सध्या काय ऐकलंत / ऐकताय- ४

याआधीचे भाग: | |

=========

ये दिल और उनकी निगाहोंके साये

https://www.youtube.com/watch?v=aavwzVGlJrs

--

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

जयदेवचे अप्रतिम गाणे.

स्वगत > हिंदि सिनेमातलि गाणि देउन धाग्याचे छायागित करु नका बॉ. काहि वेगळे ऐकले असेल तर जरा मजा येइल.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

हीन्दी सीनेमातील गाणी म्ह. ठरीव अन अन्य सीनेमातील गाणी ती भरीव असं काही आहे का? चीनी सीनेमातील गाणी द्या, मग पाहू.

............................................................................

सर्व मराठी लेखन दीर्घात करण्याचे ठरवले आहे. र्‍हस्व-दीर्घामुळे मराठी भाषा खड्ड्यात जात आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

बॅटरिशेठ, हिंदि सिनेसंगित सर्वत्र ऐकायला मिळतं. आपल्याला चांगलं-वाइट गाणं बर्‍यापैकि माहित असतं. त्यातहि एखादं प्रसिद्ध नसलेलं गाणं लोकांना माहिति करुन देणं निराळं आणि चित्रहाराचे सडे घालणं निराळं. दुसरा मुद्दा हिंदि सिनेसंगित सोडुन अनेक भारतिय भाषांमध्ये उत्तमोत्तम संगित आहे. तुम्हि आणि अमुक यांनि याच मालिकेतल्या एका भागात तामिळ गाण्यांची ओळख करुन दिल्याचेहि पाहिले. उगा सिमेपलिकडे जाउन गाणे शोधायचि गरज नाहि. तसेहि आम्हि नाहि म्हटल्याने लोकांनि पापिलवार हिंदि गाण्यांचा रेडियो लावणे थांबणार आहेत का? काय राव.

बाय द वे तुम्हि टेम्परवारि स्वाक्षरित दीर्घामुळेचा मु र्‍हस्व काढला आहे बरं का.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

अहो पण हीन्दी गाणी दीली तर ऊगीच अङ्गावर कशाला जाता म्हटलं मी? की ऊगा अन्य गाणी ठाऊक नसतानाही शोधत बसावीत? जे आपल्याला ठाऊक आहे तेच ईतरान्ना द्यावे ना? भले मग कूणासाठी रीपीट असले तर त्यात त्याचा दोष कसा होतो ते कळ्ळे नाही.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

चीत्रहाराषी सहमत पन...

दीर्घामुळेचा मु र्‍हस्व काढला आहे बरं का.

तूम्हिसूद्धा 'दीर्घा'चा दी दिर्घ काढला आहे.

-फॅटमॅन

---------------------------
सर्व मराठि लेखण अशूध्द करन्याचे ठरिवले हाए. सूध्तलेखणामूळे मराठि भाशा खड्ड्यात जात आहे.

बेथोवन, राझुमोव्स्की क्वार्टेट

बेथोवन म्हणजे तसा काही नवीन शोध नाही, आणि चारतंत संगीत (स्ट्रिंग क्वार्टेट, माझे नवीन नामकरण) हा प्रकारही नाविन्यपूर्ण नाही.

तरी "मूनलाईट सोनाटा" किंवा "फिफ्थ सिंफनी" वगैरे संगीत जेवढे ऐकले आहे, त्या मानाने मी चारतंत संगीत मी जवळजवळ ऐकलेलेच नाही. म्हणून हे संगीत माझ्याकरिता नवीन ओळख, बहुतेक आवडत राहाणार, असे आहे.

गूगलप्लेवरुन डाऊनलोड केलेले व्हाईट नॉईज़ हे अॅप वापरुन पावसाचा, धबधब्याचा, पंख्याचा वगैरे आवाज ऐकत आहे.

हा आमचा तलत. आमचा याच्यावर भारी जीव...

http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=OPsCd7D9o3g

...तर त्याचे हे एक सुश्राव्य गाणे. (व्हिड्यो विनोदी असला म्हणून काय झाले?) तर हा होता वरिजनल सौण्डट्र्याक. ------ आणि हे एक सद्गृहस्थ. तूनळीवर तलतची गाणी गातात... http://www.youtube.com/watch?v=VyurL7sRp7U&feature=player_embedded ...का गातात, कोण जाणे. कोई पुरानी दुश्मनी होगी शायद... --- (नाही म्हणायला, बहुधा एचेम्वीने, बहुधा १९८०च्या दशकात कधीतरी, खुद्द तलतला धरून ष्टूडियोमध्ये आणून आणि बहुधा त्याच्या मानगुटीवर सुरी ठेवून त्याच्याकडून हेच गाणे गाववून घेऊन त्याचे ष्टीरियो रेकॉर्डिंग करून त्याच्या हयातीतच आणि त्याच्याच गळ्यातून त्याच्यावर सूड उगवला होताच म्हणा... http://www.youtube.com/watch?v=vBo3CkBpadc&feature=player_embedded तर ही ती रीमाष्टर्ड आवृत्ती. बिच्चारा तलत. कोठे मूळची जोशपूर्ण, उडत्या लयीची आवृत्ती आणि कोठे हा मरतुकडा प्रकार. तलतने अत्यंत नाइलाजाने या प्रकारात भाग घेण्यास होकार दिला असावा, हे जाणवते.) ====== हे तलतने गायलेले आणखी एक अतिसुंदर गाणे... http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=qHK6r3F918o ...अर्थात तलत आवृत्ती. ------ ...आणि ही तूनळी-हौशी-भजनीमंडळ आवृत्ती. http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=wUv6LOgvxgs ...त्यातल्या त्या 'अभी ज़िन्दा हूँ, लेकिन...'ला '...लेकिन क्यूँ???' असा प्रतिप्रश्न विचारण्याची खुमखुमी नाही येत? ====== हे आमच्या तलतचे आणखी एक तलम, मखमली गाणे. http://www.youtube.com/watch?v=qYrzOxANjj4&feature=player_embedded (लिपसिंकमध्ये गोची झालेली आहे, ते सोडून द्या. आपल्याला गाण्याशी मतलब.) ------ ...अ‍ॅऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽण्ड... http://www.youtube.com/watch?v=0Ldvzc1ABus&feature=player_embedded ... हियर इज़ व्हॉट द डॉक्टर ऑर्डर्ड!!! ====== (दु:खात सुख एवढेच आहे, की या महोदयांचे हे 'स्पेशल फेवर्स' हे केवळ एकट्या तलतकरता राखीव नाहीत. गृहस्थ 'मेरा जूता है जपानी'पासून जस्टिन बीबरपर्यंत मार्गे 'बीट इट' जे काही मनाला येईल ते गातात. http://www.youtube.com/watch?v=ACr-ZFSLmwI&feature=player_embedded तर हे 'बीट इट'. चपखल गाणे! कोणीतरी गृहस्थांना निरोप दिला पाहिजे.) === समाप्त - थ्यांक गॉड!!! ===

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

बिचारा तलत.

तलत बिचारा नाही काही.

तलत १९९८ साली वारला. सुटला यातून.

बिचारे आपण, की आपल्याला हे झेलावे लागते.
====================================================================================================

ते भारत आणि पाकिस्ताननी एकापाठोपाठ एक धडाके उडवले होते ना, योगायोगाने त्याच वीकांताला.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

डॉक के सी धन्य आहेत. कोपरापासुन _/\_.
आधी वाटल 'बिच्चारे'. नंतर 'लोल', नंतर 'महाभयानक'...

===
Amazing Amy (◣_◢)

...आणि प्याकेज डील म्हणून बरोबर फुकटात भविष्यसुद्धा सांगतात, आहात कुठे?

३०००च्या वर गाणी टाकलीयेत त्यांनी तूनळीवर!

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

सिरीअसली? तुम्हाला कुठुन कळलं?
३०००+ गाणी :O. ही ३-४ पाहिली (पुर्ण नाही) तेच लय झालं. i hope i won't get nightmares about him.

===
Amazing Amy (◣_◢)

...'डॉक्टरकेसी' म्हणून शोध घ्या, आणि जे जे काही सापडेल, ते मनसोक्त पहा. तुम्हालाही कळेल.

बादवे ३०००+चा दावा त्यांचाच आहे, माझा नव्हे. व्हिडियोच्या शेवटी स्वतःची जाहिरात करतात, त्यातूनच उचललाय. (त्याकरिता त्यांचे आणखी व्हिडियो संपूर्णपणे पाहावे लागतील. सगळ्या व्हिडियोंच्या शेवटी तोच मजकूर असतो असे नाही.)

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

हम्म. धन्यवाद Smile

===
Amazing Amy (◣_◢)

कुठून शोधून काढलंत हो?
बीट इट भयानक आहे. त्याआधीचं बरं होतं जरा.

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

'जिया तु बिहार के लाला' हे गाणे ऐकल्यानंतर मनोज तिवारि या गायकाबद्दल उत्सुकता वाटल्याने त्याच्या इतर गाण्यांचा शोध घेतला. तेव्हा खालिल भोजपुरि रत्न हाति लागले. गाणे भोजपुरि असले तरि सहज समजते. ऐकतांना विडियो नक्कि पहावा.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

Meena kumarine lihileli gazal, tichyach awajaat!

"I write, I recite" या नावाचा आल्बम आहे. मीनाकुमारी हिने स्वतः लिहिलेल्या आणि गायलेल्या एकूण आठ गझला आहेत. ती बर्‍यापैकी बहुगुणी होती असे दिसते. ती बरंच लिही, गाणं गात असे. इतकंच नव्हे तर पाकीजामधले तिचे लहंगे आणि दागिने तिनेच डिझाईन केले होते असं पाकीजाच्या डीव्हीडीवर वाचलंय (मला दोन्हीही आवडले नव्हते हा भाग निराळा)

हे गाणं २००३ मध्ये कधीतरी ऐकलं होतं. त्यानंतर त्याचा बराच शोध घेऊन मिळवलं होतं. चांद तनहा है बद्दल इथे मी काहीतरी लिहिलं आहे..

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

घरी गेल्यावर लगेच ऐकते!

यावरून आठवलं. उस्तादी उस्ताद से या चित्रपटातल्या या गाण्याकरता सोनू निगमला उषा मंगेशकरांनी आवाज उसना दिला आहे!
https://www.youtube.com/watch?v=Q4oso5pTdtM

अर्रे तुम्हाला अशी गाणी कशी काय लक्षात असतात आणि पाहिजे तेव्हा आठवतात?
बालपणीच्या सोनु पेक्षा प्रौढपणीच चांगला दिसतोय हेमावैम.

===
Amazing Amy (◣_◢)

सा रे ग म च्या एका भागात उषा मंगेशकर आणि मीना खडीकर आल्या होत्या परिक्षक म्हणून. तेव्हा उषा मंगेशकरांनीच हा किस्सा सांगितला होता. या गाण्यात नृत्यदिग्दर्शकाच्या सुचनेनुसार कळसुत्री बाहुलीप्रमाणे माना हलवणारा सोनु फारच केविलवाणा दिसतो आहे.

('साठी'. 'उद्देशून' नव्हे. हो, उगाच नसत्या शंका नकोत.)

घ्या, ऐश करा, आप भी क्या याद रक्खोगे, इ.इ.

----------------------------------------------------------------------------------------

जुनी, फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. रात्रीचा अटलांटाच्या डिकेटरातील उडप्याकडून सहकुटुंब सहपरिवार - एकदा 'सहकुटुंब' म्हटल्यावर पुन्हा 'सहपरिवार' कशाबद्दल म्हणायचे असते, कोण जाणे! पण प्रथा आहे. तर ते एक असो. - हं, तर सहकुटुंब सहपरिवार जेवून अटलांटाच्या ईशान्येस असलेल्या आमच्या तेव्हा गाववजा पण नुकत्याच उपनगरात संक्रमित होऊ घातलेल्या विभागातील घराकडे मार्गक्रमणा करत होतो. जेवण आटोपून परतीसाठी निघावयास बराच उशीर झाल्याकारणाने, आणि अंतरही बरेच असल्याकारणाने, घरापासून दोनतीन मैलांच्या परीघापर्यंत पोहोचेपर्यंत रात्रीचे बरेच वाजले होते. डोळ्यांवर झोप होतीच; गाडी चालवीत असल्याकारणाने ती आतापावेतो कशीबशी थोपवून धरली होती. घर आता तसे बर्‍यापैकी जवळ आले होते. मुख्य रहदारीचा रस्ता सोडून घराच्या दिशेने जाणार्‍या एका तुरळक रहदारीच्या लहानशा गल्लीवजा रस्त्यात गाडी वळवली, आणि थोडे पुढे जातो, तर रस्त्याच्या मधोमध एक कुत्री ताणून देऊन ढाराढूर (की डाराडूर?) झोपी गेलेली.

कुत्र्यांवर तसाही आमचा (दुरूनच पण) फार जीव, त्यामुळे तिची झोपमोड करण्याची इच्छा खरे तर नव्हती. पण गल्ली अरुंद होती, आणि गाडी बाजूने सहज काढण्याइतकी जागा नव्हती. म्हणून मग नाइलाजास्तव हॉर्न वाजविला. तर बाईसाहेबांनी आळोखेपिळोखे देत किलकिल्या डोळ्यांनी पाहिले, आणि आपल्याच तीर्थरूपांचा रस्ता असल्याच्या थाटात, कोणतीही घाई नसल्याप्रमाणे, निवांतपणे, आरामात आणि अत्यंत सावकाश बाजूला झाल्या.

पण बाजूला होण्यापूर्वी बाईसाहेबांनी किलकिल्या डोळ्यांनी जे पाहिले, आणि गाडीच्या हेडलाइटांत त्यांचे डोळे जे चमकले, ते पाहून साहजिकच आम्हाला तलतचे हे युगुलगीत - यालाच मराठीत 'द्वंद्वगीत' असा एक अत्यंत प्रामाणिक, पण तितकाच वैट्ट्ट्ट्ट्ट! वैट्ट्ट्ट्ट्ट!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!! वैट्ट्ट्ट्ट्ट!!!!! दुष्ष्ष्ष्ट!!!!!! शब्द आहे. पण तेही एक असो. - आठवले, आणि आम्ही ते गुणगुणू लागलो.

http://www.youtube.com/watch?v=lwcZA8RNbss

तर अशा रीतीने ही साठां उत्तरांची कहाणी पाचां उत्तरीं सफळ संप्रूण झाल्यानंतर, प्रसाद म्हणून तुम्हीही या सुमधुर गाण्याचा जरूर आस्वाद घ्या. ह्याव फन!

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

('साठी'. 'उद्देशून' नव्हे. हो, उगाच नसत्या शंका नकोत.)

हा हा हा.

--

गाणे मस्तच आहे. सिलोनवाले दिवस आठवले. बायदवे सिलोन चे पुनरुज्जीवन करण्यात आलेले आहे. https://www.youtube.com/user/eraksoldies

पण गाण्याशी जोडली गेलेली आठवण मजेशीर आहे. अशा अनेक गाण्यांशी अनेक मस्त मस्त आठवणी जोडल्या गेलेल्या असतात. व कधीकधी ते स्मृतीरंजन हे गाण्यापेक्षा जास्त मधुर वाटते. कधी गाण्याबरोबर व्यक्तींच्या आठवणी इतक्या घट्ट असतात की एखादं गाणं ऐकताना एखादा विशिष्ठ प्रसंग प्रत्येक वेळी उभा राहतो.

जय हो !!!

बायदवे सिलोन चे पुनरुज्जीवन करण्यात आलेले आहे.

रेडियो सिलोनच्या वेबसाइटीवरून त्याच्या लाइवफीडची लिंकसुद्धा उपलब्ध आहे.

येथे जा. पान पूर्णपणे खाली स्क्रोल करा. खालच्या डाव्या कोपर्‍यात 'एशिया हिंदी - लिसन लाइव' म्हणून एक लिंक दिसेल, त्यावर क्लिकवा. डौनलोड सुरू होईल, तो स्वीकारा, आणि मग डौनलोडविलेल्या फैलीवर क्लिकवा. आणि मजा करा.

(वैधानिक इशारा: लिंकवर 'एशिया हिंदी' असे जरी लिहिलेले असले, तरी तेथे पूर्ण वेळ हिंदी कार्यक्रमच असतात, असे नाही. वेगवेगळ्या टैमस्लॉटांमध्ये इतर भारतीय (विशेषतः दाक्षिणात्य) भाषांमधील कार्यक्रम - आणि ख्रिस्तप्रचारात्मक कार्यक्रम - हेदेखील वाजतातसे आढळते.)

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

(दोन्ही आवृत्त्या, एकापाठोपाठ एक, एकाच व्हीडियोत. पैकी पहिली आवृत्ती मी अगोदर ऐकलेली नव्हती. दुसरी शीड्यांक्यासेटांमधून सदैव वाजते, त्यामुळे चांगलीच परिचित आहे.)

http://www.youtube.com/watch?v=wi7uCFoTKGU

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

डॉ. आंबेडकरांची BBC तर्फे घेतलेली मुलाखत ऐकली (१९५५)
काही गोष्टी जाणवल्या -
१. त्यांची इंग्रजीवर असलेली पकड. गांधींबद्दल एका ठिकाणी ते म्हणून जातात - "in my judgement he was an episode in the history of India, never an epoch maker." ह्यातले चूक बरोबर सोडून द्या, शब्दांची रचना खूपच भावली. मात्र त्याच वेळी "you see" शब्दरचनेची खैरात खटकली.

२. गांधींना बघण्याचा एक objective दृष्टीकोन आवडला. विशेषतः धर्म / जात ह्यावरची मतं "थोडक्यात पण मुद्द्याचं" अशा स्वरूपात समजली.

३. आपल्याला आजकाल समजणारे गांधी आणि प्रत्यक्षातले गांधी, ह्यात असलेली तफावत काहीशी समजली.

अवांतर - सुमारांची सद्दी ह्या विनय हर्डिकरांच्या लेखाची आठवण झाली. आंबेडकरांसारखा ज्ञानमार्गी माणूस गांधी-काळात किती दुर्मिळ झाला होता, ते समजलं.

अवांतर - सुमारांची सद्दी ह्या विनय हर्डिकरांच्या लेखाची आठवण झाली.

ह्या लेखाचा दुवा मिळू शकेल काय?

रोचक आहे मुलाखत. आझाद हिंद सेनेला स्वातंत्र्याचं तात्कालिक कारण म्हणणं हे नव्यानीच ऐकलं.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

https://www.youtube.com/watch?v=WvzwZ3dnyco (पडोसन मधल्या इतर गाण्यांच्या मानाने हे दुर्लक्षित राहिलं. सुनील दत्त कार्टून दिसतो हा भाग वेगळा.)

हायवे पिच्चरमधील फटाका गुड्डी हे गाणे ऐकले. चाल व शब्दही सुंदर आहेत. विशेषतः "मैने तो तेरे तेरे उत्ते छड्डेया डोरियाँ" आणि "नशेमें उड जाये ओ" इथल्या जागा फारच सुंदर घेतल्या आहेत.

http://www.youtube.com/watch?v=cprez2G15LI

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

या स्पॅनिश लोकसंगीतात गाणं, बजावणं (गिटार), नाच आणि टाळ्यांनी धरलेला ताल एकत्र येतात. (पाको दे ल्युशिया या संगीतकाराचा फ्लॅमेंकोला लोकप्रियता मिळवून देण्यात मोठा वाटा होता.)

अ‍ॅडम बेन इझरा या कलाकाराच्या वादनाचा हा व्हिडिओ अलीकडेच पाहिला. त्याचा हा दुवा:

केवळ ग्रेट. हे संगीत १-२ वर्षापूर्वी - या लेखातील एका मुद्द्यात वाचले होते व नंतर सारा बरस या नर्तिकेची नृत्ये पाहताना ऐकले होते. खरच सुंदर आहे.

Smile चांगले कलाईकाम हे उत्तम नर्तक असल्याचे एक महत्त्वाचे लक्षाण आहे.

धन्यवाद.

'पाको दे लूसिया' हा फ्लॅमेन्को संगीतातला दादा-माणूस. दोन महिन्यांपूर्वीच त्याचे निधन झाले आणि विषय फ्लॅमेन्कोचा आहे, म्हणून इथे थोडे लिहीत आहे.
नव-फ्लॅमेन्को शैली विकसित करण्यात पाकोचा मोठा हातभार लागला. या शैलीत, पारंपरिक फ्लॅमेन्कोची जॅज़, रॉक, पॉप आणि इतर अनेक संगीतप्रकारांसोबत सरमिसळ केली जाते. पाको, जॉन मेक्लॉफ्लीन आणि लॅरी कॉर्रिएल यांनी, ते तिघेही कलाविष्काराच्या शिखरावर असताना, १९८० च्या सुमारास गीतार-त्रिकुट स्थापन करून अमेरिकन जॅज़ आणि फ्लॅमेन्कोची मिसळण करणारे अनेक प्रयोग केले. या त्रिकुटातून लवकरच कोर्रिएल जाऊन 'अल् दि मेओला' आल्यावर १९८१ ला त्यांनी 'फ्रायडे नाइट इन सॅन् फ्रान्सिस्को' (४२ मि.) हा अल्बम काढला. हे अकॉस्टिक गीताराच्या संगीतात एक आगळी दिशा देणारे मोठे काम समाजले जाते.

'विकी क्रिस्तीना बार्सिलोना' या वुडी अ‍ॅलनच्या चित्रपटात काही ठिकाणी पाकोचे संगीत वापरले आहे. उदा. चित्रपटातला तुकडा, मूळ तुकडा.

किंवा पाको आणि अल् दि मेओला या दोघांनी मिळून 'पिन्क् पॅन्थर' मधील अतिप्रसिद्ध धुनेवर केलेली कलाकुसर ऐकण्याजोगी आहे.

सलील चौधरी यांचे "घूम भाङार गान" (झोप उडवणारी गाणी) काल खूप दिवसांनी ऐकली. १९४०-५० पासून IPTA चे कार्यकर्ता म्हणून चौधरींनी खूप गाणी रचली. कॉलेजेत असताना डाव्या बंगाली मित्रांकडून ही प्रथम ऐकली होती.
त्यातलं हे गाणं - ओ मोदेर देशोबाशी रे" माझं अत्यंत आवडतं, पण अल्बम मधे सगळीच गाणी खूप प्रभावी आहेत.

'मोदेर' माने?

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

'आमादेर' चे जुने/काव्यमय रूप.

उदा. मिले सुर मेरा तुम्हारा: तोमार शूर मोदेर शूर, स्रिस्टी कोरूक ओइको शूर..

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

धन्यवाद.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

https://www.youtube.com/watch?v=nR7Ns06pp_4

सामने है वो जिसे लोग बुरा कहते है
और जिसको देखा ही नही ... उसको खुदा कहते है

यांनी लिहिलेले आणि मदनमोहन यांनी स्वरबद्ध केलेले माझे अत्यंत आवडते गाणे.

http://www.youtube.com/watch?v=Klv8icyguVA

-
-
-

यूट्युब लिंक -

https://www.youtube.com/watch?v=TrIkSy3TFR0

अमुकरावांनी सुचवल्यावरून हे रत्न ऐकले. अप्रतिम आहे. ऐकायला अन बघायला सारखेच आल्हाददायक आहे. मस्त गारगार वाटते.

https://www.youtube.com/watch?v=xxjvz-WGhaE

अन हेही गाणे.

https://www.youtube.com/watch?v=YGTG9n1tGnk

तेही आय गेस अमुकरावांनीच सुचवलेय.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

छानच आहेत Smile इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

१:४७ ला सुरु होणारी कव्वाली भारी आहेत. आणि त्याचा वापर पण भारी केला आहे य पिच्च्र मध्ये.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

बोनी-एम नामक वर्ल्ड फेमस ग्रूपची कैक गाणी तीर्थरूपांमुळे लहानपणी ऐकली होती ती पुनरेकवार ऐकली -उदा. वन वे टिकिट टु मून, नाईट फ्लाईट टु व्हीनस, रा रा रासपुटीन, बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन, मा बेकर, बहामा मामा, डॅडी कूल, इ.इ. अनेक..

पुनरेकवार ऐकून लय मज्या आली...

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

होय होय!!! मा बेकर तर मस्तच. मला आवडतात ती गाणी.

मा बेकर, बहामा मामा, रासपुटिन, डॅडी कूल, ही माझी त्यातली सर्वाधिक आवडती गाणी.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

तारारी तारारी www.youtube.com/watch?v=WjrJi47CTjg
भारीय गाणं! सकाळपासून रिपीट मोडवर चालूय.

===
Amazing Amy (◣_◢)

रॉकी रोड टु डब्लिन. आधीही शेअर केल्ती पण इथे डब्लिनर्स नामक आयरिश फोक ब्यांडची वरिजिनल व्हर्जन आहे. इतर व्हर्जन्स म्हणजे यापुढे शाकाय वा स्यात् लवणाय वा स्यात्!

https://www.youtube.com/watch?v=TwjDXwHbLfc

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

भूपेन हझारिका यांची "गंगा बेहती हो क्यो", "मानुष मानुषेर जोन्ने" अन "आमी एक जाजाबोर" ऐकून वेडी झाले आहे. फक्त भूपेन हझारीका ऐकते आहे.

________

_______

यांचं हे गाणं मला ऐकायला आणि बघायलाही आवडतं.

http://www.youtube.com/watch?v=2feUIohwTLg

ऐसीच्या मुखपृष्ठाने मला आठवण करून दिली.

वा! खूपच छान आहे. अगदी श्रवणीय न प्रेक्षणीय. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

खूप दिवसांनी हे गाणं ऐकलं

खूप छान वाटलं. पुढचा वेळ मस्तं आनंदात गेला.

शेवटी शेवटी गणपतीच्या ढोल-ताशांची आठवण आली. गाण्यात शेवटी शेवटी जे ड्रम्स वाजतात त्यापेक्षा अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवर अनेक पथक चांगल वाजवतात असही वाटलं Smile

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

"पाणी दा रंग वेखके" पुनरेकवार ऐकलं. लय मज़ा आला.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ड्रंकन सेलर. टि'प्पि'कल आयरिश फोकगान. लय जबराट.

https://www.youtube.com/watch?v=qGyPuey-1Jw

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

माझे आवडते गाणे -

http://www.aathavanitli-gani.com/Song/Char_Hotya_Pakshini_Tya
फैयाझ यांनी फारच छान गायले आहे.

चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले

हे माझेही आवडते गाणे आहे. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!

आज बसमध्ये एक तरुण मुलगी अतिशय विमनस्क अन सुन्न दिसली. सीटवर कलंडलेल्या तिला ना आसपासचे भान होते. एक हताश, दु:खी ऑरा तिच्या आकृतीबंधात जाणवला. सगळे उतरले ती तशीच पुढे गेली मग काय झालं माहीत नाही, कदाचित कंडक्टरने उतरवले असेल.

कॅरॉल अ‍ॅल्स्टन च्या आफ्रिकन अमेरीकन "कुंबायाह" गाण्याची आठवण झाली
_______________
मुलगी लहान असताना, आमचा आवडीचा खेळ म्हणजे - एकत्र बडबडगीतं गाणं. पैकी मला आठवणारी बहुतेक बडबडगीतं मराठी होती. कारण इंग्रजी ५ वी पासून चालू झालेलं. त्यामुळे मुलगी देखील मराठी गाणी सर्वात आधी शिकली. "ससा रे ससा नी कापूस जसा" असो की "या बाई या बकुळीच्या झाडाखाली फुले वेचू या" किंवा "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला" असो तिला गाणी ऐकायला आणि मला गायला अतिशय आवडत. आमचं मराठी आवडतं बडबडगीत होतं -
"आभाळ वाजलं धडाड्धूम
वारा सुटला सूं सूं सूंम
वीज चमकली चकचकचक
जिकडेतिकडे लखलखलख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहीलं सों सों सों
पाण्यांत बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडूक
तो ओरडला
डरांवडूक डरांवडूक!"

त्या मानानी "जॅक अँड जिल", "ओल्ड मॅक्डोनल्ड हॅड अ फार्म", 'ईट्सी बिट्सी स्पायडर्"वगैरेंची गोडी तितकीशी कधीच लागली नाही.

पण एके दिवशी मात्र माझ्या कानी एक आफ्रीकन्-अमेरीकन स्पिरीच्युअल गाणं पडलं. इतकं, मधुर, इतकं अर्थपूर्ण! मी ते गोड चाल लाऊन गाऊ लागले आणि हां हां म्हणता आमच्या आवडत्या बडबडगीतांपैकी ते बनून गेलं.

कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज क्राइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज प्रेइंग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज लाफींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह
समवन इज सिंगींग लॉर्ड कुम्बायाह ..
कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह... ओह लॉर्ड कुम्बायाह

हे ते गाणे

इतकं सोपं, साधं लोकगीत पण अर्थगर्भ. सगळ्या सुंदर गोष्टी साध्याच असतात का? का साध्या गोष्टी सुंदर भासतात? मी अनेकदा अजूनही तुनळीवर हे गाणं ऐकते. मन हलकं होतं.

कुंबायाहगीत आवडलं.. घेरी गेलो की लेकीला ऐकवतो Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद Smile

फार पूर्वी (म्हणजे माझ्या लहानपणी) आकाशवाणीवर शनिवारी रात्री १० ते ११ वाजता सॅटर्डे डेट हा कार्यक्रम लागायचा, तसेच रविवारी संध्याकाळी सँडी जोन्स रिक्वेस्ट शो पण असायचा, ज्यात तुम्ही पत्र लिहून तुमच्या आवडीच्या गाण्यांची मागणी करू शकायचा. आज अचानक लोबोच्या या गाण्याची आठवण झाली. लगेच तूनळीवर गाणे शोधले आणि अपेक्षा नसूनही चक्क हे गाणे मिळाले. दिल खूष हो गया.
अवांतरः योगायोगाने आजच लोबोचा वाढदिवस पण आहे, असे कळले.

बेबी इट्स कोल्ड आऊट्साईड - https://www.youtube.com/watch?v=7MFJ7ie_yGU
फार आवडतं!!!
वेगवेगळ्या गायक-गायिकांच्या आवाजात ऐकताना फार मजा येते.

प्रत्येकाची स्टाईल वेगळी.
https://www.youtube.com/watch?v=yiNnl9WCiYg - अ‍ॅन मुरे चा स्ट्राँग आवाज अन मायकल बबल चा व्याकुळ पण सॉफ्ट!!

https://www.youtube.com/watch?v=3qFK5YFvTYE - डीन मार्टीन चे शेवटचे शब्द नेहमी कोरसमध्ये बुडून जाणारे जणू काही त्याची विनवणी ती ऐकत नाही. तिचंच म्हणणं खरं करते आहे. Smile

https://www.youtube.com/watch?v=009kRJKf9rg - बिंग क्रॉस्बी अन डोरीस डे. दोघांचे म्हणणे इक्वल फुटींगवर वाटते.
________________

इंग्रजी गाण्यात सुरावटीपेक्षा शब्द/आवाजाला महत्त्व मला तरी जाणवतं. "फ्लाय मी टू द मून" गाण्यात टोनी बेनेट चा आवाज "फ्लाय" शब्दावर काय लकेर घेत आकाशात जातो वा!!!

कल्पना करा की तुम्ही लेखक आहात. म्हणाजे तुमची नीरीक्षण-शक्ती सामान्य लोकांहून जास्त आहे, तुम्ही संवेदनशील आहात अन जे प्रसंग इतर लोकांना सामान्य वाटतात, त्या प्रसंगांमध्ये तुम्हाला कथाबीज सापडते. तुम्हाला माणसं वाचायला आवडते, तोच तुमचा रिकाम्या वेळेचा छंद आहे.

अशाच एका सुंदर मस्त संध्याकाळी तुम्हाला २ पेग घ्यायची हुक्की येते. अन मग तुम्ही जवळचा एक बार गाठता. बारमध्ये चिक्कार लोकं टाईमपास करताहेत. तुम्ही एक पेग मागवता, थोडे सैलावता, अन मूळ स्वभावाबरहुकूम तुमचे नीरीक्षण चालू होते. बारमध्ये काही सडे स्त्रीपुरुष दिसताहेत, कोणी जोडपी आली आहेत तर कुठे मित्रांची टोळी. बहुसंख्य लोक हे हसत-खेळत ड्रींक्स चा आस्वाद घेत आहेत.

तुमच्या समोरच एक मध्यमवयीन स्त्री देखील एकटी बसली आहे. तिला पाहील्यावर तुम्हाला पहील्यांदा काय स्ट्राईक होते तर - तिची "बोनी फ्रेम" अन मोठे उदास डोळे. काय करते आहे बरं ती? अनामिकेत घातलेल्या तिच्या अंगठीशी चाळा करते आहे, काढते आहे, पहाते आहे. एक हात कपाळाला आहे. आत्ता रडू फुटेल की मग अशी वाटते आहे.

काय कराल तुम्ही? जाल तिच्यापाशी? ड्रींक ऑफर कराल? जर तसं केलत तर कदाचित ती सैलावेल, तिचा मूड खुलेल, मोकळी असेल तर चटकन हो म्हणेल. नाही तर धुडकाऊन लावेल तुमची ऑफर. तुम्हाला ती "इन्ट्रीग" तर करते आहे, मग हरकत काय आहे?

वेल लेखक नाही पण एका कवीला अशा एका संध्याकाळी भेटलेली "ल्युसिल" अन मग तिचं उलगडत गेलेलं आर्धंमुर्धं, जीर्ण तत्कालीन आयुष्य. म्हणजे केनी रॉजर यांचे हे खाली दिलेलें गाणं. एवढी मोठी कथा कमी शब्दात फुलवून, सूरांच्या जादूत बांधलेली. फक्त अनुभवावं, अन केनी रॉजर च्या आवाज अनुभवून खिन्न व्हावं. जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते चर्र होतं.

https://www.youtube.com/watch?v=4SDVkdcO8ts

काय कराल तुम्ही? जाल तिच्यापाशी? ड्रींक ऑफर कराल? जर तसं केलत तर कदाचित ती सैलावेल, तिचा मूड खुलेल, मोकळी असेल तर चटकन हो म्हणेल. नाही तर धुडकाऊन लावेल तुमची ऑफर. तुम्हाला ती "इन्ट्रीग" तर करते आहे, मग हरकत काय आहे?

जादू की झप्पी दे देंगे उसको.

हाहाहा माहीतीपूर्न अशी श्रेनी दिलीया बर्का Wink

ठीकाय.

प्लान चेंज.

झप्पी मारके पप्पी ले लेंगे उसकी.

मस्त!!! तो फिर ये एक गाना आप के लिये हो ज्जये? Wink


https://www.youtube.com/watch?v=1InNCfngCxo


Lucky lips are always kissing
Lucky lips are never blue.
Lucky lips will always find a pair of lips so true.
Don't need a four-leaf clover,
Rabbit's foot or a good look charm.
With lucky lips you'll always have,
A baby in your arms.

आज एक आनंदी गाणं सापडलं . खूप आवडलं - https://www.youtube.com/watch?v=-4o86juvMEE

डॉक्टरकेसी यांस त्वरित कळवावयास हवे.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

हाहाहा नको Sad

मायकल बबल चं - द वे यु लुक टुनाईट ऐकतेय - https://www.youtube.com/watch?v=yDh4GC7n0ig
एखादं गाणं किती मोरपिशी आवाजात गायलेलं असावं!!!
________________
https://www.youtube.com/watch?v=YNSxNsr4wmA
मस्त मस्त मस्त!!! लव्ह पुसीकॅट डॉल्स चं हे गाणां!!

ते बबल नसून बुब्ले आहे असे वाटते. (आमच्या इथे म्युझिक रेडिओवर त्याच्या कॉन्सर्टच्या पासची जाहिरात होत होती त्यात ऐकल्यानुसार)

धन्यवाद Smile

बु चा उच्चार करताना तो बू असा दीर्घ करा.

हाहाहा येस्स्स्स्स!!! Smile

छान

अतिशय सुंदर गाणे आहे

https://www.youtube.com/watch?v=KFFlWtlDRqk

But I'm sad to say, I'm on my way
Won't be back for many a day
My heart is down, my head is turning around
I had to leave a little girl in Kingston Town

गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात 'बरखा रितु' या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला जाणे झाले.

पूर्वार्धात श्री. राहुल शर्मा यांचे संतूरवादन झाले. उत्तरार्धात श्री. शौनक अभिषेकी आणि सौ. देवकी पंडित यांचे एकल व सहगायन झाले.

पूर्वार्ध - श्री. राहुल शर्मा यांना साथीला तबल्यावर श्री. मुकुंदराज देव आणि पखवाजावर पं. भवानी शंकर(!) होते. राग मेघ वाजवला. आलाप आणि जोड अत्यंत तुटक वाटला, त्यामुळे रागाचा प्रभाव पडला नाही. शिवाय झाला वाजवताना पखवाजाची साथ होण्याऐवजी इंटरफीअरन्सच जास्त वाटत होता. मत्त तालातली एक गत वाजवली, त्यात मात्र तालाच्या अंगाने वादन चांगले वाटले. नंतर एक त्रितालातली गत वाजवली. श्री. मुकुंदराज देव यांचे वादन अत्यंत संयत असते त्यामुळे दोन्ही गती चांगल्या वाटल्या. द्रुत त्रितालाच्या वेळी पैलवान भवानी शंकर पुन्हा आखाड्यात उतरल्याने नेहेमीची जुगलबंदी (रीडः हाणामारी) झाली आणि एक अशक्य मोठी तिहाई घेऊन पूर्वार्धातील कार्यक्रम संपला.

उत्तरार्ध - श्री. शौनक अभिषेकी आणि सौ. देवकी पंडित यांना साथीला कोण होते आता आठवत नाही पण स्थानिक जनता होती हे नक्की. तानपुर्‍यावर कु. केतकी माटेगावकर होत्या. स्त्री-पुरुष सहगायनातला महत्वाचा कच्चा दुवा, आवाजाची पट्टी न जुळणे - प्रकर्षाने दिसला. शौनक अभिषेकींना त्यांच्या मूळ पट्टीच्या खाली गायला लागल्याने त्यांच्या गायनाचा प्रभावच पडला नाही.प्रथम सहगायनात राग मियां मल्हार गायले. आधी वादकांसारखा चढत्या लयीचा आलाप वराच वेळ चालला. अर्थात मियां मल्हारचा आलाप गाताना '(नी) ध प', 'ग् म रे म', 'सा रे म' अशा अनेक स्वरसंगती घेतल्याने हे नक्की मियां मल्हार गातायत की सूर मल्हार की सारंग गातायत अस प्रश्न मला पडला (इतरांनाही नक्कीच पडला असणार. त्यांना बहुधा 'मियां की सूर मल्हार' असा राग गायचा असावा!!). असो. झपतालातली बंदिश सुरु झाल्यावर त्यांना मियां मल्हारची गल्ली सापडल्यासारखी वाटली. तालाच्या अंगाने झपताल ठीक वाटला. मियां मल्हार संपल्यावर दोघेही एकेकटे (आणि आपापल्या पट्टीत) मैदानात उतरले. सौ. पंडित गौड मल्हारात दोन बंदिशी गायल्या. ७-८ मिनिटे झाल्यावर त्याच त्याच जागा ऐकून गाण्यातला विचार संपल्याची जाणीव झाली. तरी य दोन बंदिशी साधारण २० मिनिटे चालल्या होत्या. नंतर श्री. शौनक यांनी कुकुभ मल्हार नावाचा एक राग गायला (बहुधा कुकुभ बिलावल आणि गौड मल्हारचे मिश्रण - साधारण गौड मल्हारच होता फक्त अवरोहात 'ध म प ग म रे सा रे सा' अशी शेपूट जोडली असावी असे वाटले). झपतालातली बंदिश शॉर्ट आणि स्वीट मांडल्याने चांगली वाटली. नंतर सुहा रागातली एक त्रितालातली बंदिश आणि द्रुत त्रितालातला तराणा गायला. ५ मिनिटात दोन्ही गाण्याच्या प्रयत्नामागचं लॉजिक समजलं नाही. बंदुकीतून गोळ्या सुटाव्या तसे स्टॅकॅटो सूर आणि बोल टाकत तराणा गायन अति द्रुत लयीत चालले. त्यांच्या वडिलांची त्या तराण्याची रेकॉर्ड उपलब्ध आहे. 'भल्या गृहस्था, ती एकदा तरी ऐकून पहा' असे ओरडून सांगावेसे वाटले. नंतर पुनः सहगायनात ठुमरी गायनास प्रारंभ झाला, पण एकुणात आधीचा एक-सव्वा तास सारा रागरंग पाहिल्यावर आमचा (पक्षी: आम्ही आणि आमचे कुटुंब) पेशन्स संपला होता त्यामुळे अस्मादिकांनी सदनातून वॉक आऊट केला.

अवांतरः फुकट पास मिळाल्याने गेलो होतो. अन्यथा या लोकांना ऐकायला ५०० रु. चे तिकीट काढून बापजन्मात जाणार नाही.

कलाकारांची नावे वाचून अपेक्षा उंचावल्या होत्या.

सौ. पंडित गौड मल्हारात दोन बंदिशी गायल्या. ७-८ मिनिटे झाल्यावर त्याच त्याच जागा ऐकून गाण्यातला विचार संपल्याची जाणीव झाली.

हे वाचून फार वाईट वाटले.

शास्त्रीय संगीतातले काहीही कळत नाही. मात्र हा प्रतिसाद त्यातील मिश्कील टिपण्ण्या आणि नेमक्या वार्तांकनशैलीमुळे आवडून गेला.
अजून येऊ दे असेच काही Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे गाणं ऐकत होते आत्ता...१९५० चं आहे. प्रचण्ड निरागस!!! सुनं बैरी बलम सच बोल रे ईब क्या होगा...

http://youtu.be/gcgFV5GR8sc

गेले कित्येक दिवस 'हायवे' मधलं रेहमानचे 'माहीवे' जाम आवडल्याने सतत एकतो आहे.

त्याचं हे cover version पण छान आहे.

https://www.youtube.com/watch?v=5tDjYuqJRJQ

मस्त फीयर्स संगीत आहे. लव्ह इट!!!!!!!!!!!
___________________

https://www.youtube.com/watch?v=7PCkvCPvDXk

हेही सुंदर आहे. व्हिडीओ छान आहे विशेषतः रंगसंगती. गायिका गोड आहे दिसायला.
_________________
फार फार सुंदर गाणं - बिकॉज यु आर माइन, आय वॉक द लाइन ...

https://www.youtube.com/watch?v=KHF9itPLUo4

आजचा मूड चीअर अप करण्यासाठी कॉफीसारखं perky गाणं हवं. हे मी कॉलेजमध्ये जे ऐकून वेडी वेडी झालेले ते गाणं. -

https://www.youtube.com/watch?v=ICkWjdQuK7Q

She was afraid to come out of the locker
She was as nervous as she could be
.
She was afraid that somebody would see
.
One, two, three, four, tell the people what she wore
.
It was an itsy, bitsy, teenie, weenie, yellow polka-dot bikini

सुंदर गाणं. खास शुक्रवारचा मूड!!! Smile

http://www.youtube.com/watch?v=qoIXzCxzxAM

प्रधामंत्र्यांचे भाषण ऐकले. मोदी भारताच्या इतिहासात बहुशा नेहरू, इत्यादिंच्या लीगमधे जातील असे वाटत आहे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

http://www.youtube.com/watch?v=HrnoR9cBP3o

Spoonful of sugar helps the medicine go down
The medicine go dow-own
The medicine go down
Just a spoonful of sugar helps the medicine go down
In a most delightful way

मस्त गाणं आहे. माझं बालगीतांमधील अत्यंत आवडीचं गाणं आहे हे. Smile

_____________________

http://www.youtube.com/watch?v=1Pu1adxqUAg
हे तर तूफान आहे Smile

https://www.youtube.com/watch?v=tujMw1NeB-w
अमोरे!!! आहाहा मस्त गाणां सापडलं.

https://www.youtube.com/watch?v=4eIDtwcFXcI
हे फिव्हर ही मस्त आहे.
_________________
हे वडीलांचं मुलीसाठी गायलेलं गाणंही छान आहे - http://www.youtube.com/watch?v=7fV6fmBerRg
हे मुलीनी वडीलांकरता गायलेले - http://www.youtube.com/watch?v=9VaTDvBo_zI अतिशय सॅड आहे.

सध्या लिंक नाहिये माझ्याकडे.पण काल काही कामानिमित्तानं यूट्यूबवर एक चायनीज इन्स्ट्रुमेंटल ऐकत होतो.
छोटा -- वीस पंचवीस मिनिटांचा तुकडा आहे.
पहिल्या दहा मिनिटांनंतर त्यातून चक्क मालकंस ऐकतोय का काय असा भास व्हायला लागला.
इन्स्ट्रुमंटल ऐकून झाल्यावर लागलिच " आधा है चंद्रमा रात आधी" हे मला ठाउक असलेलं मालकंसातलं गाणं वाजवून पाहिलं.
बरीचशी सुरावट जुळत होती.
डूके चक्रावले.
मजा आली.
घरी गेल्यावर दुवा डकवतो. अवश्य प्रयोग करुन पहा.
वरवर पार वेगळी वाटतात ती चायनीज वाद्यं वगैरे.
पण एकदम ओळखीचे सूर तिकडे सापडले की मजा वाटते.
त्यांची नेमकी ओळख पटेपर्यंत काहीसं दातात बडिशेप अडकल्यासारखा बारीकसा अस्वस्थपणाही असतो.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जिवंत व्यक्तीत विसंगती/विरोधाभास असणे अस्वाभाविक नाही.कन्सिस्टन्सी असते ती दगडाकडे, पण तो निर्जीव असतो.

सही आवडली.

Do I contradict myself? Very well, then I contradict myself, I am large, I contain multitudes." - Walt Whitman

आठवला! मन अन व्हिटमन ... ग्रेट माइंड्स थिंक अलाइक Wink

झुकविंदर सिंग मारकी साहेबांचा इंटरव्ह्यू. काय अस्खलित मँडारिन बोलतोय पोरगा, वाह!

https://www.youtube.com/watch?v=S5qXkPNk5cA

काय कळलं तेवढं विचारायचं नाही. शे-शे!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सलोना सा सजन और में हूँ
जिया में एक अगन है और मै हूँ
तुम्हारे रूप की छाया में साजन
बड़ी ठंडी जलन है और मै हूँ

क्या बात है!!

https://www.youtube.com/watch?v=DjKJ8srHKi4

काल रागा/गानाडॉटकॉम वर रात्रभर (म्हणजे झोपेपूर्वी) मंद वाद्यसंगीत अखंड ठेवायचा प्रयत्न केला. पण फसला. इतरत्र शोधायला बराच वेळ लागू लागला. तेव्हा राग केदार आणि राग कल्याण, इंस्ट्रूमेंटल, ऐकण्यासाठी सगळ्यात उत्तम वेबसाईट कोणती? आणि कोणत्या वाद्यावर हे राग आपणांस* खूप भावले आहेत?

* प्रश्न जाणकारांना उद्देशून. मी स्वतः संगीतात अज्ञ आहे पण कोइंसिडेंटली या दोन्ही रागांतील सारी गाणी माझी सर्वात प्रिय राहीली आहेत.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.

मागच्या आठवड्यात पद्मजा फेणाणींचा गझ़ला आणि गाण्यांचा कार्यक्रम होता. विशेष नाही आवडला. गझ़ल या प्रकारासाठी मला मुळातंच मिसफिट वाटणारा, पातळ आणि गोड आवाज (जो गृहित होताच) आणि त्यात गझलेला लागणार्‍या ठेहेरावाचा जाणवलेला आभाव, यामुळे कार्यक्रमानी निराशाच केली. त्यातल्यात्यात, 'केव्हातरी पहाटे' आणि लताबाईंच्या बोलण्याची नक्कल व त्यांची काही निवडक जुनी हिंदी गाणी, हेच काय ते समाधानकारक.

ठेहेराव म्हणजे काय?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

म्हणजे जास्त घाई न करता काही शब्द किंवा शब्दसमूह मस्त घोळवत, तालाशी माफक खेळत + शब्दार्थांना साजेसा आवाज लावत पेश करणे + आपली माध्यमावर किती पकड आहे हे श्रोत्यांना कळवून देण्याच्या नादात उगीचच गायकीच्या कसरती न दाखवणे.. अशा मिश्र काहीश्यासाठी मी ठेहेराव शब्द वापरला होता आहे.
सूरावरचा ठेहेराव म्हणजे त्या सूराला काही काळ धरून ठेवणं, लांबवणं. थोडक्यात, ठेहेरना = थांबणे + रेंगाळणे अशा काहीशा अर्थी.

...These people made my day!

Speechless & Spellbound !

पंडित हरिप्रसाद चौरासिया

http://www.youtube.com/watch?v=bmzD8SOnoKg&list=RDt_IirasJvGo&index=3

Great Great Great!!!!!!!!!!!!!!

संतोष संत / संदीप चटर्जी

http://www.youtube.com/watch?v=t_IirasJvGo

पंडित शिवकुमार शर्मा

http://www.youtube.com/watch?v=1JJOAYwov_E&list=RDt_IirasJvGo&index=2

Mandar Katre