल तिचं काय मत असतं?

आपल्या दृष्टीने असं प्रतिगामी मत आहे तरीही स्वतःची काहीतरी ओळख आहे - नोकरी करते, स्वतःची गाडी आहे, असं. ती तिच्या मर्यादित चौकटीत आनंदी आहे तरीही तिच्या आयुष्यात पुरुष नसल्यामुळे पारंपरिकदृष्ट्या अपूर्ण आहे. डिंपलच्या पात्राच्या बाबतीत सरळ, एकमार्गी प्रतिगामी भूमिका घेतलेली आहे; पण सिदच्या आईच्या बाबतीत अशी पूर्ण प्रतिगामी भूमिकाही नाही. डिंपलच्या पात्राबद्दल असणाऱ्या मुलाच्या भावना संपूर्ण झिडकारूनही तिला असं एकटं, अपूर्ण दाखवण्याचा अर्थ काय लावायचा? वैचारिक गोंधळ?

पर्यायी सिद्धांत - ज्या चौकटीत सगळ्या चांगल्या लोकांची लग्नं लावली जातात, निदान प्रत्येकासाठी कोणीतरी शोधलं जातंय त्यातून विचार करता - पुरुष तर ती नाहीच; तिचं पुनरुत्पादनाचं वय उलटून गेल्यामुळे ती आता बाई आणि पर्यायाने माणूसच राहिलेली नाही, असं म्हणायचं का? नाही म्हणायला, तिचं मनःपरिवर्तन झालेलं दाखवल्यास तिच्यासाठी प्रीती झिंटाचा मामा आहेच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> तरीही तिच्या आयुष्यात पुरुष नसल्यामुळे पारंपरिकदृष्ट्या अपूर्ण आहे. डिंपलच्या पात्राच्या बाबतीत सरळ, एकमार्गी प्रतिगामी भूमिका घेतलेली आहे; पण सिदच्या आईच्या बाबतीत अशी पूर्ण प्रतिगामी भूमिकाही नाही. <<

अपूर्ण? छे छे! आयुष्यातल्या एकमेव पुरुषाशी तो मेल्यानंतरही एकनिष्ठ राहणारी आणि केवळ आपल्या मुलाचं भलं चिंतणारी आदर्श भारतीय नारी आहे ती. तिच्या आयुष्यात दोन पुरुष आहेत - मेलेला नवरा आणि मुलगा. हेच तिचं भागधेय वगैरे. मग तिच्यापाशी नोकरी, गाडी वगैरे असणं म्हणजे केवळ ज्या शहरी तरुण डेमॉग्राफिकसाठी फिल्म बनवली आहे त्यांचं आणि त्यांच्या आसपासचं वास्तव आहे - नोकरी करणारे दोन्ही पालक, त्यातून डबल इन्कम, मग आर्थिक स्थिती सुधारलेला मध्यमवर्ग, वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

म्हणजे आदर्श पूजनीय नारीच्या काही लैंगिक, शारीरिक गरजा नसतात का, परंपरेनुसार? (मेल्यावर आग लावायला मुलगा आहे, पण ते वगळता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स्वसंपादित Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो असतात की. रेग्युलेशन असतं ते त्या कोण पूर्ण करू शकेल यावरच.

बाकी, भसाभस वापरलं की व्हिट्रिऑलही बोथट होतं हे सांगणंही बोथट झालंय आताशा, पण उम्मीद पे दुनिया कायम है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

भसाभस वापरलं की व्हिट्रिऑलही बोथट होतं हे सांगणंही बोथट झालंय आताशा, पण उम्मीद पे दुनिया कायम है.

कश्श्या आपल्या मनाच्या तारा जुळतात नै!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कश्श्या आपल्या मनाच्या तारा जुळतात नै!

रेझोनन्सच जाहला जणू. पयला की दुसरा की कितवा?

फीलिंग नॉस्ट्याल्जिक-स्टेष्नरी वेव्ह्ज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गोल गोल होतयं.

आयुष्यातल्या एकमेव पुरुषाशी तो मेल्यानंतरही एकनिष्ठ राहणारी आणि केवळ आपल्या मुलाचं भलं चिंतणारी आदर्श भारतीय नारी आहे ती.

तीनी दुसरं लग्न केलेलं नाही यावरून हा निष्कर्ष काढलाय का? जर तिला नवर्‍याची गरजच वाटली नाही म्हणून तिनी लग्न केलं नाही असं का असू शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

महेश अंकल उर्फ रजत कपूर आणि सुहासिनी मुळ्ये? काहीही.
त्यापेक्षा ऑस्ट्रेलियातच जायचं तर तिला स्टीव (ऑफिसमधला माणूस) बरा आहे. तिघेही सुखी रहातील. सिद सुद्धा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आपली उगाच काव्यगत न्यायाचं शास्त्र वापरून विनोदनिर्मितीचा प्रयत्न केला हो. (टॅकी विनोदाबद्दल क्षमस्व.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१
निदान मी तरी त्यातून तोच बोध घेतला.
*
मी साधारणतः नव-पारंपरिक घरात वाढलो.
बर्‍यापैकी निमशहरी धार्मिक वगैरे वातावरण.
घरातही नवअंधश्रद्धा आणि "नवमागास"पणा भरपूर.
माझी मूळची मानसिक बैठक तीच.
तर सांगायचं म्हंजे "बाईनं ज्यास्त ट्यांव ट्यांव केलं तर ती अशीच फ्रस्टु होते "
(आणि त्यामुळे आपल्या जीवनाबद्दल ज्या काही संकल्पना आहेत त्याच्च कशा बरोबर आहेत)
हे मनावर घोटून घेत चित्रपट गृहाबाहेर पडलो.

*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"बाईनं ज्यास्त ट्यांव ट्यांव केलं तर ती अशीच फ्रस्टु होते "

हाहाहा. प्रामाणिक प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांना सिद आवडला होता त्यातले किती जण त्यावेळी 'काकूबाई' प्रकारचे होते? इथे मी मानसिकतेविषयी विचारतो आहे, ऐसीवरी काका लोकांनी उगाच चेकाळू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आमच्या पीढीत जितकं काकूबाईपण सेफली टाकता येईल तितकं मी टाकलेलं. पण मला सिड आवडलेला. तो जी चपराक देतो न विशुद्ध प्रेमाविषयी लेक्चर देतो ते मला आवडलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला, नुकत्याच ज्युनियर नायतर सीनियर कालिजात पाय ठेवलेल्या पोरापोरींनी पाहायचे शिणुमे म्हातार्‍या लोकांनी पाहिले की असलंच काहीतरी चामट बाहेर निघतंय.... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल चाहता है आणि हम आपके है कौन तसा ह्यांचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही.
पण इथे चर्चा सुरु आहे, तशाच गप्पा माझ्या आणि विक्षिप्तच्या झालेल्या.
म्हणजे हम आपके है कौन आणि त्या निमित्तानं स्वतःला आसपास दिसणारी/जाणवणारी दुनिया, त्यातलं बदलतं डायनामिक्स असं त्या गप्पांत होतं.
तिच्या परवानगीनं ह्या गप्पा इथे मांडतोय.
.
.
सुरुवात झाली माझ्या http://www.aisiakshare.com/node/3145 ह्या धाग्यातल्या प्रतिसादातून :-

http://www.loksatta.com/lokrang-news/hum-aapke-hain-koun-a-movie-symboli...

'हम आपके है कौन?'ची देन

मला ह्या लेखातल्या मुद्द्यात तथ्य वातलं.
पण मागे एकदा गिरीश कुबेर ह्यांचा "चंगळवादी व्हा" हा लेख आला होता एक दोन वर्षापूर्वी; तोही आवडला होता.
दोन्हींचा आशय एकदम विरुद्ध जातो आहे असे वाटले.
.
.
विक्षिप्त :-
'हम आप के'ला कोणीतरी व्यक्तिगत आकसाव्यतिरिक्त झोडल्याचं पाहून फार्फार आनंद झाला.
.
.
मनोबा :-
पण मला त्या घातलेल्या शिव्याही पटल्या, आणि ह्याच्या अगदि उलट जे गिरीश कुबेर म्हणत होते ते -- "चंगळवादी व्हा" हे ही पटलं. घोळ होउ लागलाय डोक्यात
.
.
विक्षिप्त :-
चंगळवादी व्हा हे मर्यादित अर्थाने मलाही मान्य आहे. 'हआहैकौ'मध्ये ज्या भुक्कड त्याग, मूल्यांचा उदोउदो केला आहे ती सोडून द्या; उदा. आलोकनाथने पुतण्यांसाठी लग्न न करणं, माधुरी-सलमानने पोरासाठी प्रेम विसरणं वगैरे हे मूल्य बाष्कळ आहे. शिवाय त्यात ये रे माझ्या मागल्या आहे; काकाने जे केलं तेच आता पुतण्याही करणार वगैरे. शरीराच्या मूलभूत गरजा असतात, त्या मान्य करा, त्या पुरवा आणि मग मूल्यांचा विचार करण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल.

तू, मी लोकशाहीचा, कोणाला मत द्यायचा याचा सारासार विचार करू शकतो. कारण आर्थिक सुस्थितीमुळे आपल्याला ते शक्य आहे. ज्यांना रेशन कार्ड मिळालेलं नाही, रोजचं पोटभर जेवण मिळेल याची खात्री नाही यांना लोकशाही हे मूल्य वाटेल का? निवडणूका आल्या की कोणीतरी पैसे देतं, रेशन कार्डासाठी कोणीतरी खरोखरची मारामारी करतं, कोणीतरी आपल्या पोराला हंडीच्या आठव्या थरावर चढवण्याचं ग्लॅमर देतं, या अशा लोकांकडून मूल्यं जपली जातील का? मुळात त्यांना मूल्यं बाळगणं परवडेल का? उपाशीपोटी माणसाकडून त्याग, समाजाचं ऋण फिटणं वगैरे गोष्टी होतील का? सतत त्यागाने त्रासलेला माणूस असून असून किती भला माणूस असणार?

कुबेरांचा तो अग्रलेख मी वाचला नाही. गूगल करून चटकन सापडलाही नाही. त्यामुळे त्यांना निश्चित काय म्हणायचं आहे हे मला माहित नाही. पण तो लेख चांगला असेल तर माझ्या मते असं काहीतरी त्यात लिहीलेलं असेल.

.
.
मनोबा :-
हा तो लेख :-
http://www.globalmarathi.com/20120928/5310331379683010162.htm
चला, चंगळवादी होऊ या...
.
.

मनोबा :-
आणि तू हम आपके है कौन ला जे झोडपते आहेस ते "कै च्या कै मूल्य" दाखवल्याबद्दल.
आणि लोकसत्ताच्या लेखात जे झोडलय ते "सगळी सचोटी ,साधेपणा पायदळी तुडवत नुसत्या धत्तड धत्तड भव्य दिमाखदार दिखावेगिरीवाल्या गोष्टी " हिरिरिने पुढे आणल्याबद्दल.
त्यांचा आरोप आहे "हम आपके है कौन पूर्वी गोष्टी जरा तरी बर्‍या होत्या" आणि तुझा आक्षेप आहे
"हम आपके है कौन ने पूर्वीपासूनच सुरु असलेल्या गोष्टी तशाच बिन्डोकपणे दाखवल्या"

शंका :-
तुला जे म्हणायचय आणि त्या लेखात जे लिहिलय ते मला समजलं तसच आहे का? की काही वेगळं आहे ?
.
.
.
विक्षिप्त :-
अग्रलेख - तो मला किंचित भाबडा वाटला. त्यांनी लिहीलेली बाजू चूक आहे असं नाही, पण चंगळवादाला दुसरीही बाजू आहे. ती संस्कृती नष्ट होण्याची नाही तर रितेपणाची आहे. तोच रितेपणा हआहैकौ मध्ये भसाभस भरलेला आहे आणि वर त्याचं समर्थनही आहे. चंगळवादी लोक आणि बडजात्यांच्या सिनेमांतली पात्रं फार काही वेगळी नसतात. त्यांची मूल्यव्यवस्था वरवर पाहता फार निराळी असली तरी ही माणसं रिकामी असतात. आयुष्य सुखाचं सुरू झालं, नोकरी/धंदा व्यवस्थित सुरू आहे, दर महिन्याला बँकेत ठराविक पैसे जमा होतात, अधूनमधून पर्यटनासाठी देशा-परदेशात फिरायची ऐपत आहे अशा वेळेस माणूस अस्तित्वविषयक प्रश्नांचा, आपल्या समाजासमोर असणाऱ्या प्रश्न-आव्हानांचा विचार करायला सुरूवात करू शकतो. झोपडपट्टीतल्या, उपाशीपोटी माणसांना हे परवडत नाही. पण परवडत असूनसुद्धा बहुतांशी चंगळवादी हे करत नाहीत.

काही लोकांची तेवढी कुवत नसते, त्यांच्याबद्दल फार आक्षेप नाही. पण अनेकांची कुवत असते, (त्याशिवाय ते या पैसे मिळवण्याच्या स्पर्धेत टिकून राहू शकणार नाहीत.) पण असा काही विचार करायचा असतो हे लक्षात येत नाही आणि मालिका, हआहैकौ सारखे बिनडोक सिनेमे, (दवणेंसारखे) सुमार लेखक, संघासारख्या शिपाईगडी तयार करणाऱ्या संघटना यांचा मारा माणसावर झाला की हे असे प्रश्न पडतच नाहीत. हे सगळे प्रकार सिगरेटसारखे अॅडीक्टीव्ह असतात. एकदा त्याची सवय लागली की सुटू शकत नाही. कुठेच, कोणत्याच बाबतीत कंफर्ट झोनच्या बाहेर येण्याची तयारी नसते. आणि हे सगळे प्रकार म्हणजे gratification ची परमावधी गाठून देतात. मग कोण कशाला काही विचार करतंय?

यावर अमेरिका किंवा यूकेमध्ये फार उत्तर शोधलं गेलंय असं माझं म्हणणं नाही. आणि हे तोटे आहेत म्हणून माणसांचा, व्यक्तींचा आर्थिक फायदा होऊ नये असं तर अजिबातच नाही. जरूर आर्थिक फायदा व्हावा, काल झोपडीत राहणारा मनुष्य आज चाळीत यावा, उद्या त्याचा स्वतःचा फ्लॅट असावा. रोजच्या जगण्यासाठी माणसांना मारामारी करायला लागू नये. कारण त्यातून फारच दुरवस्था येते, सगळ्यांचीच. पण चंगळवादाचे तोटेही आहेत आणि ते जपून का होईना, मांडण्याची जबाबदारी कुबेरांसारख्यांवर आहे. ती त्यांनी टाळू नये.

त्यांना हे समजत नसेल असं नाही. पण संस्कृतीच्या नावाखाली चंगळवाद नको असं भाजपावाले म्हणतात तेव्हा कुबेरांची होणारी अडचण मला समजते. पण म्हणून तो लेख पूर्ण आहे असं मला वाटत नाही.

---

हआहैकौ हा सिनेमा एवढा वाईट आहे की कोणत्याही दिशेला बोट दाखवा भिकारपणा निघेलच बाहेर. एकमेव चांगली गोष्ट म्हणजे नोकरांना प्रेमाने वागवताना दाखवलेलं आहे. बाकी पराकोटीचा स्त्रीद्वेष (एवढा की त्या रेणुका शहाणेला मुलगाच होतो, स्त्री-पुरुष युगुलगीतांमध्ये सुरूवात पुरुषच करतात, शिवाय नेहेमीचं संस्कृतीरक्षण आहेच), आत्मसन्मान नसणारी हिरवीण आणि बाकीच्या बाया, भोंगळ मूल्य, श्रीमंत माणसांची रिकामी आयुष्य उदात्त आहेत हे दाखवणं, चित्रपट या माध्यमाचे लावलेली वाट, भीषण संगीत (आणि त्यात चिरकणाऱ्या लताबाई) ... ही यादी हवी तेवढी वाढवता येईल.

तो लेख लिहीणाऱ्या मनुष्याचा चित्रपट या माध्यमावर जीव असणार म्हणून त्याने हा मुद्दा काढला आहे. जो व्यापक आहे म्हणून अधिक परिणामकारक आहे. आणि त्यातही नेमका चंगळवादातून निर्माण झालेलं रितेपणा आणि त्याचं उदात्तीकरण यावर नेमकं बोट ठेवलेलं आहे.

असलीच श्रीमंती, पण त्यातून डायबेटीक गोग्गोड स्वभाव नसणारी माणसं, आपसात अधूनमधून भांडण होणारे लोक, कधीमधी दारू, सिग्रेट ओढणारे लोक, व्यवसायात राजकारण करणारे लोक असं काही आणि तरीही पुरेसं रिकामं दाखवलं असतं तरीही सिनेमा एवढा डोक्यात गेला नसता.

.
.
.
मनोबा :-
तुझ्या खरडीला बरच उशीरानं उत्तर देतो आहे.
खरडीनं विचार करायला लावला.
आयुष्यात रिकामपण असलेली जी मंडळी म्हणत आहेस मी त्यातलाच आहे बहुतेक.
किंवा माझे स्वतःचे जे आयुष्याबद्दलचे स्वप्न आहे ते तू वर्णन केलेल्या रिकामपणाशी बरेच म्याच होते.
बाकीचं अजून विचार करुन सांगतो.
.
.
.
विक्षिप्त :-
तुला तुझा रिकामपणा समजतो म्हणूनच तू त्या लोकांसारखा नाहीस. त्या लोकांना आपला रिकामपणा समजत नाही. ज्यांना रिकामपणा समजतो ते अस्वस्थ होतात, विचार करायला प्रवृत्त होतात.
.
.
.
मनोबा :-
शिवाय नेहेमीचं संस्कृतीरक्षण आहेच

संस्कृती हा इतका अ‍ॅबस्ट्रॅक्ट शब्द आहे की विचारता सोय नाही.
तांत्रिकदृष्ट्या कुणी "संस्कृतीरक्षण करतो " असं म्हटलं तर "कर बाबा कर. तुला वाटतय तसं कर." असं म्हणावसं वाटतं.
पण बहुतांश वेळेला हे म्हण्णारी गबर पैशेवाली अंधश्रद्ध हल्कट मंडळी डबल स्टँडर्ड भेटली आहेत.
त्यामुळे कुणी संस्कृतीरक्षण म्हटलं की पोटात भीतीचा गोळा येतो.

उदाहरण :-
म्हणजे "वाहवा रामजी जोड्डि क्या ब्बनाई " ह्याच्या मधल्या ओळी आहेत
"सब रस्मों से बडी हय जग में दिल से दिल की सगाई"....
हे असं म्हणतात. नाचतात. पब्लिक श्रद्धेने पाहतं.
हे श्रद्धेनं पाहणारं पब्लिक अ‍ॅक्चुअली ड्याम्बिस आहे.
"दिल से दिल की सगाई " म्हणत ह्यांना नाचायचय. पण त्याच वेळी आपल्या पोरांना चांगले संस्कार द्यायचेत.
चांगले संस्कार म्हणजे आई बाप निवडून देतील त्या अज्ञात जोडिदाराच्या गळ्यात मुकाट्याने हार घालायचा.
जन्मभर रहायचं सोबत. थोडक्यात, ब्लाइंड गेम खेळायचा.
शिवाय जे काय करायचं ते "आपल्यातल्या आपल्यात".
"कुणाचीही पोरगी करुन आण रे बाबा. पण xyz लोकांची नको." हे ही ठरलं.
शिवाय त्यांची सांपत्तिक स्थिती वगैरे तोलामालाची असली पाहिजे. "बॅलन्स शीट " मॅच झालं पाहिजे वगिअरे अटी आहेतच.
अरे???????
हे सगळं असं आहे तर "दिल से दिल की सगाई " म्हणत चांगुलपणाच्या नावानं, सज्जनपणाच्या नावानं वगैरे उड्या का मारता ?
नाही, बॅल्न्स शीट मॅच करणं, डोके गहाण ठेवत पालकांचं ऐकणं ही सुद्धा "स्ट्रॅटेजी " असू शकते, ती स्ट्रॅटेजी वापरायचा मागील पाच हजार वर्षापासूनचा शिरस्ता तुम्ही चालू ठेवता इथवरही ठीक आहे. पण मग ते तसंच आहे हे तरी मान्य करा ना. भडाव्यांनो, ह्यात "दिल से दिल की सगाई " कशाला आणताय?
.
.
.
विक्षिप्त :-
होय होय. शिवाय हुंडा घेणार नाही म्हणताना खानदानी रईस कशाला हव्येत मुलीकडचे?
.
.
.
मनोबा :-
कारण उत्तम चारित्र्य हवय ना!
जो श्रीमंत ("खानदानी") तोच काय तो चारित्र्यवान.
बाकीचे सगळे भडवे मा****.
शिवाय आपले व्याही नि आपण तेवढे सन्मार्गानं पैसे वगैरे कमावणारे असतो.
इतर सर्वच श्रीमंत (किंवा निदान आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत) हे गैरमार्गानच श्रीमंत झालेले असतात.
जय हो.
तू राजीव सान्यांचं गल्लत्-गफलत्-गजहब वाचतेस का?
त्यात एका प्रकरणात ह्याचा संक्षिप्त पण गमतीशीर आढावा घेतलाय.
.
.
.
.

विक्षिप्त :-

शिवाय आपले व्याही नि आपण तेवढे सन्मार्गानं पैसे वगैरे कमावणारे असतो.
इतर सर्वच श्रीमंत (किंवा निदान आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत) हे गैरमार्गानच श्रीमंत झालेले असतात.

आणि कोणी बऱ्या मार्गाने श्रीमंत झालेलं असेल तर त्यांच्या घरातलं कोणीतरी अनैतिक वर्तन करणारं असतं. लोकांना घालूनपाडून बोलणे, सतत पार्लरमध्ये जाण्याइतपत उथळ असणे इ.
.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0