अलीकडे काय पाहिलंत? - १५

(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)

***

'आयायटी बॉम्बे'मध्ये 'साथी' नावाचा एक LGBTQ सपोर्ट ग्रुप आहे. साथी आणि कशिश-फॉर्वर्ड यांनी मिळून आयोजित केलेला एक कार्यक्रम काल पाहिला. 'क्रश-शेक', 'क्यों की' आणि 'मित्रा' असे तीन लघुचित्रपट आणि नंतर त्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी गप्पा असं त्याचं स्वरूप होतं.

इशारा: पुढे सिनेमाच्या गोष्टी आणि इतरही काही रहस्यभेद आहेत. नको असल्यास, वाचू नका.

'क्रश शेक' अगदी फ्रेश होता. एका चिकण्या पोराच्या मागे लागलेली पोरगी पोरगा गे निघाल्याचं बघून भंजाळते इतकीच गोष्ट. पण कसली ताजीतवानी आणि मिश्कील. मजा आली.

'क्यों की'मधे गांधीजींची दांडी यात्रा आणि LGBTQ प्राइड मार्च यांच्यातलं साम्य जाणवण्याचा एक साक्षात्कारी क्षण आहे. तोही मस्त.

'मित्रा' अर्थातच तेंडुलकरांच्या 'मित्राची गोष्ट'वर आधारित आहे. ती गोष्ट आणि त्यावर आधारित एकांकिकेत (की नाटक?) काम करताना रोहिणी हट्टंगडींना आलेले अनुभव या दोन्ही गोष्टी वाचल्या होत्या. त्यामुळे माझी पाटी कोरी नव्हती. त्यात आणि रवी जाधवचं बोलणं. सिनेमा कुठल्या प्रेक्षकांना दाखवला जातो आहे, याचं अजिबातच भान नसल्यासारखं, फक्त 'माझीच लाल' प्रकारातली जाहिरातबाजी करणारं. बरं, सिनेमात विन्याच्या भूमिकेत संदीप खरे. हळुवार, कविमनाचा वगैरे कायमस्वरूपी. भन्साळीच्या देवदासकडून उसने आणलेले कपडे घालून पुण्याच्या हॉस्टेलात फिरणारा विलायती रुबाबातला विन्या. गोष्टीचा शेवट बदललेला. नि संदीप खरेच्याच एका 'उदासी तयाचा रंग'छाप कवितेचं वेष्टण. वीणा जामकर आणि काही खरोखर चांगले चित्रक्षण असूनही - डोकं साफ गेलं.

नंतरची प्रश्नोत्तरं मात्र...

तेंडुलकरांच्या 'नाटक आणि मी'मधल्या एका लेखात त्यांनी अमेरिकेतल्या एका नाटकाबद्दल लिहिलं आहे. अ‍ॅफ्रोअमेरिकन वस्तीतले भीषण प्रश्न मांडणारं ते नाटक होतं. नाटक परिणामकारक, पण शेवट अगदी बटबटीत - भाषणबाज. त्या शेवटानं नाटकाच्या परिणामावर बोळा फिरतो, तो तेवढा वगळा, असं त्यांनी नाटककाराला सांगितलं. तेव्हा नाटककारानं निर्विकार ठामपणे सांगितलं, 'ते तुमच्यासाठी नव्हतं.' त्या प्रश्नानं आपल्याला चपराक बसल्यासारखं वाटलं, असं तेंडुलकरांनी नोंदलं आहे.

तसाच अनुभव मला आला. मी सिनेमाचा बरेवाईटपणा आणि माझे तथाकथित समीक्षकी चष्मे घेऊन या कार्यक्रमाकडे बघत होते. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदी वेगळा, खुला होता.

'मित्राचा शेवट सकारात्मक केल्यामुळे फार बरं वाटलं.'
'या गोष्टी आम्हांला सोबत करतात.'
'मोकळेपणानं या विषयाकडे पाहिल्याबद्दल खूप आभार.'
'असे अनेक चित्रपट असायला हवे आहेत.'
'बिहारमधल्या माझ्या काही मित्रांना कदाचित मी काय म्हणतो आहे, ते स्वीकारता येणार नाही. पण त्यांना सिनेमाची गोष्ट कळेल. त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. थँक्यू.'
'सिनेमा सुंदर. पण गे कपल्सवर केलेलं साचेबंद स्त्रीपुरुषभूमिकांचं आरोपण पटलं नाही.'
'तुम्ही या विषयावर सिनेमा करताना सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल काही नवं शिकलात का?'

अशा अनेक प्रतिक्रिया. 'हळूहळू मुख्यधारेतले प्रेक्षक हे सगळं नॉर्मल म्हणून स्वीकारतील. तोवर क्विअर सिनेमामधे अडचणींचाच अँग्स्टी आवाज मोठा असणार आहे. पण हे बदलेल. नक्की.' असा आशावाद. खूप मजेनं सिनेमे आणि एकमेकांची सोबत एन्जॉय करणारे लोक. मजा आली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

धन्यवाद, हे अनुभव छान असतात बर्‍याचवेळेला, अ‍ॅम्बिअन्स वेगळा, प्रेक्षक वेगळे, माहोल वेगळा आणि मस्त जमु शकतो.

तसाच अनुभव मला आला. मी सिनेमाचा बरेवाईटपणा आणि माझे तथाकथित समीक्षकी चष्मे घेऊन या कार्यक्रमाकडे बघत होते. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदी वेगळा, खुला होता.

हे प्रतिसाद जाणुन घेण्यात मला अधिक रुची असते, त्यालाच मी परिप्रेक्ष्य वगैरे म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> तेव्हा नाटककारानं निर्विकार ठामपणे सांगितलं, 'ते तुमच्यासाठी नव्हतं.' त्या प्रश्नानं आपल्याला चपराक बसल्यासारखं वाटलं, असं तेंडुलकरांनी नोंदलं आहे. <<

हे मान्य करण्याचा प्रामाणिकपणा तेंडुलकरांकडे होता. पण मग मला असंही वाटलं, की ज्यांना 'शेवट सकारात्मक केल्यामुळे फार बरं' वगैरे वाटतं त्यांच्यासाठी मग त्याच धर्तीवर तेंडुलकरही नाहीत. 'मित्राची गोष्ट' - मूळ नाटक सुन्न करणारं आहे. जी.ए.ंच्या 'कैरी'चा सिनेमा करताना केलेले बदल जसे कथेच्या आशयाला मारक होते तसाच 'मित्राच्या गोष्टी'चा शेवट सकारात्मक करणं आशयाला मारक आहे असं वाटतं. (रवी जाधवकडून त्याहून फार वेगळ्या अपेक्षा नव्हत्याच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अर्थातच. मलाही 'कैरी'ची आठवण झाली (जरी दर्जामध्ये बराच फरक असला, तरीही!)

मला मजा आली ती प्रतिसादामुळे. नसेना का एखादा सिनेमा परिपूर्ण सर्वांगसुंदर. तो तरीही किती काय काय देऊ करत असतो, हे पाहणं आश्चर्याचं आणि मजेशीर होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जीएंच्या कथांवर आधारित चित्रपट, टेलीफिल्म्स, एकांकिका एवढेच काय पण जीएकथांचे इतर भाषांत (म्हणजे इंग्रजीत) भाषांतर करण्याचे माझ्या माहितीतले सर्व प्रयोग फसले आहेत. फेड, प्रदक्षिणा वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

का कोण जाणे, विहीर बघितल्यावर मला असं वाटलं की उमेश कुलकर्णी जीएंच्या कथांना चांगला न्याय देऊ शकेल.
विहीरमधून त्याने मांडलेली दु:खाची जातकुळी जीएंच्या अंगाने जाते. (शिवाय त्याच्या प्रॉडक्शनचं नावही आरभाट आहेच!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरिक्शण आवड्ल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

सहमत. माझ्यामते कैरीसुद्धा पूर्ण फसला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांना 'शेवट सकारात्मक केल्यामुळे फार बरं' वगैरे वाटतं त्यांच्यासाठी मग त्याच धर्तीवर तेंडुलकरही नाहीत.

बरोब्बर. बिर्याणीत भरपूर साखर घालून तिचा साखरभात करून खाणारेही असतील कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ उपमा अ‍ॅलर्ट देतोय :). मला गोष्टींचा, चित्रपटांचा, एवढेच नव्हे तर सिरीयल्स मधल्या एपिसोड्सचा शेवट सकारात्मक, हीरो लोकांचे 'रीडीमिंग' वगैरे करणारा असला तर आवडतो (असावाच असे नाही, पण असला तर आवडतो. प्रेफरन्स.). उदा: ब्रेकिंग बॅड मधे तसे बहुतांश होत नसल्याने ती आवडायला मला खूप वेळ चिकाटीने पाहावी लागली. एका एपिसोड मधे प्रॉब्लेम सोडवून कोणीतरी कोणाकडे तरी आभारदर्शक दृष्टीने पाहतोय, आपल्याही गळ्यात आवंढा वगैरे अशा सिरीयल्स मला जास्त आवडतात - बॉस्टन लीगल, बर्न नोटिस, लेव्हरेज, व्हाईट कॉलर ई.
पण बिर्याणीचा साखरभात करून खाणे मला आवडत नाही Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदी वेगळा, खुला होता.

हे वाचून फार छान वाटलं. गे आणि लेसबियन लोकांसाठी असं खुलेपणाने व्यासपीठ उपलब्ध होतं हे वाचून आनंद वाटला. चला, निदान शहरांमधून तरी जरा आशादायी वातावरण दिसतंय, अशीच प्रगती होवो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्राईंग टु फाईंड माय लॉस्ट सॅनिटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

समजलं, पण त्यानिमित्ताने नसीर आणि पंकजबद्दलही लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्विटर, फेसबुकवरून पाहिलेला पॅलेस्टाईनमधला एक फोटो -

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एवढ्यात पाहिलेले काही:

१.
फाइंडिंग फॅनी:
ठिक वाटला. उत्तम सिनेमॅतोग्राफी, नासीर आणि नेहमीच्या यशस्वी कंपनीचा चांगला अभिनय, गावाचं उत्तम उतरलेलं शांतपण, ध्वनी, प्रकाश, म्युझिक आदी तांत्रिक अंगेही आवडली. पण एक सिनेमा म्हणून एकत्र परिणाम मात्र म्हणावा तितका झाला नाही.
बरीच अपेक्षा ठेऊन गेलो होतो. अपेक्षेला तितका उतरला नाही.
(५.५ - ६ / १०)

२.
Everybody's Fine:
मला अतिशय आवडला. रॉबर्ट डी नीरो ची एक वेगळी भुमिका.
(कथावस्तुचा सारांश सुरू)
चित्रपटाला सुरूवात होते ते एका उत्साही उतारवयाच्या मध्याला आलेल्या बापाला (रॉबर्ट) घराची डागडूजी करताना दाखवण्यापासून. त्याची मुले विकांताला घरी येणार आहेत हे समजते. त्यांच्यासाठी सारी तयारी तो आनंदाने करत असतो. त्याची मुलांबद्दलची अटॅचमेंट हलकेच दाखवणारे मात्र व्यवस्थित स्पष्ट करणारे १-२ प्रसंग येतात. शेवटी नीसटात्या प्रसंगात समजते हा मनुष्य घरात एकटा आहे, बायको काहीच दिवसांपूर्वी वारली आहे. नी एकेका मुलाचे फोन येऊ लागतात की त्यांना येणे शक्य नाही.
मग हा ठरवतो की अमेरिकाभर विखुरलेल्या आपल्या चारही अपत्यांना स्वतः जाऊन भेटायचे. प्रकृतीमुळे विमानप्रवास वर्ज्य असतो. तेव्हा बाय रोड/रेल हा प्रवास तो करतो. अशावेळी आपल्या विश्वात मश्गूल असलेली मुले त्याला भेटतात. ती एकमेकांना धरून असतात का? त्यांच्या आयुष्यातील प्रश्न वडिलांना जाणवतात का? या प्रवासातून व नंतर वडिलांमध्ये झालेले बदल? मुलांवर बारीक लक्ष असणार्‍या व त्यांना आयुष्यात सतत नवी आव्हाने सर करायला पुढे 'ढकलणार्‍या' - पुश करणार्‍या - वडिलांची भुमिका व त्याचा अपत्यांवर होणारा परिणाम, मुले व वडिलांमधील तरल नाते इत्यादी अनेक लहान पण महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्ष करत कथा पुढे सरकते.
(सारांश समाप्त)
हळुवार नी खुसहुशीत हास्यात्मक प्रसंग, काहीवेळा अंतर्मुख करणारे संवाद तर शेवटी मनसोक्त रडु आणणारा हा चित्रपट मस्ट वॉच आहे.
माझ्याकडून ९/१०

३.
कॅलेंडर गर्ल्स:
आयुष्याची संध्याकाळ हा एक वेगळा विषय आहे जो चित्रपटांना खुणावत आला आहे. जगभरात विविध व्यक्ती आपल्या उतारवयात अनेकदा अश्या गोष्टी करत आल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात एक नवे पर्व तर सुरू झाले आहेच, एकुण समाजाच्या मानसिकतेतही त्यांनी बदल घडवण्यात आपला वाटा उचललेला आहे.
कॅलेंडर गर्ल्स ही कथा आहे अशाच एका लहानशा ब्रिटीश खेड्यातील महिलांची. साठी- सत्तरीच्या या बायका दर आठवड्याला WIच्या सभासद म्हणून भेटतात. त्यातील काहिंना ब्रोकोलीचे उपयोग वगैरेपेक्षा टवाळक्या व कुचाळक्या करण्यात(च) विंटरेस्ट असतो. अशावेळी एकाचा नवरा मरतो आणि त्याला श्रद्धांजली म्हणून एक सोफा घ्यायचा त्याच्या पत्नीच्या मनात असते. मात्र लेदर कव्हर्ड सोफा बजेटच्या बाहेर असल्याने तो गट एका वेगळ्या मार्गाने पैसा कमवायचे ठरवतो - तो मार्ग असतो आपल्याच न्युड फोटोजने सजलेले कॅलेंडर बनवून!

घर चालवणार्‍या सामान्य स्त्रिया त्यांना जे "गुड कॉज" वाटते त्यासाठी हे पाऊल उचलतात नी त्यांच्या स्वतःच्या, त्या क्लबच्या, गावाच्या आणि एकुणच समाजाच्या विचारसरणीत त्याबद्दल विविध आवर्तने उठतात. त्याचा उत्तम धांदोळा घेणारा हा चित्रपट बघण्यासारखा आहे. अतिशय खुसखुशीत संवाद, कुठेही चित्रपट वल्गर/पॉर्न होणार नाही याची घेतलेली दक्षता, उत्तम लोकेशन्स, सेटवर आवर्जून देखल घेण्यायोग्य लहान गोष्टी, पुरक पात्रांचा सुयोग्य वापर इत्यादी मुळे चित्रपट वेगळ्या उंचीवर जातो.

माझ्याकडून ८/१०

४.
माय ब्रदर निखिल
समलैंगिक संबंधांवर उत्तम भाष्य करणारा हा चित्रपट असला तरी एचायव्ही पॉसिटीव्ह व्यक्तीच्या आयुष्याची कहाणी मांडणारा हा चित्रपट आपल्या मुख्य विषयाशी कुठेही ढळत नाही हे विशेष. एवाना हा अनेकआंनी पाहिला असेल त्यामुळे अधिक लिहित नाही. मला खूप आवडला. बरेच दिवसांनी चित्रपटाने सहज न थांबता येणारे रडु दिले. मस्त!

माझ्याकडून ८/१०

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

Everybody's Fine:

होय होय फार टचिंग सिनेमा आहे. मी पाहीला आहे. ऋषीकेश यांनी सारांश छान लिहलाय. मलाही रडू आलेलं शेवटी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दाताखाली आलेले काही खडे:
ठिक,सिनेमॅतोग्राफी,भुमिका, डागडूजी, विकांताला,नीसटात्या,स्पर्ष,अश्या,काहिंना,न्युड,धांदोळा,रडु,पुरक,एवाना,अनेकआंनी.. विंटरेस्ट वगैरे बॅटमनी विनोद असावा म्हणून सोडून दिले आणि जोईप्रमाणे 'व्हाय गॉड, व्हाय?'असे म्हणून गप्प बसलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

या पिच्चरच्या कथावस्तू वरून this must be the place हा सिनेमा आठवला. पण पाहताना रडू येईलच याची ग्यारंटी नाही! तेव्हा पाहिलाच तर आपल्या रिस्कवर पाहावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅलेंडर गर्ल्स ची बरी आठवण करुन दिलीत. मी ट्रेलर पाहीले होते व फार आवडले होते. आता बघते नेट्फ्लिक्स वर मिळाला तर. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ्रेझरमध्ये त्याची चक्रम, गीकी, प्रिटेन्शियस, पॉंपस सायकिअॅट्रिस्टची भूमिका पाहिल्यापासून केल्सी ग्रामर हा माझा प्रचंड आवडता नट. नेटफ्लिक्स चाळता चाळता बॉस नावाच्या स्टार्झ ओरिजिनल सीरिजच्या मुखपृष्ठावर त्याचा चेहरा करारी भूमिकेत दिसला. उघडून बघितलं. 'विखारी राजकारणी - शिकागोचा मेयर - टॉम केन' असं वर्णन वाचून उत्सुकता चाळवली. अमेरिकेतली पहिली काही वर्षं शिकागोच्या जवळ घालवल्यामुळे नुसत्या त्या शहराच्या दर्शनासाठीसुद्धा ती सीरिज बघायला हरकत नव्हती. कधीतरी बघायचं म्हणत असताना गेल्या आठवड्यात आजारपण-जागरण या निमित्ताने एक निवांतपणा मिळाला. पहिला एपिसोड लावला. आणि मग थांबणं अशक्य होतं. तीन दिवसांत बिंज करून प्रत्येकी तासाभराचे अठरा एपिसोड कधी संपले कळलंच नाही.

टायटल सॉंगमध्येच शिकागोचा एक राखाडी-ड्रीअरी, भव्य-उत्तुंग-पण तरीही स्लीझी, असा मूड पकडलेला आहे. तो प्रचंड आवडला.
शिकागोच्या मेयरपदाशी जुळलेलं राजकीय शक्तीचं आणि प्रोहिबिशनमधल्या गॅंग्सपासून असलेलं गुन्हेगारी प्रवृत्तींचा अंडरकरंट हे या सीरियलमध्ये छान सामावलेलं आहे.
केल्सी ग्रामरची फ्रेझरमधून उभी राहिलेली गोग्गोड प्रतिमा उडून जाऊन अत्यंत नीच राजकारणी या प्रतिमेत जायला काहीच अडचण आली नाही, याचं कारण म्हणजे त्याचा स्वतःचा अभिनय आणि कथावस्तूची विश्वासार्हता. ज्यांनी फ्रेझर बघितलेलं नाही अशांसाठी - चिमणराव ही प्रतिमा जाऊन दिलीप प्रभावळकरला गब्बरची भूमिका करता आली तर जसं परिणामकारक वाटेल तसं काहीसं...

ही सीरियल पाहताना वारंवार हाउस ऑफ कार्ड्सशी तुलना होत होती. पण त्या तुलनेत बॉस कितीतरी वरचढ ठरते. केव्हिन स्पेसीपेक्षा केल्सी ग्रामरचं पात्र जास्त हाडामांसाचं, पोलादाचं वाटतं. आणि आसपासचे राजकीय ताणतणाव हे खरेखुरे आणि अधिक क्लिष्ट, गुंतागुंतीचे आहेत. त्यामानाने हाउस ऑफ कार्ड्सची कथा फारच एकरेषीय वाटते.

खटकणारी एकच गोष्ट म्हणजे या सीरियलमध्ये अनेक सेक्स सीन्स आहेत. सुरूवातीच्या एपिसोड्समधले उत्तान बेफिकीरपणामुळे त्या कथेत रंग भरणारे ठरतात. पण नंतर नंतर प्रत्येकच भागात कोणी ना कोणी, कोणा ना कोणाशी काहीतरी करताना डिट्टेलवार दाखवायचं असा फॉर्म्युलाच बनून जातो. (कोणीतरी 'यात खटकण्यासारखं काय बुवा' असं म्हणेलच..)

असो, संधी मिळाल्यास जरूर पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाउस ऑफ कार्ड्सशी तुलना होत होती. पण त्या तुलनेत बॉस कितीतरी वरचढ ठरते

हा अभिप्रायच उत्सुकता वाढवायला पुरेसा आहे.
शोधावाच लागेल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'बॉस'चे पहिले सातआठ भाग पाहिले. त्यातील सेक्स सीन्समुळे सगळी मजाच निघून जाते. अगदी टिटिलेटिंग, डिटेलवार दाखवत बसतात त्यामुळं मुळात त्या भागाचा विषय काय होता हेच विसरायला होतं. (कॅथलीन रॉबर्टसन बाकी जबराच दिसते Wink )टायटल साँग आणि सुरुवातीला दिसणारे शिकागो फारच छान आहे. गेम ऑफ थ्रोन्सही मी सेक्स सीन्सला वैतागूनच सोडून दिले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप वर्षांपूर्वी 'फ्रेझर' या मालिकेचे यापूर्वी तीनचार भाग पाहिले होते. त्यावेळी 'साईनफेल्ड'चे भूत डोक्यावर स्वार असल्याने फ्रेझरला न्याय देता आला नव्हता. सुदैवाने फ्रेझरचे सर्व भाग आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत. गेले काही दिवस बिंजवॉचिंग केल्यानंतर फ्रेझर, नाईल्स, डॅफनी, रॉझ, बुलडॉग, मार्टी आणि एडी या सर्व पात्रांचा मी प्रचंड फ्यान झालोय.

साईनफेल्डच्या तुलनेत ही मालिका फारच कमी लोकप्रिय आहे याचे आश्चर्य वाटते. विनोद, संवाद आणि प्रसंग तिन्ही उच्च आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साईनफेल्डच्या तुलनेत ही मालिका फारच कमी लोकप्रिय आहे याचे आश्चर्य वाटते. विनोद, संवाद आणि प्रसंग तिन्ही उच्च आहेत.

अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजपासून ब्लॅकलिस्टचा दुसरा सीझन सुरु होतोय. मी पहिला सीझन पाहिला नव्हता. मागचा वीकेंड आणि त्यापूर्वीचे काही दिवस बिंज वॉचिंग करुन बहुतेक भाग पाहून संपवले. बोस्टन लीगल आणि सेक्स, लाईज अँड व्हिडिओटेप या चित्रपटातील जेम्स स्पेडर अत्यंत आवडतो. ('ऑफिस' मध्येही त्याला चांगला रोल होता पण तो रोल नंतर फारच उथळ होत गेला) त्याचा स्क्रीन प्रेझेन्स नाना पाटेकरची आठवण करुन देणारा आहे.
'ब्लॅकलिस्ट'मध्ये सगळी सीरिज एकखांबी तंबूसारखी त्याच्या आधारावरच टिकून आहे. (बाकीच्या मेकप बिकप केलेल्या, लिपस्टिक लावलेल्या एफबीआय एजंट वगैरे ठीकठाक.) एम-आय ५ (स्पूक्स), एनसीआयएस, २४ वगैरे क्राईम शोजमध्ये असतं तसंच फिल्ड एजंट्स, सीआयए, एफबीआय, डबल एजंट वगैरे घिसेपिटे प्लॉट्स आहेत. नाही म्हणायला थोडेसे नवीन प्रश्न (केमिकल वेपन्स, डीएनए, इंटरनेट हॅकिंग) घेतले आहेत पण एकंदरीत क्राईम शोजमध्ये चालतं तसंच सगळं.

जेम्स स्पेडर आवडत असल्यास आवडू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रश्न इथे विचारणे योग्य आहे की नाही ते माहित नाही पण मुंबईत २२ सप्टे. ते २९ सप्टे. जागरण फिल्म फेस्टीव्हल सुरु झालाय. कुणी दिलेल्या दुव्यावर जाऊन एखादा चित्रपट सुचवाल काय प्लीज ?
साधारण हटके विषयावरचे चित्रपट पाहावयास आवडतील. (अर्थात आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणल्यावर तसे ते असतीलच हे वेगळे सांगायला नकोच)

दुवा : http://jff.co.in/films.php

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अग्ली नावाचा अनुराग कश्यपचा सिनेमा १९ सप्टेंबर ला रिलीज होणार होता. पण कुठेच दिसत नाहिये तो सिनेमा लागलेला. कोणाला काही माहित आहे का याबद्दल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कश्यपचा "पाँच" अजून रिलीज झाला नाहीये. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

'पाँच' यूट्यूबवर मिळतो की सहज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी टॉरंटवरून घेऊन बघितला होता.

अवांतरः
कश्यपनी त्याच्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितल आहे. टोरंट्समुळे त्याचे ब्लॅक फ्रायडे, पांच हे चित्रपट अधिकृतरित्या रिलीज न होता देखील माऊथ टू माऊथ पब्लिसिटीने अनेक लोकांपर्यंत पोहोचले आणि त्याचं करीअर वाचलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अवांतरः

जर टॉरंटमुळे पिच्चर लोकांसमोर पोचले तर त्याचं करिअर कसं वाचलं? म्हणजे प्रसिद्धीबिसिद्धी ठीके, पण टॉरंट इल्लीगल डौनलोड आहे, सबब पैसा इ. वरिजिनल लोकांपरेंत जाणार नाही. मग त्याला काय मिळालं? ते समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रसिद्धीच. या नावाचा एक मनुष्य चित्रपट बनवतो आणि ते भारी असतात ही पब्लिसिटी झाली जी त्याला फुडले पिच्चर मोठ्या निर्मिती गृहांकडून मिळवायला उपयोगी पडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ओह, बरोबरे. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पांच वर त्याकाळात "डिस्टर्बींग मुवी" या टॅग खाली सेंन्सॉरने बंदी घातली होती. अनुरागने एकही सिन कट करायला नकार दिला असल्याने यात वादाची अजुनच भर पडली. शेवटी त्याने स्वतः होउन नैराश्यात हा चित्रपट प्रोड्युसरची परवानगी घेउन नेटवर अपलोड केला. यातलं केकेच (अभिनय) "मै खुदा" गाणं जबराच. पुढे काळ थोडा बदलला आणी अनुरागही. मग त्याने ह्याच चित्रपटाचा शैतान नावाने कल्किला घेउन रिमेक बनवला. रिलीजही केला Smile कारण अनुरागचे म्हणने असते की त्याला त्याच्या वादात प्रोड्युसरचे आर्थीक नुकसान करणे आवडत नाही. ब्लॅक फ्रायडे आणी पांच बाबत त्याने दाहक अनुभव घेतले.

अवांतर :- पांच चित्रपट बघितल्यावर अशुतोष गोवारीकरने इमिजीएट प्रतिक्रीया दिली होती की इट इज डिस्टरबींग मुवी. सेन्सारची बंदी योग्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

black friday 2007 ला रिलीज झाला होता.
हे ढळढळित लक्षात राहण्यामागे एक दु:खद ,ह्रुदयद्रावक आठवण आहे.
मी कभी अलविदा ना केहना पहायला गेलो होतो; तेव्हा black friday पुढील आठवड्यात ह्याच थेट्रात लागणार असल्याची जाहिरात पाहिली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ब्लॅक फ्रायडे २००७ मध्ये रिलीज व्हायच्या आधी २-३ वर्ष टोरंटवर होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> black friday 2007 ला रिलीज झाला होता. <<

भारतात थिएटरमध्ये रीतसर प्रदर्शित होण्याच्या काही वर्षं आधीच 'ब्ल्॓क फ्रायडे' आणि अनुराग कश्यपची हवा झाली होती हे खरं आहे. 'ब्ल्॓क फ्रायडे' चित्रपट महोत्सवांमधून आधीच (२००४ सालीच) फिरला होता हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तो तेव्हा प्रचंड गर्दीत दाखवला गेला होता. त्यामुळेच imdbवर तो २००४चा असल्याचं म्हटलं आहे. म्हणून टॉरंट्स हे अनुराग कश्यपच्या कल्टमागचं एक कारण असलं तरी ते एकमेव कारण नाही. किंबहुना, 'सत्या'चा लेखक म्हणून मी त्याचं नाव सर्वप्रथम ऐकलं होतं. नंतरचं राम गोपाल वर्माचं वाईट काम सर्वांसमोर होतं. त्यामुळे अनुराग कश्यपला 'सत्या'चं श्रेय अनेक वर्षांपासून मिळत होतं. तेदेखील त्याच्या कल्टमागचं एक महत्त्वाचं कारण होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सत्याचे स्क्रिप्ट अनुराग कश्यपनेच लिहलं होतं. दमदार होतं वादच नाही. ब्लॅकफ्रायडे चे रिलीज न्यायालयातील खटल्यांतील आरोपींची नावे जशीच्या तशी वापरल्याने ( व खटला प्रलंबीत असल्याने) पुढे ढकलण्यात आले. अनुरागचा कल्ट निर्माण होण्यामागील महत्वाचे कारण आहे त्याची दिग्दर्शन शैली आणी बोल्डनेस. उदा. करन जोहरच्या चित्रपटांची खिल्ली (ही रामुनेही उडवली), आता अमिताभ मेकॅनीकल झालाय, स्क्रिप्ट अँड् स्टोरी इज द रिअल स्टार आय डोंट नीड अदर्स, मि ब्लॅक फ्राय्डे बनवीताना दाउदला घाबरलो नाही मग सलमानला कशाला घाबरेन... वगैरे वगैरे विधाने. कश्यप रसायनच वेगळं आहे.

पण आता काही गोष्टी नमुद कराव्या लागत आहेत... करन जोहर सोबत पॅचप अन त्यातुन हंसी तो फंसी सारख्या कमकुवत चित्रपटांची निर्मीती. अतिशय व्यवस्थीत बांधणी केलेली कथा पण प्रत्येक सीन इनोवेटीव पध्दतीनेच चित्रीत करायचा अट्टहास असल्याने प्रेजेंटेशन रोचक करण्यच्या नादात संल्गनता तुटणे यामुळे त्याचे २.२५ तासाचे चित्रप्टही ४-५ तास झाले बघत आहोत असा भास होतो ( उदा. अग्ली, गँग्ज ऑफ वासेपुर), अमिताभ सोबत पॅचप. दरवेळी फक्त लुजर अ‍ॅटीट्युड असलेली पात्रे घेउन चित्रपट तयार करणे ( म्हणे डार्क चित्रपट आहे) वगैरे वगैरे वगैरे... बॉम्बे वेलवेटसाठी रणबीर कपुर( स्टार) घेणे.

बंब्मे वेल्वेटचा ट्रेलर अतिशय अनइंप्रेसीव वाटला. रणबीरला कुरळे केस देउन तर प्रचंड बायकी बनवले आहे... मग पडद्यावर त्याने मारधाडीचा कितीही आव आणो. अर्थात पिक्चर अभि बाकि आहे. बघुया...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

हा सिनेमा २६ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पीकेच्या गर्दीत याला प्रदर्शनासाठी जागा मिळावी ही इच्छा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नील डिग्रास टायसन नामक फिजिसिस्टाने नॅरेट केलेली कॉसमॉस नामक अप्रतिम सेरीज पाहतो आहे. तूर्त फक्त पयलाच एपिसोड पाहून झाला पण डॅम इंप्रेस झालो. ब्ल्यू रे वाली व्हर्जन डौनलोडवल्यामुळे स्पेस इ. ची अवाक करणारी सुंदर दृश्ये, साधी सोपी कथनशैली, इ. फार मस्त प्रकार आहे. लोकांनी अवश्य पहावी असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुझ्याकडे आहे हे उत्तम. नावावरीन नी वर्णनावरून स्पेस सायफाय वाट्टेय.
भेटलास की घेईन तुझ्याकडून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भेटलो की देईनच- तो काय विषय नाही.

पण सायफाय नाही. विश्व कसे निर्माण झाले इ. बद्दलची सेरीज आहे. बिग ब्यांग ते चंद्राबिंद्रावर जाणारा माणूस हा प्रवास कसा काय झाला बॉ? या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रेत्न आहे.

१९८० च्या दशकात कार्ल सगान नामक फिजिसिस्टाने याच नावाची सेरीज नॅरेट केली होती, तिचाच हा अपडेटेड औतार म्हणा की! ह्या नव्या सेरीजचा नॅरेटर नील डिग्रास टायसन हा त्या सगानचा लै मोठ्ठा पंखा आहे. वरिजिनल सेरीजमधले बरेच नॅरेटिंग डिव्हाईसेस आहे तस्से ठेवलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Cosmos थोर आहे.तो नील बाबा सेगन यांचाच वारसा पुढे चालवत आहे. आणि cosmos सारख्या थोर मालिका पाहून अनेक मनांत विज्ञान रुजेल असे आशादायीपणे वाटते.(केवळ अंतराळशास्त्राची भूल नव्हे तर एकंदरीत 'विज्ञान') शिवाय नील यांची शैली क्या केहने.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण सहमत! लय खंग्री सेरीज आहे. बारक्या पोरांना दाखवणे तर मष्टच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा माणूस लई डोक्यात जातो. अल्पकाळचा शास्त्रज्ञ आणि फुल टैम स्वतःची हवा करणारा, असं वाटतं. नव्या योर्कातल्या "Museum of Natural History" मध्ये planetarium चा डिरेक्टर आहे म्हणे. तिथे पण त्याच्या रेकॉर्डेड आवाजातला animated अगम्य show… गिफ्ट शॉप मध्ये फक्त त्याचीच पुस्तकं… cleveland सारख्या छोट्याशा गावातल्या planetarium मध्ये "live" anchor/guide होता आणि त्याचा show १०० पट अधिक मजेदार आणि माहितीपूर्ण होता… हे टायसन काका निव्वळ नफेखोर वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता इथे अनेकांपर्यंत तेच पोहोचतात.मुलाखती आणि उपलब्ध यूटयूब वीडियो यांवरून तरी तो चांगला वाटला.तुम्हाला आवडणारी इतर विज्ञान संवादक मंडळी कोण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो इथे अमेरिकेतही tyson काकाच पोहोचतात सगळीकडे… मी फक्त माझं मत सांगितलं… माझे आवडते विज्ञान संवादक असे कुणी नाहीत हो… विज्ञान सोपं करून सांगणारा आणि उगाच स्वतःची मार्केटिंग न करणारा असा कुणीही चालतो मला…

tyson काकांचा दिखावाच फार… जिथे जातील तिथे ज्ञान झाडत असतात. Titanic ची ३D आवृत्ती बनत होती तेवा या काकांनी जेम्स कॅमेरोन ला सांगितला म्हणे, मूळ चित्रपटात rose लाकडावर आडवी पडून तारे बघते, तर त्यातली ताऱ्यांची मांडणी चुकलीय म्हणे तुमची. मग कॅमेरोन काकांनी tyson काकांना बोलवून ग्रह तार्यांची मांडणी नीट करून घेतली म्हणे… उगाच काय कुठेही शोबाजी? आणि एवढं करूनही मांडणी चुकलीच म्हणे…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Titanic ची ३D आवृत्ती बनत होती तेवा या काकांनी जेम्स कॅमेरोन ला सांगितला म्हणे, मूळ चित्रपटात rose लाकडावर आडवी पडून तारे बघते, तर त्यातली ताऱ्यांची मांडणी चुकलीय म्हणे तुमची. मग कॅमेरोन काकांनी tyson काकांना बोलवून ग्रह तार्यांची मांडणी नीट करून घेतली म्हणे… उगाच काय कुठेही शोबाजी? आणि एवढं करूनही मांडणी चुकलीच म्हणे…

येडा आहे का टायसन? उगा कायतरीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जेव्हा कार्ल सेगन त्याच्या कॉसमॉसमुळे लोकांचा चाहता झाला तेव्हा त्याच्याबद्दल लोकांनी अशीच नाराजी व्यक्त केली होती. ("अल्पकाळचा शास्त्रज्ञ आणि फुल टैम स्वतःची हवा करणारा", फार दिखावा करतो वगैरे) कोणीतरी नंतर त्याच्या रिसर्च पेपर्स पब्लिशींगचा स्टॅटीस्टीकल अभ्यास केला आणि त्याच्या रिसर्चमध्ये त्याच्या 'पब्लिक अवेअरनेस प्रोग्रॅममुळे' कोणताही खोडा पडलेला नाही हे सिद्ध केले. टायसनवर आरोप करणार्‍यांनी असे काहीतरी सिद्ध करण्याची जबाबदारी घेतली तर त्यांच्या आरोपांना आम्ही गंभीरतेने घेऊ.

राहता राहीला प्रश्न टायटॅनिकचा. जेम्स कॅमेरूनबद्दल जर तुम्हाला माहित असेल तर त्याला विज्ञानाबद्दल फार प्रेम आहे, एखादी गोष्ट करताना त्यात काटेकोरपणा ठेवण्याबाबत तो प्रसिद्ध आहे. नुकताच कॅमेरून मरियाना ट्रेंचमध्ये स्वतः एक सबमरीन "पायलट" करून गेला. http://en.wikipedia.org/wiki/Deepsea_Challenger

http://www.washingtonpost.com/blogs/style-blog/post/titanic-night-sky-ad...
"Tyson said that he felt he should hold Cameron accountable because of his infamous precision in the movie. Cameron took painstaking care to recreate every historical detail in the film, even using the original blueprint of the ship — but he didn’t take as much care when it came to the sky, apparently."
कॅमेरूनचे वक्तव्यः “And with my reputation as a perfectionist, I should have known that and I should have put the right star field in. So I said ‘All right, send me the right stars for that exact time and I'll put it in the movie.’ ”

या गोष्टीनंतर टायसनला असे प्रश्न लोक विचारू लागले आणि आता तो बर्‍याचदा आपली मतं याबाबत थोड्याश्या गमतीने व्यक्त करतो. (उदा. ग्रॅव्हीटी)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्रतिसाद आवडला.
टायसन यांचे त्यांच्या क्षेत्रातले काम आणि त्याचा दर्जा यांचे मूल्यमापन करूनच एखादे जबाबदार विधान करावे. एरव्ही व्यक्तिगत आवडनिवड असणारच. मला त्यांचा विट आवडतो व तो अस्थानी आणि अनावश्यक वाटत नाही.
अडनिडया वयात टायसन सारख्या लोकांचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो हे मला नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला तो माणूस आवडत नाही ह्या विधानात बेजबाबदार काय आहे कळले नाही. मी त्यांच्या museum मध्ये त्यांचा show पाहिलाय आणि मला नाही आवडला. relevant वाटला नाही. आणि एकूणच media मधला त्यांचं वागणं हे उगाच गरज नसताना ज्ञान पाजळणारं वाटलं… हे माझं मत आहे. मी माझ्या प्रतिक्रियेत कुणाच्याही मतांचा अवमान केला नाही त्यामुळे माझं criticism हे बेजबाबदार नाहीये… फारफार तर माझ्यापुरतं मर्यादित आहे असं म्हणा… तुमच्या आवडी माझ्यावर थोपवू नका…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आताच romedy now वर द बिग इअर पाहिला . आवडला . एका वर्षात सर्वाधिक वेगवेगळ्या पक्ष्यांना पाहणे आणि बघणे याला अमेरिकेत Birding म्हणतात . दरवर्षी सर्वाधिक पक्षी नोंदानार्या पक्षी निरीक्षकाला Birder of The Year पुरस्कार मिळतो . कहाणी मधले तीन मुख्य पात्र बोस्टिक , स्टू , आणि ब्रॅड हे तिघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले या पुरस्कारासाठी जीव तोडून प्रयत्न करत असतात . या पैकी बोस्टिक हा सद्य विजेता . नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी आणि अजून कोणी आपल्या पुढे जाऊ नये यासाठी झपाटलेला . यासाठी कुठलीही किंमत मोजायला तैयार . अगदी वैयक्तिक आयुष्याची पण . स्टु हा करोडपती उद्योगपती . पण आयुष्याच्या संध्याछायेत आपण काय कमावल यापेक्षा काय गमावलं याची tally करणारा संवेदनशील माणूस . आयुष्याच्या शेवटी उद्योग साम्राज्य वाऱ्यावर सोडून तो आपल्या आवडत्या कामासाठी बाहेर पडतो . Birding साठी . आणि शेवटचा ब्रॅड . ३६ वर्षाच्या ब्रॅड हा ३६ वर्षीय घटस्फोटीत . निव्वळ रेटायच म्हणून रटाळ नौकरी करणारा . थोडक्यात loser type . पण त्याला पण आता जग आपल्याला आपल्यानंतर कस आठवेल याची चिंता भेडसावू लागली आहे . हे तिघे पण जास्तीत जास्त पक्ष्यांना आपल्या Camera मध्ये कैद करण्यासाठी सर्व विवनचनावर मात करून बाहेर पडतात . झपाटलेल्या बोस्टिक ला मात द्यायला दोन ध्रुवा वरचे स्टु आणि ब्रॅड हात मिळवणी करतात . शेवटी हि स्पर्धा कोण जिंकत ? या स्पर्धेत कोण काय कमावत आणि कोण काय गमावत ? या प्रश्नाची उत्तर प्रत्यक्ष बघण्यात मजा आहे . बाकी सिनेमा चा सगळ्यात मोठा plus point म्हणजे मला कळलेले Birder आणि Birding च अनोख सुंदर विश्व . ते पडद्यावर अतिशय सुंदर टीपल पण आहे . माझ्या आवडत्या जेक ब्लेक ने ब्रॅड च पात्र सुंदर उभारलंआहे . त्याला ओवन विल्सन आणि स्टीव मार्टिन ने तितकीच तोलामोलाची साथ दिली आहे . मला background score पण भन्नाट आवडला . एकूण चुकवू नका संधी मिळाली तर . भारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

विषय आवडीचा आहे. नक्की शोधुन बघेन
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विकांताला पाहिलेले चित्रपटः

१. डिस्ट्रिक्ट ९
सायफाय पट. नेहमीचा तरी वेगळा.
< कथावस्तु सुरू>
भविष्यात जोहानसबर्ग शहरावर एक प्रचंड मोठे अंतराळायान येऊन थांबले आहे व काही एलियन्स पृथ्वीवर येऊन २० वर्षे झाली आहेत. त्या एलियन्सला खूप खायला लागते. त्यांच्यासाठी शहराला लागुनच एक नवा भाग राखीव ठेवला आहे. त्याचे नाव डिस्क्ट्रिक्ट ९.
आता हे परग्रहवासी कायमचेच इथे राहणार, त्यांचा उपद्रव नको या भावनेने त्यांच्यासाठी शहरापासून २०० किमी दूर नव्या जागी त्यांना हलवायचे ठरते. त्यासाठी त्यांना नोटिशी बजावायला एका अधिकार्‍याची नेमणूक होते. तो तिथे घराघरात जाऊ लागतो. एका अ‍ॅक्सिडन्ट नंतर त्याचा एक हात एलियन्स सारखा होतो. मग काय होते? एलियन्स इथे अडकले असतात का थांबले असतात? त्यांच्या परत जायच्या मार्गाचे काय होते? वगैरे अनेक प्रश्नांची उत्तरे हळुहळु प्रेक्षकाला समजु लागतात
<कथावस्तु समाप्त>

एका डॉक्युमेंटरीसारखा स्थळ, बोलणार्‍या - मुलाखत देणार्‍या व्यक्ती व हळुहळू उलगडत जाणारी कथा रोचक आहे.
वेगळ्या प्रकारे चितारलेला व अनेक विषयांवर मुळातून विचार करायला लावणारा हा चित्रपट मस्ट वॉच आहे
माझ्याकडून ७/१०

२. द एंजल्स शेअर
विनोदी अंगाने स्कॉटिश समाजाचे चित्रण, एकाच वेळी वैयक्तिक कथा आणि विस्कटलेल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी गैरकृत्य करूनही ते अनैतिक न वाटवण्याची किमया साधलेला हा चित्रपट मला खूप आवडला.
लोकेशन्स किंवा इतर अनेक तांत्रिक अंगे (विशेषतः ध्वनी) वगैरे उत्तम आहेच. मला आवडली ती भाषा. तद्दन स्कॉटिश अ‍ॅक्सेंट कानावर इतका पडतो, त्यातही कथेतील पात्रे ही "वाया गेलेली" असल्याने अतिशय स्लँग नी "फकिंग" या शब्दांची रेलचेल असणारे अगदी खास "देशी" (लोकल) संवाद चित्रपटाला खुमासदार बनवतो.

चार मित्रांमधील (यात एक मुलगी तीन मुले) खोडकर, अज्जिब्बात हम चार जन्मो जन्मोके दोसत वगैरे डायलॉग न टाकता - सगळा मेलोड्रामा वगळून - येणारी दिसणारी मैत्री फारच सटल नी नेमकी! जगात मैत्री असली की वर्तनही इथुन तिथून सारखेच असते वाटायला लावणारी आणि म्हणूनच या चौघाना गावगुंड प्रतिमा असणार्यांचाअ ह्युमन आस्पेक्ट दाखवण्यात यशस्वी झालेली फिल्म. एकदा तरी बघाच!

माझ्याकडून ७/१०

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अतिअवांतर: टाइम मॅनेजमेंटचं एखादं लेक्चर अरेंज करशील का पुढल्या कट्ट्याला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

टिव्हीला बाय बाय करायला तयार असाल तर नक्की! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लास्ट वीक टुनाइट विथ... नमो! नमो!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हिस्टरी टीव्ही ची "मेन व्हू बिल्ट अमेरिका " ही चार भागान्ची मालिका आता तूनळी वर उपलब्ध आहे. मला अतिशय आवडली ...

अमेरिकन सिव्हिल वॉर वर आधारित अनेक चित्रपट टोरेन्ट च्या कॄपेने बघायला मिळाले . उल्लेखनीय असा "कोल्ड माउन्टन" आणि "गॉन विथ द विन्ड"...इतरही बरेच चांगले आहेत ...

काउबॉय मूव्हीज किंवा वेस्टर्न मूव्हीज या प्रकारातील देखील काही चित्रपट खूप आवडले ... नवीन आलेला "अ मिलियन वेज टु डाय इन द वेस्ट" बरा वाटला ...

कालच एका दमात "बँग बँग" आणि "हैदर " बघितले... हैदर बरा वाटला ,पण काही वेळेला दिग्दर्शक दहशतवादाच्या बाजूने बोलतोय की काय असा भास होतो....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

'हॅम्लेट' हे शेक्सपिअरचं प्रचंड थोर काहीतरी असलेलं नाटक आहे आणि त्यात 'टू बी ऑर नॉट टू बी' हे स्वगत आहे यापलीकडे मला हॅम्लेटविषयी काहीही माहीत नाही. या पार्श्वभूमीवर 'हैदर' पाहिला. आवडला.

- उत्तरार्धात सिनेमा गरजेहून थोडा जास्त रेंगाळतो असं माझं मत झालं. ते हॅम्लेटबद्दलच्या अज्ञानापोटी असू शकेल.
- फैजच्या कवितांचा काहीच्या काही सुंदर, चपखल वापर.
- सिनेमॅटोग्राफीबद्दल काय बोलावं? काश्मीर हे गोष्टीतलं एक पात्रच झालं आहे.
- तब्बो आणि इतर लोकांच्या अभिनयाबद्दल काही बोलायची गरज आहे असं मला वाटत नाही.
- भारतीय सैन्याचं चित्र कसंही रंगवलं तरी माझा स्वाभिमान इत्यादी दुखावण्याचं कारण नाही. तसली राष्ट्रभक्ती गेली खड्ड्यात. पण गुलजारच्या 'माचिस'ची फारच आठवण झाली. त्यात पोलिसांचा छळ या एकमात्र कारणापोटी पंजाबात अतिरेकी तयार झाले असं चित्र त्यात होतं. सिनेमा कितीही छान, तरलबिरल असला तरीही ते एकांगीच होतं. तसंच इथे झालं आहे का, असा एक बारीकसा किडा चावला.

'हैदर' पुन्हा पाहावा लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

टू बी ऑर नॉट टू बी

ह्या स्वगताचा हैदर मधे तुम्हाला लागलेला(अनुभव) संदर्भ सांगता येईल काय? मी चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे जाणुन घेण्यास उत्सुक.

टिपःप्रश्न प्रामाणिक आहे, खवचट नाही. माझ्या प्रतिसादांना खवचट श्रेणी मिळण्याची व्यवस्था केली असावी काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इशारा: गोष्ट कळू नये असं वाटत असेल त्यांनी पुढे वाचू नये.

ज्या बापाबद्दल नितांत आदर आणि जवळीक तो खरंच दहशतवाद्यांना सामील होता नि म्हणून मारला गेला, की व्यभिचारी आईनं काकाच्या मदतीनं त्याचा बळी घेतला - या संभ्रमात हैदर वेडापिसा झालेला आहे. बापाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी दहशतवाद्यांनी दिलेलं पिस्तुल त्यानं जवळ बाळगलेलं आहे. पण मारायचं की मरायचं, याबद्दल त्याचा निर्णय झालेला नाही. तेव्हा हे स्वगत येतं.

सिनेमात 'टू बी ऑर नॉट टू बी'ची आठवण व्हावी अशी दोन स्वगतं आहेत. एक खाजगीत प्रेयसीसमोर बोललं गेलेलं (यात हैदरचा व्यक्तिगत संभ्रम दिसतो असं माझं मत) आणि एक चौकात जाहीरपणे बोललं गेलेलं. (हे दुसरं स्वगत पाहताना मला 'माचिस'मधला नाना पाटेकर आठवला. त्याच्या पार्श्वभूमीला काश्मिरी जनतेची कोंडी आहे.) दोन्ही आवडली. चपखल वाटली.

काश्मीरची पार्श्वभूमी हॅम्लेटच्या गोष्टीकरता ओढूनताणून आणलेली वाटली नाही, चपखल बसली, त्यात या स्वगताचाही वाटा असणार.

वर लिहायचं राहून गेलेलं, म्हणून इथे अवांतरः
१. शाहीद कपूरनं फारच सुरेख काम केलं आहे. पण त्यात काय सरप्राइज नाही. 'कमीने'मधला शाहीद बघून त्याचा अंदाज होताच.
२. हिंदी सिनेमाची (सलमान!) आणि हिंदी गाण्यांची लोकप्रियता यांचा केलेला वापर. अंगावर काटा यावा, असा वापर आहे. बघूनच अनुभवावा असा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

एकंदर मकबूल, ओंकारा, हैदर. तोडीस तोड ट्रायॉलॉजी झालीय तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'माचिस' नाही हां, सॉरी, 'हुतुतू'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

www.maayboli.com/node/51102 इथली अमा ची पोस्ट रोचक आहे. मी तो धागा अजून वाचला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हे जवळजवळ तंतोतंत लिहायला मी आले होते. शेवटचा मुद्दा सोडुन. पोलिसांचं चित्रण मला एकांगी नाही वाटलं.
शाहीद कपूरचं झपाट्ल्यासारखं वागणं अस्वस्थ करतं. तो चांगला नर्तक असल्याचा वापर छान केलाय 'बिसमिल' गाण्यात.
हैदर मीही पुन्हा बघेन कदाचित.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही पाहिला मागच्या आठवड्यात हा पिच्चर. पहिला भाग खूप आवडला, दुसर्‍या भागात थोडी निराशा झाली. केके मेनन गुलालमध्ये होता तसाच इथेही आहे. काहीच फरक नाही. बहुदा दोन्ही पात्र सारखीच आहेत म्हणून असेल. तब्बू आणि शाहीद कपूरची कामं आवडली. शाहीदचा एक मोनोलॉग, जो टू बी ऑर नॉट टू बीच्या धर्तीवरचा आहे, तो ही जमलाय. काश्मिर प्रश्नाची दुसरी बाजू पाप्युलर सिनेमामध्ये आली हेही आवडलं. बिस्मिल आणि कबरिस्तानातलं गाणं, दोन्ही अप्रतीम. पण काही काही गोष्टी केवळ काश्मिर आणि त्याची संस्कृती दाखवायची म्हणून टाकलाय असं वाटलं. व्हीडो लायब्ररीवाली पात्रं डोक्यात जातात. का आहेत समजलं नाही.

अवांतरः ओमकारामध्ये विशाल भारद्वाजनी पटकथा लिहिताना, लंगडाच्या पात्रात केलेल्या करामती वाचायला मिळाल्या. काही प्रसंगामधल्या छोट्याश्या बदलांमुळे पात्रं प्रेक्षकांना कशी खूप वेगळी जाणवतात याचं रोचक विश्लेषण.

http://ocw.mit.edu/courses/foreign-languages-and-literatures/21f-011-top...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सहमत. पण हैदरबद्दल बाकी वाचन करता त्यातील बायसही नजरेसमोर आला खरा. फ्याशनमध्ये बसत नसल्याने त्याबद्दल बोलत नाही. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे हा यडा आहे का?

www.youtube.com/embed/xQ_IQS3VKjA

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लय भारी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही एक फिल्म आहे आणि डॅनी हा प्रोफेशनल आहे. तूनळीवरील Dreez76 ची प्रतिक्रिया बोलकी आहे.

I'm not saying this is fake, but in a way it is.. because everything he does is pre-scouted and he knows exactly where to go. It would be an entierly different matter if it wasn't.
When he rides down the mountain, the path has been checked beforehand to see which is the best way down, checking for loose rocks and boulders which otherwise could cause a slip or fall.
It would be like having someone racing through the streets with a formula One car, but first you make sure there aren't any pedestrians or cars around that can cause an accident.

Not saying i could do it, i get tingling in my legs just watching those heights, just saying; try doing it un-scouted next time and film it - directors cut style.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भय इथले... (संपूर्ण कविता) किंचित निराळ्या ढंगात:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. प्रकाश बाबा आमटे पाहिला.

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ’रमामाधव’ची आठवण झाली. तिथे इतिहास गुंडाळून ठेवून लिहिलेल्या पारंपरिक प्रेमकथेच्या शिळ्या कढीला श्रीमंती ऊत होता.

इथे तंत्राबिंत्राची वासलात, गचाळ स्पेशल इफेक्टी वाघाशी खेळणारा उघडा नि ओलेता नाना पाटेकर, नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी (दोघेही ’चतुरंगी’ प्रेक्षकवर्गात समाजसेवकी-सुसंस्कृत-संवेदनाशील लोकांसाठी असलेले तद्दन ’आयकॉन’ अभिनेते हा योगायोग नसावा) यांच्यातला एकसुरी, अवघडलेला, ’संस्कृतिपूर्ण’ शृंगार. आदिवासी म्हणजे माकडंबिकडं असावीत अशा सुरात लिहिलेले प्रसंग. पार्श्वभूमीला समाजसेवा. म्हणजे सिनेमा बघणं हाच समाजसेवेला बाय डिफॉल्ट पॅसिव्ह हातभार ठरण्याची गॅरण्टी.

अशा सिनेमाबद्दल वाईट काही म्हणायची सोय नसतेच. कारण तसं म्हटलंच, तर तुम्ही आपोआप उच्चभ्रू, हस्तिदंती मनोर्‍यात राहणारे, समाजापासून नाळ तुटलेले, असंवेदनशील, कोरडे वगैरे टीकाकार होता. तर गुन्हा कबूल आहे. पण ’डॉ. प्रकाश बाबा आमटे’ भिकार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अशा सिनेमाबद्दल वाईट काही म्हणायची सोय नसतेच....

नेमकं. शिवाजीवर काढलेला एखादा चित्रपट्/मालिका/पुस्तक भिकार असूच शकत नाही -हेही त्याचंच रूप.
आणि आयकॉनिक अभिनेतेसुद्धा पटलेलं आहे. नानाला तर आजकाल "आवर रे" म्हणावसं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतः प्रकाश आमट्यांना आवडला असावा काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्त्री दिग्दर्शिका आहेत म्हणून टीका होते, असं 'रमामाधव'बद्दल कानावर आलं होतं. आता असं कानावर येतं का ते बघायचं. (नाही आलं तर पुणेरी प्रेम उतू गेलं असं निश्चित समजता येईल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ट्रेलरवरूनच तो बंडल आहे हे ताडले होते. यूट्यूब आणि तुमचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅप्टन फिलिप्स: टॉम हॅन्क्स व तो मुख्य पायरेट दोघांची कामे चांगली झाली आहेत. टॉम हॅन्क्स तर आवडतोच. जहाजावारचे वातावरण, सुरूवातीचे डीटेल्स मस्त. त्या पायरेटचे काम केलेल्याने काम नक्कीच चांगले केले आहे, पण त्याबद्दल ऑस्कर बिस्कर देण्याएवढे बाकी कोणाचे रोल मागच्या वर्षी भारी नव्हते का असे वाटले. मात्र चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे.

A place beyond the pines: हा ही आवडला. ब्रॅडली कूपरचे बरेचसे पिक्चर्स आवडले आहेत. व्हिलन वाले रोल ("वेडिंग क्रॅशर्स"), कॉमेडी मधला सेन्सिबल सहकलाकार ("हँग ओव्हर" सिरीज) किंवा लीड रोल मधला ("लिमिटलेस". तो 'सिल्वर लाइनिंग्स प्लेबूक" अर्धाच पाहिला आहे) अशी बरीच विविधता असलेले त्याचे रोल मस्त असतात. यातही त्याचे काम चांगले आहे. रायन गॉसलिंग चे आत्तापर्यंत पाहिलेले बरेचसे रोल्स अत्यंत गंभीर होते, यातही तसाच आहे. काम चांगले आहे त्याचे, पण तो एकसूरी वाटू लागला आहे आता. सुरूवातीला रायन गॉस्लिंग ची कथा वाटते ही, पण खरी ब्रॅडली कूपर व इतरांची आहे. जास्त स्पॉइलर देत नाही. गंभीर चित्रपट आहे, पण खिळवून ठेवतो. रे लिओटाचा एक नेहमीसारखा रोल ही आहे.

डाय हार्ड सिरीज पुन्हा पाहिली. त्यातील तो नवीन पाचवा आल्याने वातावरण निर्मिती करता, व आता ब्लू रे मधे आल्याने आधीचे चारही पुन्हा पाहिले. मग पाचवा पाहू लागल्यावर लक्षात आले की काही दिवसांपूर्वीच तो पाहिला होता :). पहिल्या चार इतका चांगला नाही तो, पण घरी डीवीडी वर पाहताना कंटाळा नाही येणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय कॅप्टन फिलीप्स प्रिमीअर शो पाहीलेला, आवडलेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टॉम हँक चा कॅप्टन फिलिप्स नावाचा अप्रतिम सिनेमा(साहसपट) पाहीला आहे का कोणी? नवरा मारीटाइम कॉन्फरन्स ला गेलेला असताना, (आज) त्याने "खर्‍या कॅप्टन फिलिप्स" यांच्या बरोबर काढलेला फोटो. ओह माय गॉड!!!
https://scontent-ort2-1.xx.fbcdn.net/v/t1.0-0/p206x206/14937350_1778024625804882_57607444210684477_n.jpg?oh=d43210940ecd620f1d69bf3761198d31&oe=58C1E387

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल मिन्नेसोटा मराठी मंडळाने मिन्नेअपोलिस येथे आयोजित केलेल्या पद्मजा फेणाणी जोगळेकरांच्या मैफिलीला मी आणि माझ्या बायकोने हजेरी लावली. मराठी मंडळ संख्येने छोटं आहे. अंदाजे १०० लोक उपस्थित होते. मैफिल उत्कृष्ट रंगली. अशा पद्धतीची कोणतीही मैफिल अनुभवण्याचा आमचा हा पहिला अनुभव. पण अपेक्षेपेक्षा जास्त मजा आली आणि खरंच वेळ कसा गेला कळलं नाही.

स्वतः गायिका पद्मजाताई सहज गप्पा मारल्याच्या स्वरुपात संवाद साधत होत्या, विनोद करीत होत्या आणि श्रोत्यांना त्यांच्या सोबत गाणं गायला प्रोत्साहन देत होत्या… पण कुणी फारसे गुणगुणले वगैरे नाही… त्यांच्या आदरातून असेल किंवा स्वतःच्या आवाजाची जाणीव असेल म्हणूनही असेल… मी गाण्यांच्या अशा मैफिलींबद्दल जे ऐकलं होता, त्यापेक्षा चांगला, हसता खेळता प्रकार वाटला. त्या कुठल्याही गाण्याआधी त्याची थोडीफार पार्श्वभूमी सांगत होत्या त्यामुळे गाणी अजून रंगली. एकंदरीतच सुसंबद्ध आणि छोटासा पण छान कार्यक्रम… अजून एक गोष्ट विशेष वाटली, ती म्हणजे NRI दुसरी पिढी… श्रोत्यांपैकी जी कुणी शाळकरी मुलं होती ती थोडाफार ऐकत होती, नाहीतर बाहेर फिरून येत होती, पण त्यांनी गडबड करून वगैरे व्यत्यय आणला नाही… चांगलीच धाकात असतील. अशाच एका मुलीची idea मला फार आवडली. सभागृहात बर्यापैकी प्रकाश होता आणि त्यात ती शांतपणे पुस्तक वाचत बसली होती. पुस्तक अभ्यासाचं नव्हतं… पण कसलं का असेना… आईवडिलांना आवडणारी गोष्ट करताना स्वतःची आवड पण सांभाळली हे विशेष… माझं गाण्याचं ज्ञान अत्यल्प आहे… त्यामुळे तीन तास गायकाकडे बघत राहून मी प्रत्येक वेळी गाणं ऐकू शकेल असं नाही… अशावेळी पुस्तक वाचलेलं काय वाईट? वाचता वाचता कानांनी काही उत्तम सूर पकडलेच तर अनपेक्षित दाद जाईल माझी… मी त्या मुलीची ही idea पुन्हा अशी काही मैफिल झाली तर वापरून पाहीन… लेट्स सी…

आता आम्ही दोघे या कार्यक्रमाला का गेलो? कारण आम्ही खूप दर्दिबिर्दी नाही… गायिका माहित होत्या पण त्यांची गाणी कुठली हे विचारलं तरी पट्कन सांगता नाही येणार… आम्ही गेलो मराठी मंडळाशी संबंध वाढावा म्हणून… गेल्या महिन्यात त्यांचा गणपती उत्सव साजरा केला त्यातही हेच कारण प्रबळ… मराठी ओळखी होतील, कुणी मित्र मिळू शकतील… पण यावेळीसुद्धा त्या बाबतीत प्रगती झाली नाही. मी आणि बायको दोघंही तिशीच्या खालचे, आणि अजूनही "दोघं"च… मंडळात बरेच लोक पस्तिशीच्या पुढचे आणि "तिघं" किंवा "चौघं" झालेले… उरलेले लोक केस अमेरिकेत केस पांढरे केलेले किंवा भारतात केस पांढरे करून अमेरिकेत मुलाकडे किंवा मुलीकडे आलेले… बरं, आमची कुणाशीच आधीपासून ओळख नाही… कानांवर मराठी पडत होतं, पण बोलायला किंवा ओळख करून द्यायला approach कसं व्हावं ते पण कळलं नाही… थोडक्यात, कार्यक्रमाला आम्ही "दोघं" च गेलो आणि आलो. मराठी लोकांमध्ये असूनही असंच अलिप्त वाटणार असेल तर केवळ "मराठी दिवाळी" साठी पुढच्या कार्यक्रमाला जावं का हा प्रश्न पडलाय…

आमचं arranged marriage… आम्ही एकमेकांना हळू हळू आवडत गेलो आणि इथे आल्यापासून एकमेकांचे चांगले मित्र झालो… पण या व्यतिरिक्त बाहेर आम्हाला दोघांना आपापले colleagues आहेत पण मित्रमैत्रिणी नाहीत… "तिशीच्या खालचं couple" अशा isolated जागी दोघंही अडकलोय… गैर भाषिक मित्र थोडे थोडे व्हायला लागलेत पण स्वभाषिक मित्र होणं अवघड वाटायला लागलंय… पता नही, शायद यहां से चल दे आगे, न छोडे कोई निशान….

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकाच अनुभवावरून मत बनवू नका/निराश होऊ नका. मराठी कार्यक्रमाला येणारे लोक पटकन नवीन माणसाला सामावून घेतात - निदान मूळचे लोक त्यासाठी काही खास प्रयत्न करतात असे फारसे दिसत नाही, पण तेथे नवीन असल्याने तुम्हीच थोडे पुढे जाऊन ओळख करायचा प्रयत्न करा (तुम्हाला इंटरेस्ट असेल तर - तसा तो आहे हे जाणवले म्हणून लिहीतोय). मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांना, किंवा एक दोन इतर "पदाधिकारी" असतील इ-मेल करा व नंतर पुढच्या कार्यक्रमाला जाऊन भेटा, ओळख करून घ्या. तसेच "चौघे" जे असतील त्यांना "दोघे" जे असतात त्यांच्यात इंटरेस्ट नसतो असे काही नाही. सगळ्यात शुअर पर्याय म्हणजे तेथील कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मदत करणे- व्हॉलंटियर्सची अत्यंत गरज असते अशा कार्यक्रमांना.

अमेरिकेत तुमची चांगली मैत्री मराठी लोकांशीच होईल असे नाही. कोणाची कोठे वेवलेंथ जुळेल सांगता येत नाही. मी येथे ममं च्या अनेक कार्यक्रमांना जाऊन सुद्धा निव्वळ तेथील ओळखीवर कोण नवीन मित्र झाल्याचे आठवत नाही. पण त्यात मीही कधी काही खास प्रयत्न केले नाहीत हे ही खरे आहे. याउलट माझ्या एका मित्राचा आख्खा ग्रूप हा तेथील ओळखीवर झाला आहे.

मात्र ऐसी, मिपा किंवा माबो यापैकी कोणाचा प्रेझेन्स तुम्ही राहता तेथे जास्त आहे त्यावरून यापैकी एखाद्या साईटवर नेहमी येणार्‍यांशी तुमची मैत्री होण्याची शक्यता जास्त आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मात्र ऐसी, मिपा किंवा माबो यापैकी कोणाचा प्रेझेन्स तुम्ही राहता तेथे जास्त आहे त्यावरून यापैकी एखाद्या साईटवर नेहमी येणार्‍यांशी तुमची मैत्री होण्याची शक्यता जास्त आहे
शक्यता हा शब्द वापरलात ते फार बरं केलत. ऐसीवर येण्यापूर्वी दुसर्‍या एका संकेतस्थळावर इथे असतो त्याहून दहापट अधिक पडीक असे.
तिथे भरपूर प्रतिसाद देत असे. जमेल तसे जमेल तितके लिहीत असे.
पण विविध वेळी सतत आपण झुरळासारखं झटकलो जातोय असं वाटायचं.
म्हणजे तिथलं वातावरण वगैरे हसतं खेळतं दंगाखोर म्हणून आवडायचं.
पण ही पोरं आपल्याला खेळायला का घेत नाहित हा प्रश्न पडायचा.
स्वतःहून बर्‍याचदा अप्रोच करायचा प्रयत्न केला; पण तेही जमलं नाही.
शेवटी स्वत:हून इतकं जास्त बोलायला वगैरे जाणं गळेपडूपणा वाटू शकतं म्हणून प्रयत्न सोडले.
मी नेहमी त्या साइटवर जात असे तरी अगदिच बेदखल असल्यासारखा होतो.
असो.
आता हापिसातून हीच एक साइट उघडते त्यामुळे काही प्रश्न नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

volunteering च्या पर्यायाचा विचार मी पण करत आहे. जर त्यांची membership घेतलीच तर त्या दिशेने प्रयत्न चालू ठेवेन. बघुया…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी अमेरिकेत असताना ३-४ कार्यक्रम अटेंड केले. प्रत्येक अनुभव एकेक "अनुभव"च आहे.
तेथील स्थानिकांचे कार्यक्रम अनेकदा अतिशय रटाळ, दर्जाहीन आणि फारशी प्रॅक्टीस न केलेले असतात असे चांगलेच जाणवले. (तुलना प्रोफेशनल्सबरोबर करत नाहीये. भारतातील स्थानिकांचे - हौसिंग सोसायट्यांचे वगैरे कार्यक्रम - यांच्यासोबत करतोय)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल ह्यूस्टन मराठी मंडळातर्फे हाच कार्यक्रम इथे झाला. तुम्ही म्हणाल्याप्रमाणेच कार्यक्रम सुरेख झाला, म्हणून वेगळे काही लिहित नाही.
मराठी मंडळात किंवा मराठी आंतरजालावर मराठी लोकांशी ओळखी होतील, कुणी मित्र मिळू शकतील अशा अपेक्षेचा बराच अनुभव आहे, त्यामुळे मी त्या फंदातच पडत नाही. एखादा कार्यक्रम बघायचा असेल तर नॉन-मेंबरसाठी थोडे महाग तिकीट असते ते काढतो. प्रश्न मिटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ.प्रकाश बाबा आमटे नावाचा सिनेमा काल पाहिला. एकदा नाशिकमध्ये बाबांना बघण्याचा योग आला होता. त्यानंतर काही वर्षांनी डॉ.विकास आमटे आणि डॉ.भारती आमटे यांना भेटता आले. त्यावेळी निलकांतीताई पाटेकर देखील उपस्थित होत्या. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाताई आमटे यांनी भेटण्याची संधी मिळाली नाही. समृध्दी पोरे यांच्या ‘प्रकाश बाबा आमटे’ सिनेमामुळे ती इच्छा पूर्ण झालीय. तो सिनेमा नव्हता. ती एक जिवंत डॉक्युमेंटरी होती.
सिनेमा पाहिल्यानंतर ‘हेमलकसा’ परिपूर्ण समजले. हेमलकसाला जाण्याचे किंवा प्रकाश-मंदाताईंना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा आता राहिली नाही. कारण सिनेमाच्या रूपाने आता दोघे दिसलेच नाही. तर –हदयात देखील घुसले-आत बसले. भरपूर बोललेत देखील. प्रकाश आणि मंदाताई समोर आले तर आता काहीच बोलता येणार नाही. दोघांनी व्यक्तिगत आयुष्याविषयी,समाजाविषयी,निसर्गाविषयी,मानवाविषयी सृष्टीविषयी सर्व काही सांगून टाकलंय. हातचं काहीच राखून ठेवलं नाही. ‘आम्ही हे असे जगलो-जगतोय आणि माणसांसाठी आम्ही हे सर्व केले-करतोय’, असे या सिनेमातून प्रकाश-मंदाताई सांगतात. सिनेमासंपतांना मात्र ‘तुम्ही काय करताय’ असा प्रश्न हळूच –हदयात कोरून ठेवतात. हा प्रश्न कस्तुरीमृगासारखा आपल्या जवळ रहात असल्यामुळे आता ही दोघे प्रत्यक्ष भेटली तरी संवाद होणार नाहीत. आता या दोघांच्या उत्तुंग उंचीची खूप आदरयुक्त भीती वाटू लागली आहे. सामान्य माणूस म्हणून आमचे खुजेपण वाटते त्यापेक्षा जास्त असल्याचे भासू लागले आहे.
नानांनी अभिनय असा केलाय की शब्द नाहीत त्यासाठी. प्रकाश आमटे म्हणून जगण्याची आंतरिक इच्छा पूर्ण करून घेतांना नाना, तुम्ही आमच्या अश्रृंची सतत बोली लावली. नाना सिनेमात रडतात. मात्र, धारा चित्रपटगृहातील प्रेक्षकांमधून वाहत असल्याचे वारंवार दिसत होतं. हे असं कमी सिनेमांच्या वाटयाला आलं आहे. मंदाताईंना साकारतांना सोनाली कुलकर्णी तुसभरही कमी पडलेल्या नाहीत. प्रत्येक मुलीने, महिला डॉक्टरने, विवाहित स्त्रीने, आईने मंदाताईंना पहायला हवं. घरात मंदपणे जळणारी ‘मंदा’सारखी समई असते; म्हणून जगाच्या अंधारवाटा उजळवणारा ‘प्रकाश’ निर्माण होतो. सिनेमा पाहून हेच कळले आहे.
(चित्रपटं बघण्यासाठी आलेली कुटुंबं चित्रपटगृहाच्या पाय-यांवर बसून होती. मराठी चित्रपटासाठी मराठी माणूस पाय-यावर बसावा, तो चित्रपटगृहात रडावा आणि खळखळून हसत बाहेर पडावा. पुढे चित्रपटातील कथेभोवतीच पिंगा घालत तो आत्ममग्न व्हावा. एका कलाकृतीच्या ताकदीचा याहून अधिक सुंदर नजारा तो कोणता...?)

चोउर्तेस्य-ंय फ्रिएन्द ंर Manoj Kapade

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीतराग बनो......वीतद्वेष बनो !

अत्त दीप भव !

चोउर्तेस्य-ंय फ्रिएन्द ंर म्हणजे नक्की काय हो भाऊ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Mandar Katre

Courtesy-My friend Mr

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने