आवरणच्या निमित्ताने

भैरप्पायण सुरू आहे सध्या Smile वंशवृक्ष आणि आवरण वाचल्या नुकत्याच. वंशवृक्ष ची स्टोरी वेगळी आहे तर आवरणचा मेसेज वेगळा आहे. भैरप्पांची संयत शैलीत उदात्तापासून विदारक अनुभव सांगण्याची शैली विशेष आवडली. इतिहास आणि इतिहासलेखनात ज्यांना रस आहे अशा सर्वांनी आवरण जरूर वाचावी अशी शिफारस करेन. आवरणमध्ये सिलेक्टिव्ह रीडिंग करणार्‍या आणि तेच इन्फरन्सेस ऐक्याच्या नावाखाली लोकांच्या तोंडावर मारणार्‍या इतिहासलेखकांची पार वाट (कादंब्रीपुर्ती तरी का होईना Wink ) लावण्यात भैरप्पा पुरते यशस्वी झालेले आहेत. या कादंबरीच्या लोकप्रियतेचे एक उदाहरण म्हंजे कन्नडमध्ये तिच्या २ वर्षांत २० आवृत्त्या निघाल्या!!

संपादक मंडळः "सध्या काय वाचताय-२" या धाग्यातील वरील प्रतिसादापासून या विषयावर व्यनीमधून चाललेली चर्चा दोन्ही पक्षांच्या अनुमतीने जाहिर करत आहोत. जेणे करून या विषयावर इतर मतमतांतरे व्यक्त करता येतील

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

जितक्यावेळा आवरणचा विषय निघेल तितक्यावेळा माझे प्रतिकूल मत नोंदवेन अश्या भुमिकेतून हा पुस्तकविश्वमधील चर्चेतील माझ्या प्रतिसादाचा दुवा पुन्हा देत आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरील धाग्यावर व्यक्त केलेल्या वल्लींच्या मताशी सहमत. (अवांतर-सहा सोनेरी पाने हे पुस्तक प्रचंड एकांगी आहे, बौद्ध-जैनांवर अनावश्यक टीका केलीये त्यात. उगीच पोलिटिकल करेक्टनेससाठी म्हणून म्हणत नाहीये, खरंच सांगतोय) पात्रे पकड घेणारी आहेत, लक्ष्मी आणि प्रो. शास्त्री ही पात्रे विशेष पकड घेणारी आहेत-शास्त्रींबद्दल म्हणतोय कारण तशी काही लोकं पाहिली आहेत, पण ती प्रॉफ वगैरे नाहीयेत.

उरला सिलेक्टिव्ह रीडिंगचा मुद्दा. इथे मजा अशी आहे, की मुसलमानी इतिहासाच्या उदात्तीकरणाविरुद्ध कोणी बोलले रे बोलले, की लगेच हिंदू समाजात जात्याधारित व्यवस्थेमुळे लोकांना जे हाल भोगावे लागले, का नाही बोलत, म्हणून विचारणा होते. हे बंधन का असावे? लेफ्टिस्ट, सेक्युलॅरिस्ट वगैरे लोकांमुळे हिंदू कट्टरपंथाला तसाही सेफ्टी चेक आहेच. पण इस्लामला नाही. पण निव्वळ हे सत्य कोणी बोलून दाखवले की लगेच सिलेक्टिव्ह रीडिंगचा आरोप केला जातो, जे गलत आहे. हिंदू धर्माबद्दल नेहमी अपॉलोजेटिक बोलले पाहिजे, हा अप्रत्यक्ष सूर मला बिलकुल एकांगी वाटतो. मुद्दा इतकाच आहे, की ही सगळी ऑब्जेक्टिव्हिटी, सगळी साधनशुचिता नेहमी हिंदू धर्मासाठीच का राखीव आहे?? मूळ विवेचनाचा गड्डा तो आहे. त्यामुळे हिंदू धर्मांतर्गत इश्श्यूज तिथे अवांतरच झाले असते. हे म्हणजे दलित वाङ्मयात विदिन-दलित जातिभेद का दिसत नाहीत, असे विचारण्यापैकी आहे. दलितांमध्ये सुद्धा प्रचंड जातिभेद आहेत, हे नाकारता येत नाही. पण असे असले तरी दलित म्हणून त्यांना उच्चजातीकडून कमीअधिकपणे सारख्याच प्रमाणात वाईट वागणूक मिळालेली आहे, आणि ते लोक त्यांच्या साहित्यातून त्या वागणुकीविरुद्ध आवाज उठवतात, त्याला अन्याय्य म्हणता येत नाही. तोच न्याय इथे. हिंदूंत जातिभेद आहेत, पण हिंदू म्हणून मुसलमानांकडून त्यांना सारख्याच प्रमाणात वाईट वागणूक मिळाली आहे. त्यामुळे त्या वागणुकीवर कोणी टीका केली तर ती अन्याय्य कशी??

आणि इतिहासात ती वागणूक मिळाल्याचे असंख्य दाखले असतानाही, हिंदू राजांच्या कोपर्‍याकापर्‍यातल्या गोष्टी हट्टाने उजेडात आणून त्यांवर टीका करायची आणि मुसलमान राजांच्या दुर्वर्तनावर पांघरूण घालायचे, हा सरळसरळ दुटप्पीपणा झाला. याला माझा सक्त विरोध आहे, आणि अशी प्रवृत्ती दिसते तिजविरुद्ध वाचा फोडणारी कादंबरी म्हणून मला आवरणचे महत्व मोठे वाटते.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अपेक्षित प्रतिसाद Smile

दोन गोष्टी
१. माझा आक्षेप हा एकांगी लिहिण्यावर नाही. माझा आक्षेप आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या पुस्तकाला
अ. 'आवरण' हटवू पहाणारी म्हणताय
ब. ससंदर्भ लेखनाचा दावा करताय
तर येणारे तपशील हे 'गाळून' यायला नकोत. आवरण हटवल्यावर स्वतःला आवडते/पटते/सोयिस्कर वाटते केवळ तीच भुमिका दिसता कामा नये.

मला सहा सोनेरी पाने इतकी एकांगी असली तरीही मला ती आवरण पेक्षा बरीच जास्त आवडते. कारण त्यात 'आमचा कसा अभ्यास आहे बघा' असा बोभाटा नाही, तथ्ये आपण पहिल्यांदाच उजेडात आणतो आहोत असा आव नाही. नाविन्याचा मुद्दा उचलतोय कारण याच कादंबरीला भारतीय 'डा विंची कोड' म्हटलंय. सहा सोनेरी मध्ये एक 'भुमिका' आहे. इथेही तशीच भुमिका आहे पण मांडणीचा आव वेगळा आहे .. काहिसा 'डरपोक' आहे म्हटल्यास अतिशयोक्ती होऊ नये.

तेव्हा अश्या पुस्तकांच्या आवृत्त्या भराभर संपल्यास नवल नाही कारण ही 'जाहिरातींची गिमिक्स' यशस्वी आहेतच. मात्र त्यामुळे पुस्तक अचुक किंवा योग्य होतेच असे नाही.

२. पात्रांची पकड, कादंबरी म्हणून कथा प्रवाही नसणे, गोंधळलेले संपादन वगैरे माझे मुद्दे इथे मांडत नाही कारण ते व्यक्तीसापेक्ष आहेत. तेव्हा त्याबाबत चर्चा पुढे नेण्यात हशील दिसत नाही.

आता वतील प्रतिसादातील आक्षेपांकडे वळू

मुद्दा इतकाच आहे, की ही सगळी ऑब्जेक्टिव्हिटी, सगळी साधनशुचिता नेहमी हिंदू धर्मासाठीच का राखीव आहे??

कारण हिंदु धर्मियांचा दावा आहे की ते स्वतःत काळाप्रमाणे बदल घडवतात, वाईट प्रथा टाकून नेहमी प्रगतीशील असतात थोडक्यात ते सहिष्णू आहेत. किंबहुना 'बदल आणि पळवाटा' याच गुणांमुळे हिंदु धर्म टिकला आहे असे म्हणता यावे. असा दावा आणि असे गुण असणारा दुसरा धर्म माझ्या माहितीत नाही. किंबहुना हिंदुंसारखी लवचिकता, इस्लामाप्रमाणे शक्ती किंवा ख्रिश्चॅनिटी प्रमाणे धनाश्रय घेता न आल्याने इतर धर्म म्हणावे तितक्या वेगात फोफावले नाहीत काहि तर रोडावत आहेत किंवा संपत आहे. असो अवांतर झाले तेव्हा ही साधनशुचिता पाळायचे बंधन हिंदुधर्मियांनी घातले आहे इतरांनी नाही. हिंदु वगळता इतर धर्मीय आमचा धर्मही सहिष्णू आहे असे सांगु लागतात आणि हिंदु धर्मिय कट्टर होऊ पहातात तेव्हा त्यांनी आपापला धर्म टाकला असतो असे मला वाटते. हिंदुत्त्व कट्टर नसल्यानेच टिकले आहे असे माझे मत आहे. (मुळात हिंदु कोण? याचे उत्तर घटनाकारांनाही देता आले नाही ते काही उगाच नव्हे या पार्श्वभुमीवर श्री. अटलबिहारी वाजपेयी यांचे हिंदु हा धर्म नाही केवळ आचारसरणी आहे. हे मत सत्याच्या अधिक जवळ जाणारे वाटते पण ते असो.)

आणि इतिहासात ती वागणूक मिळाल्याचे असंख्य दाखले असतानाही, हिंदू राजांच्या कोपर्‍याकापर्‍यातल्या गोष्टी हट्टाने उजेडात आणून त्यांवर टीका करायची आणि मुसलमान राजांच्या दुर्वर्तनावर पांघरूण घालायचे, हा सरळसरळ दुटप्पीपणा झाला. याला माझा सक्त विरोध आहे

सहमत आहे माझाही याला विरोध आहे. त्याच वेळी याच्या पात्रांच्या (हिंदूच्या जागी मुसलमान आणि उलट)अदलाबदलीसही विरोध आहे इतकेच. किमान ज्या कादंबरीने इतकी मोठी संदर्भसूची छापली आहे त्या कादंबरीस तर नक्कीच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझ्या ह्या मुद्याला उत्त्तर नै ना दिले त्वां

मुद्दा इतकाच आहे, की ही सगळी ऑब्जेक्टिव्हिटी, सगळी साधनशुचिता नेहमी हिंदू धर्मासाठीच का राखीव आहे?? मूळ विवेचनाचा गड्डा तो आहे. त्यामुळे हिंदू धर्मांतर्गत इश्श्यूज तिथे अवांतरच झाले असते. हे म्हणजे दलित वाङ्मयात विदिन-दलित जातिभेद का दिसत नाहीत, असे विचारण्यापैकी आहे.दलितांमध्ये सुद्धा प्रचंड जातिभेद आहेत, हे नाकारता येत नाही. पण असे असले तरी दलित म्हणून त्यांना उच्चजातीकडून कमीअधिकपणे सारख्याच प्रमाणात वाईट वागणूक मिळालेली आहे, आणि ते लोक त्यांच्या साहित्यातून त्या वागणुकीविरुद्ध आवाज उठवतात, त्याला अन्याय्य म्हणता येत नाही. तोच न्याय इथे. हिंदूंत जातिभेद आहेत, पण हिंदू म्हणून मुसलमानांकडून त्यांना सारख्याच प्रमाणात वाईट वागणूक मिळाली आहे. त्यामुळे त्या वागणुकीवर कोणी टीका केली तर ती अन्याय्य कशी??

बाकी आवरणला डा विंची कोड म्हण्णे चूक आहे. आणि तसे पाहिले तर डा विंची कोडमध्ये तरी ओरिजिनल रिसर्च कुठेय? जे आधी माहिती होते, तेच चटकदारपणे मांडलेय. अगदी त्याच प्रकारे नसले तरी थोड्याफार प्रमाणात इथे तेच झालेय ना. शिवाय, आवरणमध्ये जो इश्श्यू घेतलाय, तो आधी कुठल्या कादंबरीत कव्हर केला गेलेला आहे का?

हिंदु वगळता इतर धर्मीय आमचा धर्मही सहिष्णू आहे असे सांगु लागतात आणि हिंदु धर्मिय कट्टर होऊ पहातात तेव्हा त्यांनी आपापला धर्म टाकला असतो असे मला वाटते.

सहमत.

त्याच वेळी याच्या पात्रांच्या (हिंदूच्या जागी मुसलमान आणि उलट)अदलाबदलीसही विरोध आहे इतकेच (स्माईल) किमान ज्या कादंबरीने इतकी मोठी संदर्भसूची छापली आहे त्या कादंबरीस तर नक्कीच.

हा एक अनावश्यक आग्रह वाटत नाही का? पॉलिटिकल करेक्टनेसचा हा आग्रह अस्थानी आहे असे म्हटले तर? (माझे तरि हेच म्हणणे आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वरील सगळ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची तर २-३ भागांचा धागाचा काढावा लागेल म्हणून त्यातला एकच निवडून मोजकेच लिहिले.

हा एक अनावश्यक आग्रह वाटत नाही का? पॉलिटिकल करेक्टनेसचा हा आग्रह अस्थानी आहे असे म्हटले तर?

मी या भुमिकेला विरोध करत नाहिये. म्हणजे जर ही एक ऐतिहासिक 'कादंबरी' म्हणून समोर आली असती (जसे मराठीत अनेक ऐतिहासिक कादंबर्‍या आहेत) तर मला कदाचित आवडलीही असती. पण कादंबरीत दिलेली माहिती योग्य आहे इतकेच मत असणे वेगळे आणि 'हेच सत्य आहे' असा 'आवेश' असणे वेगळे. मुसलमान राजवटीत झालेले अत्याचार अधिक प्रभावीपणे अनेकदा आले आहेत. पण ते सांगताना तसा मथळा घेऊन निबध लिहा. इथे दोन्ही पक्ष मांडतो आहे असा अविर्भाव आहे. विविध धर्मीय पात्रांची योजना आहे मात्र एकाच धर्माला काळ्या रंगात 'निर्णायकपणे' रंगवले आहे. माझा आक्षेप तसा रंगवण्याला नसून तश्या 'निर्णायक' मताला आहे. पूर्णविरामाला आहे.

दुसरं असं की मुसलमान राजांच्या दुर्वर्तनावर पांघरूण घालायचे हे अयोग्य असेल तर हिंदुं राजांच्या दुर्वर्तनावर पांघरूण घालायचे योग्य कसे? असे खडे सवाल टाकावेत तसा पोकळ अभिनिवेशी ड्वायलाग मारायचा मोह आवरणे कठीण आहे Wink

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे दोन्ही पक्ष मांडतो आहे असा अविर्भाव आहे. विविध धर्मीय पात्रांची योजना आहे.

इथे दोन्ही बाजू आलेल्याच आहेत की! प्रोफेसर शास्त्रींच्या रूपाने एस्टॅब्लिशमेंटचे म्हण्णे काय आहे ते तर कळतेच आहे. लक्ष्मी ज्या मतांना विरोध करतेय, ती मते ठीकठिकाणी आलेली असून त्या दुसर्‍या पक्षाचीच आहेत. मग एकच बाजू मांडली आहे हा आक्षेप कसा काय उरतो?

मात्र एकाच धर्माला काळ्या रंगात 'निर्णायक पणे' रंगवले आहे. माझा आक्षेप तसा रंगवण्याला नसून तश्या 'निर्णायक' मताला आहे. पूर्णविरामाला आहे.

मी मगाशीदेखील याचे उत्तर दिलेय तिकडे लक्ष द्या ना प्लीज समजा दलित साहित्य हा विषय आहे, तर त्यात बाय अँड लार्ज, उच्चजातींनी दलितांवर केलेले अत्याचार विखारी भाषेत येणे स्वाभाविक आहे की दलितांतर्गत तेढीचे वर्णन ? तोच न्याय इथे का लावू नये? दलित साहित्यात उच्चजातींचे चित्रण फार काळ्या रंगात केलेय असा आक्षेप घेणे बरोबर आहे का? माझ्या मते फारसा नाही. का? तर त्यामागे अनुभव आहेत तसे. सिमिलरलि, या कादंबरीचा विषय इतिहासलेखनातल्या एका धोकादायक प्रवृत्तीशी संबंधित असल्याने , त्या प्रवृत्तीचे बॅशिंग तिथे येणे स्वाभाविकच आहे. बाकी दोन्ही बाजूंची मते आणि काळ्यागोर्‍या रंगाबद्दल विवेचन वर दिलेलेच आहे.

दुसरं असं की मुसलमान राजांच्या दुर्वर्तनावर पांघरूण घालायचे हे अयोग्य असेल तर हिंदुं राजांच्या दुर्वर्तनावर पांघरूण घालायचे योग्य कसे? असे खडे सवाल टाकावेत तसे पोकळ अभिनिवेशी ड्वायलाग मारायचा मोह आवरणे कठीण आहे

मी तर म्हणतोय कराच सर्वांना नंगे कशाला सोडायचं साल्यांना? ऑन अ सीरिअस नोट, मुस्लिम राजांनी आपल्या अत्याचारांवर नेहमी धर्माचे पांघरूण घातलेले आहे, त्याच्या आधारे अत्याचार जस्टिफाय केलेले आहेत, त्यामुळे मुस्लिम राजांच्या वर्तनावर टीका=इस्लामवर टीका हे समीकरण बर्‍याच अंशी व्हॅलिड राहील. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अतिशय घाईत आहे.. एकच लिहितो.. बाकीचे उद्या:

मग एकच बाजू मांडली आहे हा आक्षेप कसा काय उरतो?

मुसलमानांची बाजु सक्षमपणे मांडली आहे असे खरेच वाटते का?

दलितांवरील अन्यायावर आधारित कादंबरीत एकांगी चित्रण योग्यच वाटते कारण ते तसे होते. तत्कालीन काळात दलित व्यक्तींनी सवर्णांवर अन्याय केल्याचे दाखले अत्यल्प आहेत. वर व्यक्त केलेल्या राजवटीच्या काळात तसे म्हणता येईल का? असो. बाकी नंतर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मुसलमानांची बाजु सक्षमपणे मांडली आहे असे खरेच वाटते का?

या प्रश्नाचे उत्तर

तत्कालीन काळात दलित व्यक्तींनी सवर्णांवर अन्याय केल्याचे दाखले अत्यल्प आहेत. वर व्यक्त केलेल्या राजवटीच्या काळात तसे म्हणता येईल का

या प्रश्नाच्या उत्तराशी निगडित आहे असे मला वाटते. कादंब्रीमधील राजवटीच्या काळात मुस्लिमांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची ढिगाने उदाहरणे सापडतील हे मला माहितीच आहे, जऽरा वेळ मिळाला तर हे कंपाईल करणे काऽही अवघड नाही. त्यामुळे मुस्लिमांचे चित्र एकांगी येणे हेही स्वाभाविकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

इथे दोन्ही बाजू आलेल्याच आहेत की! प्रोफेसर शास्त्रींच्या रूपाने एस्टॅब्लिशमेंटचे म्हण्णे काय आहे ते तर कळतेच आहे.<<
नाही रे. खूप सुलभीकरण आहे हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

>> समजा दलित साहित्य हा विषय आहे, तर त्यात बाय अँड लार्ज, उच्चजातींनी दलितांवर केलेले अत्याचार विखारी भाषेत येणे स्वाभाविक आहे की दलितांतर्गत तेढीचे वर्णन ? तोच न्याय इथे का लावू नये? दलित साहित्यात उच्चजातींचे चित्रण फार काळ्या रंगात केलेय असा आक्षेप घेणे बरोबर आहे का? माझ्या मते फारसा नाही. का? तर त्यामागे अनुभव आहेत तसे.<<

साहित्यमूल्याचे निकष इतिहासाला लावू नयेत आणि इतिहासाचे निकष साहित्याला लावू नयेत असं वाटतं. वरच्या मतात हे गृहित धरलेलं आहे की दलित साहित्य हे उच्चजातींनी त्यांच्यावर केलेल्या अन्यायाभोवतीच प्रामुख्यानं फिरावं. माझ्या मते ही अपेक्षासुध्दा दलित साहित्यावर आणि पर्यायानं दलितांवर अन्यायच करणारी आहे. ह्या वर्षीच्या एका दिवाळी अंकात प्रज्ञा दया पवारांचा एक लेख आहे. दलित जातींच्या अंतर्गत स्त्रियांवर जे अन्याय होतात त्यांना पुरेशी वाचा फुटत नाही, अशी खंत त्यांनी त्यात व्यक्त केली आहे. ती या संदर्भात बोलकी आहे.

अनेक वर्षांच्या परंपरेनंतरही एखाद्या प्रकारच्या साहित्यात जर त्याच त्याच प्रकारचे अनुभव येत असतील, तर साहित्यमूल्याच्या निकषावर ते साहित्य कुठेतरी कमी पडतंय असं वाटू लागणार नाही का? वेगळ्या जाणीवा, वेगळे अनुभव, वेगळी भाषा म्हणून सुरुवातीला गौरव होणं उचितच आहे, पण विशिष्ट मुद्द्यांवरचं अडकलेपण कोणत्याही प्रकारच्या साहित्याला हानिकारक ठरतं. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषेतल्या भारतीय साहित्याविषयीसुध्दा असे मुद्दे येतात. म्हणजे ते एक्झॉटिकच असावं अशी काही पाश्चात्यांची त्याकडून अपेक्षा असते. जर सुशिक्षित, नागरी भारतीय समाजाच्या आधुनिक जाणीवा त्यात दिसू लागल्या, तर 'याला काय भारतीय साहित्य म्हणायचं?' असे आक्षेप घेतले जातात. असेच मुद्दे स्त्रीवादी साहित्य, 'गे' साहित्य अशा कॅटेगरींसंदर्भात येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हम्म दलित उपमा अंमळ गंडली वाट्टं.आता

अनेक वर्षांच्या परंपरेनंतरही एखाद्या प्रकारच्या साहित्यात जर त्याच त्याच प्रकारचे अनुभव येत असतील, तर साहित्यमूल्याच्या निकषावर ते साहित्य कुठेतरी कमी पडतंय असं वाटू लागणार नाही का? वेगळ्या जाणीवा, वेगळे अनुभव, वेगळी भाषा म्हणून सुरुवातीला गौरव होणं उचितच आहे, पण विशिष्ट मुद्द्यांवरचं अडकलेपण कोणत्याही प्रकारच्या साहित्याला हानिकारक ठरतं.

याच्याशी सहमत आहेच. पण आवरणचा विषय असा चघळला गेला आहे का? मुसलमानांकडून पूर्वी हिंदूंवर झालेले अत्याचार हा विषय नाहीच्चे, तर तो इतिहासलेखनपद्धतीशी निगडित आहे. त्यामुळे विषयाचे नावीन्य तर आहेच, नैका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नुकताच आवरणबद्दल हा रिव्ह्यू हाती लागला. उत्तम आहे, या चर्चेत आधी न उल्लेखिलेले बरेच मुद्दे कव्हर केलेत. यावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाचला. आभार. नवे मुद्दे आहेतच. पण तरी प्रस्तूत लेखक हे परिक्षण "suggestio falsi वरचे आवरण काढणारी कादंबरी", त्यात असलेली तथ्ये, त्याची योग्यता, वैशिष्ट्ये वगैरे या दृष्टिकोनातून करतो आहे. मात्र त्या कादंबरीत जे दिले आहे ते चुक आहे, गैर आहे, अवास्तव आहे असा (किमान माझा) मुद्दाच नाही, कादंबरीतील सत्य अपूर्ण आहे. तिथे आवरण काढताना सोयीस्कर suggestio falsi वरचेच आवरण काढले आहे, ज्यामुळे वाचकापर्यंत सत्य व्यवस्थित पोचत नाहिच - अर्धवटच पोचते (अर्थात आधीपेक्षा अधिक पोचते तरी अर्धवटच) - असा माझा आक्षेप आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सप्रेशिओ व्हेरि वरचे आवरण ही कादंबरी काढत नाही असे का वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

माहित नाही. बहुदा सापेक्ष असावे.
आधी अजिबात माहित नसलेले (किंवा दडवलेले?) असे नवे फारसे काही त्यात मिळाले नाही. "सहा सोनेरी पाने" मध्ये वगैरे बहुतांश मुद्दे येऊने गेलेले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके. बहुतांश ऐतिहासिक मुद्दे आधी इतरत्र येऊन गेलेले आहेत हे मान्यच. अर्थातअच कादंबरीचे नावीन्य त्यात नाही. पण इतिहासलेखनात ऐतिहासिक घटनांचे प्रतिबिंब कसे पडते आणि इतिहासकारांच्या सर्कल्समध्ये ओव्हरऑल चित्र कसे असते याबद्दल भाष्य करणारी कादंबरी दुसरी मला दिसली नाही. मागे एकदा म्हटल्याप्रमाणे इतिहासलेखनपद्धतीवरील भाष्य हे आवरणचे डिफाइनिंग फीचर ठरावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवरण कादंबरीने तथाकथित डाव्या आणि पुरोगाम्यांच्या काडकन मुस्काडीत मारलेली आहे.
पण माझंच ढुंगण लाल करत नाचणा-या डाव्यांना अक्कल येणार नाही.
हिंदूद्वेष हेच त्यांचे एकमेव कर्तव्य असतं असं मानून जगत असतात्

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही बहुचर्चित कादंबरी , बऱ्याच उशीरा, म्हणजे यावर्षी वाचली. कादंबरीच्या बाबतीत मी बॅटमनशी सहमत आहे. समजा, अगदी एकच बाजू दाखवली असे गृहीत धरले, तरी जी दाखवली आहे ते सत्य आहे, हे तरी मान्य करा. तेही डावे मान्य का करत नाहीत ?
गोध्र्यामधे कारसेवकांना डब्यांत कोंडून जाळले ते कुणी , हे जगाला माहीत आहे. पण लालु यादवच्या कमिटीने, कारसेवकांनीच दारे बंद करुन स्वत:ला जाळून घेतले, असा निष्कर्ष काढला. कारसेवक अगदी चुकीचे कृत्य करुन आले होते, त्यांनी स्टेशनवरच्या चहा वाल्यांशी उद्धटपणे व्यवहार केला, हे सर्व खरे आहे. तरीही, त्यांना जिवंत जाळण्याचे कृत्य करणाऱ्यांना आजपर्यंत, कुठल्या पुरोगाम्यांनी दोषी ठरवले आहे ?
या देशांत पूर्वी बहुसंख्य हिंदु अहिंसक प्रवृत्तीचे होते. ते आज हिंसेच्या पातळीवर उतरले आहेत. हा बॅकलॅश कशामुळे आला ? याचा तरी नि:पक्षपणे विचार करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परफेक्ट बघा. एकच एक बाजू कायम रेटत राहिली की कधी ना कधी बॅकलॅश येणार आणि जितकी मोठी ॲक्शन तितकीच मोठी रिॲक्शन येणार. डावे आणि त्यांचे बगलबच्चे किंवा पेट्रन्स कितीही रडूदेत. त्यांनीच लावलेल्या विषवल्लीची फळे आज बाधताहेत सर्वांना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चोक्कस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथली चर्चा वाचून आवरण वाचली. तिरशिंगराव आणि बॅटमॅनशी बऱ्याच अंशी सहमत आहे. ऋषिकेशशी पण बऱ्याच अंशी सहमत आहे.
इतिहासात झालेल्या कृत्याचा स्वीकार व्हायला हवा आहे. माफी फार पुढची गोष्ट पण स्वीकार व्हायला हवा आहे.
फोडाफोडी अजून नकोच पण त्या ठिकाणी फलक असायला हवाय.
त्याचवेळेला जिथे जिथे संशोधनातून सिद्ध होईल तिथे तिथे बौद्ध वास्तू फोडून/ बळकावून हिंदू मंदिरे बांधली गेल्याचाही स्वीकार व्हायला हवा आहे.

आपल्याला (आत्ताच्या माणसांना) हेरिटेज सांभाळणे या गोष्टीची अक्कल पुरेशी आलेली आहे तर आपण अजून फोडाफोडीचा आग्रह धरता कामा नये.

पण होते काय (हे पुढचे केवळ कादंबरीबद्दल) की भैरप्पा आपला इस्लामद्वेष आणि ब्राह्मणी किंवा सनातनी हिंदुत्वाचे अपार आणि आंधळे कौतुक यातून सुटका करून घेऊ शकले नाहीयेत. अशी शेकडो वाक्ये पेरलेली आहेत कादंबरीभर. परत गाडी सतत गोमांसभक्षण वगैरे प्रतिकांशीच घोटाळते. प्रो. शास्त्री, लक्ष्मीचा नवरा आणि मुलगा हे इतके काळेकुट्ट करून टाकलेत. प्रो. शास्त्रींची ख्रिश्चन बायको (फिरंगी म्हणजे ख्रिश्चनच हा एक विनोद आहेच), त्यांची मुलगी हे भटकलेले जीव वगैरे ही अशी एकांगी गृहितके ठायी ठायी सापडत राहतात.
त्या वाक्यांनी सगळी विश्वासार्हता धुळीस मिळते. एवढा केलेला अभ्यास वाया जातो. अनेकांचे फावते.

  • ‌मार्मिक4
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

प्रतिसाद आवडला.
मलाही हेच म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढा केलेला अभ्यास वाया जातो. अनेकांचे फावते.

एवढ्या कारणासाठी कादंबरी वाचण्याची इच्छा होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यातली किमान काही प्रतीके ही ओव्हर आर्चिंग द्वेषातून आलेली असण्यापेक्षा भैरप्पा-अनंतमूर्ती या वैयक्तिक संघर्षाचा परिणाम म्हणून आलेली वाटतात. प्रो. शास्त्री म्हणजे अनंतमूर्ती असे वाचल्याचे आठवते.

बाकी इस्लामद्वेषापेक्षा मुस्लिमद्वेषावर फोकस पाहिजे लोकांचा. इस्लाम ही एक विचारसरणी आहे, इतर कुठल्याही विचारसरणीसारखी. फक्त एका विचारसरणीच्या सो कॉल्ड द्वेषावर लोक फोकस का करतात कोण जाणे. तुम्ही वैयक्तिक काही करताहात असे म्हणणे नाही, पण तुमच्या प्रतिसादामुळे लिहायला निमित्त झाले बस. इस्लामची अनुदार चिकित्सा करणे म्हणजे इस्लामद्वेष नव्हे हेही जाता जाता नोंदवून ठेवतो. कैक मुसलमानांना व्हिक्टिमगंड असतो आणि त्यामुळे अशा कुठल्याही चिकित्सेला इस्लामद्वेषाचे लेबल लावले की झाले, साला ते लेबल म्हणजे ब्रह्मास्त्र झालंय अलीकडचं. समोरची व्यक्ती एकदम "सीदन्ति मम गात्राणि" होऊन जाते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओके हा शाब्दिक फरक मी लक्षात घेतला नव्हता. माझ्या डोक्यात आला नव्हता. फरक नक्की समजण्याइतके द्न्यान माझ्याकडे नाही. आणि मी लेबल चिकटवत नाहीये.
मुस्लिम माणसांना आणि नॉन-हिंदुत्ववादी लोकांना काळेकुट्ट रंगवणे, मुस्लिम घरातले डिप्रेसिंग वातावरण आणि या सगळ्यातली अतिशय सपाट अशी जनरलायझेशन्स. सनातनी ब्राह्मणी हिंदुत्वापलिकडे एक हिंदु जग आहे याचे भानही नसणे किंवा दुर्लक्ष करणे (उदाहरणार्थ बळी द्यायची परंपरा आमच्या धर्मात नाही वगैरे विनोद). एका टिपिकल प्रो-हिंदु नजरेनेच केवळ दोन्ही धर्मांबद्दल बोलणे. हे विविध ठिकाणी प्रचंड हुशारीने पेरलेले आहे (भैरप्पांच्या लिखाणातल्या हुशारीला टोप्या उडवू सलाम आहे!).
माझा तरी निर्देष तिकडेच आहे.
धर्माची चिकित्सा करायला तेवढे वाचन पाहिजे त्या त्या धर्माच्या तत्वद्न्यानाचे, पद्धतींचे, चालीरितींचे. ते माझे नाही.

अरे हा द्न्य कसा काढायचा? ज्ऽज करून पण येत नाहीये.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

याच्याशी अंशत: सहमत आहे. बाकी ज्ञ = j+Y.

तरी शेवट मला आश्वासक वाटला त्यातल्या त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बहुतांशी पुरोगाम्यांचे कोणत्याच धर्माचे वा तत्वज्ञानाचे अभ्यास वाचन नसते. असतो तो फक्त एक आविर्भाव - मलाच सारे कळते. त्यातून हिंदू सॉफ्ट टार्गेट. हाणा तिच्यायला त्याला. वर सुधारक म्हणुन मिरवता येते.

आवरण परिपूर्ण नाही पण बुरखे टराटरा फाडून पुरोगाम्यांचे योग्य मूल्यमापन करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0