सध्या काय ऐकलंत / ऐकताय- ३

याआधीचे भाग: |

===========

https://www.youtube.com/watch?v=zq1iAEICw8E

मधुबालेच्या डोळ्यात "अश्क" बघितले की .... यारों ... जहन में एक दर्द सा उठता है ... एक खलिश सी महसूस होती है !!!

(आणि त्यात तो माठ ... भारतभूषण.)

---

--

field_vote: 
0
No votes yet

मधुबाला सुंदर होती कि आकर्षक होती?

अपने अपने हौसले ... अपने तलब की बात है
चुन लिया हमने उन्हे ... सारा जहां रहने दिया

pretty , beautiful or attractive?
पण सौंदर्य आकर्षक नसतं असं कोण म्हणतं ?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ज्युलिया रॉबर्ट्स् आकर्षक आहे तर एश्वर्या राय सुंदर आहे असं म्हणतात.

दोन्ही क्याटेगरीज म्युच्युअली एक्स्क्लूझिव्ह नाहीत.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

सौंदर्याचे काही निकष/मापदंड लावल्यास आकर्षक माणसे सुंदर आहेत असे निष्कर्ष प्रत्येक वेळेसच निघणार नाहीत आणि vice versa.

अर्थातच. पण आकर्षणाची व्याख्याही केली पाहिजे. लैंगिक आकर्षणाशी जवळपास असं काहीसं तुम्हांला अभिप्रेत आहे असं वाटतंय. की ते तसं नैये?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

नाही, बर्‍याचवेळेस अनेक माणसे फारशी सुंदर नसतात तरीहि आवडतात असे निरिक्षण आहे.

जण्रल आवडण्याचा अन सौंदर्याचा तसाही संबंध नसतो. पण जेव्हा लैंगिक आकर्षणाचा विषय येतो तेव्हा ते निगडित होतं.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

"Drinking makes you look sexy."

"But I haven't be drinking!"

"No. But I've been."

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

ठ्ठो ROFLROFL

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ती म्*ठी अन का*डी नेऊन घाला की रे तिकडे. (कुठे ते सगळ्यांना माहीती असायचे) .... (रावसाहेब). पुलं.

हा हा हा ROFL

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

१.आकर्षण मुली काँन्फिडेंट असतात-मुक्ता बर्वे
२.सुंदर मुली मंद असतात-एश्वर्या राय
३.सेन्शुअस मुली confident+ good smelling असतात-चित्रांगदा सेन
४.सेक्सी मुली confident+emotional असतात-दिपीका

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

काहिच नव्हती. थोराड, चौकोनी बांधा, स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव आणि नाचाच्या नावानी बोंब!!!

तू जालावर किती शत्रू ओढवून घेतल्येस याची तुला कल्पना आहे ना?

बाकी स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव असणारी प्रत्येक स्त्री मला लक्ष देण्यालायक निश्चित वाटते.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मलाही सण्ड्रा बुल्क आवडते गं. मधुबाला म्हणल ना की जालावर जरा अंमळ जास्तच उमाळे फुटतात...उसासे सोडले जातात म्हणुन जरा कुजकेपणा केला. अणि तुला महितीये मधुबाला आवडणं म्हणजे काहितरी उच्च अभिरुचीच लक्षण बिक्षण असतं आणि ती आवडत नाही अस म्हटल रे म्हटल की लगेच तुमचा आयक्यू मायनस मधे गणला जातो.

स्त्रीसुलभ नजाकतीचा साफ अभाव असणारी जोडी फॉस्टर, तिची बोलण्याची वेगळीच लकब आणि 'मॉन्स्टर' या चित्रपटात सौंदर्यांची, स्त्री शरीराच्या प्रमाणांची ऐशीतैशी करणारा मेकप, आकार आणि त्या सगळ्याला शोभणारं काम केल्यामुळे शार्लीझ थेरन फार आवडतात.

(मधुबाला आवडतच नाही असंही नाही, तिरळी होती तरी सुंदर होती. तसल्याच घिस्यापिट्या भूमिका आणि हिरो-हिरविणीने लौ करण्याच्या आड व्हिलन येणार असलेच सिनेमे त्या काळात होते हा काही तिचा दोष नाही. त्यापेक्षा तिच्याबद्दल यशस्वी, कमावती अभिनेत्री आणि तरीही घरातली सत्ता वडलांच्या हातात, हिच्या हातात खुळखुळा वगैरे भाग मला जास्त रोचक वाटतो.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मधुबाला आवडणं म्हणजे काहितरी उच्च अभिरुचीच लक्षण बिक्षण असतं >> कैच्याकै. उलट ते 'नॉर्मल' असण्याचं लक्षण आहे. म्हणजे सुंदराला सुंदर म्हणण्यात 'लोक काय म्हणतील' माझे हुच्चभ्रू दोस्त नावं ठेवतील वगैरे विचार न करता प्रामाणिकपणे 'आवडते' म्हणणं असतं. याउलट मधुबालाबाबत नाक मुरडणं हे अभिरुचीच्या तथाकथित वरच्या थरात आपण आहोत वगैरे ठसवण्याचा प्रयत्न असतो, म्हणजे पुलं, वपु वगैरे चारचौघांना आवडणार्‍यांना 'मध्यमवर्गीय लेखक' म्हणून हिणवणार्‍या, किंवा इतरांच्या गळ्यातील ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरला आकडेवारीची मोडतोड करून नालायक सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार्‍या, लताबाईंच्या स्वर्गीय गाण्यांपेक्षा त्यांनी कसं राजकारण केलं वगैरेमधे रस असणार्‍या, चार लोकांच्या अनुभवाशी सहज जोडल्या जाऊन दाद घेणार्‍या कवितांपेक्षा रांगोळी टिंबांच्या कहाण्या सांगणार्‍या दुर्बोध कविता कित्ती आशयघन, आशयसूत्रांच्या प्रयाणपाराच्या पलिकडच्या वगैरे आहेत म्हणणार्‍या पण प्रत्यक्षात डोंबलं काही कळलं नाही असं मनात म्हणणार्‍या दांभिक जमातीबद्दल बोलतोय मी. तिच्या पेक्षा ज्युलिया रॉबर्ट्स कित्ती क्यूट, पुलंपेक्षा वुडहाऊस किती न्याचरल आहे नै वगैरे फुकाच्या टिमक्या वाजवणार्‍यांबद्दल बोलतोय मी.

हुश्शः आता गायबतो नाहीतर मार पडणार नक्की.

-मधुबालाच्या सौंदर्याचा कट्टर चाहता (पण तिच्या अभिनयाबद्दल सोयीस्कर मौन पाळणारा) रमताराम

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

एक विशेषण वापरले नसते तर हा पुलोत्तरी (after PuLa) प्रतिसाद अत्रेपूर्व (before Atre) कर्कश्श वाटला नसता. सरसकटीकरणं आर्टिक्युलेट करण्यापासून तुम्हास मुक्ती मिळो.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

ररा, This is the best प्रतिसाद ever in the history of mankind.

खरा मित्र असावा तर ररांसारखा.

ररागुर्जी ने क्या बात बोली है! ऐसे बोली है जैसे बंदूक की गोली है!!!!

(बद्धकोष्ठी मधुबालाहेटरांचा द्वेष्टा) बॅटमॅन.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

मधुबाला: थोराड पSSSSSSSSSSSण सुंदर चेहेरा, ठोकळा बांधा, नाचाची बोंब, अभिनयाशी वैर ई.ई.

पु.ल.: कुर्निसात!!

वुडहाउसः आणखी एक वादग्रस्त विधान करणार होते..पण राहिलं ते. त्यादिवशी आमचा सगळा ग्रुप TCBY मधे गेला होता. तर तीथे लागलेल्या म्युझिक मधे अचानक आय पी एल ची चिरपरीचीत धुन ट्यँट्यँट्यँट्यँट्यँट्यँट्यँट्यSSSSSSSSS कानावर पडली. आयपीएल सुरु होतय आणि सगळा इण्डिञन घोळका आलाय म्हणुन त्यांनी ही धुन वाजवली असं आधी वाटलं (ईथे असं करतातही) पण कसलं काय हो...ते एक ईंग्लिश गाणं होतं. च्यायला ओरिजीनल काय नाहीच का आपल्याकडे..? Fool )

वपु. : जाउ द्या, सोडा, जाSSSSSSउ द्याSSSSSSS

लता: १९७५ पुर्विची आवडते. आता हे पण राजकारण का?

सचिन तेंडुलकरः क्रिकेट, आकडेवारी, रेकोर्ड्स..बाप माणुस!! (त्याचे सत्यसाईबाबांच्या ईथले वर्तन नाही पटले...पण शेवटि त्याची श्रद्धा, त्याची निष्ठा त्याच्याकडे. त्यानी कुठल्याही कोंट्रोवर्सी मधे कसलाच स्टॅण्ड घेतला नाही, त्याला आणि फक्त त्यालाच शक्य असुनसुद्धा पण तरिही त्याचा निर्णय, त्याची मर्जी. आणि शेवटि त्याच्यामधले काय आवडावे आणि काय नाही ही एब्सोल्युटली माझी मर्जी नाही का? त्याचं सगळच आवडत असं म्हणणं , म्हणजे माझा पण 'मधुबालाचाहता' होणार...!!!)

चित्र आणि ईतर कला: घोडा म्हणजे घोडा आणि माणुस म्हनजे माणुस ईतक स्वछ कळतं तेच आवडतं. आमच्या ईण्डियातल्या टाउन्शीप मधे एक स्कल्प्चर पार्क होता. तिथे एक घासुन गुळगूळीत केलेला दगड होता, त्याला मधोमध एक तासलेलं मोठ्ठ भोक पाडल होतं आणि वर आणखीन एक तसलचं भोक होतं. तो म्हणे 'मुक्त होणारा आत्मा' होता... SadSadSad

काव्यः नाच रे मोरा...छान कळतं पण आवडत नाही. "आलो होतो हासत मी,काही श्वासांसाठी फक्त,दिवसांचे ओझे आता,रात्र रात्र शोषी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळयांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा" म्हणायला खुप आवडत पण घण्टा कळत नाही SadSadSad

कॉम्प्लीकेटेड आहे हो सगळ. मधुबाला आवडत नसणार्‍यांचे पण ईतके पैलु असु शकतात..हो ना? मग मधुबाला ना आवडणारे उपर्रोल्र्खित सगळ्याच विशेषणांना म्हणजे राजकारणी, दांभिक ई.ई. पात्र आहेत असं म्हणणं म्हणजे थलथकतिकलन नाही का?

(देवा, ब्याट्म्यान चा कॉम्प्युटर बंद पाड...अरे देवा..पण मी तर देव ही मानत नाही.... :O :O :O )

(देवा, ब्याट्म्यान चा कॉम्प्युटर बंद पाड...अरे देवा..पण मी तर देव ही मानत नाही.... Shock Shock Shock )

मधुबालाला अजून श्या घातल्या तर तुमचाच 'कँपुटर' बंद पडो!!!!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

स्वरा तुम्ही जिंकलात!

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

यही तो मै कह रहा हूं.

काल त्यांनी सुमन कल्याणपूर यांचा आवाज लतादीदींपेक्षा जास्त आवडतो - असे विधान करून मला अलियनेट केलेले आहे. आज मधुबालेबद्दल हे असं बोलून आमच्या पर्ल हार्बर वरच अ‍ॅटॅक केला.

तिसरे व चौथे महायुद्ध एकत्रच होणार असे दिसते. मी आमच्या सेनादलांना DEFCON 1 वर जायचा आदेश दिलेला आहे.

ज्जे बात! गब्बर तुम आगे बढो! हम लडाई देखने को उत्सुक हय Blum 3
तरी म्हणल मधुबाला समर्थक एवढे शांत कसे काय इतका वेळ.
बाकी स्वराच्या स्त्रीसुलभ नजाकत सोडुन इतर मुद्द्यांशी मी सहमत आहे. पण त्याकाळी बर्याच नायिकांचा बांधा तसाच होता. चुभुद्याघ्या.
खरंतर आत्ताआत्तापर्यँत, सोनाली बेँद्रे वगैरे येइपर्यँत नायिका तशाच होत्या. परत चुभुद्याघ्या :-D.

===
Amazing Amy (◣_◢)

अरे बापरे...मी ईथे ऑलरेडी ममीफाय झालेय. हरकत नाही, 'हमरी अटरीया पे...http://youtu.be/-BOWrHtthyc आणि 'ये लाल इश्क ये मलाल इश्क...http://youtu.be/W0Gms9jn9lg ऐकते....

चलो, आने दो...!

आय आय सर!!!!

आमच्या (फार जीव इ. असलेल्या) मधुबालेबद्दल विनाकारण असे बिनबुडाचे उद्गार काढणार्‍यांना तर कड़ी से कड़ी सजा दिली पाहिजे. (म्ह. नजरकैदेची-या कडीपासून त्या कडीपर्यंत).

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

बिनबुडाच्या मधुबाले साठी +१००..!! आय माय स्वारी पण ती खरच आयताकृती होती..!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

शांत खड़गधारी लिओनी दास.

ओ ते संधी अगोदर साधायचं बघा बरं! च्या मारी, विग्रह कैतरी वेगळेच सुचवू पाहतोय.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

हौ अबौट श्री. लिओ नि. दास. (बंगाली/ओडिसी टैप दास). बघा म्हणजे आमचे भाषिक ज्ञान अमंळ कमीच आहे.

हेही ठीक अन तेही. इनफ्याक्ट तुम्ही वरिजिनल ग्रीक स्पेलिङ्गप्रमाणेच बरोबर उच्चार केलात, फक्त तो सुटा लिहिल्याने अनवस्थाप्रसङ्ग झाला Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

>>बिनबुडाच्या मधुबालेसाठी

विदा द्या.आणि हो बुडावरुन आकर्षकपणा सिद्ध होइल, चेहर्‍यातील सौंदर्याची चर्चा चालू आहे.

नै तर काय! चर्चाविषय काय आणि चर्चा चाललीय कशाची. एकूणच बिनबुडाचा प्रकार आहे.

निव्वळ स्वतःच्या विरोधभक्तीसाठी अशी विधाने केलेली पाहून मणोरञ्जण बाकी चिकार होत आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

एकुणच 'मधुबाला सुंदर आहे' हे थलथकतीकलन आहे. आणि फक्त तीच सुंदर आहे हा तर कणेकरणीय मधुराभक्तीचा प्रकार आहे.

उत्तरार्ध तरी ठीके, पण पूर्वार्ध हा निव्वळ विरोधभक्तिप्रणीत अन अतएव बिनबुडाचा सॉरी आयताकृती आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

चला हळुहळू पटतयं तर तुम्हाला....इन फॅक्ट पुर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळुनच खम्प्लीट आयत बनतोय... ROFL

घंटा.

मधुबालेबद्दल बोलताना स्त्रीशरीराचे कुठेतरी वस्तूकरण करत आहोत हा विचार मनाला शिवला नाही हा विरोधाभास बाकी अतिशय रोचक वाटला Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र....भलतीकडेच गेलं कि हे...ईति लेखनसीमा.. :O :O :O

ईति लेखनसीमा

म्हणजे लेखन परत चालूच, असं ना?

*********
आलं का आलं आलं?

आधी तुमची बाजु सपष्ट करा...मधुबाला or एंटिमधुबाला..?

थलथकतीकलन म्हणजे काय?

सरसकटीकरण.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

ओते. थमदले.

फ्रेंच, चिनी लोकांचं इंग्लिश लक्षपूर्वक ऐकलं तर ते शब्दाच्या सुरूवातीच्या 'थ'चा 'स' करतात असं लक्षात येईल. हा 'स' म्हणजे आपल्या 'स'सारखा नसतो, थ-ज-स च्या मधला उच्चार असतो, पण आपल्याकडे तो उच्चार नाही म्हणून लिहीण्याची सोय नाही. या लोकांशी बोलताना त्यांना 'थर्टी सेव्हन' समजलं नाही तर सरळ 'सर्सी सेव्हन' म्हणून पहा.

तर ते या 'थलथकटीकरणा'मुळे आठवलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सौंदर्य जरा चहुअंगानी पाहा हो...फक्त चेहेर्‍यात सौंदर्य पाहण्याच्या वृत्तीचा त्रिवार णिशेध..!!

फक्त बुडात सौंदर्य हुडकू पाहणे हे बिनबुडाचे शिवाय अज्ञानमूलक आणि स्त्रीद्वेष्टेही आहे.

की स्त्रीद्वेष म्ह. फक्त पुरुषांनी केला तरच होतो (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसारखा)?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

बाकी स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव असणारी प्रत्येक स्त्री मला लक्ष देण्यालायक निश्चित वाटते.

हे वाक्य किंचित बदलून म्हणेन :-
बाकी तथाकथित स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव असणारी प्रत्येक स्त्रीसुद्धा मला लक्ष देण्यालायक निश्चित वाटते.
.
.
मधुबाला छान वाटते तसेच विद्या बालनसुद्धा.
काही शहाणे तिला लठ्ठ वगैरे म्हणतात.
म्हटलं अतिअशक्त असण्यापेक्षा इतपत लठ्ठ असलेलच बरं.
शिवाय ती स्वतःशी प्रचंड कम्फर्टेबल आहे.
स्वतःशी कम्फर्टेबल असलेल्या स्त्रिया छान वाटतात.
त्यातल्या काहिंचा नैसर्गिक बांधाच जाड्/मजबूत्/डबल हड्डी असतो. काही मुळातच बारिक अंगकाठीच्या असतात.
मुद्दाम मरेस्तोवर झिरो फिगरसाठी मरमर करणारे आवडत नाहित.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बाकी स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव असणारी प्रत्येक स्त्री मला लक्ष देण्यालायक निश्चित वाटते.

ही तर स्त्रीसुलभ नजाकतीची सरळ सरळ विरोधभक्ती आहे. रोचक!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

चौकोनी बांधा, स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव आणि नाचाच्या नावानी बोंब!!!

हे असेलही. तरी आम्हाला ती छान वाटते.

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्त्रीसुलभ नजाकतीचा अभाव

अश्याच हर्कती या स्त्रीसुलभ वगैरे कप्पेकरणावर आक्षेप.
आणि मधुबालात नजाकतीचा अभाव होता या आक्षेपार अधिक जोर्दार आक्षेप! Smile

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा हा! मला https://www.youtube.com/watch?v=b2Q8B2jLvVM याची आठवण झाली.

या धाग्याच नाव 'मधुबाला, सुंदर की आकर्षक?' किँवा तत्सम काहीतरी हवे Smile

===
Amazing Amy (◣_◢)

ये कनीस जिल्ल-ए-इलाही को अपना खून माफ करती है !!!

ये कनीस 'मोहम्मद जलालुद्दीन अकबर' को अपना खून मुआफ करती है!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'मोहम्मद जलालुद्दीन' की 'जलालुद्दीन मोहम्मद'?

_/\_

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

खरे तर अतिशय सुंदर गाणे आहे, याची कल्पना आहे. पण उघडून पाहवले नाही.

काय आहे, आजपावेतो हे गाणे केवळ शीड्याक्याशेटांमधून ऐकलेले आहे. बोले तो, केवळ ऑडियोमध्ये. पण तलतचा आवाज ऐकण्याकरिता बरोबर दिलीपकुमारचे थोबाडसुद्धा पाहत राहण्याची कल्पना सहन करवत नाही.

----------------------------------------------------------------------------------------------

का कोण जाणे, पण दिलीपकुमारचे थोबाड पाहिले, की केवळ 'याच्या कानाखाली खरकट्या हातांनी एक खन्नकन वाजवावी' ही एकमेव भावना आजपावेतो मनात प्रबळ होत आलेली आहे. (तसे आपण एरव्ही फारसे व्हायोलेण्ट प्रवृत्तीचेही नाही. बोले तो, बहुधा नसू. आणि, नथिंग पर्सनली अगेन्ष्ट मिष्टर दिलीपकुमार, ईदर. पण होते खरे असे. डोक्यात जातो खरा.)

सोबतीला मधुबाला असली, तरीही. (तसे मधुबालेबद्दल आपण न्यूट्रल आहोत. बोले तो, टॉलरण्ट. म्हणजे, फार ग्रेट वगैरे आहे, असेही वाटत नाही, पण तिटकाराही नाही. चालून जाते. माफक नयनाल्हाददायक आहे, आपल्यापुरती ठीक आहे. असो.)

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

ती देखताच बाला, कलिजा(पुनरेकवार)खलास झाला!!!!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अच्छा जी मैं हारी...साठी मी पण तुमच्या कळपात!!!

क्या बात! सत्याची कास धरलीत याचा आनंद झाला!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

शुकर है फिर भी आए तो.

... गब्बर एरव्ही कसाही असो ;), पण त्याची गाण्यातली टेष्ट मात्र वाखाणण्यासारखी आहे, हां!

- (वामहस्तप्रशस्तिपरायण) 'न'वी बाजू.

-------------------------------------------------------------------------

कारण शेवटी आम्ही... लेफ्टिष्टच! त्याला काय करणार? Wink

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

मस्स्स्स्त मस्स्स्त मस्स्स्स्त...!!!

भयाण नाच...!! SadSadSad

.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

ही सगळीच उच्च गाणी आहेत. जुल्म-ए-उल्फत पे - हे तर लताबाईंनी खास आमच्यासारख्यांची "लाख जिगर चाक" करण्यासाठीच गायलेले आहे असे वाटते.

उठाये जा उनके सितम - हे रात्री अकरा वाजता ऐकावे. रेड वाईन चा एखादा पैमाना साथ हो तो "जुबां खामोश तो होगी ... पर ... अश्क भर आयेंगे".

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

_/\_

ये जानने का प्रयास कर रहा हूं
के मेरे पैमाने मे मय ज्यादा है या अश्क

हे घ्या आणखी एक ...

https://www.youtube.com/watch?v=0aT45mikEGU

हम प्रेम के सागर में एक साथ बहे होते
और अगर बच भी जाते तो अपने ही
अश्कोंमे डूब के मर गये होते...

कोणतं गाणं आहे या प्रतिसादात? मला काहीच दिसत नाहीय :-(. व्हिडीओसोबत गाण्याचे २ ३ शब्द किँवा युट्युब लिँक दिली तर बरं होइल.

===
Amazing Amy (◣_◢)

लोडवायला वेळ लागतोसे दिसते. (का कोण जाणे.)

१. यूँ हसरतों के दाग़ http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=OypGJJrizas
२. उन को यह शिकायत है http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=vY_S_Br6MAs
३. उठाए जा उन के सितम http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=It4hHAp-784
४. जुर्म-ए-उल्फ़त पे हमें लोग सज़ा देते हैं http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=CM1jjv5Z70E

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

वाह! छान आहेत चारी गाणी. आभार Smile

===
Amazing Amy (◣_◢)

इराणचे कधीकाळचे जनगणमन ऐकले.

"वतनम वतनम वतनम".

https://www.youtube.com/watch?v=FxQFWkjPBZU

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

फैली हुई है सपनोंकी बाहे ... च्या नंतर हे मला खूप रोमँटिक वाटतं (दुसर्‍या क्रमांकावर)

http://www.youtube.com/watch?v=tScOkrdvg1w

--

हे ही खूप ऐकतेय सध्या...

http://youtu.be/CI3nkNITPps

काल एका छोट्याश्या ईण्डीयन ग्रोसरी मधे साखर घेतानाच अचानक हे ऐकल...मस्स्स्स्स्त वाटलं...एकदम देजा वू फिलींग..!!

http://youtu.be/SBNjybKlcJM

९० च्या पूर्वीच्या सगळ्या हिरोईन च्या चेहऱ्यात मला काही फरकच काळात नाही आहे.
वरती मधुबालाचे विडीओ बघितले. गोड आहे पण आमची ठमी पण मेक अप केल्यावर गोडच दिसते. त्याकाळी अभिनय म्हणजे काय असणार आहे ? कॅमेरा समोर जाऊन नुसता कपाळावर बट घेऊन झाडाच्या आगे मागे हिरोला गाजर दाखवत फिरायचं(अपवाद-देविका राणी)
आजकाल सनीदीदी किती श्रम घेते(हवेत उडणे वगैरे).
वूडहाउसच्या विनोदाला हसणारे लोक आय टी कंपनी मध्ये काम करतात आणि फावल्या वेळात क्ले कोर्टवर टेनिस खेळतात.(खेळतात म्हणजे रकेट घेऊन जिमखान्यात जातात आणि टाईमपास करत बसतात)
पुल देशपांडे आज असते तर त्यांनी पुस्तक लिहिण्याएवजी ब्लॉग लिहिला असता का?

आकडेवारी जाउदे सचिन तासापण एकदम अवरेज खेळाडू होता. उगीच फुटेज भेटलं त्याला.
कोहली , द्रविड , गांगुली , पोन्तिंग , बेवेन , लारा हे त्याच्यापेक्षा शतपटीने प्रतिभावंत खेळाडू होते.

आम्ही फक्त रंगीत चित्रे बघतो त्यांचे रस ग्रहण करत नाही.

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

मधुबाला, सचिन हमारे दैवत है. तुम अपनि जिभ संभालो. नहितो तुमको कॉन्स्टिपेशनका सर्टिफिकेट मिलेगा.

गंभिर होतः आम्हाला मधुबाला एक-दोन गाण्यातुन माहित आहे. तिच्याविषयी लोकांना भिषण प्रेम असेल असंही माहित नव्हतं. आम्हि आसपासच्या हाडामांसाच्या मुलिंवर लाइन मारत असल्याने आमचे जिवापाड प्रेमहि त्यांच्यावरच होते. ८०च्या दशकात बराच मसाला उपलब्ध असल्याने अगदि पौगंडावथेतहि श्यामश्वेत काळातल्या बायांचा विचार करावासा वाटला नाहि.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

पुराणकाळात हिरोइन्स कुंकू बिंकू(बिंदी) लावायच्या नाहीत काय ?

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

हे ऐकाच. लताचं नाहिये, आशाचं आहे. आलि रे मेरे नैना बान पडी...

http://youtu.be/gMgwYNMAjVE

इर्शाद. हे मी नुकतंच माझ्या फेसबुकावर पोस्ट केले होतं. उच्च आहे. पूर्वी सिलोन वर फार लागायचं. सकाळी साडेसात वाजता. पुराने फिल्मों के संगीत च्या कार्यक्रमात.

------

जोडीला हे ऐका -

https://www.youtube.com/watch?v=q8Sb7eRG4bw

सावन मे उमग्यो मेरो मन
भनक सुनी हरी आवन की

नन्ही नन्ही बूंदन मेहा बरसे
शीतल पवन सुहावन की
मीरा के प्रभु गिरिधर नागर...

श्रावणाच्या पावसाच्या थेंबांत आपल्या हरी ला पाहणार्‍या मीरे ला ग्रीन पोएटेस म्हणायला हरकत नसावी.

http://www.youtube.com/watch?v=NbqCWwlNKrA

दिस इज ओल्डेस्त सॉंग आय लाईकड

Est-ce que tu as un plan? Je me suis perdu dans tes yeux.

हे एक पाकिस्तानि गाणे आत्ताच ऐकले. आधिहि आवडले होते.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

गायिकेचा आवाज अगदीच भारी आहे किंवा उच्चार निर्दोष आहेत अथवा रेकॉर्डिंगचा दर्जा अगदीच अप्रतिम आहे असे काहिही नसून गाणे (आणी गायिका) चक्क आवडले.
अवांतर : मानवी दगड तर अतिशय सुंदर. काय त्या विधात्याची किमया ! दगड अधूनमधून चक्क थोडासा(च) हलतो देखील आहे.

कसलं कॉमेडी गाणं आहे हे. एकतर तो फल्सफा शब्द गंमतशीर. आणि दुसर्यांदा क्या जानो म्हणताना ROFL

===
Amazing Amy (◣_◢)

फैज सायबांची शायरी. आए कुछ अब्र कुछ शराब आए. ही गझल अनेकांनी गायिली आहे. गुलाम अली, बेगम अख्तर, तलत, जगजित, मेहदी हसन, नुसरत इ.

https://www.youtube.com/watch?v=bV4pNQb-YNc

हि गझल गुलाम अलिच्या आवाजात? छ्या. स्कॉचमध्ये भिजवलेला मेहंदि हसनचा आवाज कुठे अन हा गुलाम अलिचा पहाडि चहा कुठे. छ्या छ्या...

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

'पहा पहा मंजुळा हा माझ्या भिमरायाचा मळा' हे विठ्ठल उमप यांच्या गोळिबंद आवाजात.

__________
श्रेणिव्यवस्था जिंदाबाद - मालकशाहि जिंदाबाद

पावसात भिजलेली माला सिन्हा .... ओ हो हो .... ए रहमो करम जरा थम के बरस .... कही बरसात में आग न लग जाये ...

https://www.youtube.com/watch?v=tdeaeyr8wS4

नजरे तून होणारे प्रेमसोहाळे....

https://www.youtube.com/watch?v=t8vDu-C7u1Q

This comment has been moved here.

https://www.youtube.com/watch?v=1wO-bP98Qf0&list=FLI7M3Na6uXxocSXPCghcjm...
सुंदर सूदिंग गाणे.

सही: तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाच वाद आपणाशी.