चंद्र आणि मंगळ यांची पिधान युती
चंद्र व ग्रह यांचे आकाशातील मार्ग तसे जवळून असतात मात्र त्यातील किरकोळ फरकांमुळे दोन्ही एकमेकांजवळ आले तरी त्यांमध्ये अंतर असते. मात्र कधीतरी भुमिती जुळून येते आणि चंद्राचा मार्ग बरोबर ग्रहावरून जातो. अशा घटनेला पिधानयुती असे म्हणतात (occultation).
आज सकाळी उत्तर अमेरिकेत मंगळ आणि चंद्राची पिधानयुती पहावयास मिळाली. चंद्रकोरीच्या मागे मंगळ अदृश्य होण्याच्या काही क्षणांपुर्वी घेतलेला फोटो खाली देत आहे. मंगळाला चंद्रामागून पुन्हा बाहेर यायला साधारण ६५ मिनीटे लागली.
मोठे, व काही इतर फोटो इथे पाहता येतील.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
आठ बीट्
सहसा मी आठ बीट फॉर्म्याट मध्ये फोटो घेऊन संस्करण करतो- कारण संगणनशक्ती कमी लागते. पण १६ बीट फाईलही वापरू शकतो. खगोलीय फोटोत बराच भाग काळा असल्याने सहसा फाईल छोटी असते.
विकीकॉमन्सकरता फाईल देता येईल. पण देणाऱ्याचे नाव वगैरे लावतात का?
बाकी, हो, ब्लॉगवर आहेत अजून काही खगोलीय फोटो.
विकीकॉमन्सकरता नाव तुम्ही
विकीकॉमन्सकरता नाव तुम्ही ज्या युझरनेमने प्रवेश करता ते येईल. इन्फोमध्ये. वाटरमार्क नकोच. फोटोचा EXIF data ही लोकांना दिसतो. एक वेगळा इमेलही लॉगिनसाठी वापरू शकता.
कुणी/तुम्ही खगोलीय माहितीचा लेख लिहिला लिहिला - occultation किंवा पिधानयुती (विकिमराठी) तर त्यांना फोटोंचा उपयोग होईल.
खगोलीय फोटोत बराच भाग काळा असल्याने
बरोबर. पण चंद्र जरा अधिक रेखीव दिसेल.
(मी एक गम्मत म्हणून चार फोटो टाकले होते. खगोलीय नाही.)
छिद्रान्वेष!!!
(प्रस्तुत कॅमेरा हा बहुधा पिनहोल कॅमेरा नसावा, तस्मात् प्रस्तुत प्रतिसादाचे प्रस्तुत शीर्षक तितकेसे चपखल ठरत नाही. परंतु तूर्तास चालवून घेऊ. हॅविंग सेड दॅट...)
--------------------
चंद्राच्या उजव्या बाजूला, खाली कॅमेऱ्यावर डाग पडलाय.
हे असे 'नाक आलंय' म्हणून सांगितल्यासारखे लक्षात आणून द्यायला पाहिजेच होते का? तेही चारचौघांत?
सांगितले नसतेत, तर इथे कोणाचेही लक्ष त्याकडे गेले नसते. किंवा गेले असते, तरी त्याकडे दुर्लक्ष करून, चंद्राच्या 'बिग पिक्चर'च्या सौंदर्याकडे कॉन्सण्ट्रेट केले असते.
आता सगळे चंद्राकडे पाहायचे सोडून (कामधंदे नसल्यासारखे) डाग१ शोधत बसतील, नि त्याकडे टक लावून पाहात बसतील! लावलीत ना वाट?
(असो. 'शिष्यादिच्छेत् पराजयं' याव्यतिरिक्त काय म्हणू शकतो?)
--------------------
आणि, डाग, डाग म्हणून ज्याच्यावरून हिणवताय, तो डाग बोले तो कशाला म्हणताय? ते चंद्राच्या फाइव्ह ओ'क्लॉक पोझिशन आणि सिक्स ओ'क्लॉक पोझिशनच्या मधोमध एक पूर्णविरामवजा२ पांढरट ठिपक्यासारखे जे दिसतेय, त्याला? अहो, तो कॅमेऱ्यावरचा डाग नाहीये; तो तुमचा निळ्या (की नायल्या) जाऊन बसलाय तिथे, नि कॅमेरा पृथ्वीवरच ठेवून रिमोटने सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतोय! (साला, फेसबुकावर लाइक्स मिळविण्यासाठी कायकाय उचापती करतील लोक नि कोठेकोठे कडमडतील, सांगवत नाही.)
असो चालायचेच.
--------------------
१ चंद्रावरचा नव्हे. कॅमेऱ्यावरचा.
२ 'पीरियड' शेमिंग?
अरेरे- pale
"तो तुमचा निळ्या (की नायल्या)३ जाऊन बसलाय तिथे, नि कॅमेरा पृथ्वीवरच ठेवून रिमोटने सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतोय!..."
या ३ नंबरच्या सुवर्णनोंदीच्या (ते ही सुमुहुर्त) अभावाने डोळे पाणावले.
वा!
वा!