विचार कोणता असावा

आतापर्यंत या स्थळावर तसेच इतर अनेक स्थळांवर इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम हा विषय चघळून चघळून बाद झाला असावा. माझा प्रश्न इंग्रजी माध्यम की मराठी माध्यम नाही. प्रश्न असा -
ज्यांनी ज्यांनी गेल्या वीस ते तीस वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु केल्या, त्यातील काही जण मराठी माध्यमात शिकलेले होते. ज्या मराठी शाळेत आपण शिकलो तिलाच मदत देऊन मोठी करण्याचा विचार केला असता तर सुयोग्य झाले असते. त्या ऐवजी इंग्रजी माध्यमातील शाळ सुरु करावी, असा विचार का आला असावा ?
खाली काही पर्याय देतो. त्यातील तुमच्या दृष्टीने योग्य पर्याय कोणते वाटतात ?
1. काहीतरी नवे करण्याची इच्छा.
२. शिक्षण क्षेत्रात क्रांती इत्यादी घडवण्याची इच्छा.
३. यापुढील काळ इंग्रजीचाच आहे. घ्या वाहत्या गंगेत हात धुवून.
४. महाराष्ट्रातील विद्यार्थी जागतिक पातळीवर कमी पडता कामा नयेत, हा प्रामाणिक विचार.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet