शारीरिक

अ‍ॅकलेशिया कार्डिया -रोग व उपचार-३

अ‍ॅकलेशिया कार्डिया (Achalasia Cardia) हा एक अन्ननलिकेचा व त्याच्या जठरावरील जोडणीच्या मधे जो स्नायुंचा वॉल्व्ह असतो त्याच्या क्रिया नीट न चालण्याचा रोग आहे. साधारणपणे लाखांत एका माणसाला हा होतो. अन्ननलिकेच्या खालच्या व जठरावरच्या वॉल्व्हला Lower Esophagal Sphincter (LES) असे म्हणतात. आपल्या अन्ननलिकेची व या एलईएस ची हालचाल मोटर सेन्सर नर्व्हसमुळे होत असते. म्हणून आपण कुठलीही खाद्यवस्तु चावून गिळली की त्या घासाची अन्ननलिकेतली हालचाल खालच्या दिशेने आकुंचन्-प्रसरण या तत्त्वावर होते. त्याचवेळेस, खालचा वॉल्व्ह उघडतो आणि खाऊन झाल्यावर आपोआप बंद होतो. त्यानंतर जठराचे काम चालू होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

अ‍ॅकलेशिया कार्डिया-एक जिवंत अनुभव-२

पूर्वसूत्रः - कोणीतरी परफोरेशन असे म्ह्टल्याचे ऐकू आले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

विद्यार्थ्यांची दुपारची जेवणे अर्थात मिड डे मिल

नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मीडियाचे व त्यायोगे जनतेचे लक्ष 'शाळेतील दुपारच्या जेवणावर' अर्थात 'मिड डे मिल' योजनेकडे वळले आहे. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी व दु:खदायक आहे. या निमित्ताने ही योजना काय आहे? ती कशी राबवली जाते वगैरे शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि तेव्हा मिळालेली माहिती सर्वांसमोर ठेवतो आहे. खरंतर, घटना घडून जाऊन काही दिवस उलटले आहेत पण माहिती जमवून टंकन करण्यात थोडा अधिक वेळ गेल्याने काहिशा शिळ्या झालेल्या पण अर्थातच महत्त्वाच्या विषयावर लिहावे असे ठरवले. या निमित्ताने या योजनेशी संबंधित विषयांवर चतुरस्र चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.

योजना:

धाग्याचा प्रकार निवडा: : 

सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या

गोड चेहर्‍याची 14-15 वर्षाची मुलगी आईच्या गळ्यात पडून लाडे लाडे "मम्मीSSS .... " असे म्हणत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाहव्वा करत असलेले ऐकताना टीव्हीच्या पडद्यासमोर खिळून बसलेल्या 15-54 वयोगटातील स्त्रियांना जाहिरातीतील नॅपकिन्स हवीहवीशी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वापरून झाल्यानंतर त्याचे काय करायचे हा प्रश्न संवेदनशील महिलांना नक्कीच भेडसावत राहणार. परंतु हे घाणीतले कपडे जेव्हा कचऱा कुंडीत जातात तेव्हा ती घाण उपसणे ही एक मोठी समस्या होते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - शारीरिक