अलिकडे काय पाह्यलंत ? - ३

दुसरा धागा बराच मोठा झाल्यामुळे तिसरा धागा सुरू करत आहे. भाग -२

रुचीच्या सूचनेवरून 'कपलिंग' नावाची ब्रिटीश मालिका बघायला सुरूवात केली आहे. दोन दिवसात सहा भागांचा पहिला सीझन बघून संपला. ही मालिका 'सेक्स कॉमेडी' आहे, पण 'अमेरिकन पाय'सारखी गलिच्छ अजिबात नाही एवढं वगळता लिहीण्यासारखं मला फार काही सुचलं नाही. (या वाक्याबद्दलही रुचीचे आभार.) तीन मित्र, तीन मैत्रिणी एकत्र येऊन धमाल करतात हे वाचून 'फ्रेंड्स'ची आठवण होणं अपरिहार्य आहे. पण 'कपलिंग' त्यापेक्षा फारच वेगळी वाटते आहे.

एकटं बसून दारू पिणं अधिक miserable का ही मालिका एकट्याने/एकटीने बघणं हे मला ठरवता येत नाहीये. तेव्हा शक्य तेवढे डांबरट मित्रमैत्रिणी जमवून मालिका पहा, नाहीतर आपल्या नवरा/बायको/पार्टनरसोबत पहा. आपापली निवड.

हा या मालिकेचा यू ट्यूबचा दुवा
http://www.youtube.com/user/coupiing
मालिका नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.
http://movies.netflix.com/WiMovie/70140370?strkid=251452526_0_0&trkid=22...

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.
सोमवार, 15/12/2014 - 09:03 | 'कपलिंग' पाहायला घेतली. (Score: 2)

मेघना भुस्कुटे

पुण्य: 2

'कपलिंग' पाहायला घेतली. वाह्यात धमाल आहे. धन्स अदिती!

-मेघना भुस्कुटे
***********
'रेषेवरची अक्षरे': मराठी ब्लॉग्स आणि फोरम्सवरच्या निवडक ललित साहित्याचं संकलन: दिवाळी २०१५

मंगळवार, 26/03/2013 - 16:01 | बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड-२ (Score: 5 मार्मिक)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

अमुक :

>>कथेतल्या अनेक गोष्टी माझ्यासाठी अनाकलनीय राहिल्या. एक म्हणजे इतक्या अनारोग्य आणि दारिद्र्यात राहण्याचा तेथल्या रहिवाश्याञ्चा अभिमान आणि गरज समजू शकली नाही. नायिकेचा बाप तिला परिस्थितीशी लढण्याचे धडे देतो पण जेंव्हा सरकारी (की एन्.जी.ओ.) मदत मिळते, वा विस्थापनाच्या गोष्टी वर येऊ लागतात, त्यावेळी तो रुग्णालयातून पळ काढतो. जर त्याची मालमत्ता वा रोजगाराची साधने हिरावली जाणार असती तर विस्थापनाला विरोध समजू शकतो. पण तसे काहीच नाही आहे. मालमत्ता म्हणजे ज्या ठिकाणी तो राहत आहे तो डम्पर. उदरनिर्वाहाचे त्याच्याकडे कुठलेही साधन नाही. मुलीवर अपार प्रेम तर आहे; पण मग परिस्थितीशी लढण्याचे धडे देताना तो परिस्थिती सुधारण्याचा सन्धी असूनही काहीच प्रयत्न का करीत नाही ? ते कळले नाही.<<

मुकतासुनीत :

>>अमुक यांनी लिहिल्याप्रमाणेच माझी "बीस्ट्स" बद्दलची भावना होती. त्यांनी माझ्या मनातलं नेमकं मांडलं. <<

मी यासाठी वरच्या प्रतिसादात असं म्हटलं होतं - 'डोक्यात निर्माण झालेलं काहीसं रोमॅन्टिक चित्र आणि दारिद्र्य-हलाखीचं हे वास्तव यांतलं अंतर भीषण होतं. पण या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असण्यासाठी माणसांमध्ये जे काहीतरी अन्योन्य असायला लागेल ते काय असेल, याची कल्पना 'बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड' पाहून येते.' जगात (आणि विशेषत: अमेरिकेत) निव्वळ वरच्यासारखा, म्हणजे भौतिकवादी, विचार करून जगणारी माणसं नाहीत; तर त्याहून वेगळं काहीतरी पाहाणारी आणि वेगळं जगणारी माणसं आहेत हे एरवी लक्षात येत नाही, पण अशी माणसं पाहिल्यावर ते लक्षात यावं. हलाखीत जगणाऱ्या माणसांनासुद्धा आपल्या तोडक्यामोडक्या झोपडीविषयी आपुलकी वाटू शकते आणि विस्थापित व्हायला ते नकार देऊ शकतात, हे भारतीयांना तरी नर्मदा बचाओ आंदोलनासारख्या चळवळींमुळे कळायला हरकत नाही असं वाटतं. नदीतले मासे मारून खाणं आणि सख्यासोबत्यांच्या साथीनं जगणं एवढ्यानं काही माणसं सुखी होऊ शकतात. मग ते कळून घ्यायला आपण नकार का देतो?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बुधवार, 27/03/2013 - 10:02 | नकार नाहीच.. (Score: 3 रोचक)

अमुक

पुण्य: 2

चिंतातुर जंतू : ....हलाखीत जगणाऱ्या माणसांनासुद्धा आपल्या तोडक्यामोडक्या झोपडीविषयी आपुलकी वाटू शकते आणि विस्थापित व्हायला ते नकार देऊ शकतात, हे भारतीयांना तरी नर्मदा बचाओ आंदोलनासारख्या चळवळींमुळे कळायला हरकत नाही असं वाटतं. नदीतले मासे मारून खाणं आणि सख्यासोबत्यांच्या साथीनं जगणं एवढ्यानं काही माणसं सुखी होऊ शकतात. मग ते कळून घ्यायला आपण नकार का देतो?
........ कळून घ्यायला नकार अजिबात नाही. उलट उत्सुकताच आहे. माझ्या प्रतिसादात 'मालमत्ता = डम्पर' हे कमी लेखण्याच्या दृष्टीने लिहीले नव्हते, तर मालमत्ता = डम्पर हे समीकरणाच्या दृष्टीने लिहीले होते. तिथे राहणार्‍याला आपली झोपडी प्रिय आहे हे तर साहजिकच आहे. तो एकटा - विनापत्य असता तर मला तसा प्रश्नही पडला नसता. पण चित्रपटात अनेकदा आपल्या पोरीला दूर ठेवून, रागे भरून जरी त्याचे वर्तन वरवर आदीम/रानटी वाटले तरी आपल्या पोरीचे भले व्हावे ही कळकळ एक बाप म्हणून अनेक प्रसङ्गान्तून वर येत राहते. चित्रपटात हीच गोष्ट मुख्य आहे आणि ती मी तशी स्वीकारलीही. ती बापाची ओढाताण खूपच ठळक आणि जिवघेणी आहे. परन्तु पडलेला प्रश्न पोरीच्या भवितव्याचा आहे. अनेकदा समाजात आपण व्यसनधीन बाप पाहतो. व्यसन सुटता सुटत नाही पण मुला-बाळान्ना चाङ्गले जग दाखविणे हे ते सचोटीने करतात. भले ते रात्री-अपरात्री पिऊन शिव्यागाळ करतील पण शुद्धीत असताना प्रसङ्गी चार फटके लगावून आपल्या मुलान्ना दारूपासून दूर ठेवण्याचे व्रत ते कटाक्षाने पाळतात, निदान तसा प्रयत्न तरी करतात. या चित्रपटातला बाप अश्याच जातकुळीतला दाखवायचे आहे असे वाटले. त्यामुळे पोरीच्या बाबतीत त्याचे वर्तन अनाकलनीय वाटले, पण अस्वीकार्य मुळीच नाही. तुमच्या मार्मिक प्रतिसादाबद्दल आभार.

मंगळवार, 26/03/2013 - 18:23 | प्रतिसाद (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

____/\____

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मंगळवार, 26/03/2013 - 19:04 | +१. जंतूंना येक साष्टांग (Score: 2)

बॅटमॅन

पुण्य: 1

+१.

जंतूंना येक साष्टांग दंडवत. _/\_

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

सोमवार, 21/04/2014 - 21:06 | +२ (Score: 2)

मन

पुण्य: 2

+२

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रविवार, 24/03/2013 - 10:03 | मख्खी हा चित्रपट खरच भन्नाट (Score: 1)

विषारी वडापाव

पुण्य: 2

मख्खी हा चित्रपट खरच भन्नाट आहे . व्यक्तिरेखा सरसकट काळ्या-गोरया रंगात असणे, दक्षिण भारतीय चित्रपटात असणारा थोडा भडकपणा, आणि पुनर्जन्म सारखी अशास्त्रीय कल्पना या गोष्टी एकदा मान्य करून सिनेमाला बसलो की पुढचा अडीच तास कसा जातो ते काळात नाहीत. मनोरंजन वॅल्यू या फक़त एका निकषावर हा सिनिमा बघण्यासारखा आहे.

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

रविवार, 24/03/2013 - 00:27 | "एकच प्याला" बालगंधर्वला (Score: 2)

बॅटमॅन

पुण्य: 1

"एकच प्याला" बालगंधर्वला पाहिलं.

लागे हृदयी हुरहूर, सत्य वदे वचनाला, कशि या त्यजूं पदाला ही अजरामर पदे ऐकली. मस्त मजा आली. काही ठिकाणी काळ किती बदलला हे कळून आल्याने जरा बोअर झाले, काही ठिकाणी मौज वाटली. पण बाकी काही असो, नट मंडळी तयारीची वाटली. त्यांचे गाणे मस्त आवडले.

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

रविवार, 24/03/2013 - 07:11 | (तुझ्याकडे पुरेसं मट्रियल (Score: 2)

३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्य: 2

(तुझ्याकडे पुरेसं मट्रियल नसेल असं समजून) याचा पुढचा धागा उघडून तिथेच का लिहीत नाहीस? इथे १०० च्या वर प्रतिसाद झालेत.

रविवार, 24/03/2013 - 06:26 | विनंती (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

कुणाचं प्रॉडक्शन आणि कुणी कामं वगैरे केली त्याबद्द्दल सांगता काय ?

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रविवार, 24/03/2013 - 16:09 | चित्तरंजन कोल्हटकर दिग्दर्शित (Score: 2)

बॅटमॅन

पुण्य: 1

चित्तरंजन कोल्हटकर दिग्दर्शित नाटक. सिंधूचे काम करणार्‍या कुणी सुचेता अवचट म्हणून आहेत. तळीराम लैच भारी वठवलाय, अ‍ॅक्टरचे नाव विसरलो Sad इतकेच लक्षात आहे.

@विक्षिप्तबै: येस्स, पुढच्या एंट्रीला लक्षात ठेवेन.

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

शनिवार, 23/03/2013 - 19:59 | 'मख्खी' चित्रपट पाहीला. नायक, (Score: 2)

टाटाबायबाय

पुण्य: 2

'मख्खी' चित्रपट पाहीला.
नायक, नायिका, खलनायक अशी सुरुवातीची टिपीकल ४० मिनीटं बोअर झाली. पण एकदा का मख्खीची एंट्री झाली की धमाल मजा येते. मस्त एनिमेशन केलंय.
चित्रपट युट्युब वर आहे.

Pray continue...

शनिवार, 23/03/2013 - 07:39 | न आवडलेले चित्रपट (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

या धाग्यात विशेष आवडलेल्या सिनेमांबद्दल आपण सर्वजण लिहितो आहोत. (असा माझा समज आहे. ) न आवडलेल्या चित्रपटांबद्दल आवर्जून लिहावं असं वाटत नाही पण त्यातही उल्लेखनीय सिनेमे जेव्हा आवडत नाहीत तेव्हा लिहावंसं वाटतं. आपल्याला का आवडले नाहीत त्याची मीमांसा इतर लोकांच्या मताशी तपासून पहावीशी वाटते.

"बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" : यंदाच्या ऑस्कर यादीतला एक सिनेमा. यातल्या (आता नऊ वर्षांच्या असलेल्या) एका लहान मुलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या श्रेणींत मानांकन मिळाल्यामुळे थोडी अधिक उत्सुकता होती. अलाबामा (की लुईझियाना ?) भागातल्या सखल भागात रहाणार्‍या एका मुलीच्या, तिच्या वडलांच्या आणि परिसराच्या बाबत एका मोठ्या पूराच्या निमित्तानं घडलेल्या घटना असं त्याचं स्वरूप.

या सर्व व्यक्तिरेखांच्या आयुष्याचं चित्रण प्रसंगी भीती वाटेल अशा प्रकारच्या दारिद्र्याचं आहे. "अस्तिवाच्या सीमारेषेवरचं जीवन" असं वर्णन करता येईल असं. अनारोग्य, मूलभूत गरजांच्या पूर्तीचा अभाव, संगोपन सुरक्षितता आणि पोषणादि गोष्टींकडे असलेल्या एकंदर दुर्लक्षामुळे असलेली भयंकर अवस्था, परंतु या सार्‍यामधे आयुष्याकडे नुसतं खेळकर नजरेनेच नव्हे तर अत्यंत अभिमानाने पहाण्याची वृत्ती, या वृत्तीला साजेसं त्या अल्पवयीन मुलीचं प्रथमपुरुषी काव्यात्म निवेदन. एकंदर कॅमेरावर्क कवितेच्या अंगाने जाणारं आहे हे खरं आहे, परंतु एकंदर एका चित्रपटाकडे अशा काव्यात्म दृष्टीने पहायला एक प्रेक्षक म्हणून मी पुरेसा तयार नाही याचं मला प्रत्यंतर आलं. सिनेमा मी पाहिला, पण विशेष एंजॉय केला नाही हे मान्य करतो.

वर "अमुक" या सदस्याने दिलेल्या सूचनेवरून टेरेन्स मलिक यांच्या "द थिन ब्लू लाईन" सिनेमाच्या बाबतही अगदी असाच मिळताजुळता अनुभव आला.

या निमित्ताने जाणवलं ते हे की आपण एखादं अमूर्त चित्रांचं प्रदर्शन पाहू शकतो, वेगळ्या धाटणीच्या कवितेला सामोरं जाऊ शकतो. पण "कथना"पलिकडचे दृष्यसौंदर्यवजा अनुभव देऊ पहाणारे चित्रपट आस्वादण्याइतकी आपली मनोभूमिका काही तयार झालेली नाही.

येथील सदस्यांपैकी कुणी हा चित्रपट पाहिला काय ?

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सोमवार, 25/03/2013 - 18:29 | "बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" (Score: 2)

ऋता

पुण्य: 2

"बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" कालच पाहिला. खूप आवडला असं म्हणता नाही येणार पण नक्की कोणती बाजू कमकूवत वाटली चित्रपटाची?असं कोणी विचारलं तर तसं काहीच चटकन 'हे आवडलं नाही' असं सांगायला सुचत नाही. कॅमेर्‍याचे अगदी संकुचित फील्ड ऑफ व्ह्यू आणि सतत बोटीत असल्यासारखं हलतं चित्र असल्यामुळे डोळ्यांना जरा त्रास झाला.

रविवार, 24/03/2013 - 03:01 | बीस्ट्स् ऑफ द सदर्न वाइल्ड् (Score: 2)

अमुक

पुण्य: 2

.....येथील सदस्यांपैकी कुणी हा चित्रपट पाहिला काय ?....
..........पाहिला आहे.
त्यावेळी 'कत्रिना' वादळाची पार्श्वभूमी नीटशी ठाऊक नव्हती. तरी एका मैत्रासोबत आधी बोलणे झाल्याने थोडेफार कळले होते. तुम्ही म्हटता तसे छायाङ्कन उजवे असलेला चित्रपट आहे आणि ते गोष्टीशी सुसङ्गत आहे. कथेतल्या अनेक गोष्टी माझ्यासाठी अनाकलनीय राहिल्या. एक म्हणजे इतक्या अनारोग्य आणि दारिद्र्यात राहण्याचा तेथल्या रहिवाश्याञ्चा अभिमान आणि गरज समजू शकली नाही. नायिकेचा बाप तिला परिस्थितीशी लढण्याचे धडे देतो पण जेंव्हा सरकारी (की एन्.जी.ओ.) मदत मिळते, वा विस्थापनाच्या गोष्टी वर येऊ लागतात, त्यावेळी तो रुग्णालयातून पळ काढतो. जर त्याची मालमत्ता वा रोजगाराची साधने हिरावली जाणार असती तर विस्थापनाला विरोध समजू शकतो. पण तसे काहीच नाही आहे. मालमत्ता म्हणजे ज्या ठिकाणी तो राहत आहे तो डम्पर. उदरनिर्वाहाचे त्याच्याकडे कुठलेही साधन नाही. मुलीवर अपार प्रेम तर आहे; पण मग परिस्थितीशी लढण्याचे धडे देताना तो परिस्थिती सुधारण्याचा सन्धी असूनही काहीच प्रयत्न का करीत नाही ? ते कळले नाही.
दुसरी न कळलेली गोष्ट म्हणजे 'बीस्ट्स्'ची दन्तकथा. ती आता नीट आठवतही नाही आहे त्यामुळे त्याबाबत लिहून फायदा नाही. पण एकूणच चित्रपटातले त्या कथेचे रुपक कळले नाही.
एक-दोन ठिकाणी प्रसङ्ग भावले. उदा. ती मुलगी आणि तिची आईसदृरुश असणारी एक बाई तिच्यासाठी खाणे बनविते, कडेवर घेते, इ. ते चित्रण माझ्यासाठी फार हृदयस्पर्शी होते.

अवान्तर:
.....वर "अमुक" या सदस्याने दिलेल्या सूचनेवरून टेरेन्स मलिक यांच्या "द थिन ब्लू लाईन" सिनेमाच्या बाबतही अगदी असाच मिळताजुळता अनुभव आला......
मी आधी सुचविलेला चित्रपट - 'थिन् रेड् लाईन्'; ब्लू नव्हे.

रविवार, 24/03/2013 - 06:25 | प्रतिसाद (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

अमुक यांनी लिहिल्याप्रमाणेच माझी "बीस्ट्स" बद्दलची भावना होती. त्यांनी माझ्या मनातलं नेमकं मांडलं. (याला "मनींच्या तारा जुळणं" म्हणतात असं काहीसं ऐकून आहे (स्माईल) ) पण जंतुंचा प्रतिसादसुद्धा आवडला.

आणि मलिक यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल घातलेल्या गोंधळाबद्दल दिलगीर आहे.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शनिवार, 23/03/2013 - 09:40 | बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड (Score: 3 रोचक)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

मी हा चित्रपट पाहिला आहे. कत्रिना जेव्हा न्यू आॅर्लीन्सवर येऊन थडकलं होतं तेव्हाची दूरचित्रवाणीवरची दृश्यं अजूनही डोक्यात घर करून आहेत. निसर्गाच्या अशा उद्रेकातून माणसाची होणारी ससेहोलपट भारतासारख्या गरीब देशाला नवीन नाही, पण अमेरिकेसारख्या एरवी सधन आणि प्रगत समजल्या जाणाऱ्या देशाचं तेव्हा झालेलं ते दर्शन अजब होतं, कारण ती एक वेगळीच ('द अदर' ह्या अर्थानं) अमेरिका होती. न्यू आॅर्लीन्सची फ्रेंच संस्कृती, तिथलं जाझ वगैरेंबद्दल ऐकीव माहितीतून डोक्यात निर्माण झालेलं काहीसं रोमॅन्टिक चित्र आणि दारिद्र्य-हलाखीचं हे वास्तव यांतलं अंतर भीषण होतं. पण या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असण्यासाठी माणसांमध्ये जे काहीतरी अन्योन्य असायला लागेल ते काय असेल, याची कल्पना 'बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड' पाहून येते. त्यातली माणसं आणि त्यांचं वर्तन पाहाता ते वास्तववादी चित्रण नाही, हे सहज लक्षात येतं. पण तरीही माणसातला एक रोमॅन्टिक आणि तरीही वास्तव असा जागृत निखारा त्यात तग धरताना दाखवला आहे. ते एकाच वेळी हृदयस्पर्शी आणि काव्यात्म होतं. मला त्यातली काव्यात्मता आणि त्यातलं दृश्यसौंदर्य कथनापलीकडचे वाटले नाहीत, तर त्याउलट कथनातल्या पात्रांच्या एरवी अविवेकी आणि अतार्किक वाटू शकेल अशा वर्तनाची एकमेव तर्कशुद्ध संगती लावणारे वाटले, आणि कदाचित म्हणूनच अधिकच भिडले. असे सिनेमे निर्माण होतात म्हणून अमेरिका ह्या देशाबद्दल थोडी आशा मनात बाळगता येते.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गुरुवार, 21/03/2013 - 14:10 | In Time नावाचा अ‍ॅन्ड्र्यू (Score: 3 रोचक)

नगरीनिरंजन

पुण्य: 2

In Time नावाचा अ‍ॅन्ड्र्यू निकोल नामक लेखक/दिग्दर्शकाचा जस्टिन टिंबर्लेक अभिनित विज्ञानकथापट पाहण्यात आला.
भविष्यात लोकांचं २५ नंतर शारीरिक वय वाढणे बंद होईल अशी सोय जेनेटिक इंजिनिअरिंग करून केलेली असते त्यामुळे सगळे लोक नेहमीच पंचविशीचे तरूण असतात. पण त्यात एक मेख असते की २५ वर्षे वय झाल्यावर माणूस एकच वर्ष जगणार. अर्थात त्यापुढे जास्तीचा वेळ 'कमावण्याची' सोय असतेच. त्यामुळे वेळ हाच अक्षरशः पैसा असतो. जगाचे टाईम झोन केलेले असतात. बक्कळ कमाई असलेले हजारो वर्षे जगू शकणारे जवळजवळ अमर लोक झोन १ मध्ये राहतात, तर मिळेल ते काम करून रोजंदारीवर जगणारे बाराव्या झोनमध्ये राहतात. बाराव्या झोनमध्ये राहणार्‍या काही तासांवर गुजराण करणार्‍या नायकावर १०६ वर्षांची संपत्ती असलेल्या माणसाच्या खुनाचा आळ येतो. पुढे काय होते ते चित्रपटात पाहणेच योग्य.
अभिनय, छायाचित्रण वगैरे फार काही विशेष नसले तरी मला कथेमुळे चित्रपट आवडला. चलन म्हणून काळाची देवाणघेवाण पाहून नकळत काळ आणि पैसा याची तुलना होते. भ्रष्टाचार, गरीब लोकांचे शोषण आणि भाववाढ वगैरे प्रकार फारच परिणामकारक ठरतात. आपण वेळ घालवून पैसा कमावतो हे कुठेतरी डाचायला लागतं.
उदा. नायकाची आई काम संपवून नायकाला भेटायला निघते. तिचा वाढदिवस ते साजरा करणार असतात. नेहमीची तिची बस येते. बसमध्ये चढल्यावर ड्रायव्हर म्हणतो की तिकीटाचे भाव वाढले आहेत. तिच्याकडे द्यायला तेवढा वेळ नसतो (सकाळीच नायकाला तिने उधार दिलेला असतो). ती म्हणते, "I've got just one hour and its a two hour walk"
"You better run then", ड्रायव्हर थंडपणे म्हणतो.

Hope is NOT a plan!

गुरुवार, 21/03/2013 - 14:12 | रोचक दिसतोय पिच्चर (Score: 2)

बॅटमॅन

पुण्य: 1

रोचक दिसतोय पिच्चर एकदम!!!

आता हा पाहणे आले. धन्यवाद (स्माईल)

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

गुरुवार, 21/03/2013 - 15:41 | +१ (Score: 2)

ऋषिकेश

पुण्य: 2

+१

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!
--
मी माझे थ्रेशोल्ड सेटिंग्ज बदलून फक्त +१:२५ या स्कोरचे प्रतिसाद उघडे दिसतील (बाकीचे झाकलेले) असे केले आहे. तेव्हा काही वेळा त्याहून कमी स्कोरचा प्रतिसाद न वाचला गेल्याने त्यावर माझा प्रतिसाद न आल्यास आगाउ क्षमस्व!

सोमवार, 18/03/2013 - 11:30 | Jeanne Dielman (Score: 2 रोचक)

दिपक

पुण्य: 1

Jeanne Dielman, 23 Quai du Commerce, 1080 Bruxelles (1975)

३ तास १५ मिनिटाचा चित्रपट. कहाणी एका विधवेची तीच्या तीन दिवसांची. पुर्ण चित्रपटभर ती तीचे दैनंदीन घरकाम करताना दाखवली आहे. सोबत आहे तीचा टीनएज मुलगा. पहिल्या दिवसानंतर दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवसात तिच्यात येणारा बदल आणि शेवट तर भन्नाट आहे. हा चित्रपट बनला तेव्हा त्या डायरेक्टर चे वय २५ होते.

रविवार, 17/03/2013 - 15:04 | लिंकन (Score: 2)

ऋता

पुण्य: 2

कालच लिंकन पाहिला...आधी थोडं त्याबद्द्ल (त्या काळाबद्द्ल) वाचून गेले होते त्यामुळे फायदा झाला. डे लुईसचा अभिनय सुंदर...त्यासाठीच मुख्यत्त्वे हा चित्रपट पाहिला. संवाद विशेष आवडले; परत घरी सीडी/डीव्हीडी वर इंग्लिश सबटायटल्स सकट पहायचा आहे.
मोठ्या पडद्यावर जरूर पहावा हा चित्रपट एकदा तरी.

रविवार, 17/03/2013 - 19:51 | "लिंकन" (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

अलिकडच्या एका लांबच्या विमानप्रवासात "लिंकन" उपलब्ध होता. पण दुर्दैवाने, सबटायटल्सशिवाय. त्यामुळे तो तेव्हा पाहिला नाही. आधीच फ्लाईटमधली ती दिव्य साऊंड सिस्टीम आणि ते छोटेसे इयरफोन्स. आणि त्यात आमची दिव्य श्रवणशक्ती - आणि माझा अंदाज आहे की सिव्हिल वॉरच्या वेळचे अ‍ॅक्सेंट पण "स्पेशल" असणार.

तस्मात् "लिंकन"ची डीव्हीडी जेव्हा केव्हा येईल तिथवर थांबणें.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रविवार, 17/03/2013 - 06:42 | "माय लेफ्ट फूट" (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

मला आठवतंय, १९८९ साली दूरदर्शनवर "द वर्ल्ड धिस वीक" नावाचा कार्यक्रम सादर व्हायचा, प्रणॉय रॉयचा. (बहुदा दर शुक्रवार रात्री.) १९९० च्या ऑस्करमधे सर्वोत्कृष्ट नटाचं पारितोषिक डॅनियल डे लुईसला "माय लेफ्ट फूट" करता मिळाल्याची बातमी तेव्हा पाहिलेली आठवते आहे. हा सिनेमा आज पहाण्याचा योग आला.

सेरेब्रल पाल्सी या मेंदूच्या विकाराने ग्रस्त असलेल्या क्रिस्टी ब्राऊन नावाच्या आयरीश पेंटर/लेखकाची कहाणी. "अमुक अभिनेता अमुक भूमिका जगलेला आहे" अशा प्रकारची वाक्यं आपण पुष्कळ वाचतो. त्याचा प्रत्यय इतक्या प्रकर्षाने हा असा सिनेमा पहाताना येतो खरा.

मी नंतर कधीतरी या चित्रपटनिर्मितीच्या वेळच्या काही कथा (काही वर्षांपूर्वी) कुठेतरी वाचल्या होत्या. सेटवरील जवळजवळ प्रत्येकजण डे लुईसच्या बाबत प्रचंड वैतागलेला होता. याचं कारण म्हणजे (म्हणे) हा माणूस सबंध चित्रिकरणादरम्यान त्या व्यक्तिरेखेसारखाच वागत होता ! डावा पाय वगळतां , संपूर्णपणे विकलांग शरीराने आठवडेच्या आठवडे तो कसा काय वावरला असेल याची मी कल्पनाच करू शकत नाही.

असो. ही भूमिका अविस्मरणीय आहे यात शंका नाही.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रविवार, 17/03/2013 - 08:55 | अवांतर: लेफ्ट फुट आणि ऑस्कर (Score: 2)

टाटाबायबाय

पुण्य: 2

अवांतर: लेफ्ट फुट आणि ऑस्कर वरुन आठवले, गेल्या वर्षी धुमाकुळ घालणारा 'जोली तैँ चा राइट लेग' कुठे दिसला नाही यावर्षी...
बादवे 'हंगर(?) गेम्स' मधल्या 'गोबर्या गालांच्या गुटगुटीत बाळ' जेनिफर लॉरेन्सला सिल्वर लाइनिँग प्लेबुक साठी यावर्षीचे सगळे पुरस्कार मिळाले... मला खरं तर ती ऑस्कर नॉमिनेशन मिळालेली ९ वर्षाँची छोकरी फार आवडलेली...

Pray continue...

रविवार, 17/03/2013 - 19:48 | प्रतिसाद (Score: 4 विनोदी)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

>>> 'जोली तैँ चा राइट लेग' कुठे दिसला नाही यावर्षी.. <<<<

(घसा खाकरून) मी पण तेच म्हणत होतो... असो. मराठीत "एखादी तरी स्मितरेषा" नावाचं काहीतरी पुस्तक आहे त्या धर्तीवर "एखादा तरी पाय...." असो असो.

>>>मला खरं तर ती ऑस्कर नॉमिनेशन मिळालेली ९ वर्षाँची छोकरी फार आवडलेली... <<<

"बीस्ट्स ऑफ द सदर्न वाईल्ड" लवकरच पाहण्यात येईल. - आय मीन पाहण्यात आल्या जाईल. त्याबद्दलचा फीडब्याक देण्यात आल्या जाईलच (स्माईल)

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रविवार, 17/03/2013 - 07:48 | अगदी ! (Score: 2)

अमुक

पुण्य: 2

'लिङ्कन'च्या भूमिकेसाठीही तो चित्रीकरण चालू असेपर्यन्त असाच वावरला, असे ऐकून आहे.

(अवान्तर : What's Eating Gilbert Grape [1993] या चित्रपटात मतिमन्द 'आर्नी'ची व्यक्तिरेखा अवश्य पाहा. लिओनार्दो-दि-काप्रिओ त्यावेळी कुणास माहीतही नव्हता.)

रविवार, 17/03/2013 - 19:45 | "गिल्बर्ट ग्रेप" (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

.'द लाइफ अँड डेथ ऑफ पीटर सेलर्स' आणि "गिल्बर्ट ग्रेप" यादीत टाकतो आहे. थँक्स.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

रविवार, 17/03/2013 - 15:23 | भूमिका जगणारा- पीटर सेलर्स (Score: 2)

ऋता

पुण्य: 2

'भूमिका जगण्या'बद्द्ल असच पीटर सेलर्स या अभिनेत्याबद्द्ल म्हटलं जात असे.'द लाइफ अँड डेथ ऑफ पीटर सेलर्स' ह्या सिनेमात पीटर सेलर्सची आई त्याला सेटवर भेटायला येते आणि तिला भेटतं ते फक्त त्याचं पात्र (तिचा मुलगा नव्हे) असा सीन आहे...जरूर पहावा.

अवान्तरात आलेला सिनेमा जॉनी डेप मुळे पहायला घेतला होता आणि लिओनार्डो लक्षात राहिला.

रविवार, 17/03/2013 - 03:08 | Les Enfants Terribles (Score: 3 रोचक)

३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्य: 2

Les Enfants Terribles (लेझान्फाँ तेरिब्ल?) नावाचा कृष्णधवल फ्रेंच चित्रपट पाहिला. जाँ कॉक्तू याच्या कादंबरीवर आधारित चित्रपट कॉक्तूचा म्हणायचा का जाँ पिअर मेल्व्हिलचा म्हणायचा हा वादही म्हणे त्या काळात रंगला होता. चित्रपटाची कथा इथे आहे.

प्रचंड आक्रमक स्वभावाची बहिण एलिझाबेथ आणि तिच्यासमोर स्वतःला प्रस्थापित करण्याचे क्षीण प्रयत्न करणारा भाऊ पॉल ही यातली 'भयंकर मुलं'. त्या दोघांचे आपसांतले शारीरिक संबंध incest (मराठी?) म्हणता येण्यासारखे नाहीत, पण मानसिक संबंध तसेच. एलिझाबेथ मृत्युदूत म्हणावी अशी आक्रमक. आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे त्यांचे खेळ असा हा चित्रपट आहे. चित्रपट एकीकडे सस्पेन्स थ्रिलर वाटतो, दुसर्‍या बाजूने मानवी नातेसंबंधांमधला असणारी रस्सीखेच, चढाओढ असं काहीतरी. १९२९ च्या आसपास कादंबरी प्रसिद्ध झाली तेव्हा फ्रान्समधे काय लक्षवेधी घटना सुरू होत्या ते माहित नसल्यामुळे चित्रपट नक्की कशाबद्दल आहे हे मात्र समजलं नाही. पण तरीही चित्रपटाला फार गती आहे त्यामुळे "पुढे काय?" ही उत्कंठा टिकून राहिली.

"आकर्षक" नावामुळे आणलेला दुसरा चित्रपट A French gigolo (मूळ शीर्षक Cliente) फारसा आवडला नाही. टाकाऊही नाही. पात्रिक उर्फ मार्कोला त्याच्या बायकोच्या व्यवसायासाठी पैसे हवे आहेत म्हणून तो नाखुशीनेच जिगोलोचं काम करतो. त्याची घटस्फोटित क्लायंट जुडीथ त्याच्या प्रेमात पडते. त्याच्या बायकोला आधी हे माहित नसतं, पण समजल्यानंतर प्रेम, लग्न का पैसे असा तिचा तिढा यासंदर्भात हा चित्रपट आहे.

रविवार, 17/03/2013 - 12:33 | A French gigolo वरुन काही (Score: 1)

विषारी वडापाव

पुण्य: 2

A French gigolo वरुन काही अंशी ढापलेला चित्रपट म्हणजे देसी बॉइस. अक्षय आणि जॉन अब्राहम लीड मध्ये असणारा हा चित्रपट डेविड धवन यांचे सुपुत्र रोहित धवन यानी केला आहे. या चित्रपटमधला जॉन अब्राहम चा ट्रॅक याच स्टोरीलाइन वरुन घेतला आहे. फक़त यात मुख्य पात्र गिगोलो नसून स्त्रियांसाठी कपडे काढून नाचणारे (Male Stripper) दाखवले आहे. भारतीय मेनस्ट्रीम पब्लिक ला गिगोलो पचणार नाही असे वाटले असेल. बाकी चित्रपट डेविड धवन च्या चित्रपतांप्रमाणेच आचराट आणि बटबटीत.

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

रविवार, 17/03/2013 - 09:28 | जुदाई (Score: 4 विनोदी)

मन

पुण्य: 2

पण समजल्यानंतर प्रेम, लग्न का पैसे असा तिचा तिढा यासंदर्भात हा चित्रपट आहे.
सदर चित्रपट अनिल कपूर, श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर ह्यांच्या "जुदाई" ह्या अभिजात भारतीय पटांतून उचललेला दिसतोय. अर्थातच वरिजनलची सर ह्या भ्रष्ट नकलेस येणार नाही.त्यातही श्रीदेवीचं मानसिक द्वंद्व आणि असच चित्रित केलय. संयत हाताळणी, चित्रपटाचा सौम्य बाज, त्याला अल्लाद असलेली सूचक पार्श्वसंगीताची डूब आणि एकूण सामाजिक स्थितीचं भान असलेल्या परेश रावलचे मार्मिक प्रश्न चित्रपटाला वेगळीच उंची देउन जातात. जॉनी लिव्हर नेहमीप्रमाणेच भूमिका अक्षरशः जगलाय. आक्रमक विनोद वात्याला येउनही कुथेही आक्रस्ताळेपण नहई; मद्रासीपण नाही.
वैश्विक संयत हाताळणीसाठी प्रसिद्ध अशा सर्वोत्तम चित्रपटात मी त्याचे(म्हंजे पिच्चरचे; जॉनीचे नव्हे) नाव घेइन.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

रविवार, 17/03/2013 - 09:43 | अशी तुलना (किंवा उचलेगिरी) (Score: 2)

३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्य: 2

अशी तुलना (किंवा उचलेगिरी) होईल अशी कल्पनाच नाही केली. अनिल कपूर पैशांसाठी देहविक्री करतो आणि कोणा रस्त्याकडेच्या गिगोलोला त्याच्याबद्दल असूया वाटते हे माझ्या कल्पनेपलिकडचं आहे. कोणाला किती पैसे पुरेसे वाटतात हे सांगणं किंवा आपसांत तुलना करणं कठीण आहे. पण पन्नाशीच्या जुडीथचं तिशीच्या मार्कोच्या प्रेमात पडणं आणि अनिल कपूरपेक्षा दहा-पंधरा वर्ष तरूण दिसणार्‍या उर्मिलाचं त्याच्या प्रेमात वेडं होणं याची तुलना करणं कठीण वाटतं.

'जुदाई' फारच तुपकट आणि गोग्गोड आहे या फ्रेंच चित्रपटाच्या तुलनेत. त्यातल्यात्यात "मुझे प्यार हुआ अल्लामियां" गाण्यात आणि संबंधित गोंधळातच काय ती गंमत होती!

शनिवार, 16/03/2013 - 18:59 | काही दिवसांपुर्वी 'द कुक, द (Score: 3 रोचक)

टाटाबायबाय

पुण्य: 2

काही दिवसांपुर्वी 'द कुक, द थिफ, हिज वाईफ अँड हर लवर' नावाचा अनरेटेड चित्रपट पाहीला. या चित्रपटात खूप नग्नता आणि हिँसाचार आहे. त्यामुळे X किँवा अनरेटेड असं रिलीज करण्यास परवानगी दिली. निर्मात्यांनी अनरेटेड निवडलं.
'डंबलडोअर' थिफ आणि 'क्विन' त्याची बायको झालीय. अशा तगड्या अभिनेत्यांनी हा X रेटेड चित्रपट केला, म्हणजे नक्कीच काहीतरी रोचक असेल, नाही का?
मला या चित्रपटाची सिनेमटोग्राफी आणि बेकग्राउंड स्कोअर खूप हाँटिँग वाटला.
चित्रपट युट्युब वर आहे. वॉच इट अॅट युअर ओन रिस्क (स्माईल)

Pray continue...

शनिवार, 16/03/2013 - 19:19 | पीटर ग्रीनवे (Score: 4 माहितीपूर्ण)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

'द कुक, द थीफ...' हा पीटर ग्रीनवेनं दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. जागतिक सिनेमाचा इतिहास लिहायचा झाला तर त्यात ह्याचा समावेश करणं माझ्या मते क्रमप्राप्त ठरेल. युरोपियन कलेचा खूप वेगळ्या पद्धतीनं वापर करून एक परिणामकारक दृश्यसौंदर्यशास्त्र त्यात घडवलं आहे. ८०च्या दशकातल्या थॅचर सरकारच्या सत्तेतल्या ब्रिटनमधल्या भांडवलवादी आणि चंगळवादी संस्कृतीवर त्यात बोचरी टीका आहे. मोठ्या पडद्यावरच पाहावा अशी शिफारस करेन, कारण एखादा भव्य ऑपेरा पाहिल्याचा अनुभव यावा इतकी दृकश्राव्य ताकद त्यात आहे.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रविवार, 17/03/2013 - 08:38 | "८०च्या दशकातल्या थॅचर (Score: 2)

टाटाबायबाय

पुण्य: 2

"८०च्या दशकातल्या थॅचर सरकारच्या सत्तेतल्या ब्रिटनमधल्या भांडवलवादी आणि चंगळवादी संस्कृतीवर त्यात बोचरी टीका आहे." >>
ही माहीती माझ्यासाठी पुर्णपणे नवीन आहे. धन्यवाद.
चित्रपट पाहील्यानंतर जे फार थोड वाचन केलं, त्यातुन सिम्बॉलिझम बद्दल कळलेलं. रेस्टॉरंटचे निरनिराळे भाग निळा, हिरवा, लाल आणि पांढरा रंगात दाखवण्यामागचा उद्देश इ.
या चित्रपटावर लेख लिहावा ही विनंती. खरं तर 'जागतिक सिनेमाचा इतिहास लिहायचा झाला तर त्यात ज्या चित्रपटांचा समावेश असेल' त्यावर एक लेखमालाच येउद्या (स्माईल)

प्रेक्षक जर विज्युअल इंपेक्ट साठी तयारीने बसला असेल तर चित्रपट मोठ्या पडद्यावर पहायला हरकत नाही. माझ्यासारख्या सर्वसामान्य, अनप्रिपेअर्ड व्यक्तीची, लहानशा पडद्यावर पाहील्यानंतरची प्रतिक्रिया 'वॉट द हेल डिड आय जस्ट सी' अशी होती...

Pray continue...

रविवार, 17/03/2013 - 00:03 | जंतूंच्या या परीक्षणामुळे हा (Score: 2)

बॅटमॅन

पुण्य: 1

जंतूंच्या या परीक्षणामुळे हा पिच्चरही पहावा असे वाटू लागलेय. सहीच!

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

शनिवार, 16/03/2013 - 09:04 | "बरन" (Score: 4 रोचक)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

"बरन" : इराणी दिग्दर्शक मजिद मजिदी यांचा २००१ चा सिनेमा.

दिग्दर्शकाबद्दल ऐकलं होतं पण पहायचा योग येत नव्हता. पण अलिकडे पाहिलेल्या अ सेपरेशन या इराणी चित्रपटानंतर औत्सुक्य नक्की वाढलं होतं.

"बरन" ने माझी बिलकुल निराशा केली नाही. चित्रपट अतिशय आवडला.

स्पॉईलर : सुरवात

१९७७ च्या रशियन आक्रमणानंतर अफगाणिस्तानातले लाखो लोक - त्यापैकी अनेक कुर्द वंशाचे लोक - शेजारच्या राष्ट्रांमधे बायकामुलांसकट पळून गेले. यापैकी काही इराणमधे आले. या लोकांच्या पुढच्या पिढ्या इराणमधेच वाढल्या.

असं असूनही या "निर्वासित" अफगाण लोकांना इराणसारख्या ठिकाणी दुय्यम स्वरूपाचं नागरिकत्वच मिळालं. त्यांना त्यांची वेगळी ओळखपत्रं दाखवणं आवश्यक बनलं. या बहुतांश लोकांची आर्थिक स्थिती निम्नस्तराचीच राहिली.

कथानक घडतं इराणमधल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी. एका अफगाण मजूराचा काम करताना पाय मोडतो. दुसरे दिवशी त्याच्या मुलीला - मुलाचा वेष परिधान करून - दुसरा एक बुजुर्ग कामाला आणतो. बांधकामाच्या ठिकाणी एक पोरगेलेसा इराणी मुलगा चहा-नाश्ता पुरवण्याचं काम करत असतो. त्याच्या स्वतःच्या काहीशा माथेफिरू स्वभावामुळे त्याची भांडणं होतात नि एके दिवशी त्याची चहा-नाश्ता बनवायची नोकरी जाते नि त्याला कष्टाची कामं करायला सुरवात करावी लागते. या प्रसंगी केवळ निमित्तमात्र ठरलेल्या या नव्या "पोराला" ती चहा-नाश्ता बनवण्याची नोकरी मिळते नि त्यामुळे इराणी मुलगा या नव्या पोरावर दांत ठेवून असतो.

एके दिवशी त्या इराणी पोराला कळतं की हा नवा अफगाण पोरगा म्हणजे पोरगीच आहे. तो या मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडतो. कामावर असताना तिच्या मागेमागे जाऊ पहातो. पण संवाद असा शक्य होत नाही.

या बांधकामात अफगाणी कामगारांचं काम करणं बेकायदेशीर असतं. एक दिवस अचानक बांधकाम विभागाचे अधिकारी इन्स्पेक्शनला येतात नि या नव्या अफगाण "पोरा"ला पकडू पहातात. इराणी मुलगा त्या अफगाण पोरीला सुटायला मदत करतो नि या भानगडीत त्याला अधिकार्‍यांमार्फत दंड सोसावा लागतो, मालकाची कानउघाडणी ऐकावी लागते.

सर्वच अफगाण मजूरांच्या नोकरीवर गंडांतर येते. पर्यायाने "ती" अफगाण मुलगीही निघून जातेच. इकडे हा इराणी पोरगा तिच्याकरता व्याकूळ होतो. सुटी काढून तिचा पत्ता शोधत येतो. तिला कळू न देता तिच्या हालअपेष्टा दूरून पहातो. आणखी कष्टी होतो. गुप्तपणे तिच्या कुटुंबाला मदत करू पाहतो. त्यापाई आपली जन्माची कमाई गमावतो, इतकंच नव्हे तर आपला कामाचा परवानाही जामीन ठेवतो. या सार्‍या देवाणघेवाणीत त्या मुलीशी एकही शब्द बोलणं काही त्याला जमत नाही. शेवटी शेवटी त्या मुलीला "हा आपली मदत करतो आहे" इतपत कळतं इतकंच.

शेवटी त्याच्या मदतीनंतर त्या अफगाण मुलीचं कुटुंब मायदेशी जायला निघतं. त्यावेळी मूकपणे एकमेकांबद्दलच्या कोमल भावना एकमेकांपर्यंत काही क्षणांपुरत्या व्यक्त केल्या न केल्याशा होतात. पावसात उमटलेल्या तिच्या पावलाकडे तो पाहताना चित्रपट संपतो.

स्पॉईलर : अखेर

अनेकानेक बाबींमुळे चित्रपट आवडला. यातल्या काही बाबी "अ सेपरेशन" या सिनेमाशी मिळत्याजुळत्या वाटल्या.

कथानकाची, प्रसंगाची हाताळणी कुठेही मेलोड्रमाटीक नाही. सर्व पात्रे अत्यंत नैसर्गिक अभिनय करतात. "नायकाच्या मनात नायिकेबद्दल वाजलेली सतार ...." इत्यादि घोळ नाहीत. पार्श्वसंगीताचा जवळजवळ अभावच. त्यामुळे नाचगाणी वगैरे सोडूनच द्या.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचं चित्रण करतानाही त्यातली दृश्यात्मक श्रीमंती - किंवा प्रगल्भता - जाणवते. दृश्यात्मक श्रीमंती म्हणजे एकतर स्पेशल इफेक्ट्स्चा भडीमार किंवा स्वित्झर्लंड वगैरे वगैरे रमणीय दृष्ये या ठाशीव संकल्पनांना छेद देणारी ही प्रगल्भता आहे.

इराणच्या या प्रदेशातल्या बदलत्या ऋतुमानाचा - विशेष करून थंडीचा, प्रसंगी होणार्‍या हिमसेकाचा वापर मला आवडला. त्यात "दाखवेगिरी" , खोटेपणा कणाचा वाटला नाही.

इराण-अफगाणिस्तानातल्या राजकीय सामाजिक परिस्थितीचं, या परिस्थितीचा सर्वात वाईट फटका ज्या वर्गाला दशकानुदशकं बसतो आहे त्या परिस्थितीचं चित्रण कुठेही बटबटीतपणे , प्रचारकी पद्धतीने झालेलं नाही. उदाहरणार्थ त्या मुलीने मुलगा म्हणून - आणि तेही अफगाण व्यक्तीने असं वावरावं - यातला प्रचंड मोठा धोका हा अध्याहृत धरलेल्या राजकीय-धार्मिक-सामाजिक वास्तवाचा परिपाक आहे. हा धोका प्रस्तुत चित्रपटाचा जणू केंद्रबिंदू. पण त्याची वाच्यताही कुणी करत नाहीत. सर्वजण अपरिहार्यपणे घडत्या नाट्यामधे सामील होतात - किंवा त्याचे साक्षीदार असतात.

एकूण "बरन" म्हणजे माझ्यालेखी चित्रपट पहाण्याचा एक श्रीमत् अनुभव.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मंगळवार, 02/04/2013 - 18:46 | आताच पाहीला बरन युट्युबवर. डब (Score: 2)

टाटाबायबाय

पुण्य: 2

आताच पाहीला बरन युट्युबवर. डब किँवा सबटायटल्स नव्हते पण संवाद कमीच असल्याने फार फरक पडला नाही.
तुम्ही ' "नायकाच्या मनात नायिकेबद्दल वाजलेली सतार ...." इत्यादि घोळ नाहीत.' असं लिहीलय, पण नायक नायिकेला केस विँचरताना पाहील्यावर बरंच टिँगटिँगटिँग संगीत आहे Sad
आणि मला ते अफगाण कामगार गरीबपण वाटले नाही (कदाचीत अंगभर कपडे असल्याने). आपल्याकडचे सलाम बॉम्बे मधले गरीब लगेच दरीद्री भिकारी दिसून येतात. दो बिघा जमीनमधे पण गरीब शेतकरी लगेच जाणवतो. या बरनमधले गरीब, गाल आत गेलेले वगैरे दिसतात पण कपडे बरेच असतात त्यांच्याकडे.
एकंदर प्रेमकथा असल्याने चित्रपट आवडला नाहीच. शेवट मात्र तरल आहे. बहुतेक ही इराणी काव्यात्म शैली माझ्यासारख्यांसाठी नसावी.

Pray continue...

मंगळवार, 02/04/2013 - 18:50 | तपशीलाचा किंचित घोळ? (Score: 2)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

>>आणि मला ते अफगाण कामगार गरीबपण वाटले नाही (कदाचीत अंगभर कपडे असल्याने). आपल्याकडचे सलाम बॉम्बे मधले गरीब लगेच दरीद्री भिकारी दिसून येतात. दो बिघा जमीनमधे पण गरीब शेतकरी लगेच जाणवतो. या बरनमधले गरीब, गाल आत गेलेले वगैरे दिसतात पण कपडे बरेच असतात त्यांच्याकडे.<<

थंड हवेच्या ठिकाणी हे बऱ्यापैकी नाॅर्मल आहे. काश्मीरमधले लोकदेखील गरीब असले तरी जिवंत राहण्यासाठी अंगभर कपडे घालतात.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मंगळवार, 02/04/2013 - 19:05 | हम्म. डोळ्यांना 'असे' गरीब (Score: 2)

टाटाबायबाय

पुण्य: 2

हम्म. डोळ्यांना 'असे' गरीब पहायची सवय नसल्याने मला ते एक्सेप्ट करता आले नसावे.
आणि प्रेमकथा असल्याने अजुनच नावडता विषय Sad
माजिदीचा दुसरा कोणतातरी चित्रपट पाहुन ठरवेन इराणी/माजिदच्या चित्रपट मला झेपतात की नाही.

Pray continue...

मंगळवार, 02/04/2013 - 21:44 | माजिदी म्हणजे इराणी चित्रपट (Score: 2)

३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्य: 2

माजिदी म्हणजे इराणी चित्रपट असं समजू नकोस. जाफर पनाही आणि असगर फरहादीचे दोनच चित्रपट बघूनही ते माजिदीपेक्षा खूप वेगळे आणि प्रगल्भ आहेत हे लक्षात आलं. असगर फरहादीच्या 'अ सेपरेशन'बद्दल जंतूने आधीच लिहीलेलं आहे. त्यातल्या लेयला हतामीने तिच्या पंचविशीत काम केलेला 'Leila' नावाचा चित्रपट मिळाला होता. रोम्यांटीकपणा पक्का नावडीचा असेल तर इराणी चित्रपटाचं सांपल म्हणून तो बघायला हरकत नाही.

मंगळवार, 02/04/2013 - 23:11 | लीला/लैला (Score: 2)

अमुक

पुण्य: 2

.....'Leila' नावाचा चित्रपट मिळाला होता. रोम्यांटीकपणा पक्का नावडीचा असेल तर इराणी चित्रपटाचं सांपल म्हणून तो बघायला हरकत नाही.
..............म्हणणे कळले नाही. थोडे अधिक स्पष्ट करू शकाल ? चित्रपट पाहिला आहे.

बुधवार, 03/04/2013 - 01:34 | रोमँटिकपणा म्हणून सगळं, निदान (Score: 2)

३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्य: 2

रोमँटिकपणा म्हणून सगळं, निदान शेवट गोड होतो, असं या चित्रपटात काही नाही. उलट एकमेकांवर प्रेम करणार्‍या लेयला आणि तिच्या नवर्‍याने एकमेकांसाठी, दुसर्‍यावरच्या प्रेमाखातर केलेल्या तडजोडींमधून शेवटी दोघेही दु:खातच रहातात. मला हा चित्रपट फारच उदास वाटला.

रविवार, 17/03/2013 - 00:02 | परीक्षण आवडले!!!! अवश्य बघेन (Score: 2)

बॅटमॅन

पुण्य: 1

परीक्षण आवडले!!!! अवश्य बघेन मिळाला की.

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

शनिवार, 16/03/2013 - 09:35 | प्रश्न (Score: 2)

मुक्तसुनीत

पुण्य: 2

मी जे दोन इराणी सिनेमे पाहिले त्यात वास्तववादी चित्रण असलं तरी (विशेषतः "बरन"मधे) अतिशय काव्यात्म अनुभव मला आला. एखाद्या व्यक्तीबद्दलच्या नाजूक भावना, तिच्यापर्यंत पोचायची धडपड , त्या प्रवासामधली अपरिहार्यता, ऋतुचक्राच्या अबोल चित्रणाचा सहजसुंदर उपयोग..... हे आपल्याकडे इतकं अभावानेच का जाणवावं असा प्रश्न मला राहून राहून पडतो खरा.

मजिदी इत्यादि प्रभृती जे सादर करतात त्यामधे जे असतं तो "मिनिमालिझम"चाच एक नमुना, असं म्हणता येईल का ? इथल्या जाणकारांकरवी मला जाणून घ्यायला आवडेल.

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शनिवार, 16/03/2013 - 10:06 | इराणी काव्यात्म शैली (Score: 3 रोचक)

चिंतातुर जंतू

पुण्य: 2

>>मी जे दोन इराणी सिनेमे पाहिले त्यात वास्तववादी चित्रण असलं तरी (विशेषतः "बरन"मधे) अतिशय काव्यात्म अनुभव मला आला. एखाद्या व्यक्तीबद्दलच्या नाजूक भावना, तिच्यापर्यंत पोचायची धडपड , त्या प्रवासामधली अपरिहार्यता, ऋतुचक्राच्या अबोल चित्रणाचा सहजसुंदर उपयोग..... हे आपल्याकडे इतकं अभावानेच का जाणवावं असा प्रश्न मला राहून राहून पडतो खरा.

मजिदी इत्यादि प्रभृती जे सादर करतात त्यामधे जे असतं तो "मिनिमालिझम"चाच एक नमुना, असं म्हणता येईल का ?<<

माजिदीच्या आणि इतर बऱ्याचशा इराणी चित्रपटांची शैली 'निओ-रिअलिझम' म्हणता येते. याची काही वैशिष्ट्यं म्हणजे सामान्य माणसांच्या जगण्यातल्या साध्यासुध्या सुखदु:खांच्या गोष्टींना काव्यात्म करणं आणि त्यांद्वारे प्रेक्षकाच्या हृदयाला स्पर्श करणं. चकचकीत हिंदी किंवा अमेरिकन सिनेमापेक्षा अर्थात हा सिनेमा दिसायला वेगळा असतो. त्यातलं नाट्य किंवा तिढा हादेखील आपल्या सवयीच्या व्यावसायिक चित्रपटांतल्या मेलोड्रामापेक्षा छोट्या जिवाचा असतो. 'बायसिकल थिफ'सारखा सिनेमा हा याचा आद्य आदर्श. आपल्याकडे बिमल राय ('दो बिघा जमीन') किंवा सत्यजित राय (अपू त्रिधारा) ही याची परिचित रूपं म्हणता येतील.

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बुधवार, 13/03/2013 - 01:17 | आर्गो पाहिला. मस्त टाईट (Score: 2)

बॅटमॅन

पुण्य: 1

आर्गो पाहिला. मस्त टाईट पिच्चर आहे. पण टिपिकल हॉलीवुडी आहे. अशा पिच्चरांमधूनही बाहेर यावे असे वाट्टे अलीकडे.

देवावर विश्वास नसलेल्यांनी "देव भले करो" अशी प्रार्थना करणे म्हणजे स्त्रीवाद्यांनी मनुस्मृतीच्या पारायणाचा सप्ताह साजरा करण्यापैकी आहे.

मंगळवार, 12/03/2013 - 05:30 | शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला (Score: 3 माहितीपूर्ण)

सन्जोप राव

पुण्य: 2

वरातीमागून घोडे ही परंपरा पाळत परवा हे दोन अंकी नाटक पाहिले. नाटकातल्या ब्राह्मण, मराठा, शिवसेना यांच्या प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष विरोधाबद्दलच जास्त चर्चा झालेली आहे. नाटक काहीसे प्रचारकी ढंगाचे असले तरी आवडले. दलित आणि मुस्लिमांच्या व्यथा मांडायच्या तर त्यासाठी ब्राह्मणांना टार्गेट केलेच पाहिजे का वगैरे असे काही मूलभूत प्रश्न डोळ्यांआड करता आले ('संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारले ती बघता तिच्यामागे मनुवाद्यांचा हात दिसतो' वगैरे ताबडतोब बालीश तर्क वगैरे) तर नाटक मनोरंजन करते. फक्त मनोरंजनच. विचारांची घुसळण वगैरे करायला लावण्याच्या दृष्टीने बाकी हे नाटक उथळच वाटते. शिवाजी या माणसाचे आणि कल्पनेचे अपहरण करणार्‍या शिवसेनेवर थेट भाष्य आणि टीका करण्याचे धाडस नाटककर्त्यांनी दाखवले आहे हे विशेष. शिवसेनेने राडा करुन या नाटकाचे प्रयोग बंद पाडलेले नाहीत यावरुन ही टीका थोडीशी क्रिप्टीक आणि विचार करणार्‍यांनाच समजणारी अशी आहे, हे ध्यानात येते. शिवाजी या कल्पनेला आता दलित आणि मुस्लिम यांनी एकत्र येऊन मराठ्यांकडून-शिवसेनेकडून परत हिसकावून घ्यावे असला काही रामदास आठवले टाईप आक्रस्ताळा संदेश या नाटकातून जात असेल तर मग मात्र कठीण आहे.
प्रेक्षागृहात शंभर-दीडशे प्रेक्षक होते. चुकीच्या जागी, खांडेकरी दवणट वाक्यांना टाळ्या वगैरे प्रकार आता सवयीचे झालेले आहेत.

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

शनिवार, 16/03/2013 - 12:58 | हे फारच टिपिकल आहे हो. (Score: 2)

विसुनाना

पुण्य: 2

आजकाल पुरोगामी म्हणवायचं तर त्या अटींमध्ये शिवाजी 'क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक' नव्हता हे सिद्ध करायच्या मागे लागायचे हे एक कलम वाढवले आहे.
खरं म्हणजे, सात आंधळे हत्तीला शोधतात तसे आहे शिवाजीचे.