ही बातमी समजली का? - २

भाग |

रोज आपण अनेक बातम्या वाचत असतो. ऐकत असतो. त्यापैकी अनेक बातम्यांमध्ये आपल्याला फारसा रस नसतो, तर त्याउलट अनेक बातम्यांबद्द्ल आपण स्वतःला संलग्न करू शकतो किंवा काही बातम्या आपल्याशी निगडीत नसल्या तरी त्या विषयांट / घडामोडींत आपल्याला रस/रुची/उत्सूकता/आवड असते.

या दुसर्‍या प्रकारच्या बातम्यांबद्दल अनेकदा आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरंतर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असे तिथे स्पष्ट म्हटलेलेली आहे. पण, त्याबद्दल विस्ताराने लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारेच / यापैकी अनेक गोष्टिंमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बर्‍याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचेही जीवावर येते.

तेव्हा अश्या बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अश्या बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्य बातमीवर विस्ताराने चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या बातमी या धाग्यात रुपांतर केले जाईल.

पहिल्या भागाला मिळालेल्या उत्तर प्रतिसादानंतर वाचकांच्या सोयीसाट्।ई हा दुसरा भाग सुरू करत आहे.

चला तर, सांगा अश्या बातम्या ज्या वाचून तुम्हाला विचारावंस वाटेल "ही बातमी समजली का?"

field_vote: 
0
No votes yet

का हो मंडळी हे ऐकलंत का? : भारतीय देवाला विसरताहेत! Wink

हे मटावाले फारच विनोदी बोलतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कदाचित खरं असेल. देवाऐवजी "अनंतकोटी ब्रह्माण्ड नायक" किंवा "मनःसामर्थ्यदाता" यांच्यावरचा विश्वास वाढीस लागला असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नक्की विनोद आहे हा? बहुदा याच माहितीचा आधार घेत इतरत्र काही युक्तिवाद किंवा विधाने केली गेली असल्याने शंका आली. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारतीयांबद्दल माहीत नाही, पण इतर जगभरात देवाबद्दलची आस्था कमी झालेली आहे हे खरं आहे. ब्रिटनमध्ये गेल्या काही दशकांत चर्चला जाणारांची संख्या निम्मी झालेली आहे. त्याचबरोबर चर्चला जाणारांचं सरासरी वय वाढलेलं आहे. थोडक्यात चर्चमध्ये जाणारे लोक जवळपास तेच राहिलेले आहेत, नवीन पिढीतले लोक चर्चमध्ये फारसे जात नाहीत, किंवा फारच कमी प्रमाणात जातात.

इथे लिहिलेलं आहे

"In 1990, 20.4% of the population attended an Orthodox Christian church on any given weekend. In 2000, that percentage dropped to 18.7% and to 17.7% by 2004.""In 1990, 20.4% of the population attended an Orthodox Christian church on any given weekend. In 2000, that percentage dropped to 18.7% and to 17.7% by 2004."

जुनी व्यवस्था मोडून पडते आहे. एक गाव, त्यात बहुतांश अशिक्षित लोक, परस्परसंबंध, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, त्यांच्याशिवाय त्यांच्यापलिकडे इतरांशी नसलेला संबंध, एकत्र कुटुंबपद्धती .... हे सगळं बदलत आहे. त्यामुळे धर्मव्यवस्था ढिली होते आहे. भारतातही हे दिसलं तर नवल नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धर्म, कर्मकांडे, अंधश्रद्धा, देव-सुपरपॉवर ही कल्पना, माता, बाबा, देवी, नामस्मरणाचे महत्त्व, पाप-पुण्य, जनम जनम के फेरे असल्या सगळ्या गोष्टींतून भारतीय नव्हे तर अवघ्या जगातील जनतेला मुक्ती मिळावी आणि उपक्रमावर ज्यावर न कंटाळता चर्चा चालत असतात त्या विवेकवादाचा जगात प्रचार-प्रसार व्हावा म्हणून मी, यनावाला, नानावटी, प्रकाश घाटपांडे वगैरे आम्ही सगळे लोक नुकतेच दगडूशेठला नवस बोलून आलेलो आहोत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

"आई अंबाबाईच्या कृपेनं महाराष्ट्र सेक्युलर आहे..." या पुलंच्या, तुलनेनं कमी प्रसिद्ध असलेल्या खवचट उक्तीची आठवण झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सेक्युलर? मला वाटते येथे वेगळा शब्द आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सांगा की मग आठवून. नेमका पत्ता सांगू? यंदाच्या अक्षरच्या दिवाळी अंकात मिळेल. आत्ता अंक माझ्या हाताशी नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

बुद्धिप्रामाण्यवादी हा तो शब्द आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

उपक्रमावरच्या चर्चा वारल्या, आता फक्त शब्दांची हाडं उरलीयेत, वितंडवाद घालणारे विवेकवादी(!) झाले असणार, तुमचा दगडूशेठ नवसाला पावला म्हणायचा. पण जी नावे तुम्ही दिली ते लोक इतर काही कारणांसाठी श्रद्धाळू आहेत ह्याबद्दल आंतरजालावर कुजबुज होत असते, खरं/खोटं देव जाणे.

ऑन अ सिरिअस नोट - धार्मिकतेत घट होत असेल, पण श्रद्धावाद्यांमधे घट होत आहे की नाही हे तपासले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विनोद आहे का? यासाठी विचारलं की भारतीय देवाला विसरताहेत वगैरे फारच वरवरचं वाटलं.. देव या संकल्पनेचं स्वरूप बदललं असेल. ट्रॅडिशनल 'पावरबाज' विविध रुपी देव जाऊन बाबा, माता, बुवा, स्वामी, महाराज, माई, ताई वगैरेंचा सुळ्सुळाट धरला तर धमाल येईल.

दुसरं असं की सदर चाचणी ही धर्मावर आहे, धर्मावर विश्वास नाही पण "त्या अज्ञात शक्तीवर आहे" असे काहिबाही (अतर्क्य?) बोलणारे लोक आहेतच की जगात

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

संजाराम बाइंडर
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20291708.cms

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बातमी खरीच असावी असे वाटते. देव कोठेतरी स्वर्गात राहतात अशी बोलवा आहे आणि मेल्याशिवाय आपणांस ते दिसत नाहीत. ह्याविरुद्ध ह्या जिवंत जगातच गावगन्ना बाबा-बापू-माई-माताजी सहज उपलब्ध असल्याने लोक तिकडेच वळणार हे उघड आहे. ह्याखेरीज साईबाबा, गोंदवलेकर महाराज, 'गण गण गणात बोते' फेम गजानन महाराज इत्यादिकांच्या दुकानांमधून तो माल घाऊक प्रमाणात विक्रीस उपलब्ध आहे. आळंदी-पंढरपूर इत्यादि बाजारपेठाहि खुल्या आहेत तर मग देवादिकांची आवश्यकता काय?

On a more serious note, हिंदूंच्या देवांची संख्या ३३ कोटि आहे ही केवळ गैरसमजूत असून तो आता एक 'क्लीशे' झाल्यासारखा आहे. त्याला कोठेहि ग्रांथिक आधार नाही. मुळात वैदिक लिखाणात देवांच्या ३३ 'कोटि' (३३ प्रकार, गट) असे उल्लेख आहेत आणि ते देव म्हणजे ८ वसु, ११ रुद्र, १२ आदित्य आणि २ द्यावापृथिवी असे ३३ आहेत. त्यांची 'देव'ही 'कोटि'. ह्या कोटि शब्दाचा संख्यात्मक अर्थ घेतल्याने ३३ कोटि देव ही भोळसट कल्पना जनमानसात पक्की झाली आहे. हिंदुधर्माची आणि चालीरीतींची खिल्ली उडविण्यात स्वारस्य असलेल्या मिशनर्‍यांनी ह्या भोळसट कल्पनेचा पुरेपूर उपयोग केल्याचे दिसते

ह्याविषयीची साधार चर्चा ह्या धाग्यात पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>हिंदुधर्माची आणि चालीरीतींची खिल्ली उडविण्यात स्वारस्य असलेल्या मिशनर्‍यांनी ह्या भोळसट कल्पनेचा पुरेपूर उपयोग केल्याचे दिसते

मिशनर्‍यांनी केला असे वाटत नाही. सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांमध्ये गायीच्या पोटातल्या ३३ कोटी (कोटी=३३ * १०^७) देवांचे चित्र (जिवतीच्या चित्रासारखे?)असल्याचा उल्लेख येतो. त्या अर्थी श्रद्धाळू हिंदू खरेच ३३ कोटी देव असल्याचे मानत असावेत. मिशनर्‍यांनी थट्टा केली की नाही कल्पना नाही पण सावरकरांनी यथेच्छ थट्टा केली आहे.

या पीडीएफमधील पृष्ठ ५९ वरील तिसर्‍या चौथ्या परिच्छेदात हा उल्लेख आढळतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सहमत. पंढरपुरात लै वर्षांपूर्वी गेलो असताना तिकडे एक ३३ कोटी देवांचे लहानसे देऊळ बघितल्याचे आठवतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

३३ कोटी देवांचे लहानसे देऊळ - वदतोव्याघात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संपादकः width="" height="" चा वापर टाळावा ही विनंती

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक कोटीची एक नोट छापली (किंवा नाणं बनवलं) की काम झालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/--/articleshow/20306034.cms
अ‍ॅमवे च्या पदाधिकार्‍यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारत पायरसी मॅप बदलायच्या मागे आहे

हे जर शक्य झालं तर जगातील अरबी समुद्रातील ट्रॅफिक वाढून भारताच्या गंगाजळीत बरीच वाढ होईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अ‍ॅक्वाटिक एप थियरी मला बर्‍याच काळापासून माहित होती; पण सध्या ती नव्याने चर्चेत आलेली दिसते.
डीएनएतली बातमी.
सर डेव्हिड अ‍ॅटेनबरोंनी या प्रमेयाबद्दल अनुकुलता दाखवल्याने याच्या समर्थकांना जोर आला आहे. सध्याच्या सर्वमान्य थियरीनुसार काही वानरं झाडावरून उतरून गवताळ माळरानावर फिरू लागली आणि त्यातूनच दोन पायावर चालणारा माणूस तयार झाला.
अ‍ॅक्वाटिक एपवाले म्हणतात की माणसाला फर नसणे, सायनसची पोकळी मोठी असणे, इतर वानरांपेक्षा माणसाच्या त्वचेखाली जास्त चरबी असणे इत्यादी गोष्टी अ‍ॅक्वाटिक एप थियरीने जास्त चांगल्या प्रकारे सिद्ध होतात.
तज्ज्ञांनी मात्र तत्परतेने या थियरीचा पुन्हा एकदा विरोध केला आहे.
बातमी

Adding in an aquatic phase to the evolution of people is like adding yo-yo strings to gravity to explain the movement of the planets," said Dr Rae.

Pouring further cold water on the veteran documentary-maker's ideas, Joe Parker, an evolutionary scientist at Queen Mary University of London, asked: "If our transition to an aquatic or semi-aquatic environment was so successful, why aren't we still there?

"For the aquatic ape to work, you have to postulate not one, but in fact two unlikely shifts - into an aquatic niche and then back on to land again."

या अनुषंगाने बीबीसी वन वरच्या एका डॉक्युमेंटरीतला एक व्हिडिओ रोचक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्रिती स्पोर्ट्स नामक मार्केटिंग कंपनीची १५ टक्के मालकी धोनीकडे आहे आणि ही कंपनी धोनीसह रैना, जडेजा, वगैरे लोकांचेही मार्केटिंग करते. त्यामुळे आरपीसिंग सारख्या निष्प्रभ आणि सुमार गोलंदाजाला एकदोन वेळा संधी देण्यात आली होती असे वाचले. आरपी सिंगच्या मते तो या कंपनीशी संबंधित नाही. मात्र गूगल कॅश मधील या कंपनीच्या वेबसाईट व ट्विटर खात्याच्या पानांवर आरपीसिंगचे नाव दिसते. शिवाय धोनी चेन्नै सुपर किंग्जचा कप्तान व इंडिया सिमेंट कंपनीमध्ये उपाध्यक्ष पदावर आहे. काही वर्षापूर्वी सुमार कामगिरी केल्याबद्दल धोनीला काढून टाकण्याची शिफारस करणाऱ्या अमरनाथ वगैरे मंडळींवरच गदा आली होती आणि श्रीनिवासन यांनी नकाराधिकार वापरून धोनीचे स्थान वाचवले असेही वाचले. आयपीएल मध्ये बेंगलुरू वि. चेन्नै सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर १ धाव आवश्यक असताना या स्पोर्ट कंपनीच्या जडेजाला गोलंदाजी करताना आरपी सिंगने नो बॉल टाकला. शेवटच्या चेंडूवर १ धाव आवश्यक असताना नो बॉल टाकणारा दुसरा आंतरराष्ट्रीय खेळाडू चटकन आठवत नाही. या सर्व प्रकाराबाबत जितके समोर येत आहे तितकी किळस वाटत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सर्व प्रकाराबाबत जितके समोर येत आहे तितकी किळस वाटत आहे

+२१ किळस / राग वगैरे येत आहेच

फक्त ज्याप्रकारे व ज्या व्यक्तींनी हा IPL नावाचा प्रकार सुरू केला ते पाहता याकडून याहून वेगळी अपेक्षा नव्हतीच Sad फक्त यातील सामील व्यक्तींचे वजन बघता हे इतके उघड होते आहे हे खरंतर आश्चर्यकारक आहे.

अवांतरः या प्रसंगी धोनीचे तोंड गप्प का? हा प्रश्न मिडीयाने लाऊन धरला होता तो तितकासा आततायी नव्हता तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फक्त यातील सामील व्यक्तींचे वजन बघता

यांचे वजन असतेच.. पण विरोधी, शत्रू पारड्यातही जास्तीचे वजन आले की हे असे उचलले जातात. तेव्हा बेईमानी नेहमी डेंजरसच.. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१५ वर्षाच्या लहान उद्योजकेची ही बातमी वाचून खूप कौतुक वाटलं. याहू वर बर्‍याच जणांनी वाचली असेलच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय, वाचली ही बातमी.
ती वाचून जी प्रतिक्रिया झाली, तीच काल राज्य शासनाचे पुरस्कार पाहतानाही झाली. अजित पवार याच्या हस्ते हे पुरस्कार (पक्षी: खैरात) वाटले जात होते. सुसंस्कृत महाराष्ट्रातले तथाकथित सामाजिक जबाबदारी मानणारे कलावंत (नाना पाटेकर, रीमा) गोग्गोड हसून तो स्वीकारत होते, धन्य होत होते. काही वर्षांपूर्वी 'मनोहर जोशींच्या हस्ते श्रीपुंनी पुरस्कार स्वीकारावा की न स्वीकारावा' असे वादंग तरी झडले. आता तेही नाही.
इथे या कार्यक्रमात नानाने फक्त 'तेवढे शब्द जरा जपून वापरा' (बघा जमलं तर... नैतर, र्‍हाऊ द्या, तसं आमचं फार कै मागणं नाही...) अशी लाचार मल्लीनाथी केली.
देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

"लाचार मल्लीनाथी"

आवडल्या गेली आहे. याचा अंत कशात होणारे ते एक जाणता राजाच जाणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मनोहर जोशींच्या हस्ते श्रीपुंनी पुरस्कार स्वीकारावा की न स्वीकारावा' असे वादंग
............मला आठवते त्याप्रमाणे तेंडुलकरांनी हिरिरीने मत मांडले होते की श्री.पुंनी तो स्वीकारू नये. पण त्यामागचे कारण आठवत नाही. तेंडुलकरांचा मनोहर जोशींकडून स्वीकारण्यावर आक्षेप होता की राज्य सरकारकडून, की दोघांवर ? तसेच श्रीपुंनी तो स्वीकारण्याचे काय समर्थन दिले तेही आठवत नाही. तुम्हांला आठवते ?
(अर्थात, ती व्यक्ती श्रीपुंसारखी होती म्हणून तेंडुलकर बोलले. इतर कुणी असते तर कदाचित इतक्या कळकळीने ते जाहीर बोलले असते का असा प्रश्न पडतो.. त्यामुळे आक्षेप असण्यात श्रीपुंनी सरकार(/जोशींकडून) पुरस्कार स्वीकारणे असणे, हाही घटक कदाचित असू शकतो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'मनोहर जोशींच्या हस्ते श्रीपुंनी पुरस्कार स्वीकारावा की न स्वीकारावा' असे वादंग तरी झडले.
आणि (आम्ही जुनेच नव्हे तर प्राचीन असल्याने) त्याही आधी तेंडुलकरांनी अंतुलेंच्या हस्ते!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

बघतोस काय? मुजरा कर! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या धागाचे शीर्षक वाचून मी दर वेळेला प्रचंड संभ्रमित होतो. माझ्या मनात याचे आपोआप भाषांतर असे होते:
Did you understand it?

याला कारणीभूत मराठीतीली "समजणे" हे क्रियापद आहे याची मला कल्पना आहे (ओव्हरलोडेड अर्थ).
मग बरेच वेळेला मी बातम्या शेअर करत नाही कारण की मला वाटते की त्यात न समजण्या सारख काहीच नाही. परंतू या धाग्याचे स्वरूप बघ्ता, याचे टायटलः
ही बातमी ऐकली का?

असे हवे होते. ते काय म्हणतात निट पिक का काहीतरी, तसेच. बाकी चालू द्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही बातमी कळाली का? असे शीर्षकही चालून जावे असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'काखेत कळसा अन गावाला वळसा' असे शीर्षक मी सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

समर्पक आहे एकदम!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओबामांच्या फोटोचे प्रवेशपत्र
विनोद आणि हास्य दुर्मिळ झालेले असताना अशी एखादी बातमी दिवस फुलवून टाकते. कशाला क्रांतीबिंतीच्या बाता करता? भारताला आहे तसेच राहू द्या. अशी फुकट करमणूक कुठे मिळेल तुम्हाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

ROFL ROFL ROFL

मध्यंतरी सतारवाल्या रविशंकरांच्या मृत्युलेखात श्री श्री रविशंकरांचा फोटो टाकला होता त्याची या निमित्ताने आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ही लिंक हवीय हो. प्रत्यक्ष बघण्यात जी मजा आहे ती वाचण्यात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही ती लिंक.

पण लोकांनी आरडाओरडा केल्यामुळे आता बरोबर पिच्चर लावलेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा यु मेड माय डे!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्षली गोळीबारात जखमी झालेले काँग्रेस नेते विद्याचरण शुक्ल यांचे निधन झाल्याची बातमी आहे. मेलेल्या व्यक्तीबाबत वाईट बोलू नये वगैरे संकेतांना तिलांजली देऊन बोलायचे तर काँग्रेसची, त्यातल्या त्यात गांधी घराण्याची हांजी हांजी करुन मोठा झालेला एक स्वार्थी नेता. त्याहूनही वाईट लिहायचे तर अशांना इतके दीर्घायुष्य कसे लाभते हा एक प्रश्नच आहे. बोरीबाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

आणीबाणीतल्या चांडाळ चौकडी*तले एक.

*संजय गांधी, बन्सीलाल, विद्याचरण शुक्ला आणि चौथे कोण ते आठवत नाही. कदाचित फोतेदार किंवा आर के धवन असतील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

फोतेदार किंवा धवन नव्हेत, चौथे होते जगमोहन....
तुर्कमान गेट फेम!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile
पुर्वी अशी वादग्रस्त व्यक्तीमत्त्वे पुस्तके / आत्मचरित्रे लिहायची, आता जमाना बदलल्याचे लक्षण दुसरे काय? Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

१५ जुलैपासून तार-सेवा बंद होणार अशी बातमी इथे आणि इथे वाचली.
याचा अर्थ, जिथे जिथे पोस्ट-खाते पोहोचले आहे तिथे किमान एस्.एम्.एस्. पोहोचविण्याची सुविधा आहे, असे मानणे वास्तवाशी कितपत सुसंगत आहे ?
पर्यायी व्यवस्था काय आहे ?
तार आणि तार करण्याची पावती या दोनही गोष्टी भारतीय न्यायव्यवस्थेत अधिकृत पुरावा म्हणून मान्य केल्या गेल्या आहेत. एस्.एम्.एस्. वा वॉईसमेलला तशी काही मान्यता मिळण्यापूर्वीच हे सारे होत आहे, ही एक रोचक बाब.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोन्साटोच्या हस्तक्षेपाशिवाय असं काही होत आहे. Wink

२००६ साली आलेल्या 'डोर' चित्रपटातला एक प्रसंग आठवला. राजस्थानातल्या एका खेड्यात रहाणार्‍या मीराचा (आयेशा टाकिया) नवरा आखाती देशात नोकरीला गेलेला असतो. नवर्‍याशी बोलण्यासाठी गावातल्याच एका माणसाला पैसे देऊन त्याच्या मोबाईलवरून फोन करते. नेटवर्कसुद्धा यथातथाच असल्यामुळे मातीच्या एका ढिगार्‍यावर उभं राहून फोन वापरायचा असं करावं लागतं.
गावागावात प्रत्येकाकडे मोबाईल असण्याची आवश्यकता नसावी; एखाद्या हिकमती माणसाकडे फोन असला तरी तारखात्याचा धंदा बुडीत खात्यात जाण्यासाठी हे पुरेसं असावं.

दुसरी गोष्ट आठवली ती अफजल गुरूच्या फाशीच्या बाबतीत. त्याच्या फाशीची तारीख घाईघाईत ठरवून, घरच्यांना तारेने हे कळवलं. ही तार घरच्यांना मिळण्यापूर्वीच फाशीची अंमलबजावणी केली. आणि यावर टीका झाली त्यात "एसेमेसने कळवायला काय झालं होतं?" असा सूर होता.

तार आणि तार करण्याची पावती या दोनही गोष्टी भारतीय न्यायव्यवस्थेत अधिकृत पुरावा म्हणून मान्य केल्या गेल्या आहेत. एस्.एम्.एस्. वा वॉईसमेलला तशी काही मान्यता मिळण्यापूर्वीच हे सारे होत आहे, ही एक रोचक बाब.

सहजच "SMS indian court" असे शब्द गुगलला दिले असता काही रोचक बातम्या मिळाल्या

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कुटुंबव्यवस्थेच्या उत्क्रांतीवर टिप्पणी करणारा मंगला सामंत यांचा लेख लोकसत्तामधे वाचला.
गतिमान काळातील कुटुंब संस्था

दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर मंगला सामंत यांचे दोन चांगले लेख लोकसत्ताने छापले होते. हा ही लेख आवडला म्हणून त्यांचं नाव शोधलं. तर हे तीन चांगले लेख मिळाले. पहिले दोन लिंगभावाबद्दल आहेत. तिसरा जेनी मार्क्स (कार्ल मार्क्सची पत्नी) हिच्याबद्दल आहे.
समलैंगिकता : एक समजून घेण्याचा विषय (या लेखात फ काहीतरी वेगळाच दिसला. आणि प्रतिसादाच्या नावाखाली सगळं स्पॅम आहे.)
मनी व्हर्सेस डायमंड संघर्ष लिंगभावाचा
‘बेडरूमी प्रश्न’ पेलणारी जेनी मार्क्स

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गतिमान काळातील कुटुंब संस्था: लेख चांगला आहे, पण तपशिलात काही अनावश्यक सरसकटीकरण जाणवते. ते रामायण वैग्रे प्रकर्ण ओढूनताणून बसवलंय. शिवाय, माता-मूल या तथाकथित अनादिअनंत कुटुंब व्यवस्थेचा माणसाच्या एक्स्टेंडेड बाल्याशी संबंध लावण्याची तसदी घेतलेली दिसत नाही. "आत्ता चाल्लंय ते भयंकर काहीतरी नाही" इथपर्यंत संदेश ठीके, पण बाकीचे जरा गंडलेले दुवे आहेत.

समलैंगिकतेच्या लेखात एक रोचक मुद्दा आहे- आयरॉनिकली गे लोक ब्रिटिशपूर्व काळात जास्त सुखी होते! मजा आहे.

मनी व्हर्सेस डायमंडचा लेखही उत्तमच. नर्चर काय नेचर काय, प्रत्येक पक्षाच्या पुरस्कर्त्यांनी चड्डीत राहूनच क्लेम केला पाहिजे.

चवथ्या लेखाचा पॉइंट मात्र कळला नाही.

१.जेनीबद्दल अनभिज्ञ असू नये-मान्य.
२.कार्ल मार्क्सने भानगड केली- मान्य.
३. भानगड करणे चूक- मान्य.

पण लेखातला सूर भानगड सोडली तरी अ‍ॅक्यूजेटरी वाटतो आहे. नक्की कशाचे मूल्यमापन अन कसल्या तागडीत करायचे आहे ते झेपले नाही. म्हणजे "मार्क्स असेल मोठा तत्वज्ञ, पण त्याचेही पाय मातीचेच" हे दाखवण्याचा अट्टाहास होतोय की काय अशी शंका येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मार्क्स मोठा तत्त्वज्ञ होताच, आणि त्याचेही पाय मातीचेच होते, यात मुळात चूक काय हे समजलं नाही. जे चूक नाही, खरंतर योग्य आहे ते कसं योग्य आहे हे सांगितलं तर त्यावर आक्षेप का घ्यावा? मार्क्सचेही पाय मातीचेच असल्यामुळे त्याचं तत्वज्ञान कवडीमोल किंवा हिणकस ठरत नाही. तत्त्वज्ञानाचं मूल्यमापन निराळं, व्यक्ती म्हणून मार्क्सचं मूल्यमापन निराळं. जो कार्ल मार्क्स कामगारांचं शोषण पाहून व्यथित झाला, त्यानेही आपल्या पत्नीचं शोषण केलं; पुढे याबद्दल त्याला दु:ख झाल्याचा उल्लेखही लेखात आहे.

या लेखात मूल्यमापन असेलच तर ते जेनी मार्क्सचं आहे, कार्ल मार्क्सचं नाही. तिच्या त्यागाचं, कष्टांचं उदात्तीकरणही त्यात नाही (जे करण्याकडे उजव्या विचारांच्या लेखकांचा ओढा असतो). हा लेख वाचल्यावर सुनीताबाईंचं 'आहे मनोहर तरी' आणि त्यांच्याबद्दल मंगला गोडबोलेंनी लिहीलेलं 'सुनीताबाई' हे पुस्तक, विशेषतः त्याचा शेवटचा भाग आठवला. पुलं-सुनीताबाई निश्चितच हलाखीचं आयुष्य जगले नाहीत. पण लोकप्रिय, प्रसिद्ध पुरुषांची तेवढी प्रसिद्ध नसणारी बायको आपल्या समोर येते त्यापेक्षा फार जास्त कर्तबगार, हुशार किंवा विचारी असू शकते. अशा प्रकारच्या लिखाणाचा अभाव असेल तर अशा स्त्रियांचं कर्तृत्त्व, विचार सगळ्यांसमोर येत नाहीत.

जेनीने कार्ल मार्क्सशी लग्न केलं नसतं किंवा दारिद्र्यामुळे वेळेतच मार्क्सला घटस्फोट दिला असता तर बहुदा ती एवढी प्रसिद्ध झाली नसती; पण निदान पोटच्या, एक वर्षाच्या पोरीला पुरण्याची वेळ तिच्यावर आली नसती. तिला काय काय सहन करावं लागलं हे लिहील्यामुळे कार्ल मार्क्स MCP ठरेल असेल तरीही त्यातून मुहंमदाला आरसा दिसण्यासारखं पातक घडत नाही.

लग्नबाह्य शरीरसंबंधांशिवाय त्याचा MCP पणा दिसतोच.

---

लिंगभावासंदर्भात लेख आहेत त्यावर टिप्पणी करण्याइतपत माझं वाचन नाही. असाही एक दृष्टीकोन, म्हणून ते आवडले एवढंच. समलैंगिकतेची अर्थशास्त्रीय बाजू मांडणारा हा लेख काही महिन्यांपूर्वी वाचला होता: The Economic Case for Same-Sex Marriage

---

'मिळून सार्‍याजणी'च्या मे महिन्याच्या अंकातला एक लेख आवडला: स्त्रिया.
डॉ. नुरीत पेलेद एल्हनान या जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठात भाषा व शिक्षणशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. युरोपियन पार्लमेंटमध्ये त्यांना साखारोव्ह यांच्या नावाने दिला जाणारा ‘मानव अधिकार व भाषण स्वातंत्र्य’ पुरस्कार दिला गेला. १९९० मध्ये त्यांची १३ वषार्र्ंची मुलगी (स्मदार) जेरूसलेममध्ये आत्मघातकी हल्ल्यात मारली गेली. ८ मार्च २०१० ला युरोपियन पार्लमेंटमध्ये त्यांनी दिलेल्या भाषणाचा हा अनुवाद आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मार्क्स मोठा तत्त्वज्ञ होताच, आणि त्याचेही पाय मातीचेच होते, यात मुळात चूक काय हे समजलं नाही. जे चूक नाही, खरंतर योग्य आहे ते कसं योग्य आहे हे सांगितलं तर त्यावर आक्षेप का घ्यावा?

चूक आहे असे मी कुठेच म्हणालो नाही. फोकस कशावर जाणवला त्यासंबंधी बोलतोय. राहता राहिला कर्तृत्वाचा प्रकार. जेनी स्वतंत्र विचार करू शकणारी होती, काय चूक अन काय बरोबर हे तिला कळत होतं आणि तिच्यावर अन्याय झाला तो तिने सहन केला. करायला पाहिजे होता/नाही हा तर वेगळाच प्रकार. ते एक असोच. पण तिचे कर्तृत्व नक्की काय आहे हे समजले नाही. ती हुशार होती हे मान्यच, पण कर्तृत्व?

एका लफडेबाज नवर्‍याला सांभाळून घेणे हे सोपे काम नाहीच, पण "गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ" सोडल्यास कर्तृत्व म्हणून काय गणावे, असा प्रश्न पडतो, बाकी काही नाही.

अर्थात जे अज्ञात आहे ते पुढे यावेच या मताचा मीही आहे.असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"गृहिणी सचिवः सखी मिथः प्रियशिष्या ललिते कलाविधौ" सोडल्यास कर्तृत्व म्हणून काय गणावे

घरातल्या स्त्रीला/स्त्रियांना गृहित धरणं आणि त्यांच्या कष्टाची किंमत न मोजणारं संस्कृत "सुभाषित" देण्याबद्दल आभार.

बाकी लेखातलीच काही वाक्यः
मार्क्सने भडक लेखन करू नये असे जेनीला फार वाटे...
त्याकाळातही युरोपात अनेक स्त्रिया स्वैरपणा करत असूनही जेनी संसार अर्धा टाकून उठून गेली नाही की लहानग्या मुलांसह वैतागाने आत्महत्या केली नाही.
कोसळता संसार दोन्ही खांद्यावर पेलून ती मार्क्सच्या कार्यात मग्न होऊन गेली. त्याचा पत्रव्यवहार ती सांभाळी. डिक्टेशन घ्यायला बसे. त्याच्याबरोबर चर्चा करी. काही सूचना करी.
... मार्क्सने पुस्तक लिहिलं. त्याबाबत जेनीने त्याला सहकार्य केलं. तिनेच पुस्तकाची मुद्रणप्रत तयार केली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

घरातल्या स्त्रीला/स्त्रियांना गृहित धरणं आणि त्यांच्या कष्टाची किंमत न मोजणारं संस्कृत "सुभाषित" देण्याबद्दल आभार.

नेहमीप्रमाणे गल्ली पुन्हा एकदा चुकलेली आहे, अर्थात त्याचीही सवय आहेच. स्त्रियांना गृहीत धरणारं सुभाषित हे नाही हे समजायला पाणिनी असण्याची गरज नाही.

"कार्येषु मन्त्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रम्भा" हे सुभाषित तू म्हणतेस त्या छापाचं आहे. तस्मात टीकेआधी डेटा पारखून घेणे.

आता लेखाबद्दलः

ती मार्क्सची हुशार असिस्टंट होती हे मान्यच आहे. तिने काही सूचना केल्या हेही मान्य.

मग व्होट हा कसा लुच्चा आहे याबाबत मार्क्सने पुस्तक लिहिलं. त्याबाबत जेनीने त्याला सहकार्य केलं.

अर्धवट वाक्य कोट केल्याने समजूत होण्याची शक्यता आहे की "दास-राजधानीत" जेनीचा काही विशेष हात होता, जे की लेखावरून दिसत नाही. त्या अनुषंगाने मी म्हणत होतो. अन याही पुस्तकात टेक्निकल अन इतर बाबी उत्तम सांभाळल्या हे मान्यच आहे. कर्तृत्व म्हंजे वैचारिक कर्तृत्व अशा अर्थी मी म्हणत होतो. असो. बाकी अन्य गोष्टी या कर्तृत्व नामक संज्ञेला पात्र आहेत/नाहीत इ.इ. टोकनिझम-रिडन वादात शिरायची इच्छा नाही.

शिवाय, तत्कालीन युरोपात स्वैरपणा बराच होता आणि त्या तुलनेत तिचे न सोडून जाणे कसे उल्लेखनीय आहे वगैरे वगैरे अंमळ हुकलेलंच आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जेनी मार्क्स संदर्भातला लेख आणि इथे झालेली चर्चा वाचली.

"लोकप्रिय/कर्तृत्ववान/विद्वान/लोकोत्तर इत्यादि व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाबींचं महत्त्व विशेष नाही. भरजरी वस्त्राच्या मागच्या बाजूची भरड बाजू पहाण्यात काय हशील आहे ?" या स्वरूपाचा विचार कालबाह्य ठरतो आहे असं मला वाटतं. काळ ज्याप्रमाणे व्यक्तीच्या विचारांचं, सार्वजनिक आयुष्यातल्या कर्तृत्वाचं मूल्यमापन करतो तसंच वैयक्तिक आयुष्यात त्या व्यक्तीचं वर्तन कसं होतं याचीही खानेसुमारी घेतली जाते. या गोष्टी निरनिराळ्या आहेत, काही लोकांना काही बाबतीत अधिक रस असतो इतपत बरोबर आहे. परंतु यापैकी एक बाजू अधिक महत्त्वाची आणि दुसर्‍या बाजूला काहीही महत्त्व नाही असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे Inconvenient Truth ला अंधारात ठेवण्यासारखं, किंवा डोळेझाक करण्यासारखं वाटतं.

मार्क्सच्या तत्वांची पूर्ण विसाव्या शतकावर घनदाट छाया पडलेली आहे; एखाद्या वटवृक्षाच्या पारंब्या लोंबाव्यात, आणि त्या पारंब्याना धुमारे फुटून परत नव्या शाखा बनाव्यात, मूळ वृक्षाची व्याप्ती नक्की काय, किती खोलवरची, किती मोठी ते कवेत घेणं सोडा, दृष्टीत सामावणंही अशक्य व्हावं तसं मार्कसिस्ट विचारचौकटीचं आहे यात काय संशय ? पण "मार्क्स : एक व्यक्ती, एक नवरा, एक बाप" ही देखील एक बाजू आहेच. तिला नाकारण्यात हशील नाही.

बाकी "महापुरुषाचे मातीचे पाय" हा प्रकार स्वीकारणं एकंदरीतच थोडं कडवट्पणा आणणारं आहे हे खरंच. आपल्या प्रदेशाचं/भाषेचंच घ्या. "शिवाजीचे वैयक्तिक आयुष्य" या बाबत एक शब्द जरी उच्चारला तरी त्या माणसालाच नव्हे तर त्या व्यासपीठाला/संस्थेला आग लागेल. या पार्श्वभूमीवर "जीजस हा एक मोठा फ्रॉड मनुष्य होता" इत्यादि स्वरूपाच्या पुस्तकांच्या चळती उघडपणे वागवणार्‍या समाजाची किमान ही एक बाजू योग्य दिशेने घडली असल्याचं जाणवतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

महापुरुषाचे मातीचे पाय स्वीकारण्यात कडवटपणा असायचं कारण नाही. शिवाजी, मुहम्मद, इ. काही (बरेच) अपवाद वगळले तर बाकी बर्‍याच लोकांचे मूल्यमापन केले तरी टेन्शन नाही. सुदैवाने मार्क्स यात येतो हे बरं आहे.

मार्क्स हा एक नवरा अन बाप म्हणून कसा होता हे नाकारण्यात काहीच हशील नाही-त्याने भानगड केली ही गोष्ट गर्हणीयच आहे आणि तिचा निषेध करावा तितका थोडाच. अन अशा लफडेबाज नवर्‍याला सांभाळणारी बायको ग्रेटच म्हणायला हवी.

त्याबद्दल काही म्हणणेच नाहीये. अज्ञात बाजू दाखवताना अभिनिवेश मिसडिरेक्टेड होतो की काय अशा शंकेतून वरील लेखाकडे पाहिले तर मात्र तो अभिनिवेश जरा जाणवतो तस्मात मी जे म्हणालो ते म्हणालो.

आणि वैयक्तिक गोष्टींचे महापुरुषांच्या सगळ्यात मोठ्या काँट्रिब्यूशनशी रिलेशन जोडताना कल्पनेच्या भरार्‍या मारल्या जाताहेत किंवा नाही, हे पाहणे अत्यावश्यक आहे. बर्‍याचदा त्या मारल्या जातात-जे की चूक आहे. अन कुठली बाजू जास्त महत्वाची हे अभ्यासचौकट काय आहे यावर अवलंबून असतं. पण या चौकटींची गल्लत करणारेच जास्त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आजवरच्या दुर्दैवी आपत्तींना धैर्याने तोंड देणार्‍या जेनीला तो आपला सर्वात मोठा पराभव वाटला असेल. चार मुलांची माता नि पुन्हा पाचव्या खेपेचे डोहाळे लागून जेमतेम तीन महिने झालेले! मार्क्सला तिने काय कमी केलं होतं? निदान शरीरसुख भरभरून दिल्याचेच हे पुरावे नव्हते का?

हे वाचून हसावे का रडावे तेच कळत नाहीये.
_______________
काही रोचक प्रमेयं/गृहीतकं पहा-
प्रमेय(१) ५ मुले होणे = शरीरसुख देणे
उपप्रमेय - तेही "भरभरुन" देणे ROFL
प्रमेय(२) शरीरसुख "भरभरुन मिळणे = कशाचीही कमी नसणे
प्रमेय (३) काही कमी असेल तरच लोक भानगडी करतात
ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपण दीडशे वर्षांपूर्वीच्या युरोपबद्दल बोलतो आहोत.

त्या काळात धर्माचा लैंगिक आयुष्यावर सर्वसाधारणपणे किती पगडा होता? मुलं होण्यासाठी असणारे शरीरसंबंधच योग्य, मान्य करण्यासारखे अशी ख्रिश्चन धर्माची शिकवण आहे. साधारण पन्नास वर्षांपूर्वीच्या, १९६७ सालच्या फ्रेंच-स्पॅनिश चित्रपटात Belle de Jour मधे शरीरसंबंध म्हणजे काहीतरी वाईट असं समजणार्‍या स्त्रीचं चित्रण आहे. (निरोध आणि अन्य संततीनियमनाची साधनं वापरण्यात फ्रान्स हा एक आघाडीचा युरोपीय देश आहे.)

त्या काळच्या युरोपीय समाजावर निव्वळ आनंदासाठी शरीरसंबंध ठेवण्याला वाईट समजणे अशा प्रकारच्या विचारांचा पगडा असण्याची बरीच शक्यता आहे. यासाठी कट्टर धार्मिक असण्याची आवश्यकता नाहीच. जेनी मार्क्स स्वतः किती धार्मिक होती याची कल्पना नाही. निदान ती कोणी बंडखोर बाई नव्हे; आजूबाजूच्या स्त्रिया घटस्फोट वगैरे देताना दिसत असल्या तरी तिने कार्लला घटस्फोट दिला नाही. वरचं प्रमेय क्र. १ इथे फार लागू करता येईलसं वाटत नाही. २०१३ सालची मूल्य आणि लैंगिक सुख-स्वातंत्र्याच्या कल्पना १८८१ साली मेलेल्या जेनी मार्क्सवर लादून तिचं (आणि या वाक्याचंही) मूल्यमापन होऊ नये. दुसर्‍या महायुद्धानंतर, विशेषतः स्त्रीवादाच्या दुसर्‍या लाटेनंतर (१९६०चं दशक) स्त्रियांचं लैंगिक स्वातंत्र्य, मोकळेपणा इ गोष्टी बर्‍याच बदलल्या आहेत.

तिच्याकडून जे काही देता येईल ते सगळंच तिने दिल्याचं, प्रयत्न केल्याचं, लेखातून दिसत आहेच, माहेरच्या घरून मिळालेली संपत्ती, आरोग्य, स्थैर्य, सगळंच. तिच्यात जर काही कमतरता होती तर ती याला पाच वेळा गर्भधारणा होईपर्यंत दिसली नाही का? (साधारण असाच तर्क मद्रास उच्च न्यायालयाने वापरला असावा.) प्रमेय क्र २ सुद्धा बाद.

लग्न केल्यावर बायकोची फसवणूक केल्याचं म्हटलं; त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही हे मान्य.

(मुमताजमहलवर शहाजहानचं एवढं प्रेम होतं तर १४ वेळेस तिला एवढ्या यातना का सहन करायला लावल्या, असा प्रश्न विचारला जातो.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मुमताजमहलवर शहाजहानचं एवढं प्रेम होतं तर १४ वेळेस तिला एवढ्या यातना का सहन करायला लावल्या, असा प्रश्न विचारला जातो.)

पण मूल होताना त्रास होतोच असं गृहीतक धरलय इथे. (व्यायाम व आरोग्य नीट असेल तर विशेष त्रास होत नाही. हिंदी चित्रपटातून अवास्तव चित्रण केलं जातं.) शिवाय हेही गृहीतक आहे की तिला त्रासच झाला असेल, अपत्यप्राप्तीचा आनंद वाटलाच नसेल.
शिवाय तेव्हा गर्भनिरोधाची साधनं होती अथवा नव्हती याबद्दलही शंका आहे. मग शहाजहानने काय मन मारायचं का? तिनेही मारायचं का?

थांबते!!! चर्चा लै भरकटलीये

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही.

आजच्या काळातला प्रसूतीमुळे होणारा मातांच्या मृत्युचा दर . प्रसूतीमधे स्त्रियांचा मृत्युही होतो असे आकडे दिसतात त्यामुळे हिंदी चित्रपटात (किंवा इंग्लिश मालिकांमधे) काय दाखवतात याला फार महत्त्व नाही दिलं तरी चालेल. प्रश्न फक्त तात्पुरत्या वेदनांचा नसतो. प्रागतिक विचारांची, घरचं बरं असणारी स्मिता पाटीलही प्रसूतीदरम्यान गेली. अगदी चौदाव्या मुलाच्या जन्मामुळेही आनंद होत नाही असं नाही, पण तो उपभोगायला आई जिवंतच नसेल तर कसला आनंद?

प्रत्येक जिवंत प्राण्याची जगण्याची इच्छा अतिशय तीव्र असते. अगदी लंगडं कुत्रंही खुरडत, खुरडत अन्न मिळवण्याचा प्रयत्न करतं पण आत्महत्या करत नाही. ही तीव्र इच्छा निर्माण होते ती आपली जनुकं पुढच्या पिढीत देण्याच्या इच्छेतून. ही इच्छाही हार्डवायर्ड असते. त्यामुळे जीवशास्त्रीयदृष्ट्या जिवंत रहाणं अधिक महत्त्वाचं का जनुकं पुढच्या पिढीत देणं हा प्रश्न क्लिष्ट आहे. (= मला उत्तर माहित नाही.)

सध्याच्या काळात आई जगणं महत्त्वाचं, मुलं कमी असली, एकही मूल नसेल तरी चालेल असे निर्णय घेण्याकडे समाजाचा कल असतो. पण आता तंत्रज्ञानामुळे पर्यायही उपलब्ध आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमची बाजू समजली. इथे या निमित्ताने चांगली चर्चा झाली असं आवर्जून नोंदवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला तरी लेख जेनीच्या त्यागाचे उदात्तीकरण करणाराच वाटतोय. यातून मला खालील शक्यता वाटतायत

१. जेनीला मुळातच कार्ल मार्क्सच्या कामाबद्दल/ तळमळ आणि ओढ असल्याने तिने त्याला सोडून जाण्याचा विचार केला नसेल.
२. घटस्फोटाचा विचार मनात येऊनही, तो घेण्यासाठी म्हणून त्यावेळच्या समाज व्यवस्थेला झुगारून देण्याएवढी जेनी धीट नसेल. उदा. घटस्फोटाला समाज मान्यता नसणे. एडिथ व्हारटन च्या 'एज ऑफ इनोसन्स' कादंबरीत १८७० साली कौंटटेस एलेनला तिच्या घरचे, घराची प्रतिष्टा राखण्यासाठी म्हणून घटस्फोट घेऊन देत नाहीत. त्या कादंबरीवर एक अप्रतिम फिल्म ही आहे.
३. तिच्या मुलांचा मृत्यू फक्त दारिद्रामुळे न होता, असाध्य रोगामुळे झाल्याने तिने कार्लला दोषी ठरवून त्याला सोडून जाण्यात काही अर्थ नसेल. माझ्या आजीला ८ मुले झाली, त्यातली ३ इन्फन्सी मधेच गेली. त्यावेळची वैद्यकीय स्थिती पाहता, हे खूप कॉमन असले पाहिजे.
४. कार्लचे त्याच्या नोकराणीबरोबरचे संबंध उघडकीस आल्यावरही ती कार्ल ला सोडू शकली नाही, याला तिच्या त्यागापेक्षा, तिची असहायताही जबाबदार असू शकते. इतक्या मुलांची जबाबदारी ती एकटी पेलू शकली असती का? तिला तिच्या माहेरकडून काही मदत मिळू शकत होती का? काहीच उपाय नसल्याने तिने कार्लला सोडले नसेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समलैंगिकत्त्वावरील लेख आवडला.. सुरवात दमदार पण शेवट काहिसा खटकला: 'ट्रान्स जेन्डर' आणि 'होमोसेक्श्युअल्स' हे पूर्णतः वेगळे असल्याचं हा लेख मान्य करत नाही. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

+१
आणि "ज्याच्या नावाने ‘ऑस्कर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो, तो नाटककार ऑस्कर वाइल्ड" >> ??? हे कायेए?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कार्ल मार्क्स बद्दल तो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अभिमानी व व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टा पुरस्कर्ता होता. हे वाक्य वाचून आश्चर्य वाटले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

>>कार्ल मार्क्स बद्दल तो वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अभिमानी व व्यक्तिस्वातंत्र्याचा कट्टा पुरस्कर्ता होता. हे वाक्य वाचून आश्चर्य वाटले.<<

हे पाहा : मार्क्स आणि वृत्तपत्रस्वातंत्र्य

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे वाचलं का?

India sets up nationwide snooping programme to tap your emails, phones

http://timesofindia.indiatimes.com/tech/enterprise-it/security/India-set...

यात मोबाईल, ईमेल इत्यादिसोबत ब्राउझिंग हिस्टरी वगैरेचाही समावेश आहे असं लेखावरुन दिसतं. इतरही बर्‍याच देशांमधे अशी यंत्रणा आहे असंही म्हटलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मगाशी हे हेडिंग वाचलं, त्यावर क्लीकवलं तर ब्राऊझर हँग झाला, म्हटलं सरकार ही बातमी दडवतंय वाट्टं Wink
जोक्स अपार्ट, हे धक्कादायक नसलं तरी दुर्दैवी आहे!

बाकी लोकशाहीतील सरकार लोकांच्या लायकीनुसार बनतं यावर अधिकाधिक विश्वास अश्या बातम्यांमुळे बसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'आधार' कार्डाचा उपयोग होत नाही/होणार नाही असं नाही. पण अशा बातम्यांनंतर सरकारी यंत्रणा या प्रकारांचा दुरूपयोग करणारच नाही यावर विश्वास ठेवणं कठीण जातं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बाकी सहमतच. पण आधार कार्ड वाटपातच इतके घोटाळे झालेत, इतक्या गफलती झाल्यात, की गैरवापर करणार तरी कशाचा असं वाटतं कैकदा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रभु रामचंद्रांनी बाण मारून जिथे गंगा उत्पन्न केली ते "बाणगंगा" आणि जिथे वाळूचे शिवलिंग बनवले ते "वाळकेश्वर"! अशा पुनित वास्तूंच्या सानिध्यात असलेल्या टेकडीला "मलबार हिल" असे ब्रिटिश राजच्या खुणा बाळगणारे नाव असण्यापेक्षा "रामनगरी" असे यथायोग्य नाव असणे बरे, नाही का? Wink

http://www.mumbaimirror.com/mumbai/civic/Malabar-Hill-to-be-renamed-Ramn...

अर्थात, उद्या पालिकेने अट्टाहासाने असे नामांतर केलेच तरी कालांतराने त्याचे "अप्पर वाळकेश्वर" होणारच नाही याची खात्री नाही बॉ! (साक्षीला "अप्पर वरळी आणि SoBo आहेतच ;))

१. मुंबईच्या इंग्रजी वृत्तपत्रांत दक्षिण मुंबईचा उल्लेख हटकून SoBo (South Bombay) असा केला जातो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रामायणाच्या काळापासून भय्यांनी मुंबईवर आक्रमण केलंय तर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राम निदान काल्पनिक म्हणता येईल. पण निदान ज्ञानेश्वरांच्या काळी तरी देवगिरीचा राजा "यादव"च होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"यादव" = "जाधव" हे लक्षात घेता, प्रस्तुत यादव हे मराठी असण्यास प्रत्यवाय नसावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

देवगिरीचे "यादव" हे मूळचे "जाधव" म्हणजेच मराठी असणे शक्य आहे!

तसेच, राम (काल्पनिक अथवा अन्य) असला तरी, १४ वर्षांनी पुन्हा उत्तर भारतात परत गेल्याचे मानण्यात येते. शिवकालीन "गागाभट्ट्"देखिल परत गेले असे समजते!

परंतु, येऊन ठाण मांडण्याची परंपरा पेशवेकालीन असावी!

तत्कालीन धनदांडग्यांच्या हवेल्यांवर पहारेगिरी करणारे गारदी हे अद्याप येथेच आहेत. सध्या ते सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराशी झोपा काढताना दिसतात!

(१) गारदी हे Guard (=पहारेकरी) चे देशी रूप असावे. पेशवेकाळापासून ही जमात पहारेकरी म्हणून उत्तर भारतातून आयात केली जात असावी (आठवा सुमेरसिंग, खरकसिंग). खेरीज ती अर्धशिक्षितही असावी (कुणी "ध" लिहून दिले तर ते सर्रास "मा" असे वाचीत!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नरेंद्र मोदींनी दोन दिवसात उत्तराखंडातून १५ हजार गुजराती यात्रिकांना सुखरूप सोडवून आणले.

रोचक बाब ही की बातमी टाइम्स समूहाखेरीज इतरत्र कुठेही दिसली नाही.

मटा मधील बातमी

कुठल्याही न्यूज चॅनेलवरही दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारतीय वायुदलाने आपल्या इतिहासाताले सर्वात मोठे रेस्क्यु ऑपरेशन सुरु केलेय. वायुसेनेचे कित्येक जवान गेले २४ तासं झोपलेले नाहीत. हे स्टेटस लिहले जाईपर्यंत वीस हजारं लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलयं आणि हा आकडा दर तासाला वाढतोयं. यथावकाश ऑपरेशन संपेल, सेना परतं आपआपल्या कॅम्पात जाईल. त्यातं अहोरात्र झटणार्‍या एखाद्याचे नावं कळाले तरी खुप. एव्हड्यात म.टा. ऑनलाईनचे "ते' उत्तराखंडला गेले... व्हीआयपी ट्रिटमेंट नको म्हणाले... सरकारी यंत्रणेवर त्यांनी कुठलाही दबाव टाकला नाही..." वाचण्यात आलं. काही एकदम जवळच्या मित्रांनी शेअर केलेलं दिसलं. हाँगकाँग मध्ये मानवी अधिकारासाठी काम करणारे समर अनार्य यांनी Change.org वर एक Petition टाकलयं. त्याचा अनुवाद असा.

---
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार

नरेंद्र मोदी फक्त आपल्या काही विश्वासू अधिका-यांना ते सोबत घेऊन उत्तराखंडला गेले आणि १५,००० गुजराथी लोकांना एका रात्रीत सुरक्षितरित्या परतं घेउन आले. आठवड्याभरातं सैन्यदलाने फक्त २०,००० लोकांना सोडविण्यात यश आले असतांना काही प्रश्न असे आहेत -

१) अटकलेल्या २७ इतर राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांमधुन मोदींच्या सहकार्‍याने बरोबर गुजराथी लोकांनाच कसे शोधुन काढले?
२) मोदींच्या ताफ्यात असलेल्या बसेस व बोईंग विमानांना लँण्डींग करतांना प्राथमिकता देण्यात आली होती का? असे असेल तर इतर सुटकेची गरज असलेल्या लोकांपेक्षा गुजराथी लोकांना प्राधान्य देण्यात आले असे नाही का?
३) सर्वप्रथम आजारी लोक, नंतर लहान मुले आणि वृद्ध , त्यानंतर स्त्रिया आणि नंतर पुरुष हा सुटकेचा मुलभुत नियम पुर्णपणे मोडीत काढला गेला नाही का?
४) वरील प्रश्नांचे उत्तर 'हो' असे असेल तर गुजराथी संकटग्रस्तांना प्राधान्य दिल्याचा निष्कर्ष निघतो आणि अशा परिस्थितीत याला जबाबदार असणार्‍यांना शिक्षा केली जावी.

वरील प्रश्नांचे उत्तर 'नाही' असल्यास टाईम्स ऑफ ईडिया 'पेड जाहीरातची' बातमी बनवुन सरळ सरळ खोटे बोलतं आहे आणि याबद्दल त्यांच्यावर कार्यवाही व्हावी.

श्रेय- राहुल बंसोडे चेपु वरुन साभार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

महाराष्ट्र टाईम्समधे ही एक बातमीही दिसली.
‘फेकू मोदी’ श्रेय घेताय: दिग्विजय

बाकी राहुल बनसोडेंच्या विचारांशी सहमत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मोदी श्रेय "घेताय" की नाही ते माहिती नाही, पण ही मटीय भाषा पाहून डोसकं फिरताय हे नक्की!! वायझेड मेले !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

उत्तराखंड मध्ये मोदी गेले # बरोबर
15000 यात्रेकरू हलवले # 80 इनोव्हा आणि 25 बसेस मधून उत्तरखंडात कुठूनही डेहराडून गाठणे (फेर्‍या मारून) शक्य आहे, म्हणून बरोबर म्हणता येईल
गाड्यांचा ताफा गेला # तेही बरोबर म्हणता येईल
पण

हे यात्रेकरू अडकलेले होते हे कशावरून?

नाहीतरी..

माणूस पण नाय जाऊ शकत अशा ऊंचाइ वर तप करणार्‍या गुरुद्येवाचा फोटो हायच रिसिकेसला Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नावरे आवरीता!

ही दिव्य मराठी बोली.

ही सकाळची.

खबर बहुतेक सगळ्या बातमीपत्रात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नावरे आवरीता!

इंग्रजी वृत्तपत्रे (गूगलमार्फत) आणि न्यूज चॅनेलवर दिसली नाही.
Modi Resque 15000 असे शोधल्यावर टाइम्स सोडून कोणत्याच वृत्तपत्राचा दुवा येत नाही. इतर जे दुवे येतात ते ब्लॉग, फोरम स्वरूपाचे येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

https://www.google.de/search?q=modi+rescues+15000&ie=utf-8&oe=utf-8&aq=t...

रेस्कुचे इस्पेलिन्ग तपासा राव. येतय बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नावरे आवरीता!

तुमच्या शोधात सुद्धा टाइम्सचेच दुवे येतायत. एनडीटीव्ही वगैरे काल दाखवत नव्हते. आजही एनडीटीव्ही अ‍ॅलेज्ड रेस्क्यू असं म्हणतायत. रेस्क्यूच्या चुकीच्या स्पेलिंगनेसुद्धा टाइम्सचा दुवा येत होता.

मोदींनी रेस्क्यू केल्याची "बातमी" फक्त टाइम्स मध्येच होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

द हिंदू मधील केसवच्या नजरेतूनः

मूळ दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

असं नसतानाही केवळ interpretation बदललं म्हणून निकाल पलटतात. त्याबद्दल मी बोलत आहे. हा विषय बातमीशी निगडीत नाही पण असे होते तेव्हा खालच्या न्यायालयला कान धरून उठबशा काढायला लावाव्यात असे मला नेहमी वाटले आहे.

पटलं नाही. याचं कारण असं की खालच्या न्यायालयाने हेतूतः चुकीचा निर्णय दिलेला नसतो. त्याची शिक्षा खालच्या न्यायालयाला झाली तर तिथे न्यायाधीश मिळणार नाहीत. आपला निर्णय फिरवला, ही शिक्षाच पुरेशी नाही का?

कोण निरपराधी आहे हे अगोदर कोण म्हणणार? लोक? सरकार? न्यायव्यवस्था? प्रत्येकाने वेगवेगळे तसे मानून आपापल्या हद्दीत कारवाई चालू केली तर अराजक नाही का येणार?

राजकीय पक्ष जर अशा निरपराध लोकांची यादी जाहीर करत नसेल, थोडक्यात न्यायसंस्थेवर दबाव आणत नसेल, तर कायदेशीररित्या असं करण्यात अडचणी असू नयेत.

रेशियल प्रोफायलिंगबद्दल हा व्हीडीओ पाहिला होता. आपल्याकडे हे अगदी असंच होत असेल असं नाही, पण काय म्हणायचं आहे याचा अंदाज यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

This comment has been moved here.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.