दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
४ जून
जन्मदिवस : हॉवरक्राफ्टचे जनक सर ख्रिस्तोफर कॉकरल (१९१०), इतिहासाभ्यासक, अनुवादक डॉ. भगवान गणेश कुंटे (१९२०), अभिनेत्री नूतन (१९३६), गायक एस्. पी. बालसुब्रह्मण्यम (१९४६), अभिनेता अशोक सराफ (१९४७), अभिनेत्री अॅंजेलिना जोली (१९७५)
मृत्युदिवस : साहित्यिक गोविंद वासुदेव कानिटकर (१९१८), बौद्ध धर्माभ्यासक, पंडित धर्मानंद दामोदर कोसंबी (१९४७), निसर्गतज्ज्ञ चार्ल्स विल्यम बीब (१९६२), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक व्यंकटेश अय्यंगार (१९८६), इतिहासतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशिन दासगुप्ता (१९९८), अभिनेत्री सुलभा देशपांडे (२०१६), सिनेदिग्दर्शक बासू चटर्जी (२०२०)
---
राष्ट्र सेवादल दिवस.
जागतिक युद्धपीडीत बालक दिवस.
स्वातंत्र्यदिन : टोंगा (१९७०)
१८७६ - न्यू यॉर्कहून निघालेली 'ट्रान्सकाँटिनेन्टल एक्सप्रेस' ही अमेरिकेच्या दोन तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी ट्रेन ८३ तास ३९ मिनिटांच्या प्रवासानंतर सॅन फ्रांसिस्कोला पोहोचली.
१९१३ - स्त्रियांना मतदानाचा हक्क मागणाऱ्या चळवळीची कार्यकर्ती एमिली डेव्हिसन हिने इंग्लंडच्या राजाच्या घोड्याचा लगाम खेचला. ती टाचांनी तुडवली गेली. त्या जखमांनी तिचे दहा दिवसांनंतर निधन झाले.
१९१७ - पहिल्या पुलित्झर पुरस्कारांचे वितरण.
१९२४ - इ.एम. फॉरस्टरलिखित 'अ पॅसेज टू इंडिया' कादंबरी प्रकाशित.
१९५७ - मार्टिन ल्युथर किंगने प्रसिद्ध "पॉवर ऑफ नॉन-व्हॉयलन्स" सांगणारे भाषण दिले.
१९८७ - जाफनातल्या तमिळ लोकांना विमानांतून मदत करण्याबद्दल श्रीलंकेने भारताचा निषेध केला.
१९८९ - शेकडो लोकांची हत्या करून तिआनानमेन चौकातील आंदोलन चिनी लष्कराने संपुष्टात आणले.
१९८९ - पोलिश निवडणुकांत 'सॉलिडॅरिटी' पक्ष विजयी; पूर्व युरोपात कम्युनिस्टविरोधी निदर्शने सुरू; वर्षाअखेरपर्यंत अनेक राष्ट्रांतील कम्युनिस्ट सत्ता समाप्त.
१९९४ - वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ब्रायन लारा याने आठ डावात सात शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.