सध्या काय वाचताय? - भाग २
पहिला भाग अतिशय लांबल्याने सगळ्यांच्या सोयीसाठी दुसरा भाग सुरू करतोय.
या धाग्याचा पहिला भाग इथे वाचता येईल. त्या भागात रोचना यांनी म्हटल्याप्रमाणे,
बर्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता थोडे फार त्याबद्दल सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. पण अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसर्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जीवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणार्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहावेत ही आशा आहे.
मी सुरवात करतो:
सध्या पैस, शेरलॉक, अंताजीची बखर आणि हसरे दु:ख (चार्ली चॅप्लीनचे चरित्र) इतकी सगळी (टोका-टोकाची) पुस्तकं समांतर वाचतोय = डोक्याचा भुगा
पैस मधील एकेक लेख वाचून शांत-रम्य तरीही जड अशा काही गुढार्थाने भरलेल्या प्रदेशातून गेल्यासारखं वाटतं.. त्यावर शेरलॉक मधील कथानकाचा वेग, गुढ उलकलणारा थरार नेमका उतारा आहे ;). हरसे दु:ख अत्यंत ओघवत्या भाशेत लिहिलेले चार्मी चॅप्लिनचे चरित्र आहे. वाचायला एका बैठकीची मात्र गरज नाही.. लहान प्रकरणातून, एक चांगल वेग ठेऊन चरित्र पुढे सरकते. अंताजीची बखर नुकतेच सुरू केले आहे. जरा अधिक वाचून त्यावर टिपण्णी करेन.
चला तर तुम्हीही सांगा सध्या काय वाचताय?
मीही हा प्रयोग लवकरच करुन बघणार आहे
ऋ,
शेरलॉक व हसरे दु:ख समजू शकतो. पण पैस आणि अंताजीची बखर ही २ पुस्तके सुद्धा समांतर वाचू शकतोस म्हणजे ग्रेटच आहेस तू.
वाचनानंद हरवणार नाही याची काळजी घे मित्रा. कारण पैस व अंताजीची बखर (हसरे दु:ख सुद्धा) वेगवेगळ्या भावनिक पातळीवर नेणारी पुस्तके आहेत.
मीही हा प्रयोग लवकरच करुन बघणार आहे
जेम्स हॅडली चेसचे 'कम इझी गो इझी' परत (कितव्यांदा ते माहित नाही) वाचायला घेतलंय.
आता जोडीला अजून ४ पुस्तके घेतो वाचायला. १. गिव्हिंग - बिल क्लिंटन २. भौतिकशास्त्र आणि अध्यात्म - फ्रिजॉफ काप्रा - मराठी अनुवादः अविनाश ताडफळे (टाओ ऑफ फिजिक्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद) ३. कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा - विजय देवधर ४. आफ्टर दि क्वेक - हारूकी मुराकामी - मराठी अनुवाद : निशिकांत ठकार (भूकंपाच्या पार्श्वभूमीवरच्या सर्व कथा आहेत)
नाही रे.. वाचनानंद हरवत
नाही रे.. वाचनानंद हरवत नाहीये.. प्रत्येक पुस्तक वाचण्याच्या वेळा वेगवेगळ्या आहेत. पैस शांत वेळी, शांत डोक्याने वाचतो. त्यातला एक लेख वाचुनच जड वाटु लागते मग उतारा म्हणून शेरलॉक आहेच
अंताजीची बखर नुकतेच सुरू केलेय (फक्त प्रस्तावना वाचुन झालीये.. यापुढचे विकांताला वाचेन म्हणतो).. तर हरसे दु:ख बसमध्ये वाचायला चांगले आहे. फार विचार करावा लागत नाही आणि वाचायलाही मजा येते असे पुस्तक आहे ते.
बाकी तुझ्या प्रयोगाला शुभेच्छा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
माझे वाचन
ऋ, छान वाटले.
तुझा वाचनानंद हरवत नाहिये हे महत्त्वाचे
तुझ्या प्रतिसादातील उतारा हा शब्द जास्त महत्त्वाचा आहे
जेम्स हॅडली चेस व विजय देवधर यांची पुस्तकं मी या प्रयोगात उतारा म्हणून वापरतो आहे
वाचन प्रयोग मी सुरु केलाय.एका वेळी २ पुस्तके याआधीही वाचली आहेत.
पण ३-४ पुस्तके एका वेळी थोडी जड जात आहेत. मी शक्यतो एका वेळी एकच पुस्तक वाचतो.
जेम्स हॅडली चेसचे - कम इझी गो इझी - ५६ पाने वाचून झालीयेत. पुस्तक अर्थातच भन्नाट व माझे आवडते आहे.
विजय देवधरांचे - कार्लसनची जलपरी आणि विलक्षण गूढकथा - देवधरांचे मनोगत वाचून झाले आहे. कार्लसनची जलपरी ही तिसरी कथा आहे, तीच वाचणार आहे.
फ्रित्जॉफ कॅप्रा - भौतिकशास्त्र आणि अध्यात्म - सुरुवात चांगली वाटली. ४-५ पाने झालीयेत. पण हे पुस्तक बहुतेक जसे जमेल तसेच वाचेन. विषय देखील हळूहळू वाचावा असाच आहे. (हे पुस्तक म्हणजे द ताओ ऑफ फिजिक्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे ) पद्मश्री डॉ. विजय भटकर यांची छोटीशी प्रस्तावना, अनुवादक अविनाश ताडफळे यांचे मनोगत व फ्रित्जॉफ कॅप्रा यांचे मनोगत वाचून झाले आहे. या पुस्तकाचा आवाका जबरदस्त असाच आहे. मी पुस्तकाच्या नावात लिंक दिली आहेच. बुकगंगावर याची काही पाने वाचून पुस्तकाविषयी कल्पना यावी.
लोकसत्तात या पुस्तकाची ही बातमी
हारूकी मुराकामी - आफ्टर दि क्वेक - मराठी अनुवाद : निशिकांत ठकार ( ६ पानी अनुवादकीय आवडले आता लवकरच कथा वाचन सुरु करेन.)
मी काय वाचतोय
स्वामी पुन्हा वाचून नुकतंच संपवलं.
आता पु.लं.चं श्रोतेहो वाचायला घेतोय. वेळ मिळेल तसं वाचेन.
गल्ली चुकलं काय हो हे?
वाचनानंद हरवणार नाही याची काळजी घे मित्रा.
नाही रे.. वाचनानंद हरवत नाहीये
स्वामी पुन्हा वाचून नुकतंच संपवलं.
आता पु.लं.चं श्रोतेहो वाचायला घेतोय.
चुकून दुसर्याच एखाद्या संकेतस्थळावर आल्यासारखे वाटले....
'व्हॉट हो!'(वुडहाऊस), करुणाष्टक, जाहिरातीचं जग (यशोदा भागवत), फिरंगढंग (शरद वर्दे) आणि इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन अशी संपूर्ण विसंवादी पुस्तके वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. बर्याच प्रतिक्षेनंतर मिळालेली चारुता सागरांची पुस्तके (शायरीच्या पुस्तकात सुकलेले फूल जपावे तशी - जैसे सूखे हुवे फूल किताबोंमे मिले, कभी यूंही जब हुंई बोझल आंखे वगैरे) न वाचता हृदयाशी जपून ठेवली आहेत....
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
:)
ओहो! निव्वळ वाहवा!
बरी आठवण करून दिलीत.
आधी ऐकले नव्हते.. कशावर? कशाप्रकारचे पुस्तक आहे?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वॉट हो!
सर्वात आवडतं वुडहाउस पुस्तक कोणतं??
"लीव इट टू स्मिथ" (अक्रॉस द पेल पॅराबोला ऑफ जॉय....:-)) आणि "डॅमसेल इन डिसट्रेस" यांच्या मध्ये ठरवू नाही शकत!
'डॅमसेल इन डिसट्रेस, मस्तंच.
'डॅमसेल इन डिसट्रेस, मस्तंच. अलिकडे वुडहाउसच्या 'गोल्फ स्टोरीज' पुन्हा वाचायला घेतल्या आहेत, आपल्या माहितीत जर एखादी गोल्फचा छंद असलेली पण त्यात फारशी गती नसलेली व्यक्ती असेल तर या गोष्टी वाचण्याचा आनंद द्विगुणित होतो असा माझा अनुभव आहे.
अवांतर: उत्तम विनोद, माणसाच्या आयुष्यात किती निखळ आनंदाचे क्षण घेऊन येतो याबद्द्लची एक आठवण आहे. एकदा डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये एकटीच वूडहाउसचे पुस्तक घेऊन बसले होते. मन:स्थिती खूपच वाईट होती, थोड्या वेळातच डॉक्टर काय सांगणार आहेत आणि त्याने आपल्यावर काय ओढावणार आहे याची पुसटशी कल्पनाही होतीच त्यामुळे वेळ जितका लांबावा तितके चांगले असे वाटत होते. हातातले पुस्तक चाळता चाळता एका गोष्टीत रंगून गेले, इतकी की शेजारच्या पेशंट्सना विसरून वेड्यासारखी खुदुखुदु हसत होते. त्यातली काही वर्णने आजही आठवतात आणि काही क्षणांपुरता मिळालेला निखळ आनंदाचा विसावाही आठवतो.
:)
थांबा पुन्हा एक्दा वाचुन सांगतो
इतकी छान आठवण करून दिल्यावर पुन्हा दोन्ही पुस्तके वाचावीच लागतील
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
व्हॉट हो
व्हॉट हो च्या माझ्याकडे असलेल्या आवॄत्तीत स्टिफन फ्रायची प्रस्तावना आहे, ती प्रस्तावनाही खूप रोचक आहे. वूडहाऊसच्या पुस्तकांबद्द्ल, त्यातल्या पात्रांबद्द्ल, त्याच्या असामान्य भाषाप्रभुत्वाबद्दल आणि अर्थातच त्याच्या विनोदबुद्धीबद्दल स्टिफन फ्रायची टिप्पणी वाचनीय आहे.
लज्जा गौरी - ढेरे, ध्वनिताचे
लज्जा गौरी - ढेरे, ध्वनिताचे केणे - वा. ना. आचार्य, बखर अंतकाळाची - नंदा खरे
सगळं पुन्हा वाचतानाही नव्यानं आवडतंय.
इतकं संमिश्र वाचू नये हे माहीत आहे. पण सलग वाचनाचा आवाका गेल्यासारखा वाटतो, नि सलग वेळही मिळत नाही. त्यामुळे इलाज नाही.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
नॉट विदाऊट माय डॉटर.
सध्या 'नॉट विदाऊट माय डॉटर' वाचतेय.
लेखन रोचक आहे. मात्र अमेरिकेची भलावण अन इराकवर टीका हे ठरवून साधलेले लक्ष्य वाटते.
इराकमध्ये लेखिकेला एकही चांगली गोष्ट दिसू नये याचे आश्चर्य वाटले.
अगदी! पण इराणमध्येच काय
अगदी!
पण इराणमध्येच काय आपल्याच गावात असलेल्या सासरच्या घरात एकही चांगली गोष्ट न दिसणार्या स्त्रिया असतातच की
"नॉट विदाऊट....." दुसरी बाजू
संपादक: चर्चा रंगत चालल्याने तसेच मुळ धाग्याला अवांतर होईल या सार्थ भितीने नवे समांतर मुद्दे येण्याचे टळू नये म्हणून या पुढील प्रतिसाद चर्चाप्रस्तावाच्या रुपात वेगळे काढत आहे. ती चर्चा इथे वाचता येईल
अम्चे सर मन्ले,श्याम, "सावर
अम्चे सर मन्ले,श्याम, "सावर रे" वाच रे... मि वचय्ल सुर्वात केलि.
मज्याकदे सग्ले भाग अहेत.. मि दिवेलाग्नीला रोज वच्तो..
थोर पुस्तक आहेत सग्ली.
बरेचसे नियतकालिकवाचन आणि एखादे पुस्तक
मागच्या महिन्यात विमान प्रवासात 'ब्लाइंड विलो, स्लिपींग वुमन' हा मुराकामीचा कथासंग्रह वाचण्यास सुरूवात केली. दोन-चार कथा वाचल्यावर त्याचीच 'नॉर्वेजियन वुड' ही कादंबरी वाचू लागलो. मला कादंबरी नितांत आवडली. कदाचित ज्या वयाविषयी कादंबरी आहे त्या वयाच्या सामाजिक पोरकेपणाविषयी आपुलकी किंवा 'मॅजिक माउंटन' वगैरे कादंबर्यांचा प्रभाव यामुळेही असू शकेल. 'नॉर्वेजियन वुड्स' मधल्या काही कथा लांबपर्यंत रेंगाळत राहतात. आजकाल एखाद्-दुसरी कथा अधुनमधून वाचतो. कथासंग्रहाच्याच बाजूला कुरूंदकरांचे 'मागोवा' आहे. तेही असेच कधीतरी वाचले जाते. 'नातिचरामी' घेऊन ठेवले आहे तेही कधीतरी वाचण्याचा विचार आहे. विकत घेतल्यानंतर काही पाने वाचल्यानंतर आपण भारतीय कितीतरी वेळ नुसत्या खोल्यांमध्येच वावरत असतो अशी तीव्र जाणीव झाली.
ट्रूमन कपोटेची "आनसर्ड
ट्रूमन कपोटेची "आनसर्ड प्रेयर्स" (अपूर्ण कादंबरी), "ब्रेक फास्ट अॅट टिफनीज" (कथा संग्रह) आणि " म्युझिक फॉर कॅमेलिऑन्स" (कथा संग्रह) हे नुकतेच वाचले. एकूण कपोटेची भाषा लिहिण्याची शैली आवडली.
या वाचलेल्यांपैकी," म्युझिक फॉर कॅमेलिऑन्स" ची प्रिफेस (का फोरवर्ड?) फार आवडली (जशी ऑस्कर वाईल्ड च्या "द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे" ची आवडली होती).
ट्रूमन कपोटे ह्याची "इन कोल्ड ब्लड" ही जास्त गाजलेली कादंबरी...वाचली नाहीये अजून. पण या कादंबरीच्या लेखना वरचा "कपोटे" नावाचा सिनेमा खूप आवडला होता. त्यातली कपोटे ची भूमिका तर अप्रतीम साकारली आहे (फिलिप सेमूर हॉफमनने)...आणि तोच चेहरा आणि आवाज मला कपोटेचं लेखन वाचताना जाणवत होता.
आता रेमण्ड चँडलर ची "द लिटिल सिस्टर" वाचत आहे.
सागर यांनी चेसच्या एका
सागर यांनी चेसच्या एका पुस्तकाची लिँक दिली आहे. त्याच वेबसाईट वर चेस ची इतर ही बरीच पुस्तकं मिळतील
http://jchase.ru/englishbooks/
वुडहाउसचा जीवज् खूप प्रसिद्ध असला तरी अंकल फ्रेड चे ही बरेच पंखे आहेत. अंकल फ्रेड इन स्प्रिंगटाइम, अंकल डायनामाइट आणि कॉकटेल टाइम खूप मजेदार आहेत. कॉकटेल टाइम मधे ख्रिस्टीच्या मिस मार्पल ची बर्यापैकी टर उडवलीय. आणि ब्लांडिँग्ज केसल त्यातले एक एक नग किँवा ड्रोनज् क्लब चे एक एक मेंबर्स हा हा! एगज्, बिनस् अँड क्रंपेटस् आणि इतर लघुकथासंग्रह पण छान आहेत. आणि वुडहाउसच्या स्कुल स्टोरीज् वाचायला पण मजा येते.
थोडी भर
अस्मिता यांनी जी लिंक दिली आहे ती गूगल क्रोम ब्राऊजर वापरुन उघडा
रशियन संकेतस्थळ असले तरी क्रोम च्या सहाय्याने ट्रान्सलेट पर्याय वापरुन कोणत्या पीडीएफ फाईल्स इंग्रजीत आहेत याची सहज कल्पना येईल.
लिंक शेअर केल्याबद्दल धन्यवाद अस्मिता
थ्यांक्यू फॉर "जेम्स हेडली चेईज" खजीना!
"जेम्स हेडली चेईज" हे हिंदीत ट्रान्सलेटेड प्रकरण कालेजच्या जमान्यात फार वाचले आहे. प्रवासाला निघताना स्टँडवरून एकदा १५ रुपयांत एक पुस्तक विकत घेतले, की वाचून सुस्थीतीत असले, तर पुन्हा २ रुपयांत ते बदलून दुसरे मिळत असे. यासाठी कोणताही पुस्तकवाला चालत असे त्याकाळी. विशेषतः स्टेशनवर ही सिस्टीम उत्तम चालत असे.
मी सध्या Ray Kurzweil - The Age Of Spiritual Machines वाचतो आहे.
काय वाचताय बरोबर कसं वाचता? असाही धागा हवा.
मी माझ्या मोबाईल फोनमधे वाचणे पसंत करतो. अँड्रॉईड बेस्ड फोन्स यासाठी फार सुंदर आहेत. सध्याचे वाचनयंत्र म्हणजे Galaxy Tab-2. यात फायदा म्हणजे एकतर हवे तेव्हा हवे तिथे वाचन सुरू करता येते. दुसरे म्हणजे अक्खी लायब्ररी सोबत असते. अन मुख्य म्हणजे 'जळ्ळं मेलं ते वाचन. तो दिवा बंद करा आधीऽ सक्काळी मला उठावं लागतं...' इ. ऐकून घ्यावे लागत नाही
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
छान माहिती
काय वाचताय बरोबर कसं वाचता? असाही धागा हवा.
मी माझ्या मोबाईल फोनमधे वाचणे पसंत करतो. अँड्रॉईड बेस्ड फोन्स यासाठी फार सुंदर आहेत. सध्याचे वाचनयंत्र म्हणजे Galaxy Tab-2. यात फायदा म्हणजे एकतर हवे तेव्हा हवे तिथे वाचन सुरू करता येते. दुसरे म्हणजे अक्खी लायब्ररी सोबत असते. अन मुख्य म्हणजे 'जळ्ळं मेलं ते वाचन. तो दिवा बंद करा आधीऽ सक्काळी मला उठावं लागतं...' इ. ऐकून घ्यावे लागत नाही
हास्याची कारंजी उडाली
अॅन्ड्रॉईड बद्दल पूर्ण सहमत आहे.
जेएचसी बद्दल तुम्ही म्हणता ते दिवस आठवले. चांगल्या स्थितीतले पुस्तक फक्त २ रुपयात बदलून मिळते हा अनुभव मात्र मी नाही घेतला. अन्यथा बरीच पुस्तके वाचून झाली असती
अवांतर तुम्ही उल्लेख केलेल्या पुस्तकाबद्दल व लेखकाबद्दलही कधीच ऐकले नव्हते. अमॅझॉन वर या पुस्तकाला ४ स्टार रेटिंग आहे
अगदि २रुपयातचा काळ कोणता
अगदि २रुपयातचा काळ कोणता माहित नाही पण आता ३० /४० रु मिळते .ठाण्याहून रे ने कुठे जायचे असल्यास पं नै बैंकेसमोरच्या गुरुकृपा बुक डेपोतून शंभरचे वीस मध्ये आणि दोनशेचे चाळीसात एक महिन्यापर्यंत परत बदलून मिळते .प्रवासात वाचता येते आणि महागडे टैबलेट बाळगण्याची नेण्याची गरज नाही .विकतच घ्यायचे असल्यास ऐंशी /एकशेसाठ मध्ये देतो .मी येथून खुशवंत सिंगचे १.डेल्हि २.आतमचरित्र ,वगैरे बरीच पुस्तके वाचली .
सध्या
माझं पुस्तक अजून लिहून व्हायचय. ते पूर्ण झाल्यावर तेच वाचत बसेन; तोवर काहीही नाही.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
गेल्या १०-१२ दिवसांपासून
गेल्या १०-१२ दिवसांपासून 'प्रकाश नारायण संत' ह्यांचा 'लंपन' वाचतोय
वनवास, शारदा-संगीत, पंखा वाचून झाले झाले अगदी न थांबता एका मागे एक सपाटाच लावला होता.. सध्या झुंबर वाचतोय आणि वाईट वाटतय की आता ही लंपन वरची लेख-माला संपणार
मी त्यामानाने खूपच उशीरा वाचतोय ही पुस्तकं.. खूप ऐकून होतो पण बाकी आधीच वाचायच्या यादी मधे इतर पुस्तकं होती त्यात हे जरा राहूनच गेलं. मग एका मैत्रिणीने वाढदिवसाला 'वनवास' भेट म्हणून दिलं आणि मग सपाटाच लावला 'संतांच्या' ह्या पुस्तकांचा
म्याड
लंपूच्या गोष्टी मस्त आहेत, प्रना संतांचा ह्या पुस्तकातला विनोदाचा बाज फार वेगळा आणि मस्त आहे. त्यात म्याड मंत्र पण आहे.
पंचापांडू – सह्यादांडू – सप्तपोपडे – अष्ट जिंकिले – नऊनऊ किल्ले – दश्शा पेडा – अकलकराठा बाळू मराठा – तिरंगी सोटा – चौदा लंगोटा – पंधराशी परिवळ – सोळी घरिवल – सतरम सीते – अठरम गरुडे – एकोणीस च्यकच्यक – वीसा पकपक – एकवीस कात्री – बावीस रात्री – तेवीस त्रिकाम फुल – चोवीस चोर – पंचवीस मोर.
लंपूच्या गोष्टी मस्त आहेत,
अगदी..अगदी.. ! अगदी 'तेहत्तीस हजार अठ्ठावीसशे सत्तावीस' वेळा वाचल्या तरी कंटाळा येणार नाही. लंप्या म्हणजे लंप्याच अगदी शंभर भागिले शंभर बरोबर एक म्हणजे एकच !!
जी.ए. कुलकर्णींनी अनुवाद
जी.ए. कुलकर्णींनी अनुवाद केलेले (मुळ लेखक कॉनराड रिक्टर) रान आणि शिवार पुर्ण झालेत, आता 'गाव' घेतलय वाचायला. त्याचबरोबर 'व्यासपर्व' सुद्धा समांतर चालु आहे. (डोक्याचा 'भुगा' नाय .. भजं )
रंगनाथ पठारेंचं 'शंखातला माणुस' ही चालु आहे बरोबर !
अजूनही गावच वाचतोयेस? जीएंची
अजूनही गावच वाचतोयेस?
जीएंची परिक्षणं लिहूनसुद्धा
रंगनाथ पठारेंचं 'शंखातला माणुस' ही चालु आहे
पाठारेंचं ताम्रपट वाचले आहेस काय?
अरे कॉनराडच समजायला कठीण
अरे कॉनराडच समजायला कठीण जातोय सागर ! जीए तर विचारुच नकोस ! 'स्वामी' तर दहावेळा तरी वाचुन झाली असेल आत्तापर्यंत, प्रत्येक वेळेला काही तरी नवीनच अर्थ लागतोय
म्हणूनच त्यांना अभिजात म्हणतात
अरे कॉनराडच समजायला कठीण जातोय सागर ! जीए तर विचारुच नकोस ! 'स्वामी' तर दहावेळा तरी वाचुन झाली असेल आत्तापर्यंत, प्रत्येक वेळेला काही तरी नवीनच अर्थ लागतोय
हा हा हा..
म्हणूनच या सर्व लेखकांची व पुस्तकांची वर्णी अभिजात साहित्यात होते
अनेदा अनेकांना सांगितलेले मत
अनेदा अनेकांना सांगितलेले मत पुन्हा देतो:
रिक्टरचे पुस्तक जितके अप्रतिम आहे त्याहुन जीएनी केलेला अनुवाद बराच डावा - बोजड वाटतो.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"दस्त्येव्हस्की"
खूप वर्षांमागे अनिरुद्ध कुलकर्णी यांनी थोर रशियन कादंबरीकार दस्त्येव्हस्कीवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह पाहिला होता. तोवर दस्त्येव्हस्कीचं काहीही वाचलेलं नव्हतं. त्यामुळे थोडं चाळून "एक चांगलं पुस्तक" असं मनाशी धरून ठेवून दिलं होतं. त्यानंतर केव्हातरी दस्त्येव्हस्कीच्या "क्राईम" ची तीर्थयात्रा घडली. मग त्याचा "तळघरातला माणूस" भेटला.
काही महिन्यांपूर्वी अगदी अचानकपणे कुलकर्णींचं हे पुस्तक हाती लागलं. आणि हे पुस्तक आपण त्यावेळी ठेवून कसं दिलं याचं आश्चर्य वाटलं. १९८३-८४ सालामधे "नवभारत" या नियतकालिकांत आलेले हे लेख. एखाद्या लेखकाकडे कसं पहावं, त्याचा कुठल्या कुठल्या अंगाने अभ्यास करावा, त्याच्या लेखनातल्या प्रेरणा, त्याची शक्तीस्थानं, हे सगळं कसं उलगडून दाखवायचं याचा, हे पुस्तक म्हणजे एक आदर्श वस्तुपाठ आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं.
एकोणीसाव्या शतकातली रशियामधली परिस्थिती , दस्त्येव्हस्कीची झालेली जडणघडण, त्याच्या वडलांचा खून , झारच्या विरुद्ध प्रचार करणार्या गटात निव्वळ सहभाग दाखवल्याबद्द्ल मृत्यूची शिक्षा ठोठावली असताना वधस्तंभापासून क्षमा मिळवल्यामुळे परत येणं, त्याची ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्मावरची श्रद्धा, त्या श्रद्धेतून निर्माण केलेले तत्वमंथन , त्याची एपिलेप्सी, जुगारीपणा या सार्याचा त्याच्या साहित्यावर कसकसा प्रभाव पडला, त्याच्या कादंबरीची वैशिष्ट्ये कुठली , त्यातून त्याच्या स्वतःच्या आयुष्याचेच जीवनप्रक्षेपण कसे झाले आहे, एक व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं प्रतिरूप अशी दुसरी व्यक्ती अशी "छाया व्यक्ती" तो कादंबर्यामधे कशी योजतो , त्याच्या लिखाणातल्या स्त्री व्यक्तीरेखा आणि त्याच्या आयुष्यातल्या स्त्रियांची त्यांवर पडलेली गडद छाया , त्याच्या लिखाणातल्या " सामाजिक/राजकीय बांधिलकी"चं स्वरूप , आणि या सर्वाचा बोधस्वर म्हणजे "विश्वबंधुत्त्वाचा चिद्घोष" त्याच्या "ब्रदर्स कारमाझफ" या शेवटच्या महान कादंबरीवर कसा घडतो याचं अत्यंत सुरस, मनोरंजक आणि अतिशय शहाणं असं वर्णन या फक्त १४० पानांच्या लेखसंग्रहातून आलेलं आहे.
अत्यंत दु:खाची बाब म्हणजे या ग्रंथाच्या कर्त्याचं थोड्या वर्षांपूर्वी वयाच्या पन्नाशीच्या आत अकस्मात् झालेलं निधन.
शीर्षक : "दस्तयेवस्की"
लेखक : अनिरुद्ध कुलकर्णी
काँटिनेंटल प्रकाशन
पहिली आवृत्ती १९८५
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
क्राईम अँड पनिशमेंट, तसेच
क्राईम अँड पनिशमेंट, तसेच नोट्स फ्रॉम अ डेड हाऊस ह्या कादंबर्या अप्रतिम आहेत. व्यक्तिचित्रणाची त्याची हातोटी लाजवाब आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
हे पुस्तक आता मिळवून वाचणे आले.
मिळवले. आभार. मात्र
मिळवले. आभार.
मात्र सावकाशीने वाचन चालले आहे. भसाभस वाचून संपवण्याचा ऐवज नव्हे!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
दुर्गा भागवत
दुर्गा भागवत
पैस, ऋतुचक्र हि अर्धवट वाचलेली पुस्तकं. या वेळी पुस्तक खरेदीत हि दोन्ही पुस्तकं आवर्जून घेतली. सध्या ऋतुचक्र वाचतोय.
भूतेर गॉल्पो
शुचित्रा भट्टाचार्यांचे "जोनाथोनेर बाडी़र भूत" (जॉनथनच्या घारातलं भूत) वाचतेय. एका मुलीला भेट म्हणून घेतलं, पण द्यायच्या आधी वाचून काढायचा प्रयत्न करतेय. ठीक आहे, भूताच्या गोष्टी मस्तच, बंगाली वाचनही सुधारतंय पण "गोसावी बागातील भूत" इतकं काही रंजक नाहीये.
कार्लो गिन्ज्बर्ग या विख्यात इटॅलियन इतिहासकाराचे "थ्रेड्स अँड ट्रेसेस" सुद्धा वाचतेय. "माइक्रोहिस्टरी", अर्थात एखाद-दुसर्या घटनेच्या अगदी बारीक निरीक्षणातून व्यापक सामाजिक-सांस्कृतिक चिकीत्सेच्या इतिहासप्रकाराचे, गिन्ज्बर्ग जनक मानले जातात. ते "द चीज अँड द वर्म्स" नावाच्या, १६व्या शतकातल्या इटलीतील लोकधर्म आणि लोकसंस्कृतीवरच्या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यात कॅथोलिक चर्चने चालवलेल्या धर्मचौकशीच्या न्यायालयीन कागदपत्रातून एकाच केसचे, मेनोक्कियो या गिरणी चालकाने चर्चच्या प्रश्नांच्या दिलेल्या निराळ्या आणि अननुपंथी उत्तरांवरून तत्कालीन लोकधर्माचे सुरेख विश्लेषण आहे. "क्लूज" हा त्यांचा गाजलेला लेख सर्व इतिहासप्रेमींनी अवश्य वाचावा. "थ्रेड्स अँड ट्रेसेस यात सुद्धा इतिहासशास्त्रावरचे निबंध आहेत.
इथला धागा बघून्..."पुस्तके
इथला धागा बघून्..."पुस्तके विकत घ्यायला जायला वेळ मिळत नाही" ही फार फुटकळ सबब आहे... ऑनलाईन पण पुस्तक खरेदी करता येऊ शकते हा सक्षात्कार झाला.
इथेच दिलेल्या बुकगंगा च्या साईट वर जाऊन संग्रही ठेवावीत अशी फार इच्छा असलेली(पुर्वी लायब्ररीमध्ये वाचल्यावर) खालील पुस्तके विकत घेतली
१. पार्टनर - व.पु.काळे
२. तुंबाड्चे खोत खंड १ व २ - श्रीं.ना.पेंडसे
३. स्वामी - रणजित देसाई
४. संभाजी - विश्वास पाटील
५. सोबत - मधु मंगेश कर्णिक
६. ययाती - वि.स. खांडेकर
बुकगंगाचा पहिला अनुभव तसा चांगला म्हणता येईल. पण फ्री शिपिंग म्हणायचे आणि शेवटी "ऑनलाईन प्रोसेसिंग चार्जेस" असे म्हणुन दोन टक्के घ्यायचे - पटलं नाही..असो आता पुस्तकांबद्दल.
स्वामी
- खरेतर स्वामी ही मालिका मी टिव्हीवर आधी बघितली होती आणि मग हे पुस्तक वाचलं होते. आता आठवत नाही पण घरीच कायम असलेलं "राऊ" ची पारायणे झाल्यामुळे असेल दोन्ही मध्ये तुलना झाली आणि मला पहिल्यांदा वाचून ही इतकी अपील झाली नव्हती. तरीही घ्यावीशी वाटली म्हणून घेतली. आत्ता परत वाचल्यावर आश्चर्यकारकरित्या मला ती मागच्या वेळेस पेक्षा जास्त आवडली. राऊ ही एक प्रेमकथा जास्त आहे आणि कदाचित स्वामीकडून मी तीच अपेक्षा ठेवल्यामुळे तेव्हा अपेक्षाभंग झाला असावा असे आता वाटते.
ययाति
- ही मी इतकी आधी वाचली होती की राजा ययाति, त्याच्या आयुष्यातल्या दोन स्त्रिया देवयानी आणि शर्मिष्ठा यांच्या बद्दल काहीतरी आहे इतकेच आठवत होते. पण तेव्हा अगदी खूप आवडली असं झालं नव्हतं हे नक्की आठवतंय.
आता परत वाचल्यावर मागच्या वेळेपेक्षा जास्त बरी वाटली असे म्हणू शकेन. माझ्या ऑल टाईम फेवरिट यादीत तिचा अजूनही समावेश नाही झाला (स्वामी ला पण हेच लागू होते) आणि कद्दचित कधीच होणार नाही पण ठिकठाक आहे. बर्याच दिवसांनी परत वाचायला हरकत नाही ह्या गटात ही (आणि स्वामी पण) नक्कीच आहे.
पार्टनर
- माझ्या सर्वात आवडत्या वपुंच्या सर्वात गाजलेल्या पुस्तकांपैकी एक! कॉलेज मध्ये असताना वाचली होती आणि झपाटून वगैरे गेले होते. लायब्ररी मध्ये सापडतील तितकी सगळी वपुंची पुस्तके त्यानंतर आणून वाचली. अगदी डायरी मध्ये त्यातली आवडती वाक्ये लिहून ठेवली होती.
पण या वेळी वाचली आणि काय सांगू.. फार सामान्य वाटली! मला नक्की कळत नाही नक्की कशाकशामुळे हा बदल झाला. तरी मी अशा कारणांची यादी बनवायचा प्रयत्न केला.
१. "पोरगी म्हणजे झुळुक्..", "हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणं...." इत्यादी टाळ्या घेणारी वाक्यं नुसती जागोजागी पेरली आहेत, काही ठिकाणी कारण नसताना पण असं वाटलं. कद्दचित पहिल्यांदा वाचलं तेव्हा हे सगळं नवीन होतं, आता थोबाड्वही आणि इमेल वर त्यांच्या अशा टाळ्याघेऊ वाक्यांचा जो सुकाळ माजला आहे त्यामुळे परत ते ओरिजिनल जागी वाचणे पण डोक्यात गेले असावे असे वाटते.
२. ३२ हजार रुपयाला मुंबई मध्ये नवा ब्लॉक, ३ रुपये सिनेमा तिकिट, ५० रुपयाला टेबल.. काहीतरी हिशोबाचा लोचा असावा असे वाटले म्हणजे ज्या काळात ही कादंबरी होति तो फिल्टर लावला तरी सगळ्या आकड्यांमधलं प्रमाण फार जास्त चुकलय असं वाटल.
३. श्री, किरण , श्री ची आई, शेजारच्या लावालाव्या करणार्या काकू आणि अर्थात पार्टनर, मी कोणाच्याच विचारसरणीशी स्वतःला कोरिलेट (मराठी प्रतिशब्द?) करू शकले नाही. कॉलेजकाळात फक्त कल्पनाविलास होता, आता लग्न, स्त्री-पुरूष संबंध, मूल या सगळ्यांचा अनुभव घेतल्यावर हे सगळे उगाच अतिरंजित वाटले. का ज्या काळात, ज्या सामाजिक/ आर्थिक परिस्थिती मध्ये कथेतील पात्रे आहेत त्यातून मी कधीच बाहेर पडले म्हणुन असे होत असेल?
४. श्री चा वरवर चा समजूतदारपणा पण जेव्हा हवे तेव्हा बायको/प्रेयसी चे न ऐकता स्वतःला पाहिजे तेच करणे उदा अमित चे फोटो, फक्त रूपावर भाळणे( टिपिकल पुरूष/नवरा), किरणचा कोतेपणा आणि किरकिरी वॄत्ती (टिपिकल बाई/बायको) वगैरे वगैरे डोक्यात गेले, विशेषतः किरण!
अर्थात म्हणुन मी वपुंची पुस्तके वाचणे/विकत घेणे सोडणार का? - नाही.
माझ्या "सर्वात आवडत्या लेखकांपैकी एक" या पदावर वपु राहणार का? - अर्थात..कायम!
परत कधीतरी पार्ट्नर काढून वाचणार का? - हो नक्कीच, कुणी सांगावे काही वर्षांनी परत मत बदलेल!
-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||
+१००
पार्टनर बद्दल काय बोललात! +१००
मीही जरा जास्तच अपेक्षेने उघडली असल्याने असेल, पण कंटाळा आला वाचताना.. अजिबातच रिलेट करू शकलो नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वयात येणं
उच्चभ्रू मंडळी याला वयात येणं असं म्हणतात.
माझ्यासारखी माणसं याला 'काही नाही, अनुभव शहाणं करत असतो माणसाला, त्यानुसार हे बदल घडतात' असं म्हणतात.
थोडेसे पार्टनर बद्दल
सविताजी,
पार्टनर बद्दलः
ताज्या वाचनाने तुमचे मत बदलले यात आश्चर्य नाही. बदल हा मनुष्यस्वभाव आहे.
मी पार्टनर वर हा एक पुस्तक परिचय लिहिला आहे.
माझे मत पार्टनर बद्दल अजूनही बदललेले नाहिये.
सुरुवातीला पार्टनर त्यातील पंचेस साठी लक्षात राहिली तर कथानकाकडे दुर्लक्ष होण्याचा धोका असतो. त्यामुळे कदाचित वाचकाला नंतरच्या वाचनात (पंचेस माहिती असल्यामुळे) आनंद मिळत नसावा असा एक माझा तर्क आहे. मला व्यक्तीशः वपुंच्या पार्टनरच्या कथानकात वाचकाच्या मनात आंदोलने निर्माण करण्याची एक जबरदस्त ताकद दिसली त्यामुळेही असेल कदाचित पण 'पार्टनर' आजही माझ्या खूप आवडीची कादंबरी आहे
तुमच्या प्रतिसादातील शेवट खूप आवडला
अर्थात म्हणुन मी वपुंची पुस्तके वाचणे/विकत घेणे सोडणार का? - नाही.
माझ्या "सर्वात आवडत्या लेखकांपैकी एक" या पदावर वपु राहणार का? - अर्थात..कायम!
परत कधीतरी पार्ट्नर काढून वाचणार का? - हो नक्कीच, कुणी सांगावे काही वर्षांनी परत मत बदलेल!
कन्फर्मेशन
>>३२ हजार रुपयाला मुंबई मध्ये नवा ब्लॉक, ३ रुपये सिनेमा तिकिट, ५० रुपयाला टेबल.. काहीतरी हिशोबाचा लोचा असावा असे वाटले म्हणजे ज्या काळात ही कादंबरी होति तो फिल्टर लावला तरी सगळ्या आकड्यांमधलं प्रमाण फार जास्त चुकलय असं वाटल.
नाही नाही. ३ रुपयाला सिनेमाचं तिकीट ही वस्तुस्थिती आहे. (५० रुपयांना टेबल याची खात्री नाही). आणि ३२ हजाराला ब्लॉक मुंबईत नसावा. ठाणे-डोंबिवलीत असावा. आणि तो ३०-३५ हजारात मिळत होता. [व्ह्यू पॉईंटात झालेला फरक म्हणजे ७५-८० दरम्यानच्या काळात, ज्या वर्गाचे चित्रण पार्टनर कादंबरीत/वपुंच्या पुस्तकांत आहे त्या वर्गात, वन रूम किचनचा स्वतःचा/स्वतंत्र फ्लॅट - १० बाय १० चा हॉल आणि ८ बाय ८ चे किचन अधिक संडास बाथरूम घरात असलेला- अशीच लग्न होण्याच्या वयातल्यांची कल्पना होती]. मी त्यावेळी त्या वयात आणि त्याच आर्थिक वर्गातला असल्याने पार्टनर मधल्या पात्रांशी रिलेट करू शकलो. नंतर टीव्हीवर अश्विनी भावे आणि विक्रम गोखले यांनी सादर केलेल्या सिरिअलमध्ये ती मजा वाटली नाही. आज पार्टनर वाचणार्या तरुण व्यक्तीला त्याच्याशी रिलेट करता येणार नाही यावर सहमत आहे.
वपुंचे साहित्य बव्हंशी अशा (कनिष्ठ?) मध्यम वर्गाचे चित्रण करते. त्या दृष्टीने ते मर्यादित लेखक होते. (हे त्यांनी दूरदर्शनवरील मुलाखतीत स्वतःच मान्य केले होते). त्यांचे साहित्यातले (मला वाटणारे) योगदान म्हणजे "जुन्या चाळीतले जीवन समृद्ध आणि चान चान होते आणि फ्लॅट संस्कृती आल्यावर ते संपले" याप्रकारच्या नॉस्टॅल्जियाला त्यांनी नेहमी खोडून काढले. (माझ्या विचार करण्याच्या पद्धतीला एक नवी दिशा त्यामुळे मिळाली).
बाकी चटकदार वाक्ये हे त्यांचे वैशिष्ट्य नेहमीच होते. 'घर असावं घरासारखं नकोत नुसत्या भिंती' हे वर्ल्डफेमस वाक्यही बहुधा त्यांचंच आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
दिल्ली
खुशवंतसिंग यांची 'दिल्ली' ही कादंबरी. एका मैत्रिणीने या कादंबरीची केवळ शिफारस केली नाही तर पुस्तकही दिलं मला वाचायला तिच्याकडंचं. पुस्तक एवढं सहजी हातात पडल्यावर वाचायला घेतलं.
बाकी काहीही असो, खुशवंतसिंग यांना दिल्ली चांगली माहिती आहे, तिचा इतिहास तर माहिती आहेच पण तिचा वर्तमानही आतून माहिती आहे हे जाणवतं (कादंबरी १९९० मध्ये प्रकाशित झाली आहे). ऐतिहासिक व्यक्तींची माहिती त्या त्या काळातील कोणा तरी व्यक्तीच्या तोंडून येते हे विशेष आवडत आहे. हजरत निजामुद्दीन यांचं जीवन, रकाबगंज साहिब गुरुद्वाराचं महत्त्व .. अशा अनेक गोष्टी माहिती झाल्या. एरवी नुसतंच एक रेल्वे स्थानक असणारं 'हजरत निजामुद्दीन' आता एकदम सजीव होउन गेलं आहे माझ्यासाठी. औरंगजेबाचं निवेदन वाचताना क्षणभर 'बिचारा औरंगजेब' असं वाटून गेलं(!!) - हे लेखकाचं कौशल्य.
पुस्तक अजून निम्मं बाकी आहे. पण एकंदर पाहता अर्धवट सोडणार नाही असं दिसतंय. खुशवंतसिंग यांच्या कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष द्यायचं आणि कोणते मुद्दे त्रास करुन न घेता सोडून द्यायचे याचा एकदा अंदाज आला की मग मजा येते वाचायला हे लक्षात आलं!
***
अब्द शब्द
ही आवडली तर...
सविता, दिल्ली आवडली तर "ट्रेन टू पाकिस्तान" अवश्य वाच....
सध्या ..
दोन पुस्तके नुकतीच वाचली. दोन्ही आवडली.
१ अनिल अवचटांचे 'कार्यरत' - सुरेख पुस्तक. कुठे आडबाजूला मोठ्ठे काम करत राहिलेल्या सहा लोकांच्या कहाण्या आहेत.'रिपोर्ताज' शैलीमध्ये अवचट त्या सांगतात. यात दुष्काळी भाग हिरवा करत राहिलेले अनिल कुलकर्णी आहेत, 'वनमित्र' काका चव्हाण आहेत. कुठल्याही उपमा आणि अलकारांचा वापर न करता साध्या भाषेत अवचट या लोकांचा मोठेपणा मांडू शकतात हा अवचटांचा लेखनगुण.
२ डॉक्टरबाबू - डॉ शशांक परुळेकर - ग्रंथाली - एका डॉक्टरचा फर्स्ट इयर पासून MD होईपर्यंतचा प्रवास 'कादंबरी' रुपाने लेखक मांडतो. निवेदनात ही कांदंबरी आहे, आत्मचरित्र नव्हे असे म्हटलेय. पण प्रत्यक्षात पुस्तकाचा फॉरमॅट चरित्राचाच वाटतो. यातला नायक प्रेमाबिमात फसत नाही; उलट होऊ पाहणार्या नायिकेला परावृत्त करतो. डोक्याने सुपिक आहे त्यामुळे रॅगिंग असो वा प्राध्यापकांनी केलेला पक्षपात दोन्हीला पुरुन उरतो. ह्या पुस्तकाबद्द्ल कधी काही वाचले नव्हते, योगायोगाने हाती आले आणि आवडले.
अश्विन सांघीचं 'द क्रिष्णा
अश्विन सांघीचं 'द क्रिष्णा की' वाचतोय सद्ध्या !
फुल्टू टाईम पास आहे. कृष्ण, द्वारका, स्यमंतक मणी , आर्यन इन्वेजन, भारतातील मुख्य शिवमंदीरे आणि कैलास पर्वत या सगळ्याच बाबी एका नव्याच अँगलने मांडली आहेत. मजा येतेय वाचताना
पुण्याची अपूर्वाई
अनिल अवचटांचं पुण्याची अपूर्वाई वाचतोय
पुण्यातल्या त्यांनी वर्णन केलेल्या काहीच ठिकाणी गेलो आहे. अन्यत्र वर्णन केलेल्या गल्ल्या-बोळं स्वतः पाहिलेली नसली तरी ओघवत्या आणि सहज सोप्या लेखनापुणे पुस्तक आवडतं आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
लवकरच घेतो हे पुस्तक
अवचटांचं लिखाण एक तर पचनी पडते तरी किंवा नाही तरी.
ऋ तू पचनी पडले गटात आल्यामुळे मला आनंद झाला
लवकरच हे पुस्तक घेतो.
मी ही पक्का पुणेकर असल्यामुळे या पुस्तकात वर्णन केलेली ठिकाणे एन्जॉय करु शकेन.
अवांतर : सध्या 'एका कोळीयाने' वाचायला घेतले आहे. म्हातारा सांतियागो आणि त्याने मासेमारी शिकवलेल्या मुलाचे नाटकी संभाषण सध्या मनोरंजन करीत आहे. एका कोळीयाने ची नवी आवृत्ती अतिशय देखणी आहे. रंगीत रेखाटने व त्या रेखाटनांचा रंजक इतिहास पुस्तकाच्या सुरुवातीला दिलेला आहे.
एकूणच काय तर अर्नेस्ट हेमिंग्वेच्या 'द ओल्ड मॅन अॅन्ड सी' चा पुलंनी केलेला मराठी अनुवाद 'एका कोळीयाने' सर्वांगाने सुंदर आहे. पुन्हा ही कादंबरी वाचताना तोच ताजेपणा जाणवतोय हे महत्त्वाचे.
अवचटांचं लिखाण एक तर पचनी
अवचटांचं लिखाण एक तर पचनी पडते तरी किंवा नाही तरी.
असहमत.
अवचटांची काही पुस्तकं मला आवडतात. केवळ सुरुवातीच्याच काळातली असं नाही, कारण 'मुक्तांगण' आणि 'पुण्याची अपूर्वाई' अलीकडची असूनही आवडली. पण अलीकडच्या दिवाळी अंकातले अवचटांचे लेख, त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कवितांची पुस्तकं... अजिबात आवडत नाहीत.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
+०.५ असहमतीशी काहिसा
+०.५ असहमतीशी काहिसा सहमत
मुक्तांगण वाचायचंय.. मात्र आधीची पुस्तके जसे कार्यरत वगैरे भारीच आहेत.
दिवाळी अंकातले अनेक लेख मलाही 'ऑन डिमांड' लिहिल्यासारखे (लिहायचे म्हणून लिहिले टाईप्स) वाटले मात्र काही मासिकांतील (अंक, वर्ष वगैरे विसरलो) लेखही आवडल्याचे आठवते.
बाकी सागर, मी अवचटांच्या बाबतीत एका ठाम गटात नाहि हे कळले असेलच. मात्र बरेचसे लेखन आवडले आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
गैरसमज नको
मेघना,
मी फक्त पुस्तकांबद्दल बोलतोय. दिवाळी अंक आणि पुस्तके यांच्यात लेखक एकच असला तरी तुलना योग्य होणार नाही. बालसाहित्याबद्दल मात्र मी वाचलेले नसल्यामुळे मत नाही देता येणार.
अवचटांबद्दल माझ्या काही मित्रांनी त्यांची कोणतीच पुस्तके वाचायची नाहीत असे ठरवले आहे. त्यांचे अनुभव अनेक वाचकांच्या पचनी पडत नाहीत. खास करुन 'स्वतःविषयी' मधे लिहिलेले अनुभव. म्हणून ती जनरलाईझ कमेंट होती. शिवाय कोणत्याही लेखकाचे प्रत्येक पुस्तक नेहमीच दर्जेदार असेलच असे नसतेच ना?. मला स्वतःला अवचटांची पुस्तके आवडतात.
राग दरबारी
इथली भरपूर चर्चा वाचून मित्राला त्याच्या घरून हे पुस्तक आणायला लावले आणि आता वाचायला सुरुवात केली आहे. पहिलेच हिंदी पुस्तक असल्याने कूर्मगतीने अडखळत वाचन सुरू झाले आहे, पण मजा येते आहे.
लिटररी न्यूरोसायन्स
ह्या धाग्यावर थोडे अवांतर होईल, तरीही आज वाचलेला हा लेख रोचक वाटला म्हणून त्यातला काही भाग येथे डकवतो आहे. पुस्तक वाचण्यात रंगून गेल्यानंतर आपण कथानकात घडणार्या गोष्टींचाच भाग आहोत, असं वाटणं काही नवीन नाही. त्यासंबंधी केला गेलेला एक छोटा प्रयोग -
मजेशीर पुस्तक
डायरी ऑफ अ विम्पी किड वाचले. .
अगदी पटकन वाचुन होणारे, मजेशीर पुस्तक आहे. आवडले!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' हे
'अ प्रिन्सेस रिमेंबर्स' हे गायत्रीदेवी यांचं आत्मकथन. मराठी अनुवाद केला आहे आशा कर्दळे यांनी. मेनका प्रकाशनने २००४ मध्ये प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक.
स्वातंत्र्यपूर्व काळ, त्यातल्या काही संस्थानिकांचं जीवन याच 'आतून' दर्शन घडतं या पुस्तकात - अर्थातच एका राजकन्येच्या दृष्टिकोनातून. एखादा भव्यदिव्य सेटचा सिनेमा पाहत आहोत असं वाटत राहिलं मला हे पुस्तक वाचताना. कूचबिहारची ही राजकन्या पुढे जयपूरच्या महाराजांच्या प्रेमात पडते आणि त्यांची तिसरी पत्नी बनून राजस्थानमध्ये येते. लॉर्ड माउंटबॅटन, प्रिन्स फिलीप, केनेडी... अशा लोकांचे उल्लेख सहज येत राहतात पुस्तकभर. त्या दिवसांचे सविस्तर वर्णनं आहेत - लग्नात किती साड्या घेतल्या वगैरे.
स्वातंत्र्याचा काळ, संस्थांनांचे विलीनीकरण यांचेही उल्लेख आहेत. आणीबाणीच्या काळात गायत्रीदेवी यांनी साडेपाच महिने तुरुंगवास भोगला - त्याचेही वर्णन आहे. पण संस्थानांच्या विलीनीकरणानंतरचा भाग थोडा घाईघाईने उरकल्यासारखा वाटला मला.
मूळ पुस्तक वाचलेलं नाही. पण अनुवाद वाचताना फार अडखळल्यासारखं वाटलं नाही - त्याअर्थी अनुवाद उत्तम असावा.
पुस्तक संग्रहात असावं का नाही (मला भेट मिळालं आहे याबाबत दुमत होऊ शकतं - पण एकदा जरुर वाचावं असं मात्र आहे.
***
अब्द शब्द
संस्थानिकांची विचारधारा कळण्यासाठी उपयुक्त पुस्तक
सविताताई,
या पुस्तकाची नोंद करुन ठेवली आहे. पुढील महिन्यात पुण्याला जाणार आहे तेव्हा पाहतो कुठे मिळाले तर
तत्कालीन वातावरण सत्ताधीशांच्या दृष्टीकोनातून समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे हे आत्मकथन.
Sense of an Ending
आत्ताच sense of an Ending वाचले. चांगले आहे, मानवी स्वभावावरची commentary चांगली आहे.
अगदी छोटे आहे त्यामुळे लवकर वाचुन होते. शेवटी पर्यन्त उत्कंठा टिकवुन ठेवली आहे, पण सर्व प्रश्नांची उत्तरे नीट मिळत नाहीत.
सेन्स ऑफ अॅन एंडिंग
माझ्या मते हा त्या कादंबरीतला एक चांगला घटक होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
" द स्ट्रेंजर" (अल्बेर काम्यु
" द स्ट्रेंजर" (अल्बेर काम्यु ) वाचले. कोण्या एकाने प्रामाणिकपणे कथन केलेली त्याची कथा म्हणता येईल. दुसर्या भागात पुढे वाचत जाता हळुहळु प्रत्येक वाक्यावर थांबून विचार करायला लागतो.
परत परत वाचायला लागेल असं पुस्तक.खूप आवडले.
त्यातली पयली ओळ
वाचकाला काम्युचे हे पुस्तक कधी ना कधीतरी बोलावतेच. कितीतरी भाषांमधे आणि किती पिढ्यांमधे या पुस्तकावर चर्चा झडत असतील. त्यातल्या त्यात, त्यातल्या पयल्या ओळीवर हमखास. तुमच्यामुळे आज पुन्हा ती पहिली ओळ, ते पुस्तक, त्यातला तो मेसॉल्त, ते अरबांबरोबरची त्याची झटापट, तो कोर्ट सिन वैगेरे समोर तरळले.
अलिकडे ‘द न्यु यॉर्कर’ मधे द स्ट्रेंन्जर च्या नव्या भाषांतराच्या निमित्ताने एक छान निबंध प्रकाशित झाला तो वाचला होता. इथे आहे तो.
त्या लेखात `द आऊटसायडर' मधल्या पहिल्या वाक्यावरुन उदबोधक चर्चा आहे.
कसं होईल त्याचं भाषांतर इत्यादी बद्दलची चर्चा.
ते वाचताना मनात आलं, काय होईल मराठीत:
‘आई मेली त्या दिवशी.’ ‘त्या दिवशी आई गेली’. ‘मम्मा त्या दिवशी गेली.’ ‘मायनं शेवटचा श्वास घेतला.’
निधन पावली/वारली/देवाघरी गेली.
पहिलं वाक्य
पहिलं वाक्य, पुस्तकातलं ते पहिलच असल्यामुळे संदर्भाशिवाय वाचकाला भेटतं. पुढे त्याचा संदर्भ लागतो. मला तरी 'मदर डाइड टुडे' हे भाषांतर आवडलं आहे. दुव्यातला लेख रोचक आहे.
पुस्तकाचं मराठी भाषांतर कुणी केलं आहे का?
विचार करता मला वाटत मराठीत.." आई गेली(वारली?) आज. किंवा कदाचित कालही असेल. नक्की नाही सांगता येणार." असं काहीसं करता येईल. अर्थात जास्त विचार करत गेल्यास तुम्ही म्हणता ते सर्व पर्याय आवडू अथवा नावडू लागतील...आणि नेमका अर्थं काय घ्यावा असा संभ्रम निर्माण होईल.
दिवाळी अंक
'अक्षर' दिवाळी अंकातला सुलेखा नागेश यांचा डॉ. नयना पटेल यांच्या आणंद येथील कृत्रीम गर्भारोपणाचे इस्पितळ व भाडोत्री मातांचे (सरोगेट मदर्स) वसतिगृह याविषयीचा लेख रोचक आहे. उपजीविकेची मर्यादित साधने असलेल्या स्त्रियांचे आयुष्य अशा उपक्रमात सहभागी झाल्याने कसे बदलून गेले आहे, तथापि या गोष्टींमध्ये सहभागी होणे याला समाजात अद्याप मान्यता कशी नाही आणि त्यामुळे या सरोगेट मदर्सना हे सगळे लपूनछपून कसे करावे लागते याबातची माहिती रंजक तरीही विचार करायला लावणारी आहे. प्रगत देशांमध्येही याबाबत गुप्तता पाळण्याकडेच (यातल्या 'पाळण्या' या शब्दावर कोटी करायचा मोह आवरुन!) लोकांचा कल असतो हे वाचून काहीसे नवलही वाटते. याच अंकातील मारी कॉल्विन या अमेरिकन युद्धपत्रकार महिलेविषयी चा मीना कर्णिकांचा लेखही मुद्दाम वाचावा असा आहे.पाडगावकरांनी 'सलाम' या कवितेच्या वाचनादरम्यान म्हटल्याप्रमाणे 'भय' आणि 'शोषण' यांच्या सावलीत किड्यामुंग्यांसारखे आयुष्य जगणार्यांच्या गर्दीत चेचन्या, श्रीलंका, सीरीया , अफगाणिस्तान अशा जगातील कमालीच्या अशांत भागांत राहून वृतांकन करणार्या, हल्ल्यात एक डोळा गमावूनही जिद्द न हरणार्या आणि अशाच एका हल्ल्यात प्राण गमावणार्या मनस्वी मारीचे वेगळेपण ठळकपणाने दिसत राहाते. लेखिकेने लेखाच्या शेवटी मारीला केलेल्या 'सलाम' मध्ये आपणही सामिल होतो. जराही संवेदनशीलता शाबूत असेल तर हा लेख वाचून लगेचच तरी दिवाळीच्या फराळावर ताव मारणे किंवा पणत्या,मेणबत्त्या, आकाशकंदील, फटाके लावायला धावणे शक्य होणार नाही. या लेखाचे हे मोठे यश आहे असे मला वाटते.
'सत्यमेव जयते' ही आमीर खानची मालिका, मलाला युसुफझाई आणि ग्रेस यांच्याविषयी या वर्षीच्या दिवाळी अंकांमध्ये बरेच लेख आहेत.'मलालाविषयी 'अक्षर' च्या अंकाच्या मुखपृष्ठावरील इरावती यांचे चित्र आणि 'डरते है बंदूकवाले एक निहत्ती लडकी से, फैले है हिम्मत के उजाले, एक निहत्ती लडकी से' हा हबीब जालिब यांचा शेर वाचून मला बरे वाटले. हातात पूजेचे तबक घेऊन, डोक्यावरुन पदर घेऊन, नाकात नथ घालून सुस्मित आणि सलज्ज वगैरे मुद्रेने उभ्या असलेल्या ललनांचे मुखपृष्ठ असलेले अंक आता स्टॉलवरुन उचलावेसेही वाटत नाहीत. अर्थात या पूर्वग्रहाची जबरदस्त किंमत द्यावी लागते. उदाहरणार्थ या वर्षीचा 'माहेर'चा दिवाळी अंक. पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी.दीपावली'त रामदास भटकळांचा ग्रेसवरील (आणि अनिल अवचटांचा आनंद नाडकर्णींवरचा 'माझा आनंदा' (इथेही 'मी आहेच!) हा लेख आहे. अनिल अवचटांचे लेखन आता पूर्वगग्रहाची टरफले काढून वाचताच येत नाही. सदाशिव अमरापूरकरांचा हा लेख ( तो अवचटांचा आहे, हे सोडल्यास!) तसा निर्दोष आहे, पण ते तितकेच. अवचटांच्या लेखनात सगळ्यात महत्त्वाचे पात्र असते ते म्हणजे 'मी'. या लेखातले अमरापूरकरदेखील अवचटांना वाट करुन देण्यासाठी अंग चोरुन उभे आहेत असे वाटते. मुक्तांगण, बासरी, सुनंदा, ओरिगामी, ओतूर....मला वाटते पन्नाशी-साठीनंतरचे माणसाचे आयुष्य हे त्याच्या आधीच्या आयुष्याची रिवाईंड केलेली फिल्मच असते. ती माणसाने शांतपणे, एकट्याने बघावी. वाटल्यास पुन्हापुन्हा बघावी. प्रत्येक अनुभवाकडे 'आता यावर काहीतरी लिहितो...' असे बाह्या सरसावून बघणे माझ्या आकलनापलीकडले आहे. असेच काहीसे मला विजय पाडळकरांचे मौजेतला 'जीएंची प्रतिमासृष्टी आणि सिनेमा' हा लेख वाचताना वाटले. 'मला श्रीखंड आवडते आणि मला चित्रे काढायलाही आवडते, मग मी श्रीखंडानेच चित्रे काढणार..' असे काहीसे पाडळकरांनी केले आहे. पाडळकरांनी 'हंस' मधील 'चोरी (नंतर 'वर्ग-स्क्वेअर' चे चिन्ह) चा मामला' हा लेख का लिहिला हे त्यांना कुणीतरी खाजगीत विचारायला हवे. 'इट हॅपन्ड वन नाईट' चा एक प्रसंग, 'चोरी चोरी' तला एक प्रसंग असे या दोन चित्रपटांच्या पटकथांचे जणू संकलनच पाडळकरांनी सादर केले आहे. सो व्हॉट? यापुढे जाऊन त्यात 'दिल है की मानता नही' चीही भर घालता आली असती. पण पुन्हा एकदा, सो व्हॉट?
भारतातील सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती यांमुळे अस्वस्थ झालेल्या लेखकांचे बरेच लेख या वर्षीच्या दिवाळी अंकांत आहेत. माझ्या मते हे एक चांगले लक्षण आहे. 'वर्षाचा मंगल दिवस, मग त्या दिवशी असलं अभद्र, अपशकुनी कशायला वाचायला पाहिजे?' असल्या विचारांची राखरांगोळी होईल तोच खरा मंगल दिवस. तीच खरी दिवाळी. प्रज्ञा दया पवारांचा 'हा गुन्हा आपण वारंवार करत राहूयात' हा लेख थोडासा दोन्ही हातात तलवारी परजणारा असला तरी या वर्गात मोडणारा आहे. 'माझं बरं चाललंय ना, मग मरु दे तो समाज...' असं म्हणून 'नो पार्किंगमध्ये गाडी लावून, पकडलो गेलोच तर पोलिसाच्या हातात पन्नासाची नोट सरकावून मद्दडपणे सणाची 'खरेदी' वगैरे करणारे लोक अशा लेखांची पाने उलटवून पुढे जातात. त्यांनी तसेच करावे ('माझ्या बुद्धिमत्तेविषयी तुम्ही साशंक झालात. तसेच राहा!' एकनाथ बागूलांना पुलंनी लिहिलेल्या पत्रातले वाक्य!) 'असहाय नागरिक आणि मोडलेली व्यवस्था' हा नरेंद्र चपळगावकरांचा मौजेच्या दिवाळी अंकातला असाच एक लेख.
'दीपावली' तले नंदिनी आत्मसिद्धांचे उर्दू लेखक /शायरांवरील लेख अप्रतिम असतात. 'आईना हमें देखकर (के?) हैरान सा क्यूं है?' हा शहरयार यांच्यावरील लेख असाच आहे. या सगळ्या लेखांचे पुस्तक निघावे (आणि मग आपण ते विकत घ्यावे!) असे मला फार वाटते.
'रेहमानचे वारसदार' या रणजित पवारांच्या लेखाचे त्याच्या शीर्षकाशी काय नाते आहे हे समजून घेणे मला कठीण गेले. पण एकंदरीत नव्या संगीतकारांविषयी फक्त कुत्सित नाराजीच असणार्यांना सावध करणारा हा लेख आहे, हे नक्की. त्यातही पियुष मिश्रा या माझ्या आवडत्या अभिनेता-लेखक-संगीतकाराचा झालेला उल्लेख वाचून मला फार बरे वाटले. या वर्षीच्या बर्याच दिवाळी अंकांमध्ये 'गँग्ज ऑफ वासेपूर' चा टाळ्यांच्या कडकडाटात झालेला उल्लेख बाकी मला कळाला नाही. ते माझे या बाबतीतले अज्ञान असे समजून पुढे जाणेच इष्ट ठरेल.मि. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हाजिर हो' हा चंद्रसेन टिळेकरांचा लेख या वर्षीच्या दिवाळी अंकांतला एक उत्तम लेख मानता येईल . 'आई अंबाबाईच्या कृपेनंच महाराष्ट्र बुद्धिप्रामाण्यवादी आहे' असलं भन्नाट वाक्य लिहिणार्या पुलंना एक माध्यम म्हणून वापरुन टिळेकरांनी समाजाच्या दांभिकपणाला जे चिमटे काढले आहेत त्याचे नाव ते. वैचारिक चालना देणारे लिखाण करायचे तर चकलीचा तुकडा दह्यात बुडवून खाता येण्यासारखेही करता येते याचा हा नमुना म्हणता येईल ( 'खुसखुशीत' हा शब्द लिखाणात वापरणार्याला बाकी आता जनलोकपाल बिलातच दहा हजार वर्षांची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करणे आवश्यक आहे!) सुबोध जावडेकरांचे लेखन मुद्दाम वाट पाहावे असे असते. 'अक्षर' मधील त्यांचा 'माणसं परोपकारी का असतात?' हा लेख मला आवडला.Altruism ही नक्की काय भावना असते? तिचा उगम कुठून होतो? मानवेतर जीवां मध्ये ही भावना असते का? या सगळ्याबाबत जावडेकरांनी केलेला उहापोह रंजक आणि माहितीपूर्ण आहे. (उंदीर आणि चिंपाझींवर या संदर्भात केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष तर फारच!) मुद्दाम वाचावा असा हा लेख आहे.
'दीपावली'च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ वेधक आहे. देवदत्त पाडळकरांच्या या सुरेख चित्राचे 'संवेदना' हे नाव सोडून सगळे मला कळाले. (मौजेच्या अ़ंकाचे 'हेड ऑफ अ वुमन' हे अमेदियो मॉदिलियानीचे मुखपृष्ठ आणि त्यावर असलेला प्रभाकर कोलतेंचा लेख हे मला सौरभ गांगुलीला ऑफ स्टंपवर टाकलेल्या वेगवान बाऊन्सरसारखे फसवून गेले. 'नवचित्रकलेच्या प्रदर्शनात एकेक चित्र बघून मी थोबाडीत मारल्यासारखा चेहरा करुन पुढे सरकत होतो ' हे कुणाचे तरी (आणखी कोण?) वाक्य आठवले. काहीकाही गोष्टी आता नशिबात नाहीत म्हणून सोडून देणे भाग आहे. One may not be elected!) 'लोकमत दीपोत्सव' च्या दिवाळी अंकात 'कपाळमोक्ष होऊन खड्ड्यात पडलो तरी बेहत्तर, पण इतरांनी घालून दिलेल्या वाटेवरुन मी मठ्ठ बैलासारखा चालणार नाही हा उर्मटपणा ही बदलासाठीची पूर्वअट आहे' असं सुभाष अवचट लिहितात . 'जुने जाऊ द्या मरणालागुनि' वगैरे ठीक आहे पण आहे ते मोडल्याशिवाय नवे होणार नाही म्हणून 'मी आधी आहे ते सगळे मोडणार, मग नवे निर्माण होते की नाही ते नंतर बघू हा या अवचटांचा 'उर्मटपणा' मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे!
या आणि इतर अंकांतल्या कविता मी वाचण्याचा इमानेइरबारे प्रयत्न केला. काही परिचित लोकांच्या कविता समजून घेण्याचा मी प्रामाणिक वगैरे प्रयत्न केला आणि त्या मला (नेहमीप्रमाणे) कळाल्या नाहीत, म्हणून मग मी तो नाद सोडून दिला. सुजित फाटक यांची 'अक्षर' मधली 'प्रिय पुणे' ही कविता मला कळाल्यासारखी आणि म्हणून आवडल्यासारखी वाटली.
पुणे,
सह्याद्रीत पडलेलं प्लॅस्टिक हे तुझ्या मेट्रोपोलिटन अस्तित्वाची
डॉल्बी डिजिटल मेलोड्रामाटिक साक्षय
या आणि अशा ओळी ध्यानात राहातात.
आणि शेवटी 'अक्षर' मधल्या निळू दामलेंच्या 'अनोखा व्हिसलब्लोअर' या ज्युलियन असांजबद्दलच्या लेखाविषयी. हा लेख अत्यंत अभ्यासूपणाने लिहिलेला आहे. विशेषतः बगदादमध्ये अमेरिकन सैनिकांनी निरपराध अफगाणी माणसे (व मुले) यांच्यावर विनाकारण केलेल्या गोळीबाराबद्दल असांजने मिळवलेल्या collateral murder या फिल्मविषयी वाचताना अस्वस्थ व्हायला होते. 'वर्तमानपत्रं निष्प्रभ आहेत. बातम्यांचा वापर करुन, ब्लॅक मेलिंग करुन गब्बर झालेले पत्रकार एक शोधा, दहा मिळतील. या गोचीकोंडीतून असांजनं वाट काढली' असं दामले लिहितात. (मग 'लवासा' हे तुमचे पुस्तक हा त्याचाच एक भाग का? असे प्रश्न विचारायचे नसतात!)
बाकी दिवाळी अंक वाचायला अजून सवड झालेली नाही.
उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा
अनेक आभार!
अनेक आभार!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वा !
आता जमेल तितक्या लवकर दिवाळी अंक वाचणें आणि या उत्तम प्रतिसादाशी ताडून पहाणें आले !
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
'अक्षर' घरी येण्याच्या वाटेवर
'अक्षर' घरी येण्याच्या वाटेवर आहे. संजोपरावांच्या प्रतिसादामुळे आता उत्सुकता आणखीच ताणली आहे.
मी सध्या 'असंग्रहित र. धों. "(संशोधन आणि प्रस्तावना: अनंत देशमुख) वाचते आहे. काही पटतं आहे आणि काही गोष्टी अगदीच न पटण्यासारख्या आहेत. पाहूयात वेळ मिळाला तर कदाचित त्या असहम्तींबद्दल लिहिनही..
-मस्त कलंदर
उदरभरण नोहे
स्थापत्यशास्त्र
स्थापत्यशास्त्रावरचं त्या विषयातील अभ्यासकाला (अभ्यासाला सुरवात करून १ वर्ष झालं आहे अश्या - फुल टाईम अभ्यास) भेट म्हणून देता येईल, असं इंग्रजीमधून लिहिलेलं (किंवा इंग्रजीत भाषांतर झालेलं) पुस्तक कोणीतरी सुचवू शकाल काय?
माझं बजेट साधारण ५००-७०० रु आहे. फारच उत्तम पुस्तक असल्यास रु.१००० पर्यंत खर्च करू शकतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रॉबर्ट व्हेन्च्युरीचे
रॉबर्ट व्हेन्च्युरीचे ़'Complexities and Contradictions in Architecture' हे विशेष उल्लेखनिय पुस्तक आहे, किंमतीची कल्पना नाही.
अनेक आभार!
अनेक आभार!
Flipkartवर ९१४ रु मध्ये आहे..
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"बुकगंगे"त माझी दिवाळी अंकाची
"बुकगंगे"त माझी दिवाळी अंकाची ऑर्डर बुडाली की काय कोण जाणे! यायला जाम उशीर होतोय. मागवले आहेत - अक्षर, अंतर्नाद, मुक्तशब्द, पद्मगंधा, उत्तम अनुवाद, मौज, आणि साधना.
पण आजच फ्लिपकार्ट द्वारा हजरः
१. सुमित सरकार, "द स्वदेशी मूव्हमेंट इन बेंगॉल", आधुनिक भारतीय इतिहासलेखनाचे एक अनमोल रत्न. खोल अभ्यास, अस्सल स्रोतच नाही तर जुन्या-नवीन स्रोतांचा अत्यंत मार्मिक आणि क्रियेटिव्ह वापर, आणि प्रथम छापले गेले तेव्हा (१९७३) स्वदेशी चळवळी बद्दलच्या तत्कालीन ज्ञानाला पूर्णपणे पालटणारे पुस्तक. यात राष्ट्रीय चळवळीवर आणि तिच्यातल्या विविध पदरांचा विचार करताना इतक्या नवीन आणि वैदिध्यपूर्ण स्रोतांचा उल्लेख आहे की तेच आता एक प्रकारे या इतिहासाचे स्रोत झाले आहे. सरकार खुद्द मार्क्सवादी इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत, पण तत्कालीन मार्क्सवादी विचारांना, इतिहासपद्धतीलाही त्यांनी सामाजिक-सांस्कृतिक विचारांचे नवे स्वरूप दिले, आणि कायमचे बदलून टाकले. या वर्षी या क्लासिक पुस्तकाची नवीन पेपरबॅक आवृत्ती छापली गेली, म्हणून पुन्हा वाचायला घेतली.
२. हरिश्चंद्र थोरात - कादंबरीविषयी. गौरी देशपांड्यांच्या कादंबरींवरचा लेख वाचायला घेतलाय, खूप आवडतोय. मी त्यांचा कादंबरीशास्त्रावरचा भलामोठा प्रबंध नाही वाचला, पण यातील परीक्षण-लेख रोचक आहेत.
३. खानोलकरांची "गणुराया आणि चानी".
आभार!
द स्वदेशी मुव्हमेन्ट इन बेंगॉलच्या मुखपृष्ठावरील रविंद्रनाथांची भारतमाता बघुन उत्सुकता अधिकच चाळवली आहे. काही तरी नव्या परिप्रेक्ष्यातून तथ्ये मांडली असावीत असे तुमचा परिचय आणि हे मुखपृष्ठ बघुन अधिकच जोमाने वाटते आहे. पुस्तक शोधायला हवे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जयवंत द्ळविन्ची धर्मानंद
जयवंत द्ळविन्ची धर्मानंद वाचली. निळु फुलेनी एका मुलाखतीमध्ये या कादांबरीवर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेंव्हा पासून हे पुस्तक वाचण्याची इच्छा होती. एका कोकणी जमीनदार घराण्याची स्वंतत्रपूर्व काळात होणारी जीवघेणी वाताहत हा मुख्य विषय. कोकणाची पार्श्वभूमी असल्याने एकूण च गूढ डूब कादांबरी ला आली आहे. दळवी च्या इतर लेखनाप्रमाणेच सेक्स हा घटक कहाणीच्या जडणघडणीत इथेपण महत्वाची भूमिका बजवतो. पण सगळ्यात महत्वाच म्हणजे माजघराची सोशिओलोजि. आजी , बनात्या , या स्त्रिया म्हणजे त्याकाळातल्या स्त्रियांच अतिशय जिवंत चित्रण दळवी नि केल आहे. माझ व्यक्तीष: आवडत पात्र म्हणजे खानोलकर मास्तर. त्या मागसल्या गावात थिंकिंग माइनोरिटी मध्ये असणारा हा शिक्षक म्हणजे दैववादाच जिवंत उदाहरण. एकूण च धर्मानंद वाचन हा अस्वस्थ करणारा अनुभव आहे.
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
वासांसि जीर्णानि
'वासांसि जीर्णानि' हा महेश एलकुंचवार यांच्या तीन नाट्यलेखनांचा संग्रह वाचते आहे. या शीर्षकाचं पहिलं 'नाटक' वाचून झालं आणि आवडलं. मरणशय्येवर असलेला गृहस्थ, त्याची पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी आणि घरात आश्रय दिलेली एक विधवा स्त्री - यांचं संभाषण, त्यातून व्यक्त होणारे नातेसंबंधांचे ताणेबाणे - पकडून ठेवणारं आहे.
अवांतरः पण हे नाटक? २५ पानांत मांडलेला संवाद सादर करायला कितीसा वेळ लागत असेल? वाचणं आणि वाचलेले शब्द मोठ्याने बोलणं - त्यातल्या विरामांसह - यात किती फरक पडत असेल वेळेचा याचा अंदाज येत नाहीये नेमका.
***
अब्द शब्द
अवांतरः पण हे नाटक?
मी ह्या नाटकाचा प्रयोग पाहिलेला आहे आणि त्याचा कालावधी तासापेक्षा जास्त नक्कीच होता.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भाषा आणि भाषाविज्ञान
डॉ. रमेश धोंगड्यांचे 'भाषा आणि भाषाविज्ञान' हे पुस्तक वाचतोय. बर्यापैकी खोलवर आणि रोचक माहिती आहे. काही संकल्पना मराठीत कधीच वाचल्या नसल्याने मध्ये-मध्ये अडखळायला होते आहे.
Scoop!
कुलदीप नय्यर यांचे 'Scoop!' वाचतोय. विषय आवडीचा असल्याने आवडतेय
शिवाय काल ५ पुस्तकांची भेट मिळाली (म्हंजे पुस्तके निवडली मीच फक्त पैसे मी भरले नाहित ):
-- मण्यांची माळ - सुनीता देशपांडे
-- रिटा वेलिणकर - शांता गोखले (चित्रपट पाहिलेला नाही. तो पहायचा आहे म्हणून त्याआधी पुस्तक वाचायचं होतं. चित्रपट आधी पाहिलेला असेल तर पात्रांची प्रतिमा डोक्यात ठोस होते -असा अनुभव आहे- जे मला आवडत नाही
-- उत्खनन - गौरी देशपांडे (बर्याच जणांकडून ऐकले असल्याने या लेखिकेचे पहिल्याप्रथम काहि वाचतो आहे)
-- मौनराग - महेश एलकुंचवार (उत्खननची डिट्टो कमेंट)
-- Hello.. I Love You.. Good Bye (लाईट रिडिंग, गेल्या शतकाच्या सहाव्या दशकात केलेल्या अराऊंड द वर्ल्ड सफरीचे प्रवासवर्णन)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
रिटा वेलिणकर
कादंबरी वाचा. ती चित्रपटापेक्षा अधिक परिणामकारक आहे. लेखिकेची माध्यमावर ताकद पक्की आहे. त्याउलट दिग्दर्शिका नवखी आहे. त्यामुळे फार फरक पडतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
ओके
मण्यांची माळ वाचून झाल्यावर आता रिटा वेलिणकर वाचायला घेतले आहे. लेखिकेची पकड 'त्या वर्षी' लाच जाणवली होती, म्हणून हे आवर्जून वाचायला घेतले आहे.
हे वाचून झाल्यावरच चित्रपट पाहणार आहे. तेव्हा त्याबद्दलचे मत देईनच
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
भैरप्पायण सुरू आहे सध्या
This comment has been moved here.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गर्द ...
अनिल अवचट यांचे "गर्द" वाचतोय ..
विषय वेगळा आहे .. गर्दचं व्यसन आणि त्याची मुंबई आणि पुण्यातील व्याप्ती ("reach") का आणि कशी वाढली ह्याचं विदारक चित्रण पुस्तकातून उभं केलय .
गर्दच्या विळख्यात सापडलेल्या लोकांची शारीरिक अवस्था आणि निश्चित अशा अंताकडे त्यांचा चाललेला प्रवास, डॉ. आनंद नाडकर्णी या लोकांवर करत असेलेले विविधांगी उपचार आणि व्यसनग्रस्तांना बाहेर आणण्यासाठी करत असलेले अथक प्रयत्न निश्चितच थक्क करणारे आहेत.
प्रथम आवृत्ती १९८६ साली प्रकाशित झाली असली तरी आताच्या रेव पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विषय अजूनही नक्कीच कालबाह्य झालेला नाही. प्रस्तावनेत मांडलेला - "एखादं पुस्तक इतक्या मोठ्या सामाजिक प्रश्नाला रोखत नसतं , पण या प्रश्नाच्या सुरुवातीच्या अवस्थेत याबाबाबत कोणी जागं केलंच नव्हतं, असं होऊ नये म्हणून हे पुस्तक " हा विचार नक्कीच पटतो.
बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "
https://archive.org/stream
https://archive.org/stream/Gard-Marathi
इथे ऑनलाइन वाचता येइल.
नरहर कुरुंदकर यांचे 'शिवरात्र'
नरहर कुरुंदकर यांचे 'शिवरात्र' वाचतोय.
कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध विचार मांडण्याच्या पद्धतीमुळे स्तिमित व्हायला होते.
पहिल्या भागात गोळवलकर आणि गांधीजी यांच्यावरचे लेखन केले आहे.
वादग्रस्त मुद्दे आहेत. पण तरी लिहितोच.
गांधींवर जो मुस्लिमधार्जिणा संघाकडून आरोप केला जातो तोच मुळात चुकीचा कसा आहे हे कुरुंदकर सिद्ध करुन दाखवत आहेत.
प्रत्यक्षात गोखले व टिळक हे जेव्हा काँग्रेसमधे होते तेव्हाच त्यांनी मुस्लिमांशी विभक्त मतदारसंघाचा करार केला होता. प्रत्यक्षात त्यानंतर गांधीजींनी मुस्लिमांशी असा एकही करार केलेला नाही. त्यामुळे फाळणी टाळण्याच्या वेळी गांधीजींना आलेल्या अपयशाची मीमांसाही कुरुंदकरांनी परखडपणे केली आहे. गोखले - टिळकांच्या धोरणांमुळे झालेल्या नुकसानाचीही चिकित्सा केली आहे.
तसेच गांधीजी हे नेहमीच हिंदूंचे नेते होते व मुसलमानांचे नव्हते असेही ठाम प्रतिपादन मुद्द्यांच्या आधारे त्यांनी केले आहे. मुसलमानांनी कायमच गांधींना विरोध केला होता. त्यांच्याशी गांधीजी नेहमीच गोड बोलत होते पण प्रत्यक्षात करार त्यांनी एकही केलेला नव्हता. यामागची गांधीजींची भूमिकाही कुरुंदकरांनी स्पष्ट केली आहे.
तसेच हिंदुत्त्ववाद्यांचा दम फक्त बोलण्यात होता व कृतीत त्यामानाने नगण्य होता. अशीही चिकित्सा कुरुंदकरांनी केली आहे.
उदाहरणार्थ - स्वातंत्र्यलढ्याच्या संग्रामात हिंदुत्ववाद्यांनी मुळात असे कोणते लढे लढले? तर याचे उत्तर एकही नाही हे कुरुंदकर 'शिवरात्र' मधे सिद्ध करतात. अगदी हैद्राबाद मुक्तीसंग्रामाच्या लढ्यात गांधीजींच्या शब्दाने ज्या गोष्टी झाल्या त्यावेळी हिंदुत्त्ववाद्यांनी कोणतीही कृती केली नाही. त्यामुळे केवळ हिंदुत्त्ववादाचे विचार लोकांना पाजून व कृती न करणार्यांना गांधीजींच्या निर्णयांचे मूल्यमापन करण्याचा अधिकार नाही...इ..इ... अशा अनेक स्पष्ट व सिद्ध करणार्या दाखल्यांनी मन सुन्न होऊन गेले आहे.
फक्त २४ पानेच वाचून झाली आहे. पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर कदाचित त्यावर सविस्तर लिहिन. तूर्तास छोटेसे पुस्तक पण आवाका अगदी प्रचंड आहे अशी सध्याची परिस्थिती आहे.
ह्म्म
मुद्दे वादग्रस्त खचितच आहेत. मात्र वरील मत/चिकित्सा सत्याच्या (किंवा खरंतर माझ्या मताच्या ) खूप जवळ जाणारे वाटले.
टिळकांना राजकीय दृष्ट्या असंतोषाप्रमाणेच हिंदु संघटनेचे जनक का म्हणू नये असे हे लेखन वाचून वाटते. त्यातला कोरडा/पोकळ अभिनिवेश दुर्लक्षिला तरी विचार करण्यायोग्य बरेच मुद्दे रहातात.
तुझ्या या परिचयानंतर पुस्तक विकतच घ्यावे असे ठरवत आहे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
खरे आहे ऋ
सत्य हे कठोर असते हेच खरे. मला त्यांचे बरेचसे मुद्दे पटले. सुदैवाने मी गोविंद तळवलकरांची 'सत्तांतर' सिरिज, फाळणीपूर्व भारतातील घटनाक्रम व राजकारण यांच्यावर वा तत्सम अनेक पुस्तके वाचली असल्याने कुरुंदकरांच्या मांडणीतली खोली लगेच जाणवली.
गांधीजींनी १९३४ सालीच काँग्रेसच्या सदस्यत्त्वाचा त्याग केला होता. असे असूनही भारतीय जनमानसावर गांधीजींची असलेली पकड, प्रभाव व ते राष्ट्रपिता का ठरले यावर नरहर कुरुंदकर यांची चिकित्सा जबरदस्त आहे.गांधीजींना आपण राष्ट्रपिता का मानतो? याची सर्व बाजूंनी जी मांडणी त्यांनी केली आहे ते पाहून खरोखर अचंबा वाटतो.
खरे तर शिवरात्र मधील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा वेगळ्या धाग्यावर व्हायला हवी. वाचून पूर्ण झाल्यावर मी तसा प्रयत्न नक्की करेन.
तुझ्या या परिचयानंतर पुस्तक विकतच घ्यावे असे ठरवत आहे
तुझ्यासारख्या खर्याचा शोध सातत्याने घेणार्या अभ्यासकाला हे पुस्तक म्हणजे खचितच पर्वणी आहे याची मला खात्री आहे. कुरुंदकरांची 'जागर' व 'धार आणि काठ' ही देखील याच पठडीतील पुस्तके आहेत. अर्थात विषय थोडे वेगळे आहेत. कुरुंदकरांच्या तर्कशुद्ध चिकित्सा पद्धतीचे तुम्ही एकदा फॅन झालात की त्यांचे प्रत्येक पुस्तक ही एक पर्वणी ठरते. 'मनुस्मृती' हाही त्यांचा असाच अप्रतिम ग्रंथ आहे. पण बाजारातून तो अदॄश्य होऊन बहुतेक दशक होत आले आहे.
दिसले नाही
मी जालावर शोधत होतो. बुकगंगा / फ्लिककार्टावर दिसले नाही. तु कुठून घेतलेस?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अक्षरधारातून घेतले होते
मी अक्षरधारातून मागच्या महिन्यात घेतले होते.
दिवाळीत पुण्याला आलो होतो. पण अचानक काही अडचणींमुळे दौरा आटोपता घ्यावा लागला. पण शिवरात्र पुण्यात आलो त्याच्या दुसर्याच दिवशी घेता आले.
बुगगंगावर आहे की
हा घे शिवरात्रचा थेट दुवा
गांधीजी आणि मुसलमान या
गांधीजी आणि मुसलमान या संदर्भात कुरूंदकरांचे विचार पुस्तकातून वाचलेले नाहीत. पण हा प्रतिसाद पहाता, डॉ. सदानंद मोरेंनी 'लोकमान्य ते महात्मा'मधे असाच निष्कर्ष काढलेला आहे असं दिसतं. पुस्तकात १८६ पानं आहेत हे पहाता कदाचित कुरूंदकरांनी तपशील दिले नसावेत, जे डॉ. मोरेंच्या ग्रंथात बर्यापैकी प्रमाणात आहेत. पण निष्कर्ष तसेच.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
समयोचित आठवण
धन्यवाद आदिती,
या एका छान पुस्तकाची समयोचित आठवण करुन दिलीस तू.
कुरुंदकरांचे पुस्तक म्हणजे तर्कशुद्ध निष्कर्ष आहेत तर तू म्हणतेस तसे सदानंद मोरेंचे पुस्तक अवाढव्य असल्याने त्याची व्याप्ती ही भरपूर पुराव्यांनी भरलेली आहे. य.दि.फडके, कुमार केतकर, सदा डुम्बरे, दिलिप चित्रे आदी मान्यवरांनी गौरविलेला हा ग्रंथ खरोखर छान आहे. बुकगंगावर या पुस्तकाची काही पाने वाचता येतील.
मण्यांची माळ
Scoop! नंतर सुनीता देशपांडेंचं मण्यांची माळ वाचायला घेतलं आहे. पुलं असतानाचे व गेल्यांनतरचेही असे विविध लेख या पुस्तकात आहेत. एकूणच वाचनानंद देणारं, प्रसंगी हळावां करणारं तर पुन्हा एकवार स्वतःला बाहुरून निरखण्याच्या गुणांमुळे सुनीताबाईंना सलाम करायला लावणारं पुस्तक प्रसंगी आत्मचिंतनासही भाग पाडते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१ हेच म्हणतो
सुनिताबाईंची पुस्तके एकूणच मनात घर करुन राहण्यासारखी असतात.
त्यांची एवढी विद्वत्ता व समज पाहून खरोखर स्तिमित व्हायला होते.
सध्या
ब्रेकिंग डॉन वाचतो आहे.
ट्वायलाईट सिरीजचे आधीचे भाग वाचले होते, मात्र ब्रेकिंग डॉन चित्रपट पाहण्याची इच्छा जास्ती तिव्र असल्याने, त्यावर येणारे ट्वायलाईट चित्रपटाचे दोन्ही भाग बघितल्यावरच ते हातात घेण्याचे ठरवले होते.
ट्वायलाईट सिरीज मधिल इतर पुस्तके :-
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २
एका तेलियाने
गिरीश कुबेर यांचे 'एका तेलियाने' हे पुस्तक वाचून जवळ जवळ संपत आले आहे. ह्या विषयावरचे हे पहिलेच पुस्तक वाचतोय. बरीच नवीन आणि रोचक माहिती मिळते आहे.
कन्फेशन्स ऑफ अ ठग
नुकतंच 'कन्फेशन्स ऑफ अ ठग' हे इंग्लिश पुस्तक वाचून काढलं. १८३० ते १८३६ या काळात इंग्रजांनी ठगांचा बीमोड केला. त्या काळात पकडलेल्या अनेक शेकडो ठगांना फाशी दिली, दीड-दोन हजारांना काळं पाणी किंवा तुरुंगवास मिळाला. काहींना माफीचा साक्षीदार केलं. त्यापैकी एक - अमीर अली. त्याने आपल्या गुन्हेगारी इतिहासाची जी कथा सांगितली ती त्याच्या भाषेतच सांगितलेली आहे.
संपूर्ण पुस्तक मन लावून वाचण्यापेक्षा भराभर चाळून संपवण्याचं हे पुस्तक आहे असं मला वाटतं. याचं मुख्य कारण म्हणजे त्यातली भाषा. एकतर पावणेदोनशे वर्षांपूर्वीची इंग्लिश, त्यातही अमीर अलीच्या उर्दूचं जवळपास शब्दशः भाषांतर केलेलं असल्यामुळे ते वाचायला जड जातं. मात्र ते बाजूला केलं तर त्यातली कथा सुरस आणि चमत्कारिक आहे. अनेक ठिकाणी अरेबियन नाइट्सचा भास होतो.
या पुस्तकातला मला आवडलेला भाग म्हणजे ठगांचं विश्व त्यात उत्तम निर्माण केलेलं आहे. प्रवाशांचा विश्वास ते कसा संपादन करतात, त्यांना किती शिताफीने ठार करतात, कसे व्यवस्थितपणे गाडून पुरावे नष्ट करतात हे वाचून अंगावर काटा येतो. त्या काळी प्रवास करणं म्हणजे केवढं जिकिरीचं काम होतं हे जाणवतं. शतकानुशतकं चालू असलेल्या या निर्घृण खुनांना आळा घातल्याबद्दल ब्रिटिशांना जनतेने दुवा का दिला असावा हे आता कळतं. (खुशाल गाठीला सोनं बांधून काशीला जावं... वगैरे वाक्यं ऐकलेली आहेत)
दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे या सगळ्याकडे बघण्याचा अमीर अलीचा दृष्टिकोन. स्वतःच्या हाताने किमान १०० तरी खून केलेला माणूस स्वच्छ मनाने स्वतःला धार्मिक आणि एकंदरीत भला माणूस समजतो. अगदी मोजक्या वेळेलाच त्याला पश्चात्तापसदृश भावना होतात.
एकंदरीत वेगळ्या विषयावरचं पुस्तक, सुरूवातीची शंभरेक पानं नीट वाचून पुढची भराभर संपवण्याजोगं आहे. मला वाटतं यावर सिनेमा बनलेला आहे, तो बघितला तर उत्तम.
तत्कालीन ठगी बद्दलच्या
तत्कालीन ठगी बद्दलच्या लेखनाचा ब्रिटिश साम्राज्याच्या समर्थनात किती मोठा वाटा होता, आणि खासकरून विलियम स्लीमन यांच्या लेखनानी ठग आणि ठगांबद्दलचे एक विशिष्ट, विकृत रूप इंग्रजी वाचकांपुढे कसे ठेवले; अमीर अली सारख्या 'साक्षीदारां' च्या जबानींच्या 'सत्या'चे स्वरूप काय, वगैरे वगैरे यावर अलिकडे बरेच संशोधन झाले आहे. टेलर च्या कादंबरीचा या साम्राज्यवादी चर्चाविश्वातील स्थानाबद्दल, आणि कादंबरीच्या कथानकावर रचना-स्वरूपावर विख्यात इंग्रजी इतिहासकार मेरी पूवी यांचा रोचक लेख आहे, तुम्हाला कदाचित वाचायला आवडेल.
जाता जाता, पूवी यांचे प्रसिद्ध पुस्तक 'A History of the Modern Fact ही मस्त आहे.
नेव्हर ट्रस्ट अ थिन कूक.
सुट्ट्या चालू आहेत आणि सोफ्यावर लोळत वाचायला काहीतरी रंजक (आणि पलायनवादी) वाचायला म्हणून एरिक ड्रेग्नीचे 'नेव्हर ट्रस्ट अ थिन कूक' हे त्याच्या इटलीतल्या वास्तव्यातल्या 'चविष्ट' अनुभवांवर आधारित लिहिलेल्या, छोट्याछोट्या वर्तमानपत्रातल्या स्तंभांचं पुस्तक वाचते आहे. खुसखुशीत, विनोदी आणि सहजसोपे तरीही मार्मिक निरोक्षणे असलेले पुस्तक आवडते आहे. तसे हे सर्वच अनुभव खाण्याशीच संबंध असलेलेच असे नाहीत पण इटलीबद्द्ल काहीही लिहायचे म्हटले तर खाण्याविषयीचे अपरिहार्य संदर्भ येतातच. त्याबद्द्ल अधिक सांगणारे 'व्हाय इटालियन्स लव्ह टू टॉक अबाउट फूड' हे इलेना कोस्टूकोविचचे अर्धवट वाचलेले पुस्तकही पूर्ण करायचे आहे.
ही सगळी पुस्तके वाचताना ऑलिव्ह तेलात बुचकळून खायला फोकाचियाची सुरेख साथ आहे!
नेव्हर ट्रस्ट अ थिन कूक.
सुट्ट्या चालू आहेत आणि सोफ्यावर लोळत वाचायला काहीतरी रंजक (आणि पलायनवादी) वाचायला म्हणून एरिक ड्रेग्नीचे 'नेव्हर ट्रस्ट अ थिन कूक' हे त्याच्या इटलीतल्या वास्तव्यातल्या 'चविष्ट' अनुभवांवर आधारित लिहिलेल्या, छोट्याछोट्या वर्तमानपत्रातल्या स्तंभांचं पुस्तक वाचते आहे. खुसखुशीत, विनोदी आणि सहजसोपे तरीही मार्मिक निरोक्षणे असलेले पुस्तक आवडते आहे. तसे हे सर्वच अनुभव खाण्याशीच संबंध असलेलेच असे नाहीत पण इटलीबद्द्ल काहीही लिहायचे म्हटले तर खाण्याविषयीचे अपरिहार्य संदर्भ येतातच. त्याबद्द्ल अधिक सांगणारे 'व्हाय इटालियन्स लव्ह टू टॉक अबाउट फूड' हे इलेना कोस्टूकोविचचे अर्धवट वाचलेले पुस्तकही पूर्ण करायचे आहे.
ही सगळी पुस्तके वाचताना ऑलिव्ह तेलात बुचकळून खायला फोकाचियाची सुरेख साथ आहे!
'आम्ही अन आमचा बाप'
'आम्ही अन आमचा बाप' वाचतेय.
लेखनकाळात वाचले असते तर विशेष अन वेगळे वाटले असते.आता दलित साहित्य भरपूर झाल्याने फारसे वेगळे वाटले नाही.
वेगळे वाटले नाही? आश्चर्य आहे..
मला तरी इतर दलित साहित्यापेक्षा खूपच वेगळे वाटले. जास्त प्रांजळ आहे,मुद्दाम भडक रंगवलेले नाही.
आक्रस्ताळेपणा तर मुळीच नाही. अत्यंत संयत मांडणी.
आणि एकूण संरचनाही निराळी आहे - बापाचे आत्मकथन, भावंडांचे आत्मकथन ,कुटुंबातील स्त्रियांचे आत्मकथन आणि शेवटी नव्या पिढीचे आत्मकथन.
नरेन्द्र जाधवांनी हे अनुभवकथन वेगळ्या पद्धतीने हाताळलेलं आहे. भाषाशैलीही ज्यात्या प्रथम पुरुषाला साजेशी आहे.
दलितांच्या त्या काळातील परिस्थितीबद्दल सत्याच्या अधिक जवळ जाणारे असे हे पुस्तक आहे.
सर्व प्रश्न अनिवार्य
रमेश इंगळे उत्रादकर यांची "सर्व प्रश्न अनिवार्य" कादंबरी वाचायला घेतलीय. परिवर्तनाचा वाटसरू मध्ये या कादंबरीवर एक रोचक लेख वाचल्यावर मागवली.
पन्नास-एक पानं वाचली आहेत, पाळीपाळीने भयानक विनोदी, आणि निराशाजनक पुस्तक. शालेय शिक्षणाच्या दैनंदिन विश्वात बसवलेले कथानक, शिक्षणाच्या नावाखाली चालणारे, अंगावर काटा आणणारे प्रकार, विचार आणि घटना, पण तरी ही विलक्षण सहानुभूतीनी चितारलेली आणि विनोदी पात्रे आणि संवाद. कथानक मधूनच निवेदन उगीच प्रचारक आहे, पण अजून तरी मधूनमधूनच.
इथे कोणी वाचली आहे का? असल्यास अभिप्राय वाचायला आवडेल.
मौनराग
मौनराग वाचुन झाले. अतिशय आवडले. त्यातील प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे एका ललित लेखनाचा प्रवास जाणवतोही आणि समृद्धही करून जातो.
आता आजच Hello.. I Love You.. Good Bye वाचायला घेतले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हार्डी
थॉमस हार्डीचं 'जूड द ऑबस्क्योर' आणि फ्रॉईड्चं 'ईंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स'
All Creatures Great and Small
जेम्स हेरियटचं All Creatures Great and Small वाचायला सुरूवात केली आहे. फारच मजेशीर गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल आधी या धाग्यात थोडं बोलणं झालेलं आहे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
झिम्मा - विजया मेहता हिरा
झिम्मा - विजया मेहता
हिरा पवार यांचे आत्मचरित्र - नाव आठवत नाही आत्ता.
अधोरेखित - सुप्रिया विनोद
रिपोर्टिंगचे दिवस - अनिल अवचट.
'झिम्मा' विशेष आवडते आहे. नाटक आणि वैयक्तिक आयुष्य यांबद्दल पुरेसे लिहिले आहे ('लमाण'मधे जर्रा वैयक्तिक काही येतेसे वाटले, की लागू घाईघाईने त्यावर काट मारून मगच पुढे लिहीत गेले असावेत असा संशय आलावता. त्यामुळे ते दस्तावेज म्हणून ठीक. पण फार कोरडे वाटले होते. याउलट 'झिम्मा'.) आणि तरी कसलीही अनावश्यक स्पष्टीकरणे, लफडी, नालस्ती यांचा मागमूस नाही. निरनिराळे - वैयक्तिक आणि व्यावसायिक आणि अभ्यासविषयातले - निर्णय घेण्याच्या प्रक्रिया, त्यातली घालमेल, आनंद, सहकलाकार आणि मित्रांचा सहभाग, काळाचे भान - हे फार सुंदर उलगडत चालले आहे.
'अधोरेखित' मधे व्यक्तिचित्रे आहेत आणि ती बहुतांशी 'अक्षर'च्या दिवाळी अंकांतून पूर्वप्रकाशित आहेत. पण या बाईंचे लिहिणे मला आवडते. पुरेसे अलिप्त आणि पुरेसे व्यक्तिसापेक्ष असते. त्यातले रसिका जोशी, ठक्कर, अरुण होर्णेकर, प्रभावळकर या व्यक्तींवरचे लेख विशेष सुंदर.
बाकीची दोन हाती घेतली की वृत्तान्त कथीन.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
'मेलुहाचे मृत्युंजय' - मराठी अनुवाद
'मेलुहाचे मृत्युंजय' मराठी अनुवाद काल रात्रीच वाचून झाले.
पुस्तकातील तांत्रिक चुकांकडे दुर्लक्ष करुन आणि एक फिक्शन म्हणून वाचले तर हे पुस्तक चित्तवेधक आहे. खिळवून ठेवण्याची क्षमता या कादंबरीत नक्कीच आहे. तसेच ही कादंबरी वाचकाला पुढील भाग वाचण्यास उद्युक्तही करते. आता पुढील मराठी भाग कधी प्रकाशित होतोय याकडे लक्ष आहे.
कादंबरीत शिवाचे पात्र अतिशय सक्षमपणे रंगवलेले आहे. महादेव, रुद्र या विभिन्न व्यक्तीरेखांनंतर शिव हा महादेवाची जबाबदारी स्वीकारणारा श्रीरामानंतरच्या काळातला नायक आहे. महादेवाची जबाबदारी तो पेलू शकेल की नाही याबद्दल शिवाच्या मनातील आंदोलने अतिशय ताकदीने कादंबरीत उतरवलेली आहेत. मेलुहाच्या लोकांची जीवनपद्धती देखील वाचकाला प्रभावित करते. सतिचे पात्र अतिशय प्रभाव टाकते. तसेच कनखला, पार्वतेश्वर व आयुर्वती ही देखील या कादंबरीची लक्षात राहणारी ठळक पात्रे. दक्षाची भूमिका पटत नसली तरी त्याची व्यक्तीरेखा फारसा प्रभाव सोडत नाही. मेलुहाचे लोक सूर्यवंशी व प्रभू श्रीरामाच्या आदर्श नियमांना काटेकोर पणे मानणारे असतात व त्यांचे चंद्रवंशी लोकांशी वितुष्ट असते. कादंबरीत दक्षकन्या सतिवर दोनवेळा हल्ला करणारी व अधून मधून वावरणारी बुरखाधारी नाग व्यक्ती कथानकात रहस्य व उत्कंठा निर्माण होण्यास बर्याच वेळा हातभार लावते.
ही कादंबरी वाचणार असाल तर थोड्या सूचना :
१. पहिली शंभर-सव्वाशे पाने नेटाने वाचावी लागतील
२. तांत्रिक चुका वा आजच्या काळातल्या वापरलेल्या परिमाणांकडे दुर्लक्ष करा
३. अनुवादिकेने या कादंबरीचा अनुवाद करण्यासाठी बरेच परिश्रम केले आहेत पण सुरुवातीला तिच्या अनुवादांमधील किरकोळ चुकांकडे प्रयत्नपूर्वक काणाडोळा करा. पुढील दोन्ही भागांचे अनुवाद याच अनुवादिकेने केले तर ती जास्त योग्य न्याय देऊ शकेल असे वाटते.
४. चिकित्सक भूमिकेतून हवे तर वाचा पण एक फिक्शन म्हणून वाचले तर कादंबरी खरोखर वाचनानंद देते.
मेलुहाचे मृत्युंजय या कादंबरीविषयी मी वर जे लिहिले आहे ते अर्थातच माझे वैयक्तीक मत आहे. कोणाचा अनुभव वेगळा असेल तर माहिती करुन घ्यायला अवश्य आवडेल.
मी याचे वरिजिनल इंग्रजी
मी याचे वरिजिनल इंग्रजी वाचलेय. ते चांगले आहे, पण ४००० वर्षांपूर्वीच्या पात्रांच्या तोंडी हॉलीवुडपटी (विशेषतः अॅक्शनपटी) भाषा वापरलेली पाहून थोडे कसेसेच झाले. कथा म्हणून चांगलेच आहे, त्यात शंका नै. इम्मॉर्टल्स ऑफ मेलूहा नंतर दि सीक्रेट ऑफ नागाज हे पुस्तक येते, तेही वाचले. दर्जाबद्दल पहिल्यापेक्षा डावेच म्हणावे लागेल. कथा लै कै प्रेडिक्टेबल नै पण क्लिशे वाटली. त्यामुळे तिसरे "ओथ ऑफ दि वायुपुत्राज" हे विकत घेण्याचे धाडस होत नैये.
बाकी पहिल्याचे यश हे त्याच्या पहिलेपणात सामावलेले आहे. निव्वळ शैलीनुसार पाहिले तर तत्सम कादंबर्यांशी तुलता येईल का? याबद्दल मी तरी साशंक आहे. पण इंग्रजीतील तत्सम कादंबर्या मी वाचल्या नाहीत. नाही म्हणायला याच्याशी अंशतः तुलता येईल अशी कादंबरी म्हंजे मायकेल क्रैटनची टैम्लैन. तिच्या पासंगालाही ही पुरत नै. लेखक अमिष त्रिपाठीचा इतिहास पक्का आहे, हे मात्र जाणवत राहते. मेलूहा हे हडप्पा संस्कृतीचे सुमेरियन रेकॉर्ड्स्मध्ये येणारे नाव हेतुपुरस्सर वापरणे, मेहेरगढ़, संगमतमिऴ्,अशी नावे हळूच खुबीने पेरणे, हे माझ्यातल्या इतिहासप्रेमीला सुखावते. बेटा तसा कल्पक आहे.
पण ही एक चांगली सुरुवात आहे, याबद्दल दुमत नसावे. इथूनच हळूहळू असे प्रयत्न होतील अशी आशा. काय माहिती, असे प्रयत्न झालेही असतील. असा प्रयत्न भारतिय पुराणकथांबद्दल अन्य कोणी केला असेल तर किमान मला तरी माहिती नाही-एक सणसणीत अपवाद म्हणजे रामायण ३३९२ ए.डी. ही कॉमिक्स सेरीज. हाष्टेलात असताना एक शिनुमा-साहित्य-कॉमिक या त्रयीचा फ्रीक आमचा दैवयोगाने मित्र होता त्याच्यामुळे ही कॉमिक बुक्कें पहावयास मिळाली. कथा आणि चित्रकला दोन्ही अप्रतिम, अफलातून, भन्नाट आहेत. रामाला किक-** अॅक्शन हीरोचे रूप देण्यात कॉमिककार पूर्ण यशस्वी झालेले आहेत.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वर्मावर बोट
बॅटमॅन नेमके वर्मावर बोट ठेवले आहे.
पण ४००० वर्षांपूर्वीच्या पात्रांच्या तोंडी हॉलीवुडपटी (विशेषतः अॅक्शनपटी) भाषा वापरलेली पाहून थोडे कसेसेच झाले.
बॅटमॅन माझाही हाच गोंधळ उडाला होता. म्हटले पुस्तक वाचावे की नाही? तेव्हा मग मी या तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले व मूळ कथानकाकडे लक्ष दिले. पहिला भाग वाचला असल्याने पुढील दोन भागांनंतर शेवट काय ही उत्सुकता असल्यामुळे मी नक्की वाचेन. मनाचे समाधान होईलच याची खात्री तुमच्या प्रतिसादामुळे वाटत नाहिये. तरी पण पुढील २ भागांचे मराठी अनुवाद अवश्य वाचणार आहे.
आता रामायण ३३९२ ए.डी. च्या मागे लागतो. या माहितीबद्दल खरेच धन्यवाद.
ओक्के. पण इंग्रजी बुक्के
ओक्के. पण इंग्रजी बुक्के सवलतीत उपलब्ध असताना आणि तुमचे इंग्रजी वाचन तगडे असताना अनुवादित मराठी का वाचता असा एक प्रश्न पडला.असो.
बाकी रामायण सेरीज मात्र अवश्य वाचाच! टोरेंट मदतीला आहेच
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गैरसमज नको
पण इंग्रजी बुक्के सवलतीत उपलब्ध असताना आणि तुमचे इंग्रजी वाचन तगडे असताना अनुवादित मराठी का वाचता असा एक प्रश्न पडला.असो.
बॅटमॅन भाऊ, तुमचा गैरसमज नको. इंग्रजीत ज्या विपुलतेने साहित्य उपलब्ध आहे ते पाहता, मी काहीच वाचलेले नाहिये. आणि मराठी पुस्तकांच्या तुलनेत मी इंग्रजी पुस्तके बरीच कमी वाचली आहेत. मला मराठी वाचनच जास्त आवडते. सुदैवाने इंग्रजी साहित्य आता मराठीतही मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे त्याला प्राधान्य देतो एवढेच.
होय रामायणाची टोरेन्ट मिळाली आहे. लवकरच उतरवून घेतो
गैर किंवा कसलाही समज झाला
गैर किंवा कसलाही समज झाला नाही. जरासे ऑड वाटले होते इतकेच. हरकत नाही. खुलाशाबद्दल धन्यवाद भोचकपणाबद्दल स्वारी.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
मलाही अनेकदा ऑड वाटते.
अहो स्वारी कशाबद्दल म्हणती आहे तुमची स्वारी? हा हा हा...
तुमचे ऑड वाटणे साहजिक आहे. मला स्वतःलाही अनेकदा वाटते पण मुळापासून गोष्टी समजून घेताना अनेकदा अनुवाद हा एक अभ्यासाचा विषय होऊन जातो आणि ते मला आवडते. माझ्याकडे मेलुहा इंग्रजी व हिंदीतून पण आहे. पण हिंदी फारसे वाचू शकलो नाही. मराठी अनुवादाची उत्सुकता व अपेक्षा होती त्याप्रमाणे ती पूर्णही झाली. अनुवादिकेने खरोखर बरीच मेहनत घेतली आहे.
बॅटमॅन यांनी उल्लेखिलेल्या रामायण ३३९२ ए.डी. ची कॉमिक्स येथून पीडीएफ स्वरुपात उतरवून घेता येतील. एकदम सहीच दिसत आहेत ही कॉमिक्स. लवकरच वाचेन. बॅटमॅन भाऊ रामायणाच्या माहिती बद्दल धन्यवाद
अवांतरः बॅटमॅनभाऊ भोचकपणा चालूच ठेवा. मला आवडला
हर्कत नै मग. बाकी तो दुवा
हर्कत नै मग.
बाकी तो दुवा गंडलाय बहुतेक, ओपन होत नैये. संपादकास्नी सांगता का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
थेट लिंक
ही थेट लिंक : http://www.filecrop.com/ramayan-3392-ad-pdf.html
तो दुवा का काम करत नै ते कळाले नै... असो...
थेट लिंक मुळे काम व्हावे
धन्यवाद
धन्यवाद
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
सगळ्यांच्या सोयीसाठी या
सगळ्यांच्या सोयीसाठी या धाग्याचा पुढील भाग सुरू केला आहे. तो इथे वाचता येईल
यापुढील नव्या पुस्तकांबद्दलचे प्रतिसाद नव्या धाग्यावर द्यावेत ही विनंती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!