अलीकडे काय पाहिलंत? - ८

अलीकडे काय पाहिलंत? याच्या सहाव्या भागात १००हून अधिक प्रतिसाद झाल्याने हा नवीन भाग सुरू करत आहे.

याआधीचे भाग: | | | | | |

मुक्ता बर्वेच्या निर्मितिसंस्थेचं पहिलं नाटक 'छापाकाटा' पाहिलं. इरावती कर्णिकचं नाटक. ज्यांना गोष्टीबद्दल उत्सुकता कायम ठेवायची आहे, त्यांनी पुढे वाचायचं टाळलेलं बरं.
गोष्ट वेगळी आहे. एक आजारी आई नि तिची अविवाहित तरुण मुलगी यांची ही गोष्ट. आई-मुलीचं नातं म्हटल्यावर जे काही गोडमिट्ट डोळ्यांसमोर येतं त्यातलं हे नातं नाही. एकटेपणातून येणारी असुरक्षितता, अगतिकता, एकमेकींना घट्ट पकडून ठेवू पाहणं, त्याच वेळी सुटायसाठी धडपडणं, लहान गावात / जुन्या घरात / कर्तृत्वाला वाव नसलेल्या अवकाशात घुसमटत राहणं, परिणामी एकमेकींना ओरबाडणं... हे सगळं आहे. नि तरीही एकमेकींबद्दल कर्तव्याचा नि प्रेमाचा धागाही शिल्लक आहे. इथे ही गोष्ट आई-मुलीची आहे. पण ती कुठल्याही दोन व्यक्तींमधल्या नात्याची असू शकतेच... इतकं गुंतागुंतीचं, क्रूर आणि चाकोरीबाहेरचं काही लई दिवसांत पाहिलं नव्हतं.
हे सगळं रीमा आणि मुक्ता बारीक जागांतून भरत राहतात. (त्यांच्या अ‍ॅक्टिंगबद्दल काय बोलावे? त्याबद्दल एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल. केवळ तेवढ्यासाठी मी नाटक पुन्हा पाहणार आहे.) श्वास घ्यायला जागाही न देता.
पण म्हणून नाटक चोख दोषरहित आहे असं अजिबात नाही. आईची व्यक्तिरेखा चक्क काळीकुट्ट वाटते. तिला यत्किंचितही सहानुभूती द्यावीशी वाटत नाही. शेवटाकडे तिच्यातलं आईपण जागं होईस्तोवर. शेवटी आई जो निर्णय घेते, तो घेईपर्यंतचा तिचा असा काही प्रवास असेल की नाही? की केवळ लेखकाला वाटलं, आता टेन्शन बास, नि आईला शहाणपण आलं? तसंच मुलीचंही. मेलेल्या बापाशी या मुलीची इतकी घट्ट बांधीलकी आहे, हे अगदी शेवटी शेवटी मुलगी सांगेस्तोवर कुठेच दिसत नाही.

एखादी मस्त मालिका तब्बेतीत काढायला घ्यावी, चांगली मजा यायला लागावी नि मग एकदम ट्यार्पी मिळत नाही, म्हणून गोष्टीच्या शेवटाकडे नेऊन सगळ्यांना सुखी करून मोकळं व्हावं, तसं काहीसं शेवटी वाटलं. अर्थात याचा दोष कलाकारांकडे नाही, हे पुन्हा आवर्जून नमूद करावं इतकी मजा रीमा नि मुक्ताची जुगलबंदी पाहताना, मुक्ता नि आशीष कुलकर्णीचे सीन्स पाहताना येते.

field_vote: 
0
No votes yet

अजून पेप्रात जाहिरात दिसली नाही नाटकाची ती?
जावं म्हणतोय आता.मुक्ता बर्वे साठी तसाही जायला तयार आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कालचा पहिला किंवा दुसराच प्रयोग होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आभार!
नाटकाला बघुन घेण्यात येईल! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काल बालगंधर्वला पुण्यात पहिला प्रयोग होता. मला नाटक आवडलं. फक्त रीमाच्या अभिनयासाठी तरी नक्की नक्की पाहावं असं आहेच. फार वेगळीच भूमिका आहे मी तरी पहिलेली ही रीमाची! मुक्ता चा अभिनय नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट. तिच्या एवढ्यात आलेल्या लग्नाळू चित्रपटांपेक्षा पूर्वीची फाइनल ड्राफ्ट आणि कबड्डी कबड्डी मधली मुक्ता आठवली. व्यक्तिरेखांचा ग्राफ फारसा चढला नाही या बाबत मेघनाशी सहमत आहे. नेपथ्य आवडले. नाशकातलं जुनं घर आणि अंगण छान उभं केलंय. नरेंद्र भिडे यांच्या पार्श्वसंगीतात काहीच वेगळं नाहीये.

पण सर्वांचे अभिनय, संहिता यासाठी एकदा पाहायलाच हवा असा प्रयोग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कालच हे नाटक पाहिलं
आधी एक सांगतो की नाटक एकूणात बर्‍यापैकी आवडलं!

(पांढर्‍या ठशातील वाक्ये कथासुत्र उघड करण्याची शक्यता आहे)

फार चाकोरीबाह्य किंवा प्रत्यक्षाहून उत्कट वगैरे काही वाटलं नाही. (एक तर माझ्या आधीच्या हाफीसमधल्या एका चांगल्या मैत्रिणीची अशीच स्टोरी उलगडताना फार जवळून पाहिली आहे. तिने शेवटी कंटाळून पळून जाऊन लग्न केले - त्यामुळे विषय माहितीतलाच नव्हे तर जवळून बघितलेला) दुसरे असे की मुळ कथा अगदीच बेतास बात वाटली - त्यात नाट्य अगदी मामूली , तेच तेच. त्यामानाने, पटकथा बरीच बरी -छान वेगात फुललेली- पण पुन्हा संवाद कर्कश वाटले. सेट फारसा आवडला नाही. मुक्ता सोडल्यास इतरांचा अभिनय मात्र चोख. त्यात रिमा म्हंजे तर हैट आहे! कितीतरी दिवसात इतका चोख अभिनय बघायला मिळाला नव्हता.

शेवटाबद्दल मात्र माझं मत अगदी उलट आहे. मला शेवट आवडला. मुळात रिमाची भुमिका कथेमध्ये काळीकुट्ट केलेली नाहिये असे लगेच म्हणवत नाही, पण रिमाचा अभिनय त्यात जी आर्द्रता म्हण किंवा एक पॉसिटिव्हिटी म्हण आणतो ना त्याला तोड नाही. निव्वळ तिचा अभिनय व संवादफेक यामुळे एरवी अविश्वसनीय वाटु शकला असता तो शेवट खरा वाटायला लावला आहे. (नव्हे बहुतांश प्रेक्षकांना खरा/शक्य वाटलाही - "आता बघ ती येईल" हे वाक्य मी मागे-पुढे बसलेल्या किमान तीन व्यक्तींकडून + माझ्या बायकोकडून ऐकले). एक शक्यता अशी की तु बघितलेला प्रयोग पहिलाच असल्याने तोवर भुमिका तिच्यात तितकी भिनली नसेल. आता ती भुमिकेत इतकी मुरलीये की ते बेरकेपण, समोरच्याल राग आणते, नंतर कीव आणू लागते आणि नंतर शेवट शक्य आहे असे वाटायला लावते.

मुक्ता बर्वेने मात्र अपेक्षाभंग केला. अडखळणारी व तोंडातल्या तोंडात केलेली संवादफेक, कधी जास्तच लाऊड अभिनय तर कधी पडेल अभिनय. किमान रिमापुढे आपण उभे आहोत हे समजून तिने स्वतःला बरेच चँलेंज करायला हवे आहे.

प्रकाश, संगीत वगैरे ठिक ठाक (दिवस आहे का रात्र यानी कथेत फार फरक पडत नसला तरी दिवसा-दुपारी झाडांच्या सावल्या मागील भिंतीवर दिसू नयेत असे वाटते). ध्वनी तर अनेकदा हास्यास्पद (एकदा तर ग्लास पडल्याचा आवाज पडून गेल्यानंतर २-३ सेकंदानी आला, तर घरा बाहेर गाड्यांचा प्रकाश दिसत होता पण अंगणातही गाड्यांचे आवाज मात्र येत नव्हते) - अर्थात छिद्रान्वेषाचा दोष मान्य आहेच. मात्र कथा संथ असली की अशा गोष्टींकडेही लक्ष जाते हे दिग्दर्शकाने लक्षात घ्यायला हवं होतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हं. परत पाहायचं आहे. तेव्हा कदाचित पटेलही. पण मुक्ताकडून अपेक्षाभंग? ऐकून आश्चर्यमिश्रित वाईट वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अडखळणारी व तोंडातल्या तोंडात केलेली संवादफेक, कधी जास्तच लाऊड अभिनय तर कधी पडेल अभिनय.
हे शक्य नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो की नाही? माझीपण प्रथमप्रतिक्रिया अशीच होती. पण आता असेल तो प्रयोग तिच्याकरता वाईट. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पुन्हा बघितलंस तर हे बघ नी सांग काय वाट्टं.
**
१. पहिल्या अंकात त्या असीमसोबत त्याच्या रूमवर जलद भांडताना एकमेकांचे संवाद एकतर ओव्हरलॅप व्हायला हवेत किंवा मग नीट मुद्देसूद भांडण दाखवावं. मात्र स्टेजवरच्या घाईत बोलताना ती चक्क संवाद अर्ध्यावर सोडून देते. (मी ही दचकलो!)
२. रिमावर हात उगारण्यच्या प्रसंगात ती हात स्वतःच्या डोक्याच्याही वर पाची बोटं फुलवून? - अगदीच नाटकी/ठरवून केल्यासारखा. मला आधी कळलंच नाही काय चाल्लंय, तिने हात उगारलेला आहे हे नंतर तिच्या संवादावरून गेस करावं लागलं
३. शेवटी बाबांच्या फोटोशी रडतपेक्षा भरून आलेल्या अवस्थेत बोलताना, चक्क संवाद तोंडातल्या तोंडात म्हटले!
४. रिमाच्या हातची काठी खेचून घ्यायचा प्रयत्नात संवाद ऑलमोस्ट थांबवते. जर खरच अचानक करायचं आहे तर ते खरच 'अचानक' हवं नै का?

अजूनही आहे, हे नमुन्यादाखल!

काही गोष्टी एरवी लक्षात येत नाहीत, विशेषतः पोश्चरबद्दल. (अगदी सुरवातीला तर ती दिड पायांवर प्रदर्शनातील अबाहुलीसारखी ठरवून उभी आहे, संवाद ऐकत. घरी असं कोण रहातं?) पण समोर रिमा बहुदा ऑल टाईन ग्रेट अभिनय करत असेल तर नकळत तुलना होते नी मुक्ता फिकी वाटते.

मलाही आश्चर्यमिश्रीत वाईटच वाटलं Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी नाटक पाहणार नाहीय, पण वरच्या चर्चेवरुन एक प्रश्न पडलाय "इतकं गुंतागुंतीचं, क्रूर आणि चाकोरीबाहेरचं काही लई दिवसांत पाहिलं नव्हतं." असे म्हणण्यासारख नक्की काय आहे नाटकात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दोन माणसं एकमेकांना कुठल्या टोकाला जाऊन धरून ठेवू शकतात, हे पाहणं माझ्याकरता अंगावर येणारं होतं. नि तेही आई-मुलगी या रूढार्थानं प्रेमळ-शुभंकरोती-ममताछाप नात्यात रंगवलेलं, म्हणून अजूनच चाकोरीबाहेरचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बिली वाईल्डर या दिग्दर्शकाचे दोन चित्रपट पाहिले. सनसेट बुलवार्ड आणि द फ्रंट पेज. पहिला हॉलिवूडबद्दल आणि दुसरा छापील माध्यमांबाबत. दोन्ही चित्रपट या व्यवसायांची काळी बाजू दाखवणारे, डार्क विनोदाने भरलेले. असा सगळा काळा कारभार असला तरीही दोन्ही चित्रपट बघून फार आवडले, बघताना मजा आली इ.

'सनसेट बुलवार्ड'मधे कुठे काही 'इश्क सुफियाना' वगैरे दिसेल का याची वाट पाहिली. पण न दिसल्याने अंमळ निराशाच झाली. (तसा 'लेअॉन' पहाताना 'जीवन में जाने जाना एक बार है होता प्यार'ची फार आठवण होत होती.) 'द फ्रंट पेज' पहाताना 'पिपली लाईव्ह' फार आठवला नाही, कदाचित लक्षात राहिला नाहीये हे कारण असावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्या हिवाळी सुट्टीत ठरवून काही मराठी सिनेमे आणि एक नाटक पाहिले (सगळे आपलीमराठी.कॉम वर). प्रेमाची गोष्ट आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं हे दोन्ही चित्रपट चांगले वाटले. प्रेमाचे चित्रण थिल्लर नव्हते हे आवडले. सागरिका घाटगे आणि पल्लवी जोशी ह्या दोघींचे बोलणे थोडे कृत्रिम वाटले, पण चालून जाण्यासारखे होते.
जब्बार पटेलांचा मुक्ता पाहिला आणि अजिबात आवडला नाही. पात्रयोजना, कथा, आणि दिग्दर्शन, काहीच आवडले नाही.
कदाचित, आघात आणि वी आर ऑन-होऊन जाऊ द्या हे चित्रपट ठीकठाक होते. बालक पालक आवडला.
पाऊलवाट पाहिला. काहीच खास नव्हता. कथेत फार दम नव्हता.

विक्रम गोखले आणि स्वाती चिटणीस चे 'नकळत सारे घडले' हे नाटक पाहिले. विक्रम गोखलेंचा अभिनय आणि वाक्यफेक अप्रतिम. स्वाती चिटणीसचा अभिनय खास आवडला नाही. अनिकेत विश्वासरावचा अभिनय चांगला होता. शर्वरी पटवर्धनचे पात्र फार महत्त्वाचे नव्हते. तिचा अभिनय ठीकठाक होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल रात्री भारतीय एक्सएन वर शरलॉक (होम्स) सीजन ३ चा पहिला भाग पाहिला.
सीजन २ मध्ये (उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करून) मेलेला होम्स मेलेलाच कसा नव्हता (ते अशाअशा - १ , २ किंवा ३ प्रकारे घडलेले असू शकेल वगैरे), मधल्या दोन वर्षांच्या अज्ञातवासाच्या काळात मोरिआर्टीचे नेटवर्क खोदून आणि खोडून काढण्यात त्याने किती हाल सोसले आणि तो परत आल्यावर (वंचनेमुळे त्रासलेला आणि चिडलेला) वॉटसन त्याला कसा बदडतो यावर बराच भाग खर्ची पडला.

त्यामुळे 'द एम्प्टी हर्स' (पी सायलेंट) हा अतिरेक्यांनी केलेला ब्रिटिश पार्लमेंट उडवून देण्याचा कट आणि होम्सने त्याची केलेली उकल हा (मूळ कथानकाचा) भाग फारसा रंगवता आला नाही. रात्री शेवटी जाणार्‍या रिकाम्या अंडर्ग्राऊंड ट्यूबच्या शेवटच्या डब्यात एकच माणूस चढतो, शेवटपर्यंत ट्यूबमधून तर कोणीच उतरत नाही आणि तरीही शेवटच्या स्टेशनवर ती ट्यूब रिकामीच पोचते... असे प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते --- आणि ते रहस्य तसे सोप्पे होते.

सीजन ३ च्या पहिल्या भागाने थोडी निराशा केली. वेटिंग फॉर मोर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्यातून हा उपधागा वेगळा काढावा लागेलशी आशा आहे.

माझी नाही निराशा झाली. बादवे, ज्यांनी अजून पाहिला नसेल त्यांनी पुढे वाचू नये.

त्यांच्यापुढे मोठी आव्हानं होती. दोन वर्षं लोक 'कसा जगला शेरलॉक' या कूटप्रश्नावर बॅण्डविड्थ खर्ची घालत होते आणि जॉन नि शेरलॉक एकमेकांशी सलोखा कसा करतील यावर गोष्टीच्या गोष्टी लिहीत होते. अशात मॉफ्टिसनं काहीही केलं असतं, तरी ते समाधानकारक होण्याची शक्यता नव्हतीच. पण माझ्या मते त्यांनी अजिबात अपेक्षाभंग केला नाही. विशेष आवडलेल्या गोष्टी या अशा:
- अनेक ठिकाणी फॅनडमला घातलेले डोळे. फॅनडममधे प्रचलित असलेले वेगवेगळे 'कॉन्स्पिरसी थिअरीज'च्या जातकुळीचे सिद्धान्त या भागात धमाल पद्धतीत वापरले आहेत नि तरी शेरलॉक कसा जिवंत राहिला याचं निराळं बरचंसं तर्कशुद्ध स्पष्टीकरणही आहे.
- मायक्रॉफ्ट नि शेरलॉकची भारीपैकी, गुंतागुंतीची, वेगवान, बरंच सांगणारी-बरंच दडवणारी जुगलबंदी
- होम्स बंधूंचे पालक. चक्क. Biggrin
- शेरलॉक आणि जॉन दोघेही भावनिक पातळीवर व्यवस्थित गंडलेले लोक आहेत. पिस्तुलं, पाठलाग, रहस्य, खून, धमक्या, बॉम्ब यांत ते जितक्या सहजतेनं वावरतात, तितकीच त्यांची भावनिक गोष्टींना सामोरं जाताना फाफलते. त्यांची तारांबळ आणि हळूहळू येणारी प्रगल्भता हा या मालिकेचा सर्वांत वेगळा नि रंजक भाग आहे. त्या बाबतीत या भागानं पूर्ण समाधान केलं.
- मेरी मॉर्ट्सन. जॉनची प्रेयसी. अ‍ॅमंडा अ‍ॅबिंग्टन केवळ गोड. अतिशय मजा येते ती, बेनेडिक्ट आणि मार्टिन यांच्यातले सीन्स पाहताना.

नाही म्हणायला, अ‍ॅन्डरसनसोबतचा शेरलॉकचा सीन मला विशेष नाही आवडला. थोडा कापला असता तर काहीच बिघडलं नसतं. तशीच ट्रेन्सची दृश्यं आणि जॉनला बॉनफायरमधून वाचवतानाचा पाठलागाचा सीक्वेन्स हे दोही जरा लांबलं आहे. पण एकुणात पुढच्या भागात काही उत्तरं मिळणं शिल्लक आहे. त्यासाठी वाढवलेली उत्कंठा आणी आधीच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं, एकाएकी मिळालेली प्रचंड लोकप्रियता आणि त्यामुळे वाढलेल्या अपेक्षा हे सगळं पाहता मी खूश आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कदाचित (वयानुसार) नव्या शरलॊकचा फ्यॆन असूनही हे जालावर चाललेले कथेबद्दलचे अंदाज बांधणे - नव्या फेबु/ ट्वीटस/ व्हाटस अ‍ॅपमधले हॆशटॆग्ज #sherlock वगैरे या नवीन भानगडींमध्ये (आम्ही जुने झालो म्हणून) मागे आहोत -त्यातली मजा कळत नाही म्हणा.

बाकी शेरलॉक मानवी होत चालला आहे वगैरे जाणवले - त्याचे कुटुंब असू शकते - त्याला स्त्रीमध्ये तसा रस असू शकतो- (तो एका स्त्रीचे चुंबन घेऊ शकतो किंवा मोरिआर्टीबरोबर त्याची गे रिलेशन्स असतील असे कोण्या फॅन्सना वाटले कोणास माहित?) - वॉटसन गे नाही असा त्याचा स्वतःचा स्पष्ट उच्चार - फॅन्सनी त्याला दिलेले खोट्या पुराव्यांचे चॅलेंज वगैरे - हे सगळे त्याच्या पुनरुत्थानाचा भाग म्हणून ठीक आहे. पण गुंतागुंतीच्या रहस्याची उकल हे शरलॉकचे मुख्य काम - ते या भागात तसे फिके होते. या भागात त्याचे म्युझियमही चालले नाही. तो बदललाय मागच्या दोन सिरीजपेक्षा. तो हसतोय - विनोद-चेष्टा करतोय वगैरे (जुन्या लोकांना पचवणे अवघड!)

म्हणून मूळचा सन १९०० जवळचा शरलॉक होम्स आणि नवा सन २०१० पासूनचा शरलॉक यांच्यामधल्या पिढीतला मी थोडा निराश झालो. १९९० जवळ जन्मलेले चाहते कदाचित या भागापुरते तरी जास्त भाग्यवान ठरलेत असे म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बराचसा सहमत विसूनानांशी. mystery element असं काही नव्हतचं या भागामध्ये. शेरलॉक पण माणसाळलाय असं दाखवलय. आधीच्या सहाही भागांचा गाभा म्हणजे त्यातली गोष्ट जी या नव्या भागात नाहीये. आता मुळ गोष्टीमध्ये ज्यात शेरलॉक परत येतो (adventure of the empty house) त्या गोष्टीमध्येपण गोष्ट/ रह्स्य असं फार मोठं नाहीये. पण जेव्हा तुम्ही तीनच भाग काढणार असतां तेव्हा त्यातला एक भाग नुस्त्या भरत भेटींनी वाया घालवला तर नाही आवडतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चिरंजीवांसोबत (तो एकच आहे, पण हा शब्द अनेकवचनी लिहावा असे ऐसीवर कोणीतरी सुचवले होते.) इस्केप फ्रॉम द अर्थ हा लहानग्यांचा कार्टूनपट पाहिला. मज्जा आली.
अर्थातच त्यात तीच तीच अमेरीकनांची परग्रहवासीयांची थीम होती, पण चिरंजीवांचे अजूनही नाविन्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काल एक भन्नाट स्वप्न पाहिले. डॉ. मनमोहनसिंग हे अंकल बिल्बो बॅगिन्स, सोनिया गांधी या गँडाल्फ, राहूलबाबा फ्रोडो. एक लहानशी पांढरा दाढी असणारा बाबा सॉरॉन आणि एक अमित शहांसारखा दिसणारा बाबा सारुमान. सारुमानने इंटरनेट हिंदूंची मोठी फौज तयार केली आहे. काही उच्चपदस्थ लोक स्नूपिंग करत अविवाहित बायकांवर वॉच ठेवत आहेत. बिल्बोसिंगांनी निवृत्ती घेतल्याने फ्रोडोबाबावर मुकाबला करण्याची मोठी जबाबदारी आहे. गँडाल्फवरही चहूबाजूंनी हल्ले होत आहेत. मजा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL ROFL ROFL ROFL

मग ते मॉर्डॉर कुठेशी आलं म्हणे? नै म्हणजे वरिजिनल कथेत मॉर्डॉर पूर्वेला वगैरे असतं म्हणून विचारतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या कथेत ते पश्चिम किनारपट्टीवर आहे. गिमलीच्या भूमिकेत दिग्विजय सिंग.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गिमली?????

आपला एलोटीआरचा अभ्यास अंमळ कमी पडतो आहे असे सुचवावेसे वाटते. प्यारेलाल तरी काय आहेत त्या दोहोंत ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्यारेलाल तरी काय आहेत त्या दोहोंत

(समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता बोलण्याचा) स्पष्टवक्तेपणा व परखडपणा? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण दिग्विजयसिंग आणि पर्खड???????? ROFL ROFL

असोच ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रियांका गांधींचा कथेत प्रवेश होत आहे. सुटेबल पात्रयोजना करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आंतरजालावर चांगल्या श्रेणी आणि परीक्षणे असल्याने (आणि याच दिग्दर्शकाचा सिल्वर लायनिंग प्लेबुक हा मागील वर्षी आलेला - जेनिफर लॉरेन्स व ब्रॅडली कूपर अभिनित - चित्रपट आवडल्याने) अमेरिकन हसल हा चित्रपट पाहिला. अतिशय कंटाळवाणा आणि लांबलचक वाटला. इतरांना हा चित्रपट का चांगला वाटला असावा याचा विचार करतो आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल 'एमजीएम'वर '१९८४' हा ब्रिटिश सिनेमा पाहिला. मी पुस्तक वाचलेलं नाही, पण मला गोष्टीबद्दल साधारण कल्पना होती. काहीच्या काही अंगावर येणारा सिनेमा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Wolf of wall street पाहिलाय का कोणी? काय मत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही ऐकायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाहण्याचा प्रयत्न केला मात्र चित्रपटातील ड्रग व सेक्सच्या दृश्यांचा व शिव्यांचा अतिरेक झाल्याने बंद करावा लागला. पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. कोणी संपूर्ण पाहिला असेल तर मतप्रदर्शन करावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परवाच पाहीला, As of December 25, 2013, it ranks 2nd on the list of films that most frequently use the word "f***".
प्रचंड मोठा आहे, संपूर्ण ३ तासाचा. पहिल्या हाफ मध्ये स्टॉक्सचा वापर करुन पैसे वगैरे कसे मिळवतो, पार्टी आणि ड्रग्स इत्यादी. अशा गोष्टी स्क्रीनवर बघायला मला फार आवडत नाही. पार्टीप्रेमी मित्राला फर्स्ट हाफ फार आवडला. आपले पैशे घालवून त्यांची पार्टी का बघा हे माझे विचार.
पुढचा भाग पांढर्‍या रंगात टाकतो.
ब्लू चिप बरोबर हेवी मार्जीन असलेले स्टॉक्स विकून हा गडी लै कमावतो. मग एफ्बीआय मागे लागते. हा भौ स्विस ब्यांकेच्या दिशेने वाटचाल सुरु करतो. चार लोकं पकडून क्याश इकडून तिकडे. तर हा स्विस ब्यांकेचा खर्च चालू असताना क्याश इकडून तिकडे करणारी म्हातारी गचकते. मध्येच हा भौ कुठली तरी बेक्कार स्ट्राँग गोळी( Lemmon Qualuude, nile प्लीज नोट, तुच ना तो हलुसिनोजेनवाला?) घेतो आणि हँगओव्हरच्या आसपास जाणारे चाळे करतो. शेवटी त्याला अटक होते, तीन वर्ष आत काढल्यानंतर शेठ सेल्स टेक्नीक्सचा सेमीनार देताना दिसतात.

ठीक वाटला एकंदर, फार उच्च नाही. मुद्दाम पहावा असा तर अजिबात नाही. मजबुत मोठ्ठ्या सुट्टीत वेळ जात नसेल तर बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपले पैशे घालवून त्यांची पार्टी का बघा हे माझे विचार
वरील प्रतिसादातून शंतनुराव किर्लोस्कर आठवले.
ते असेच प्रखड बोलत; त्यांचं बोलणं विक्षिप्त वआटे.
सुधीर गाडगीळ ह्यांनी घेतलेल्या मुलाखतीतील काही भाग मला आठवतो तसा.
सुधीर गाडगीळ :- आपल्याला काही अभंग वगैरे आवडतात. उद्योगाच्या धकाधकीतून वेळ काढूनही तुम्ही ऐकता. पण चित्रपट नाटके पाह्ताना मात्र फारसे गंभीर चित्रपट पहात नाही. असे का?
किर्लोस्कर :- आधीच आयुष्यात बरेच हेडेक्स आहेत. आपले पैसे खर्चून दुसर्‍याची डोकेदुखी/दुसर्‍याचे दु:ख कशाला बघा उगाच? मी वेळ छान जावा म्हणून तद्दन धंदेवाईक चित्रपट पाहतो.
आशायघन वगैरे काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

धन्यवाद अतिशहाणा, मन्दार Smile
मी रेडीफवरच्या समिक्षा वाचल्या. त्यात साधारण असे लिहिलय की, चित्रपट ज्या उद्देशाने बनवलाय त्याच्या नेमका उलटा परिणाम करतोय. सेक्स, ड्रग्ज चे उदात्तीकरण किँवा जॉर्डन ला हिरोप्रमाणे दाखवलय वगैरे. तसे खरंच झालय का?
चित्रपट R रेटेड आहे. मी पाहिलेला एकमेव R चित्रपट द कुक द थीफ हिज वाइफ अँड हर लवर. यातले सेक्ससीन एक्सप्लीसीट तर होतेच + जे रंग/लाइट वापरलेत त्यामुळे अजुनच डिस्टर्बिँग अंगावर येणारे वाटले. वुल्फच्या ट्रेलरवरुन तरी तो सौम्य वाटतोय.
एफ शब्दाच्या वापरात पैला नंबर कोणत्या चित्रपटाचा आहे म्हणे? यादी कुठे पहायला मिळेल?
अवांतर माहिती: Nile ला +१ दिलेल बरंका तिकडे मी आणि किर्लोस्करांचे आणि माझे मत कित्ती कित्ती जुळतेय :-P.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधीच आयुष्यात बरेच हेडेक्स आहेत. आपले पैसे खर्चून दुसर्‍याची डोकेदुखी/दुसर्‍याचे दु:ख कशाला बघा उगाच? मी वेळ छान जावा म्हणून तद्दन धंदेवाईक चित्रपट पाहतो.
अर्थात!! आपले पैसे खर्चून त्याची पार्टी बघण्यापेक्षा आपण करू की त्यापेक्षा! हाकानाका

चित्रपट ज्या उद्देशाने बनवलाय त्याच्या नेमका उलटा परिणाम करतोय

होय, खरंतर उद्देश्श हा आहे, हे कोणीतरी सांगे पर्यंत कळणारच नाही. "प्रत्येक गोष्ट विकण्यासाठी आहे" असा काहीसा असावा असं वाटेल. सेक्स, ड्रग्जचे दणकून उदात्तीकरण आहे.

एफ शब्दाच्या वापरात पैला नंबर कोणत्या चित्रपटाचा आहे म्हणे? यादी कुठे पहायला मिळेल?
अरेरेरे कोणाचं काय तर कोणाचं काय, तुम्हाला पण यात इन्ट्रेस्ट का? Biggrin Biggrin (हलकेच घ्या हो ). यादी ही इथे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Law Abiding Citizen हा रजनीकांतपट पाहिला. कैच्या कै. सत्य समोर आल्यावर भ्रमनिरास होतो असा गूढपट.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नुकताच हा सिनेमा पाहिला. पाहण्याचे मुख्य कारण मार्टिन सोर्सेसी. चित्रपटाने फार निराशा केली. सिनेमाला काहीही थीम नाही, रँडम गोष्टीं घडतात. पहिल्या अर्ध्या भागात फक्त 'वॉल स्टीट मिल्यनेअरचे आयुष्य किती वाईट' असं दाखवण्याचा प्रयत्न आहे याशिवाय नक्की काय म्हणतोय दिगदर्शक हे समजत नाही.

(काही स्पॉयलर्स असू शकतात.)
'रस्त्यावरच्या' लोकांना घेऊन वॉलस्ट्रीटवर अतिश्रीमंत होणारा नायक ही घिसीपिटी थीम आहे. ह्या लोकांची कॅरॅक्टरं अत्यंत पो़कळ आहेत. त्यात तो कसं हे करतो यावर विशेष काही नाही, एक दोन मोनोलॉग्स फक्त आहेत. मोनोलॉग्सही रटाळ आणि घिसेपिटे. (त्यातील काही सेकंदांपुरते कप्रिओ आपले अभिनय कौशल्य दाखवतो, एरवी कोणीही खपुन गेला असता.)

वेश्या, ड्रग्ज वगैरे गोष्टींची प्रचंड अतिशयोक्ती करतना हे सगळं वॉलस्ट्रीट-कल्चरबद्दल घृणा निर्माण करण्याकरता घेतलं आहेत असा भास प्रथम होतो. पण नंतर त्यात काही काही दृश्यांमध्ये दिग्दर्शकाने इतका वेळ घालवला आहे की या वॉल स्टीटवरील लोकांप्रमाणे त्यालाही यात काही विशेष रस असावा की काय अशी शंका येते.

मध्ये मध्ये हा सिनेमा विनोदीच जास्त (आणि बायोग्राफिकल कमी) बनवायचा होता की काय अशी शंका येत राहते. अर्थात विनोदाची क्वालिटी रटाळ आहे. एक उदा. स्त्रियांच्या प्युबिक हेअर बद्दल संवादाचा सीन तीन-चार मिनीटे आहे. असे प्रकार करण्यापेक्षा सिनेमा दोन तासांत गुंडाळला असता तर किंचित जास्त प्रभावी ठरला असता.

नायकाच्या आयुष्यात अनेक असंभवनीय गोष्टी घडत राहतात, त्यांच इतका भडीमार होतो (आणि असूसुत्रता) की त्यातली मजा निघून जाते. सदर सिनेमा हा एका मनुष्याच्या अनुभवावर आधारीत पुस्तकावर बेतलेला आहे, आणि यातील 'असंभवनीय' गोष्टींही बहुतांशी खर्‍या आहेत असा दावा दिसतो. तरीही, चित्रपटातली अतिशयोक्तींबद्दल मला शंका आहे.

एकंदरीतच, सिनेमा नाही पाहिलात तरी चालेल. उलट पाहूच नका, त्या ऐवजी वेळ-पैसा वाचवून दुसरा एखादा सिनेमा पहा असा अनाहूत सल्ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-Nile

डिकॅप्रिओची अ‍ॅक्टिंग उत्तम वाटते. कळस म्हणजे क्लबहाउसमधून घरी जाताना अचानक ड्रगची किक बसून त्याला कळायचं बंद होतं तेव्हा तो कारपर्यंत कसा स्वतःला रेमटवत नेतो तो शीन. बाकी प्रथम हाफ म्हञ्जे कांती शाह + बोरॅट वाटतो पण विकीपांडित्य सांगते की ते सगळे खरेच होते म्हणून. काय की.

बाकी ती मार्गॉट रॉब्बी मात्र ड्रॉप डेड गॉर्जस प्लॅटिनम ब्लाँड आहे खरीच. (च्यायला आमच्यापेक्षा वय कमीय तिचं)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"टाईमपास" हा सध्याचा बर्‍यापैकी चर्चित सिनेमा पाहिला. स्क्रिप्ट मध्ये ढोबळ चुका असल्या तरी बघायला बरा वाटला. केतकी माटेगावकर ला स्टिरिओटाइप केले जात असले तरी असे रोल तिला एक्दम फिट्ट शोभतात. अगदी सुंदर नसली तरी मुळात खूप निरागस दिसत असल्याने तिचे दर्शन सुखावून जाते.

मला वेड लागले...प्रेमाचे, कुठलेतरी एक दु:खद गाणे ( आता शब्द विसरले पण चाल छान होती) आणि विशेषतः "फुलपाखरू..छान किती दिसते" या बालकवींच्या कवितेचे रॉक व्हर्जन फारच आवडले.

चेन्नई एक्सप्रेस पेक्षा हजार पटीने चांगला वाटला. एकदा बघायला (१०० रू च्या आसपास ति़किट असले तर) काहीच हरकत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

चेन्नै एक्प्रेसपेक्षा चांगला म्हणणे म्हणजे तो पिच्चर वाईट आहे असे म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वीट फारच मऊ होती. निदान दगडाहून तरी मऊच होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

"हजार पटीने चांगला" - म्हणजे वरचे ९९९ ठेवा की!

आणि अगदी छान नाहीच म्हटले..एकदा बघणेबल आहे इतकंच.

मुळात डेढ इश्किया बघायचा होता, पण त्याचे तिकिट शनिवार्/रविवार काहीच्या काही महाग होते, मग मराठी सिनेमाच्या शिड्या बाजारात पटकन येत नाहीत, हिंदीच्या पटकन येतात तेव्हा २ आठवडे तिकिटदर कमी व्हायची वाट बघू नाहीतर शि.डी. आणू असे ठरले, पण थेटरात जाऊन सिनेमा बघायचा आहे अशी आता इच्छा झालीच आहे तर काय करावे - अशा विचारात "टाइमपास" ला पसंती दिली गेली, आणि मला काही माझे १२० x २ = २४० रू वाया गेले असे अजिबात वाटले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

Youtube वर 'ये जो है जिंदगी' ही १९८४ ची मालिका पाहिली. सतीश शहा, शफी इनामदार, स्वरूप संपत आणि किरण बेदी यांची कामं मस्त आहेत . विशेषतः सतीश शहाचे प्रत्येक भागात वेगवेगळे पात्र साकारणे भारी जमलय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“Practical men who believe themselves to be quite exempt from any intellectual influence, are usually the slaves of some defunct economist."
― John Maynard Keynes