सध्या काय ऐकताय/अलिकडं काय ऐकलंत? - ५

या आधीचे भाग (गब्बरनं बळकावलेलं खोरं Wink ) :

भाग १| भाग २| भाग ३| भाग ४

एका कामासाठी लोकगीते शोधत होतो. लग्नाच्या, गोंधळ-जागरणाच्या सीजनमुळे तशी ती आपसूकच अॅम्प्लीफाईड होऊन कानावर पडताहेत, पण ती ऐकता त्यांना पारंपारिक लोकगीते कितपत म्हणावीत अशी शंका येऊ लागली आहे. घराशेजारच्या एका जागरणात "मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून"ची फर्माईश केली गेली. त्या वाघ्याचा क्षणात अजय गोगावले झाला आणि बेट्यानं दुसरं कडवं "ओढ लाविती अशी जीवाला" हे सुरु केले. न राहवून मीच पुढाकार घेतला आणि मनातल्या मनात शाहीर साबळेंची क्षमा मागून गळा सोडला. (सध्या झी मराठीच्या नव्या खुळामुळे लोकली आम्ही फार्मात आलो, म्हणून झी मराठीचे खास आभार Wink )

तसंच आणि मला अतिशय आवडणारं हे गाणं. ते इथे वाचा आणि कोपऱ्यातल्या प्लेयरवर ऐका: माझ्या कानड्या मल्हारी.

त्यातला पुंडलीक फरांद्यांचा आवाज लई आवडतो. कोरस माती खातो, तेवढं खुपतं. पण फरांद्यांच्या गाण्यामुळे त्यांना माफ करावं. शेवटच्या दोन शब्दांच्या मधल्या अवकाशाला किंचितसा ताणून् पहिल्या शब्दाचे शेवटचे अक्षर , दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर अस्पष्ट उच्चारायची लकब विषेश प्रिय. काही शब्द गावठी निवांतपणा दाखवावेत तसे उच्चारणे (कैवारी च्या ऐवजी गैवारी सदृश्य उच्चार, क चे ग आणि ख चे घ) मध्येच स्वरांच्या पातळ्या खटक्यासारख्या बदलणे (बानू भाळली भाळली, माझा देव हो देव हो झालाय येडा) जबरा.

शिवाय खंडेरावाला "माझा देव हो देव हो झालाय येडा, लुटी धनगर-गावड्यांचा वाडा" म्हणून पार सलगीत आणल्याबद्दल ही रचना आवडते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

मला ते अनुनय अन लटक्या रागाचं "शुक शुक मन्या जातोस की नाही की पाठीत घालू लाटणं" गाणं प्र-चं-ड आवडतं.

http://www.aathavanitli-gani.com/Song/Shuk_Shuk_Manya

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वनराज भाटीयांची अनंत द एंडलेस हे कंपोझिशन http://play.raaga.com/hindi/album/Anant-The-Endless-Vol-1-HD000147 इथे ऐकतोय. भाविकांसाठी अर्थ आणि नास्तिकांसाठी संगीत फार उत्तम आहे.
----------------
याची माझ्याकडे मागे सीडी होती. आमचा या सीडीने एकदम इंटरस्टेलार केलेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

येथे पहिल्या दिवशी जाणे झाले. हापिसातून जायला उशीर झाल्याने श्री. जाधव (सुंद्रीवादन), सौ. सानिया पाटणकर (गायन) आणि श्री. प्रभाकर-श्री. दिवाकर कश्यप (सहगायन) ऐकायला मिळाले नाही. पं. शिवकुमार शर्मा यांनी राग चारुकेशी वाजवला. चारुकेशीमध्ये आलाप व जोड, त्यानंतर अनुक्रमे रुपक, अध्धा आणि द्रुत त्रितालातील रचना वाजवल्या. रुपक तालातील रचना वाजवताना ते तालाशी आणि लयीशी जे काही खेळले, त्याला जवाब नाही. बराचसा भाग कळतोय असं वाटत असताना वेगळ्या वजनात आणि लयीत वाजवायला सुरुवात करत होते. सोबत तबलासाथीला पं. विजय घाटे होते. त्यांनीही अतिशय मस्त साथ केली, ज्यामुळे पं.शिवकुमारांच्या ताल/लयीच्या चाललेल्या गमती निदान थोड्याफार तरी कळू शकल्या. यानंतर त्यांनी दादर्‍यातील मिश्र पहाडी सदृश एक धुन वाजवली. अर्थात धुन वाजवताना रागाचं कुठलंही बंधन नसल्याने एका रागातून दुसर्‍या रागात जाणे, विवादी स्वर लावणे, तिरोभाव वगैरे गोष्टी नेहेमीच्या कौशल्याने त्यांनी वाजवल्या. त्यामुळे ती धुन ऐकायला फारच मजा आली. असो. साऊंडवाला मेजर म्हणजे मेजरच माती खात होता. मागील रांगातील लोकांना ऐकू न येणे, बेस-हाइज जास्त असणे, मिड्स अजिबातच कमी असणे यामुळे श्रोत्यांसोबत कलाकारही वैतागले होते. त्यात परत मांडवात उकडत होते आणि नेमके स्टेजच्या वर पंखे नसल्याने पंडितजींनी जाता जाता एकूणच संयोजनाचे वाभाडे काढले.

नंतर 'संगीतमार्तंड' आणि त्यांची टोळी 'स्वरमंचा'वर आली (हा खास आनंद देशमुखी सवाई शब्द बरं का). सर्व शिष्य आणि कन्या दुर्गा जसराज यांना घेऊन स्थानापन्न झाल्यावर आणि नेहेमीचे 'जय हो' वगैरे करुन झाल्यावर असे कळले की आज काही संगीतमार्तंडांचे गाणे ऐकण्याचा योग नाही. त्याऐवजी त्यांच्या शिष्यांनी गायलेल्या त्यांच्या बंदिशी आणि सोबत सं.मां. यांची लाईव्ह कॉमेंट्री/प्रकट मुलाखत असा मामला आहे. भैरव रागातली (रात्री!) पहिली बंदिश सौ. गार्गी सिद्धांता-गुप्ता यांनी पेश केली. मग निरुपण, मग अंकिता जोशी यांनी पूरिया रागातली एक बंदिश गायली. मग पुन्हा निरुपण आणि मग श्री. प्रीतम भट्टाचारजी यांनी काफी रागातला एक टप्पा गायला. टप्पागायन चालू असताना सं.मा. अचानक स्टेजवरून उठून गेले. आणि मग आम्हीही बाहेर पडलो. पुढल्या महिन्यात सं.मा. ८५ वर्षांचे होणार आहेत असे कळाले. त्यांच्या विद्वत्तेबद्दल्/कलेबद्दल पूर्ण आदर राखूनही असे म्हणावेसे वाटते की आपल्याला जर होत नसेल तर गायचा (किंवा सवाईच्या स्टेजवर हजेरी लावायचा) अट्टाहास कशासाठी? शिष्य्वृंद जर चांगला गात असेल तर त्यातीलच एखाद्याला संधी द्यावी. असो. अशी भावना फक्त माझी नसून सवाईला आलेल्या कित्येक लोकांनी बोलून दाखवली.

आज झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि येत्या २-३ दिवसांत मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे सवाई गंधर्व महोत्सवच रद्द करण्यात आलेला आहे. आता उर्वरित ३ दिवसांचा महोत्सव त्याच कलाकारांना घेऊन जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात होईल असे कळते. श्रोत्यांना त्याच तिकिटावर तो ऐकता येईल, फक्त आहेत ती तिकिटे जपून ठेवावीत असे संयोजकांनी सांगितले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंद्रीवादन छानच झालं. भीमन्ना जाधवांनी गायकी ढंगाने वअजवल्यामुळे (भीमपलास) मला जास्त भावलं असावं.

सानिया पाटणकरांचं गायन मला तरी फारसं भावलं नाही. श्री राग फारसा आवडत नसल्यानेही असू शकतं.

कश्यप बंधू जबर तयारीने गायले. अशा महोत्सवातलं गाणं हे "कलेची खिडकी" असावं - त्याप्रमाणे त्यांच्या गायनाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

साऊंडवाला मेजर म्हणजे मेजरच माती खात होता.

अगदी अगदी. तबल्याचा आवाज होळीतल्या टमकीसारखा सपाट येत होता.

सं. मां. बद्दलही सहमत. कुठे थांबायचं माणसाला कळलं पाहिजे...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सानिया पाटणकरांचं गायन मला तरी फारसं भावलं नाही. श्री राग फारसा आवडत नसल्यानेही असू शकतं.

श्री राग गाणं हीच एक तारेवरची कसरत आहे. एक तर रागाचा जीव लहान आहे. पूरिया धनाश्री सारखा तो दळता येत नाही. त्यात परत मुख्य न्यास तार कोमल ऋषभावर (तो ही चढा) असल्याने तो बर्‍याच वेळा दाखवावाच लागतो. आणि मग जर तुमच्या गाण्यात भावदर्शीपणा नसेल तर तो सतत दाखवलेला कोमल ऋषभ कर्कश्श वाटायला लागतो. आणि अशा रीतीने श्री राग पडतो. गेल्या वर्षी सवाईत कोणीतरी सारंगीवर श्री राग वाजवला होता. वाजवला चांगला, पण एक तर सारंगीचा आवाज मुळात शार्प असल्याने थोड्या वेळाने ते वादन अत्यंत कर्कश्श वाटायला लागले होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अध्यात्माची डूब असलेली अतिशय सुंदर रचना, तितक्याच ताकदीने शुजात हुसेन यांनी गायलेली.
_______
https://www.youtube.com/watch?v=LPvtpXtv0Lg
मै तो पियासे नैना लडाई आयी रे,
घर नारी कुंवारी कहे तो कहे, मै तो पिया से नैना लडाई आयी रे!
सोहनी सुरतियां, मोहनी मूरतियां
मै तो हृदय के पीछे समाइ आयी रे| ..... घर नारी कुंवारी कहे सो कहे ..
सेज हो सोनी देख के रोऊं, रोऊं मै दिन रैन
पिया पिया करत हाये, पलभर सुख ना चैन
- आमीर खुस्रो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आकाशवाणीवर देबू चौधरी या सितारवादकाची एक हृदय मुलाखत (मधे मधे त्यांच्या आबडत्या जुन्या काळातल्या गोड गाण्यांची खुमास देऊन) ऐकली. त्यांनी म्हणे ८ नवे राग रचले आहेत. माझी अशी कल्पना होती की राग जनरली नव्याने बनत नाहीत. ते मिसळले इत्यादी जातात. आपल्या पित्याच्या आणि पत्नीच्या कोमल आठवणींतून त्यांनी त्यांच्याच नावे केलेले राग रचले हे विशेष भावून गेले.
http://en.wikipedia.org/wiki/Debu_Chaudhuri

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही मुलाखत आज रात्री पुढे चालू आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वा सुंदर गाणं सापडलं. Smile

https://www.youtube.com/watch?v=zmYMkl1Grzc

अन हे - डेव्हिल वेन्ट टू जॉर्जिआ तर अत्यंत आवडते आहे
https://www.youtube.com/watch?v=K6RUg-NkjY4

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काल दि. १३ रोजी पं. उल्हास कशाळकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे झालेल्या सत्कार समारंभाला गेलो होतो. पं. फिरोज दस्तूर फाऊंडेशन, पुणे यांनी हा समारंभ आयोजित केला होता. पूर्वार्धात सत्कार आणि उत्तरार्धात पं. कशाळकर यांचे गायन असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. कचेरीतून यावयास उशीर झाल्याने सत्कार समारंभास उपस्थित राहाता आले नाही, परंतु मुख्य गाण्याचा कार्यक्रम मात्र पूर्ण ऐकावयास मिळाला.

पं. कशाळकर यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग कामोदने केली. त्यात विलंबित झुमर्‍यात ख्याल, आणि मध्य-द्रुत त्रितालात 'जाने ना दूंगी' ही चीज सादर केली. यानंतर राग बहार पेश केला, ज्यात त्यांनी 'फुलवाले कंथ' ही अतिशय पुरानी मध्यलय त्रितालातील चीज ('अख्तर पिया' म्हनजेच वाजिद अली शाह यांनी रचलेली. हे नवाब वगैरे होते म्हणतात. नक्की तपशील शोधावा लागेल.) आणि 'बन बन फूली' ही द्रुत एकतालातील बंदिश गायली. कार्यक्रमाचा शेवट त्यांनी 'तुम हो जगत के दाता' (रुपक ताल) या त्यांच्या नेहेमीच्या भैरवीने केला. 'ही बंदिश मी उस्ताद विलायत खांसाहेबांच्याकडून घेतली' असे त्यांनी सांगितले.

पं. कशाळकरांचं गायन ऐकणं हा एक विलक्षण अनुभव असतो. रागाची शुद्धता आणि बंदिशीची सर्व अंग सांभाळत, सजवत त्यांचं गाणं जे चढत्या क्रमाने रंगत जातं त्याला तोड नाही. ग्वाल्हेर-आग्रा गायकीची सगळी अंग (न रेंगाळता सरळ रागाच्या चलनाला हात घालणारी शिस्तबद्ध बढत, झुमरा आणि तिलवाड्यासारखे ताल आणि लयीवर विलक्षण प्रभुत्व; क्लिष्ट, तरीही वजनदार आणि रागाचं चलन सांभाळणार्‍या ताना, अफाट बोलताना, बोलबनाव, वगैरे. शिवाय खास जयपूर घराण्याची न तोडता आवर्तन बांधण्याची पद्धत ही वेगळीच) तर त्यांच्या गाण्यात दिसतातच शिवाय उत्तमोत्तम राग, पुरान्या बंदिशी ऐकायला मिळतात त्या वेगळ्याच. कालचंच उदाहरण द्यायचं झालं तर कामोद (जो पूर्वीच्या काळी बेसिक राग समजला जायचा), जो आजकाल फार कमी ऐकायला मिळतो, तो ऐकायला मिळाला. संध्याकाळ सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले (कार्यक्रम विनामूल्य असल्याने समाधान आणखीनच वाढले हे वेसांनल) Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्यासारखी शास्त्रीय संगीत जाणणारी, श्रवणारी पिढी आमच्यासारख्या ती ऐकू, कळू न शकणार्‍या पिढीने रिप्लेस होत आहे याचा कधी कधी विषाद वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घाटावरचा भट तुमच्यापेक्षा वयाने कमी असेल असा एक अंदाज! तरीही तुम्ही त्यांना रिप्लेस करत असाल तर माझी हर्कत कैच नाही Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उदाहरण द्यायचं झालं तर कामोद (जो पूर्वीच्या काळी बेसिक राग समजला जायचा), जो आजकाल फार कमी ऐकायला मिळतो, तो ऐकायला मिळाला.

त्यांचा कदाचित या वाक्याने तसा समज झाला असावा. पण आपल्या अंदाजाशी सहमत.

@अरुणजोशी

तुमच्या बालपणीचा काळ जर नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात / त्यानंतर येत असेल तर होय, तुम्ही आणि तुमची पिढी आमच्यासारख्यांना रिप्लेस करत आहे. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुमच्यासारखी शास्त्रीय संगीत जाणणारी, श्रवणारी पिढी आमच्यासारख्या ती ऐकू, कळू न शकणार्‍या पिढीने रिप्लेस होत आहे याचा कधी कधी विषाद वाटतो.

अगदी.

गेल्या जन्मी आम्ही काय पाप केलं होतं देव जाणे. पण एक वाद्य वाजवता येत असेल तर शपथ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अहो गिटारच्याच "नोट्स" वाजवल्या पाहिजेत असं थोडंच आहे! Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जॉनी कॅश यांच्या मुलीचं रोझॅना कॅशचं पहीलं मनोगत अन नंतरचं गाणं फार गोड आहे. जरुर पहा.

https://www.youtube.com/watch?v=vLwocVPaGsE


_______

हे देखील छान आहे - "Hey, Good Lookin" - HANK WILLIAMS

https://www.youtube.com/watch?v=PsjTp77LBHA
_____
सुंदर - Waylon Jennings – Good Hearted Woman
https://www.youtube.com/watch?v=fGWzobVD_Do

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"Guess who is coming to dinner" फार छान सिनेमा आहे. नायक काळा आहे अन नायिका गोरी अन नायिका नायकाला घरी जेवायला बोलावते व आई-वडीलांना अश्चर्यमिश्रित आनंद, काळजी आदिचा धक्का देते.
तिचे आई-वडील काळा जावई स्वीकारतात का, त्याचे आई-वडील गोरी सून स्वीकारतात का? ते कोणत्या turmoil मधून जातात हे कथानक.

You've got to give a little, take a little,
and let your poor heart break a little.
That's the story of, that's the glory of love.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यातला काळा नायक उच्चशिक्षित वगैरे आहे का?

ओबामा अमेरिकेचा राष्ट्रपती झाला तेव्हा त्याच्या आईवडिलांच्या लव्हस्टोरीशी एक पिच्चर कसा सिमिलर व समकालीन आहे इ.इ. चर्चा वाचल्याचे आठवते. बहुतेक हाच असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय उच्च्शिक्षित आहे. बरोबर Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अच्छा, धन्यवाद!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुझे देखील आभार. ओबामाच्या आई-वडीलांचा संदर्भ माहीत नव्हता बॅट्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"I mean, you got the first mainstream African-American who is articulate and bright and clean and a nice-looking guy,"

जो बिडेन ओबामा बद्दल बोलताना ( २००७ )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

nice-looking guy

Really? गोर्‍या sissy पुरषांपेक्षा हे काळे कितीतरी पटीनी अन संख्येने जास्त देखणे पाहीले आहेत. One of them being Denzel Washington. आता सोडा, तो म्हातारा झालाय. पण फार देखणा होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Denzel Washington हा माझ्या बायकोला पण आवडतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile हाहाहा ह्म्म!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हॉलीवूडमधले काळे हीरोज गोऱ्यांपेक्षा देखणे आहेत. मला आणि माझ्या बायकोला तर स्टीव हार्वी सुद्धा आवडतो. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile ह्म्म मी पाहीला आता हार्वी चा फोटो. मला ओके वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लोकांना इद्रिस एल्बा पण आवडतो. त्याला जेम्स बाँड करायचा चाललाय. हाय का आव्वाज?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द ऑफिसमध्ये काही दिवस पाहुणा कलाकार टाईप म्हणून आला होता तो. द वायरमध्ये झकास काम केलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याला जेम्स बाँड करायचा चाललाय. हाय का आव्वाज?

आयला! करा करा रे जेम्स बॉन्ड.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे खूप भारी आहे. मेराज़-ए-गझ़लमधलं आहे.
'बडी ठंडी जलन' तर हेवनली म्हटलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुस्पट मोड ऑन.

ते गझ़ल नाही, ग़ज़ल आहे.

खुस्पट मोड ऑफ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ती ऐकूनही बघा 'ग़ज़ल'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्सार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

'बडी ठंडी जलन' तर हेवनली म्हटलंय.

+१ छान उच्चारला आहे, तो शब्दच "ठंडी जलन" काय खतरनाक आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निना सिमोन यांचे - "फीलींग गुड" - https://www.youtube.com/watch?v=OfJRX-8SXOs गाणं ऐकतं अन तीव्रतेने वाटलं अरे हेच गाणं फ्रॅक सिनात्रा यांनी, त्यांच्या उमद्या, तारुण्याने सळसळत्या आवाजात कसे म्हटले असते? Smile
हां आता मायकल बुब्ले यांनी तेच गाणं व्याकुळ आवाजात गायलय पण .....
I felt that song is totally cut out for Frank Sinatra
.
.
निना सिमोन चं "आय पुट अ स्पेल ऑन यु" मस्त आहे. Totally spooky voice.

.
.
पण नाही "फीलींग गुड" सारख्या गाण्यास मला नीना यांचा आवाज योग्य वाटला नाही. त्यांचा आवाज अति अध्यात्मिक किंवा मग एकदम spooky गाण्यांकरता योग्य वाटतो.

तसाच आवाज आहे - Carole Alston यांचा. तो खालील अध्यात्मिक = आफ्रिकन अमेरिकन प्रार्थनेत "कुंबाया" छान वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर!! तलत मेहमूद म्हणजे बोलायचं काम नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

तलत चं नॉस्टॅल्जिया ला संप्रेरक देणारं गाणं. गाण्यावर जान कुर्बान. किती किती सुंदर संध्याकाळा या एका गाण्यावर बहरलेल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.youtube.com/watch?v=m6mOQss4L5g

...आणि ही त्याचीच हॉरर आवृत्ती:

http://www.youtube.com/watch?v=FFM1nafbM9s

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राज कपूर-नर्गिसचे हे गाणे उत्कट वाटते. अद्भुत तर आहेच. अन एक दोषास्पद म्हणजे - काळे-पांढरे (सुष्ट-दुष्ट) वातावरण दाखवणारे आहे. बरचसं बायपोलरच्या डिप्रेशन-मॅनिया सारखं. अन म्हणूनच आवडतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

http://www.aathavanitli-gani.com/Song/Geet_Houn_Aale_Sukh_Majhe
या गाण्याबद्दल मी मनातले छोटे मोठे विचार मधे एक प्रश्न टाकला होता. ते गाणं नेटवर सापडलं. गाण्याचा फक्त सुर माझ्या लक्षात होता आणि त्यातला भावना हा शब्द. हे गाणे गावातल्या मोठ्या लाउडस्पीकर्सवर लागायचे. ग्रेट अनुभव होता तो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इव्हिनिंग इन गे महाराष्ट्रा हे १९६९ मधलं खूप मस्त गाणं माझ्या लहानपणी खूपदा ऐकलं होतं. त्यावेळी "गे" चा अर्थ केअरफ्री आनंदी असा होता.

त्यावेळी रेडिओसाठी मुख्यतः हे बनवलं होतं. परवीन वाच्छा गायक. मिना कावाचं संगीत (चूभूदेघे).

नुकतंच हे गाणं सुमन श्रीधरने आपल्या खास आवाजात अप्रतिम येडेचाले अन स्कॅट वगैरे करुन गायलं आणि ते गे अँथेम अशा रुपात प्रसिद्ध झालं. सुमन श्रीधरची गाणी का आवडतात हे न सुटलेलं कोडं आहे. पण जबरदस्त आवडतात. अगदी तिच्या बेवड्या अदाकारीयुक्त गाण्यांबाबतीतही हेच म्हणणं आहे. काहीजण तिला बेसूर म्हणतात.. पण हे नक्की बेसूर म्हणायचं की मनसोक्त गाणं ? आय डोंट थिंक शी सिंग्ज आउट ऑफ ट्यून.

या व्हिडीओतल्या तिच्या अदाही खासच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

Invictus या माझ्या आवडत्या चित्रपटात शेवटच्या मॅचच्या वेळी हे गाणं वाजत राहतं. त्याची एनर्जी त्या पूर्ण प्रसंगाला मिळाली आहे आणि साऊथ आफ्रिकन विवक्षित संस्कृतीला एकदम योग्य ..
मग ते शोधलं. तर त्या मूळ अल्बम मधलं आणि वेगळं दोन्ही मिळाली

shosholoza invictus

shosholoza other

इतरांप्रमाणे युट्युब व्हिडिओ कसा इथे टाकायचा हे समजलं नाही म्हणून फक्त दुवा दिला आहे..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एम्बेड या भागातील लिंक टाकायची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हा एम्बेड भाग कुठे असतो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यूट्यूब विडिओ > खाली Share > Embed मधे लिंक मिळते. ती <. iframe.=""> स्वरूपाची असेल. तिथून डकवता येतो विडिओ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Nako re Nandlala
नको रे नंदलाला ...
धरू नको रे हरी पदराला.
लहानपणी ऐकलेलं एक गाणं आठवलं म्हणून युट्यूबलं आणि मिळालं. आशाताई या गाण्यात क्लासिकल टू मॉडर्न टू क्लासिकल असा जो ताल बदलतात तो अद्वितीय आहे. गाण्याच्या गोडव्याचं वेगळं रिकमेंडेशन करायला नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मागे बोले माय

मागे बोले माय ! मागे बोले माय !
कान्हू घेउन जाय, रानी धेनू घेउन जाय
संगे चाले श्रीदाम सुदाम

गीत - शान्‍ता शेळके
संगीत - मीना खडीकर
स्वर - उषा मंगेशकर

अर्थ अंदाजे समजला, पण गाणं अतिशय सुश्राव्य आहे.

इथे ऐका: http://www.aathavanitli-gani.com/Song/Kanhu_Gheun_Jaay

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

होय गोड आहे हे गाणं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

फार वर्षांपूर्वी सुधीर गाडगीळांनी मीना खडीकरांची एक मुलाखत दूरदर्शनसाठी घेतली होती. उषा मंगेशकर अधूनमधून उदाहरणादाखल गात होत्या. त्यात मीनाताईंनी - हे गाणे एका नेपाळी लोकसंगीताच्या धुनेवर बेतले आहे - असे सांगितल्याचे आठवते. यू-ट्यूबवर ती चित्रफीत दोन वर्षांपूर्वीपर्यंत होती. आता शोधली पण सापडली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहा! पूर्वी सकाळी १० साडेदहाच्या दरम्यान आकाशवाणी मुंबई-ब ला सुगम संगीत प्रकारत हे गाणं बरेचदा वाजवायचे. आवडायचं मला ते. आता वाचल्यावरही कानात वाजू लागलं.
म्हणे, माझ्या लेकरा रे
माझ्या वासरा रे
उशीर नको लावू
वेगे परत घरी ये रे
सूर्य येता माथी तुझे पोळतील पाय
संगे चाले श्रीदाम सुदाम....

उषा मंगेशकरांची अशी काही वेगळीच गाणी एखाद दोन तरी आहेत. एक आठवतच नाहीय पण बंगाली लोकधून वर बेतलेलं नववधूशी स्ंबधीत. ( शालू हिरवा नाही .)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आहाहा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाह!! फारच फारच गोड!! कलिजा खलास झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

येत्या गणपतीतलं हिट गाणं - जय मल्हार सिरियलमधलं "बानुबया बानुबया". लिंक मिळाली की देतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

कर्नाटकी संत आणि कवि श्री. पुरंदरदास यांचं हे एक कानडी भजन आहे. आता मला कानडी अजिबात येत नाही. पण हे एकतर भजन आहे आणि त्यातले बरेचसे शब्द संस्कृतोद्भव आहेत त्यामुळे अर्थ समजायला फारशी अडचण येत नाही.
हे भजन पूर्वी एम एस सुब्बलक्ष्मी यांनीही गायलेलं आहे पण ते कर्नाटकी शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने! इथे हेच भजन पं. कैवल्यकुमार गुरव यांनी गायलं आहे ते आपल्या महाराष्ट्रीय धुमाळीच्या स्टाईलने! थोडीफार पं. भीमसेन जोशींच्या स्टाईलची आठवण करून देणारं!
मला फार आवडलं, बघा तुम्हाला पसंत पडतंय का?
https://www.youtube.com/watch?v=r4AGYSGptaA

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! फारच मधुर आहे. त्याचा अर्थ किती सुंदर आहे-

Show yourself (fast) O Lord of Vaikuntha'
let me gaze upon you to my heart's content....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

https://www.youtube.com/watch?v=FheKFINaOIk&list=PLhHnlV3b9pFmTTeQDZ_Iwr...
राग केदार - उस्ताद बिस्मिल्ला खान. ३ दिवसांच्या सुट्टीत ६-७ दा ऐकला, पण मन भरेना.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे काहीतरी वेगळ्याच भाषेतलं ऐकण्यात आलं :-
https://www.youtube.com/watch?v=Tnm5-7cmJr0
.
.
नेमकं काय म्हणतोय हा बाबा ते कळत नाही.
पण ऐकत रहावंसं वाटतं.
गोड मधाळ लडिवाळ आणि क्वचित आर्तसुद्धा वाटलं(काही उर्दू गझला वाटतात तशा)
.
.
रेकॉर्डिंग बारिक आवाजातली आहे. हेडफोन लावून आणि मोथा आवाज करुन ऐका.
.
.
मधून मधून ऐकू येणारी बासरी, आणि तुणतुणणारं मेंडोलिन मस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गाणं पश्तोमधलं दिसतंय. फारशीच्या प्रभावामुळे, त्यातले काही शब्द ओळखीचे वाटताहेत. उदा. मन (=मी), संगदिल (=निर्दय), शे असर (=काय परिणाम), जिक्र इत्यादी.

चालही तशी परिचयाची आहे (किसी राह में किसी मोड पर... मेरे हमसफर, मेरे हमसफर)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१ मेच्या सुट्टीला जोडून कोकणात गेल्तो. जाताना दिवसाचा प्रवास होता. पुलं ऐकत गेलो. काही ठरवून प्लेलिस्ट बनवली नव्हती पण सुरुवातच अंतू बर्वा, म्हैस वगैरे ट्रॅक्सनी झाली. मजा आला. (ऐसीवरचे बरेच लोक पुलं आवडणं हे मध्यमवर्गीय मीडियॉक्रिटीचं लक्षण मानतात हे मला ठाऊक आहे. पण आपली आवड, त्याला इलाज नाही)

परत येताना रंगीला, युवा, तक्षक, ताल, द जंटलमन, हम से है मुक़ाबला वगैरे विंटेज रेहमान ऐकत आलो. 'रेहमानला आजकाल झालंय तरी काय?' या विचाराने हळहळ वाटली.

हा प्रतिसाद 'सध्या काय ऐकताय' धाग्याच्या मूळ हेतूला अनुसरून नाही हे मला ठाऊक आहे. पण मिळालेला आनंद शेअर करावासा वाटला म्हणून लिहिले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपली आवड, त्याला इलाज नाही

+१ त्याला इलाज नाही. हाथ मिलाओ.
माझ्या मोबाईलमध्येही पुलंचे १०-१२ ट्रॅक्स सतत असतात. आठवड्या-पंधरवड्यातून एखादं पारायण फ्रेशनेस देऊन जातं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सहसा मला, "lament" अर्थात शोक व्यक्त करणारी गाणी फार आवडतात हे लक्षात आले आहे.
हे सर्वात आवडतं गाणं आहे-
.

"

Late Lament
.
Breathe deep the gathering gloom,
Watch lights fade from every room.
Bedsitter people look back and lament,
Another day's useless energy spent.

Impassioned lovers wrestle as one,
Lonely man cries for love and has none.
New mother picks up and suckles her son,
Senior citizens wish they were young.
Cold hearted orb that rules the night,
Removes the colours from our sight.
Red is grey and yellow white.
But we decide which is right.
And which is an illusion?

"

हे दुसरं अत्यंत आवडतं गाणं

.
.
हे तीसरं अत्यंत आवडतं गाणं. बाप रे इतकं eerie वाटतं अन खरच सिनेमात अत्यंत समयोचित आहे
.
.
I was alright for a while
I could smile for a while
but I saw you last night
you held my hand so tight
as you stopped to say hello
you wished me well
you couldn't tell
that I've been crying over you
crying over you
and you said so long
left me standing all alone
alone and crying crying crying crying
it's hard to understand
but the touch of your hand
can start me crying
I thought that I was over you
but it's true so true
I love you even more than I did before
but darling what can I do
for you don't love me
and I'll always be crying over you
crying over you
yes now you're gone
and from this moment on
I'll be crying
crying
crying
crying
crying
crying
over you.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

'मॅड मेन' या मालिकेचा ग्रंथ या रविवारी आटोपतो आहे. त्या निमित्ताने, नॅन्सी सिनात्राचं 'यू ओन्ली लिव्ह ट्वाईस' पुन्हा ऐकलं.

[मालिकेतला संदर्भ. (कदाचित) नॉट सेफ फॉर वर्क!]

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

" वन लाईफ फॉर युवरसेल्फ अ‍ॅन्ड वन फॉर युवर ड्रीम्स ... "

फारच छान .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

उजेडात होते पुण्य - अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे - कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी- घडे लोकसेवा
उघड दार देवा आता.......

ही विडियोअक्लिप कशाची आहे; त्यात ऐतिहासिक तथ्य किती आहे; वगैरे मुद्दे जरा बाजूला ठेवून क्लिपमधलं नुसतं ब्याकग्राउंड म्युझिक ऐकून पहा.
मस्त अनुभव आहे. विडियो न पाहता नुसतच ऐकणं; विशेषतः ७ मिनिट २० सेकंदांनंतरचं म्युझिक.
.
.
https://www.youtube.com/watch?v=w6C5P-AYGdY
.
.
बादवे, हे स्वरवाद्य नक्की कोणतं आहे ?
पियानो वगैरे आहे का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मनोबास व अन्य सर्वांस हा प्रश्न आहे की - निराकार संगीत (= शब्दहीन) कोणी कसे ऐकू शकते? माझ्या डोक्यातील mundane विचार थांबतच नाहीत अशा संगीतामुळे उलट अधिक प्रकर्षाने जाणवतात. पण शब्दमय संगीत खूप आवडते विशेषतः शब्द-अब्द. कारण शब्दांत हरवून जायला होते स्वतःचा, आजूबाजूचा विसर पडतो.
जेव्हा तुम्ही असे निराकार संगीत ऐकता तेव्हा तुम्ही मनातील विचार कसे थांबवता?
___
एका व्यक्तीने मला सांगीतले होते की असे संगीत ऐकताना ती व्यक्ती स्त्रिया सकाळी, डोइवर घागर घेऊन पाण्यास निघाल्या आहेत वगैरे तो कल्पे.
तेव्हा मला वाटलेले- अरेच्च्या मग इतकं सगळं कशाकरता? हा द्राविडी प्राणायम कशाला सरळ शब्दवाली भूपाळी ऐका.
____
पण निराकार संगीत आवडणार्‍यांच्या बद्दल तीव्र कुतुहल वाटते खरे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नि:शब्द संगीत मला खूप आवडते. पण ते आवडताना डोक्यातील विचार थांबावेत असं कुठंय? उलट संगीतामुळे नवीन विचार सुरू होतात, नवनवीन भावच्छटांची अनुभूती येते. त्या अनुभूतीवर तरंगायला खूप मजा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१ डोसक्यात काहीतरी अ‍ॅबस्ट्रॅक्ट आकार येतात. लय भारी मज्जा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

युरोपियन ऑपेरावालं नि:शब्द वाद्यसंगीत ऐकताना तर ही अनुभूती कळसाला पोहोचते. आता यात लक्षावधी पीसेस आहेत, पण या निमित्ताने वन ऑफ माय ऑल टैम फेव्हरीट पीसची लिंक देतो.

https://www.youtube.com/watch?v=-XO_9q3hDOI

प्योत्र चायकोव्हस्की कंपोजर आणि हर्बर्ट फॉन कराजन कंडक्टर. इन्नफ सेड.

तरी अंमळ ब्याकग्रौंडः १८१२ साली नेपोलियनने रश्यावर आक्रमण केलं आणि रश्याने नंतर त्याचा यशस्वी प्रतिकारही केला. या सर्वांचं सिंबॉलिक रिप्रेझेंटेशन यातून कळतं. वैयक्तिक मला का कुणास ठाऊक हा पीस 'आपला' वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आदूबाळ व बॅटमॅन यांचे आभार.

उलट संगीतामुळे नवीन विचार सुरू होतात, नवनवीन भावच्छटांची अनुभूती येते. त्या अनुभूतीवर तरंगायला खूप मजा येते.

ह्म्म्म Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॅटमॅनाशी सहमत. शिवाय काही वाद्यं (विशेषतः वायुवाद्यं) मनापासून उत्कृष्ट वाजतात तेव्हा त्या वाद्याच्या आवाजात मनुष्याच्या गळ्यातून येणार्‍या आवाजाचे वेव्हफॉर्म्स सापडतात. वादकाचा उ:श्वास त्यातून बर्‍याचदा स्टेटमेंट्स करतो. फुंकणार्‍याची अधीरता, शांतता, आर्तता वगैरे मनातली बाहेर येणार्‍या श्वासाच्या आवाजात जाणवते.

सॅक्सोफोन, क्लॅरिनेट यात तर खूपच. खर्जात अधिक.

हा वैयक्तिक अनुभव आहे. इतरांनाही तसंच वाटत नसू शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वायुवाद्यांबद्दल विशेष सहमत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बासरी आवडते पण त्या स्वर्गिय अनुभूतीच्या पार्श्वभूमीवरती, मनातील mundane विचारच त्रास देऊ लागतात. उदा- घड्या घालायच्या आहेत, भाजी कोणती करु? मी वेळ वाया घालवते आहे का जे की अक्षम्य आहे वगैरे वगैरे Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनुभूतीच्या पार्श्वभूमीवरती, मनातील mundane विचारच त्रास देऊ लागतात. उदा- घड्या घालायच्या आहेत, भाजी कोणती करु? मी वेळ वाया घालवते आहे का जे की अक्षम्य आहे वगैरे वगैरे

हा पूर्ण वेगळा प्रॉब्लेम आहे. मुंडेन विचारांपासून दूर राहण्याचं किंवा थोडासातरी ब्रेक घेण्याचं ऑब्सेशन हे एकमेव कारण या समस्येमागे आहे.

संगीत, ध्यानधारणा, दारु, जप, व्यायाम वगैरेंना "सोल्यूशन" ऊर्फ "उपाय" म्हणून करणं हा खूप मोठ्या प्रमाणात केला जाणारा व्यर्थ खटाटोप आहे. आत निवांत तर बाहेर निवांत. अमुक एक करुन विचार जातील अशा आशेने ते करणं म्हणजे एक माईल्ड अ‍ॅब्यूसच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही "उपाय" या युटिलेटिरीअन दृष्टीकोनातून नाही. पण मस्त रवीवारी उठून आंघोळ करुन, एकटे बसले (कारण बाकी सारे उशीरा उठतात) की सिनेमा पहाता येतो पण निराकार संगीत ऐकता येत नाही - असा अनुभव आहे. जाम "वेळ घालवतोय" अशी टोचणी लागते. कितीतरी वर्षे खरं तर परवापरवापर्यंत मी फिक्शन वाचत नसे फक्त्त्त्त्त्त्त्त्त सेल्फ-हेल्प पुस्तके. आहे स्वतःला सुधारण्याचं ऑबसेशन आहे. आता खूप वर्षांनी "फिक्शन" मधील गोडी कळते. तेदेखील असं वाटूनच की हीच पात्रे खर्‍या जगात सापडतात. म्हणजे परत कल्पनेचा धागा वास्तवाशी घट्ट जोडला जातोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्लॅरिनेटवर भारतीय शास्त्रीय संगीत तर बाप वाजतं. रेड्योवरच्या "संगीत सरिता" नावाच्या कार्यक्रमात एकदा ऐकलं होतं. पाच दहा मिनिटांचाच, मारवा/पूरियाधनाश्री सारख्या सायंकालीन रागाचा तुकडा असावा. लांबवलेले सूर. मींडकाम. झक्कास वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

शिवाय काही वाद्यं (विशेषतः वायुवाद्यं) मनापासून उत्कृष्ट वाजतात तेव्हा त्या वाद्याच्या आवाजात मनुष्याच्या गळ्यातून येणार्‍या आवाजाचे वेव्हफॉर्म्स सापडतात. वादकाचा उ:श्वास त्यातून बर्‍याचदा स्टेटमेंट्स करतो. फुंकणार्‍याची अधीरता, शांतता, आर्तता वगैरे मनातली बाहेर येणार्‍या श्वासाच्या आवाजात जाणवते.
सॅक्सोफोन, क्लॅरिनेट यात तर खूपच. खर्जात अधिक.

आमच्यासारख्या ढ गोळ्यांसाठी, हे तर एकदम "महाविद्यालयीन" शिक्षण झालं. Smile
संगीत हे असं कळणं या जन्मी तरी शक्य नाही.
___
आम्हाला शब्दांचे सुस्पष्ट मार्गदर्शन लागते अन्यथा हरवायला होते. शब्द अन थेट "कम्युनिकेशन" टाळून, "Subtlety" हे एक उत्तम मूल्य शिकायचे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शब्द प्रत्येक आनंददायक इंटरप्रिटेशनसाठी आवश्यक असतात हीच चुकीची समजूत आहे.

अर्थात एखाद्याला शब्दांविषयी जास्त आकर्षण असल्याने त्याला त्यात आनंद मिळत असेल तर ते काही निकृष्ट असं मुळीच नव्हे. पण शब्दांखेरीजही खूप अनुभव आहेत. आणि खरंतर शब्दांची बाउंडरी ओलांडल्यावर जास्त मोठ्या संख्येने आहेत. पुस्तकी वाटेल पण खरंच..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्म्म शक्य आहे. अन शब्दांचे तूफान आकर्षण हेदेखील खरे आहे. किंबहुना जगातील कवि नष्ट होतील का? अशी काल्पनिक भीती मला बरेचदा वाटते अन मग आपलं काय होईल ? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समजा कवी नष्ट झाले तरी एका जन्मात सध्या असलेलं काव्यवाङ्मय वाचून संपणे केवळ अशक्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणीतरी एका लहान मुलीला परवा म्हणत होतं की तू पोएट होशील.

ती म्हणाली "आय डोन्ट वान्ट टु बी अ पोएट"

"पोएट" असं काहीतरी "होता" येतं का? किंवा पोएट होणं "टाळता" येतं का? हा प्रश्न तेव्हा पहिल्यांदाच पडला. तो फालतू प्रश्न आहे असं समजून तेव्हा उडवून लावला मनात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भीती ही बरेचदा - irrational च असते गवि.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, म्हणजे मी दिलेला हा प्रतिसाद त्या भीतीच्या प्रतिसादाशी संबंधित नव्हता. हा वेगळाच प्रश्न होता. कविता हा पूर्वी मी यथेच्छ टवाळी उडवलेला, नावडता, कृत्रिम म्हणून हिणवलेला प्रकार हळूहळू रोचक वाटायला लागून, "अरे यातही मजा आहे बरं का भरपूर" इथपर्यंत प्रवास झालेला आहे.

युरोपात जिथे फिरत होतो तिथे आसपासचं सौंदर्य बघून म्हणा किंवा काही कारणाने त्या मुलीने एक सुंदर रिदमिक शब्दरचना उत्स्फूर्तपणे केली. तेव्हा तिला अशी कॉम्प्लिमेंट मिळाली.. की "यू विल बी ए पोएट." आणि ती म्हणाली "आय डोन्ट वाँट टु बी अ पोएट, आय वाँट टु बी अ डॉक्टर."

मी म्हटलं की तू ऑलरेडी पोएट आहेस. यू विल बी अ पोएट याला काही अर्थ नाही.

असा "पोएट न बनण्याचा" ऑप्शन तिला शिल्लक आहे का? असा प्रश्न मनात आला.

...........................................................

एनीवे, तुमच्या भीतीविषयी..

व्यक्त होण्याची माध्यमं भरपूर वाढल्याने शब्दांचं मार्केटही वाढलं आहे. जोपर्यंत थेट मूळ विचार मेंदूकडून मेंदूकडे ट्रान्समिट करण्याचं तंत्र येत नाही तोपर्यंत शब्दांना मरण नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नि:शब्द संगीत ऐकताना उलट मनात र्‍यांडम विचारांऐवजी बर्‍याचदा सुसंगत विचारतरंग उठत असल्याचे निरीक्षण आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही न कळणाऱ्या भाषांतली गाणी ऐकता असे वाटते. (तेलुगु?) ती ऐकताना कसे वाटते?
शिळेवर किंवा नुसतेच 'हंहं' करत गाणे गुणगुणत नाही का तुम्ही कधी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक तेलगु की तमिळ गाणं (https://www.youtube.com/watch?v=xxjvz-WGhaE) बॅटमन यांनी मागे एका धाग्यावर दिले होते. ओह माय गॉड फार सुंदर होतं पण नुसतं ऐकायला नसतं आवडलं. ते चित्रीकरण इतकं गोड आहे. आता मी "श्री रामदासु" या तेलुगु सिनेमातील गाणी खूप ऐकते. पूर्ण ज्युकबॉक्स ऐकते पण का तर त्यातील - दशरथनंदन, जानकीजीवन, शब्दब्रह्मपरात्पर आदि सास्कृत शब्दांमुळे. अवीट गोडीची गाणी आहेत.
पण याउलट चित्रीकरण अथवा ओळखीचे शब्द नसतील तर ऐकताच येत नाहीत. इतके लोक "रवींद्र संगीताबद्दल" बोलतात आपल्याला त्यातलं शष्प कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला तुम्हा सगळ्यांचा प्रचंड हेवा वाटतो आहे.
मला गाणं ऐकताना फक्त मजा येते.. असे काही अ‍ॅब्स्ट्रॅक्ट जाऊ दे ओळखीचे आकारही दिसत नाहीत, वादका मूड वगैरे तर जर्राही जाणवत नाही.. Sad

==

साला! हे अंगच माझ्या मेंदूला नाय मिळालंय! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आजचे-डोक्यात-रूतून-बसलेले-गाणे:

प्रथमच याचा व्हिडिओ पाहिला. साधारण चित्रीकरणाची थीम पाहून (पोशाखी ऐतिहासिक चित्रपट + ईषत् लपंडाव) 'धुंद मधुमती नाथ रे' आठवलं.

शिवाय, या चित्रपटातली ('रुस्तम सोहराब') इतर गाणीही सुरेख आहेत. ('ऐ दिलरूबा', 'फिर तुम्हारी याद आयी' इ.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=mN0XZo2u4Y0
माझंदरान देखील एकदम झकास गाणे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं