जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
काल "राही मतवाले" हे तलत मेहमूद यांचे गाणे ऐकून, त्यांचा व सुरैय्याचा "वारीस" हा १९५४ चा सिनेमा पाहीला. एकदम खूप आवडला. सशक्त व नाट्यमय कथा, अतिशय गोड गाणी. तलत मेहमूद देखणे दिसतातच पण डायलॉगमध्ये त्यांचा मृदू आवाज .... ओह माय गॉड!! साध्या बोलण्यातही, इतका मृदू, मखमली आवाज. सिनेमा फार छान आहे.
.
यु ट्युबवर सापडेल.
.
ज्यांना आसक्त तर्फे दरमहा भरणारे "रिंगण" माहीत नसेल त्यांच्यासाठी हे सांगणे अगत्याचे ठरेल की दर महिन्याच्या दुसर्या शनिवार/रविवारी सुदर्शन रंगमंच, पुणे इथे 'रिंगण' या कार्यक्रमांतर्गत विविध प्रकारच्या साहित्याचे अभिवाचन अनेक मान्यवरांतर्फे केले जाते. या रविवारच्या रिंगणात 'कामातुराणाम्' नावाचा प्रयोग होणार आहे असे समजताच या प्रयोगाला हजेरी लावायचीच असे ठरवले होते. त्यात माधुरी पुरंदरे, हृषीकेश जोशी व किरण यज्ञोपवीत हे तिघे अभिवाचन करणार असल्याने एका मर्यादेहून चांगला कार्यक्रम होईल याची खात्री होती. उत्सुकता होती की या वेळी नक्की कोणत्या वेच्यांचे अभिवाचन असेल.
जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
काल 'मुव्हीज-नाऊ प्लस' ह्या चॅनल वर 'शेफ' सिनेमा पाहिला. मागच्या वर्षी भारतात थेटरात आला होता तेव्हाच पहायचा होता पण दुर्दैवाने जमलं नव्हतं आणि असे सिनेमे आठवड्यापेक्षा जास्त चालत नाहीत इथे. भारतीय सिनेमागृहात हॉलीवूड म्हणजे सुपरहिरो, हॉरर, अॅक्शन, स्काय-फाय, कॉमेडी हेच जोमात चालतं असं माझं मत. असो, ह्या सिनेमाबद्दल आधी ऐसीवर लिहीलं आहे का? असल्यास वाचायला आवडेल.
जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
काल यशवंत नाट्यमंदिरात "अ फेअर डील" हे नाटक पाहिले. आवडले. कॉलेजात जाणार्या मुलीच्या हाती चुकून आपल्या (अर्थातच मध्यमवयीन) आईची रोजनिशी लागते. ती वाचल्यावर तिला असे लक्षात येते की आपल्या आईचे तिच्यापेक्षा वयाने बर्याच लहान असलेल्या एका तरुणाशी लफडे (अफेअर - अ फेअर - :) )चालू आहे. त्यानंतर घडणारी ही गोष्ट. ज्यांना नाटक पाहायचे असेल त्यांचा रसभंग होऊ नये म्हणून कथेविषयी ह्याहून अधिक लिहीत नाही.
जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
***
'रायबेशे' आणि 'ढाली' नावाचे दोन नृत्यप्रकार आज पहिल्यांदाच पाहिले. फारच वेगळे वाटले. ही दोन्ही बंगालमधली लोकनृत्यं आहेत. नृत्य महोत्सवात सादर होत होती म्हणून नृत्यं म्हटलं, पण त्यात नृत्याव्यतिरिक्त गाणी होती, कसरती होत्या, युद्धसदृश प्रसंग होते.
जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.
जुन्या धाग्यात १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
***
हॉलिडे पाहिला. पीकेवर उतारा म्हणून उत्तम आहे.
---------------
खाऊन पिऊन सोफ्यावर लोळत सगळ्या जगावर कमेंट करणारांनी, खासकरून राष्ट्रवाद कसा फालतू आहे, लष्कराला टॅक्सचे पैसे मी का देऊ इ इ विचार करणारांनी अवश्य पाहावा.
जुन्या धाग्यात १००च्या जवळपास प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा. उजव्या बाजूला किंवा मुखपृष्ठावर असणाऱ्या मुखवट्यांच्या प्रतिमेवर टिचकी मारून या प्रकारातले सगळे धागे सापडतील.)
***
बीईंग देअर (१९७९) हा चित्रपट पाहिला. - आता लिहिताना बघितलं तर चित्रपट इतका जुना आहे हे कळलं, बघताना तो मला अगदी ताजा वाटला होता.