प्लीज डू नॉट फीड द ट्रोल्स...

अमेरिकेत अनेक ठिकाणी मी पाट्या बघितल्या आहेत. विशेषतः प्राणीसंग्रहालयात आणि नॅशनल पार्क्समध्ये. 'प्लीज डू नॉट फीड द ऍनिमल्स'. येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये अनेक अस्वलं असतात. तिथे 'प्लीज डू नॉट फीड द बेअर्स' अशा पाट्यादेखील दिसतात. हा संदेश का दिलेला असतो असा मला नेहमी प्रश्न पडत असे. प्राण्यांपासून माणसाला धोका असतो म्हणून की माणसापासून प्राण्यांना धोका असतो म्हणून? त्याचं थोडक्यात उत्तर असं की दोन्ही बरोबर आहे. माणसांनी प्राण्यांना खायला घातलं तर त्यांना माणसांकडून खायला मिळेलच अशी अपेक्षा निर्माण होते. त्यामुळे जे लोक त्यांना खायला घालत नाहीत त्यांच्याबाबतीत ते आक्रमक होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की माणसांकडून अन्न मिळण्याची सवय झाली तर त्या रानटी प्राण्यांची स्वतःहून अन्न मिळवण्याची नैसर्गिक ऊर्मी नष्ट होऊ शकते. उन्हाळ्यात टूरिस्टांकडून त्यांना खायला मिळेल, पण हिवाळ्यात, जेव्हा कोणी फिरकत नाही तेव्हा काय?

'कृपया प्राण्यांना खायला घालू नका' या घोषणेप्रमाणेच 'कृपया ट्रोलना खायला घालू नका' ही घोषणाही वाचायला मिळाली. तुम्ही हे वाचून गोंधळात पडला असाल याची मला खात्री आहे. अस्वलं माहीत आहेत, एकंदरीत प्राणी माहीत आहेत, पण ट्रोल म्हणजे काय? हे कुठच्या प्राण्याचं नाव आहे का? त्यांच्यापासून आपल्याला किंवा आपल्यापासून त्यांना काय धोका असतो? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. आपण अगदी मुळापासून सुरूवात करूया.

ट्रोल म्हणजे काय? हा शब्द मुळात आला तो स्कॅंडेनेव्हियन लोककथांमधून. त्यात ट्रोल हे राक्षससदृश असतात. सामान्य मनुष्यापेक्षा कितीतरी प्रचंड आणि शक्तिवान. पण अतिशय कुरुप, आणि अत्यंत मंद. इथे ट्रोलांच्या काल्पनिक प्रतिमा सापडतील. लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये टोल्कीननेदेखील या ट्रोलांचा वापर केलेला आहे.

पण जर ट्रोल्स हे काल्पनिक असतील तर त्यांना खायला घालू नका या घोषणेला काय अर्थ आहे? मृगजळ पिऊ नका असं म्हणण्यासारखंच नाही का ते? सांगतो.

आंतरजालीय परिभाषेत ट्रोल या शब्दाचा थोडा वेगळा अर्थ होतो. इंटरनेट ट्रोल म्हणजे कोणी राक्षसी प्राणी नाही. तर खोडसाळ, भडकाऊ विधानं करणारे आयडी. मराठी संस्थळं आंतरजालावर तशी नवीनच आहेत. पण जुन्या काळपासून युजनेट ग्रुप्स आहेत. तेव्हापासून ट्रोलही आहेत. विकिपीडियावर इंटरनेट ट्रोल वर लेख आहे. अर्बन डिक्शनरी वर असलेल्या आंतरजालीय ट्रोलच्या व्याख्या वाचण्यासारख्या आहेत. मराठी आंतरजालावर जे काही त्यातले नमुने दिसतात ते अशा दिव्य परंपरेतले आहेत. आंतरजालावर अनेक लोक या प्रवृत्तीने ग्रासलेले आहेत. त्यावर मुबलक लिखाणही झालं आहे. अशाच एका लेखाचा आराखडा, त्यातल्या काही कल्पना व माझा अल्प अनुभव घेऊन मी पुढचा लेख प्रश्नोत्तर स्वरूपात लिहितो आहे. तिथे सुरूवातीलाच लिहिलेलं आहे

Before we begin, though, understand this: the best way to deal with a Troll is to ignore them entirely.

१. ट्रोल नक्की कोण असतात? ते काय करतात?
या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं कठीण आहे. गुन्हेगार म्हणजे नक्की कोण असतात, व ते काय करतात, या प्रश्नांच्या उत्तरासारखंच. अनेक प्रकारचे गुन्हे असतात - पाकिटमारी, खून, दरोडा आणि सुनेला जाळून मारणं हे जसे गुन्हे आहेत तसेच पैशांची अफरातफर, लाचलुचपत आणि इनसायडर ट्रेडिंग हे पांढरपेशी गुन्हे आहेत. ट्रोलगिरीदेखील अशाच वेगवेगळ्या प्रकारे चालते. वरच्या गुन्ह्यांत गुन्हेगारांकडून इतरांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष उपद्रव होतो. ट्रोलांच्या वागणुकीमुळेही प्राथमिक परिणाम होतो तो म्हणजे त्यांच्या प्रतिसाद, टिप्पणी यांतून इतर उचकतात. उचकावणं हा अगदी बरोब्बर शब्द आहे. कारण बहुतेक ट्रोलांचा तोच प्रयत्न असतो.

ट्रोल
विकिपीडियावरील इंटरनेट-ट्रोलचं काल्पनिक चित्र.

२. हे लोकांना का उचकावतात? त्यातून त्यांना काय मिळतं?
कोकिळ का गातो? घुबड घूत्कार का करतं? हत्ती सरळ रेषेतच आणि उंट तिरक्या रेषत का चालतो? तो त्यांचा स्वभावधर्मच असतो. तसाच काही लोकांचा इतरांना त्रास देऊन त्यात आनंद मानण्याचा स्वभाव असतो. शाळेतली दांडगट मुलं कशी एखाद्या लहानखुऱ्या मुलाला मारून हसतात, तसंच. पण त्यांना सगळ्यात आनंद मिळतो तो येनकेन प्रकारेण आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यात. वर दिलेले बहुतेक गुन्हे पैशांसाठी होतात. ट्रोलांची वागणूक ही आपल्या स्वतःवर लक्ष खिळवून ठेवणं आणि आपण इतरांना कसं मामा बनवलं, त्रास दिला याचा आनंद उपभोगण्यासाठी होते.

३. ते नक्की कशा कशा प्रकारे उचकावतात?

गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी जशी वेगवेगळी असते तशीच ट्रोलांचीही असते. विकीमिडियावरचा 'व्हॉट इज अ ट्रोल' लेख
म्हणतो - Some trolls are critical of the project, its policies, its users, its administration, or its goals. Often, this criticism comes in the form of accusations of cabals (कंपू), ilks (जमाती), or campaigns that are typically invested in a particular POV, invested in maligning a specific user, and other similar claims. इतरही काही पद्धती असतात. एक पद्धत म्हणजे अत्यंत गलिच्छ किंवा अपमानास्पद विधानं वारंवार करणं. वाचकांपैकी काही जणांनी गेंड्याची कातडी पांघरलेली असली तरी काही हळवे सदस्य असतात. ते अशा विधानांनी दुखावले जातात. एखाद्या चांगल्या गोष्टीला इतकं वाईट कसं कोणी म्हणू शकतो, ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. त्यामुळे ते त्या ट्रोलच्या विधानाचा धिक्कार करतात. किंवा ते चूक कसं आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्या ट्रोलसाठी अर्थातच काडीचाही फरक पडत नाही. कारण अनेकांच्या मनात आपला धिक्कार करावासा वाटण्याइतपत भावना निर्माण झाल्या यानेच त्यांना समाधान मिळतं. काही हाच प्रकार गलिच्छपणा न करता करतात. निव्वळ पुरेसं धुसर पण सकृद्दर्शनी चुकीचं विधान केलं की झालं. अनेक लोक त्याची चूक दाखवण्यासाठी तुटून पडतात. मग ती चूक कशी नाही हे सिद्ध करण्यात ट्रोल भरपूर टीआरपी खाऊ शकतात. आपल्याला वारंवार असे आयडी दिसतात की मूळ चर्चा, लेख कशाविषयीही असो - हे लोक त्यात शिरले की थोड्याच वेळात ती चर्चा फक्त त्यांच्या स्वतःविषयी रहाते. अनेक लोक त्यांना विरोध करतात. आणि नेहमीची सवय झाल्यावर ती प्रतिक्षिप्त क्रिया होते. तसं झाल्यामुळे त्रयस्थांना 'तो म्हणतो ते अगदीच बरोबर असतं असं नाही, पण खूप लोक त्याने काही लिहिलं की बिचाऱ्यावर तुटून पडतात. हे बरोबर नाही.' अशी सहानुभूतीही त्यांना मिळते. हे खरे कौशल्य असलेले ट्रोल. आपण इतक्या लोकांचा वेगवेगळ्या प्रकारे मामा बनवतो म्हणून स्वतःशी खुदूखुदू हसणारे.

४. ट्रोलांचं व्यक्तिमत्व काय प्रकारचं असतं?

या प्रश्नाला सरळसाधं उत्तर नाही. ट्रोलांचे कंटाळलेले, थापाडे, भांडकुदळ, स्फोटक विधानं करणारे असे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या विधानांवरून ते यडपट वाटले तरी ते खरोखरच तसे असतीलच असं नाही. पण बऱ्याच ट्रोलना आपल्याकडे लक्ष हवं असतं. आंतरजालावर स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी सुंदर लेखन करण्यापेक्षा कोणालातरी हिणवण्याचा मार्ग सोपा असतो. असा मार्ग निवडणारं व्यक्तिमत्व नक्की काय जातीचं असेल? एकतर आपल्याला चांगलं काही करता येत नाही, किंवा ते चांगलं करण्यासाठी कष्ट घेण्याची तयारी नाही अशी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती. त्यासाठी आंतरजालावर मिळणाऱ्या बुरख्याचा, निनावीपणाचा गैरफायदा घेणारी व्यक्तिमत्व. त्यातले काही सामान्य जगात यशस्वी नसलेले, मित्रपरिवार कमी असलेले असतात. पण तरीही पुरेसं साधारणीकरण करता येत नाही.

५. मग या प्रकारच्या वर्तणुकीवर उपाय काय?

बिपिन कार्यकर्तेंनी आपल्या एका अत्यंत वाचनीय लेखात शिव्यांविषयी लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, सर्वात जहाल शिवी कुठची? तर ती म्हणजे 'दुर्लक्ष'. हा सर्वात उत्तम उपाय आहे. आंतरजालावर कोणीतरी काहीतरी भडकाऊ विधानं करतो म्हणून आपण भडकण्यात काही अर्थ नाही. राही ना का ते भडकाऊ विधान तिथे! जितकी भडकाऊ विधानं दुर्लक्षाने मरतील तितकं चांगलं. ऐसी अक्षरे वर प्रतिसादांना श्रेणी देण्याचा फायदा या बाबतीत दिसून येतो. दुर्लक्ष करण्याजोग्या विधानांना कोणीतरी तशी श्रेणी देऊन ठेवली की इतरांना ओळखायला सोपी जातात.

६. ट्रोल कोण नाही?

संस्थळांवर बरीच वर्षं वावर केल्यावर अनेक ट्रोलांचा अनुभव येतो. दुर्दैवाने एखाद्या नवीन सदस्याने केलेलं काहीसं पोरकट विधानही एखाद्या मुरब्बी ट्रोलने केलेल्या विधानासारखं वाटू शकतं. मग त्याला भडकाऊ, अवांतर अशी श्रेणी मिळाली की त्या सदस्याचा विरस होऊ शकतो. त्या बाबतीत सुमारे तीन विधानांची सवलत द्यावी. जर सातत्याने अशी विधानं आली तर त्या आयडीची वागणूक ही ट्रोलसदृश आहे असं समजायला हरकत नाही. मात्र आधी नको.

सारांश काय तर आपल्याला जागोजागी ट्रोल दिसतात. त्यांची विधानं आपल्या डोक्यात जातात. आपल्याला मनस्ताप देतात. त्यावर सोपा उपाय म्हणजे एकतर कोणता आयडी अशी विधानं करतो हे ओळखणं. आपला प्रतिसाद देण्यापूर्वी आपण ट्रोलला हवं तसंच वागतो आहोत का, त्याच्या हातातलं मनोरंजनाचं खेळणं बनतो आहोत का, हा विचार करावा. शक्य तिथे दुर्लक्ष करावं. अत्यंत गलिच्छ वागणुक केली तर व्यवस्थापनाकडे तक्रार करावी. पण 'डोण्ट फीड द ट्रोल' हा संदेश कायम लक्षात ठेवावा.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3.636365
Your rating: None Average: 3.6 (11 votes)

प्रतिक्रिया

झालं का लगेच रडगाणं सुरू! बाकी काही लोकांना आपणच ट्रोल आहोत हे लगेच कसं काय वाटलं हे रोचक बिचक आहे नाही का?

असो, घासूगुर्जींना सप्रेम भेट. बघा असं काहीतरी करून उपयोग होतोय का ते! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

बाकी काही लोकांना आपणच ट्रोल आहोत हे लगेच कसं काय वाटलं हे रोचक बिचक आहे नाही का?

हे काही लोक आम्हीच.
----
रोचक बिचक काहीच नाही. त्याला पुरेशी पार्श्वभूमी आहे जी खुली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

किती नार्सिसीस्ट असावं एखाद्याने! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

It is any day better to love yourself than hating others. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ट्रॉल हा शब्द वाचून हॅरी पॉटर मधला एक डायलॉग आठवला.
"anyone can speak trollish. All you have to do is point and grunt!"
बादवे, नेटवर दंगा घालणार्‍यांना ट्रॉल हा शब्दच का निवडला असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"anyone can speak trollish. All you have to do is point and grunt!"

आडकित्ता यांनी हा जोक करून, लोकांच्या डोक्यावरून जाऊन आणि मग त्यांनी समजावून देऊनही झाला आहे, याच धाग्यावर.

ट्रोल हे मठ्ठ दिसणारे, भीतीदायक आणि घालवायला कठीण म्हणून त्यांना ते नाव पडलं असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्र... अर्धवटच वाचला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

डू नॉट फीड द ट्रोल्स.. इथपर्यंत ठीक होतं ... पण 'प्लीज डू नॉट फीड द बेअर्स' अशा एखाद्या सदस्याबद्दल वैयक्तिक टिप्पणी करणार्‍या लेखनाचा जाहीर निषेध ..!!

अस्वला ... आम्ही तुझ्या बरोबर आहोत ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

इथे अस्वलही आहे आणि ट्रोलही. अस्वलाला खायला घाला; तो हसवून मारेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाने