गद्य

शुष्क काष्ठने आण्या पत्र

समीधाने, संध्याकाळचा वरण-भाताचा कुकर लावुन, देवापुढे उदबत्ती लावली. बाल्कनीतील जाईला पाणी घालून, साठीला आलेली, समीधा जरा खुर्चीवरती विसावली. घरात,शिजलेल्या भाताचा सुगंध, घमघमाट सुटला होता. आज मानसी तिच्या मुलीला घेउन म्हणजे समीधाच्या नातीला घेउन, भेटायला येणार होती. मानसी, समीधाला भेटायला वरचेवर येत असे. त्या दोघी यायच्या आत,तेवढी काही स्तोत्रे म्हणावीत म्हणुन, समीधा जरा विसावली होती. दत्तबावनी वाचता वाचता ती एका ओळीपाशी येउन थांबली, -
"शुष्क काष्ठने आण्या पत्र| थयो केम उदासीन अत्र|

ललित लेखनाचा प्रकार: 

आमची मे महिन्याची सुट्टी

लहानपणी म्हणजे किशोर वयात वगैरे मला फार काँप्लेक्स आलेला. कसला, तर आमची आधीची पिढी सतत त्यांनी लहानपणी केलेल्या गमतीजमती, दंगा मस्ती, गलका, अश्या सुरेख आठवणी सांगायचे तसं आमच्याकडं पुढच्या पिढीला सांगायला काय वेगळं असणार असंच वाटायचं. म्हणजे काय तशी बोरींगच तर सुट्टी असते वगैरे वाटायचं. पण आता कळतंय आत्ताच्या मुलांना सांगायला पुष्कळ आहे. ते काही सांगायचं नाहीच पण आता मे महीना लागला, जरा जुनंच सगळं आठवायला लागलं.

ललित लेखनाचा प्रकार: 

निरंजन

निरंजन हा माझ्या अत्यंत आवडत्या शब्दापैकी एक शब्द. लहानपणी ना.सि.फडके यांची निरंजन नावाची कादंबरी वाचली होती. काय होते त्या कादंबरीत आता आठवत सुद्धा नाही. पण या शब्दाने मात्र मनावर गारूड केलं.
निरंजन या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत पवित्र, निष्कपट आणि कुठलेच किल्मीष नसलेले .पण मला त्याच्या नादाची भूरळ पडली. या शब्दाचा नाद मला देवळाच्या गंभीर घंटानादा सारखा वाटायला लागला. शांत अशी आत्म्याला स्पर्श करणारी जाणीवच जणू ती. हाच शब्द माझे अवघे प्रणव झाला.
माझ्या मनाचा अध्यात्मिक ओढा मला अश्याच जागा, वस्तू, लोक, चित्रे, नैसर्गिक सौंदर्य आणि शांतीमय वातावरणाकडे कायम ओढत असतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

करोनाच्या नानाची टांग

मुझ को तुम जो मिले सारा जहान मिल गया
तुम जो मेरे दिल मे बसे दिलका कंवल देखो खिल गया

https://www.youtube.com/watch?v=r_AKKWy4ayg
नंतर, .............

तुमने हंसी ही हंसी मे दिल क्युं चुराया जवाब दो
आंखोंसे तुमने भी कितनी नींदे चुरायी हिसाब दो ...

https://www.youtube.com/watch?v=IW86QvUY9tw
.
.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

सुलतान पेडणेकर - हृषीकेश गुप्ते

गावाकडल्या जांभळ्या शाळेच्या आवारात चिंचेचं एक डेरेदार झाड आहे. झाडाखाली चांगला ऐसपैस पार बांधलाय. साधारणत: चौतीस वर्षांपूर्वी मी सुलतानला सर्वप्रथम पाहिलं ते याच चिंचेच्या पाराखाली. “शेट. शेट ना? बारके शेट? तुमाला घरा व्हारलाय. मी तुमाला नेवाला आयलोय.” त्या अनोळखी चेहेर्‍याचा मी पुरता अदमास घ्यायच्या आतच तो पुढे म्हणाला, “शेट, मी सुलतान. सुलतान इब्रमअली पेरनेकर.”

ललित लेखनाचा प्रकार: 

मला सगळे सारखेच!

काँक्रीटच्या जंगलातल्या माझ्या घरातून जेवढा निसर्ग दिसतो त्यात सर्व काही आलबेल दिसते आहे. समोरचे झाड वसंताच्या आगमनाने बहरुन आले आहे. त्याला घर मानणाऱ्या दोन-तीन खारुताई त्याच्या फांद्यांवरून नेहमीसारख्याच मजेत पकडापकडी खेळत आहेत. त्या झाडाचे दुसरे एक भाडेकरु कबुतरांचे एक जोडपे. त्यातला नर सध्या आपला गळा फुगवून त्यावरचे करडे जांभळे मोहक रंग दाखवून कबुतरणीला वश करु बघत आहे. मध्येच दोघे माझ्या बाल्कनीत एकांत शोधायला येतात बहुतेक. पण मीही सध्या घरीच असल्याने त्यांची गैरसोय होते. परंतु त्यांना त्याची फारशी फिकीर नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

बाजाराच्या आठवणी!

माझं लहानपण तसं फार गरिबीतही नाही आणि फार मध्यम वर्गातही नाही असे मध्येच कुठेतरी गेले. आईवडीलांकडे पैसा कमी होता पण खाऊन पिऊन सुखी होतो. शेती व जोडधंद्यामुळं सतत चलन फिरत राही पण ते अगदी पोटापुरतं असे. अगोदर शेती जिरायती होती. धान्य, कडधान्य एवढंच मिळायचं.

ललित लेखनाचा प्रकार: 

पसारा

खोटं कशाला बोला, खरं तर शुद्ध आळसामुळेच घराची अवस्था 'पसाराच पसारा चोहीकडे' अशी होऊन बसली होती. नवरा हा प्राणी पसार्याला ताबडतोब कावणारा मिळालेला आहे. तर मी म्हणजे अगदी शेवटचा पर्याय म्हणून पसारा आवरते. मला किती का पसारा असेना ढिम्म फरक पडत नाही. chores चो-अ-र्स या शब्दालाच कसा कंटाळवाणा नाद आहे. चो-अ नंतरचा र्स येणारच नाही असे वाटते. कधी संपणारच नाही. तसाच पसारा कसा पसरट शब्द आहे, पसरलेलं मध्ये ताबडतोब काहीतरी पसरटलेलं असं डोळ्यासमोर येतं. मला स्वत:ला घर टापटीप ठेवणाऱ्या लोकांबद्दल मला प्रचंड आदर आहे. कशा काय याना प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवर ठेवण्याची उत्तम सवय असते.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाटवड्या - प्लेट-फुल ऑफ हॅपीनेस आणि मेमरीज

ललित लेखनाचा प्रकार: 

निर्मितीची कल्पनाशक्ती

टोनी मॉरिसन उद्धृत

टोनी मॉरिसन ह्या प्रसिद्ध लेखिकेचं निधन झाल्यावर मला तिच्याबद्दल समजलं.

आमचं ऑफिस सध्या 'वी वर्क'च्या जागेत आहे. तिथे पाण्याच्या पिंपाशेजारी काही तरी उद्धृत असतं. कालचं मला आवडलं म्हणून मी तिथल्या रिसेप्शनव‌रच्या मुलींशी बोलायला गेले.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य