पुरुषांसाठी धोकादायक केस लॉ
प्रौढ स्त्री-पुरुषांमध्ये शारीरिक संबंध आल्यास ते पती-पत्नीच - मद्रास हायकोर्टाचा निर्णय
http://www.loksatta.com/desh-videsh-news/couple-of-right-legal-age-indu…
मला हा निकाल ४९८-अ नंतर परत समाज ढवळुन काढेल असे वाटते. या निकालाने अनेक पुरुष परत ब्लॅक्मेलिंग्मुळे गोत्यात येऊ शकतात असे वाटते. केवळ ब्लॅकमेलिंगच नाही तर प्रथम पत्नीच्या (असल्यास) घटस्फोटाचा धोका देखिल पत्करावा लागेल असे वाटते. याशिवाय प्रत्येक विवाहबाह्य संबंधाला कोर्टाने आता प्राईस टॅग लावला आहे असे दिसते. कित्येक विवाहित/अविवाहित पुरुषांच्या मोलकरणी या पुरुषांना गोत्यात आणु शकतात.
सेक्स म्हणजे लग्न न्हवे !
अन सेक्स संपला म्हणजे लग्न समाप्त झाले असे तर नक्किच न्हवे. काय निकाल दिलाय भौ. हा न्यायालयाचाच निर्णय आहे कि खापपंचायतिचा ?
विवाहबाह्य संबंधाची व्याख्या काय आहे हे कोणि स्पश्ट करेल का ?
या निर्णयामुळे बहु पति-पत्नित्वाचा कायदेशिर अधिकार प्रत्येकाला मिळेल काय ?
निर्णय
या निर्णयामुळे बरेच गुंते वाढणार आहेत..सर्वोच्च न्यायालय त्यावर निकाल देइलच
बाकी
कित्येक विवाहित/अविवाहित पुरुषांच्या मोलकरणी या पुरुषांना गोत्यात आणु शकतात
हे वाक्य फारच कोत्या मनोवृतीचे आहे..गरीबांना , कष्टकर्यांना उपभोग्य समजण्याची सरंजामशाही मानसिकता..
आणि
"कित्येक विवाहित/अविवाहित स्त्रियांचे नोकर / ड्रायव्हर स्त्रियांना गोत्यात आणु शकतात" ...असे लिहिले नाही ...त्यामुळे लेखक स्त्री द्वेष्टा आहे हे सिद्धच होतेय
दया आणि बुद्धी
तर्कतीर्थ ,
तुम्ही समाजामधल्या एका मोठ्या घटकाबद्दल अत्यंत बेजबाबदारपणे आणि स्त्रीयांविषयी गलिच्छ विधाने करत आहात..
मोलकरणी केवळ गरीब आहेत म्हणून त्या शारीरीक संबंध प्रस्थापित करून गोत्यात आणतील ही शायनी अहुजा सारखी मानसिकता तुमचा स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट करते..
त्यामुळे दुसर्यांविषयी टीकाटीप्पणी करण्यापेक्षा विधाने तपासून पहा.
मोलकरणी केवळ गरीब आहेत म्हणून
मोलकरणी केवळ गरीब आहेत म्हणून त्या शारीरीक संबंध प्रस्थापित करून गोत्यात आणतील ही शायनी अहुजा सारखी मानसिकता तुमचा स्त्रियांविषयीचा दृष्टीकोन स्पष्ट करते..
शाहिर, तुमचे सुताने स्वर्ग गाठायचे कौशल्य अचाट आहे. गोत्यात आणायला शारीरीक संबंध प्रस्थापित करायलाच हवा असं काही नाही. ४९८-अ ने उडवलेला हलकल्लोळ तुम्हाला ठाऊक नाही असे दिसते.
माझ्या एका मोलकरणीला मागे मी कामावरून कमी केले तेव्हा तिने कोणत्या थराचा तमाशा केला होता ते मी अजुन विसरलेलो नाही. माझ्या बायकोच्या कंपनीत एका स्त्रीला कामावरून कमी करण्यापूर्वी कंपनीला ती स्त्री घाणेरडे आरोप करून मेस करणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी लागली होती.
बायकांच्या हलकट्पणाकडे दूर्लक्ष करायचे ही सध्या फॅशन असली तरी मी त्याबद्दल बोलत राहणार... मग कुणी काहीही म्हणो.
आणखी एकः माझ्या आईचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले तेव्हा २४ तास नर्स ठेवावी लागणार होती. तेव्हा डॉ. नी शक्यतो सर्व कुटुंब असलेली मध्यमवयीन नर्स ब्युरोला पाठवायला सांगा अशी टीप दिली होती. सूज्ञास अधिक सांगणे न लगे...
The lower court had ordered
The lower court had ordered the man to pay monthly maintenance of R500 to the couple's two children and Rs1000 as litigation expenses. The lower court observed that the woman's wedding with the man had not been proved by documentary evidence. Hence, she was not entitled to maintenance.
...खालच्या कोर्टाचं वागणं काही कळलं नाही. बायको नसलेल्या स्रीच्या दोन मुलांना ५०० रु प्रतिमाह पोटगी/पैसा द्यायची आणि तिला नाही. फारच कॉम्प्लेक्स केस आहे.
घाई नको...
मला वाटते की संपूर्ण निर्णय, तसेच ह्या मामल्यातील वस्तुस्थिति - facts - समोर येण्याआधीच वर्तमानपत्रातील त्रोटक - आणि बुद्ध्याच सनसनाटीच्या - बातम्या वाचून आकाश कोसळत असल्याचा त्रागा करणे आपण टाळावे.
(हा निर्णय अगदी ताजा असल्याने त्याची अधिकृत प्रत जालावर उपलब्ध होण्यास काही काळ जाणार हे लक्षात ठेवावेसे वाटते.)
That said, ह्या त्रोटक बातम्यांमधूनहि एक वस्तुस्थिति पुढे येतांना दिसते. ती म्हणजे ह्या दोघा स्त्रीपुरुषांना दोन मुले आहेत. पहिले मूल कदाचित एकाच वेळच्या लैंगिक संबंधामुळेहि होऊ शकते पण दोन मुले व्हायला असे संबंध बराच काळ चालले पाहिजेत आणि दोन मुले असणे हा असे संबंध दीर्घकाळ चालू असल्याचा पुरावाच आहे. त्रोटक बातम्यांवरूनच कोर्टाच्या ह्या निर्णयात relationship हा शब्द वापरला गेला आहे असे जाणवते. अशी दीर्घ चाललेली relationship अस्तित्वात असली तर मग केवळ 'लग्न' झालेले नाही ही पुरुषाला पळवाट राहात नाही, अशा मुलांच्या संगोपनाचा भार त्याने उचललाच पाहिजे ही कोर्टाने केलेली अपेक्षा अवास्तव वाटत नाही.
कोर्टाचा निर्णय असा असला तर अनेक देशांमध्ये मान्य असलेल्या commonlaw marriage ह्या संकल्पनेच्या भारतातहि येण्याची ही नांदी मानता येईल आणि त्यात काहीच वावगे वाटत नाही.
'एक वेळेस केलेला लैंगिक व्यवहार = कायदेशीर लग्न, त्याच्या सर्व संबंधित गुंत्यासह' इतका उथळ निर्णय कोठलाहि न्यायाधीश देईल असे वाटत नाही. जरी मला असे वाटले तरी, to err on the safe side, मी निर्णय वाचेपर्यंत आपले आपले मत राखून ठेवीन आणि 'पुरुषांसाठी धोकादायक' अशा प्रकारची अतिरंजित -पक्षी आक्रस्ताळी- शीर्षके टाळण्याचा प्रयत्न करेन! वर्तमानपत्रातील बातमीला 'केस-लॉ' म्हणणार नाही.
अशी दीर्घ चाललेली
अशी दीर्घ चाललेली relationship अस्तित्वात असली तर मग केवळ 'लग्न' झालेले नाही ही पुरुषाला पळवाट राहात नाही, अशा मुलांच्या संगोपनाचा भार त्याने उचललाच पाहिजे ही कोर्टाने केलेली अपेक्षा अवास्तव वाटत नाही.
मला नेहमी हा प्रश्न पडतो की असे मारुन मुटकून घोड्यावर चढविलेले नवरदेव कितपत त्या स्त्रीच्या/अपत्यांच्या आयुष्यात "व्हॅल्यू अॅडीशन" ठरतात? त्या पुरषांकडून फक्त आर्थिक लाभाच्या अपेक्षेनेच हे खटलं (ले) चालविलेले जातात का? तो आर्थिक लाभ कसा ट्रॅक करतात. आपल्या मनःशांतीचा एक मोठा हिस्सा या खटल्यांमध्ये जातो त्याचे काय. त्यामुळे मुलांची न भरुन निघणारी हानी होतच नसेल काय? अर्थात मग तशी हानी टाळण्यासाठी त्या पुरषाला मो़काट सोडायचा का? तर नाही. पण मग अन्य उपाय काय? :(
अगदी दर वेळेस हटकून असले प्रश्न पडतात.
बरोबर आहे, पण...
व्हॅल्यू अॅडिशन, मनःशांती, मुलांची हानी या मॉस्लोच्या हायरारकीतल्या वरच्या लेव्हलच्या गोष्टी आहेत सारीकाताई! मुलं जन्माला घालून त्यांच्या किमान पालन-पोषणाचीही जबाबदारी न उचलू इच्छिणार्या बेजबाबदार बापांना (मराठीत 'डेडबीट्-डॅड')आर्थिक जबाबदारी तरी कमीतकमी उचलायला लागू देत!!! सध्या कायद्याने तितकंच शक्य आहे!!
किमान पालन-पोषणाचीही जबाबदारी
किमान पालन-पोषणाचीही जबाबदारी न उचलू इच्छिणार्या बेजबाबदार बापांना (मराठीत 'डेडबीट्-डॅड')आर्थिक जबाबदारी तरी कमीतकमी उचलायला लागू देत!
शिवाय त्याला कमी श्रीमंत ठेवला की पुढच्या वेळेस त्याला घोड्यावर चढवणारी भेटणंही कठीण होईल! ;-) ('द मिरर'मधे जे वेगवेगळे संवाद मिनाच्या कानावर पडतात त्यात हे ही एक शहाणपण आहे.)
आपल्या समाजत परिस्थिती सगळीकडे समान आहे असं अजिबात नाही. पण अजूनही स्त्रियांमधली बेरोजगारी जास्त आहे, स्त्रिया मिळवत्या असल्या तरीही एकाच प्रकारच्या कामासाठी स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो असं दिसतं, यात त्या मुलांची आबाळ होऊ नये असा विचार असावा.
उलट
विवाहाचा एकमेव फायदा (म्हणजे आपल्या मुलांना औरसपणा आणि स्वतःला मिळमिळीत का होईना पण सौभाग्य) मिळवलेल्या आणि त्यासाठी बांडगुळ नवर्याला दारू-मटनासह पोसून वर त्याचा मार खाणार्या अनेक कष्टकरी स्त्रिया पाहिल्या की कोर्टाच्या असल्या निकालांचा आणि प्रसिद्धी माध्यमांनी लावलेल्या त्याच्या अन्वयार्थाचा पोकळपणा फार-फार जाणवतो.
लेखकाचा दांडा गोत्यास काळ?
कित्येक विवाहित/अविवाहित पुरुषांच्या मोलकरणी या पुरुषांना गोत्यात आणु शकतात.
कोकणातले हजारो बाल्ये मुंबईत गडीकाम करतात.
त्यांचा अनुल्लेख होतोय.
हा त्यांच्यावर अन्याय आहे.
आणि मुंबईतल्या पुरषांवरदेखील.
मुंबईत स्त्रियापण फॉर्वर्ड असतात.
त्यांनापण बाल्ये गोत्यात आणू शकतात.
त्यामुळे हा त्यांच्यावरपण अन्याय आहे.
उत्तर भारतातपण घरगडी असतात.
एकुणात लेखकाला अन्याय करायला आवडतो.
त्यालाच गोत्यात आणायला हवं.
गड्यांनो संघटित व्हा.
तर्कतीर्थ यांना दिलासा
घोड्याच्या तोंडून ऐकणे
http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/ladies/---/articleshow…
कैच्याकै निर्णय आहे.
कैच्याकै निर्णय आहे. वायझेडपणाचे अजून एक उदाहरण.