दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने

महाराष्ट्रात कोरोना महासाथीचा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कहर चालू होता. ऑक्टोबरपासून हळू हळू सगळं ओसरत चाललं होतं . डिसेंबर अखेरीला दररोज नवीन बाधित रोग्यांची संख्या आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत होतं.

जानेवारीत सार्वत्रिक लसीकरणाची सुरुवात झाली आणि महासाथीच्यासंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता महासाथ पुन्हा जोराने उसळून आलेली दिसते.

पुण्यात तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात फक्त दीडशे-दोनशे नवीन बाधित असत. आज चार पाच आठवड्यांच्या नंतर हाच आकडा हळू हळू वाढून दीडशेवरून ४५००च्या घरात गेला आहे.

Pune active cases
(प्रतिमा आंतरजालावरून साभार.)

महाराष्ट्रात दुसरी लाट आली आहे!!!!

यावेळी मध्यमवर्गीय सोसायट्यांमधून बाधित जास्त दिसत आहेत , अजून तरी. पुणे मुंबई व्यतिरिक्त मराठवाड्यातूनही फार बातम्या येत आहेत ...

तसेच सचिन तेंडुलकर, आमिर खान, परेश रावळ असे अनेक सेलेब्रिटी लोकही बाधित होताना दिसताहेत.

तुमचे दुसऱ्या लाटेचे अनुभव लिहिण्यासाठी हा धागा.

field_vote: 
0
No votes yet

माझ्या साडूचे वडील म्हणजेच माझ्या मेव्हणीचे सासरे आत्ताच करोनानं गेले. त्यांच्याकडे एकत्र कुटुंबटाइप वातावरण आहे. फ्यामिलीत अनेक लोक +ve आहेत.वय वर्षे 58. स्वभाव (त्या सर्वांचाच) काळजी घेण्याचा नव्हता. "डॉक्टर लुटतात" ही एक खतरनाक श्रद्धा असल्यानं कधीच काही तपासणी, डॉक्टरकडे जाणं वगैरे केलं नाही. लस घेऊ म्हणून त्यातल्या त्यात त्यांचा(ज्यांचा आज मृत्यू झालाय त्यांचा) आग्रह होता. पत्नीनं "अजिबात गरज नाही लस घ्यायची" असं सांगून टाकलं. संयुक्त कुटुंबात कुणीच लस घेतली नाही. कुटुंब मूळचं औरंगाबादच्या वेशीवर वाळूज औद्योगिक वसहतीजवळ एक गाव आहे, तिथलं. मंगळवारी admit केलं. आज, म्हणजे रविवारी गेले. म्हणजे इन्फेक्शन बरंच खोल रुजल्यावर मग तपासणी केली, admit झाले, असं घडलं असावं.
बहुतेक आधीच म्हणजे शनिवारीच गेले असावेत. कारण "काहीही करुन ताबडतोब निघा" हे घरातल्या थोरल्या मुलाला (म्हणजे माझ्या साडूला ) कालच सांगितलं होतं. आज पहाटेच इथून निघून तो तिथं पोचला. आधुनिक वैद्यकाबद्दल तिडीक इतकी जास्त होती की पूर्वी एकदा घरातल्या एका सदस्याला गॉल ब्लॅडर मध्ये खडे होऊन जीव जायची वेळ आली, तरी शस्त्रक्रिया करायची नाही म्हणून अडून बसले होते सगळे. (नंतर बाबा पुता करुन हातापाया पडून शस्त्रक्रिया करवून घेतली होती, तो भाग वेगळा)
मूळ गावात वावर कायम होता. तिथं वाडा आहे. राबत्यातली शेती होती. येऊन जाऊन शेती करत. ते स्वतः नवरत्न कंपन्यांपैकी एकात होते आता निवृत्त होणारच होते. पत्नी PhD आहे.आणि आता त्यांनी काढलेला निष्कर्ष दिसतोय की ....

"हॉस्पिटलमध्ये जाऊन काही उपयोग झाला नाही"

त्यांच्यात कुणी अजूनही लस घेईल असं वाटत नाही. ते असं का वागण्याचं कारण म्हणजे ग्रामीण भागात जडणघडण झाली म्हणून असं आहे म्हणावं तर तेही पटत नाही. गावातही पोक्त, शहाणी सुरती लोकं असतातच की.
माझी सध्या गोची अशी की भेटायला कसं, कधी जाऊ कळत नाही. 8 तारखेपर्यंत औरंगाबादेत लॉकडाऊन आहे. इकडं माझं नुकतंच प्लास्टर काढलंय. (गेल्या महिन्यात तळपायाला फ्रॅक्चर अन मग शस्त्रक्रिया झालीय ) मी आत्ता कुठं walkerच्या साहाय्यानं का असेना घरातल्या घरात चालतोय. सगळी बोंबाबोंब. आणि आम्हा सगळ्यांची घरं दीड दोन किमीच्या परिसरात आहेत औरंगाबादला. (मी, साडू आणि आमच्या दोघांचा मेव्हणा) तर आता घरातले सिनिअर सिटीझन तिकडं भेटायला जायचं म्हणत होते. (माझे आई बाबा आणि मेव्हण्याचे आई बाबा. म्हणजे माझे सासूसासरे) साडूकडचे बहुतांश सगळे quarantine मध्ये आहेत. भरीला भर म्हणून तिकडं ते अजूनही काही पाळत नाहीयेत असं वैतागलेला मेव्हणा सांगत होता. (तो ताबडतोब गेला तिकडं)

क्रमश:

काळजी करुन काय होणार आहे. जे व्हायच ते होईल. जे जगाच होईल ते आपल होईल. असा विचार करणारे बरेच लोक आहेत. पण असा विचार करुन बेफिकिर रहाणारे लोक त्यांना समजावता येत नाही.

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

एक डार्विन अवॉर्ड म्हणून कल्पित बक्षीस असतं. आपल्या मूर्खपणामुळेच मरून जगातल्या जीन पूल मध्ये मूर्ख जीन्स ची संख्या कमी करणाऱ्या महान विभूतींना देण्याबद्दल विचार केला जातो. पहा, नॉमिनेशन होईल का ते. पण या वर्षी बरीच competition असणार हे नक्की.

“Generations to come will scarce believe that such a one as this ever in flesh and blood walked upon this earth.” -Albert Einstein.

औरंगाबदला माझ्या परिचयातील एक ऐन तिशीतील तरुण आहे. स्टेट बँकेत कामाला आहे. त्याचा oxygen कितीवर यावा? 50 वर आहे. छातीत सगळीकडे बेक्कार पसरलेलं आहे इन्फेक्शन. त्याच्या आणि माझ्या बाबांचे घरोब्याचे संबंध. आत्ता कुठं हॉस्पिटलात पोचले. थेट icuत टाकला. माझ्या आसपास चिकार लोकांचं बेक्कार नुकसान झालेलं दिसत आहे.
.
माझ्या अजून एका मित्राचे वडील 7 तारखेला गेले. त्याची आई icuमध्ये महिनाभर होती. तो मूळचा परभणीचा. सध्या राहायला पुणे. त्यांना डिसचार्ज मिळून घरी गेल्यावर दोन दिवसांनी तब्येत एकदम खालावली. पुढं काही दिवस आय सी यू अन शेवटी मृत्यू झाला.
.
अजून एक मित्र (माजी रुममेट) कोविडला असाच hoax म्हणत टिंगल करी. आता दोनेक आठवडे नागपूरला हॉस्पिटलात काढायला लागल्यावर सरळ झालाय. तिथं असताना त्याची बेक्कार घाबरला होता. श्वासही घेता येत नव्हता.
.
माझ्या बायकोच्या माहेरी कुटुंबच्या कुटुंब "अंदर" झालीत. (ह्यातली बहुतांश औरंगाबादची) काका, आत्या, मामा...असे सारे सख्खे नातलग अन त्यांचे कुटुंब कोविड पॉझिटिव आहेत. एक मामा तर गेला मागच्याच महिन्यात.
.
जवळच्या एका मित्राचे वडील कोविड होउन दुरुस्त होउन घरी परतलेत. (एरिया -- खडकेश्वर, औरंगपुरा)
मी यादी करणंही सोडून दिलेलं आहे. कित्येक बाबी सुटल्याही असतील ह्यातून.
.
माझे वडील बँकेत काम करत. ह्यांचा आठ दहा जणांचा घट्ट ग्रुप आहे. (सलग दोन तीन दशके सोबत काम केल्यानं चांगले परिचित आहेत सगळी कुटुंब एकमेकांना). त्यातल्या दहा पैकी सहा लोकांना मागच्या एक वर्षात होउन गेलेला आहे. (पाचेक जण आत्ता सध्या पॉझिटिव आहेत. ब्माझ्या वडीलांना जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये झाला होता करोना)

ह्या मागच्या महिन्याभरातल्या केसेस थेट माझ्या पाहण्यात आहेत. पब्लिकला वॉट्सॲपवर अजूनही विनोद सुचतात. अजूनही मधूनच कुणीतरी लाट बिट कै नै, करोना हेच एक मिथ आहे म्हणतंय. दुसरी लाट म्हणजे लस विकण्याचा केलेला प्रपोगेंडा आहे, असंही काहीजण अजूनही म्हणत आहेत.

मोजणी करणं सोडून दिलं आहे.
मुंबैत -
माझे जवळचे लोक ICU मधे क्रिटिकल होउन परत आले आहेत. महिनाभर हॉस्पिटलात वास्तव्य - त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे सरकारी इस्पितळ आणि अतिशय चांगला स्टाफ. शिवाय डिसेंबर-जानेवारीत असल्याने खाटा उपलब्ध होत्या.
आणखी एक बिन्धास काका. रोज भजनाबिजनाला जात, बाजारात फिरत. परवा भयानक खोकायला लागले तरीही कोविड वगैरे नाही म्हणत होते. रक्तातला ऑक्सिजन ७०वर आलेला तेव्हा धावपळ करून ॲडमिट केलं, खाजगी हॉस्पिटलात. आता थोडे सावरलेत, पण तरीही अजून ICUमधे आहेत.

आणखी एक सिनिअर सिटिझन मास्क लावायलाच तयार नाहीत. स्वत: खोकत असताना लोकांनी "निदान आता तरी मास्क लावा" म्हटल्यावर यांचं उत्तर -
"तुला माझी काळजी असेल तर मला काही होणार नाही. तुला स्वत:ची काळजी असेल तर तूच मास्क लाव" असं सडेतोड उत्तर देऊन मोकळे झाले.
आता पुन्हा ते मास्क न लावता रानोमाळ भटकायला मोकळे आहेत.

हट्टी ज्येष्ठ मंडळी ऐकायला तयार नाहीत. काय करायचं कळत नाही.

कारण खरडीतले विचार विनोदी नसून त्यातला ऐवज मलाही लागू आहे. एवढं सांगून खाली बसतो.
बरं यावर उलटसुलट वाद घालणारा मी नाही. पण निर्णय चुकीचे असले तरी ठाम असतात.

तर सांगायची गोष्ट म्हणजे साम्पल शोधण्यासाठी दूर जायला नको. समोरच आहे. माझे विचार आणि मतं तिरपागडे असण्याची कारणं मागे इथेच कुठे तरी लिहिली आहेत.

होळीमध्ये वाईट गोष्टी जळतात यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. दोन होऊन गेल्या.

कोरोना खेळ नाही. थोतांड नाही.

आतापर्यंत पुण्या-मुंबईच्या बातम्या आपण वाचत होतो आणि दुरून डोंगर साजरे असं वाचून सोडून देत होतो. पण याच बातम्या मराठवाड्याबद्दल वाचायला येत आहेत. पुणे मुंबई मध्ये तितक्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल्स तरी उपलब्ध आहेत. आपक्याकडे तशा सुविधा पण नाहीत. त्यामुळे काळजी घेणे, संशय वाटताच टेस्ट करून घेणे आणि पॉजिटीव्ह आलात तर न घाबरता उपचार करून घेणे हा सर्वात चांगला, सोपा आणि जीव वाचवणारा पर्याय आहे. कोरोना बद्दल लक्षात ठेवा - Early detection is a key. जितक्या लवकर टेस्ट कराल, तितकी बरी होण्याची शक्यता जास्त हे लक्षात असू द्या.

मराठवाड्यातील भयावह परिस्थिती आपल्या सर्वांच्याच लक्षात यावी म्हणून -

■ औरंगाबाद मध्ये एका बेडवर तीन तीन पेशंट उपचार घेत आहेत. सरकारी हॉस्पिटल्स फुल झाली आहेत.

■ नांदेड शहरामध्ये रोज 10-12 मृत्यू होत आहेत. स्मशानभूमीत वेटिंग सुरू आहे.

■परभणी मध्ये हॉस्पिटल बेड उपलब्ध नाहीत म्हणून होम क्वारणटाईन करायला सुरुवात केली आहे. आज एका दिवसात 684 नवीन रुग्ण सापडलेत.

काळजी घ्या मित्रांनो!! थोडासाही संशय आला तर लगेच टेस्ट करा. तुम्ही लवकर टेस्ट केली तर तुमच्यापासून होणारा संसर्ग लवकर आटोक्यात येऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि सर्वात महत्वाचं, ही तर मार्च महिन्याची सुरुवात आहे फक्त.

- विवेक महाजन

1) ५०,% लोक corona खरोखर रोग आहे असा विश्वास ठेवतात.
उरलेली लोक corona थोतांड आहे ह्या मतावर ठाम आहेत .
2) मास्क मुळे बचाव होतो - संशोधक.
मास्क तुमचे रक्षण करू शकत नाही - दुसरे संशोधक.
३) आता पर्यंत corona नी इतके मृत्यू झाले_ संशोधक.
दुसऱ्या आजाराने मरण आले पण नाव corona चे-
दुसरे संशोधक.
४) corona च उगम चीन - संशोधक.
Corona चे उगम स्थान नक्की माहित नाही - दुसरे संशोधक.
५) pcr test नी खात्री नी covid इन्फेक्शन माहीत पडत - संशोधक.
Pcr टेस्ट चुकीचे निदान करते - दुसरे संशोधक.
मरायला टेकलेल्या व्यक्ती ची निगेटिव्ह टेस्ट आल्याची अनंत उदाहरण..
६) बाधित व्यक्ती chya जवळच्या लोकांना corona होतो-. संशोधक
..लहान खोलीत नवरा positive aani बाकी सर्व negrtuve- सामान्य जनतेचा अनुभव.
७) लस घेतली की CORONA होत नाही संशोधक
लस घेवून पण corona badhit- सामान्य जनतेचा अनुभव.
८) corona वर उपचार नाहीत - संशोधक.
Corona वर जे उपचार होतात त्या मुळे ९०% वर लोक corona मुक्त.
जगाच्या इतिहासात हा एकमेव रोग आहे त्या बद्द्ल कोणाचेच एकमत नाही..
संशोधक जे दावे करत आहेत त्याच्या एकदम विपरीत अनुभव dr आनी लोकांना येत आहेत..

कृपया गैरसमज पसरवू नका. तुम्ही 'दोन प्रकारची मतं आहेत' याचा अर्थ 'कोणाचंच एकमत नाही' असा काढत आहात. पर्याय (पॉसिबिलिटीज) आणि शक्यता (प्रोबॅबिलिटी) यांत गल्लत करत आहात. 'लॉटरी एकतर लागेल किंवा नाही लागणार. तेव्हा दोन्हींची शक्यता ५०-५०%', असले दावे करत आहात. हा गंभीर विषय आहे, तेव्हा विचार करून, जबाबदारीने विधानं करा. खोटी, पुराव्याशिवायची विधानं करू नका.

उलट सुलट मत प्रसार माध्यमातून व्यक्त होत आहेत
२) सायन्स मॅगझिन, रोज नवीन विरूद्ध माहिती देत आहेत.
३) लोकांचे अनुभव आणि संशोधक ची मत जुळत नाहीत.
४)इथे माणूस रोग प्रसारक आहे आणि माणसाच्या हालचाली वर १०० टक्के नियंत्रण ठेवता येते तरी गंभीर स्थिती का निर्माण झाली?
हा प्रश्न कोणाला ही पडेल.
५) जिथे डास,पिसवा,आणि बाकी सुष्म कीटक रोग प्रसारक असतात तिथे नियंत्रण ठेवणे अवघड असते.
पण सहा फिट उंच माणसावर नियंत्रण ठेवणे काहीच अवघड नाही
६) लॉक डाऊन पासून सर्व जगाने केले पण स्थिती जैसे थे
७) कसलेच symptron नसणाऱ्या व्यक्ती ना हॉस्पिटल मध्ये जबरदस्ती admit करण्या मुळे आरोग्य व्यवस्था धोक्यात का आणली गेली
७) विविध देशात विविध प्रकारचे strain आहेत हे माहीत असून सुद्धा जागतिक हवाई वाहतूक एक वर्ष साठी पूर्णतः का बंद केली नाही..
इथे फायदा १ रुपया असेल तर नुकसान करोड रुपये झाले.
८) २०१९ मध्ये चीन मध्ये काय होत आहे हे पूर्ण जगाला माहित होते आम्ही वुहान च्या बातम्या बघून वुहान पृथ्वी वर नाही तर दुसऱ्या galaxy मध्ये आहे हेच समजत होतो.
सर्व माहीत असताना लगेच चीन च बाकी जगाशी असलेली प्रवासी,सामानाची वाहतूक का बंद केली नाही
८) आज पण भारत च नाही तर पूर्ण जगा नी हवाई वाहतूक बंद केलेली नाही.....
९) अंतर राष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांना गजबजलेल्या शहरात प्रवेश का दिला.
१०)अंतर राष्ट्रीय प्रवास करणाऱ्या लोकांना कसलेच बंधन न टाकता सरळ एअर पोर्ट वरून घरी,शहरात,गावात प्रवेश दिला गेला
का?

तात्या,
करोनाच्या उगमाविषयी, तीव्रतेविषयी आणि एकंदरीतच स्वरूपाविषयी संभ्रम असणं सहाजिक आहे.
फ्लूचा प्रकार असल्याने उपचार "१००%" यशस्वी न होणं हे सुद्धा वावगं नाही.

"पण कोविड१९ जीवावर बेतू शकतो- तेव्हा काळजी घ्या. मास्क वापरा आणि स्वत:चा बचाव करा"
ह्यात दुमत असायचं कारण नाही ना?

तक्रार तुमच्या '५०% लोक कोरोनावर विश्वास ठेवतात उरलेले ५०% ठेवत नाहीत' यासारख्या विधानांबाबत आहे. हे आकडे कुठून काढलेत? त्यांमधून फॉल्स इक्विव्हॅलन्स बनतो.

तुम्ही जे लिहिताय त्याला रिडक्टिव्ह लॉजिक (मराठी?) म्हणतात. पुरेसं किंवा काहीच समजलेलं नसताना, सब घोडे बारा टके म्हणून जे काही म्हणलं जातं, त्याचं मूळ बरेचदा अशा तर्कात सापडतात.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्याच्या पहिल्या पिढीच्या लशींनी "इन्फेक्शन होणार नाही" असा दावा कोणत्याही उत्पादकाने केलेला नाही. सौम्य इन्फेक्शन तरीही होऊ शकतेच. मात्र लस तुम्हाला तीव्र रोग आणि मृत्यू यापासून १०० टक्के वाचवेल!हे सध्या प्रचलित असलेल्या सात-आठ लसींमध्ये दाखविले गेलेले आहे.

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

आमच्या सोसायटीत ७५ कुटुंबं आहेत साधारण. गेल्या वर्षात किंवा जानेवारीपर्यंत तीन किंवा चार जण बाधित होते फक्त. गेल्या तीन आठवड्यांत तीन पूर्ण कुटुंबं आणि काही एकटे सदस्य बाधित झाले आहेत. एका काकूंना अॅडमिट केलं हाेतं, वय ७०च्या पुढे म्हणून. त्या घरी आल्या आहेत, थोडा आॅक्सिजन कमी होतो मधनंच, पण घरी सोय केली आहे. बाकी सगळयांना फार त्रास होत नाहीये. सोसायटीतल््या बहुतेक सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे.
मी १ एप्रिलनंतर घेणार आहे लस. सरकारी की खाजगी रुग्णालयात जायचं ते गर्दीवर ठरवणार.
आमच्या काॅलनीसमोर असलेल्या पालिकेच्या शाळेत कोविड केअर सेंटर होतं, ते डिसेंबरमध्ये बंद केलं होतं. कालच ते पुन्हा सुरू केलं आहे. भांडुपच्या ड्रीम्स माॅलमध्ये असलेल्या एका रुग्णालयात आग् लागल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच, १० रुग्ण मरण पावले त्यात. तिथे ७५ रुग्णांची सोय होती बहुधा. आता तेही अनेक दिवस वापरता येणार नाही, तसेही त्या रुग्णालयाला परवानग्या कशा मिळाल्या वगैरे वाद सुरू झाले आहेतच. आमच्या इथल्या सेंटरमध्ये २७५ रुग्णांची सोय होऊ शकते, आमचा खासदार ते सुरू व्हावं म्हणून पाठपुरावा करत होता, आग लागल्यामुळे ते लवकर झालं असावं.
अख्खं कुटुंब बाधित झाल्याने सगळ्यांच्याच जेवणाखाणाचा प्रश्न निर्माण होताना दिसतोय. मदतनीस बायांना बोलवता येत नाही. घरातल्या सर्व सदस्यांनी स्वयंपाक व इतर कामं येत असतील तर ठीक. आणि बाईच हे सगळं करत असेल, व तिला फार थकवा आला असेल तर प्रश्न निर्माण होतात. नशिबाने आमच्या इथे घरगुती डब्यांची सोय चांगली आहे.

This too shall pass!

या नविन लाटेच्या कारणाबाबत कुठे मिमांसा झाली आहे काय? मार्च आधी तीनेक महिने एकंदरीतच करोना गेल्याप्रमाणे मोकळीक दिसत होती देशभरात. तेव्हा नविन केसेसचा रेट का घसरत होता आणि आता का वाढत आहे यावर जर कोणी सविस्तर विश्लेषण केलं असेल तर वाचायला आवडेल. 2020 च्या करोना व्हायरसच्या लाटेच्या सुरवातीलाही भारतातील लाट इतर देशांपेक्षा उशीरानेच आली होती, तेव्हा लॉकडाऊन ते हवामान वगैरे अनेक कारणं पुढे केली गेली होती- त्यातली अनेक लागू नाहीत हे आजवर स्पष्ट झालंच आहे.

-Nile

भारताची आकडेवारी पाहिली तर दोन मुख्य 'लाटा' दिसताहेत. पण त्या दोनच आहेत का? अमेरिकेची आकडेवारी पाहिली तर त्यात किमान तीन लाटा, आणि आता चौथी चालू होत असल्याचं दिसतं. मुद्दा असा की किती 'लाटा' आहेत हे कसं मोजायचं? कारण भारताच्या 'पहिल्या' रुंद लाटेतही दोनतीन रुंद लाटा एकमेकांत मिसळून गेल्याचं दिसतं.

हे अर्थातच तुमच्या प्रश्नाला उत्तर नाही. पण 'ही लाट मोठी का, आत्ताच का?' हे प्रश्न क्लिष्ट आहेत. हा मल्टिव्हेरिएट प्रॉब्लेम आहे. काही वर्षांनी एआय वापरून, काहीतरी मॉडेल तयार करून यावर प्रकाश पडू शकेल किंवा निदान काही सामायिक सत्यं गवसू शकतील. सध्यातरी चित्र फार आशादायी नाही. डकवर्थ-लुइस या गणितज्ञांनी अभ्यास करून फॉर्म्युला तयार करण्याआधी कोणीतरी क्रिकेटर मंडळी काहीतरी नियम करायची आणि बोऱ्या वाजायचा तशी परिस्थिती सध्या वाटते आहे.

बहुतेक सर्वांचे एकमत असलेले कारण - लोकांनी शस्त्रे (किंवा ढाली) खाली ठेवल्या हे आहे, निदान महराष्ट्रात तरी. यात सरकारी यंत्रणाही आल्या. उदा. दुकानांतून, इतर सार्वजनिक ठिकाणी सॅनिटयझरचे ष्ट्यांड दिसायचे बंद झाले. ही सक्ती चालू ठेवता आली असती. मास्क सक्ती चालू ठेवून आणि न पाळणाऱ्यांना दंड लावून परिस्थिती नियंत्रणात राहिली असती. हे निदान लसीकरणाने वेग पकडेपर्यंत चालू ठेवता आलं असतं. अगदीच् काही नाही तर निदान १०० कोटींचं टार्गेट लवकर पूर्ण झालं असतं.

या नविन लाटेच्या कारणाबाबत कुठे मिमांसा झाली आहे काय? मार्च आधी तीनेक महिने एकंदरीतच करोना गेल्याप्रमाणे मोकळीक दिसत होती देशभरात. तेव्हा नविन केसेसचा रेट का घसरत होता आणि आता का वाढत आहे यावर जर कोणी सविस्तर विश्लेषण केलं असेल तर वाचायला आवडेल.

कुणी मीमांसा केली असेल तर वाचायला मलाही आवडेल. दरम्यान, माझ्या आसपास अनेक लोकांना किंवा त्यांच्या आप्त-स्वकीयांना करोना झाला आहे, त्यामुळे मी प्रत्येकाला विचारत राहिलो की संसर्ग कसा झाला असावा. मला जे दिसलं ते काहीसं असं - मध्यमवर्ग सप्टेंबरच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात बाधित झाला होता. त्यानंतर तो अतिशय सांभाळून वागत होता. दिवाळीतही आणि नंतरही. हळूहळू जसजसं दिसत गेलं की पुण्यात रोज नवे रुग्ण सापडण्याचा आकडा २००-३००वर स्थिर आहे, तसतसा हा मध्यमवर्ग बिनधास्त झाला (मुंबईत लोकल वगैरेही चालू झाल्या त्याच सुमाराला). त्यातच लस उपलब्ध झाली, त्यातून आणखी निर्धास्तपणा आला - एक डोस घेऊन बाधित झालेले ज्येष्ठ नागरिकही माझ्या आसपास दखलपात्र संख्येत आहेत. थोडक्यात, संसर्ग ज्यांना ज्यांना झाला त्या प्रत्येकाचं वर्तन पाहता बाधित होण्याजोगंच ते होतं असं दिसतं. प्रत्येकानं काही ना काही रिस्क घेतलेली होती आणि त्यातच संसर्ग झाला, या पलीकडे वेगळं काही कारण मला तरी आढळलं नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जागतिक महामारी असलेल्या corona ल जरा गंभीर पने घ्या.
कोणी
1) सायन्स ची माहिती प्रसारित करणाऱ्या सर्व electric आणि प्रिंट मीडिया नी.
अर्धवट माहिती ,सामान्य लोकांच्या आकलन बाहेर असलेली आणि फक्त संशोधक लोक च पूर्णतः समजू शकतील असली माहिती सामान्य लोकांना देवू नका.
त्या मुळे,चुकीचे समज, अतिशोक्ति युक्त गैर समज निर्माण होतात आणि गोंधळ उडतो.
सरकारी निर्णय काय असतील ह्याची माहिती कमीत कमी तीन दिवस अगोदर तरी द्यावी.
नाहीतर अचानक निर्णय मुळे लोक अडचणीत येतात.
महापौर,जिल्हाधिकारी,कोणत्या तरी पक्षाचा नेता ,चिल्लर नेते ह्यांनी अक्कल pajalu नये.
ह्या महामारी वर काय निर्णय घेणार आहे त्याची माहीत फक्त आणि फक्त देशामार्फत पंतप्रधान आणि राज्य मार्फत मुख्यमंत्री ह्या लोकांनीच द्यावी.
बाकी लोकांनी फालतू आणि चुकीची माहिती देवू नये.
लोक समजदार आहेत फक्त त्यांना योग्य माहिती मिळणे गरजेचे आहे.
हजार लोकांना ची हजार परस्पर मत त्यांना नको आहेत.

या लेखावर तज्ञांनी मत द्यावे. हे खरं असेल, तर दिवस कठीण आहेत.

https://www.pudhari.news/editorial/editorial/corona-new-double-mutant-va...

दैनिक पुढारी नी जी माहिती दिली आहे त्याची भाषा.
असेल
असू शकतं.
अशा प्रकारची आहे ठाम मत नाही
अशी अर्धवट माहिती देवून भीती पसरवणाऱ्या प्रसार माध्यमांना सरकार नी कठोर कारवाई करून धडा शिकवावं.
लोकशाही आहे ह्याचा अर्थ काही ही बकवास सहन केली जाईल असा अर्थ नाही

या मुद्यावर महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारात बेबनाव उघड झाला आहे.

असं का वाटलं ?

सध्या मी महाराष्ट्रात रहात नाही.
आमचा कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरचा एक जिल्हा आहे.
माझी इथे प्रायवेट प्रॅक्टिस आणि नवऱ्याची सरकारी नोकरी आहे.
आमचा अनुभव असा की-
कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळी लॅाक डाऊन स्ट्रीक्ट होते
कॅांटॅक्ट ट्रेसिंग, आयसोलेशन व्यवस्थित होत होते
प्रशासकीय लेवलवर दररोज कोविडचा आढावा घेणे, वेगवेगळी आकडेवारी गोळा करणे चालू होते
तालुका लेवललाही सरकारी कोविड केअर सेंटर्स होती.

ॲाक्टोबर नोवेंबरपासून तालुका लेवलची कोविड केअर सेंटर्स पूर्णच बंद पडली.
पेशंटसअभावी सगळी प्रायवेट कोविड सेंटर्स बंद पडली.
सरकारी रूग्णालयातले काही वॅार्डस आणि आय सी यू बंद पडले.

आता लोकांच्यात इतकी बेपर्वाई आहे की मास्कस तर सहसा कुणी वापरत नाही.
सगळ्यांनीच थोड्या बहुत पर्यटनाला सुरूवात केलीय. आम्हीही महाराष्ट्रात येऊन गेलो.
इथे महाराष्ट्रासारखे समारंभांना ५०/१०० माणसांचे बंधनही नाही. सर्रास ५००-१००० लोकांचे समारंभ होतात. नावाला मास्क असतो, पण मेकप कसा दिसणार, जेवणार कसं , फोटो कसा काढणार करत तो गळ्यातच असतो.
जे ज्येष्ठ नागरिक वर्षभर कसेबसे घरात तग धरून होते त्यांना वॅक्सिनचा पहिला डोस मिळताच अमरत्वाचा पट्टा मिळाल्यासारखे वाटले व ते ही पर्यटन, समारंभ करत फिरू लागले. यामुळे किंवा वॅक्सिन घ्यायला एकत्र जमले/हॅास्पिटलला आले त्याच्यामुळे, किंवा इतर काही कारणांनी वॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर आणि दुसऱ्या डोसपूर्वी पॅाजिटीव येणाऱ्यांचे प्रमाण वाढलेय.

आमच्या जिल्ह्याततरी एकाच ठिकाणी आर टी पि सी आर टेस्ट होते.
इतक्या दिवसांत अजून एखादे सेंटर उघडावे, ठराविक चार पाच लोकांखेरिज इतर टेक्निशीयन्सना टेस्ट करण्याचे ट्रेनिंग द्यावे हे झाले नाही. तेयामुळ टेस्टरेसपैकीच कोण पॅाजिटीव आलेयास लॅब १-२ दिवस फ्युमिगेशनसाठी बंद होते आणि मग टेस्टींगच बंद पडतं.

बऱ्याच आर एम पींना करोनाची भयानकता अजून कळलेली नाही.
९०ते ९५ टक्के करोना अजूनही विशेष काही ट्रीटमेंट न करता बरे होत असल्याने आपण देतो तेच उपचार खरे होते, योग्य होते असं काढे देणाऱ्या वैद्यापासून पेनिसिलीन उगाचंच टोचणाऱ्या कंपाउंडर कम डॅाक्टर सगळ्यांना वाटतंय.
त्यामुळे खरोखर जे बॅड होऊ शकतात ते रूग्ण ओळखले जात नाहीत, उशीरा ओळखले जातात आणि योग्य ट्रीटमेंट सुरू होईपर्यॅत जीव जायची वेळ आलेली असते.

त्याला कारण प्रसार मध्यम आहेत रोज उलट्या सुल्ट्या बातम्या
पक्की ठाम माहिती covid विषयी कोण कडेच नाही
त्या मुळे लोकांचा विश्वास उडाला आहे
सरकारी निर्देश,न्यूज चॅनेल वरील बातम्या,ह्यांना कोणी गंभीर पने घेत नाही

१. नवीन कोविड लाट ही सर्व वयोगटातील रुग्णांना बाधित करत आहे. बरेच रूग्ण गंभीर कोविड लक्षणांसह पूर्ण विकसित झालेला फुप्फुस संसर्ग ( एआरडीएस = १०० पेक्षा पी/एफ रेश्यो ) दर्शवित आहेत. पण २ - ३ वेळा आरटी-पीसीआर चाचणी घेतल्यानंतरही त्यांच्यात कोविड विषाणू आढळत नाही. अगदी सुमारे २५ – ३० वर्षांच्या आसपास असलेले तरुण रूग्णही गंभीर लक्षणे दर्शवित आहेत. याचा परिणाम रेमेडिसिव्हिर किंवा फविपिरावीर सारख्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलवर होत आहे. दुसरे म्हणजे, ही वाढती चिंता आहे की भारतातली ही नवीन लाट ही कोविड विषाणूच्या नवीन उत्परिवर्तनामुळे (Mutation) आलेली असू शकते. या नव्या नमुन्यांची चाचणी भुवनेश्वर आणि पुण्यातील व्हायरोलॉजी लॅबमध्ये सध्या केली जात आहे.
२. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा इतिहास असलेल्या रूग्णांमध्ये लसीकरण चांगला टायटर प्रतिसाद दर्शवित नाही. (कारण अशा रुग्णांची कमकुवत झालेली रोगप्रतिकार प्रणाली.) उदाहरणार्थ, काही डायबेटिक आणि हायप्रटेंसिव्ह असलेल्या डॉक्टरांनीच लसीकरणाचा योग्य टायटर प्रतिसाद न आल्याने स्वत:ला आता ४ - ४ वेळा लसीकरण करून घेतले आहे. म्हणून, कोविड लसीचे कार्य योग्यरित्या होण्यासाठी व्हिटॅमिन डी, ई, बी आणि झिंक, कॉपर सारख्या रोगप्रतिकारक घटकांचा पूरक आहार सर्वांनाच आवश्यक आहे.
३. काही राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या कमी वाटत असली तरीही संपूर्ण भारतभर रूग्णांमध्ये अचानक वाढ होते आहे. या लाटेचा वाढण्याचा दर सर्वत्र सारखाच आहे. कोविड बाधित रुग्णांचे तसेच तीव्रतेचे प्रमाण वाढत आहे.

४. जरी कदाचित कोविडजन्य मृत्यूचे प्रमाण सध्या कमी दिसत असले तरी सर्व रुग्णालये पुन्हा भरतील तेव्हा ते जास्त होईल अशी शक्यता आहे. सावधगिरी न बाळगणाऱ्या लोकांना याची निश्चित कल्पना दिली पाहिजे आणि तरीही बेपर्वा वागणाऱ्या लोकांवर दबाव आणला पाहिजे. अन्यथा ही पहिल्यापेक्षा भयानक लाट असेल.

तात्पर्य, सावधगिरी बाळगा. गर्दीत जाऊ नका. मास्क घाला (शक्यतो, N95). 'कोरोना नाहीच आहे' वगैरे बोलणाऱ्या माणसांना सौम्य शब्दात जाणीव करून द्या, तरीही ऐकत नसले तर तुम्ही दूर रहा, फक्त गरज असेल तरच प्रवास करा, सणसमारंभ साजरे करताना तारतम्य बाळगा - अजून उत्सव साजरे करायची वेळ आलेली नाही.
स्वतःची, कुटुंबाची आणि समाजाची काळजी घ्या. जर लॉकडाऊन नको आहे पण संसर्गही कमी करायचा आहे तर मग संयम बाळगला पाहिजे.
It is not possible to have the cake and eat it too.

मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा इतिहास असलेल्या रूग्णांमध्ये लसीकरण चांगला टायटर प्रतिसाद दर्शवित नाही. (कारण अशा रुग्णांची कमकुवत झालेली रोगप्रतिकार प्रणाली.) उदाहरणार्थ, काही डायबेटिक आणि हायप्रटेंसिव्ह असलेल्या डॉक्टरांनीच लसीकरणाचा योग्य टायटर प्रतिसाद न आल्याने स्वत:ला आता ४ - ४ वेळा लसीकरण करून घेतले आहे. म्हणून, कोविड लसीचे कार्य योग्यरित्या होण्यासाठी व्हिटॅमिन डी, ई, बी आणि झिंक, कॉपर सारख्या रोगप्रतिकारक घटकांचा पूरक आहार सर्वांनाच आवश्यक आहे.

याच्या चाचण्या करणारे सक्षम लोक जगात असावेत असा अंदाज. ज्यांना असे प्रतिसाद मिळत आहेत त्यांनीही ही विदा ससंदर्भ सार्वजनिक करणे आवश्यक. ते नसताना अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याची गरज नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सध्या आजूबाजूला मी जी माणसे पाहतोय ती आरोग्याच्या बाबतीत फारच जागरूक झाली आहेत. मात्र काम धंद्यासाठी बाहेर तर पडावेच लागणार. घरी बसून कसे चालेल? दुसरी लाट, तिसरी लाट हे येतच राहणार. एखादे वर्ष लॉकडाऊन वगैरे उत्सव साजरे करून जनता ताब्यात राहू शकते. केवळ लॉकडाऊन, संचारबंदी वा कडक निर्बंध वगैरे पोरखेळ चालू ठेवून कोरोना अटोक्यात येणार नाही. लसीकरणाच्या मोहिमेत सर्वच वयोगटातील लोकांना सामील करावे.

वयोवृद्ध आणि लहान मुले घरी राहून चालू शकतील. शाळा कॉलेजेस बंदच असल्याने काही प्रमाणात गर्दी कमी होईल.पण त्यावर संबंधित व्यवसाय, रोजगाराच्या बाबतीत काय खबरदारी घेतली जातीय? लॉकडाऊन मुळे कैक व्यवसाय ठप्प झाले. बेरोजगारी वाढली. हे कुठपर्यंत चालणार.

आजची आर्थिक परिस्थिती अशी आहे की सर्वसामान्य माणसांनी जर केवळ मूलभूत गरजांसाठी खर्च केला आणि किमान चैनीच्या खर्चांवर निर्बंध घातले तरी तरी बाजारपेठेत कैक क्षेत्रांत मंदीसदृश्य परिस्थिती तयार होते. सध्याच्या घडीला ज्याची खर्च करण्याची क्षमता अधिक त्याच्यावर कोरोनाच्या बाबतीत खाजगी इस्पितळात उपचार केले जातात. सरकारी आरोग्यव्यवस्था आहे तशीच आहे. गेल्या वर्षभरापासून काही हॉस्पिटल्सने मजबूत कमावले. तर काही लोकांनी कोरोनाच्या नावाखाली बाजार मांडला. हे सर्व लोकांनी बघितले आणि बहुतांश लोकामध्ये सुरुवातीला जी भिती होती ती भीती सध्यातरी अजिबात दिसत नाही. आता लोकांनी कोणालाही सिरियसली घ्यायचं नाही असं ठरवलंय दिसतंय.

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

दुसरी आहे की पाचवी आहे हे माहीत नाही
जागतिक संशोधक मंडळी ना विचारले तर मतभेद होवून एक पासून दहा पर्यंत कोणती ही लाट निघू शकते..
आता जी लाट चालू आहे ह्या मध्ये कोणतीच लक्षण,कोणताच त्रास नसणारी पण बाधित आहेत असे टेस्ट रिपोर्ट असणारी लोक जास्त आहेत.
जे भयावक आकडे रोज येत आहेत तेवढी गंभीर स्थिती नाही ..
बहुसंख्य लोकांचा positive report आहे पण ते अगदी तंदुरुस्त आहेत ..
साधी crocin ची पण त्यांना गरज नाही
पण सरकारी नियमा मुळे उगाचच त्यांना त्रास होत आहे.
गंभीर आजारी काही शे मध्येच आहेत.
अगदी किरकोळ संख्या आहे त्यांची.
बाकी लोकांना विलागिकरण करण्याची पण काही गरज नाही ...
टेस्ट न केलेले असंख्य तंदुरुस्त लोक समाजात आहेत ..सर्वांची टेस्ट केली तर भारतातील १३० कोटी लोकसंख्येत काही कोटी लोक corona बाधित निघतील.....
जिथे जास्त टेस्ट तिथे जास्त रुग्ण .
जिथे गैर कारभार,बिलकुल टेस्ट नाहीत तो corona मुक्त प्रदेश .ही सत्य परिस्थिती आहे

अहो काहीही काय बरळताय? 'भयावह आकडे' असले तरीही वाईट परिस्थिती नाही? मग दिवसाला जवळपास ७०० मृत्यू व्हायला लागले आहेत ती काय चांगली गोष्ट आहे का? आणि हा आकडा गेल्या काही आठवड्यांत भस्सकन सातपट वाढला आहे.

तुमच्या मते वाईट परिस्थिती म्हणजे काय ते एकदा समजावून का सांगत नाही तुम्ही?

आज पर्यंत भारतात कॉविड मुळे मृत्यू आलेल्या लोकांची संख्या. 166862 आहे .
एक वर्ष होवून जास्त दिवस झाले .आपण एक वर्ष च पकडले तर दिवसाला सरासरी देशात 457. लोक corona मुळे मेलेली आहेत.
देशात 718 जिल्हे आहेत रोज एक व्यक्ती पण एका जिल्ह्यात मृत्यू पावलेली नाही.
आज पर्यंत देशात बाधित लोकांची संख्या 12928574 आहे .
देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे फक्त 1 टक्के लोक बाधित आहेत.
100 मध्ये एकच व्यक्ती बाधित झाली आहे
मृत्यू दर 1.5 पेक्षा पण कमी आहे.

मग दिवसाला जवळपास ७०० मृत्यू व्हायला लागले आहेत ती काय चांगली गोष्ट आहे का?

तुम्ही म्हणताय हे?

७०० मृत्यू हा (ॲब्सोल्यूट) आकडा महत्त्वाचा नाही. हा आकडा पर कॅपिटा किती आहे, ते पाहायला हवे, नाही काय?

शिवाय, एखाद्या ठिकाणी दहा वर्षांतून कोव्हिडमुळे एखादाही मृत्यू झाला नसेल, आणि मग त्यानंतर अचानक एक झाला, तर ते अधिक भयंकर आहे. इथे रोज ७००. ते (तुलनेने) तितकेसे भयंकर नाही, नाही काय?

- (गुर्जींचा (बथ्थड, परंतु) शब्द प्रमाण मानणारा शिष्य) 'न'वी बाजू.

==========

(या धाग्यावर वरील प्रकार अस्थानी आहे, हे मान्य. परंतु राहवले नाही. क्षमस्व.)

पर कॅपिटा हिशोब करून भारताची परिस्थिती युरप-अमेरिकेपेक्षा सुमारे १५पट चांगली आहे असं म्हटलेलं आहेच मी अनेक वेळा.

माझा मुद्दा एक्स्पोनेन्शियल ग्रोथबद्दल होता. गेल्या चारपाच आठवड्यात सातपट. एक्स्पोनेन्शियल ग्रोथ बराच काळ चालू राहिली की ते पर क्यापिटा आकडेदेखील महाभयानक होतात. अजून पाचेकवेळा सातपट झाली तर निम्मी पॉप्युलेशन जाईल.

सरकारी आकडे प्रमाण मानून आपलं इतरांपेक्षा टक्केवारीत बरंय असा चान चान आनंद व्यक्त होण्याची वाट पाहात होतो. निराशा झाली नाही.
एक्सपोनेन्शियल वाढही फार काही होणार नाही याची काळजी सरकारी आकडे घेतील याची मला खात्री आहे.
गंगेकिनारी वाळूत आपल्या बापाला किंवा आईला पुरायला गेलेल्या लोकांना सांगायला पाहिजे की आपलं बरंय बुवा.

दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काही ही आपत्ती आली तर त्या आपत्ती मध्ये भयंकर मनुष्य हानी तर होतच आहे पण परिस्थिती नियंत्रणात ठेवणे पण अवघड जात आहे. हताश पने जे घडतं आहे त्याच्या कडे बघत राहणे हेच हातात आहे.
पुणे,मुंबई सारख्या घनदाट लोकसंख्येच्या शहरात covid नियंत्रणात आणणे सहज शक्य नाही.
सोशल distance राखले जात नाही.
बाधित लोकांची संख्या थोडी जरी वाढली तरी आरोग्य व्यवस्था फैल होत आहे.
एवढ्या मोठ्या लोकसंख्येला आरोग्य सेवा आपत्ती काळात देणे अशक्य आहे.
कधी भूकंप झाला,अती वृष्टी झाली तर अतोनात नुकसान होईल आणि आपत्ती निवारण करणे केवळ अशक्य असेल.
शहरांच्या लोकसंख्या ह्या नियंत्रणात असणे मला तरी खूप गरजेचे वाटत आहे.
काही आपत्ती आली तर ही घनदाट लोकसंख्येची शहर बरबाद होतील.
ह्या वर विचार करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे.
शहर vertically किती वाढवावित हे ठरवणे गरजेचे आहे.

>>कधी भूकंप झाला,अती वृष्टी झाली तर अतोनात नुकसान होईल आणि आपत्ती निवारण करणे केवळ अशक्य असेल

तुमचा जन्म गेल्या आठवड्याभरातला आहे का हो? व्हेसुवियस पासून कच्छ पर्यंत, पूरांपासून- त्सुनामींपर्यंत अन महामारींपासून महायुद्धापर्यंत, शहरांतील लोकसंख्येच्या घनतेमुळे होणारी हानी यात नविन काहीच नाही. तुम्ही असं आर्किमीडीजसारखं युरेका युरेका करू नका ब्वॉ!

-Nile

जुलै २००५मध्ये मुंबईत अतिवृष्टी झाली होतीच ....

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे किती राजेश लोकांबद्दल बोलताय? त्यात माझा समावेश आहे का?

पूर्वी विरळ लोकसंख्येची गावं होती, तरी प्लेगच्या साथीत माणसं टपाटपा मरायची. आख्खी गावं उध्वस्त व्हायची. सध्याही जगभर शहरांत राहाणारांचं आयुर्मान ग्रामीण भागांतल्यांपेक्षा जास्त आहे.

शहरच नसावीत असे माझे मत नाही पण नियोजित शहर असावीत .प्रतेक वर्ग किलोमीटर मध्ये किती लोकसंख्या योग्य आहे त्या नुसार नियोजन हवे.
वर्ग किलोमीटर ३० ते चाळीस हजार लोकसंख्या मुंबई मध्ये आहे आणि हे भयानक आहे.
त्या मुळे नागरी सुविधा देणे,पाण्याचा निचरा,खेळाची मैदाने,मोकळ्या जागा ,रहदारी,पार्किंग,असे अनेक प्रश्न उभे तर राहतात पण ते विक्राळ रूप धारण करतात .
आपत्ती आली तर एवढ्या घनदाट लोकसंख्येला प्रत्यक्ष निर्माता (जगाचा ,आता ती कल्पना आहे की सत्य ह्या वर पोस्ट नको,मतितार्थ घ्यावा )पण मदत
करू शकणार नाही.
आणि हो प्लेग हा पिसवा पासून पसरत होता पिसवा हा कीटक आकाराने अतिशय लहान आणि चपळ असतो त्याच्या चाव्या पासून वाचणे केवळ अशक्य आहे.
COVID माणूस पसरवत आहे आणि माणसा पासून लांब राहणे सहज शक्य आहे.

पण गावांमध्ये लाइफ एक्स्पेक्टन्सी ६७ वर्षं आहे, आणि शहरांमध्ये ७२ वर्षं आहे. हे कसं?

शहरातील वायू प्रदूषण,आणि बाकी अनेक गोष्टी मुळे मोठ्या शहरातील लोकांचे सरासरी आयुष्य कमी होत आहे.
तुम्ही म्हणता वाढत आहे ?
चुकीचे आहे तुमचे मत.

आकडेवारी तपासून पाहा सर. फक्त india rural life expectancy गूगल करूव पाहा.

भारतातील पहिल्या लाटेतील सर्वात जास्त नवीन बाधितांची संख्या १८ सप्टेंबर २०२० रोजी होती. ९७००० च्या घरात.

आता काल रोजी भारतातील नवीन बाधित संख्या ( एका दिवसातील ) आहे २९४२९० !!! पहिल्या लाटेतील सर्वोच्च आकड्याच्या साडेतीनपट !!

महाराष्ट्र सरकारने मर्यादित लॉक डाऊन लावला ९ एप्रिलला , त्या दिवशी महाराष्ट्रातील नवीन बाधितांची ( एका दिवसातील ) संख्या होती ६०००० च्या आसपास. त्या दिवसानंतर महाराष्ट्र्रातील हि संख्या त्या मानाने स्थिर म्हणजे ५५ ते ७० हजार मधेच आहे.
उर्वरित भारतात लॉक डाऊन नाही ( दिल्लीने काल सुरु केला )
९ एप्रिल ला भारतातील नवीन बाधित संख्या ८० हजार च्या आसपास होती आणि गेल्या ११ दिवसात ती वाढून दोन लाख ९५ हजाराच्या घरात गेली आहे .
काय म्हणावे याला ?

दिवसाला ३ लाख म्हणजे आपली परिस्थिती अमेरिकेइतकी वाईट झाली तर! तिथे सध्या एक चतुर्थांश लोकांमध्ये ७५००० रोगी दिवसाला सापडताहेत सध्या.

असो, परिस्थिती बिकट आहे खरी.

पुणे-मुंबईत (एकंदरीत महाराष्ट्रातच) वाढीचा दर (दररोज नवीन रोगी सापडणारांची संख्या) स्थिरावलेला आहे. वाढीचा दर वाढता नक्की कुठेकुठे आहे भारतात सध्या?

दुर्दैवाने सर्व माहिती देणाऱ्या साईट्स वर इतर भरपूर माहिती असते परंतु रोज किती नवीन बाधित हि माहिती कमी ठिकाणी मिळते ( ती रोज बघून अंदाज घ्यावा लागतो किंवा टिपून ठेवावे लागते ) ही एक वेबलिंक घ्या ज्यात प्रत्येकी राज्यात काल नवीन बाधित किती झाले हा आकडा दिसतो . https://www.ndtv.com/coronavirus/fullcoverage

आता मीच तुम्हाला विनन्ति करतो की अशा वेबलिंक्स शोधून द्या ( तुम्ही ग्राफविदातज्ज्ञ या नात्याने )

संपूर्ण भारतात रोज किती नवीन बाधित झाले याचा ग्राफ worldometer corona india मध्ये मिळतो

धन्यवाद. मी वर्ल्डोमीटरची साइट पाहात असतो. पुणेमु-मुंबईचे आकडे बातम्यांमधून पाहातो. एनडीटीव्हीच्या साइटवर भरपूर माहिती आहे. त्यातून ढोबळमानाने दिसतंय की महाराष्ट्रात सध्या दररोजच्या केसेस एकूण केसेसच्या १.५% आहेत. इतर अनेक राज्यांत हे २ ते ३% आहे.

दुसऱ्या लाटेसाठीचे स्वतंत्र आकडे तेसुद्धा राज्यांच्या लोकसंख्येने नॉर्मलाइज करून मिळालेले आवडले असते. दुर्दैवाने ते करण्याचं प्रोग्रामिंग ज्ञान नाही. हाताने करणं त्रासदायक आहे.

अण्णा, इथे राज्यागणिक/जिल्ह्यागणिक दैनिक आकडेवारी आणि आलेख पाहता येतील -

https://www.covid19india.org/state/MH

जमलं नील भौ !!! आभार ...
गुर्जी , ही निल ने दिलेली लिंक बघा मिळतंय सर्व यात

उजव्या बाजूला असे ग्राफ दिसतात. राजकीय नकाशा निवडला तर ज्या जिल्ह्यावर माउस न्याल त्या जिल्ह्याचे ग्राफ दिसतील. नकाशाबाहेर माऊस नेल्यास राज्याचे ग्राफ दिसतील.

graphs

वरवर बघितलं. या लोकांना विदा कशी दाखवायची ते समजलेलं आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विदा कशी दाखवायची, हे समजणाऱ्या व्यक्तिला विदारक म्हणावं का ?

हाती आलेला विदा आपल्याला हवी तशी मोडतोड/पुनर्मांडणी करून वापरण्याची क्षमता असलेल्यांना विदाहरक म्हणावं का?

९ एप्रिलला महाराष्ट्रात सध्याचा partial लॉकडाऊन लागला.
त्या तारखेनंतर महाराष्ट्रात रोजच्या नवीन बधितांची संख्या 60000 +/-10000 या घरात स्थिर आहे.

उर्वरित भारतात लॉकडाऊन नाही.
(दिल्लीचा अपवाद वगळता, तिथे दोन दिवसांच्या पूर्वी लावला)
लॉक डाऊन सोडा, निवडणुका , कुंभमेळा असे लाख लाख लोकं एकत्र येणारे इव्हेंट्स सुरू आहेत.

९एप्रिल ला संपूर्ण भारताची रोजच्या नवीन बाधितांचा आकडा होता ऐशी हजारच्या घरात , काल म्हणजे बारा दिवसांमध्ये हा आकडा तीन लाख क्रॉस करून गेला आहे.

आकडे पुरेसे बोलके आहेत. जास्त काही सांगण्याची जरुरी नाही.

लॉकडाऊन हे अंतिम उत्तर कधीच नसते हे मान्य आहे.
लॉकडाऊनमध्ये आता हेल्थ इन्फ्रा वाढवायला किती स्कोप आहे उदाबद्दल साशंक आहे
परंतु कधी कधी आलेली भयानक मोठी लाट तात्पुरती थांबविण्यासाठी हे करावे लागत असा

आणि हो, प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टीने बघून उपयोग नसतो.

>>लॉकडाऊनमध्ये आता हेल्थ इन्फ्रा वाढवायला किती स्कोप आहे उदाबद्दल साशंक आहे

सध्या काही डॉक्टर मित्रांच्या बोलण्यात असं येत आहे की बेड्सपेक्षाही ऑक्सिजनची जास्त मारामारी आहे. नुसता बेड एखाद्या वेळी मिळून जाईल पण पेशंट 'बॅड' झाला (हा डॉ. मित्रांचा पारिभाषिक शब्द आहे) तर द्यायला ऑक्सिजन अजिबातच उपलब्ध नाही. शिवाय प्रकृती स्थिर असलेले रुग्णही कधी 'बॅड' होतील सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. ऑक्सिजनसाठी गाड्या अडवल्या जात आहेत. उदा. माझ्या माहितीतले कोव्हिड हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे पुण्याजवळच्या एका औद्योगिक वसाहतीतून ऑक्सिजनचे सिलिंडर येतात. त्यांच्यासाठी निघालेले सिलिंडर स्थानिक लोकांनी दमदाटी करून तिथल्या कोव्हिड हॉस्पिटलकडे वळवायला लावले. आज सकाळीच टीव्हीवर बातमी पाहिली की अहमदनगर जिल्ह्यासाठी निघालेला ऑक्सिजनचा टँकर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अडवला. मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावर टँकर नगरकडे रवाना झाला.

दुसऱ्या लाटेत तरुण जास्त बाधित होत आहेत असा प्रवाद आहे. म्हणून मी जुलै २०२० आणि एप्रिल २०२१ चा विदा पाहिला. तर त्यात सिग्निफिकंट फरक वाटत नाही. म्हणायला जुलै २० च्या तुलनेत एप्रिल २१ मध्ये ३१-ते ४० गटात १.५% जास्त आणि ५१-६० गटात १.२५% कमी रुग्ण आहेत .

चित्र न दिसल्यास इथे पाहता येईल. https://drive.google.com/file/d/1D8MFRu3-YrLIYf6k0M0Yc3DUW8WcV_PU/view?u...

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या ओळखीतील 8 जणांना करोना झालाय. चुलतआजी गेली, जवळच्या नात्यातील कुटुंब सध्या झगडतंय. पैसे असून लस, उपचार मिळेल याची शाश्वती नाही.
नेतृत्त्वाचे अपयश म्हणजे काय हे भारतातील सध्याची परिस्थिती पाहिल्यावर कळते. अर्धशिक्षित जनतेने निवडून दिलेला तितकाच अर्धशिक्षित, आत्ममग्न, अहंकारी नेता सर्वोच्च पदावर असला की काय हाहाकार उडतो हे रोजच्या बातम्या वाचून कळतंय. गेल्या वर्षभरात गांभीर्याने काही हालचाल केली असती तर दुसरी, तिसरी लाट येईल तेव्हा तिचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज राहिलो असतो. पण त्याऐवजी सरकारने काय केले
1. भारताला यापासून काहीही धोका नाही याबाबत बाता मारणे. गोमूत्र, पतंजलीचे प्रॉडक्ट एंडॉर्स करणे. निवडणुकींच्या मोठमोठ्या सभा घेणे.
2. लसीकरणाबाबत अत्यंत अपुरी तयारी.
3. कुंभमेळ्याला परवानगी
4. भारताने (इतरांच्या तुलनेत किती) सॉलिड हाताळणी केली आहे याचे वारंवार क्रेडिट घेणे.
5. सध्याच्या परिस्थितीला नेहरु कसे जबाबदार आहेत हे सांगणे

अतिशय हताश परिस्थिती..

नेतृत्वाचे तर सोडूनच द्या. आणि, ज्या (वयो)गटांना लस तूर्तास उपलब्ध नाही, त्यांनी (नाइलाजाने) लस न घेणे हे एक वेळ समजू शकतो, परंतु, ज्यांना उपलब्ध आहे, असेसुद्धा 'आम्हाला कशाला पाहिजे लस? आम्ही कोठे कोणाकडे जातोय?' या ॲटिट्यूडपायी लस घ्यायला नाकारतात, नि मग स्वत:ही आजारी पडतात नि आख्ख्या कुटुंबाला आजारी पाडतात. आख्खे कुटुंब क्वारंटाइनमध्ये, हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध नाहीत, असल्या गोष्टी ऐकल्या, की तिडीक येते. (हॉस्पिटलमध्ये बेड्स for love or money उपलब्ध नसणे हे सद्यपरिस्थितीत समजू शकतो, आणि लागणीची प्रत्येक शक्यता कितीही खबरदारी घेतली तरी शंभर टक्के टाळणे अशक्य आहे, हेही खरेच. परंतु, गेला बाजार आपल्या परीने शक्य तेवढी खबरदारी घ्यायला काय होते, ***च्यो!)

परंतु, चालायचेच.

मध्यंतरी एक आजोबा हट्टाने रोज फिरायला जात. त्यांना काही झाले नाही पण कॅरियर बनून, आज्जींना विषाणु पास केला. आज्जी हॉस्पिटल सोई अभावी डोळ्यादेखत, अक्षरक्ष: डोळ्यादेखत गेल्या. Sad
खात्रीशीर सोर्सकडून ऐकलेली जवळच्या मंडळीतील कथा आहे.

ो
असो... हे असे काही वाचले की जास्त त्रास होतो.

ओव्हरऑल आशयाशी सहमत
पण पॉइंट नं 3 मध्ये दिल्ली मधले शेतकरी आंदोलन का पकडू नये? कुंभ मेळा जसं कारण तर हे का नाही.

महामारी चालू असताना विवाद निर्माण होतील असे कायदे कसलाच अभ्यास न करता पारित करणे हे पूर्णतः चुकीचं होते हे पण कबूल केलेच पाहिजे.
लोक विरोध करणारच ,त्यांना रस्त्यावर येण्यास सरकार नीच भाग पाडले.

दोन दिवसांपूर्वी एक मित्र कोव्हिडनं गेला. ८-१० दिवस हॉस्पिटलात होता. माझ्यापेक्षा एखाद वर्षानं लहान असेल. म्हणजे फार तर ३९.

गेल्या वर्षी घरून काम करणं वगैरे सुरू झालं तेव्हा तो नियमितपणे फेसबुकवर अतिशय फालतू विनोद शेअर करायचा. मी नियमितपणे भावाला म्हणायचे, "हा आता माझा बेस्ट फ्रेंड आहे. अजिबात स्वतःला सिरीयसली घेत नाहीये तो!"

आमची गेल्या सहा वर्षांत भेट झालेली नव्हती. संपर्क म्हणावा तर हा असा फेसबुकवरचा. आम्ही एकेकाळी एकत्र खगोल मंडळात जायचो. तोही खगोलशास्त्रातला. पुढे तो भौतिकशास्त्र शिकवायला लागला. आता काय म्हणू आणि दुःख कसं व्यक्त करू हेही समजेनासं झालं आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दैनिक भास्कर प्रो भाजप आहे असे वाटते... भयानक प्रकार आहे.
ो

सरकारी कोविड टास्क फोर्स- फेब्रुवारी मार्च मध्ये त्यांची चर्चा नाही... आणि यांची एकमेव जबाबदारी कोविड नियंत्रण. मोदी है तो मुमकीन है.

https://caravanmagazine.in/health/india-covid-19-taskforce-did-not-meet-...

या दुसऱ्या लाटेबाबत सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यातील समन्वय पूर्णपणे नष्ट झाल्याची पावती या निमित्ताने मिळाली. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात जी श्रेय लाटण्याची चढाओढ गल्ली राजकारणापासून चालू झाली (आठवा: 'संकल्पना' लिहिलेले लाखो गल्लीबोळातले फलक) त्याची सर्वोच्च परिमाणे आता दिसताहेत. त्यातही अपयश असेल किंवा एखादे अपयश येईल असे काम असेल तर हात झटकण्याचीही प्रवृत्ती दिसून आली.

गेल्या वर्षी मोदींनी आपल्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होउन अचानक देशव्यापी लॉकडाउनची घोषणा नेहमीच्या शॉक ट्रिटमेंट पद्धतीने केली. त्यावर मास्टरस्ट्रोक, लॉकडाउन पंधरा दिवसच का (आठवा: सोनू निगम), थाळी नाद वगैरे सगळे सोपस्कार झाले. सगळे निर्णय केंद्रीय स्तरावर घेतले गेले. काय चालू, काय बंद. कन्टेनमेंट झोन, पास सिस्टीम सगळे केंद्राने ठरवले. राज्यं फक्त अंमलबजावणी साठी. श्रेय अर्थात केंद्राला. पण नंतर मजूरांच्या प्रशांमुळे, अर्थव्यवस्था पार झोपल्यामुळे या निर्णयावर् चहुबाजुंनी टिका झाली. त्यानंतर लसीचे गोडवे गाऊन झाले. भारत सगळ्या जगासाठी लस निर्मिती करणार वगैरे झाले. त्यातही श्रेय आणि प्रसिद्धी हाच मुख्य भाग होता. (संस्थांना भेटी देणे)

पण यावेळी मोदींनी मागच्या वेळेच्या टीकेमुळे संसर्ग थांबवण्याच्या प्रक्रियेतून पूर्णपणे अंग बाजूला काढून घेतले. रूग्णांचे आकडे महाराष्ट्रात (मराठवाडा, विदर्भ) वाढत असताना त्यांनी राज्यांवर सगळी जबाबदारी टाकली. राज्यांना मागच्या वर्षी निर्णय घेण्याची वेळ आली नव्हती. त्यामुळे हा अनुभव नवीन. आता तर केंद्र लॉकडाऊन करू नका म्हणून सांगताहेत. सगळा सावळा गोंधळ यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. केंद्राची आम्ही बरोबर, जिथे आपली सत्ता नाही तिथे राजकारण, केंद्र-राज्य यांच्यात टोकाचा संघर्ष या सगळ्याची फळे भारताची जनता या आपत्तीत भोगत आहे.

- ओंकार.

माणसाने प्रगती केली असे सकृत दर्शनी तरी दिसत आहे.भौतिक सुखाच्या वस्तू आणि त्याच प्रकारचे संशोधन होत आहे .
एकच मर्यादित जागेत खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या एकवटली शहर निर्माण झाली.त्या मुळे इकॉनॉमी सुधारली असेल,भौतिक सुख वाढली असतील.
पण लोकसंख्येची प्रचंड घनता वाढली.
काही मोठी दुर्घटना घडली तर त्या स्थिती वर नियंत्रण ठेवता येईल एवढ्या takatichi दुर्घटना निवारण यंत्रणा आपल्याकडे नाही.
मुंबई झालेल्या अती वृष्टी मध्ये अशीच हतबलता दिसून आली होती.कधी चुकून मोठी दुर्घटना घडली.
भूकंप झाला,किंवा खूप मोठी अती वृष्टी झाली तर ह्या प्रचंड घनता असलेल्या शहरांना वाचवणे केवळ अशक्य आहे.
Covid मुळे आपण खरोखर प्रगत आहोत का ह्या वर च प्रश्न चिन्ह उभ केले आहे.
कटू आहे पण स्थिती तर तशीच आहे.
Covid नी पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली आहे तरी १३०, कोटी लोकसंख्या पैकी फक्त
१ कोटी ६६ लाख आसपास लोकांस corona संसर्ग झाला होता त्या मधील २२ लाख लोक च active आहेत.
एवढ्या मोठ्या देशात २२ लाख लोकांवर उपचार करण्यास सक्षम आरोग्य यंत्रणा नाही.

आरोग्य यंत्रणा २२, लाख ह्या आकड्यान कोलमडून पडली आहे.
कुठे ऑक्सिजन नाही तर कुठे औषध नाही तर कुठे बेड नाही.
उदिग्न करणारी अवस्था आहे.
काही मोठी दुर्घटना घडली आणि दोन तीन कोटी लोकांना तत्काळ वैदकिय मदतीची गरज लागली तर .
काय अवस्था होईल.
काय प्रगती केली माणसाने ,आणि खरोखर माणूस प्रगत झाला आहे का ?
हा प्रश्न नक्कीच कोणाला ही पडेल.
रोज तीन लाखाचा आकडा बाधित लोकांचा येत राहिला तर देशातील सर्व च यंत्रणा ना काम होतील.
कोलमडून पडतील .काय काय सावरत बसलं.
अन्न धान्य चे उत्पादन अजुन सुद्धा व्यवस्थित होत आहे म्हणून अन्न तरी मिळत आहे.
अन्न पिकवणारा वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणात बाधित झाला तर ?
उपासमार हे नवीन संकट उभे राहील.
मान्सून ठीक वेळेवर नाही आला तर.
पाणी टंचाई,आणि वीज टंचाई हे प्रश्न विक्राळ रूप घेतील.
बेरोजगारी ,आत्ताच खूप मोठी वाढली आहे.
ते संकट आहेच डोक्यावर.
अर्थव्यवस्था तरी किती दिवस तग धरेल.
अशी जर संकट एका मागून एक आली तर बघत बसण्या पलीकडे काहीच हातात राहणार नाही..

माणसाने प्रगती ची व्याख्या बदलण्याची गरज आहे आणि ती वेळ आता आली आहे.
तंत्र ज्ञान आणि विज्ञान. ह्याची प्रगती करताना आपण एकाच मार्ग स्वीकारला तो म्हणजे भौतिक सुख आणि त्याच मार्गाने घोड दौड चालू ठेवली.
Corona ni तो मार्ग चुकीचा होता विनाशाकडे नेणारा होता ह्याची जाणीव करून दिली.
माणसाने.
त्याच्या बुद्धीचा वापर करून माणसाला होणाऱ्या आणि पुढे होवू शकणाऱ्या आजारावर सर्व शक्ती खर्च करायला हवी होती.
रोग कारक जिवाणू,विषाणू ह्यांची सर्व जन्म कुंडली पाठ करून ठेवली पाहिजे होती.
पण तो मार्ग भौतिक सुख देणारा नाही म्हणून त्याला कमी महत्व दिले गेले.
आज फक्त एकच व्हायरस नी माणसाला हतबल केले .घरात बंदिस्त केले .
कारण आपल्याला कोणते संशोधन महत्वाचे आहे हेच समजले नाहीं

मोदींच्या नेतृत्त्वाची फळे आज भारत भोगतोय. जबरदस्त मुलाखत.

1. मोदींच्या मंडळात फक्त होयबांची वर्णी
2. दुसऱ्यांचे ऐकायची मनोवृत्ती नाही. स्वतःलाच सगळे कळते ह्यावर ठाम विश्वास
3. भेदभावाची मनोवृत्ती बदललेली नाही - मागील वर्षी कोविडबाबत तबलिगी जमातवर आरोप केले - मात्र कुंभमेळ्याला परवानगी. हे सगळं बंगालमधील निवडणुकांकडे लक्ष ठेवून.
4. अजूनही कोविडपेक्षा निवडणुकीवरच जास्त लक्ष - अगदी परवा - 3 लाख पेशंट सापडले तेव्हा अमित शाह बंगालमध्ये सभा घेत होते.
5. नाटकबाजीवर भर - थाळी, ताली वगैरेंना प्राधान्य. स्वतःला क्रेडिट कसे मिळेल याकडे कायम लक्ष. आणि जमत नाही तिथे मागील 60 वर्षांचे तुणतुणे लावायचे

भाजपचा आयटीसेल आणि त्याचे मॅसेज फॉरवर्ड करत बसणारे बिनडोक भक्तगण अजूनही सुधारत नाहीत. कायतर म्हणे, अमेरिकेने कोव्हीशिल्डसाठी लागणारे महत्त्वाचे घटक पुरविण्यास नकार दिला यावर मोदी गप्प बसलेत, कारण जसे क्रायोजेनिक इंजिन मिळाले नाही तेही आपल्या शास्त्रज्ञांनी स्वबळावर ते विकसित केले, तसे कोरोनावर औषधही आपण कोणाचीही मदत न घेता बनवतो आहे. एक दिवस भारत बायोटेकचं कोव्हॅक्सीन हेच आख्ख्या जगात कोरोनावरील एकमेव रामबाण औषध ठरणार आहे. जय आत्मनिर्भर भारत. जय मोदी!

आता यांना काय म्हणावं? क्रायोजेनिक तंत्रज्ञान नाकारले गेल्यानंतर ते स्वतःच विकसित करायला आपल्याला वीस वर्षे लागली होती. आपला अंतराळकार्यक्रम तितका मागे पडला. आता लसीकरणही वीस वर्षे थांबवणार आहेत का मोदी? मग अचानक आख्ख्या जगापुढं व्हॅक्सीन द्या, ऑक्सिजन द्या, रेमडेसिव्हीर द्या अशी भीक का मागू लागले आहेत हे?

अमेरिका हा अत्यंत धोकादायक देश आहे हे पूर्ण जगाला माहित आहे.संकट काळी मदत करण्या ऐवजी अडचणी कशा वाढतील हीच त्यांची धोरण असतात.
भारताचे खरे मित्र रशिया ,इराण अशा देशांना लांब ठेवून मोदी सरकार अमेरिकेच्या गळ्यात गळे घालून velentine साजरा करत होते.
आधुनिक विमान दिली तर युद्ध समयी सुट्टे भाग देणार नाहीत अशी अडवणूक करतील ते.
भारतीय शेती ला तोट्यात जाण्यासाठी भारत सरकार वर दबाव आणून शेतकऱ्यांची सबसिडी बंद करा म्हणून मागे लागला होता..
खरे मित्र ओळखा हेच मोदी ना सांगायची वेळ आली आहे
चीन बरोबर चे संबंध सुद्धा वाटाघाटी नीच सोडवा अमेरिकेच्या नादी लागून संबंध ताणून तोडू नका.
ते त्यांचा स्वार्थ साधत आहेत.

अमेरीका लबाड देश आहे हे बाकी खरं.
पण विश्वगुरू मोदींजींना एवढी साधी गोष्ट कळू नये?
त्यापेक्षा मग महागुरू काय वाईट?

Ian Bremmer यांच्या मते भारतातले खरे आकडे पाचपट असू शकतात! पाचपट या दाव्यात कितपत तथ्य असावं?

-Nile

पाचपट या दाव्यात कितपत तथ्य असावं?

परवा दिल्लीतल्या एका स्मशानभूमीत काम करणाऱ्या शीख माणसाची मुलाखत (आजूबाजूला देह जाळले जात असतानाच तिथेच घेतलेली) टीव्हीवर पाहिली - तो म्हणाला, अनेक लोकांना कोणत्याच हॉस्पिटलमध्ये अडमिट करून घेत नाहीत (कारण जागा नाहीत वगैरे), मग तो माणूस वाटेतच मरतो, मग तो कोव्हिडमुळे मेला असं धरतच नाहीत (कारण टेस्ट झालीच नव्हती). आताआतापर्यंत मी रोज तीस देह जाळत होतो आज आतापर्यंत ९० झाले आहेत, आणि आणखी ४० वेटिंग आहेत. ही गोष्ट जर दिल्लीसारख्या, म्हणजे जिथे जगाचं लक्ष असतं अशा ठिकाणची असेल, तर इतर ठिकाणी काय होत असेल याची कल्पना करता येते.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण म्हणूनच साधारण किती पट यात इंटरेस्ट आहे. इटली वगैरे मध्ये साधारण अशीच परिस्थिती होती आणी त्यांनी साधारण शक्यता स्वत:च वर्तवली होती (म्हणजे, ऑफिशियली). नंतर मेलेल्या पण न मोजता आलेल्या लोकांची मोजदादही, चीन, इटली, न्यु यॉर्क राज्य वगैरेंनी केली होती. पण ती कित्येकपट वगैरे नव्हती. अर्थात चीनचे आकडे संशयास्पद आहेच आणि भारत काही न्युयॉर्क/इटली वगैरे नाही. पण म्हणूनच संख्यारेषेवर कुठे असवा असे एक कुतूहल.

-Nile

या पाचचा अर्थ मी लावते म्हणजे साधारण तेवढाच आकडा ते दहापट यांच्या अध्येमध्ये कुठे तरी खरा आकडा असेल. अगदी ५० पट जास्त नसतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भ्रमर मुखर्जींची ही मुलाखत पाहिलीत का?

https://m.thewire.in/article/health/watch-india-may-see-five-lakh-covid-cases-3000-deaths-a-day-by-may-1

डॉ. देवी शेट्टींनीही पाचपटचा दावा केला असे वाचनात आले.

-Nile

इकॉनॉमिस्टच्या अ‍ॅनालिसीसनुसारही भारताचे आकडे पाच ते दहापट असावेत असे म्हटले आहे.

-Nile

स्पेक्युलेटिव: भारतातल्या लाटा या टेस्टिंग कितपत होत आहे यावर जास्त अवलंबुन आहेत असे वाटते. खरे तर डिसेंबर-जानेवारीत ग्रामीण भागात नक्कीच मोठ्या प्रमाणार कोविड संक्रमण होत असावे. पण ग्रामीण भागात चाचण्या होत नसल्याने पहिली लाट ओसरल्यासारखे वाटले. ग्रामीण भागातुन शहरांकडे स्थलांतर वाढले, बंधने कमी झाली आणि बाधितांची संख्या (शहरात अधिक चाचण्या होत असल्याने) शहरात जोमाने वाढू लागली.

ग्रामीण भागात corona विषयी अनंत गैर समज आहेत.
What's app नी त्यांचे brain वॉश केलेले आहे.
Corona हा रोग कल्पित आहे ह्या पासून लसीकरण हे षडयंत्र आहे.
लसी मुळे गुणसूत्र मध्ये बदल होवून नंपुसक पासून काय काय होवू शकते असेल msg सर्रास फॉरवर्ड होत आहेत..
मी जेव्हा गावी गेलो तेव्हा बघितले कोणी मास्क वापरत नाही,corona मस्करी चा विषय होता तिथे.
आणि आंतर राज्य वाहतूक बिन्धास्त चालू असल्या मुळे ग्रामीण भागातून हे बेफिकीर लोक बिन्धास्त शहरात आली आणि साथ पसरली असा अनुमान काढायला हरकत नाही.
मुंबई मध्ये मी राहतो तिथे ग्रामीण भागा पेक्षा नियम पाळणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे आणि प्रशासन पण sajak आहे.

ग्रामीण भागात corona विषयी अनंत गैर समज आहेत.

शक्यता आहे. परंतू मागील महिन्याच्या सुरुवातीला तुम्हालाही कोरोना आणि त्यावरील लस हे थोतांड वाटत होते. तुम्ही स्वतः ही लस घेणार नाही असेही म्हणाले होते मग परवा तुम्ही ह्या लसीचा दुसरा डोस घेतल्याने अत्यानंद झाला असेही म्हणाले. पंधरा एक दिवसात तुमच्या विचारांच्या गुणसूत्रात अचानक कसा बदल झाला?
संदर्भ : दुसऱ्या एका मराठी सं.स्थळावर तुम्ही ह्याच आयडीने लिहिलेले प्रतिसाद.

मानव sir दुसऱ्या संकेत स्थळा विषयी मला माहीत नाही पण ह्याच संकेत स्थळावर तुम्ही म्हणता त्या अर्थाचे माझे प्रतिसाद आहेत.
तेव्हा गोंधलेली स्थिती होती रोज वेगवेगळी माहिती वाचून गोंधळ उडाला होता.
Corona म्हणजे काय हे पूर्ण समजायला च अर्ध वर्ष गेले होते तेव्हा मला सुद्धा corona ha आजार च नाही असे वाटत होते.
राहिला लसी चा विषय.
लसी विषयी सामान्य लोकांना दोन तीन च गोष्टी माहीत असतात.
१) मेलेले जिवाणू ,विषाणू शरीरात सोडले जातात .
२)मग आपल्या शरीराची रोग प्रतिकार यंत्रणा त्यांना ओळखते आणि प्रतिकार करते.
३) आणि तर विषाणू ,जिवाणूंची ओळख काही वर्ष तरी लक्षात ठेवते.
संपले ज्ञान सामान्य लोकांचे.
माझे मत खरे तर बदलले इथले काही लेख वाचून.
लस म्हणजे काय,आणि rna वर आधारित लस म्हणजे काय ह्या विषयी ह्याच संकेत स्थळावर सविस्तर माहिती मिळाली.
आपली रोग प्रतिकार शक्ती कसे काम करते ह्याची अगदी सविस्तर माहिती इथेच मिळाली.
मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली.
म्हणून मत सुद्धा बदललं.

धन्यवाद!

तुम्ही मोकळ्या मनानं दिलेला प्रतिसाद आवडला. त्या-त्या विषयांतल्या तज्ज्ञ लोकांच्या मुलाखती घेण्यामागचा हाच हेतू असतो की कुणा वाचकांचे गैरसमज असतील तर ते कमी व्हावेत, दूर व्हावेत.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदर प्रतिसाद.
मराठी संस्थळांवरील वाचनामुळे, वावरामुळे, माझीदेखील - व्यक्तीपूजा, स्त्रियांचे हक्क, अंधश्रद्धा अशा अनेक विषयांवरची मते बदललली आहेत.

आज 4 लाख नव्या केसेस होणार का?

ऑक्सिजन सिलिंडर चे स्फोट होवून covid सेंटर ला आग लागण्याच्या हल्ली बातम्या येत आहेत..
ऑक्सिजन हा वायू ज्वलन शिल नाही तो स्वतः जळत नाही पण ज्वलनास मदत करतो.
जसे प्रकाश स्वतः दिसत नाही पण प्रकाश मुळे सर्व दिसते.
मग ऑक्सिजन सिलिंडर चे स्फोट होतात च कसे.
WhatsApp वर एक msg वाचला.co 2 चे सिलिंडर खाली करून काही व्यापारी त्या मध्ये ऑक्सिजन भरत आहेत आणि तेच ऑक्सिजन सिलिंडर म्हणून विकत आहेत.काही प्रमाणात co 2 ha वायू सिलिंडर मध्ये शिल्लक राहत असेल आणि त्या मध्ये ऑक्सिजन भरला की रासायनिक अभिक्रिया होवू न त्याचा स्फोट होत असावा अशी शंका आहे..
सामान्य दबावात निसर्गात असे घडत नसेल पण सिलिंडर मध्ये उच्च दबावात ऑक्सिजन भरला जातो त्या मुळे रासायनिक अभिक्रिया होत असेल..

ऑक्सिजन हा वायू ज्वलन शिल नाही तो स्वतः जळत नाही पण ज्वलनास मदत करतो.
जसे प्रकाश स्वतः दिसत नाही पण प्रकाश मुळे सर्व दिसते.
मग ऑक्सिजन सिलिंडर चे स्फोट होतात च कसे.

इथवरचे तुमचे म्हणणे तर्कास धरून वाटते. (बोले तो, निदान मी तरी/मीही असाच तर्क केला. आता, तो चूक की बरोबर, हे निदान मी तरी (आणि निदान या क्षणाला तरी) छातीठोकपणे सांगणार नाही. मात्र, इतके अवश्य म्हणेन, की तो जर बरोबर असेल, तर दोघांचाही बरोबर असेल, अन्यथा, दोघांचाही चूक असेल.)

WhatsApp वर एक msg वाचला.co 2 चे सिलिंडर खाली करून काही व्यापारी त्या मध्ये ऑक्सिजन भरत आहेत आणि तेच ऑक्सिजन सिलिंडर म्हणून विकत आहेत.काही प्रमाणात co 2 ha वायू सिलिंडर मध्ये शिल्लक राहत असेल आणि त्या मध्ये ऑक्सिजन भरला की रासायनिक अभिक्रिया होवू न त्याचा स्फोट होत असावा अशी शंका आहे..
सामान्य दबावात निसर्गात असे घडत नसेल पण सिलिंडर मध्ये उच्च दबावात ऑक्सिजन भरला जातो त्या मुळे रासायनिक अभिक्रिया होत असेल..

सामान्य दबावाखाली काय, किंवा उच्च दबावाखाली काय, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन यांच्यात कोणतीही अभिक्रिया होत असण्याबद्दल निदान ऐकलेले तरी नाही. (विचार करा, समजा अशी अभिक्रिया घडलीच, तर त्यातून निघणारा एंड-प्रॉडक्ट काय असेल?) त्यामुळे, हे कोणीतरी अक्षरशः ढुंगणातून ओढून काढून व्हाट्सॅपवर पसरवलेले स्पष्टीकरण वाटते. (व्हाट्सॲपवर हे खूप चालते.) फार कशाला, ती सिलिंडर फुटण्याची बातमीसुद्धा कपोलकल्पित निघाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.

परंतु समजा, ती बातमी जर खरी असली, तरीसुद्धा, सिलिंडरच्या स्फोटाचे एक साधेसोपे (आणि कोणत्याही काल्पनिक अभिक्रिया मध्ये न आणणारे) स्पष्टीकरण असू शकते. कोणी समजा डोळे झाकून त्या सिलिंडरमध्ये त्याच्या क्षमतेहून अधिक ऑक्सिजन ('हिंदुस्तान है!' म्हणत) अक्षरशः दाबून ठोसला असला, तर भरल्याक्षणी लगेच स्फोट होणार नाहीही कदाचित, परंतु पुढेमागे कधीतरी अचानक किंचितश्या धक्क्याने म्हणा, किंवा सभोवतालचे तापमान वाढल्यामुळे म्हणा, स्फोट होणे अशक्य नाही. (मात्र तरीही, त्याने आख्ख्या केंद्राला आग कशी लागेल, हे समजत नाही. असो.)

दुसऱ्या वायू चे सिलिंडर व्यवस्थित साफ न करता तेच सिलिंडर ऑक्सिजन साठी वापरणे सर्रास चालू होते .त्याचा काही तरी विपरीत परिणाम होणार हे अटळ होते. ब्लॅक fungas साठी ऑक्सिजन जो रुग्णांना दिला तो पण जबाबदार आहे असे वक्तव्य आता तज्ञ लोक करत आहेत.
पैसे मिळवणे हा एकमेव उद्येष डोळ्यासमोर ठेवून दुसऱ्या वायू साठी वापरत असलेले सिलिंडर ऑक्सिजन साठी वापरून तो रुग्णांना उपचार करण्यासाठी वापरला गेला .हे मात्र सत्य आहे.

व्हॉट्सॅपवर वाचता त्या सगळ्यावर विश्वास ठेवू नका हो.

वेगवेगळ्या बातम्या ऐकुन परत द्विधा अवस्था झाली.
१) लसी चे दोन्ही डोस घेतल्या नंतर corona झाला तरी लस घेतलेली व्यक्ती गंभीर होणार नाही,तिला हॉस्पिटल मध्ये admit होण्याची गरज लागणार नाही,त्या व्यक्ती च मृत्यू होणार नाही .
असे दावे होते.
दोन तीन तरी बातम्या वाचनात असल्या लसी चे दोन्ही डोस घेवून सुद्धा corona ni मृत्यू आला.
का? मोठे प्रश्नचिन्ह.
२) बाधित झाल्या नंतर corona चे व्हायरस lungs
खराब करतात असे सांगितले जात होते .
पण corona virus शरीरातील विविध अवयव वर परिणाम करून. त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करतो .
कसे ? कोणी सांगत नाही .
मोठे प्रश्न चिन्ह.
३)
वारंवार कानावर पडणारी दोन औषध.
A)tocilizuMab हे इंजेक्शन .
हे न मिळाल्या मुळे रोगी मेला अशा बातम्या असता.
गूगल वर शोधलं तर हे इंजेक्शन जेव्हा आपली प्रतिकार यंत्रणा आपल्याच जॉइंट मधील cell वर हल्ला करते तेव्हा हे दिले जाते.
आपलीच रोग प्रतिकार यंत्रणा आपल्याच शरीरातील घटक पेशींवर का हल्ला करते ह्याचे कारण अजुन स्पष्ट नाही मग corona चे व्हायरस हे घडवतात हे कसे ठरवले?
आणि ते त्या injection ल पर्याय नक्कीच असणार मग त्याचाच आग्रह का?
मोठे प्रश्न चिन्ह.
४) remdisivar हे औषध .
हे काही covid बाधित लोकांसाठी बनलेच नाही मग ह्या औषधांनी covid बरा होतो हे कोणी ठरवले आणि कसे.?
मोठे प्रश्नचिन्ह.
ह्या injection chi तर काहीच स्पष्टं माहिती नाही.
नक्की त्याने काय घडते आणि corona कसा बरा होतो तरी सर्रास दिले जात आहेत.
का?
खूप मोठे प्रश्नचिन्ह.
वरील दोन्ही इंजेक्शन मुळे corona virus मुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येईल आणि रोगी बरा होईल ह्या विषयी पुर्ण अभ्यास झालेला नाही प्रयोग चालू आहेत.
ही गूगल ची माहिती.
मुळात वरील दोन्ही इंजेक्शन corona वर उपचार करण्यासाठी बनलीच नाहीत.
ह्या सर्व प्रश्नांचे एकत्रित उत्तर लोक corona मुळे मरत नसून उपचार मुळे मरत आहे हे आहे.
असा अर्थ लोक लावत आहेत.
खूप लोकांच्या चर्चेत हेच मत दिसते.
आणि लोकांनी हे का खरे मानू नये?

तुम्ही पुन्हा एकदा डॉ बाळ यांची मुलाखत वाचा. आणि त्यातून प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत तर जरूर विचारा.

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती - डॉ. विनीता बाळ
करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुर्दैवाने ती मुलाखत सामान्यांसाठी नाही असं कळलं आहे.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उगाच आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून काहीतरी लिहू नका चाचा.
मुलाखत पूर्णपणे टेक्निकल आहे या अर्थाने मी जड म्हणालो होतो.
याचा अर्थ सामान्यांच्या करीता नाही असं तुम्ही काढताय .( आणि तुम्ही कधी स्वतःला सामान्य समजायला लागलात ? Wink Wink )

वाचा वाचा हे दोन्ही भाग.

हे काय तुमच्या मुलाचं लग्न आहे का, आमचे पाय धुतले नाहीत आणि आम्हांला पाच हजाराचं धोतर दिलं नाही म्हणून फुगून बसायला! तिथे झालेली सगळी चर्चा लिहून काढल्यानंतरही कशाबद्दल हा पॅसिव्ह अग्रेसिव्हपणा!!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला मुलगा नाही.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

राहूल व्होरा यावर काय प्रतिक्रिया द्यावी तेही कळत नाही. वय ३५ वर्ष.

- ओंकार.

!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गंगा नदीत फेकून दिलेलं मृत देह बक्सर बिहार मध्ये नदीच्या किनारी मिळून आले.
मृत देह पाण्यात टाकण्याची अत्यंत फालतू प्रथा फक्त आणि फक्त उत्तर भारतातच आहे. ते पण नदीच्या पाण्यात जे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
कसलेच रिपोर्ट न करता ते मृत देह corona बाधित लोकांचे असावेत असे ठरवून ते पुरले सुद्धा.
मृत देहाची ओळख पटवून ज्या लोकांनी हे कृत्य केले आहे त्यांना फासावर च चढवले पाहिजे होते.
अशी जनता ज्या देशात राहते तो देश corona वर. विजय प्राप्त करेल ही अशक्य कोटी मधील गोष्ट आहे.

आपल्या भावना समजू शकतो; त्यांच्याशी बव्हंशी सहमतसुद्धा आहे. मात्र,

मृत देहाची ओळख पटवून ज्या लोकांनी हे कृत्य केले आहे त्यांना फासावर च चढवले पाहिजे होते.

ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्यावर खटले चालवून त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी, इथवर ठीक आहे. परंतु, थेट फाशी??????

अरे, हे काय ब्रिटिश वसाहती राज्य आहे काय? की मोगलाई? Due process नावाचा काही प्रकार असतो की नाही? आणि, ते in the rarest of rare cases वगैरे जे काही सुप्रीम कोर्ट बोंबलून गेले आहे, ते मग कोणत्या भावाने?

आणि, या गुन्ह्याकरिता फाशी?????? जे गुन्हे in the rarest of rare cases का होईना, परंतु फाशीच्या शिक्षेस कायद्यान्वये पात्र ठरविले गेले आहेत, त्यांत हा प्रकार नक्की कोठे बसतो?

----------

यावरून एक गंमत आठवली. माझ्या लहानपणी आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर त्या-त्या स्थानिक भाषांतून 'युवावाणी' नावाचा एक कार्यक्रम सादर होत असे. (कदाचित अजूनही असेल.) स्थानिक युवकांना वाचा फोडणे (ईईईईईक्स!!!) तथा त्यांच्या विविध गुणांना उत्तेजन देणे हे त्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते.

तर अशाच एका संध्याकाळचा मुंबई 'ब'वरचा युवावाणीचा मराठीतील एपिसोड. कोण्या युवकाने त्यात एक श्रुतिका म्हणा, नभोनाट्य म्हणा, सादर केले होते. कोर्टाचे कामकाज कसे चालते, याची अनभिज्ञांना ओळख करून देण्याकरिता नभोनाट्य. एका आरोपीला कोर्टात आणले जाते, आरोप, साक्षीपुरावे, उलटतपासणी वगैरे सर्व सोपस्कार होतात, आरोपी दोषी ठरतो, नि सरतेशेवटी त्यास शिक्षा सुनाविली जाते. साधी ष्टोरी, नि तितकेच साधेसुधे डायलॉग. प्रभावी होऊ शकण्यासारखे नभोनाट्य होते.

गोची फक्त एकच होती. आरोपीवर आरोप होता, तो (भुरट्या) चोरीचा, नि त्याला शिक्षा सुनाविली गेली, ती जन्मठेपेची.

आमचे आजोबा बॅकग्राऊंडमध्ये बसून एका कानाने नभोनाट्य ऐकत होते. त्यांनी त्या नभोनाट्य लिहिणाऱ्याची काढलेली अक्कल चाळीसएक वर्षांनंतर आजही आठवते.

हा गंभीर गुन्हा च असला पाहिजे.
नदीचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.ते पाणी दूषित झाले तर अनेक लोकां चेजीव धोक्यात येतात.एका माणसाच खून केला तर फाशी होते अनेक लोकांचे जीव प्रदूषित पाण्याने गेले तर किती वेळा त्या व्यक्ती ला फाशी दिली पाहिजे.
पिण्याच्या पाणी प्रदूषित करणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे.

हे काय देवेंद्र फडणवीस सरकार लागून गेले आहे काय, मनाला येईल ती रँडम शिक्षा ठोठावायला? त्या प्लास्टिकबंदीच्या वेळेसारखे? पहिल्या वेळेस सापडलात, तर बुल्ला छाटू, दुसऱ्यांदा सापडलात, तर हातपाय तोडू, तिसऱ्यांदा सापडलात, तर शिरच्छेद करू, वगैरे वगैरे टैप्स?

ही असली फतवेशाहीच जर पसंत असेल, तर मग त्यापेक्षा तुम्हीच का नाही सौदी अरेबियास स्थलांतरित होत? कायमचे?

----------

नाही म्हणजे, सध्याचे सरकारही त्यापेक्षा फार काही ग्रेट आहे, असे म्हणण्याचा उद्देश नाही१अ, परंतु... असो.

१अ लॉकडाऊनचा भंग (जाणूनबुजून किंवा नाइलाजाने) करणारास पोलिसी दंडुके हा त्याच मेंटालिटीचा प्रकार. (कडक अंमलबजावणीच करायची, तर चलाने फाडा - नि ती फाडताना लाच घेऊ नका! ज्याच्या नावाने चलान फाडले, त्याला जर ते अन्याय्य वाटले, तर तो कोर्टात जाईल; त्याला नि जज्जाला पाहून घेऊ द्यात, काय बरोबर नि काय चूक ते. दंडुकेशाही कसली करता?)

'सापडलात', बोले तो, तुमच्या पझेशनमध्ये प्लास्टिकचे पॅकेजिंग/झिपलॉक/पिशवी (ग्राहक म्हणून तुमच्याकडे आलेली) जरी सापडली, तरीही.

पिण्याच्या पाणी प्रदूषित करणे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे.

आहे; मान्य. पण...

एका माणसाच खून केला तर फाशी होते अनेक लोकांचे जीव प्रदूषित पाण्याने गेले तर किती वेळा त्या व्यक्ती ला फाशी दिली पाहिजे.

...म्हणून फाशी???

अनेकांचे जीव त्यातून जावेत, या एक्स्प्लिसिट हेतूने, ठरवून प्रस्तुत सद्गृहस्थाने प्रस्तुत जलप्रदूषण केले, हे आपण कोर्टात सिद्ध करू शकता काय? तर कदाचित फाशीची शिक्षा लागू होऊ शकेल. अन्यथा, हा फाशीच्या शिक्षेस पात्र असा गुन्हा नाही.

(खून आणि मनुष्यवध (अगदी सदोषसुद्धा) यांच्यात कायद्याच्या दृष्टीने बराच फरक आहे. नि असला पाहिजे.)

अहो, आपल्या धर्मातली कर्मकांडं, स्मशानातल्या फिया, अगदी सरण-मडकं-कापड याचे वाढलेले दर ह्या सर्वामुळे परवडत नाहीये लोकांना प्रॉपर जाळणं.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

मृतदेह विद्युद्दाहिनीत जाळायला किंवा स्मशानापर्यंत न्यायलाही काही हजाराची लाच द्यावी लागत आहे असे वाचले आहे.
आपल्या म्हाताऱ्या बायकोचे प्रेत सायकलीच्या मधल्या त्रिकोणात अडकवून नेणारा म्हातारा तुम्ही पाहिलात की नाही?
नदीत प्रेत टाकणाऱ्यांपेक्षा विमानातून उतरून क्वारंटाईन धाब्यावर बसवून मोकाट फिरणाऱ्या झंटलमन लोकांना केनिंग केलं पाहिजे होतं गांडीवर.

एका उप्रमधील इसमाची यासंदर्भात मुलाखत वाचली. त्याचे वडिल वृद्धापकाळाने गेले. स्मशानात तिरडी न्यायला कोणी यायला तयार नव्हते. स्मशानात १०००० मागितले जाळायला, पंडिताचा खर्च निराळा. तो माणूस म्हणे, एवढा खर्च कुठून करू, मला ५ मुली आहेत, कमावणारा मी एकटाच. निदान गंगेत देह लोटून दिला तर पुण्य लाभेल म्हणून तसे केले.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अरेरे!

मृत देहाचे दहन,दफन करण्याची भारताची कुवत नाही हेच ह्या वरून सिद्ध होते.मग उगवती महासत्ता हे बिरूद कशाला लावून घ्यायचे.
तंत्र ज्ञान शंभर वर्षापूर्वी च माणसाने आत्मसात केले आहे की त्याच्या जोरावर शंभर दोनशे मृत चे दहन करणे खूप किरकोळ गोष्ट आहे.
ही साधी समस्या भारताला सोडवता येत नसेल तर भारत अती मागास देश आहे.

मृत देहाचे दहन,दफन करण्याची भारताची कुवत नाही हेच ह्या वरून सिद्ध होते.मग उगवती महासत्ता हे बिरूद कशाला लावून घ्यायचे.
तंत्र ज्ञान शंभर वर्षापूर्वी च माणसाने आत्मसात केले आहे की त्याच्या जोरावर शंभर दोनशे मृत चे दहन करणे खूप किरकोळ गोष्ट आहे.
ही साधी समस्या भारताला सोडवता येत नसेल तर भारत अती मागास देश आहे.

दुसरी लाट भारतात डेल्टा varient मुळे आली होती आता ती पण ओसरली .आता तिसरी लाट डेल्टा प्लस मुळे येणार अशा न्यूज येत आहेत .हा डेल्टा प्लस भारतात एप्रिल 21 मध्ये प्रथम सापडला आणि आज पर्यंत डेल्टा प्लस चे भारतात 40 रुग्ण आहेत त्या मधील 80 वर्षाची म्हातारी रत्नागिरी मध्ये डेल्टा प्लस नी मृत्यू पावलो आहे ती भारतातील माहीत असलेली पहिली केस आहे.

दुसरी लाट भारतात डेल्टा varient मुळे आली होती आता ती पण ओसरली .आता तिसरी लाट डेल्टा प्लस मुळे येणार अशा न्यूज येत आहेत .हा डेल्टा प्लस भारतात एप्रिल 21 मध्ये प्रथम सापडला आणि आज पर्यंत डेल्टा प्लस चे भारतात 40 रुग्ण आहेत त्या मधील 80 वर्षाची म्हातारी रत्नागिरी मध्ये डेल्टा प्लस नी मृत्यू पावलो आहे ती भारतातील माहीत असलेली पहिली केस आहे.

अशाने किती वेव्ह येत रहातील याचा अंदाज बांधता येणं कठीण आहे!
लस भविष्यही डळमळीत दिसत आहे...
https://science.sciencemag.org/content/early/2021/06/30/science.abi7994?...