अलीकडे काय पाहिलंत? - १५

(जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)

***

'आयायटी बॉम्बे'मध्ये 'साथी' नावाचा एक LGBTQ सपोर्ट ग्रुप आहे. साथी आणि कशिश-फॉर्वर्ड यांनी मिळून आयोजित केलेला एक कार्यक्रम काल पाहिला. 'क्रश-शेक', 'क्यों की' आणि 'मित्रा' असे तीन लघुचित्रपट आणि नंतर त्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी गप्पा असं त्याचं स्वरूप होतं.

इशारा: पुढे सिनेमाच्या गोष्टी आणि इतरही काही रहस्यभेद आहेत. नको असल्यास, वाचू नका.

'क्रश शेक' अगदी फ्रेश होता. एका चिकण्या पोराच्या मागे लागलेली पोरगी पोरगा गे निघाल्याचं बघून भंजाळते इतकीच गोष्ट. पण कसली ताजीतवानी आणि मिश्कील. मजा आली.

'क्यों की'मधे गांधीजींची दांडी यात्रा आणि LGBTQ प्राइड मार्च यांच्यातलं साम्य जाणवण्याचा एक साक्षात्कारी क्षण आहे. तोही मस्त.

'मित्रा' अर्थातच तेंडुलकरांच्या 'मित्राची गोष्ट'वर आधारित आहे. ती गोष्ट आणि त्यावर आधारित एकांकिकेत (की नाटक?) काम करताना रोहिणी हट्टंगडींना आलेले अनुभव या दोन्ही गोष्टी वाचल्या होत्या. त्यामुळे माझी पाटी कोरी नव्हती. त्यात आणि रवी जाधवचं बोलणं. सिनेमा कुठल्या प्रेक्षकांना दाखवला जातो आहे, याचं अजिबातच भान नसल्यासारखं, फक्त 'माझीच लाल' प्रकारातली जाहिरातबाजी करणारं. बरं, सिनेमात विन्याच्या भूमिकेत संदीप खरे. हळुवार, कविमनाचा वगैरे कायमस्वरूपी. भन्साळीच्या देवदासकडून उसने आणलेले कपडे घालून पुण्याच्या हॉस्टेलात फिरणारा विलायती रुबाबातला विन्या. गोष्टीचा शेवट बदललेला. नि संदीप खरेच्याच एका 'उदासी तयाचा रंग'छाप कवितेचं वेष्टण. वीणा जामकर आणि काही खरोखर चांगले चित्रक्षण असूनही - डोकं साफ गेलं.

नंतरची प्रश्नोत्तरं मात्र...

तेंडुलकरांच्या 'नाटक आणि मी'मधल्या एका लेखात त्यांनी अमेरिकेतल्या एका नाटकाबद्दल लिहिलं आहे. अ‍ॅफ्रोअमेरिकन वस्तीतले भीषण प्रश्न मांडणारं ते नाटक होतं. नाटक परिणामकारक, पण शेवट अगदी बटबटीत - भाषणबाज. त्या शेवटानं नाटकाच्या परिणामावर बोळा फिरतो, तो तेवढा वगळा, असं त्यांनी नाटककाराला सांगितलं. तेव्हा नाटककारानं निर्विकार ठामपणे सांगितलं, 'ते तुमच्यासाठी नव्हतं.' त्या प्रश्नानं आपल्याला चपराक बसल्यासारखं वाटलं, असं तेंडुलकरांनी नोंदलं आहे.

तसाच अनुभव मला आला. मी सिनेमाचा बरेवाईटपणा आणि माझे तथाकथित समीक्षकी चष्मे घेऊन या कार्यक्रमाकडे बघत होते. पण प्रेक्षकांचा प्रतिसाद अगदी वेगळा, खुला होता.

'मित्राचा शेवट सकारात्मक केल्यामुळे फार बरं वाटलं.'
'या गोष्टी आम्हांला सोबत करतात.'
'मोकळेपणानं या विषयाकडे पाहिल्याबद्दल खूप आभार.'
'असे अनेक चित्रपट असायला हवे आहेत.'
'बिहारमधल्या माझ्या काही मित्रांना कदाचित मी काय म्हणतो आहे, ते स्वीकारता येणार नाही. पण त्यांना सिनेमाची गोष्ट कळेल. त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे. थँक्यू.'
'सिनेमा सुंदर. पण गे कपल्सवर केलेलं साचेबंद स्त्रीपुरुषभूमिकांचं आरोपण पटलं नाही.'
'तुम्ही या विषयावर सिनेमा करताना सेक्शुअ‍ॅलिटीबद्दल काही नवं शिकलात का?'

अशा अनेक प्रतिक्रिया. 'हळूहळू मुख्यधारेतले प्रेक्षक हे सगळं नॉर्मल म्हणून स्वीकारतील. तोवर क्विअर सिनेमामधे अडचणींचाच अँग्स्टी आवाज मोठा असणार आहे. पण हे बदलेल. नक्की.' असा आशावाद. खूप मजेनं सिनेमे आणि एकमेकांची सोबत एन्जॉय करणारे लोक. मजा आली.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

प्रतिक्रिया

बिल गेट्स यांची थॉमस पिकेटी यांच्या 'कॅपिटल' या पुस्तकाची समीक्षा वाचली. http://www.gatesnotes.com/Books/Why-Inequality-Matters-Capital-in-21st-C...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

के.एल.एम.ची नवी सेवा-सुविधा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विकांताला डीप इन माय हार्ट हा चित्रपट पाहिला.

<पुढे कथावस्तु उघड>
एका महिलेवर अंधारात कोणीतरी खेचून घेतोय व ती महिला जखमी अवस्थेत घरी येऊन आपल्या नवर्‍याला सांगतेय की "माझ्यावर आत्ताच एका कृष्णवर्णीयाने बलात्कार केलाय" या सीनचे चित्रपटाचा प्रारंभ होतो. या बलात्काराचा परिणाम म्हणून ती स्त्री गर्भार होते. व जन्माला आलेली मुलगी हवीहवीशी वाटत असूनही "गोर्‍यां"च्यात तिला राहणे कठीण होईल म्हणून सोशल सर्विसेसला देते. त्या मुलीला त्यानंतर एक कृष्णवर्णीय स्त्री "तात्पुरती" सोय म्हणून ८ वर्षे सांभाळते, लळा लावते नी पुन्हा सोशल सर्विसेस तीला अजून एका गोर्‍या स्त्रीकडे अडॉप्टेड पालक म्हणून सोपावते.
<कथावस्तु समाप्त>

त्या एका बलात्कारातून जन्मलेल्या "मिक्स" त्वचेच्या मुलीचा व त्या योगे तत्कालीन सामाजिक बदलांचा, रूढींचा, परंपरेचा आढाया या चित्रपटात अतिशय ताकदीने घेतला आहे. अतिशय वेगात कथा सरकते मात्र परिणाम कुठेही कमी होत नाही.

घरांच्या रचना, आत असु शकणार्‍या वस्तुंतून बदलता काळही छान साकारला आहे. कथा आयसोलेशनमध्ये न घडता वेगवेगळ्या काळातील समाजाला बॅकराउंडमध्ये ठेऊन घडते त्यामुळे अधिक परिणामकारक होते

माझ्याकडून ८/१०

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठी चित्रपटांत नवा तळ उदयास (की अस्तास?) आला आहे.
प्यारवाली लव स्टोरी नामन अतीटुकारपट या सुट्टीत पाहिला. याहून भिषण चित्रपट माझ्यामते मराठीत दुसरा नसावा. फारएण्ड यांना नम्र विनंती की त्यांनी हा चित्रपट पहावा. (मग त्यांच्या लेखणीतून काही नवे नक्की प्रसवेल याची खात्री आहे)

माझ्याकडून या चित्रपटाला १० पैकी "वजा १०" अर्थात -१०/१०

लायब्ररीतून आणलेला "गुड डिक" (२००८) हा चित्रपट पाहिला.
ठिक वाटला. पॉर्न बघण्याची आवड असणार्‍या हिरवणीला पटवण्याच्या पायर्‍या पार करणार्‍या हिरोची कथा असा नाविन्यपूर्ण विषय हाताळलाही चांगलाप पण किंचित रटाळ होत गेलाय.

माझ्याकडून ६/१०

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्यारवाली लव स्टोरी नामन अतीटुकारपट या सुट्टीत पाहिला.

उंटाच्या *** मुका हा वाक्प्रचार आठवला. नाव आणि पोस्टर बघून जावसं कसं वाटलं ?????

त्या इंग्रजी चित्रपटाचं नाव वाचून तीच पॉर्न मूवी आहे का अशी शंका आली. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

नाव आणि पोस्टर बघून जावसं कसं वाटलं ?????

हॅ हॅ हॅ
लोकांच्या 'बेसावध क्षणी' काय काय चुका होतात, आमच्या ह्या चुका इतक्यावरच निभावतात हे काय कमीये Wink

==

बाकी त्या सीडी कव्हरवर त्याला "इरॉटिक कॉमेडी" म्हणतात असा दावा आहे. मला त्या चित्रपटात कॉमेडी काही भागात जाणवली, पण इरॉटिक असे नाही नव्हते (अपेक्षाभंग! Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्यारवाली लव स्टोरी नामन अतीटुकारपट या सुट्टीत पाहिला.
हे पातक आमच्याकडून पण घडलं. शारूक बघायचा का ज्यु. म्हागुरू या वादावादीत ते तिकीटं काढले गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गुड डिक'मधल्या 'हिरो'चा, जेसन रिट्टरचा दुसरा एक चित्रपट सुचवतो - 'पीटर अ‍ॅन्ड् वॅन्डी'. कथा सांगण्याच्या पद्धतीतला एक वेगळा आणि जमलेला प्रयोग. कामेही उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार.
बघतो पुढल्या भेटीत गावला तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऍंडी आणि लाना वाचोस्कीचा ’क्लाऊड अ‍ॅटलास’ पाहिला. त्यांच्या मॅट्रिक्स त्रिवेणीमुळे प्रचंड प्रभावित होऊनच हा चित्रपट पाहिला हे सर्वप्रथम सांगते. वाचोस्कींसोबत 'रन लोला रन' वाला टाईक्वे असल्याने अजूनच उत्सुकता होती. फार निराशा झाली नाही.

चांगल्या रितीने चमत्कारीक चित्रपट आहे. हा चित्रपट सहा युगांमध्ये घडतो. मनुष्य आयुष्य चक्रातून जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या जन्मात बरा-वाईट कसा बनतो. त्यावर त्याने मागील जन्मात केलेल्या ब-या-वाईट गोष्टींची छाया कशी असते असं या चित्रपटाचं स्वरूप आहे. आणि हेच स्प्ष्टपणे कळावं म्ह्णून एका युगातला नायक दुस-या युगात खलनायक म्हणून दिसतो. काही ठिकाणी निर्वाणीचे प्रसंग घडतात त्या जागाही पूर्वी पाहिल्या आहेत असं स्पष्ट कळतं.

हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारलेला आहे त्या क्लाऊड अ‍ॅटलास या पुस्तकाचे लेखक डेव्हिड मिचल यांनी पात्रांचा, त्यांच्या कर्मांचा, त्यांच्या ब-यावाईट परिणामांचा पसारा मांडताना प्रचंड गोंधळ उडाल्याचे मान्य केले होते. त्यांच्या कथेत अनेक सुटी टोकं होती, जी त्यांना एकत्र सांधता आली नाहीत असे म्हटले जाते. मी काही पुस्तक वाचलेलं नाही पण चित्रपट आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो, त्यावरून वाचोस्कींना आणि टाईक्वेला ते जमलंय असं वाटतं.

मागे एकदा डॉनी डार्को नावाचा चित्रपट पाहिला होता. समांतर विश्वांमध्ये घडणा-या घटनांचा ऊहापोह होता. तेव्हा इतकं डोकं आऊट झालं होतं की मी त्या चित्रपटाच्या डिस्कशन फ़ोरमचा आधार घेतला होता. क्लाऊड अ‍ॅटलास हा चित्रपट कळायला क्लिष्ट नाही पण त्यांच्या चर्चा वाचण्यासारख्या आहेत. आपल्या नजरेतून सुटलेल्या गोष्टी सहज कळतात, आणि आपल्याला कळलेल्या अर्थात अजून व्हॅल्यू ऍडीशन होते.

चित्रपट पाहाताना डोकं शाबूत ठेवून आणि मागील संदर्भ लक्षात ठेवून पुढचा चित्रपट पाहणा-यांकरता डोक्याला खाद्य ठरेल असा चित्रपट. पण, पुस्तक वाचताना कुठलं पात्र काय आणि कोण आहे हे २०व्या, ३० व्या पानावर विसरून जाणा-यांकरता हा चित्रपट लईच ताप ठरू शकेल.

क्लाऊड ऍटलास हे नावच सुंदर आहे, पण त्या नावाशी संबंधित त्या चित्रपटात काही आहे असं आढळलं नाही. नंतर शोधल्यावर कळलं की क्लाऊड अ‍ॅटलास हे जॅपनीज संगीत रचनाकार तोशी इचियानागीच्या अल्बमचे नाव आहे. त्या नावाने म्हणे मिचलला प्रेरणा मिळाली. लेखकू मंडळी पण म्यॅड असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

>>क्लाऊड अ‍ॅटलास हे जॅपनीज संगीत रचनाकार तोशी इचियानागीच्या अल्बमचे नाव आहे. <<
रोचक आहे. तुम्ही अल्बम ऐकला का?
मलाही हा पिच्चर लई आवडला होता. एखाद्या कथेचा plot काळाच्या दृष्टिने इतका मोठा आणि तरीही अतिकौशल्याने विणलेला असू शकतो याचेच कौतिक वाटले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, ऐकला आहे. पूर्ण अल्बममध्ये २३ कम्पोझिशन्स आहेत. पण, आपण ज्याबद्द्ल बोलतोय ते क्लाऊड अ‍ॅटलास हे पियानोवरचे क्म्पोझिशन आहे आणि त्याचे तीन ट्रॅक्स आहेत. ते इथे ऐकता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

वामन पंडितांची कथा सांगताना आसारामबापू!!

बाष्पगद्गदित जाहलो. आमच्या पंतत्रयापैकी एकाला तेवढीच अजून थोडी प्रसिद्धी मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

दोन पुर्वाश्रमीचे प्रेसिडेंट्स, एक डेमोक्राटीक पक्षाचा तर दुसरा रिपब्लिकन. दोघंही एक टर्म पूर्ण झाल्यानंतर निवडणूका हरलेले. काही कारणास्तव दोघेही वॉशिंग्टनातील घोटाळ्यात अडकतात आणि तो सोडवताना होणार्‍या गमतीजमती म्हणजे हा चित्रपट.

१९९६ चा चित्रपट असूनही चित्रपटात दाखवलेलं अमेरीकेतलं राजकारण आजच्यापेक्षा फार वेगळं नाही याची जाणिव आपल्याला होते आणि म्हणून आजही तो चित्रपट पाहताना विनोद कंटाळवाणा होत नाही. रिपब्लिकन लोकांचं 'फोनी पॅट्रीएटीजम', डेमोक्रॅटीक लोकांचा बाहेरख्यालीपणा, अमेरीकन जनतेचा राष्ट्राध्यक्षामध्ये आदर्श माणूस पाहण्याचा भोळेपणा, एनएसए, राजकारणामुळे होरपळणारी सामान्य जनता आणि त्यांच्या सामाजिक राजकीय धारणा यामधला विरोधाभास वगैरे गोष्टी चित्रपट निखळ विनोदी करून सांगतो.

मोकळ्या वेळी, एखाद्या कंटाळवाण्या दिवशी हाफिसातून वगैरे आल्यानंतर पाहण्यासारखा चित्रपट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

परेश मोकाशी यांच्या 'एलिझाबेथ एकादशी' या सुरस चित्रपटातील दृश्यवेचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जेसन राईटमन दिग्दर्शित, २००९ सालचा, जॉर्ज क्लूनीची केंद्रवर्ती भूमिका असणारा. "अप इन द एअर".

---- साधारण कथासूत्र : सुरवात
रायन बिंगहम् वर्षातले ३३० पैकी अधिक दिवस हवेत उडतो. जेव्हा उडायचे नसते तेव्हा आपल्या घरी काढायच्या दिवसाचे वर्णन "भयंकर कंटाळवाणे" असं करतो. बिंगहमचं कामही रोचक आहे. कंपन्याकंपन्यांमधून जेव्हा मोठ्याप्रमाणात नोकरकपात होते तेव्हा बिंगहमच्या कंपनीला गच्छंती झालेल्या नोकरदारांना बातमी देण्याचे काम येते. आणि बिंगहम वर्षभर जागोजागी जाऊन हुकमी एक्क्यासारखं हे काम बजावतो.

या सर्व प्रकारात त्याला एक त्याच्यासारखीच सहप्रवासिनी भेटते आणि त्यांचा संग घडतो नि मग ते असा संग घडवण्यासाठी भेटत रहातात. या नात्याचं होत गेलेलं परिवर्तन हा एक धागा.

आणि बिंगहमच्या कामामधे "क्रांती" घडवून आणण्याची प्रतिज्ञा करून आलेली "अपस्टार्ट" वाटावी अशी तरुण मुलगी, जिला कामाचे तौरतरीके शिकवताना तोच तिच्याकडून काहीतरी नकळत घडतो. हा आणखी एक धागा.

बस्स. म्हण्टलं तर इतकंच.

---- साधारण कथासूत्र : समाप्त

चित्रपटातल्या दोन स्त्रियांनी आणि इतरांनीही फार छान काम केलेलं असलं आणि त्यांच्या व्यक्तिरेखासुद्धा जिवंत असल्या तरी हे शेवटी मान्य होतंच की चित्रपट रायन बिंगहमचा आणि जॉर्ज क्लूनीचा आहे. बिंगहमचं कुठल्याही नात्याचा, कशाचाचा संदर्भ अगदी विरळपणे असलेलं हवेतलं अस्तित्व हा चित्रपटाच्या शीर्षकापासूनचा गाभा. बिंगहमचं जग फार आकर्षक आहे खरं. "विंचवाचं बिर्‍हाड पाठीवर" हे शब्दशः सार्थ ठरवेल अशी त्याची "बॅकपॅक". विमानाविमानांमधून, विमानतळांमधून, भाड्याच्या गाड्या, ऑफिसेस, होटेल्स आणि गावोगावच्या रेस्तराँमधून कसली खळबळ न माजवता हे अस्तित्व फिरतं. बहिणीचे, बॉसचे फोन येतात. त्यामधे पलिकडचा माणूस भावभावना व्यक्त करतो. बिंगहम त्या "प्रोसेस" करतो. गावोगावची बडतर्फ झालेली माणसं नजरेतून नि शब्दांतून कडवटपणा , अंगार ओकतात. बिंगहम ते "प्रोसेस" करतो. त्याला अभिलाषाच जर का कशाची असेल तर ती आहे एक कोटी हवाई मैलांचा टप्पा ओलांडण्याची. एके दिवशी "भलत्या वेळी भलत्या मेळी असता मन भलतीचकडे" असताना ती पुरी होतेसुद्धा.

बिंगहमचं अथांग वाटावं असं जग, परंतु अन्य व्यक्तींशी अपरिहार्यपणे संपर्क आल्यावर या अथांग जगताला सूक्ष्म हादरे कसे बसतात, नातेसंबंधांच्या एका झुळकीलाही शिरकाव होऊ न देणार्‍या त्याच्या जगाच्या खिडक्या किलकिल्या कशा होतात, "वाळवंटे फक्त वाळूचीच नसतात डार्लिंग" या ओळीची आठवण होईल अशा त्याच्या मरुस्थलावर "गळला पहिला सृजनाचा क्षण" कसा येतो ? हे सगळ्यात आकर्षक आहे. क्लूनीसाहेब ही भूमिका जगलेत. किंबहुना ती वेगळी निभावल्यासारखी वाटूच नये असा सगळा वावर आहे. साहेबांचं याहून अधिक चांगलं काम असलेला दुसरा चित्रपट मला आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

पुन्हा बघायला ह्वा. पहिल्यांदा बघितला होता तेव्हा आवडला होताच. एनपीआर वर याबद्दलची चर्चाही छान होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एनपीआर वर "अप इन द एअर" : दुवा :

http://www.npr.org/player/v2/mediaPlayer.html?action=1&t=1&islist=false&...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अप इन द एअर मधला नर्मविनोदाचा शिडकावा. हे असे क्षण खूप आहेत आणि एकदम डिलिशसही.

Ryan Bingham: You know that moment when you look into somebody's eyes and you can feel them staring into your soul and the whole world goes quiet just for a second?
Natalie Keener: Yes.
Ryan Bingham: Right. Well, I don't.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मला हा चित्रपट सवयीतून आलेल्या अपरिहार्यतेचा आहे असं वाटत आलंय. एखादी गोष्ट करायची शरीराला, मनाला वर्षानुवर्षे सवय असेल तर ती आपण आवडून घ्यायला शिकतो. आवडीचीच असेल तर थोड्या वर्षांनी तिच्याविना जगणं म्हणजे जगणं नव्हे असं वाटणं नव्हे असं वाटायला लागतं.पहिल्यांदा हा चित्रपट पाहिलेला तेव्हा जो बिंगहॅम व्हॉट्स इन युअर बॅकपॅकची व्याख्यानं देत,कोणतीही गृहितकं मनात न धरता, कपडे, माणसं बदलत पाठीवर विंचवाच्या बिर्‍हाडासारखं जग घेऊन फिरतो, तो बिंगहॅम त्याच्या त्या गृहितक-विरहित जगात अलेक्सला गृहित का धरतो, अतिशय मख्ख्पणे, सरावाने तोंडात बसलेली डील्स लोकांच्या तोंडावर फेकत माणसांना कामावरुन कमी केल्याच्या नोटिसा देणारा हा डाऊनसायझर नाखुशीने का होईना, आपल्या बहिणीची इच्छा का पूर्ण करतो हे मला कळलं नव्हतं. पण, ते न कळणं आणि ते न कळता एका बिंगहॅममधले हे दोन विरोधाभासी बिंगहॅम पाहणं रंजक ठरतं. तेच त्याला आमच्या-तुमच्यासारखा पडत-चुकत शिकणारा एक माणूस बनवतं.

जॉर्ज क्लूनी य चित्रपटात रायन बिंगहॅम न वाटता कॅरिस्मॅटिक जॉर्ज क्लूनीच वाटतो. त्याचं अतिशय नॉन-ग्लॅमरस, प्रामाणिक काम पाहायचं असेल तर द डिसेन्ड्ण्ट्स पाहावा. ढेरी सुटलेला, हवाईयन शर्ट आणि बर्मुडा घालणारा मॅट किंग हा स्टड, लेडी-किलर क्लूनी न वाटता, खरोखरीचा मॅट किंग वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Escoge un amante que te mire como si quizás fueras magia!

>>>पण, ते न कळणं आणि ते न कळता एका बिंगहॅममधले हे दोन विरोधाभासी बिंगहॅम पाहणं रंजक ठरतं. तेच त्याला आमच्या-तुमच्यासारखा पडत-चुकत शिकणारा एक माणूस बनवतं. <<<

Smile दाद द्यावी असं लिहिलं आहे हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

This comment has been moved here.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

O

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओ दिसत नैय्ये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने