Skip to main content

नार्सिसिस्ट

नार्सिसिस्ट
=======

-राजीव उपाध्ये

आम्ही तुझ्याशी विकृत वागलो,
हो, वागलो.
कोण म्हणतो
हा अपराध आहे?
हा शब्द आमच्या
शब्दकोशात नाही.

आम्ही जे करतो
तो आमचा स्वभावधर्म
आणि आमच्या
स्वभावाला प्रश्न विचारणं
हा तुझा उद्दामपणा.

विंचू डंख करतो
त्याच्या शेपटीतच लिहिलंय विष,
मग त्याला दोष द्यायचा?
त्याला समजावायचं?

नाही, तूच शिकायला हवं होतंस
डंख सहन करायला,
अंगात भिनत जाणार्‍या विषाला
शांतपणे पचवायला.

कारण इथे
वेदना ही तुझीच मालमत्ता आहे,
आणि आम्ही
फक्त तिचे निमित्त.

हिंस्र आणि सुंदर पाकिस्तान - दानियाल मुईनुद्दीन

सत्ता, सामाजिक उतरंड आणि मानवी महत्त्वाकांक्षेचा चित्तथरारक प्रवास असलेली कादंबरी ‘धिस इज व्हेअर द सर्पंट लिव्ह्ज’. दानियाल मुईनुद्दीन लिखित कादंबरीचा परिचय.

लवचिकता आणि स्वास्थ्य - २

लवचिकता आणि स्वास्थ्य - २ 
================ 

-राजीव उपाध्ये 

टीप - १ला भाग १७ मार्च रोजी प्रसिद्ध केला आहे. 

स्वास्थ्य म्हणजे काय? 

आधुनिक वैद्यकशास्त्रात स्वास्थ्याची कल्पना स्पष्ट करण्यासाठी दोन महत्त्वाच्या संकल्पनांची मदत घेतली जाते. या दोन्ही कल्पनांमध्ये "संतुलन" ही कल्पना केंद्रस्थानी आहे. या संकल्पनाना - होमिओस्टॅसिस आणि ॲलोस्टॅसिस अशा दोन संज्ञा इंग्रजीत वापरल्या जातात. मला या दोन्ही कल्पनांना मराठीत योग्य प्रतिशब्द न सापडल्याने मूळ इंग्रजी शब्द मी तसेच पुढे वापरले आहेत. 

'लिव्हिंग विल' (वैद्यकीय इच्छापत्र) व डिजिटल प्लॅटफॉर्मची अंमलबजावणी

वैद्यकीय उपचारांबाबतचे इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल कायदेशीरदृष्ट्या नोंदणीकृत कसे करावे?

टर्मिनेटर कथा.

एक इ- साप नीति कथा!
“आयला, मला काय काम दिले आहे स्कायनेट ने. म्हणे जा आणि पुण्याचे कृबू इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट कर. निव्वळ वेळेचा अपव्यय.”
नाही, टर्मिनेटर असे काही बोलला नाही. त्याचा टास्क होता, पुणे युनिवर्सिटीत जाऊन त्यांच्या IT विभागात जाऊन एक चिल्लू पीसी वरचा कृबू प्रोग्रॅम नष्ट करायचा होता, टर्मिनेटरने IT बिल्डींगची आधीच तोडफोड केली होती आणि आता तो पासवर्द रक्षित रूमच्या बाहेर उभा होता. एक टन वजनाच्या तीन मशीनगनपैकी एका मशीनगने त्याने तो ही दरवाजा तोडला. पासवर्द हॅक करणे असल्या अहिंसात्मक उपायांवर टर्मिनेटरचा विश्वास नव्हता. दया दरवाजा तोडो हा त्याचा मंत्र होता.

कलांच्या भिंतींपल्याड - अरुण खोपकर

विविध कलांच्या सीमारेषा ओलांडून त्यांच्यातील आंतरिक नात्याचा शोध घेत आपल्या सृजनशीलतेवर झालेले संस्कार उलगडून दाखवणारा अरुण खोपकर यांचा लेख.

भारत आणि ए०आय०

भारत आणि ए०आय०
===========

--राजीव उपाध्ये

आय०आय०टी० मुंबई चे सध्याचे संचालक प्रा० शिरीष केदारे आणि मी आय० आय० आय० टी० त असताना चांगले "अरे-तुरे"तील मित्र होतो. आम्ही एकाच वयाचे, पण वेगवेगळ्या शाखा आणि हॉस्टेल. संस्कृतप्रेम आणि गिर्यारोहण हा तेव्हा आमच्या मधला समान दुवा होता. आमचे कधी वाद आणि भांडणे झाली नाहीत, तसेच त्यांच्यामुळे माझे वैयक्तिक नुकसान पण झालेले नाही. त्यामुळे माझा त्यांच्यावर वैयक्तीक राग पण अजिबात नाही. उलट आपला मित्र आय०आय०टी० सारख्या जगप्रसिद्ध संस्थेचाचा संचालक झाला हे कळले तेव्हा अंगावर मूठभर मांसच चढले होते.

धुरंधर सिनेमा: गुप्तचर कारवाईचा गौरव की सनातनी अजेंडा?

मी स्वतः पंतप्रधान कार्यालयात असताना, सर्वश्री ए. एस. दुलत आणि एम. के. नारायण साहेबांचा पी.ए. राहिलो असल्याने, गुप्तचर कारवाई म्हणजे काय आणि त्या कशा कार्य करतात याची थोडी कल्पना होती. शत्रू देशांत राहून आलेल्या काहींनी त्यांचे किस्सेही सांगितले होते. म्हणून हा सिनेमा बघितला.

कन्या सासुरासी जाये - अरुण खोपकर

कित्येक वर्षं सोबत केलेल्या पुस्तकांचा निरोप घेणं सोपं नसतं, सांगताहेत अरुण खोपकर.