Skip to main content

मनपिशाच

हा जो पुरुष आहे तो एका परदेशी कंपनीत मॅनेजर आहे. त्याचं नाव आहे मॅनेजर. ही जी स्त्री आहे ती त्याची बायको आहे आणि तिचे नाव बायकोच आहे. ह्या क्षणी हॉस्पिटलच्या स्पेशल रूम मध्ये असहाय अगतिक स्थितीत लोळागोळा होऊन पडली आहे. मॅनेजर बायकोच्या समोर खुर्चीवर बसला आहे.
त्याच्या क्षुब्ध मनांत अनेक अर्थशून्य वादळें निर्माण झाली आहेत,दुसरें तरी काय करणार?
वेळ, रात्रीचे आठ वाजले आहेत.
आठचा राउंड करून डॉक्टर तिला तपासून गेले. तपासणी आपली नेहामिचीच. म्हणजे ब्लड प्रेशर स्तेथेस्कोप ऑक्षिजन लेवल इत्यादि. केस पेपर वर काहीतरी खरडून डॉक्टर बाहेर पडले.
तो डॉक्टरांच्या बरोबर बाहेर गेला.

जागतिक रंगभूमी दिवस : नाट्यकलेचा जागतिक उत्सव

जागतिक रंगभूमी दिवस : नाट्यकलेचा जागतिक उत्सव

दरवर्षी २७ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक रंगभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. नाट्यकला ही मानवाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा एक अत्यंत प्रभावी आणि जिवंत प्रकार आहे. या कलेच्या माध्यमातून समाजातील विविध भावना, संघर्ष, विचारधारा आणि वास्तव परिस्थिती रंगमंचावर साकार केली जाते. जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे या कलेचे महत्त्व अधोरेखित करणे, कलाकारांचे योगदान गौरविणे आणि नव्या पिढीला नाट्यकलेकडे आकर्षित करणे हा आहे.

ए०आय० निर्मित कचरा

ए०आय० निर्मित कचरा
===============

-राजीव उपाध्ये

काही वर्षांपूर्वी उपग्रहामार्फत दळवळणाचे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर त्याचा मोठा परिणाम टिव्हीवर झाला. डॉ० रिचर्ड रेस्टॅक नावाच्या एका न्युरॉलोजिस्टने माहितीच्या मार्‍याने लोक कसे स्वास्थ्य हरवून बसले हे सांगताना एक मजेशीर उदा० त्याच्या एका पुस्तकात दिले आहे [१] डॉ० रेस्टॅकच्या एका रुग्णाने "लेटेस्ट न्यूज"च्या वेडामुळे एकंदर १३ टिव्ही त्याच्या घरात बसवले होते.

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी

कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे

छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक-कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे

निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे

लवचिकता आणि स्वास्थ्य

लवचिकता आणि स्वास्थ्य
================

-राजीव उपाध्ये

माझे विद्वान मित्र डॉ० जगन्नाथ दीक्षित (एम०डी०, वय ८५) आणि मी यांच्यात एक समान धागा म्ह० आम्ही दोघेही दीर्घायुष्याची रहस्ये आधुनिक संशोधनाच्या मदतीने शोधण्यात गुंतलेले आहोत. मिळालेली माहिती नवे ज्ञान एकमेकांमध्ये वाटायचे आणि शक्य तेव्हढे आपल्या आणि आपल्या आप्तेष्टांच्या कल्याणासाठी उपयोगात आणायचे हे आम्हाला आवडते. त्यांनी मला सांगितलेले दीर्घायुष्याचे एक महत्त्वाचे रहस्य म्हणजे "लवचिकता" - शरीर जेव्हढे लवचिक तेव्हढे आयुष्य आरोग्यपूर्ण आणि दीर्घ आणि अर्थपूर्ण.

ए०आय० आणि मी

ए०आय० आणि मी
============

-राजीव उपाध्ये

सध्याच्या ए०आय० त्सुनामीमध्ये व्यक्तीगत पातळीवर ए०आय० कसा हानीकारक आहे, यावर परत-परत येणार्‍या नकारात्मक बातम्या बर्‍याच घातक आहेत. यात ए०आय०चा सल्ला कसा चुकीचा ठरला, हे मनावर बिंबविण्याचा प्रयत्न सतत केला जातो. पण ए०आय० ची चांगली बाजु भारतात तरी पुरेशी प्रकाशात आणली जात नाही, असे माझे मत बनले आहे.

शेवटचा तुकडा..

जतिन साधा माणूस आहे.  खूप शांत माणूस आहे.

कुणाच्या अध्यात ना मध्यात.

असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे.  शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते.

त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते.

चार खंडांतील माझे जलतरणास्तित्व

जगात दोन प्रकारचे लोक असतात. व्यायाम करणारे किंवा व्यायाम न करणारे. (अधूनमधून करणारे/अधूनमधून न करणारे = करणारे) पण मी जे दोन टोकाचे गट म्हणते आहे ते म्हणजे काहीही झालं तरी व्यायाम करणारे आणि काहीही झालं तरी व्यायाम न करणारे. म्हणजे उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून, पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून आणि थंडीत थंडी आहे म्हणून व्यायाम न करणारे. त्याउलट, उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून); पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून) आणि थंडीत थंडी आहे म्हणून.... वगैरे वगरे..न चुकता रोज व्यायाम करणारे. व्यायाम चुकल्यावर खिन्न होण्याचा प्रश्नच येत नाही कारण व्यायाम कधी चुकतच नाही.

स्त्रियांच्या जगात पुरुषाचे स्थान

(जागतिक महिला दिनानिमित्त) 

जीवशास्त्र व आनुवंशिकता विज्ञानाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा अभ्यास केला तर असे जाणवते की एकविसाव्या शतकाच्या मध्यावर एखाद्या जोडप्याला मूल हवे असेल तर मुलगीच पाहिजे असा आग्रह धरला जाईल. कुठलाही सुज्ञ मनुष्य मुलगा हवा अशी इच्छा करणार नाही. सबल पुरुष व अबला स्त्री ही संकल्पना कालबाह्य होईल.