छोटेमोठे प्रश्न

मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ८१

ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----

स्साला... रोच्ची कटकट

स्पष्टीकरण --
" रोजची कटकट" ह्या लिखित शब्दांचा प्रत्यक्ष उच्चार "स्साला... रोच्ची कटकट" असा केलाय.
स्पष्टीकरण समाप्त--
माझं त्या "तारे जमीनपर" पिच्चरमध्ये तो लहान मुलगा आहे ना "इशान अवस्थी"... त्याच्यासारखं होतं.
बुटाची लेस बांधता येत नाही झटकन. फार प्रयत्न करावे लागतात. पिशवीची बांधलेली गाठ सोडवता येत नाही.
रस्त्यानं जाताना फक्त समोरच लक्ष असतं. आजूबाजूला फारसं नाही. (पेरिफेरल व्हिजन नसणे बहुतेक ह्यालाच म्हणत असावेत.)
रस्ते लक्षात रहात नाहित. अगदि रडकुंडिला आलो. खुप प्रयत्न केले. पण नाहिच लक्षात रहात.

पाने

Subscribe to RSS - छोटेमोठे प्रश्न