लसीकरण अनुभव
लसीकरण अनुभव
(प्रतिमा आंतरजालावरून साभार)
जगाच्या पाठीवर कुठेही असलात आणि तुम्ही लस घेतली असेल तर तरी तुमचा लसीकरणाचा अनुभव इथे शेअर करणार का?
माझा इथे करत आहे .
काल रात्री अपॉइंटमेंट घेतली. आज सकाळची मिळाली. स्थळ बिंदुमाधव ठाकरे दवाखाना (मनपा). माझ्या घरापासून ९०० मीटर अंतरावर.
सकाळी नऊ वाजता जाऊन बसलो . अपॉइंटमेंट असलेल्या लोकांना रांगेप्रमाणे टोकन देत होते. माझा नम्बर ९ होता . सव्वा दहा वाजता लसीचा बॉक्स आला. दवाखाना व व्यवस्था उत्तम होती (मला महानगपालिकेच्या दवाखान्यांमध्ये आत्तापर्यंत नेहमीच उत्तम अनुभव आला आहे. )
साडे दहा वाजता ममव म्हाताऱ्यांचा मॉब तिथे जमा झाला. "माझी काल अपॉइंटमेंट होती ते माझे वय खूप आहे : अशी विविध कारणे सांगून रांग मोडून मध्ये घुसू इच्छित होते. हे सर्व लोक उच्चवर्गीय व प्रिव्हिलेज्ड होते. प्रत्येकाला प्रथम लस हवी होती. पोलीस व मनपा स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना त्रास देत होते . माझे लसीकरण अकरा वाजता झाले. हा मॉब नसता आला तर पंधरावीस मिनिटे आधी झाले असते. मी ऑफिसात येऊन बसलोय आता .
न बा नेहमी म्हणतात तेच खरे.
ममव थेरडेशाहीचा धिक्कार असो
कोविड लस
माझी आई, भावाची सासू, आत्या, आतोबा आणि ४५ वर्षांचा भाऊ असे पाचजण आज लस घेऊन आले. भावाला मधुमेह आहे म्हणून त्याने घेतली. बाकी सगळे सत्तरी ओलांडलेले. आधी नोंदणी वगैरे केली नव्हती. हे सगळे मुंबईत बोरिवलीला राहणारे. दहिसर पूर्वेला कोविड जंबो सेंटर होतं, तिथे आता लसीकरण केंद्र केलं आहे, तिथे गेले होते. शंभरेक लोक होते लस घ्यायला आलेले, काही आधी नोंदणी केलेलेही होते. आधार कार्ड पाहिलं, आजार वगैरेंची माहिती घेतली. नंतरही अर्धा तास पडून राहायला सांगितलं होतं प्रत्येकाला. बाहेर पडताना किती वाजता लस दिली, अर्धा तास आराम झाला की नाही, हे पाहात होते. नंतर तिला मेसेज आला. एका मेसेजमध्ये कोविशील्ड दिल्याचा उल्लेख आहे, एकात नाही. आई तिथली व्यवस्था पाहून खूष होती. आता पुढचा ३१ तारखेला घ्यायचा आहे डोस.
This too shall pass!
आमच्याकडे सर्व वेटिंग लिस्टस
आमच्याकडे सर्व वेटिंग लिस्टस फुल आहेत. १० ठिकाणी नाव वेटिंग लिस्टवरती घालून ठेवले आहे. बघू व्हायरस जिंकतो की लस.
लस घेतलेल्यांनी
मास्क वापरला नाही तरी चालेल का? कारण लसीमुळे हे लोक रोग पसरवणारे होणार नाहीत. आणि त्यांनाही रोग होणार नाही. किंवा 'मी लस घेतली आहे' अशी पट्टी बांधायची?
मास्क लागेलच.
ज्यांना लस मिळाली आहे, असे लोक रोग पसरवू शकतात. त्यामुळे निदान ७५-८०% लोकांनी लस घेईस्तोवर मास्कला पर्याय नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
करेक्ट हे लोक विषाणु पसरवु
करेक्ट हे लोक विषाणु पसरवु शकतातच पण ते स्वत:ही इन्व्हिन्सिबल/अजिंक्य नाहीत त्यांना परत होउ शकतो.
हे कसं?
विषाणू आला रे आला की लसीमुळे तयार झालेली शरिरातील विरोधक शक्ती ते नष्ट करणार ना? का फक्त त्यास तसेच राहू देणार सुप्तावस्थेत?
का त्यास निष्क्रीय करणार. हे शैक्षणिक प्रश्न आहेत. लस नक्की काय करते हे संशोधकांसच माहिती.
बाकी सरकार काय करणार तर वैज्ञानिक एक्सपर्टना विचारून तसे निर्णय घेणार.
आणि आम्ही मास्क बांधा सांगितलं म्हणून मास्क बांधणार. थोड्या महिन्यांनी लस घेण्याचं आवश्यक केलं जाईल सर्वांना तेव्हा तेही करू.
विषाणू आला रे आला की लसीमुळे
विषाणू आला रे आला की लसीमुळे तयार झालेली शरिरातील विरोधक शक्ती ते नष्ट करणार ना? का फक्त त्यास तसेच राहू देणार सुप्तावस्थेत?का त्यास निष्क्रीय करणार?
* सध्या ज्या ज्या लसींना मान्यता मिळालेली आहे त्या सर्व लसी एक नक्की करतात . लसीकरण पूर्ण झाल्यावर , (म्हणजे ज्या लसींचे २ डोस लागतात त्यांचे दोन डोस घेतल्यानंतर साधारण दोन आठवड्यानंतर ) या लसी
कोरोना संसर्ग जरी झाला तरी त्यापासून मृत्यू होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य पातळीवर आणतात. या व्यतिरिक्त संसर्ग झाला तरी आजार गंभीर होणार नाही हेही करतात .
आता तुम्ही म्हणाल की , ह्या !!!!! यात काय विशेष ?
तर याचं उत्तर असं आहे . की आधुनिक लस निर्मितीशास्त्र छद्म विज्ञान नसल्यामुळे त्याला जे माहित आहे , सिद्ध करता येण्यासारखे आहे , तेवढेच बोलण्याची मुभा आहे. वाटेल ते वायफट दावे करण्याची मुभा त्याला नाही .
विषाणू आला रे आला की तो नष्ट होणार किंवा कसे याचा अभ्यास चालू आहे , उत्तर मिळाले ( हो किंवा नाही , कसेही ) की होईल जाहीर तेही
मास्क तर बांधाच तो पर्यंत . आवश्यक केलं नसलं तरी तुमचे वय जास्त आहे लस घेतलीत तर बरे .!!!
मी घेतली काल .
लस घेणार.
कोरोना संसर्ग जरी झाला तरी त्यापासून मृत्यू होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य पातळीवर आणतात. या व्यतिरिक्त संसर्ग झाला तरी आजार गंभीर होणार नाही हेही करतात .
हे तर पहिले. मृत्यू टळणे महत्वाचेच.
+१
यात विशेष असं की लोक नव्या करोना विषाणूमुळे फार आजारी पडणार नसतील तर हॉस्पिटलांवरचा ताण बराच कमी होईल, अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे तो येणार नाही, आपली माणसं आजारी किंवा मरताना बघून लोकांना ज्या वेदना होत आहेत त्या होणार नाहीत.
साधी सर्दी झाली की कुणी त्याला घाबरत नाही. हे न घाबरणंही सध्या महत्त्वाचं आहे. समूह-प्रतिकारक्षमता तयार होईस्तोवर फक्त घाबरणंच आपल्या हातात आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
+१००
छान प्रतिसाद आहे. इट इज अ बिग डील.
लसीकरण्
म्युनसिपल दवाखान्यातला अनुभव चांगला होता. आधार कार्डाची व्यवस्थित नोंदणी करुन लस दिली. बसण्याची व्यवस्था उत्तम होती. फक्त, नगरसेवकांनी येऊन उदघाटन सोहळा उरकल्यामुळे सर्वांनाच एक तास उशीर झाला.
जिंकू किंवा मरू.
मेरा नंबर कब आएगा?
तुमचा नंबर दोन
तुमचा नंबर दोन दिवसंपूर्वीपासून आला आहे.
तुम्ही कॉविन app वर रजिस्टर करून अपॉइंटमेंट घेणे जरुरी आहे.
नंबर आया हय.
आप गये नही
हो.
आमच्या येथेही नगरपालिकेने केंद्र सुरू केले आहे. सध्या ज्येष्ठ नागरिकांना लस {मोफत} देत आहेत.
मला स्वारस्य नाही.
मी जेष्ठ नागरिकांतच मोडतो पण यात स्वारस्य नाहीच.
( म्हणजे ऐसीवर आहे, एवढे लेख वाचतो तरी उपड्या घड्यावर लस.)
अर्थात मी कसलाच नकारात्मक प्रचार करत नाहीये. माझी पत्नी घेणार आहे.
जे आहे ते सांगितलं, एवढंच.
असो. चालायचंच.
तुमचे हृदय परिवर्तन होईल तो
तुमचे हृदय परिवर्तन होईल तो महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णदिन म्हणून नोंदला जावा अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.
आणखी एक
हट्टी.
मेरा नंबर कब आयेगा?
मला कधीपासून लस हवी आहे; माझ्यामुळे लोकांना कमी उपद्रव व्हावा, विषाणूच्या म्यूटेशनमध्ये माझा हातभार लागू नये; मी आजारी पडले तर त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर आणि माझ्या जवळच्या लोकांवर ताण येऊ नये; आजारी पडलेच तर मरणासन्न होऊन घरच्यांना मोठा मानसिक त्रास होऊ नये वगैरे, वगैरे कारणं आहेत.
सुदैवानं मी ज्यांच्यावर प्रेम करते असे उतारवयीन लोक आता आपले दुराग्रह - आता माझं काय उरलं आहे छाप - सोडून काळजी घेत आहेत; लशी घ्यायला तयार आहेत, त्यामुळे मला वाटणारी काळजी कमी झाली आहे.
शिवाय माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांनीच लस घेतली असेल तर मास्कांशिवाय बागडता वगैरे येईल, हा व्यक्तिगत फायदा आहेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
विचार चांगला आहे.
त्याचबरोबर मला लस घ्यावीशी का वाटत नाही हे सांगणे गरजेचे आणि प्रातिनिधिक ठरावे.( हट्टी, आता आपले काय उरले, मला होणारच नाही करोना वगैरे कुठलातरी गट.)
१)जे वयस्कर लोक आता कामधंधा, हालचाल करत नाहीत, दारे दडपून बसले आहेत,कोणत्यातरी रोगावरच्या औषधांवर आहेत त्यांची प्रकृती फार संवेदनशील झालेली असते. असा माझा समज झालेला आहे.
२) 'डॉक्टर नसेल तिथे' नावाचे एक पुस्तक पंचवीस वर्षांपूर्वी वाचण्यात आले. ( ते माझ्याकडे आहे, आता ते प्रिंट होत नाही.) त्यात मॉडर्न मेडसनची सर्व प्राथमिक ( खरं म्हणजे विस्तृत) माहिती आहे. रोग, रोगाची लक्षणे, किती आणि केव्हा गंभीर होतात आणि कोणती औषधे किती परिणामकारक हे सर्व दिलं आहे.
३) antibiotics औषधांचा मारा भारतात तरी पातळी आणि सीमा ओलांडून गेला आहे. शिवाय ओवरदकाउंटरही मिळतात.
४) मी काही आजारी पडल्यास घरच्या सल्ल्याप्रमाणे डॉक्टरना दाखवून औषधे आणून तशीच ठेवतो. त्याला सांगतो तुमच्या औषधाने बरं वाटतंय. मॉडन मेडसन जेवढी घ्याल तेवढी ती आपल्याला अपंग,परावलंबी बनवतात हे माझे मत. नंतर डोस वाढवत जावे लागते.
५) मग लहानपणी काय करत होतात? याचे उत्तर म्हणजे नशिबाने आमचे फ्याम्ली डॉक्टर होमिओपॅथिक होते. दुसरे एक एमबिबिएस होते पण दोघेही अनाठायी महागडी औषधे देण्याच्या पार विरुद्ध. कोर्सवगैरे करायला लागेल का असं चुकूनही विचारलं तर हाकलायचे. "बरा झालास ना? मग औषध बंद."
६) आता ते डॉक्टर्स नाहीत पण होमिओपॅथिक केमिस्ट आहेत ते ओवरदकाउंटर औषधं देतात. साधारण चार दिवसांत गुण येतोच. स्वस्त आणि मस्त. कारण केमिस्टचा अनुभव आणि कोणती गोष्ट किती ताणायची हे आपण ठरवायचं. काही आयुर्वेदिक प्रयोगही करून पाहिले. चांगलीच गुणकारी आहेत.
----
एकूण काय मुद्दाम ठरवून वगैरे विरोध झाला नसून आपसुकच तसा विचार आणि वृत्ती झाली.
( मी डॉक्टर नाही आणि सल्ले दिलेले नाहीत. कोणताही प्रचार करायचा हेतू नाही. आपापल्या कुवतीने ,विचाराने, विश्वासाने निर्णय घ्यावेत.)
लस अत्यावश्यक केलीच सरकारने तर घेईन. तूर्तास विचार नाही.
याचे पॉईंट बाय पॉईंट उत्तर, मीही चिवट आणि हट्टी
१)जे वयस्कर लोक आता कामधंधा, हालचाल करत नाहीत, दारे दडपून बसले आहेत,कोणत्यातरी रोगावरच्या औषधांवर आहेत त्यांची प्रकृती फार संवेदनशील झालेली असते. असा माझा समज झालेला आहे.
हे खरेच आहे . परंतु त्याचा लस न घेण्याशी संबंध कळला. भारतात उपलब्ध दोन्ही लसी या करिता सुरक्षित आहेत. कुठल्या कॅटॅगरीतील लोकांना लस देऊ नये याबद्दल ठळक अक्षरात सगळीकडे माहिती आहे उदा . गर्भवती महिला , इम्युनोसप्रेसिव्ह औषधे सुरु असणारे लोक , ऍलर्जी असणारे लोक इत्यादी.
माझी आई ८२ वर्षांची आहे. माझ्या मोठ्या भावाच्या घरी आहे ( तो डॉक्टर आहे ) गेल्या मार्च पासून दारे दडपून घरात आहे ती . प्रकृती तोळामासा .
दोन दिवसांपूर्वी तिने लस घेतली . अजून तरी कुठलाही त्रास तिला जाणवलेला नाही.
२) 'डॉक्टर नसेल तिथे' नावाचे एक पुस्तक पंचवीस वर्षांपूर्वी वाचण्यात आले. ( ते माझ्याकडे आहे, आता ते प्रिंट होत नाही.) त्यात मॉडर्न मेडसनची सर्व प्राथमिक ( खरं म्हणजे विस्तृत) माहिती आहे. रोग, रोगाची लक्षणे, किती आणि केव्हा गंभीर होतात आणि कोणती औषधे किती परिणामकारक हे सर्व दिलं आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पुस्तकात कोरोना विषाणूजन्य आजार व त्यावरील उपाययोजना या विषयी काहीही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही.
अजून एक , लस हे औषध नाही.
औषध आजार झाल्यावर देतात.
लस आजार होऊ नये म्हणून देतात.
दोन्हीचा एकमेकांशी संबंध नाही.
३) antibiotics औषधांचा मारा भारतात तरी पातळी आणि सीमा ओलांडून गेला आहे. शिवाय ओवरदकाउंटरही मिळतात.
हेही खरे .. त्याचा लसीशी संबंध कळला नाही. कृपया उलगडून सांगा.
४) मी काही आजारी पडल्यास घरच्या सल्ल्याप्रमाणे डॉक्टरना दाखवून औषधे आणून तशीच ठेवतो. त्याला सांगतो तुमच्या औषधाने बरं वाटतंय. मॉडन मेडसन जेवढी घ्याल तेवढी ती आपल्याला अपंग,परावलंबी बनवतात हे माझे मत. नंतर डोस वाढवत जावे लागते.
पुन्हा एकदा सांगतो. लस मॉडर्न असली तरी मेडिसिन नाही.
बाकी ' जेव्हढी घ्याल तितकी परावलंबी " या तुमच्या मताबद्दल एकदा चर्चा करायचीय तुमच्याशी ,)
५) मग लहानपणी काय करत होतात? याचे उत्तर म्हणजे नशिबाने आमचे फ्याम्ली डॉक्टर होमिओपॅथिक होते. दुसरे एक एमबिबिएस होते पण दोघेही अनाठायी महागडी औषधे देण्याच्या पार विरुद्ध. कोर्सवगैरे करायला लागेल का असं चुकूनही विचारलं तर हाकलायचे. "बरा झालास ना? मग औषध बंद."
पुन्हा एकदा सांगतो. लस मेडिसिन नाही. त्याचा कोर्स वगैरे नसतो करायचा.
तुमच्या लहानपणी हा आजार नव्हता.
६) आता ते डॉक्टर्स नाहीत पण होमिओपॅथिक केमिस्ट आहेत ते ओवरदकाउंटर औषधं देतात. साधारण चार दिवसांत गुण येतोच. स्वस्त आणि मस्त. कारण केमिस्टचा अनुभव आणि कोणती गोष्ट किती ताणायची हे आपण ठरवायचं. काही आयुर्वेदिक प्रयोगही करून पाहिले. चांगलीच गुणकारी आहेत.
आयुर्वेदिक औषधांचा कोरोना आजारावर उपयोग होतो असे अजून तरी सिद्ध झालेले नाही.
सुदैवाने या आजारातील मृत्युदर फार कमी आहे. दुर्दैवाने ज्या लोकांचा आजार बळावतो आणि त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागते कॉम्प्लिकेशन्स होतात व मृत्यू होतो त्यांच्या करिता कुठल्याही पॅथीचे उपयोग होतो हे सिद्ध झालेले औषध सांगितलेत तर बरे होईल .
आजवर जगात गेल्या एक वर्षातच आजतागायत सव्वीस लाख मृत्यू झाले. लस घेतल्याने यापुढील काळातील असे अनेक मृत्यू टळू शकतात
----
एकूण काय मुद्दाम ठरवून वगैरे विरोध झाला नसून आपसुकच तसा विचार आणि वृत्ती झाली.
( मी डॉक्टर नाही आणि सल्ले दिलेले नाहीत. कोणताही प्रचार करायचा हेतू नाही. आपापल्या कुवतीने ,विचाराने, विश्वासाने निर्णय घ्यावेत.)
मला असं वाटतंय कि मूळ मुद्दा तुम्ही फारसा लक्षात घेऊन इच्छित नाहीयात , असं काही आहे का ?
आपली मैत्री आहे आणि मीही तुमच्या इतकाच चिवट आणि हट्टी आहे. तुम्ही नवनवीन गैरसमज बोलत चला , मी खुलासे करत जाईन.
पॉईंट बाइ पॉईंट उत्तरे पटली।
माझ्या मुद्दयांचा लस घेण्या/ न घेण्याविषयी काही संबंध नाही हे बरोबर. पण एकूण मलाच यात काही गम्य का वाटले नाही ते मांडले.
इतर जी पुस्तकातली माहिती दिली त्यावेळी लस नव्हती बरोबरे पण तत्वत: प्रकार तोच आहे. औषधे ( मॉडर्न) शक्यतो टाळायचीच असा एक कल निर्माण झालाय.
परंतू ही आपली प्रश्नोत्तरे आणि जो तात्विक वाद इथे लेखात आल्याने लेख आणखीच भक्कम होईल ही आशा आहे. ठिगळ ठरणार नाही.
सरळ 'मेरे मन को भाया, मैं
सरळ 'मेरे मन को भाया, मैं कुत्ता काट के खाया' म्हणा की मग
सॉस के साथ
नही और सांभार के साथ भी नही।
+१
अबापटांनी एक वाईड बॉल सोडून दिला आहे. होमिओपॅथिक औषधं नसतात, पाणी आणि साखर असतात. त्यांचा लस आणि औषधं दोन्हींशी काहीही संबंध नसतो,
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तो एक वेगळा विषय आहे.
गुण येतो ,कृती लिहिलेली आहे, विवक्षित रोगावर दिल्यावर परिणाम करते म्हणजे सामान्य माणसाच्या बुद्धीने औषध आहे. वैज्ञानिक त्यास काही म्हणोत.
माझाच वर्गमित्र ( एमडी युअरोलॉजिस्ट) म्हणतो की माझ्याच मुलांना मी दात येतांना वगैरे होमिओपॅथिकच दिली.
बाकी त्या वाइडबॉलवर अबापट अण्णांनी रनस काढले नाहीत कारण असेही ते जिंकणारच आहेत एक किंवा चार पाच रनसने.
लसवंत मंडळींचे अनुभव वाचून
लसवंत मंडळींचे अनुभव वाचून ठेवतोय.
चोवीस तास ल्स्पॉट्स् उघडे असताना (म्हणजे असं वाचलं होतं) सकाळीच सगळे गर्दी का करतात आणि नोन्दणी करतेवेळीच रिपोर्टिंग ची वेळ देत नाहीत का? असे दोन प्रश्न पडले आहेत. अट्ठावीस दिवसांनी जे दुसरी मात्रा घ्यायला येत नाहीत/ विसरतात, त्यांना शोधायला/ संपर्क करायला कोण जातात? आणि अशी राहून गेली तर काही दुष्परिणाम् होतील का?
बाकी आमच्या इथे असं म्हणण्याऐवजी आपली ठिकाणं दिली तर कळायला सोपं जाईल!
(मेरा नंबर आयेगा!)
केंद्रावर जाऊन सकाळी आधार दाखवून नोंदणी होते.
रांगेप्रमाणे अंदाजे दुपारची तीनपर्यंतची वेळ देतात. मग तेव्हा परत जायचे. लस घेतल्यावर दोन तास तिथेच थांबवतात, नंतर सोडतात.
लसीकरण केन्द्रे
आधी अपॉइंटमेंट घेतली असली तरी सकाळी ९ वाजता केंद्रावर जावेच लागते. रांगेत उभे राहून टोकन मिळवले तर त्यादिवशी नंबर लागतो. नाहीतर उद्या या, हे उत्तर मिळते. दुपारच्या वेळेची टोकन्स कधी वाटतात याची माहिती कोणी देत नाही. एकंदरीत, अपॉइंटमेंट मिळवली तरी अनिश्चितता असतेच.
अपॉइंटमेंट मिळवणे हे ही तितके सोपे नाही. पुण्यात जी सेंटर्सची लिस्ट येते त्यातील बहुतेक सेंटर्सचे पत्ते वा पिनकोड चुकीचे लिहिले आहेत. त्यामुळे आपल्या जवळचे सेंटर कुठले याचा पत्ता लागत नाही. आता तर कुठल्याही सेंटरवर २ एप्रिलच्या आधीची उपलब्ध तारीख दिसतच नाहीये. आमच्या लसीकरणाचा पहिला टप्पा झाला. लस उभयतांनी घेतली. दोघांच्या नांवासमोर partially vaccinated असे दिसते. पण सर्टिर्फिकेट मात्र फक्त माझेच दिसते. बायकोचे सर्टिफिकेट नांव व एक ग्रीन डॉट सोडून ब्लँक दिसते. अशा अनेक त्रुटी त्या सरकारी साईटवर आहेत.
लसीकरण अनिश्चितता
आमच्याकडे जो गुजराथी समाजाची मंडळे आहेत ती योग्य कामाची माहिती एकमेकांना अचूक पोहोचवतात. प्रत्येकाला एवढ्यासाठी हेलपाटे घालावे लागत नाहीत किंवा ओनलाईन शोधाशोध.
आमच्या इमारतीतल्या गुजराती शेजाऱ्यांनी सर्व घरांत जाऊन आपले केंद्र कुठे, काय न्यावे लागते, किती वेळ लागतो हे कळवले. सर्वच ज्येष्ठ नागरिकांना वाटसप - मोबाईल वापर समजत नाही तेव्हा ही मदत खरोखरच आवडली.
हा का ना का
जे जमेल तितकं ऑनलाईन करू इच्छितात त्यांना ह्या अशा सगळ्या अडचणी येतात असे दिसते. उदा. सध्या आयटीवाल्यांच्या तक्रारी फार दिसताहेत. याउलट, ज्यांचा आपल्या (आभासी नसलेल्या) परिसराशी संबंध आहे ते लोक चार लोकांना विचारतात, जवळचं सेंटर सकाळी गाठतात, टोकन घेऊन घरी येतात आणि दुपारी जाऊन लस टोचून घेतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ते तर
ज्यांचा आपल्या (आभासी नसलेल्या) परिसराशी संबंध आहे ते लोक चार लोकांना विचारतात, जवळचं सेंटर सकाळी गाठतात, टोकन घेऊन घरी येतात आणि दुपारी जाऊन लस टोचून घेतात.
ते तर केलंच आहे. आता हा घरबसल्या उद्योग इतरांना मदत करण्यासाठी. त्यांना अपॉइंटमेंट मिळवून देण्यासाठी.
- परोपकारी गोपाळ
ऐसीवर करोनासाठी जी काही मोहीम चालली आहे
त्याबद्दल आभारी आहे. संस्थळाचे मंडळ, कार्यकर्ते, संपादक खूपच कष्ट घेत आहेत.
मुंबईतून
मुंबईतून लसीकरणाचा एक रोचक अनुभव -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
लसवन्तोsहम्
लाॅकडाऊन १.० पासून नाशिक जिल्ह्याच्या एका आदिवासीबहुल तालुक्यातील खेड्यात स्थलांतरित आहे. आजच ३ कि.मी. अंतरावरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) जाऊन लस घेतली. पूर्वनोंदणी न करता जाणार असल्याने जाताना आधार व पॅन कार्डांचे फोटो मोबाईलमध्ये घेऊन गेलो होतो. PHC ला साजेशी अवस्धा इमारतीची होती. पाणी, पंखे, खुर्च्या यांची कमतरता असूनही कर्मचारी मन लावून काम करत होते. 3-4 रजिस्टर्समध्ये आधार पॅन ची नोंदणी, रक्तदाब, शरीर तापमान, आॅक्सीपल्स रीडिंगची नोंद वगैरे सर्व कामे हाती केली जात होती. लस देऊन झालेल्या जनतेला तासभर थांबवून पुन्हा एकदा सर्व रीडिंग घेत होते व क्रोसीनच्या चार गोळ्यांची पट्टी प्रत्येकाच्या हातात देऊन "दुसरा डोस घ्यायला विसरू नका, लस हे औषध नाही तेव्हा मास्क, सॅनिटायझर, साबण यांचा वापर करतच राहा, गर्दी टाळा" हे आवर्जून सांगत होते.
PHC ला पोचल्यापासून २ तासात लसवंत होऊन निघालो. दुतर्फा मिर्ची व सूर्यफुलांची शेते असलेल्या पायवाटेने परतत असतानाच पुढील sms आला:
प्रिय xxxxxxxxxx,
अभिनंदन!
आपल्याला कोव्हीड-19 लसीचा 1st डोस PHC xxxxxx येथे XX-03-2021 रोजी XXX PM वाजता व्हॅक्सीनेटर xxxxx (मोबा.क्र. xxxxxx) द्वारे यशस्वीरीत्या देण्यात आलेला आहे. आपण आपले प्रोव्हीजनल प्रमाणपत्र https://xxxx येथून डाऊनलोड करू शकता. लसीकरणापश्चात काही चौकशी असल्यास, आमच्या हेल्प लाईनशी 1075 वर संपर्क साधा - CoWIN.
आता २८ दिवसांनी रिचार्जसाठी जायचंय.
Nice!
ही फारच चांगली व्यवस्था असल्याचं दिसतंय. अनेपक्षित होतं मला!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लस्सीकरणं !!
जवळच्या हॉस्पिटलमधून, पैसे भरूनच लस घ्यायचं पक्कं ठरलं होतं.नवरोबा ६०+ असल्यानं त्याची नोंदणी सहज झाली. लसीकरणासाठी ६०+वाल्यांना कसलीही प्रमाणपत्र आवश्यक नाहीत.मी पुढच्या महिन्यात 'साठी' बुढढी नॉटी होते आहे.म्हणजे मला मे महिन्यात विनासायास लस घेता येईल.घाई करायची असेल तर, आरोग्यसेतूच्या साईटवरून प्रमाणपत्राचं फॉरमॅट डाउनलोड करून, माझ्या बॉर्डरलाईन मधुमेहाचं किंवा नसलेल्या रक्तदाबाचं सर्टिफिकेट माझी डॉक्टर मैत्रीण देणार होती. माझ्या व्होटर आयडीवर माझी जन्मतारीख, गलथान सरकारी कारभारामुळे दोन वर्ष आधीची चुकीची टाकलेली आहे. हुश्शार नवरोबाने याचा गैरफायदा घेऊन लसीकरणासाठी माझी नोंदणी व्होटर आयडीनं केली.माझ्या आईबाबांना सांगितलं की निवडणूक आयोगानं मला तुमच्या लग्नाच्या एक वर्ष आधीच जन्माला घातल्यानं मला मे महिन्याऐवजी मार्च महिन्यातच लस मिळेल.त्यांना हसावं कि रडावं कळेनासं झालं. खरंतर हा लांडा कारभार मला पसंत नव्हता.तिथं आधारकार्ड मागितलं असतं तर त्यावर माझी खरी जन्मतारीख होती. मला तिथून हाकलून लावतील अशी खात्री वाटत होती.नऊ वाजता लसीकरण सुरु होणार होतं, आमचा दुसरा आणि तिसरा नंबर होता.खासगी हॉस्पिटल असूनही बसण्याची व्यवस्था पार्किंगच्या जवळ शेडखाली यथातथाच होती. पावणे दहाला सर्व्हर डाऊन आहे असं समजलं.ऑनलाईन आयडी तपासणी करून मगच लस देण्यात येणार होती.दहाव्या नंबरावर असलेल्या गृहस्थानं २० च्या पुढच्या नंबरवाल्यांना छातीठोकपणे सांगितलं की,तुम्ही जा आणि दोन तासांनी या.तिथं प्रथमच आलेला असून त्याचा असीम आत्मविश्वास मला अचंबित करत होता.काहींनी निघून गेलेल्यांचा नंबर गेला तर काय अशी घाबरट विचारणा केली.आत्मविश्वासाच्या वादळात ती पाचोळ्यागत उडून गेली.दहा वाजून पाच मिनिटांनी आमची दिलेली माहिती तपासली.लस घेऊन आम्ही सव्वा दहाला बाहेर जाऊन पंधरा मिनिटं बसलो मग घरी आलो.आम्हाला दोघांनाही आज कसलाही त्रास होत नाहीये.
लसीपेक्षा व्होटर आयडीची नोंदणी जास्त टोचते आहे.
म्हणजे तू तुझ्या नवऱ्यापेक्षा
म्हणजे तू तुझ्या नवऱ्यापेक्षा मोठी आहेस, त्या एका कागदानुसार? का तरीही सगळं आलबेल आहे?
येऊ घातलेल्या दुसऱ्या बालपणाच्या शुभेच्छा
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
टोचणी
शेवटचं वाक्य मस्त !
व्होटर आयडीची माहिती बदलणे
लवकर होत नाही बहुतेक. आधारची अपडेट करणे सहज होते. त्याची बरीच केंद्रे आहेत.
व्होटर आयडी
व्होटर आयडी करताना नांवात, पत्त्यांत आणि अनेक तपशीलात इतक्या चुका करुन ठेवल्या आहेत. त्याहून वाईट म्हणजे त्यावेळेस आमचे जे फोटो त्यावर छापून आलेत ते सर्व मयत वाटतात.
अपडेट
पुढच्या निवडणुकांच्या अगोदर याद्या अद्ययावत करतील तेव्हा केंद्रावर जाऊन बदल करून घेण्याचे फॉर्म भरा.
आमचे फोटो फॉर्मसवर स्टेपल केले तिथेच. तेच काळे पांढरे करून आले. पण कम्प्रेस केले जातात तेव्हा फोटोचा जीव जातो. (आधारला जसे तिथे काढले जातात तसे नाही.)
स्वर्गात (असल्यास ) वोटर
स्वर्गात (असल्यास ) वोटर आयडीच मागत असतील ,कारण त्यावरील फोटो प्रवेश करताना जुळत असावा. पत्ता चुकीचा नसतो, यमाने(असल्यास)कुठून उचलावे त्या जागेचा असतो.
शंका
१. सगळे स्वर्गात(च) जातात, या गृहीतकास आधार काय?
२. उचलल्यानंतर पत्ता पाहून काय उपयोग?
दुसरीकडे वोटर आयडी बघायला वेळ
दुसरीकडे वोटर आयडी बघायला वेळ असतो कोणाला? तिकडे हॉपरने आत टाकतात.
त्याच जागेवरून उचलला आहे की नाही हे खात्री करायला पत्ता आणि यमाचे लास्ट लोकेशन मॅच केले जाते.
आमचे मित्र प्रवीण देशपांडे
आमचे मित्र प्रवीण देशपांडे लिहितात की :
प्रायव्हेट सरकारी हॅास्पिटल
तारीख ९ मार्च , वेळ १ दुपार , स्थळ पुणे
माझे ८० प्लस वडील आणि आई , ॲप वरून रजिस्टर करतात. अपॅाईंटमेंट मिळते १० मार्च सकाळ. दुकानाचे नाव - क्ष सुपरस्पेशालिटी हॅास्पिटल पुणे
तारीख १०मार्च , वेळ दुपारची , स्थळ - क्ष सुपरस्पेशालिटी हॅास्पिटल पुणे.
आई जाते लस घ्यायला. अलोट गर्दीचा दुसरा सप्ताह. आईला सांगतात की सकाळची लोकं अजून बसलीयेत. आज संध्याकाळी कींवा उद्या सकाळी १०:३० ला या.
तारीख ११ मार्च , वेळ १०:३० सकाळ , स्थळ - क्ष सुपरस्पेशालिटी हॅास्पिटल पुणे.
अलोट गर्दीचा मॅार्निंग शो. सगळी गर्दी हुच्च व मध्यमवर्गीय सुशिक्षित सुसंस्कृत सिनियर सिटीझन्सची. फाईव्हस्टार दुकान क्ष हॅास्पिटल. सगळेच सुसंस्कृत व उच्च व हुशार व सुखवस्तू असल्याने सगळेच साहजिकच महत्वाचे , त्यामुळे त्यांचा नंबर पण महत्वाचा ,ते बसलेली खुर्ची पण महत्वाची.
मग सगळे भांडत होते... हॅास्पिटलमधली डॅाक्टर म्हणाली सगळ्यांनी घरी जा , मी लसीकरण बंद करते !!
मग अजून भांडण ... मग सांगितलं की आमच्या हॅास्पिटलचा फॅार्म भरा. मग फॅार्म साठी पळापळ ... फॅार्म भरायला पेन नाही , पेन आहे तर टेबल नाही , दोन्ही आहे तर अनाउन्स केलं की सगळे फॅार्म घेणार नाही .. पहिले वीस आधी मग वीस मग पुढचे वीस...
मग परत खुर्ची मिळवण्यासाठी धडपड. सुपरस्पेशालिटी हॅास्पिटलच्या लॅाबीत सोशल डिस्टनस ३ इंच !! फॅार्मचे गोंधळ , नंबरचे गोंधळ , पैसे भरण्याचे गोंधळ ... तेजपुंज हुशार सिनियर सिटीझनसची हक्काची लढाई, न्यायासाठी आणि तत्वासाठी लढा.
शेवटी निर्णय घेतला की ह्या हॅास्पिटलला टाटा बाय बाय.
आई ला जवळच सरकारी हॅास्पिटल माहीती होतं . तिथे गेलो. रमाबाई भीमराव आंबेडकर रूग्णालय , साने गुरूजी नगर पुणे.
आईनी आत जाऊन चौकशी केली तर तिला बसायला सांगितलं कारण तिथे रिकामी खुर्ची होती! रजिस्ट्रेशन नंबर विचारला . आईला सांगतां आला नाही. मग बाबांच्या दोन्ही फोननंबर वरून चेक करून त्यांनीच शोधला. पाच मिनीटांनी आत नेलं , पाच सेकंदांनी लस टोचली. पुढचे अर्धा तास डॅाक्टरांच्या देखरेखीखाली बसायला सांगितलं , मुलाला बाहेर सांगायला जायची गरज नाही , फोन करा हवा तर पण अर्धातास इथे बसा .. अशी ताकीद दिली !
अर्ध्यातासांनंतर मुलाला बोलवा घेऊन जायला असा निरोप दिला. पाच मिनिट लस नोंदणीकरण , पाच सेकंद लसीकरण आणि अर्धा तास कंप्लसरी रेस्ट ... इतक्या वेळात घरी निघालो.....
क्ष सुपरस्पेशालिटीत सुपर सिनियर सुपर व्यवस्थेशी हक्कासाठी लढतच होते
म्हणून्
म्हणून आमची पार्टी, मुणशिपाल्टी !
पण मुन्शीपालटी इस्पितळात जाणे
प्रतिष्ठेला धक्कादायक नाही का? आणि हातातल्या सफरचंदालाही.
लस
आमच्या सोसायटीत साधारण साठेक कुटुंबं आहेत, बहुतेक ममव. सोसायटीची कमिटी सध्या नवीन निवडून आलेली आहे, सगळी तरुण मंडळी आहेत. त्यांनी सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय करायचं ठरवलं. मुलुंड पश्चिमेला असलेल्या जंबो कोविट सेंटरमध्ये जाऊन चौकशी करून आले (या केंद्रात आता लसीकरण होतं.) केंद्र चालकांनी गाडी आतपर्यंत न्यायला वगैरे परवानगी दिली. त्यामुळे एका मोठ्या गाडीत पाच जण एकत्र असे दहा जण लस घेऊन आले आहेत. ज्येष्ठ नागरिक मंडळी खूष आहेत, शिवाय घरच्यांना कोणाला जावं लागलं नाही त्यामुळे ती खूष. आणि आधी सांगून ठेवल्याने वेळही फार गेला नाही.
दुसरीकडे माझ्याकडे कामाला येणाऱ्या बाईला विचारलं की तुमच्या चाळीत।वस्तीत कोणी घेतली का लस, तर तिला लस म्हणजे काय इथपासून प्रश्न होते. काही वृत्तपत्रांमध्ये याविषयी बातम्या वाचल्या होत्या की लसीकरण वस्त्यांमध्ये पोचलेलं नाही. एक कारण अॅपची माहिती नसणं, रजिस्टर न करता येणं, असू शकेल. तिला मी आता मुद्दाम चौकशी करायला म्हटलं आहे. आणि वस्तीतल्या तरुणांना पुढाकार घ्यायला सुचवलं आहे. पाहू.
मुलुंड पूर्वेच्या पालिकेच्या सावरकर रुग्णालयात सकाळी जाऊन नंबर लावावा लागतो, राेज २०० टोकन देतात. त्यानुसार आपण जायचं, अशी अपेक्षा आहे. परंतु एक परिचित जाऊन आल्या तर त्यांनी तिथे खूप गर्दी असल्याचं सांगितलं. दुसऱ्या मजल्यावर लस देतात, तर सहाव्या मजल्यापर्यंत रांग आहे, वगैरे वगैरे. आणखी एका परिचितांनी १७ तारखेची वेळ घेतली आहे अॅपवरून, पाहू तेव्हा काय होतं. आमच्या अगदी घराजवळ लसीकरण केंद्र सुरू होणार, असंही ऐकलं आहे. ते झालं तर आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांची चांगली सोय होईल.
This too shall pass!
आज च लस घेतली
मुंबई मध्ये आजच लस घेतली .
Covaxin ही लस.
दुसरा डोस 28 दिवसानंतर.
पहिलीच oppointment घेतल्या मुळे जास्त वेळ गेला नाही.
खूप सुंदर व्यवस्था होती.
अगदी चहा,बिस्कीट,बिसलेरी पाणी इथ पर्यंत
नंतर कसलाच त्रास झाला नाही.
परवा, म्हणजे २२ मार्चला
परवा, म्हणजे २२ मार्चला माझ्या सुविद्य पत्नीने आम्हा दोघांची ऑनलाइन नोंदणी केली. आम्ही काल, २३ मार्चला गेलो. रापासून दोनेक किलोमीटर अंतरावर दळवी प्रसूतीगृह आहे. त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलचा एक भाग कोरोना लशीकरणासाठी ठेवला होता. सगळी व्यवस्था ठीकठाक होती. ऑनलाइन पण ६०च्या खालचे असलेल्यांच्या रांगेत साधारण विसावे होतो. या लायनीबरोबरच समांतर लायनीत वयस्क लोकांनाही सोडत होते.
साधारण पाउण तासांनी नंबर लागला. मात्र त्यांनी 'तुम्हाला कोमॉर्बिडिटी असल्याचं सर्टिफिकेट हवं' असं सांगितलं. बरं, ते डॉक्टरने नुसतं लिहून दिलेलं चालत नाही. विशिष्ट फॉर्म सहीशिक्क्यासह हवा. तो फॉर्म देता का विचारलं तर त्यांनी एका नोटीसबोर्डकडे बोट दाखवलं. तिथे एकुलता एक फॉर्म होता. त्याचा फोटो काढायचा, तो तंगडतोड करत झेरॉक्सवाल्याकडे न्यायचा, त्याचा प्रिंटआउट काढायचा आणि मग तो डॉक्टरांकडे घेऊन जाऊन सर्टिफिकेटवर सहशिक्के घ्यायचे. मग लस मिळणार.
हे जर रांगेत उभं असतानाच सांगितलं असतं तर आमचा बराच वेळ वाचला असता. ते फॉर्म उपलब्ध ठेवून कॉपीमागे पाच रुपये लावले असते तर साडेअकराच्या चांदण्यातला फेरफटका वाचला असता. सुदैवाने जवळच डॉक्टर सापडले, त्यांनी माझं प्रिस्क्रिप्शन पाहून लगेच सर्टिफिकेट दिलं. सुविद्य पत्नीला बऱ्याच काळापूर्वी रक्तदाबाचा त्रास होता, म्हणून तिने औषध विकत आणलं तेवढं पुरलं.
ही मधली तासभराची तकतक सोडली तर बाकी सगळं सुरळित झालं. लसपूर्व नोंदणी करणारीने लस घेताना फोटोही काढून दिला. (हॉस्पिटलच्या बाहेर जे लसपूर्व निर्धार करण्यासाठी लावले होते त्यात 'मी लस घेतानाचा फोटो सोशल मिडियावर टाकून व्हायरल करणार' हाही होता.)
अशा रीतीने घरून निघाल्यापासून तीनेक तासात परत घरी पोचलो. आता सहा ते आठ आठवड्यांनी पुन्हा एकदा.
सुविद्य
अनुभव रोचक आहे. कुठली लस मिळाली ? कोविशिल्ड की कोवॅक्सिन ?
स्वत: सुविद्य असताना फक्त पत्नीचाच उल्लेख सुविद्य असा का केला ते समजले नाही. समजा, पत्नी सुविद्य नसती तर तसा उल्लेख केला असता का ?
कोविशिल्ड.
कोविशिल्ड.
मी सुविद्य नाही, अतिविद्य आहे.
दळवी प्रसूतीगृह शिवाजीनगर?
दळवी प्रसूतीगृह, शिवाजीनगर-पुणे?
हो.
हो.
वय
वय ४५ असल्यास आता कोमोर्बिडिटी फॉर्म देणे आवश्यक नसेल (१ एप्रिल नंतर).
शिवाय महत्वाचा मुद्दा. वयाबाबत.
४५ वर्षे, ६० वर्षे ही वये खालीलनुसार पाहावीत:
१ जानेवारी २०२२ पर्यंत जे ४५ किंवा ६० वर्षे वय पूर्ण करतील ते लोक पात्र आहेत. (आणि अर्थातच आजरोजी ऑलरेडी ४५ आणि ६० पूर्ण झालेले लोक एलिजिबल आहेतच.)
जन्म जर ३१ डिसेंबर १९७६ च्या आधी झाला असेल आणि आत्ता ४४च वर्षे पूर्ण झाली असतील तरी पात्र.
।। अतिविद्या
अतिविनयेन शोभते ।।
तीर्थप्राशन: भाग एक
पहिला डोस काल मिळाला. आमच्या राज्यात (मु.पो. उसगाव वगैरे) वय वर्षं 16 च्या पुढे सर्वांना लसीकरण आता खुले झाले आहे. पहिल्याच दिवशी नोंद करून लस घेऊन आलो.
फार्मसी (मेडिकल स्टोअर) मध्ये लस मिळाली. पुढे दोन-तीन लोक होते. काही गंभीर आजार आहे का? करोना इंन्फेक्शन नुकतेच झाले होते का वगैरे स्टॅंडर्ड प्रश्न विचारले गेले. लस घेण्यास आलेल्या अन घेऊन झालेल्या अशा दोघांसाठी पुरेशी बसण्याची व्यवस्था होती. स्टोअर मध्ये असल्याने इतर ठिकाणी (जिथे दिवसाला हजारो लोकांना लसी मिळत आहेत) तशी फारशी गर्दी नव्हती.
मला लस द्यायला आलेल्या टेक्निशियनची ट्रेंनिंग सुरू होती. पहिला बकरा होणार का (म्हणजे या टेक्श्निशीयनने याआधी कोणाला इंजेक्शन दिलेले नाही) असे मला विचारण्यात आले. मी कबुली दर्शवल्यावर गोंदण समारंभ पार पडला. फायझर/बायोएनटेक कंपनीने बनविलेले व्हॅक्सिन मला देण्यात आले. पंधरा मिनीट काही रिअॅक्शन नाही हे पाहून मग मला परत जाण्याची परवानगी मिळाली.
चोविस तासानंतर इंजेक्शन टोचलल्या भागाजवळ किरकोळ दुखत आहे. थोडासा थकवा/मरगळ जाणवत आहे, पण त्याशिवाय काही विशेष इफेक्ट्स नाहीत. साधारण चार आठवड्यांनी दुसरे गोंदण मिळणार आहे.
-Nile
शुक्रवारची संध्याकाळ सोयीची
शुक्रवारची संध्याकाळ सोयीची झाली रे तुला!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
पहिली डेट
पहिली डेटच झालीए, तेव्हा अजून अंतर आहेच. जवळीक दुसर्या डेटनंतर!
-Nile
असले काहीतरी भंपक नियम पाळत
असले काहीतरी भंपक नियम पाळत जाऊ नकोस रे बाबा.
घोडं न्हालं
फायजर कंपनीचा नियमाप्रमाणे एकवीसाव्या दिवशी दुसरा डोस घेऊन झाला. सुरवातीला चार आठवड्यांनी बोलावले होते, पण सीडीसीनं फायजरचा डोस तीसर्या आठवड्यानंतरच द्यावा असे सांगितल्याने घेऊन टाकला. आता राज्याच्या बाहेर कुठेतरी जायचे(15 दिवसांनंतर) बेत आखायला हरकत नाही.
साधारण बारा तासांनंतर रिअॅक्शन आली. थंडीताप, अंगदुखी, डोकेदुखी. पॅरॅसिटमॉल घेऊन ताप गेला. पण अंगदुखी वगैरे दोन दिवस बर्यापैकी होती.
एकंदरीत तरूण लोकांना रिअॅक्शन जरा स्ट्रॉंग आहे असे दिसते आहे. तेव्हा ऐसीवरील वयोवृद्धांनी काळजी करण्याचे कारण नाही!
-Nile
(अवांतर)
यूएसएत Paracetamol (भारतातील सामान्यतः प्रचलित व्यापारी नाव: Crocin) ही संज्ञा अनाकलनीय आहे. त्याच औषधी द्रव्यास येथे Acetaminophen (येथील सामान्यतः प्रचलित व्यापारी नाव: Tylenol) या संज्ञेने संबोधले जाते.
(वस्तुतः, Paracetamol तथा Acetaminophen ही एकाच पदार्थाच्या एकाच लांबलचक रासायनिक नावाची, त्याच्या भिन्न भागांतून लचके तोडून केलेली, अनुक्रमे ब्रिटिश विश्व आणि यूएसए येथील वैद्यकीय/औषधी क्षेत्रांत प्रचलित असलेली लघुरूपे आहेत.)
आगाऊ धन्यवाद. (नाही म्हणजे, मी फायझरची लस घेतली नाही (मॉडर्नाची घेतली), त्यामुळे मला वस्तुतः टरफले उचलण्याचे कारण नाही; परंतु तरीही, आगाऊ धन्यवाद!)
(बादवे, मुलाने त्याच्या कँपसवर मागच्या महिनाअखेरीच्या सुमारास फायझरच्या लशीचा पहिला डोस घेतला. (येत्या आठवड्यात दुसरा डोस घेईल.) त्याला अद्याप तरी काही त्रास झाल्याचे ऐकिवात नाही. (मुलगा अठरा वर्षांचा आहे, बोले तो, त्याला 'तरुण' कॅटेगरीत गणण्यास (बहुधा) प्रत्यवाय नसावा. (चूभूद्याघ्या.)))
अर्थातच
1. हो, पण बहुसंख्य वाचकवर्ग भारतीय असल्याने भारतीयांना ज्ञात असलेली पॅरॅसीटमॉल संज्ञा वापरली.
2. मॉडर्ना आणि फायझर व्हॅक्सिन सारखेच आहे, तेव्हा साधारण सारखेच साईड इफेक्ट आहेत, 100% नसले तरी.
3. बरोबर आहे. वरील कमेंट दुसर्या डोसाबद्दल आहे. पहिल्याचा मलाही त्रास झाला नव्हताच.
असो. यु आर मोस्ट वेलकम आणि वयोवृद्धांबद्दल काळजी म्हणूनच उठाठेव. तरी तुम्ही फार काळजी करू नका पण काळजी घ्याच!
-Nile
लांबलचक नांव
Paracetamol तथा Acetaminophen ही एकाच पदार्थाच्या एकाच लांबलचक रासायनिक नावाची, त्याच्या भिन्न भागांतून लचके तोडून केलेली, अनुक्रमे ब्रिटिश विश्व आणि यूएसए येथील वैद्यकीय/औषधी क्षेत्रांत प्रचलित असलेली लघुरूपे आहेत.)
त्याचे लांबलचक नांव 4- Acetylamino Phenol किंवा Para acetylamino phenol असे आहे. त्याच्या प्रत्येक functional group ला संबोधायचे ठरवले तर अजूनही मोठी मालगाडी तयार करता येईल!
सकाळी लस घेतली. अंगदुखी कसकस
सकाळी कोविशिल्ड लस घेतली. अंगदुखी कसकस थंडी वाजून येणे असा रात्री त्रास झाला
प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
आज कॉविन app वर सहज चक्कर
आज कॉविन app वर सहज चक्कर मारली तर माझ्या दुसऱ्या डोस ची अपॉइंटमेंट बरोबर पहिल्या डोस नंतर 28 दिवसांनी आपोआप झाल्याचे कळले ( अपॉइंटमेंट बदलायची असेल तर रिशेड्युल करण्याचा पर्यायही दिलेला आहे)
मी घेणारे 31 तारखेला. दुसरा डोस.
( I would rather have a good protection on 15th April than on 15th of May)
लस घेतली
मी पण लस घेतली. २० मार्च ला.मुंबई मध्ये.
सुंदर आयोजन होते कुठे च गर्दी नाही.
Covaxin ही लस होती.लस घेतल्या नंतर ३० मिनिट देखरेखी खाली ठेवले जाते.तिथे चहा,बिस्कीट,पाण्याची बॉटल सर्व सोय होती.
काही जास्त त्रास झाला नाही .थोडासा ताप दोन दिवस होता.
इथे ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी कोणती लस घेतली ह्याचा उल्लेख केलेला नाही.
तसा तो करावा म्हणजे प्रतेक लसी ची माहिती मिळत जाईल.
मला कॉव्हीशिल्ड मिळाली.
मला कॉव्हीशिल्ड मिळाली.
फायझर प्रथम डोस
त्रास शून्य!पण आता मात्र थकवा जाणवतोय. फटीग!!असे ऐकलेले आहे की दुसऱ्या डोसला त्रास होउ शकतो. लवकरच कळेल.
लसीकरण अनुभव २ :
लसीकरण अनुभव २ :
आज पत्नीचा पहिला डोस होता . स्थळ बिंदुमाधव ठाकरे मनपा दवाखाना.
सव्वानऊ ला गेलो नंबर लावायला तर दोन सज्जन वृद्ध गृहस्थ श्री खांडेकर आणि श्री साने हे स्वच्छेने सर्व को ओर्डीनेट करत होते. (कुठल्याही पक्ष किंवा सामाजिक/सांस्कृतिक संघटनेचे आम्ही नाही लोकांना मदत व्हावी म्हणून हे करत आहोत हे त्यांनी स्पष्ट सांगितले. ) . खुर्च्या मांडल्या होत्या .एकाडएक खुर्चीवर लोकांना बसवत होते. साडेनऊ वाजता मनपा कर्मचारी आल्या . लोकांना टोकन देण्यात आले. दहा दहाच्या बॅचेस मध्ये वरच्या मजल्यावर नेऊन लसीकरण करत होते.
एक भावे नावाचे आजोंबा ज्यांचे रजिस्ट्रेशन नाही त्यांना cowin app वर रजिस्टर करून देत होते. हे तीन ज्येष्ठ नागरिक स्वेच्छेने हे काम करत असल्याने लसीकरण खूप सुलभ चालले आहे. एकदोन आजोबा घुसण्याचा प्रयत्न करून गेले पण यांनी त्यांना रांगेत बसायला लावले.
या तीन ज्येष्ठ नागरिकांचे हे कार्य खरोखर प्रशंसनीय वाटले.
एकच गोंधळ होता . दुसऱ्या डोस करिता एक गृहस्थ आले ,( त्यांनी पहिला डोस २ मार्च ला घेतला होता ) त्यांच्याजवळ अपॉइंटमेंट स्लिप पण होती . त्यांना तुम्ही ४५ दिवसांनी घ्यायला पाहिजे असे मनपा कर्मचाऱ्याने सांगून परत पाठवले . या एकाच बाबतीत गोंधळ दिसला . ( माझ्या मित्राने आज चेन्नई मध्ये दुसरा डोस घेतला )
गंगेत घोडं
गेल्या शनिवारी हार्टफोर्ड न्यु यॉर्कच्या राईट एड मध्ये कशीबशी मी अपॉइन्टमेन्ट मिळवली होती. पण ऐन वेळी शंका आली म्हणुन त्यांना फोन करुन कळवले की - मी न्यु जर्सीची रहिवासी आहे. त्यांनी लगेच सांगीतले की नाही त्यांच्याकडे फक्त त्यांच्या राज्याच्या म्हणजे न्यु यॉर्कच्या लोकांनाच लस देणार. म्हणजे अमेरिकन सिटीझन्स् (युनायटेड स्टेटस वगैरे) पडले बाजूला राज्याराज्यात वेगवेगळे नियम. नवऱ्याला कशी न्यु यॉर्कातच लस मिळाली देवच जाणे. त्यांनी त्याला फोटो आयडी मागीतला होता ज्यावर न्यु जर्सीचा पत्ता आहे. पण त्याला मिळाली. माझी नाकारली गेली.
आता परत माझ्याचह राज्यात या शनिवारी अपॉइन्ट्मेन्ट घेतली आहे. गंगेत घोडं न्हाउ देत एकदाचं.
__________
मीनव्हाईल, गेल्याच्या गेल्या शुक्रवारी रसेल पीटरचा स्टँड अप कॉमेडी शो पेनसिल्व्हेनियात, अगदी पहील्या रांगेतून, बघुन आलो. आजूबाजूला कोणीही मास्क घातलेले नव्हते. लोक खात पीत, खिदळत, होते. नंतरचे २ आठवडे जे की या गुड फ्रायडेला पूर्ण होतील, भीतीयुक्त वाट बघण्यात दिवस गेले आहेत - झाला का कोव्हीड- झाला का कोरोना. तीघांपैकी कोणालाही झाला नाही ते नशीब. पण परत कोणत्याही सार्वजनिक समारंभांना, शोज ना जायचे नाही असे ठरविले आहे.
अरेरे
https://apnews.com/article/can-i-take-painkillers-before-after-covid-19-...
मला ही लिंक मिळाली. अबापट प्लीज वाचा आणि सांगा.
बऱ्याच लोकांनी क्रोसिन घेतले होते. गयी भैस पानीमे. सरकारचा पैसा पाण्यात गेला. वाचून वाईट वाटले.
आभार , हे इथे सोडून इतर कुठे
आभार , हे इथे सोडून इतर कुठे वाचनात नाही. अजून संदर्भ बघेन , तुम्हालाही मिळाले तर द्या.
हे कुठले पोर्टल आहे ?
मला क्रोसीन घेतल्याने नक्की वाईट काय झाले हे कळले नाही. कृपया सांगाल का ?
पोर्टल!
असोसिएटेड प्रेस. ही नॉन-प्रॉफिट न्यूज एजन्सी आहे. अतिशय प्रतिष्ठित. (५४ पुलित्झर पुरस्कार वगैरे) अधिक माहिती इथे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाबो,
बाबो,
मोठे लोक म्हणजे .
तरीही माझे उरलेले प्रश्न राहतातच.
नंतर, गरजेपुरती
का? बातमीत सीडीसीचा हवाला देऊन स्पष्टपणे म्हटलं आहे की शक्यतो लशीआधी घेऊ नका, चालूच असली तर घ्या आणि नंतर लागली तरी घ्या, वगैरे. थोडक्यात, नंतर पॅरॅसिटॅमॉल घेण्यात विशेष अडचण नाहीच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हीच बातमी मीही वाचली होती.
पण नंतर लिंक सापडेना.
हे असे परस्पर विरोधी निष्कर्ष च लोकांना वेडे करत आहेत
सायन्स चा खेळ मांडला आहे.प्रसिध्दी ला आणि संपत्ती ला हावरे संशोधक अर्धवट अभ्यासावर निष्कर्ष काढून एकच विषयाबाबत परस्पर विरोधी मत व्यक्त करत आहेत.
पाहिले जे संशोधक होते ते हाडाचे संशोधक होते आताचे बाजारू आहेत.
सबसे तेज न्यूज चॅनेल वाले कसे अर्धवट चुकीच्या बातम्या सर्वात अगोदर देतात आणि त्या साठी न्यूज चॅनल मध्ये स्पर्धा लागलेली असते .
तसेच आज चे संशोधक आहेत
सब से तेज अर्धवट अभ्यासावर निष्कर्ष.
फायझर पहीला डोस
आज फायझरचा प्रथम डोस घेउन आले. तूफान लोकं आली होती पण इतकं व्यवस्थित स्ट्रीमलाइन्ड, शिस्तबद्ध नियोजन होतं. पहील्यांदा आत सोडताना कन्फर्मेशन इमेल चेक केली. आतमध्ये एकंदरीत २५०-३०० तरी लोक सोशल डिस्टन्स पाळत लाइनीत चालत होते. मिलिट्रीचे लोक त्यांचे फोटो आयडीज, इन्श्युरन्स आय डी तपासून त्यांना पुढे सरकायला सांगत होते. असे १० तरी अधिकारी होते. त्यामुळे चटचट १० -१० लोकांचे एकाच वेळी उरकत होते. पुढे २५ तरी 'लसीकरण बूथ' होते जिथे मिलिटरी स्टाफचा प्रत्येकी एक जवान तैनात होता. यात मला स्त्रिया दिसल्या नाहीत. काय की! तिथे प्रि-एग्झिस्टींग कंडिशन्स विचारुन मग लस टोचत होते. मिलिटरीचा स्टाफ प्रचंड कर्टिअस आणि ॲप्रोचेबल होता. लस टोचल्यानंतर वेटिंग एरिया होता. तिथे ३-४ नर्सेस फिरते मॉनिटर्स घेउन फिरत होत्या. तुम्ही एक तर फोनवरती दुसरा डोस रजिस्टर करु शकत होता किंवा या नर्सशी बोलून रजिस्टर करता येत होता. नंतर मग जाउ शकत होता.
आता जवळजवळ २४ तास होत आले.
कणभरही त्रास झाला नाही.पण आता मात्र थकवा जाणवतोय. फटीग!!५ दिवस झाले लस घेउन - आज दुपारी अचानक खूप नॉशिआ आला. ५ मिनिटे बेचैन वाटले. मग गेला.
मीही काल लस घेण्यासाठी नोंदणी
मीही काल लस घेण्यासाठी नोंदणी केली होती, पण ऐन वेळी रद्द केले. एक कारण पुण्यात लॉक डाऊन होणार असेल तर सध्या दोन आठवडे बाहेर पडावं लागणार नाही, त्यामुळे पुण्यात सध्याच्या वाढलेल्या करोणा परिस्थितीत नको, थोड्या दिवसांनी घेऊ असा विचार केला.
येत्या पंधरा दिवसांत दोघाही मुलांच्या महत्त्वाच्या प्रवेश चाचण्या आहेत. त्यामुळे करोना जाऊन विकत आणू नये असे उलट सुलट चर्चेअंती ठरवले. नुकतीच डॉकटर झालेली माझी लेक यापासून परावृत्त करू शकली नाही.
आता एपरिल २९ दरम्यान पहिला डोस घेईन...
कोवॅक्सिन साईट
मी इथे सातत्याने या साईटविषयी निरिक्षणे लिहितो. ते निव्वळ टीका करण्यासाठी नाही. इतरांना माहिती व्हावी म्हणून. दुसऱ्या डोससाठी आम्ही ९ एप्रिलची डेट घेतली होती. ती त्याच हॉस्पिटलमधे पुढच्या तारखेला मिळावी म्हणून प्रयत्नांत होतो. आज अचानक मला पहिल्या डोसनंतर ४५ दिवसांची तारीख मिळाली. या साईटवर पिनकोड टाकून जी माहिती येते ती, राज्य व जिल्हा टाकून येतेच असं नाही. आमच्या पहिल्या डोसचे हॉस्पिटल म्युनसिपल लिस्ट मध्ये असले तरी या साईटवर दिसतच नाही. या अडचणी इतरांना येतात का ?
हो. त्यात काहीच कन्सिस्टन्सी
हो. त्यात काहीच कन्सिस्टन्सी नसते. माझ्या आईची ॲपॉइंटमेंट घेतली तेव्हा संजीवन हॉस्पिटल,एरंडवन यांचे नाव आले. तिथे आईसाठी बुकिंग केले. त्यावेळी ऐशी उपलब्ध दाखवत होते. नंतर लगेच माझ्यासाठी बुकिंग केले तेव्हा तोच पिनकोड टाकला तरी संजीवनचे नाव आलेच नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हो, त्याच पिनकोडला मला
हो, त्याच पिनकोडला मला दीनदयाळ रुग्णालय दाखवते आहे, जे थोडे दूर पडते. मला दीनानाथ ला घ्यायची आहे.
शिवाय त्या परिसरातल्या सगळ्या केंद्राची माहिती येत नाही.
भाऊ ,
भाऊ ,
अनेक ठिकाणी फक्त रजिस्ट्रेशन असेल आणि सकाळी रांगेत जायची तयारी असेल अपॉइंटमेंट नसताना देखील तर सहजतेने लस मिळत आहे. किमान आजपर्यंत तरी. कुठल्या भागात राहता तुम्ही ? माहिती सांगतो . आमच्या जवळच्या किमान दोन केंद्रात तरी सकाळी अकरा वाजल्यानंतर लस आहे पण घेणारे तुरळक अशी परिस्थिती आहे .
एवढे प्लॅनिंग करू नका. दीनानाथला सगळे ममव गर्दी करत असल्याने मनपा दवाखाने , जे उत्तम सेवा देत आहेत, तिथे मोकळे आहे बऱ्यापैकी. जवळच्या लसीकरण केंद्रात जा आणि घेऊन टाका . साईट वरून पिनकोड वगैरे लांबचा वळसा घालू नका.
धन्यवाद.
धन्यवाद.
म्हणजे आधार कार्ड घेऊन थेट दाखल झाले तरीही नोंदणी फॉलोड बाय लसीकरण होते?
असं असेल तर बेश्ट.
कॉविन/आरोग्य सेतू वर
कॉविन/आरोग्य सेतू वर रजिस्ट्रेशन कम्पलसरी असते.
आमच्या जवळच्या मनपा दवाखान्यात तर तीन आजोबा लोकांना मदत करायला सकाळी येऊन बसतात.
स्वेच्छेने. ज्यांचे रजिस्ट्रेशन नव्हते त्यांना ते मोबाईल वर करून देत होते.
कुठल्या भागात राहता हे सांगत नाहियात त्यामुळे अजून जास्त माहिती सांगता येत नाहीये.
तेच ते..एरंड वन.
तेच ते..एरंड वन.
काल कोविशील्ड लशीचा पहिला डोस
काल कोविशील्ड लशीचा पहिला डोस घेतला. दिवसभर काही त्रास झाला नाही पण रात्री ताप आला. आणि आज सकाळपासून अंगदुखी सुरू झाली. पॅरासिटॅमॉल घेऊन ताप उतरला आहे. पण अंगदुखी अजून आहे.
लसीकरणासाठी ॲपॉइंटमेंट घेतली होती परंतु केंद्रावर गेल्यावर ॲपॉइंटमेंटचा काही उपयोग नाही आणि सर्वांनी कॉमन लाइन मध्ये बसायचे अशी व्यवस्था होती. साधारण ५० लोक होते. एकूण दीड तास लस घेईपर्यंत आणि पुढे अर्धा तास बसून राहण्यासाठी असे दोन तास गेले.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
...
या महिन्यापासून जॉर्जिया सरकारने लशी जॉर्जियाच्या १६ वर्षांहून मोठ्या तमाम रहिवाश्यांकरिता तत्त्वत: खुल्या केल्या आहेत. (१८ वर्षांहून मोठ्यांकरिता कोठलीही लस; १६ ते १८ वयोगटातल्यांकरिता फक्त फायझरची लस.) यापूर्वी या लशी फक्त ठराविक (अत्यावश्यक) कॅटेगरीतील लोकांकरिता उपलब्ध होत्या.
मात्र, लशी तत्त्वत: खुल्या झालेल्या असल्या, तरीही, बाजारात पुरवठा अत्यल्प असल्याकारणाने, बहुतांश ठिकाणी उपलब्ध नसतात (औट-ऑफ-ष्टाक असतात). ष्टाकमध्ये आल्यावरच अपॉइंटमेंटा दिल्या जातात, असे दिसते.
लशी खुल्या झाल्याची घोषणा झाल्यावर बायकोने त्वरित बरीच शोधाशोध करून स्वत:करिता अपॉइंटमेंट मिळविली. (मी थोडा व्यग्र असल्याकारणाने, 'बघू, कामातून थोडी सवड झाली, की एकदोन दिवसांत घेऊ'च्या मूडमध्ये होतो.) कालची अपॉइंटमेंट मिळाली, २५ मैल दूरच्या वालमार्टात. काल जाऊन आलो. सकाळीसकाळी ढोसून घेतले आहे. (मॉडर्नाची लस.) संध्याकाळी हात थोडासा दुखतो म्हणत होती. बाकी ठीक. दुसऱ्या डोसची अपॉइंटमेंट मेमध्ये दिली आहे.
हे झाल्यावर मग मीही स्वत:करिता थोडी शोधाशोध केली, आणि अपॉइंटमेंट घेतली. पहिला डोस पुढल्या आठवड्यात, दुसरा मेमध्ये. घराजवळच्या ग्रोसरी ष्टोरात. (१ मैल.) लस बहुधा मॉडर्नाचीच, परंतु खात्री करून घ्यावी लागेल.
पाहू या कसे होत जाते ते.
माॅडर्ना लशीस
आगाऊ शुभेच्छा
आमच्याकडे काही आठवडे झाले,
आमच्याकडे काही आठवडे झाले, टेक्सासात. आम्हांला दोघांनाही शोधाशोध करण्याचा फार अनुभव नाही; आणि भारतीय स्थानिकांशी खूप संपर्क नाही. त्यामुळे सध्या कोरडेच आहोत. दोघांनी एकाच वेळेस लस घेण्याचं टाळणार आहोत. साईड इफेक्टस फार असतील तर दोघंही आडवे झालो तर तिर्री सरकारची सेवा कशी होणार?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
#१
दोन तासांपूर्वी (मॉडर्नाचा) पहिला डोस घेतला. अद्याप सर्व ठीक. पुढचा डोस मेमध्ये.
+१
मी फायझरचा पहिला घेतला, तुमच्या नंतर एखाद तासात. शुक्रवारी बातमी मिळाली की साठा आहे, म्हणून अपॉइंटमेंट घेतली.
संध्याकाळी खांदा थोडा दुखायला लागला होता. सकाळी जिमात जाऊन मारामारी करून आले, तेवढ्यापुरतं बरं वाटलं. (किंवा बाकीचे स्नायूसुद्धा दुखायला लागलेच). आज पुन्हा थोडं दुखतंय. अगदी बागेत खड्डे खणायला जाणार नाही, पण रोजच्या बाकी कुठल्याच गोष्टी करताना त्रास होत नाहीये.
पण, पण, पण. सतत किती दुखतंय याकडे लक्ष आहे. त्यामुळे जिममधून घरी येताना किल्ली विसरले, ते घरी आल्यावर समजलं. मग परत एक फेरी. नंतर काम करताना सतत तिकडे लक्ष जातंय आणि आणखी चुका करत्ये. आजचा दिवस नवा काही कोड लिहिणं धोकादायक आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
...
ढोसल्या ठिकाणी आज (एका दिवसानंतर) किञ्चित दुखल्यासारखे वाटते आहे. परंतु, नथिंग डेबिलिटेटिंग; पूर्णत्वेकरून दुर्लक्षणीय.
बाकी ठीक.
बायको, #२
(स्वल्पविरामाची कृपया नोंद घ्यावी. आगाऊ आभार.)
काल सकाळीसकाळी बायको जाऊन मॉडर्नाचा दुसरा डोस घेऊन आली. दिवसभर काही त्रास झाला नाही. नंतर संध्याकाळी पोराला उचलायला म्हणून बाहेरगावी गेलो त्याकरिता अडीच तास ड्रायव्हिंगसुद्धा केलेनीत. तोपर्यंत सर्व ठीक होते. रात्री तेथेच हॉटेलात मुक्काम ठोकला. रात्री उशिरापासून मात्र एकाच बाजूचे हातपाय सणकून दुखू लागले आहेत म्हणते. बघू. होपफुली आज रात्रीपर्यंत ठीक व्हावे.
मला माझा (मॉडर्नाचाच) दुसरा डोस ढोसवून घ्यायला पुढच्या आठवड्यात जायचे आहे. मंगळवारी. पाहू या कसे होते ते.
स्वल्पविराम पावला. धन्यवाद.
मलाही दुसऱ्या दिवशी बारीक ताप, डोकेदुखी, कणकण असा त्रास झाला. तिसऱ्या दिवशी सकाळी बरी होते, पण वाकून मान खाली घालायची तयारी नव्हती. तिर्रीला खायला घालण्यासाठी पूर्ण खाली बसले, मान सरळ ठेवूनच काय ते काम केलं. चौथ्या दिवशी बागेत खड्डे खणण्याइतपत प्रगती झाली होती.
बऱ्या अर्ध्याचा दुसरा डोस येत्या शुक्रवारी आहे. शनिवारी मलाच भांडी घासावी लागणार, अशी मनाची तयारी केली आहे.
या सगळ्या आजाराचं कारण माहीत असल्यामुळे, आणि आजार अपेक्षित असल्यामुळे Near Death Experience आल्यासारखं वाटलं नाही. त्यामुळे विशेष काही तत्त्वज्ञानही सुचलं नाही. सुटलात तुम्ही सगळेच!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मी, #२
नुकताच माझा दुसरा शॉट घेऊन आलो.
अब तुम्हारे हवाले वतन साथियों...
नका हो
नका हो, असं निरवानिरवीचं बोलू! आज बुधवारही नाही, मंगळवार आहे. आणखी साडेतीन दिवस बाकी आहेत आठवड्याचे!!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
नाही, ते Near-Death
नाही, ते Near-Death Experience, तज्जन्य (निर्वाणीचे) तत्त्वज्ञान, वगैरेंची एक चुणूक दाखविली, इतकेच. म्हटले, आपलाही हात या कलेत अजमावून पाहावा.
असो. दुसरा शॉट घेतल्याच्या दिवशी काहीही झाले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र अंग सणकून दुखत होते. आज (तिसऱ्या दिवशी) पुनश्च सर्व ठीक आहे.
:ड
मला माफ करा 'न'बा, कां की मी तो प्रतिसाद तळटिपांशिवाय लिहिला!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लस घेतली
बरीच शोधाशोध करुन अखेरीस अपॉईंटमेंट मिळाली. घरापासून बरीच लांब. अपॉईंटमेंट घेऊनही रांगेत तासभर उभा होतो. फायजरच्या लशीचा पहिला डोस घेतला. पहिल्या दिवशी हात थोडासा दुखला. दुसऱ्या दिवशी प्रचंड थकवा आला. अंग गळून गेल्यासारखे वाटले.
बायकोने लस घेतली. तिला दुसऱ्या दिवशी अर्धशिशीसारखा त्रास झाला.
आता दोन दिवसांनंतर ठीक वाटते आहे. दुसरी अपॉईंटमेंट एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात.
---
लशीच्या माहितीपत्रकात - ही अप्रूवड लस नाही. याने कोविडचा प्रतिबंध होईलच याची शक्यता नाही वगैरे बरीच माहीती आहे. हे सगळं खरं असेल तर हे लशीचे थोतांड कशासाठी हा प्रश्न पडला ब्वॉ.
वाचाल तर वाचाल
लशीमुळे कोव्हिड झाला तरी हॉस्पिटलात जाण्याची पाळी यावी एवढा आजार होणार नाही; कोव्हिडमुळे मरणाची शक्यता शून्य(वत). त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर सध्या जो काही अभूतपूर्व ताण येत आहे, किंवा येण्याची शक्यता आहे, ती खूप कमी होईल.
कोव्हिड लसींची परिणामकारकता - डॉ. प्रमोद चाफळकर
लसविषयक शंकानिरसन आणि चर्चा
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
काल आईला (वय ८६-८७) लस दिली.
काल आईला (वय ८६-८७) लस दिली. तिला ताप आला नाही. फक्त अंगदुखी आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
काल पत्नीनेही लस घेतली (पहिला
काल पत्नीनेही लस घेतली (पहिला डोस). तिलाही ताप आला नाही. आज अंगदुखी आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
जॉह्न्सन & जॉह्न्सन वर
जॉह्न्सन & जॉह्न्सन वर अमेरीकेत तात्पुरती का होइना, बंदी आणलेली आहे. ७ मिलिअन लोकांमध्ये ६ केसेसमध्ये रक्ताच्या गुठळ्या आढळल्या. म्हणजे १ मिलिअन मागे १ सुद्धा नाही. पण सर्व स्त्रिया होत्या व १८-४८ वयाच्या होत्या. ३ आठवड्यांपर्यंत लसवंत लोकांना स्वत:कडे लक्ष ठेवायला सांगीतले आहे.
मुलीने गेल्याच आठवड्यात घेतली. टेन्शन!!!
https://www.cnn.com/2021/04/13/health/johnson-vaccine-pause-cdc-fda/inde...
मिलियनमध्ये एक हे टेन्शन
मिलियनमध्ये एक हे टेन्शन घेण्याचं कारण नाही. आपण कार चालवताना प्रत्येक राइडला साधारण इतकाच धोका असतो. म्हणून आपण कोणी कारमध्ये बसल्यावर टेन्शन घेत नाही.
धन्यवाद राघा, दुसऱ्या दिवशी
धन्यवाद राघा, दुसऱ्या दिवशी तिचे डोके दुखले. पोट दुखले. पण आता बरी आहे.
काही नाही केले तरी
निसर्ग नियमानुसार काही महिन्यात व्हायरस त्रास दायक न राहता friendly होईल आणि साथ निघून जाईल.
जगात असेच घडतं आले आहे आता पर्यंत तोच सर्वोच्च निसर्ग नियम आहे.
आणि लसी त्याचे श्रेय घेतील जसे प्लेग विषाणू विषयी घेतले.
लसीकरण चालू झाल्या नंतर च संसर्ग वाढीस लागला हे अनुभव आहेत.
इस्त्रायल चे संशोधन तेच सांगत आहे ज्यांनी लस घेतली त्यांनाच आफ्रिका मधील नवीन strain जास्त संसर्ग करत आहे.
पोलियो, देवी वगैरे भीषण रोग
पोलियो, देवी वगैरे भीषण रोग शतकानुशतकं होते. नेमके विसाव्या शतकाच्या शेवटी गेले आणि त्यामुळे जागतिक लशीकरणाच्या प्रयत्नांना श्रेय मिळालं!
आज पहिला डोस घेतल्यानंतर ४६
आज पहिला डोस घेतल्यानंतर ४६ वा दिवस म्हणून दुसरा डोस घ्यायला गेलो.
तीच जागा , बिंदुमाधव ठाकरे दवाखाना , कोथरूड पुणे.
लसीकरण साधारण दहा साडेदहाला सुरु होतं या अंदाजाने सकाळी नऊ वाजता गेलो.
प्रचंड गर्दी , टेबलावर एक कागद ठेवलेला होता त्यावर रांगेतून जाऊन लोकं नाव व आधारकार्ड नंबर लिहीत होते.
मीही लिहिले, माझा नंबर १३० थोडा वेळ थांबलो , अजून खूप गर्दी वाढली.
सध्याची पुण्यातील परिस्थिती बघता विचार केला की
लसीकरण होईल कदाचित , पण या गर्दीत इन्फेक्शनही होईल अशी शक्यता जास्त . सरळ परत आलो.
आता दररोज जाऊन बघणार.
तुम्हाला असंच पाहिजे.
किमान आता इतरांना कमी त्रास द्याल तुम्ही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
,२८, दिवसानंतर
२८, दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल असे सर्वच सांगत होते.मी २०, मार्च ल पहिला डोस घेतला तेव्हा तेथील Dr नी पण हेच सांगितले २८ दिवसांनी यावं लागेल दुसऱ्या डोस साठी आता हे ४६ दिवस कोठून आले.
लय गोंधळ आहे बुवा
सांभाळा
आता दररोज जाऊन बघणार.
जितके दिवस रोज त्या अर्धमास्क लोकांत जाल, तेवढा धोका जास्त.
पुण्यात साधारण लशीचा स्टॉक आल्यापासून तीन दिवसांतच त्याचा फडशा पडतो आहे. पूर्वी गिरगांवात कसं, पहाटे पाणी आलं की एकच धावपळ उडायची, तसं चाललं आहे.
गिरगाव मध्ये सकाळी पाणी
गिरगाव मध्ये सकाळी पाणी आले की झुंबड उडते.
उपमा आवडली दृश्य समोर दिसले.
चाळीत असताना सकाळी संडास समोर डब्बा संडास च्या लाईन मध्ये लावला नाही तर कसे उभ्या उभ्या योगासन करायला लागतात तशी योगासन करावी लागतील .
त्या मुळे पहिला नंबर पाहिजे.हवं तर रात्रीच जावून बसा तिथे.
आगाऊ
आगाऊ नोंदणी केली नसली तरी लसीकरणासाठी घेतात का?
आधार कार्ड कम्पल्सरी आहे का?
नाही. नोंदणी हवीच.
नाही. नोंदणी हवीच.
आधारच हवे असे नाही, पण ते नसेल तर पॅनकार्ड किंवा पासपोर्ट प्रत वगैरे सरकारी ओळखपत्र लागेल.
धन्यवाद
धन्यवाद
वाचा
वाचाल तर वाचाल.
गेला महिनाभर या ४६ -६० दिवसांच्या गॅपबद्दल लिहून येत आहे. जितकी कोविशिल्डच्या दोन डोसेस मधली गॅप जास्त, तितकी त्याची एफिकसी जास्त, अशा स्वरुपाचा रिसर्च झाला आहे, त्यानुसार सरकारने गाईडलाईन्सही जाहीर केल्या आहेत.
एक अनुभव
शेवटी आज पुण्यातल्या अतिउच्च नागरिकांच्या भागातल्या हॉस्पिटलमध्ये कोविशिल्डचा दुसरा डोस मिळाला. त्यावेळची रोचक निरीक्षणे.
१. आगाऊ अपॉइंटमेंटला काही किंमत नव्हती. सर्वांना रांगेने बसून घेण्यास सांगत होते. त्यांतही सुविद्य लोकच घुसायला पहात होते. टोकन देण्याची पद्धतच नव्हती, जी म्युनसिपल दवाखान्यांमध्ये वापरतात.
२. एक तेवीस लोकांचा अतिउच्चभ्रू ग्रुप अचानक आला व मधे घुसू लागला. लोकांनी विरोध करताच त्यांनी माघार घेतली, पण आमच्या मधेच उभे राहून सगळे मोठ्याने हास्यविनोद करु लागले आणि सोशल डिस्टन्सिंगचा बोऱ्या वाजला.
३. त्यांच्याविरुद्ध आवाज लावणाऱ्यांची कुचेष्टा होतीच.
४. कंप्युटरवर नोंद करणारा इसम चक्क,हातानेच स्वत:चा डोळा खाजवत होता. त्याच्या जवळपासही कुठे सॅनिटायझर दिसला नाही.
५. टोचून घेतलेल्या लोकांना बसण्याचे काहीच व्यवस्था नसल्याने सगळे घरी निघून जात होते.
लस घेतलेल्यांचे ओळखिच्यांचे अनुभव
म्हणजे इतरांना 'घेतली का?' विचारून नाही म्हटल्यावर बौद्धिक घेतात उगाचच.
अत्यावश्यक केल्यावर बघू म्हणतो.
-------------------------------
एक प्रश्न - लस घेतल्याची नोंद कुठेकुठे होते? - फोन क्रमांक ? /आधार नंबर? / आरोग्यसेतू app ?
लस घेण्यासाठी आधार नंबर विचारतात, फोन विचारतात आणि मेसेज येतो. आधारच्या डेटामध्ये हे अंतर्भूत होते का?
---------
प्रश्न या लेखात विचारला आहे पण योग्य ठिकाणी पाठवला तर बरं.
दुसरा डोस घेण्यासाठी पहिला
दुसरा डोस घेण्यासाठी पहिला डोस ज्या जागी घेतला होता , म्हणजे बिंदुमाधव ठाकरे मनपा दवाखाना इथे दोन दिवस चक्कर मारली. दीडशे ते दोनशे लोकं तिथे बघून परत फिरलो ( या पूर्वी या सेंटर ला ३१ मार्चला गेलो होतो , तेव्हा अजिबात गर्दी नव्हती. )
ऑनलाईन अपॉइंटमेंट मिळाली .सुबुध हॉस्पिटल कोथरूड.
नऊ वाजता जाऊन बसलो. माझ्या आधी २०-३० माणसे आली होती. लसीकरण करणाऱ्या व्यवस्थेतील कुणीही नव्हते . दहाच्या सुमाराला एक तरुण टोकन वाटून गेला.
त्यानंतर कौंटर वर दोन तरुण आले. त्यांनी जाहीर केले की फक्त अपॉइंटमेंट असलेल्यानाच लस देण्यात येईल. आणि एकदम गदारोळ झाला. लोकांनी वॉक इन चालेल असं गृहीत धरलं होतं. ती लोकं नाराज झाली , आरडा ओरडा , वाद असे झाले, पण हळू हळू लोकं पांगली. कॉउंटरवरचा माणूस सांगत होता की आज १०० डोस येणार आहेत १०० लोकांनी अपॉइंटमेंट घेतली आहे. या इतरांना कुठून देऊ लस ? आणि मग अपॉइंटमेंट असल्यानं कशी देणार.
सगळ्यांचंच बरोबर वाटत होत .
इथे कॉउंटरवर नाव फोन नम्बर ,आधार कार्ड नंबर हे सर्व रजिस्टर मध्ये हाताने लिहून घेत होते. ( सरकारी दवाखान्यात आधार नंबर सिस्टीम मध्ये टाकला कि आपोआप व्हेरिफिकेशन होते , इथे मॅन्युअल असल्याने जास्त वेळ लागत होता )
व्हेरिफिकेशन सुरु झाल्यावर एक गोरे घारे मध्यमवर्गीय काका व त्यांची पत्नी येऊन काउंटर वरच्या माणसाशी भांडू लागले . मुद्दा असा होता कि त्यांनी म्हणे फोनवर विचारलं येऊ का , तर त्यांना कुणी या असं सांगितलं . आल्यावर फक्त अपॉइंटमेंट वाल्याना मिळणार असे कळल्यावर ते पेटले. दोघेही मोठमोठ्या आवाजात जोरजोरात त्या काउंटर वरच्या माणसाला नाही नाही ते बोलत होते. यामुळे नोंदणी होऊ न शकत असल्याने लसीकरण सुरूच होऊ शकत नव्हते.
शेवटी मी त्या काकांच्या वर मोठा आवाज लावला की तुमच्यामुळे लसीकरण बंद पडले आहे. एवढे बोलल्यावर इतर चार पाच कावलेले म्हातारे लोकं उठले आणि त्या माणसाशी भांडू लागले. काही( तरुण) लोकांनी मिळून त्या माणसाला लसीकरण केंद्राच्या बाहेर नेले आणि त्यानंतर अतिशय वेगवान पद्धतीने लसीकरण सुरु झाले व सर्टिफिकेट घेऊन मी पंधरा वीस मिनिटात बाहेर पडलो ( एका वेळी २ कॉउंटर्स वर लसीकरण करत होते )
लसींचे शॉर्टेज पुढील दोन आठवडे तरी व्यवस्थेत अडचणी निर्माण करणार असं वाटत आहे
अरेरे
तुम्ही लावलेला आवाज ऐकण्याची खूप इच्छा होती. ती संधी हुकली! आता पुढच्या वेळेस मलाच यावं लागेल गोरा आणि घारा बनून!
थेट ओवरहँड
शेवटी मी त्या काकांच्या वर मोठा आवाज लावला की तुमच्यामुळे लसीकरण बंद पडले आहे. एवढे बोलल्यावर इतर चार पाच कावलेले म्हातारे लोकं उठले आणि त्या माणसाशी भांडू लागले. काही( तरुण) लोकांनी मिळून त्या माणसाला लसीकरण केंद्राच्या बाहेर नेले आणि त्यानंतर अतिशय वेगवान पद्धतीने लसीकरण सुरु झाले
हांगाशी. अण्णांचा दणका.
दुसरा डोस कालच घेतला
कालच म्हणजे 27 /4 ला दुसरा दुसरा डोस घेतला आणि आज च न्यूज वाचायला मिळाली.
Covaxin corona च्या विविध 617 variants
पासून बचाव करते.
ही न्यूज वाचली आणि जग जिंकल्याचा फिलिंग आला.
कारण मी covaxin चे दोन डोस घेतले आहेत.
राजेश भाऊ , दुसरा डोस घेतलात
राजेश भाऊ , दुसरा डोस घेतलात हे उत्तम झाले. अभिनंदन.
पण हे 617 विविध varients नाहीयेत.
एका varient च्या नावाचा तो शॉर्टफॉर्म आहे.
मी तर वेगळेच समजत होतो
आनंदात नीट बातमी वाचली नाही वाटत मी.
माहिती दिल्या बद्द्ल धन्यवाद .
पण हा 617 च जास्त भारतात आहे ना ?आणि हाच वेगाने पसरण्याची क्षमता राखून आहे ना?
सर्वर
आज चार वाजल्यापासून अठरा वर्षांवरच्या लोकांसाठी कोविनवरून १ तारखेपासूनच्या अपॉइंटमेंट मिळणार होत्या -
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
Bois!?
They are Bernie Bros, bro!
-Nile
आज बुधवार आहे. गेल्या शनिवारी
आज बुधवार आहे. गेल्या शनिवारी फायझरचा २ रा डोस घेतला. काहीच त्रास झाला नाही.
पहिला डोस
कॅनडा देशाने गरजेपेक्षा अधिक लसी विकत घेतल्या पण त्या केव्हा पोचणार याविषयी फारसा विचार न केल्याने आधी इथले लसीकरण युरोपसारखेच (यथातथा) सुरु होते. पहिल्यांदा ५५ च्या वर लोकांना लसीकरण सुरू होते पण चावट लोक वॅक्सिन शॉपिंग करत असल्याने मॉडर्ना आणि फायझरच्या लशी लगेचच संपून जात असत तर अस्ट्राझेनेकाच्या लशी पडून असत. त्या वाया जात आहेत असे लक्षात आल्याने माझ्या भागात ४०च्या वर लोकांना आता ॲस्ट्रा सहजपणे उपलब्ध आहे. आज मी पहिला डोस घेतला. काल बायकोने. गर्दी वगैरे काही नव्हती. अजुन दोघांनाही काही त्रास झालेला नाही. पुढचा डोस ४ महिन्यांनी.
लसीकरण
आज नशिबाने सोलापूर रोडवरील वरवंडला लसीकरणाची अपॉइंटमेंट मिळाली. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर मांडव टाकला होता. ४५ च्या वरचे बरेच नागरिक लस मिळेल या आशेने थांबले होते. नोंदणी शिवाय लस मिळणार नाही आणि ४५ खालच्याऺनाच लस आहे असे स्थानिक आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले तरी ते जायला तयार नव्हते. मार्च मध्ये हजार हजार लसी पडून होत्या तरी तुम्ही घ्यायला तयार नव्हता, आता साथ वाढली तेव्हा सगळ्यांना हव्या आहे, आता एवढ्या लसींचा पुरवठाच नाहीये असे वैद्यकीय अधिकाऱ्याचे म्हणणं होतं. तसेही ही covaxin जुन्या covishield वाल्यांना चालणारे नव्हते. गावकऱ्यांना कितपत समजले ते कळले नाही. नियोजनाचे काम दोन शिक्षकांना दिले होते. त्यांनी शाळेसारखीच सर्वांची हजेरी घेतली व लाईनशीर उभे केले. सुनियोजित पद्धतीने verification, computer entry करून ३० मिनिटांत बाहेर पडलो. SMS ही आला. 100 पैकी ८० जणच आले होते. त्यांना १० वाईल मध्ये ११० लसी मिळाल्या होत्या. उरलेल्या सुमारे ३० लसींचे काय करणार कोणास ठाऊक
कोविशील्डचा दुसरा डोस
आज ग्रामीण आरोग्य केंद्रावर जाऊन घेतला. केंद्रावर १०० डोस आले होते . ७०:३०:: दुसरा डोस:पहिला डोस असे गुणोत्तर तिथल्या डाॅक्टरीण बाईंनी ठरवून दिले व त्याप्रमाणे जमलेल्या प्रजेचे नियोजन केले गेले. दोन तासात लसीकरण होऊन घरी आलो. पहिल्या डोसनंतर काहीही त्रास झाला नव्हता. तसेच आताही होईल असं वाटतंय.
ही आजची स्थिती
लसीकरण अनुभव
शहरापरीस
गाव बरा.
१८+ (फक्त इंटरनेट-प्रौढांसाठी)
काही लोकांनी बॉट्स लिहून ठेवले आहेत.(सॉफ्टवेअर प्रोग्राम). दर ५ मिनिटांना १०० API calls. त्यामुळे ५-६ सेकंदात सगळे स्लॉट बुक होतात. रेडिटवर वाचलेले अनुभव पाहता, पिंपरी चिंचवडच्या केंद्रांत मुंबईहून लोक लसीकरणासाठी येत आहेत. (२० ते ४० टक्के). पुण्यातील काही लोक दौंड, वरवंड अशा ठिकाणी स्लॉट बुक करताहेत. तेही बॉट्स मार्फत. हे भयानक आहे.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
नगरसेवकांची दादागिरी
पुण्यातील स्थिती
साथे अतिशय किरकोळ
ठरवून गोंधळ निर्माण केला जात आहे असे वाटत.ऍप द्वारे registration करत आहेत कोणत्या केंद्रावर कोणती लस उपलब्ध आहे किती आहे हे सर्व माहीत पडत असणार
मोबाईल नंबर आधार शी लिंक असल्या मुळे राहतो तो पत्ता त्यांना माहीत पडत असणार मग जेवढ्या लस उपलब्ध आहेत त्यांना च टोकण नंबर देवून त्याच नावाची लिस्ट त्या संबंधित लसी करणं केंद्राला पाठवली आणि वेळ पण ठरवून दिली तर .गर्दी होण्याचे काहीच कारण नाही.ना कोणाच्या वाशिल्याची गरज आहे.
मॉडर्ना लसीच्या दोन्ही मात्रा
मॉडर्ना लसीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या...
महिनाभरापूर्वी लसीची पहिली मात्रा घेण्याचे ठरवले. वेळ निश्चिती केली. मनात जरा धकधुक होतीच. अनेक उलट्सुलट मतप्रवाह वाचून, ऐकून नुसता गोंधळ झाला होता. परंतु शेवटी ठरवलेच.
मला ज्या केंद्राची वेळ मिळाली, तिथे मॉडर्ना लस देत होते. इथे (सिंगापूर मध्ये) फायजर आणि मॉडर्ना लसी उपलब्ध आहेत. आणि नागरिकांना निवडीची संधी आहे. दोन्ही लसीबद्दलचे रिपोर्ट्स चांगले आहेत असे ऐकले होते. तसेही निवडीचे स्वातंत्र्य असले तरी त्या क्षेत्रातले शून्य ज्ञान असल्याने, सोयिस्कर केंद्र आणि सोयीची वेळ हे निकष लावून निवड केली.
सिंगापूरची आरोग्यव्यवस्था उत्कृष्ठ आहेच, त्यातही लसीकरण योजना अत्यंत पद्धतशीर आणि नगरिकांना सुलभ होईल अशीच केली गेली आहे. आम्ही केंद्रावर गेल्यावर तेथे तत्पर कर्मचारी उपस्थित होते. मला ज्या नर्सबाईंनी टोचून दिले त्या सौजन्यमूर्तीच होत्या. माझ्यासमोर त्यांनी लस असलेले पाकीट उघडले, त्यातील बाटलीतून सिरींजमधे किती घेतले तेही सांगितले (अर्थात कमी अथवा जास्त असते तरी मला कळण्याची सुतराम शक्यता नव्हतीच). नंतर अगदी हलक्या हाताने डाव्या हातावर सुई टोचली. मला अजूनही इंजेक्शनची अंमळ भिती वाटते. का माहिती नाही.. पण जराही दुखलं नाही. नंतर तिथल्याच एका मोठ्या हॉल मधे थांबायला सांगितले. माझ्यासारखे (टोचून घेतलेले) बरेच जण तिथे होते. सगळेजण शांतपणे आपापले मोबाईल फोन चाळत होते. काही वेळानंतर मला तिथल्या समोर मांडलेल्या मेजावरील कर्मचारीणीने बोलावले. मला काही त्रास वगैरे होत नाही ना इ. चौकशी केली. नंतर एक छापील कागद दिला. त्यावर माझी माहिती आणि मला मॉडर्ना ची पहिली मात्रा दिल्याची वार्ता छापलेली होती. आणि पुढच्या मात्रेची वेळ देखिल..
त्यानंतर एक फेसमास्कची पेटी आणि सॅनीटायझरची बाटली दिली...बहुदा मी लस घेतली या आनंदाप्रित्यर्थ ..
लगेच दूसऱ्यादिवशी माझ्या फोनवरील "ट्रेस टुगेदर ॲप" मधे ही माहिती नोंदवली गेली होती.
दूसरी मात्रा चार आठवड्यांनंतर ..
परंतु मधेच एक विघ्न आले होते. आम्ही एकदिवस जिथे होतो, नेमका एक कोविड पेशंट तिथे होता... साधारण त्याचवेळी. माझ्या फोनवर तसा निरोप दिसला.
आणि त्यानंतर मी पण जरा आजारी झाले होते. इतर वेळी किरकोळ म्हणून दुर्लक्ष्य केले असते (तसेही मी आत्ता तसेच करणार होते) परंतु माझ्या आहोंना शंका निरसन करणे जरूरीचे वाटले. म्हणून डॉक्टरकडे जाणे आलेच. डॉक्टरने देखिल लगेच चाचणी केली. तीन दिवस घराबाहेर जाण्यास मनाई केली. पण (माझ्या) सुदैवाने चाचणी निकाल नकारार्थी होता.
आता दूसरी मात्रा..
तेच केंद्र.. तशीच प्रक्रिया..
परंतु यावेळी गर्दी जास्त होती . सिंगापूर मधे कित्येक महिने एकही नविन संसर्ग झाल्याची केस नव्हती. ज्या थोड्याफार असत, त्या बाहेरच्या देशातून आलेल्या केसेस. त्यामुळे इथले काही अपवाद वगळता, जवळजवळ सर्व निर्बंध हटविण्यात आले होते. परंतु गेल्या काही दिवसात येथिल संसर्गाची उदाहरणे वाढण्यास सुरूवात झाली. त्यातही काही लहान मुलांचा समावेश होता. त्यामुळे परत सारे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
सिंगापूरी जनता शांतताप्रिय आणि नियमानूसार वर्तन करणारी आहे. काही गणंग असतात.. परंतु त्यांचा समाचार घेण्यास येथिल यंत्रणा समर्थ आहे. येथे नियमितपणे जरूरीची माहिती प्रसारित करण्यात येते. कुठेही गडबड , गोंधळ नसतो.
आता असे ऐकले आहे की १८ च्या खालील मुलांना देखिल लस देणार आहे. तसेच इथे एक चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. ती म्हणजे.. वयोवृद्ध नागरिक अथवा ज्यांना काही कारणांमूळे लसीकरण केंद्रावर जाणे शक्य नाही, अशा व्यक्तींना घरपोच लस देणार आहेत. एक डॉक्टर आणि एक नर्स त्या साठी नियुक्त केले जातील. खरोखरीच जनहिताची योजना आहे.
आता ईश्वराकडे एकच प्रार्थना आहे, जगावरचे हे अरिष्ट लवकरच नाहीसे होऊ दे.
*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||