पळीपंचपात्रीचा कंठाळी खडखडाट आणि झोला, बिंदी, मेणबत्तीची किणकिण

या प्रतिसादाच्या पुढच्या दोन-चार प्रतिसादांना उत्तर -

मला इथे थोडं वेगळं म्हणायचं आहे.

मुलायम सिंगांच्या विधानाला फालतू, बेताल, आचरट अशा प्रकारची जी काही विशेषणं लावायची असतील ती लावायला ना नाही. लावावीच, हे विधान त्याच लायकीचं आहे. पण मला मुद्दाम उठून या विधानाचा निषेध करावासा वाटत नाही. कारण माझ्या परिसरातले, माझा निषेध ज्यांच्या कानावर पडेल असे सगळेच लोक या विधानाचा निषेध करणाऱ्यातले आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टीने हे विधान ढवळून काढणाऱ्यातलं नाही. (उलट उदाहरण, अरुण खोपकरांचं पत्र.) दुसरं म्हणजे (माझा राजकारणाचा अभ्यास नसला तरी) मुलायम सिंग हा इसम फार लक्ष देण्याच्या पात्रतेचाच नाही. मग तो हो म्हणाला काय आणि नाही म्हणाला काय, काय फरक पडतो. पुन्हा हे विधान, मी, माझ्या परिसरातले लोक यांच्या संदर्भात आहे.

स्त्रियांविरोधात जे काही गुन्हे घडतात त्यांत बलात्कार, हुंडा, हुंडाबळी, या आणि अशा गोष्टी सर्वथैव अन्याय्य आहेत असं माझ्या परिसरातले सगळेच लोक समजतात. त्याबद्दल पुन्हा पुन्हा बोलण्यात मी माझा वेळ का दवडावा? मला त्यात रस वाटत नाही आणि मला (किंवा कोणालाही) ठराविक गोष्टींमध्ये रस वाटावा अशी अपेक्षा आणि/किंवा जबरदस्ती करणं हा अडाणीपणा आहे. (अडाणीपणा वाचून माझं शिक्षण+करमणूक होतात, त्यामुळे माझा त्यावर आक्षेप नाही.) मला ज्या बारकाव्यांमध्ये रस आहे तसं काहीही दिसत नाही तेव्हा मला त्या विशिष्ट विषयांवर वेळ दवडावा असं वाटत नाही.

स्त्रियांचे प्रश्न म्हणून मला माझ्या परिसरात निराळ्या गोष्टी घडताना दिसतात. किरन गांधी नावाची स्त्री पाळी सुरू असताना, पॅड/टँपन न वापरता लंडन मॅरेथॉनमध्ये धावते, तिचे वडील आणि भाऊ तिला प्रोत्साहन देतात, तिच्याबरोबर सराव करणाऱ्या तिच्या दोन मैत्रिणी पूर्णवेळ तिच्या जोडीने धावतात, याची बातमी होते. मला ही बातमी महत्त्वाची वाटते. किरन गांधी रक्ताचा टिळा मिरवत का धावली याबद्दल तिचे विचार मला महत्त्वाचे वाटतात. स्त्रिया, त्यांना निसर्गनियमानुसार येणारी मासिक पाळी आणि त्याबद्दल डॉनल्ड ट्रंप (अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनू पाहणारा रिपब्लिकन उमेदवार-उत्सुक) पासून माझ्या फेसबुकवर फ्रेंडलिस्टीत असणारे पुरुष कसा (अ)विचार करतात याबद्दल जरा विस्ताराने केलेला विचार मला महत्त्वाचा वाटतो.

कंठाळी आवाजात "याचा का नाही निषेध करत" असं किंचाळणं हे निष्कारण माझ्यावर (आणि इतर अनेकांवरच) सार्वजनिक शरम लादण्याचा प्रकार आहे. I won't budge to this sort of public shaming. हा प्रकार त्याज्य आहे. मुलायम सिंगाचा निषेध करण्याच्या फंदात मी पडणार नाही. पण "आता बोला, आता का गप्प"छाप विचारसरणी आणि अभिव्यक्तीचा मी ठाम निषेध करते.

(जाताजाता - मुलायम सिंगांचा निषेध करणं योग्यच आहे. इतरांवर सार्वजनिक शरम लादू पाहणाऱ्या काहींनी, हा धागा काढेस्तोवर स्वतः "निषेध" असा शब्दही लिहिलेला नाही; हे ही मजेशीर.)

माफीनामा - या धाग्यात दोन विषय एकत्र केले आहेत; हेतूपुरस्सर नाही. यापेक्षा बरा उपाय सुचला नाही म्हणून हे. दोन्ही विषय चर्चेचा भाग असतील अपेक्षा आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

कोणत्याही बॉडी फ्लुइडस ची किळस वाटत असल्याने माझा पास.
___
असं पास म्हणून पास होत नाहीये.
सुचत नाही या बातमीवर काय वाटतय ते. थोड्या वेळात विचार (कलेक्ट) करुन लिहीते.
_____
कोणाची पाळी आहे म्हटलं की मला काहीतरी इन्टेन्स होतं. सांगता येत नाही - तिच्या त्रासाबद्दल वाईट वाटणे + आपल्या पाळीची आठवण + त्या स्त्रावाच्या वासाची घृणा सगळं एकदमच होतं.
यात स्त्रीला कमी लेखण्याचा प्रश्नच नाही.
आई लहानपणी (टीनेज) मध्ये सांगायची पॅड नुसतं फेकू नकोस, ते धुवून फेक. मी याबद्दल ओरडाही खाल्ला आहे. तिचे म्हणणे होते कुत्री-मांजरं खेळतात , खातात वगैरे. अन तरीही मला इन्ट्युइटिव्हली हे माहीत होतं की तिला कोणी व्यक्तीने (मांत्रिक आदि) मिसयुझ करु नये असे वाटे. मी यासंदर्भात ना कधी ऐकले ना तिला विचारले. पण मला ते माहीत होते. .............. Go ahead & ridicule me.
_____
असं जॉगिंग करणं हे मला सुपर शॉकिंग + अननेसेसरी वाटते. काही क्षेत्रे ही फक्त स्त्रियांचीच असतात. स्त्रीत्वाची mystery / enigma, Lining of the womb अशी चव्हाट्यावर आणणे कसेतरीच वाटते. I found above incidence sad.
.
अजुन एक इतका धाडसी (जगात प्रथमच) निर्णय तिने एका रात्रीत घेतला? काहीच्या काही वाटतं ते.
____
माझी आवडती कवयित्री ल्युसिल क्लिफ्टन या विषयावरची ही कविता -

to my last period
Lucille Clifton,
.
well, girl, goodbye,
after thirty-eight years.
thirty-eight years and you
never arrived
splendid in your red dress
without trouble for me
somewhere, somehow.
.
now it is done,
and i feel just like
the grandmothers who,
after the hussy has gone,
sit holding her photograph
and sighing, wasn’t she
beautiful? wasn’t she beautiful?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन एक इतका धाडसी (जगात प्रथमच) निर्णय तिने एका रात्रीत घेतला? काहीच्या काही वाटतं ते.

तिचा हा निर्णय आणि कृती धाडसी होतं खरंच. त्या धाडसाबद्दलच मला तिच्याबद्दल आदर वाटतो.

पण हा निर्णय तिने एका रात्रीत घेतला असं मला वाटत नाही. वर्षभर मॅरेथॉनसाठी ती मेहेनत करत होती. थोडं धावणाऱ्या लोकांनाही मॅरेथॉन धावणं म्हणजे किती कष्ट आणि निर्धार यांची आवश्यकता असेल ते माहित असणार. तिच्या मनाची तयारी वर्षभर सुरू होती. ही मॅरेथॉन झाली एप्रिलमध्ये, त्याच्या काही दिवस आधीच इन्स्टाग्रामने पाळीचं रक्त चादरीवर सांडलंय असा एका कलाकाराचा फोटो हटवला होता. तिच्या तक्रारीनंतर तो पुन्हा प्रकाशित झालाही, पण ... त्याच सुमारास अनेक देशांमध्ये पाळीबद्दल असणारे संकोच या प्रकारचं लेखन पाश्चात्य माध्यमांमध्ये प्रकाशित व्हायला सुरुवात झाली होती.

आदल्या रात्री संधी उपलब्ध झाल्याचं तिला लक्षात आलं. विचार आधीपासूनच सुरू असण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इन्स्टाग्रामला काय प्रॉब्लेम होता म्हणे? त्यांचा तर फक्त प्लॅटफॉर्म आहे, ना? तिथे काय सादर होतं त्यावर नैतिक पोलीसगिरी करण्याचा त्यांना काय हक्क?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नैतिक पोलिसगिरी नाही. सोशल मिडीया पुरुषांना फुलासारखं जपतंय, (हहपुवा खवचटपणा) अशी मांडणी तेव्हा गार्डीयनमध्ये एक लेख आला होता, त्यात होती. लेख शोधून लिंक देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://www.theguardian.com/commentisfree/2015/mar/30/social-media-protec...

हा म्हणत असावीस.
___
यावरुन एक मस्त किस्सा (खरा) आठवला. स्टारबक्स मध्ये एक स्त्री स्तनपान करत होती आणि एका महीलेस ते आवडले नाहे. तिने जाऊन काऊंटरवर तक्रार केली. त्या काऊंटरवरच्या पुरुषाने काय करावे - तो खणखणीत, सर्वांना ऐकू जाइल अशा आवाजात त्या स्तनपान करणार्‍या स्त्रीला म्हणाला - कौतुकास्पद काम करते आहेस तू. चालू ठेव. आनि तिला कॉफी का काहीतरी ऑफरही केली.
मग ती तक्रार करणारी बाई धुसफुसत निघून गेली. पण स्टारबक्स च्या सी ई ओ का जो कोणी मुख्य असेल, त्याने त्या कर्मचार्‍यास बक्षीस दिले. Smile
मला ती बातमी प्रचंड आवडली होती.
______
अजुन एक मानसिक गुलामगिरीचे टोकाचे उदाहरण - अनेक स्त्रिया व्हॅजायना सैल पडू नये म्हणून मुद्दाम सी-सेक्शन करवून घेतात. व्हॅजायना सैल पडल्याचा दुष्परीणाम (?) नक्की कोण भोगतं? पुरुष. बहुतेक स्त्रियांना विशेष फरक पडत नसावा निदान कंपेअरड टू सी सेक्शनचा त्रास. मग हा सव्यापसव्य करायचा कोणासाठी - पुरुषांसाठी, त्यांच्या सुखासाठी. कदाचित जोडीदारावरील अति प्रेमाने काही स्त्रिया करतही असतील.
स-त-त चांगलं दिसायचं कोणासाठी - पुरुषांसाठी
भुवया राखायच्या कोणासाठी - पुरुषांना आपण आवडावो म्हणून.
बारीक व्हायच? - त्यांच्यासाठी ......... स्वतःच्या मूड करता अन आरोग्याकरता नाही.
.
It's a male dominated society. आनि स्त्रियाही अपराधी आहेतच. प्रश्नच नाही.
.
हे सर्व गुलामगिरीच वाटते. पण इतकं असूनही, किरन चा अ‍ॅप्रोच अंगावर आला. काही दिवसांनंतर तो रुचेलही. आत्ता नवीन आहे, ड्रास्टिक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. हाच तो लेख.

(त्याचं शीर्षक वाचूनच मी हसायला सुरुवात केली होती. एकूणच जग पुरुषांचं आहे. स्त्रियांना त्यात जागा बनवावी लागत आहे; त्यातून संघर्षसम परिस्थिती उद्भवते. मात्र लेखात पुरुषांची काळजी घेतली, पुरुषांनीच अशा अर्थाचा सूचक खवचटपणा आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

स-त-त चांगलं दिसायचं कोणासाठी - पुरुषांसाठी
भुवया राखायच्या कोणासाठी - पुरुषांना आपण आवडावो म्हणून.
बारीक व्हायच? - त्यांच्यासाठी ......... स्वतःच्या मूड करता अन आरोग्याकरता नाही.

शुचि तै - माझे नहेमीचेच आवडते मत पुन्हा लिहायची वेळ आली.. कोणी कोणा दुसर्‍यासाठी काहीही करत नाही. जे काही करतो/ते ते स्वतासाठीच.

तुम्ही लिहीलेल्या ह्या गोष्टी करणार्‍या बायकांना रीटर्न मधे काहीतरी मिळतच असणार ना, अगदीच काही नाही तर समाधान, आनंद वगैरे.

लक्षात ठेवा, जेंव्हा परतावा बंद होइल किंवा त्या परतावा मिळावा अशी इच्छा/आशा रहाणार नाही, तेंव्हा हे प्रकार करणे सुद्धा बंद होतीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

अनु राव यांच्याशी सहमत व्हायची वेळ आली. उठा ले रे बाबा !!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ते जे काय केलं त्याने महिला वर्गाचा कोणता फायदा झाला आणि स्त्री-समानतेची चळवळ कुठल्याप्रकारे दीड पाऊल पुढे गेली हे कळलं नाही.

मला दररोज तीन ते चार वेळा लघवीला जावे लागते. आणि लघवी सर्वांसमोर न करता बंद जागी करावी असं समाज हजारो वर्षांपासून दडपण आणतो आहे. लघवी होणे हे पूर्ण नैसर्गिक आहे ती उघडपणे करण्याबाबत टॅबू का असावा? शिवाय ती नैसर्गिक असल्याने ती बसमध्ये असताना किंवा कुठच्या संगीताच्या मैफलीत असताना लागली तर ती रोखून का धरावी? ते काही नाही हा जुलूम नष्ट केलाच पाहिजे......................................

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

माझ्या तर मते किळस अजुनच वाढली.
By the end of marathon, she must be stinking of sweat (that was unavoidable) + blood (which was unnecessary)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतकं सोपं नाहीये ते. एकतर लघवी एकांतात करावी, विशिष्ट ठिकाणी करावी हा संकेत स्त्री व पुरुषांसाठी समान आहे. तर पाळी येणं हे केवळ स्त्रीसाठी आहे. त्यात पाळी आलेली झाकावी इतकाच संकेत असेल तर तो तसाही जगभर पाळला जातोच. मात्र झाकणं आणि घृणास्पद असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पाळी येणं ही काहीशी घृणास्पद गोष्ट आहे हा विचार अनेक ठिकाणी अजूनही आहे. 'विटाळ' हा शब्दप्रयोगच त्याची साक्ष आहे. स्त्रीसाठी नैसर्गिक असलेल्या गोष्टीमुळे ती अपवित्र होते या कल्पनेबद्दल आक्षेप आहे. त्यासाठी 'यात अपावित्र्यकारक काही नाही' हे जाहीरपणे सांगण्याची गरज पडते.

दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर समजा वीर्यपतन हे घृणास्पद मानलं जाऊन ते झालं की पुरुषाला एक दिवस कोपऱ्यात बसण्याची शिक्षा असती तर? सर्व पुरुषांना अकारण शरमेला तोंड द्यावं लागणार नाही का? आणि यात शरमेचं काही नाही असं पुरेशा लोकांनी जाहीरपणे सांगितलं तर दबलेल्या पुरुषजातीला दिलासा मिळणार नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पण हे असं दाखवत फिरणं/ प्रदर्शन करणं" - हे अंगावर येणारं आहे.
अन्य मार्ग आहेतच की. आपल्या नातेसंबंधातील पुरुषांशी नि:संकोच बोलणे. लेख लिहीणे. फेसबुकवरुन पाळी अपवित्र नाही याची जाहीरात करणे. हा कंठाळी मार्गच किरन ने का स्वीकारला?
आता कोणीतरी म्हणेल - तिने ते मार्ग स्वीकारलेच नाहीत हे कशावरुन?
.

समजा वीर्यपतन हे घृणास्पद मानलं जाऊन ते झालं की पुरुषाला एक दिवस कोपऱ्यात बसण्याची शिक्षा असती तर?

स्त्रिया squirt करत नाहीत का? ते घृणास्पद मानलं जातं का? वीर्याचे उदाहरण इथे अनाठाइ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा कंठाळी मार्गच किरन ने का स्वीकारला?

यामागच्या उद्देशांबद्दल मेगाबायटी प्रतिसाद अगोदरच लिहून झालेले आहेत. प्रश्न इतकाच आहे की ते जे काही उद्देश असतील ते अशा कंठाळी उपायांनी साध्य झाल्याचा कितपत विदा आहे?

संभाव्य आक्षेपः इन्सिन्सिअर क्वेश्चन, एकाला एक न्याय म्हणून दुसर्‍यालाही तोच लावू पाहणे, पळीपंचपात्री वगैरे जातीय वासवाल्या कमेंट्स इ.इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजुन एक बॅट्या,

स्त्रियांचे फेशिअल हेअर, हाता पायावरचे केसही घाणेरडे दिसतात, कुरुप दिसतात अशी एक समाजात धारणा आहे. कुठल्या स्त्रीमुक्तीवादी स्त्रिया ही ओठावरची लव अन दाढी घेऊन फिरतात? मी म्हणते मुद्दाम वॅक्सिंग न करता फिरणारी स्त्री दाखवा. हे म्हणजे प्रेझेन्टेबल रहायचं तर आहे पण सिलेक्टिव्हली.
आता कोणीतरी म्हणेलच - हायजिन च्या दृष्टीने केस काढणे चांगले असते म्हणून स्त्रिया करत असाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी on principle waxing करत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

होय मेघना मला हे माहीत आहे कारण एका पोस्ट अथवा धाग्यात तू हे लिहीलेले आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्या स्त्रीमुक्तीवादी स्त्रिया ही ओठावरची लव अन दाढी घेऊन फिरतात?

हाच तर लेखातला दुसरा मुद्दा आहे. कोणाला कसला निषेध करायचा किंवा कुठे होकार द्यायचा हे ठरवू दे. तुम्ही अमुक विचारप्रणाली मानता मग तमुक गोष्ट का करत नाही, या प्रकारचा युक्तिवाद सार्वजनिक शरम आणण्याचा हास्यास्पद प्रकार आहे. लोक म्हणतात म्हणून वॅक्सिंग करायची गरज नाही तसं लोक म्हणतात म्हणून वॅक्सिंग टाळायचीही गरज नाही. तीच गोष्ट डोक्यावरच्या केसांच्या लांबीबद्दल. तीच गोष्ट कपड्यांची. लोक दोन्ही बाजूंनी बोलतात.

वॅक्सिंग न करणारीला काय काय ऐकून घ्यावं लागलं त्याबद्दल हा एक जुना दुवा - This Tumblr User Shows Her Horrific Anonymous Messages In A Powerful Art Project

आरोग्याच्या दृष्टीने केस काढणं चांगलं असतं असं कोण म्हणतंय म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

http://aisiakshare.com/node/4327#comment-110480
होय वरील प्रतिसादात मी तेच म्हटलय की "पाळी दाखवता मग फेशिअल हेअर का लपवता" अशा धाटणीचा, "कुठे गेला तुझा धर्म" टाइप आक्षेप आहे.
_____
तू दिलेला दुवा प्रचंड रोचक (Thought provoking) आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि, याच विषयावर आणखी एक लेख सापडला.
I Don't Shave Because I'm a Woman. I Shave Because I'm Brown.

हा मुद्दा भारतातल्या लोकांसाठी तितकासा लागू नाही, तरीही एकदा वाचावा असा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

होय वाचला. तिचे म्हणणे आहे दाक्षिणात्य असल्याने दाट व भरपूर केस सर्वत्रच लाभले आहेत. आणि जर पाय/ओठावरचे वगैरे केस्/लव काढली नाही तर लोक एकदम चमत्कारीक नजरेने पहातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुसलमानांच्या काही जातीत पतिपत्नीमध्ये शारीरिक जवळीक झाल्यावर पत्नीला डोक्यावरून आंघोळ करावी लागते, डोके धुवावे लागते. घड्याळात कितीही वाजले असले तरी. पुरुष लगेच थकून भागून गाढ झोपी जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


शिवाय ती नैसर्गिक असल्याने ती बसमध्ये असताना किंवा कुठच्या संगीताच्या मैफलीत असताना लागली तर ती रोखून का धरावी?


तसा काही प्रॉब्लेम नाहिये पण बस सतत हलत असल्यामुळे स्वतःचे आणि दुसर्‍याचे कपडे खराब होण्याची शक्यता असते. सध्या एक वर्ष कंडक्टरचा जॉब करा, नीट उभे राहायची प्रॅक्टीस झाली की मग बघूया.
संगीत मैफिलीत प्रीतीचं झुळझुळ पाणी सारखी गाणी वाजत असतील तर एखादे वेळेस चालून जाईल पण शास्त्रीय संगीतात कोणत्या रागात वगैरे बसवायचे ते बघावे लागेल. कदाचित मेघ मल्हारबरोबर चालून जाईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला म्हणून ही पोचपावती.
जाताजाता - मुलायम सिंगांचा निषेध करणं योग्यच आहे ???
का करायचा निषेध ? आता म्हातार्‍या माणसाला वयोमानानुसार नसतात बर्‍याचशा गोष्टी शक्य त्याला काय इलाज ? काहीबाही बडबडतात झालं. एवढं काय मनावर घ्यायचं ?

त्यापेक्षा मिडियाचा का नाही निषेध करायचा ? नाही नाही ती घाण घरात आणि मनात आणून टाकतात मेले ! सकाळ बघत नाही, दुपार बघत नाही की रात्र नाही. अगदी दारे खिडक्या लावल्या तरी हा घाण वास कोठून ना कोठून नाकात शिरतोच. किती दिवस सहन करायचे ? मी फक्त पेपरात येणार्‍या शिळ्या बातम्या वाचतो फार तर आता तेही बंद करावे म्हणतो !
नो टीव्ही न्युज प्लीज.
'राहा अपडेट', 'एक पाऊल जगाच्या पुढे', 'सबसे तेज' 'उघडा डोळे, पहा जगाकडे नीट' कशाला ????
मला नाही व्हायचं सुपर कंप्युटर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का करायचा निषेध ? आता म्हातार्‍या माणसाला वयोमानानुसार नसतात बर्‍याचशा गोष्टी शक्य त्याला काय इलाज ? काहीबाही बडबडतात झालं. एवढं काय मनावर घ्यायचं ?

Biggrin

पण मग "मिडीया बंडलच आहे, माझ्या परिसरातले सगळे दुर्लक्षच करतात" असं म्हणता येत नाही ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नो टीव्ही न्युज प्लीज.
'राहा अपडेट', 'एक पाऊल जगाच्या पुढे', 'सबसे तेज' 'उघडा डोळे, पहा जगाकडे नीट' कशाला ????
मला नाही व्हायचं सुपर कंप्युटर !

अगदी अगदी. स्वतःमध्ये काहीही नेतृत्वगुण नाही हे लवकरच (माझ्या) लक्षात आले. जे की सोईचेच होते. फार तलवार मारता येणार नाही हे कळल्याने, मनसोक्त आवडीच्या हस्तिदंती मनोर्‍यात (कविता + अध्यात्म) रमले. मलाही असेच वाटते - नकारात्मक काही ऐकायचे नाहीये मला. "ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा"
.
आजच बसस्टॉपवरती विचार करत होते - स्त्री-पुरुष समानतेच्या या गदारोळात, स्त्रिया नवर्‍याला आवडेल अशा विषयातही रस घेतात + सर्व आघाड्यांवर पुढे रहाता + विविध क्षेत्रे पादाक्रांत करतात + घरातीलही बघतात.
असं सुपरवुमन व्हायचय कुणाला? मला एक कवितेचे पुस्तक, २/३ स्तोत्रे अन एक कोपरा द्या. निवांत!!!
____
अर्थात हा निवांतपणा सावित्रीबाई फुले, राजा राम मोहन रॉय, आनंदीबाई गोपाळ व अन्य अनेक अनेक पूर्वसुरींच्या खांद्यावर उभे राहून मिळतय याची जाण आहे.
.
एक आळशी स्त्री - शुचि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. मूळ विषय मी टाकला होता.
२. मुलायम सिंग सारख्या एका पक्षप्रमुखाने केलेली विकृत विधाने लोकांसमोर यावीत यासाठी मूळ पोस्ट होती.
३. झोला, बिंदी आणि मेणबत्ती गँग यांच्या नेहमीच्या आणि मोर्चे, चॅनल्स वरून आक्रमक विरोध इ. पद्धतीने याचा विरोध झाला नाही याचे कारण विचारसरणी वा राजकिय मैत्री असावे असे मला आणि अन्य कांही प्रतिसादकांना वाटले. आक्षेप एरवी आक्रस्ताळी असणार्‍यांनी गप्प राहण्यावर होता...इतरांवर सार्वजनिक शरम लादलेली नाही. आपल्याला अर्थातच दुर्लक्ष करण्याचे स्वातंत्र्य आहेच.
४. पळी पंचपत्राचा मुद्दा तुम्हीच काढला. मी त्याचा घेतलेला अर्थ असा आहे की सध्या ब्राह्मण्यग्रस्त- प्रतिगामी लोकांचे राज्य आल्याने खरे जागले - पुरोगामी इ. दडपले गेलेत (इतके की मुलायम यांच्या केसमध्ये देखील ते आता आवाज उठवू शकत नाहीत)
५. मुलायम आजोबंची बुद्धी आणि जीभ चळलीय याचा अर्थ त्यांचा निषेध नसून सन्मान केलाय असे आपल्याला वाटले?

<मुलायम सिंगाचा निषेध करण्याच्या फंदात मी पडणार नाही..............................
(जाताजाता - मुलायम सिंगांचा निषेध करणं योग्यच आहे. /blockquote>

७. महिला विषयक सकारात्मक बातमी सांगितल्याबद्दल छान वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कबीरा खडा बाजार में, मांगे सबकी खैर|
ना काँहू से दोस्ती, ना काँहू से बैर||

मला शीर्षक अतिशय आवडलेलं आहे . भारदस्त ! कस्काय सुचतं बै लोकांना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

मतामतांच्या गलबल्यात माझा इतका गोंधळ उडतो की कोण नक्की काय कशाबद्दल कधी म्हणालं होतं नि त्याचा संदर्भ नेमका कसा लावायचा नि प्रतिवाद करायचा त्याचं नीट भान राहात नाही. म्हणून सुटीसुटी विधानं करतो.

१. मुलायम सिंग यांच्या विधानाचा निषेध करतो.
२. जगात हरघडी काही ना काही वाईट गोष्ट चाललेली असते. प्रत्येक गोष्टीचा निषेध कसा करणार ? त्यामुळे "अमुक गोष्टींचा निषेध न केल्यामुळे तमुक गोष्टीबद्दल बोलायचा तुम्हाला काहीही हक्क नाही" हे आर्ग्युमेंट कळत नाही.
३. मी एका प्रकारच्या विचारसरणीचा पुरस्कर्ता आहे म्हणजे त्या विचारसरणीशी बांधील आहोत असं म्हणणारे एकूण एक लोक निष्पाप निरागस निर्दोष असा काही अर्थ नाहीच. मुलायम सिंग आणि लालू आणि अन्य कुणी स्वतःला काय वाटेल ते म्हणवून घेत असले तरी त्यांची कारकीर्द किती भयाण होती आणि त्यांची एकेक विधानं कसली सडलेली होती हे वेगळं सांगायची गरज नाही. त्याचा विचारसरणीशी काही संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

तंतोतंत असेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कंठाळी आवाजात "याचा का नाही निषेध करत" असं किंचाळणं हे निष्कारण माझ्यावर (आणि इतर अनेकांवरच) सार्वजनिक शरम लादण्याचा प्रकार आहे. I won't budge to this sort of public shaming. हा प्रकार त्याज्य आहे. मुलायम सिंगाचा निषेध करण्याच्या फंदात मी पडणार नाही. पण "आता बोला, आता का गप्प"छाप विचारसरणी आणि अभिव्यक्तीचा मी ठाम निषेध करते.

आपण केल्यास अवेअरनेसची हाक, दुसर्‍याने केले तर सार्वजनिक शरम लादणे. किणकिणीची किंचाळी झाल्यालाही एव्हाना जमाना लोटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मध्ये मिहिर शर्माचा इथे शेअर केलेला लेख आठवला. तिथे लोक य सगळ्याबद्दल गप्प कसे? असा प्रश्न विचारला होता. तिथेही हा युक्तिवाद लागू पडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उघड पाठिंबा देणाऱ्या प्रतिसादकांचे आभार. माझ्या मुद्द्याची उदाहरणं पुरवण्याबद्दल गुद्दे-बोचकारे आणि "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म" प्रतिसादकांचेही आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अनेकांनी शू-शीचे मुद्दे या संदर्भात उपस्थित केलेले बघितले आहेत. यात आणि पाळीतून निघणाऱ्या स्रावात फरक आहेत.
१. शू-शीवर काही प्रमाणात बहुतांश लोकांचा ताबा असतो. काही काळ रोखून धरता येतं, पाळीचा स्राव असा थांबवता येत नाही.
२. शू-शी करणं म्हणजे काहीतरी ओंगळ, घरातून बाजूला बसवावं, देवळात जाऊ नये, लोणचं खराब होतं, बाथरूममध्ये जाण्याची गरज आहे हे लपवून ठेवावं, किंवा शुचिने दिलेलं उदाहरण - करणीबिरणी, असे समज त्याबद्दल नाहीत. शू-शी असेच साचून राहिले तर अनारोग्यकारक पण त्या कृतींबद्दल संकोच नाही.
३. पाळी ही समाजातल्या अर्ध्याच लोकांना आणि ते ही ठराविक वयाच्या आणि ते ही ठराविक दिवसांमध्येच येते. अगदी पुनरुत्पादनक्षम वयातल्या स्त्रियाही वर्षातला बहुतांश काळ 'मी नाही त्यातली' म्हणू शकतात आणि ते काही प्रमाणात ग्राह्य स्पष्टीकरण असतं. 'मी नाही त्यातली' म्हणायला लागण्याचं कारण पाळीबद्दल असणारे संकोच.

शू-शी आणि पाळीचा स्राव यांच्यात साम्य एकच, या गोष्टी जननेंद्रियांच्या आसपासच्या भागात असतात, स्वच्छता करताना जननेंद्रियं इतरांना दिसू शकतात आणि ती दिसू नयेत असा सामाजिक संकेत आहे. या संकेताचं पालन बालकांचा अपवाद वगळता सगळेच करतात; कोणालाही वेगळं काढलं जात नाही. शू-शी रोखून धरता येते म्हणून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या कृती योग्य ठिकाणीच कराव्या.

ज्यांना पाळीचा त्रास नाही किंवा पाळीच्या काळात काय-काय त्रास होतात हे समजलेलं नाही त्यांना या कृतीचा फायदा काय होतो हे समजणंही कठीणच. माझ्यासारख्या, फारसे संकोच न बाळगणाऱ्याही लहान वयात "माझ्या पाठी काही लागलंय का पहा" या फेजमधून गेलेल्या असतात. त्यातही उदाहरण सांगते. माझी पाळी आली तेव्हा सुरुवातीला आई मला विचारत असे, "रक्त किती असतं याबद्दल तुझा काय अंदाज? चमचाभर, डावभर? त्याबरोबर काही घनपदार्थ दिसतो का?" मला त्या प्रश्नांमुळे लाज वाटत असे. तिला माझ्या आरोग्याची काळजी होती पण मी घराबाहेर ऐकलेल्या आणि मुख्य म्हणजे आत्मसात केलेल्या संकोचांना कधीच बळी पडले होते. त्यातही आणखी वाईट गोष्ट अशी की आपण श्रद्धांना बळी पडलो आहोत, हे ही मला अनेक वर्षं समजलं नव्हतं.

पाळीचं रक्त चुकूनही बाहेरच्या कपड्यांवर दिसणं, झोपेत चादरींवर रक्ताचे डाग पडणं यांबद्दल मुलींना, स्त्रियांना प्रचंड संकोच असतात. आपली पाळी सुरू आहे हे इतरांना, विशेषतः पुरुषांना समजू नये यासाठी नॅपकिन लपवत बाथरूमकडे जाणं, हे सुद्धा लहानपणापासून मुलींच्या माथ्यावर आदळलं जातं. पाळी, त्यामुळे होणारा रक्तस्राव ही काहीतरी घृणास्पद गोष्ट आहे या शिकवणीतून ज्यांना बाहेर पडण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी किरन गांधी मुक्तीदात्री आहे. जे स्वातंत्र्य, मुक्ती मिळवण्यासाठी मला १२-१३ वर्षं स्वतःशी झगडावं लागलं ते तिने मिळवलंच असं नाही, कृतीमधून करून दाखवलं. तिच्यामुळे अनेक मुलींना, स्त्रियांना असं अनेक वर्षं स्वतःशी झगडावं लागणार नाही.

स्वातंत्र्य, समानता यांचे अर्थ कोण काय लावतं मला माहीत नाही. नानावटींचा वैचारिक क्षमतेवर पसरलेली श्रद्धेची गडद छाया हा लेख वाचला आणि माझ्याही किती श्रद्धा मी गेल्या काही वर्षांमध्ये, स्त्रीवादाचा अभ्यास सुरू करून मोडल्या आहेत हे लक्षात आलं. पाळीबद्दल लाज वाटावी, रक्ताचा डाग कपड्यांवर दिसला तर लाज बाळगावी वगैरे गोष्टी याच श्रद्धेतल्या. ते माझं स्वातंत्र्य आहे. स्वतःपासून, स्वतःच्या श्रद्धांपासूनही स्वातंत्र्य मिळवावं लागतं, सगळ्यांनाच. किरनने अशा एक श्रद्धेपासून, सार्वजनिक जागी स्वातंत्र्य मिळवलं; पुढच्या काळात इतरांना ते सहज मिळेल. म्हणून ती महत्त्वाची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप विचार करायला लावेल असा प्रतिसाद आहे. हे असं कधी अशाप्रकारे विचारात घेतलंच नाही आहे याची जाणिव करून दिल्याबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाळीचं रक्त चुकूनही बाहेरच्या कपड्यांवर दिसणं, झोपेत चादरींवर रक्ताचे डाग पडणं यांबद्दल मुलींना, स्त्रियांना प्रचंड संकोच असतात. आपली पाळी सुरू आहे हे इतरांना, विशेषतः पुरुषांना समजू नये यासाठी नॅपकिन लपवत बाथरूमकडे जाणं, हे सुद्धा लहानपणापासून मुलींच्या माथ्यावर आदळलं जातं.

हे अगदी खरे आहे.

करणीबिरणी, असे समज त्याबद्दल नाहीत.

होय मुद्दाम दिले आहे ते उदाहरण.
.
मला अदितीचा सविस्तर प्रतिसाद अतिशय आवडला आहे कारण मला न कळलेले मुद्दे व्यवस्थित विषद केलेले आहेत.
___
अन माझा प्रतिसाद "पाळी दाखवता" तर मग "दाढी-मिशा का लपवता?" हा अदिती तू ज्यावर आक्षेप घेतलाय त्याच धाटणीचा प्रतिसाद आहे हे समजतय मला. "कुठे गेला तुझा धर्म?" टाइप Smile
________

पाळीचं रक्त चुकूनही बाहेरच्या कपड्यांवर दिसणं, झोपेत चादरींवर रक्ताचे डाग पडणं यांबद्दल मुलींना, स्त्रियांना प्रचंड संकोच असतात.

यासंदर्भातील एक उदाहरण आठवतय. हे खरोखर वृत्तपत्रात वाचलेले आहे. नवपरिणित जोडप्याने महागड्या हॉटेल मधील खोली बुक केली. सकाळी चादरीवरती रक्ताचे डाग होते (अर्थात स्त्री ला सेक्स नंतर रक्तस्त्राव झाला असणार) त्याबद्दल हॉटेलने इतका गहजब केला. किती संकोचायला झालं असेल त्या जोडप्याला Sad
शरीर तसेच शारीरीक क्रियांबद्दल एकदम उदात्तीकरण (आई बनणे), बुब्ज पुरुषांना किती आवडतात ते विचारायचीच सोय नाही, अन पाळी बद्दल एकदम "अय्या शेम शेम!" मनोवृत्ती - हे आक्षेपार्ह आहेच. माझा आक्षेप फक्त किरनच्या प्रदर्शनावर होता व आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा आक्षेप फक्त किरनच्या प्रदर्शनावर होता व आहे.

आत्ता बोर्डावर असलेला दुसरा लेख - समता, स्वातंत्र्य, स्वैराचार, FTII वगैरे यात FTII चे तपशील हा एक भाग. त्यातला लिबर्टीन विचारांचा, शहाणपणाचा भाग आहे तो किरन गांधीच्या बाबतीतही तितकाच खरा आहे. FTII च्या संपाचा कंटाळा आला तरी त्याला पर्याय असतोच असं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतिहासातली दोन टोकांची उदाहरणं लक्षात घेता येतील. ज्या पाश्चात्य संस्कृतीनं लिबर्टिन लोकांमधली उर्जा ओळखून त्यांना आपल्या संस्कृतीत सन्मानाची जागा दिली, त्या देशांत निर्मितिक्षम लोकांनी नवनवोन्मेषशाली कलानिर्मिती करत नवे जागतिक पायंडे पाडले आणि इतिहास घडवला.

ह्म्म्म Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःपासून, स्वतःच्या श्रद्धांपासूनही स्वातंत्र्य मिळवावं लागतं, सगळ्यांनाच.

सध्या चर्चेत चालु विषयाशिवाय इतरवेळीही लागू पडेल असे एक चांगल वाक्य !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

पाळी म्हटलं की मला "आता तुझी पाळी , वीज देते टाळी " हेच आठवतं म्हणून आणि कधीही वापरला नसल्याने मला हा शब्द विचित्र वाटतो . मी , आई वापरत आलोय तो mentrual cycle चा शोर्ट - फॉर्म असलेला MC हा शब्द वापरेन .

MC सुरु होण्यात आपली काही चूक नाहीये आणि ती अजिबात लाजिरवाणी गोष्ट नाहीये हे अगदी पक्कं माहिती होतं. आणि त्यामुळे त्यासंबंधीच्या कोणत्याच गोष्टी कधीच लपवाव्या वाटल्या नाहीत .

मी माझ्या MC विषयी माझे बाबा , आजोबा , मावस-चुलत भाऊ , मित्र आणि आता लग्नानंतर दीर-सासरे ह्या सर्व पुरुषांशी (नवरा वगळला आहे कारण त्याच्याशी तर बोलणारच ना ) मोकळेपणे बोलू शकते . पण ते कधी, तर
१. जिम /एरोबिक्स नाही कारण MC चालू आहे असं सांगणे
२. मित्रांसोबत सिंहगड वगैरे ठरत असेल आणि तेव्हा जर MC ड्यू असेल तर न येवू शकण्याचे कारण सांगणे
३. थकलेली का दिसतेयस ह्या प्रश्नाचं उत्तर "MC मुळे " असं खरं खरं सांगणे .
अशा प्रसंगी . म्हणजे लपवून न ठेवता/ त्या गोष्टीबद्दल बोलणे हे मी करत आलेली आहे पण (किंवा कदाचित त्यामुळेच )
सोशल मेडिया वर " I am menstruating today" असा स्टेटस लावणं किंवा रक्ताळलेल्या कपड्यांचा फोटो लावणं किंवा पॅड/टँपन न वापरणे ( धावणे ही पुढची गोष्ट ) हे सर्व करण्याची गरज काय असा प्रश्न पडतो .

किरण गांधी बद्दल आदर आहे कारण ह्या दिवसांत जेव्हा मी नेहमीच्या ३मैल जॉगला पण सुट्टी मारते तेव्हा ती मॅरेथॉन धावली, पण न पॅड/टँपन वापरता धावली ह्याबद्दल फारसं कौतुक नाही. मलासुद्धा शुचीताई प्रमाणे किळसच वाटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

मलासुद्धा शुचीताई प्रमाणे किळसच वाटली.

अगदी सिद्धी मला हे सांगायचय की बायकांनाही दुसरीचा स्त्राव बघून किळस वाटतेच.
___
अर्थात अदितीचा वरचा प्रतिसाद प्रचंड आवडलेला आहे. दुसरी बाजू (अगदी स्वतःच्या संकुचित श्रद्धा - नॅपकिन लपविणे वगैरे) लक्षात आल्याच.
_____

MC सुरु होण्यात आपली काही चूक नाहीये आणि ती अजिबात लाजिरवाणी गोष्ट नाहीये हे अगदी पक्कं माहिती होतं.

दुसरी बाजू, गंमत सांगते. मुलीच्या मैत्रिणीच्या लहान बहीणीची पाळी सुरु झाली. मुलीच्या मैत्रिणीला जाम टेन्शन - आपलीच का नाही सुरु होते :). तिच्या टेन्शनमुळे मुलगी ही (अगदी किंचीत) टेन्स. आमच्या घरात जोक झाला होता तो.
मी मुलीला म्हटलं - नाही झाली सुरु तर गायनॅक कडे जा म्हणावं मैत्रिणीला वगैरे. नशीब २ महीन्यात तिचीही आली.
पण असलेही किस्से असतात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी ही बातमी वाचली तेव्हा मला प्रश्न पडला की मी किरनसारखं काही करेन का? त्याचं उत्तर आहे - नाही. एकतर हे मला सुचलं नाही; मी मॅरेथॉन धावूही शकत नाही. दुसरं आणि अधिक महत्त्वाचं, अशी प्रतीकात्मक बंडखोरी एकदा केली किंवा सामूहिकरित्या केली तर त्या बंडखोरीला अर्थ आहे. किरन पॅड न वापरता एकदा धावली याला बंडखोरीचं मूल्य आहे. इथे ब्रा-बर्निंगची आठवण होते. एकदा आणि/किंवा सामूहिकरित्या केलं तेव्हा त्याचं मूल्य टिकलं.

किरनची कृती टोकाची वाटणंही ठीकच. ही कृती टोकाचीच आहे. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोठा आवाज करावा लागतो, तो तिने केला. ज्या कारणासाठी मोठा आवाज केला, लोकांचं लक्ष वेधून घेतलं ते कारण महत्त्वाचं आहे का नाही या प्रश्नाशी गाडी अडते. प्रश्न पाळीबद्दल असणाऱ्या संकोचाचा असो वा गजेंद्र चौहान पदासाठी नालायक असण्याचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इ स १९५० मध्ये समाजाच्या काही समजुती होत्या. १९८० मध्ये त्यातल्या काही नष्ट झाल्या परंतु काही उरल्या. २०१० पर्यंत त्यातल्या आणखी काही नष्ट झाल्या. त्यातल्या काही अजूनही उरल्या आहेत. त्या उरलेल्या समजुतींचा निषेध करणे आणि त्या घालवण्याचा प्रयत्न करणे हे ठीक आहे. पण त्यासाठी १९५० मधल्या समजुतींची आणि टॅबूजची यादी करून त्या २०१५ मध्येसुद्धा अस्तित्वात असल्याचा दावा करणे योग्य नाही.

हा कंठाळीपणाच आहे आणि तो करण्याने चळवळीची हानीच होते असे मला वाटते. (आठवा अण्णा हजारे आंदोलन- पुढचे केजरीवाल यांचे
दिल्लीचे अल्पजीवी सरकार. आपण आक्रस्ताळेपणा केल्याबद्दल त्यांना झालेली उपरती आणि मग पुन्हा मिळालेला पाठिंबा. किंवा ऐसीवरच गजेंद्र चौहान निमित्ताने झालेल्या चर्चा].

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पण त्यासाठी १९५० मधल्या समजुतींची आणि टॅबूजची यादी करून त्या २०१५ मध्येसुद्धा अस्तित्वात असल्याचा दावा करणे योग्य नाही.

समजल नाही नक्की काय म्हणायचं आहे ते. एखादं उदाहरण द्या ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

  • रुपी कौरचा फोटो इन्स्टाग्रामवरून काढला गेला (तक्रारीनंतर पुन्हा प्रकाशित झाला) आणि डॉनल्ड ट्रंपने पत्रकाराच्या पाळीबद्दल हिणकस उद्गार काढले ते वर्ष २०१५ का १९८०?
  • "period taboo in india" असं गूगलमध्ये शोधलं तरी भारतात (फक्त आपल्या परिसरातच असं नाही) काय चालतं हे समजेल. मला हे दोन दुवे लगेच दिसले. (दुवा १, दुवा २) पण तुमच्या परिसरात "एऽऽऽ, तुझ्यामागे बघ डाग लागलाय" असं म्हणणाऱ्या व्यक्ती आज नाहीत असं तुम्हाला वाटतं का?
  • "लोणचं खराब होईल" ऐकत वाढलेल्यांपैकी अनेकींचा यावर आज विश्वास नसेलही, पण या अशा अंधश्रद्धांचा प्रभाव त्यांच्या मनातून पूर्ण उतरला आहे असं तुम्हाला ठामपणे सांगता येईल का? ग्रामीण भाग वगैरे सध्या सोडूनच देऊ.
  • पाळीच्या स्रावाला 'विटाळ' आणि पॅड्सना 'सॅनिटरी' (of or relating to health or the conditions affecting health, especially with reference to cleanliness, precautions against disease, etc. - जसं काही ते रक्त म्हणजे रोगच) हे शब्द कोशातून कधी काढले गेले?

या सगळ्या गोष्टी जगाच्या वेगवेगळ्या भागांत एकाच काळात चाललेल्या आहेत, त्यांचा एकत्रिरित्या विचार का करू नये?

आणि कोणत्या चळवळीची हानी होईल? रक्ताचा टिळा मिरवत धावणारी किरन गांधी आणि इथे लिहिणारी मी यांच्यापैकी कोणीही कोणत्याही चळवळीचा भाग नाही. मग आम्हाला कोणत्या गटात जोडून त्या गटाची बदनामी होणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. ३_१४ विक्षिप्त अदिती घराबाहेर चाललेल्या असताना त्यांच्या पाठीवर पक्षी शिटला असेल तर कोणीतरी सहजपणे "ए मागे कावळा शिटला आहे" असं सांगणार नाही का? त्याच्या मनात वाईट काही नाही (शर्मिंदा करण्याचा त्याचा उद्देश नाही) असं गृहीत धरू शकत असतील तर डाग लागला सांगणारा/री सुद्धा सहजपणे सांगत आहे असं का गृहीत धरता येत नाही?

२. इन्स्टाग्रामने फोटो काढून टाकला असे म्हणताना इन्स्टाग्राममध्ये काम करणारी माणसे फोटो तपासण्याचं काम करतात असं कोणाला वाटते आहे? एखाद्या फोटोवर "रिपोर्ट" च्या अमुक नंबर ऑफ क्लिक्स आल्या की तो फोटो आपोआप डिलीट/हाइड होण्याचा प्रोग्रॅम असणार हे उघड आहे. फोटो रिपोर्ट करणार्‍यांमध्ये पुरुष असतील महिलाही असतील. (मी सुद्धा असू शकेन. किंवा .शुचि.* असू शकतील). याचा अर्थ मी आणि .शुचि. या व्यक्ती पाळीला वाईट मानतात (पाळी आलेल्या बाईला अशुद्ध वगैरे मानतात) असा मुळीच होत नाही. किंवा त्यांच्या मनात पुरुषप्रधान संस्कृतीचे अवशेष घट्टपणे शिल्लक आहेत असा आरोप करणे हा आक्रस्ताळेपणा आहे. It may only help repelling the sympathizers of the cause.

३. सॅनिटरी शब्दावर घेतलेल्या आक्षेपाने मौज वाटली. त्या जागी ओलावा राहून रोग होण्याची शक्यता असते याबद्दल वाद नसावा. जर एखादे उत्पादन ओलावा राहू देत नाही म्हणून आरोग्यकारक आहे असा दावा असेल तर त्या उत्पादनाला सॅनिटरी (of or relating to health or the conditions affecting health, especially with reference to cleanliness, precautions against disease, etc.) म्हणणे सयुक्तिक आहे. पाळी आणि स्राव म्हणजे रोग असं त्यातून कुठेच सूचित होत नाही. रीडिंग बिटविन द लाइन्स हे फार ताणले गेल्याचे हे लक्षण आहे.

विटाळ हा शब्द शब्दकोषात असेलच (आणि तो असू द्यावा). पाळी आलेल्या स्त्रीला विटाळशी म्हणणे चूक आहे. तेवढे टाळले की बस. [तसेच विटाळशी म्हण़णे हे 'लेका' म्हणण्याइतके निरुपद्रवी असू शकते हे आहेच].

यानिमित्ताने थोडे अवांतर: अशाच प्रकारचा शाब्दिक वाद एक्स्ट्रा-मॅरिटल या शब्दावरून काही स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी झाला होता. एक्स्ट्रा-मॅरिटल या शब्दाऐवजी रिलेशन आउटसाइड मॅरेज असा शब्द वापरावा कारण त्यात एक्स्ट्रा काही नाही असे त्यांचे म्हणणे होते. मी त्यांना "एक्स्ट्रा-मॅरिटल ही स्टॅण्डर्ड इंग्रजी फ्रेज आहे आणि त्याचा अर्थ तुम्ही म्हणताय तोच होतो" असं सांगण्याचा प्रयत्न केला. " जसं एक्स्ट्रा-करिक्युलर म्हणजे आउटसाइड द करिक्युलम तसं एक्स्ट्रा-मॅरिटल म्हणजे आउटसाईड द मॅरेज". त्यांना ते पटले नाही कारण तो शब्द चुकीचा आहे असं त्यांच्या मनात ठामपणे बसलेलं होतं. नसलेले अर्थ काढण्याचं हे उदाहरण सॅनिटरीवरच्या आक्षेपाने आठवलं

लोणचं खराब होईल (किंवा शिवाशिव केल्याने घरावर अरिष्ट येईल) असं आज किती लोकांना वाटत असेल? तसे वाटणे गैर आहे आणि ते वाटणे घालवण्यासाठी प्रयत्न करायला हवेतच. परंतु फोटो छापून ते नक्कीच साध्य होणार नाही.

*त्यांनी वर उघड म्हटल्याने त्यांचे नाव घेतले. नो ऑफेन्स मेन्ट. किंवा त्यांना ऑफेन्सिव्ह वाटत असेल तर त्यांचे नाव काढून टाकावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते मला वाईट नाही वाटत हो. बरोबर बोलताय तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशाच प्रकारचा शाब्दिक वाद एक्स्ट्रा-मॅरिटल या शब्दावरून काही स्त्री चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी झाला होता. एक्स्ट्रा-मॅरिटल या शब्दाऐवजी रिलेशन आउटसाइड मॅरेज असा शब्द वापरावा कारण त्यात एक्स्ट्रा काही नाही असे त्यांचे म्हणणे होते.

त्यांना मिसळपाव किंवा पावभाजी फार आवडत असणार असा माझा अंदाज. एक्स्ट्रा पाव मागून-मागून तेवढाच एक अर्थ डोक्यात उरला असेल. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्तेचाचांच्या प्रतिसादाला कंठाळी परंतु अलेजेडलि कंठाळीविरोधक प्रतिसाद कसे आणि काय येतील हे पाहणे रोचक ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१. डाग लागल्यावर दोन प्रकारचं ओशाळणं होतं - एक म्हणजे आपला कपडा खराब झाल्याने विचित्र दिसतो ते. त्याचं उदाहरण तुम्ही दिलेलं आहे. दुसऱ्या प्रकारचं ओशाळणं जास्त तीव्र असतं. आपल्याच शरीरातले विविध प्रकारचे द्राव गळून कपड्यांना लागलेले असले की त्यातून चेष्टा अधिक होते. उदाहरण सांगायचं तर आम्हाला एक कॉलेजमध्ये प्रोफेसर होते - ते बहुधा अंडरवेअर घालत नसत. त्यामुळे त्यांच्या पॅंटला विवक्षित ठिकाणी डाग लागलेला दिसायचा. त्यामुळे पोरं ते शिकवायला लागले की त्यावरून आपापसात चेष्टा करायचे. ती चेष्टा होते हे त्यांना कळलं की नाही माहीत नाही. मात्र तसं होत आहे हे कळलं असतं तर त्यांना प्रचंड ओशाळवाणं वाटलं असतं. आता सर्वसाधारण पुरुषांना ९९.९९९९% ना हा प्रश्न येत नाही. कारण उपाय खूप सोपा आहे. मात्र स्त्रियांसाठी हा उपाय तितका सोपा नाही, कारण असे डाग दिसण्याचं प्रमाण बरंच जास्त आहे.

२. इन्स्टाग्रामने फोटो काढून टाकण्यामागे त्याबद्दल कोणीतरी आक्षेप घेतले हे महत्त्वाचं आहे. हेतू काहीही असेल पण त्याच फोटोला का आक्षेप? असा प्रश्न येतोच. आता रक्त दाखवायचं नाही असी काही इन्स्टाग्रामची भूमिका नाही. कितीतरी रक्तबंबाळ चित्रं सहज दाखवली जातात. उदाहरणार्थ मी instagram injury pictures गूगल केल्यावर हा दुवा सापडला. तिथे कितीतरी रक्ताळलेली चित्रं आहेत. आणि ती पाहाताक्षणी बहुतांश थत्तेंना किंवा शुचिंना आक्षेपार्ह वाटणार नाहीत. त्यामुळे मग प्रश्न विचारावासा वाटतो की तोच फोटो लोकांना आक्षेपार्ह का वाटला?

३. सॅनिटरी शब्दाबद्दल माझं तीव्र मत नाही. मात्र विटाळ या शब्दाचा अर्थ पाळीत येणारं रक्त असाही आहे. मला खात्री नाही, पण बहुधा ते रक्त आल्यावर स्त्रीची जी अवस्था होते, त्यावरून विटाळणे हे क्रियापद तयार झालं असावं. मुद्दा कुठचा अर्थ आधी हा नाही. दोन्ही अर्थ इतके एकमेकांत गुंतलेले आहेत की पाळी आलेली स्त्री अस्पृश्यासारखी हे उघड आहे.

तुम्ही इतर सर्वसाधारण मुद्दे मांडलेले आहेत की 'आता असं किती प्रमाणात होतं?' यात तुम्हाला 'फारसं नाही' असं अभिप्रेत असलं तरी हा विचारण्याजोगा प्रश्न आहे. सुशिक्षित शहरी मध्यमवर्गीय (म्हणजे स्वतःला मध्यमवर्गीय समजणाऱ्या) समाजात परिस्थिती खूपच चांगली आहे. पण तीच परिस्थिती इतरत्र गरीब वर्गात आहे का?

असो. हा प्रतिसाद बॅटमॅनला कितपत कंठाळी वाटला हे विचारल्याशिवाय राहावत नाही. निदान त्याची कंठाळीपणाची व्याख्या तरी कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>दोन्ही अर्थ इतके एकमेकांत गुंतलेले आहेत की पाळी आलेली स्त्री अस्पृश्यासारखी हे उघड आहे.

अर्थ तसा आहे हे मान्य आहे पण आज तो शब्द वापरणारे त्या महिलेस अस्पृश्य मानत नसतील. उदा माद**द शब्द वापरला तर त्याच्या शब्दशः अर्थाने वापरलेला नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

>> पण आज तो शब्द वापरणारे त्या महिलेस अस्पृश्य मानत नसतील. उदा माद**द शब्द वापरला तर त्याच्या शब्दशः अर्थाने वापरलेला नसतो. <<

भेंचोद, मादरचोद हे शब्द त्यांच्या शब्दशः अर्थाने वापरलेले असले किंवा नसले तरीही त्या अर्थामुळेच त्यांना एक पंच येतो. त्याऐवजी उदाहरणार्थ 'त्रासदायक' शब्द वापरला तर तो पंच येणार नाही. म्हणूनच ते शब्द वापरात राहिले आहेत. आणि म्हणूनच ते सेन्सॉर वगैरे केले जातात. त्याच न्यायानं आज 'भंगी' शब्द वापरला जात नाही. त्याऐवजी 'सफाई कामगार' म्हटलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. पक्षी शिटला म्हणून देवळात येऊ नका, घरात येऊ नका, गणपतीचं जेवायला येऊ नका असं कोणीही म्हणत नाही. ना त्यात "अशी कशी ही बेपर्वा मुलगी/बाई आहे" अशी भावना नसते. खरंच कधीतरी "एऽ, तुझ्यामागे डाग लागलाय" (किंवा "तुझा स्ट्रॅप दिसतोय") याचा सूर ऐका आणि मग पक्षी शिटल्याचं उदाहरण द्या. किंवा सरदारांचे पाळीच्या डागांचे जोक्स प्रचारात आले की मग दोन्हींची तुलना करूया.
२. रिपोर्ट करणार्‍या लोकांची मानसिकता हीच इन्स्टाग्रामची नव्हे समाजाची, ते सुद्धा इंटरनेटवर, इन्स्टाग्रामवर वेळ घालवण्याइतपत पैसा बाळगून असणाऱ्या लोकांची मानसिकता दाखवते. लोकांनी रिपोर्ट केलं म्हणून फोटो काढला हा मुद्दा तर मी मांडायला पाहिजे. Smile (तो तुम्हीच मांडण्याबद्दल आभार.)
३. टॉयलेट रोल्सना सॅनिटरी रोल्स म्हटलं जात नाही. त्याचा फायदा रोज, सगळ्यांना (स्त्रिया, पुरुष, वयात न आलेली मुलं) होतो. महिन्यातले सगळे दिवस.

शब्दांचे अर्थ यथावकाश बदलतात. ज्ञान, know हे त्याचं मोठं उदाहरण म्हणूनही दाखवता येईल. पण जिथे इन्स्टाग्रामवर बागडणाऱ्या लोकांना पाळीचं रक्त दिसलेलं बघवत नाही तिथे विटाळ या शब्दाचा निषेध करू नये असं म्हणताय?

रूपीने फोटो प्रकाशित करून किंवा किरनने मॅरेथॉन धावून लोकांच्या अंधश्रद्धा थेट दूर होतील असा कोणाचाही दावा नाही. माझा तर नाहीच नाही. म्हणूनच वरच्या प्रतिसादात याचं वर्णन "प्रतीकात्मक बंडखोरी" असं केलं आहे. लोणचं खराब होतं हे मानणाऱ्या नाही, पण माझ्यासारख्या, श्रद्धांना बळी गेलेल्या पण बळी जाऊ न पाहणाऱ्या अनेकींना याचा सरळच फायदा होईल हे मला आत्ता दिसतं. मी जेव्हा पाळीसंदर्भात संकोचाशी झगडत होते तेव्हा कोणी अशी मॅरेथॉन धावली असती आणि तिला प्रसिद्धी मिळाली असती तर मला माझ्याशीच, माझ्या स्वातंत्र्यासाठी एवढं झगडावं लागलं नसतं. लोकांच्या कृतींचा आपल्यावर थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम होतो. शाळेत असताना "ईऽऽ, तुला एवढंसुद्धा कसं जमत नाही" असं कोणी म्हटल्यावर मला 'आता जादू होऊन मी आपोआप घरी पोहोचले तर बरं' असं वाटण्याजागी उलट उत्तर देण्याची, निदान अपराधगंड देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती जरी असती तरी माझं आयुष्य आणखी थोडं सुधारलं असतं.

मुलींना, स्त्रियांना असे डाग पाडून घेण्याची हौस नसते. बहुतेकींबद्दल हे ठामपणे म्हणता येईल. पण रक्ताचे डाग पडतात. कितीही काळजी घेतली तरी डाग पडतात. त्याला इलाज नाही. या मुलींना, स्त्रियांना त्याबद्दल अपराधगंड वाटतो. तो अपराधगंड अजिबात वाटू नये, निदान कमी व्हावा या विचारांसाठी तिची कृती अतिशय महत्त्वाची आहे. हा तिच्या कृतीमधून होणारा प्रत्यक्ष फायदा आहे. तो फायदा पाहण्यासाठी मुळात लोणचं किंवा विटाळशी यांच्यापलिकडे काही अडचणी असतात त्यांचं आकलन करून घ्यावं लागतं. त्यासाठी ज्यांना अडचणी असतात त्यांच्याबद्दल आस्था आणि संवेदनशीलता बाळगावी लागते.

म्हणूनच धाग्याच्या शीर्षकाबद्दल थोडं - बलात्कार, खून, हुंडा, हुंडाबळी या गोष्टी अन्यायकारक आहेत हे सगळेच मान्य करतात. त्यासाठी स्त्रीवाद्यांना सैद्धांतिक पातळीवर कष्ट करण्याची गरज राहिलेली नाही. पळीपंत्रपात्रीचा मोठा आवाज करता येईल तसे हे प्रश्न आहेत, मोठा बॅकलॅश येतो आसे. त्यामानाने झोला, बिंदी, मेणबत्त्यांचे आवाज होत नाहीत. ते बारीक प्रश्नांचं, प्रगत समाजात येणाऱ्या अडचणींचं प्रतीक आहे. खून, बलात्कार यांच्या तुलनेत अपराधगंड ही छोटी, व्यक्तिगत पातळीवर असणारी अडचण आहे. पण ज्यांना अपराधगंड आहे त्यांना त्याचा त्रासच होतो, तो नकोसाच असतो. मागच्या जमान्यातल्या एखाद्या "रूढ" गोष्टीला सगळेच जेव्हा नाकारतात तेव्हा त्याखाली दबलेले इतर काही प्रश्न दिसायला लागतात. ते प्रश्न ज्यांना दिसत, जाणवत नाहीत त्यांच्यासाठी हे लेखनाचे प्रयत्न.

मोठा आवाज करून किरनने या लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. "तिने तिचं स्वातंत्र्य उपभोगलं, त्याचा इतर कोणालाही त्रास नाही तोवर काहीही करावं" अशी एक भूमिका घेता येते. "तिने तिचं स्वातंत्र्य वापरताना लोकांच्या भावना दुखावून चळवळीचं नुकसान केलं" अशीही भूमिका घेता येते. कोणती भूमिका घ्यायची हा आपापला प्रश्न आहे.

अ. संताच्या डोक्यावर पक्षी शिटतो. त्याला बंता कागद काढून देतो. तेव्हा संता वैतागून म्हणतो, "आता या कागदाचं काय करू? पक्षी तर उडून गेला."

--

अवांतर विचार - रूपीचा फोटो किंवा किरनचं मॅरेथॉन धावणं या दोन पाळीच्या संदर्भातल्या, प्रसिद्धी मिळालेल्या मोठ्या घटना. दोन्ही स्त्रिया भारतीय वंशाच्या आहेत हा योगायोग वाटतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

या विषयावरची एक हिंदी कविता -

http://www.kavitakosh.org/kk/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली कविता शेयर केल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Smile
___
कविताकोशवरती माहवारी शब्दावर सर्च देता ही एकच भारतीय कविता सापडली. दुसरी होती ल्युसिल क्लिफ्टनच्या कवितेचा अनुवाद पण ती मूळ कविता वरती उधृत केलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान चर्चा.

इतके महिने प्रॅक्टिस केल्यावर केवळ पाळी सुरू झाली, नाकातून डोळ्यातून जरा पाणी येतेय किंवा घाम येतोय असल्या प्रकारच्या क्षुल्लक नी नित्य कारणासाठी म्हणून मॅरेथॉन धाऊ नये असे कोण म्हणेल? घाम, शेंबूड किंवा पाळीचा स्राव धावता धावता पुसून आपले धावण्याचे सेकंद का वाढवा?

मला तर तिचा निर्णय अतिशय योग्य वाटला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!


इतके महिने प्रॅक्टिस केल्यावर केवळ पाळी सुरू झाली, नाकातून डोळ्यातून जरा पाणी येतेय किंवा घाम येतोय असल्या प्रकारच्या क्षुल्लक नी नित्य कारणासाठी म्हणून मॅरेथॉन धाऊ नये असे कोण म्हणेल? घाम, शेंबूड किंवा पाळीचा स्राव धावता धावता पुसून आपले धावण्याचे सेकंद का वाढवा?

धावपटू महिलेच्या निर्णयाबाबत चर्चा करीत नाही पण पॅड वापरले असते तरी धावण्याचे सेकंद वाढले असते की कसे याबद्दल साशंक आहे. शेंबूड पुसण्यासाठी नाकाखाली लावण्याचे पॅड किंवा अजून काही बाजारात आलाय का ? नसेल तर तो धावता धावता गळू देणे हा एकच उपाय सध्यातरी दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धावण्याचे सेकंद वाढण्यापेक्षा प्याड काचणे ही अडचण अधिक त्रासदायक होईल. तसेही मॅरेथॉन धावताना सेकंदाचा हिशोब करायला लागत नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

धावण्याचे सेकंद वाढण्यापेक्षा प्याड काचणे ही अडचण अधिक त्रासदायक होईल

हो की! समत आहे.

घामाबद्दल कोणीच बोलत नैये. तोही शेंबूड, नाकाडोळ्यातील पाणी व/वा पाळीसारखा एक आपोआप येणारा स्राव ए. त्याला तर अनेकांना नकोसा वाटणारा वासही येतो!

तो गाळत धावल्याबद्द्ल निषेध व्यक्त का बरे करावासा वाटत नै?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नक्की प्रॉब्लेम काय आहे? माझं नाक न पुसल्यामुळे / नाकाखाली रुमाल न बांधल्यामुळे माझे श्रम आणि वेळ आणि गैरसोय वाचणार आहे असं मला वाटलं. मी तसं केलं. अडचण काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तसं म्हणत असाल तर कै अडचणच नैये. पण "शेंबूड न पुसून मी कैतरी स्टेटमेंट केलंय" असं म्हणत असाल तर चर्चा तर होणारच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हो, विधान केलं. की बाबा, रुमाल कंपल्सरी नाही. अनेकांना कळलं, की रुमालाशिवाय चालतं. हे महत्त्वाचं आहे असंही मला वाटतं. काय चुकीचं आहे त्यात?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रॉब्लेम नाही हेच तर सांगतोय.
शिवाय धावपटूने पॅड न वापरण्याचा निर्णय घेऊन भविष्यात निर्माण होणारा जैविक कचरा कमी करण्यास हातभार लावलायं याचे देखील कौतुक व्हायलाच हवे.
शिवाय महिन्याला काही पैशांची बचत होईल ती वेगळीच. बाकी रुमाल मग तो शेंबूड पुसायचा असो नाहितर आणि कसला वापरायचा की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचेय.
त्यावर माझ्याकडून प्रतिक्रिया नाहीये.
मी दुसर्‍यांच्या इच्छेचा मान ठेवायचा प्रयत्न करतोय हो ! मला शेंबूड बघायचा नसेल तर मान वळवून दुसरीकडे बघायचा पर्याय आहेच की !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरोबर. पण तो रुमाल नसल्याचा फोटो एखाद्या सार्वजनिक ठिकाणाहून हटवण्याचा पर्याय मात्र नाही, किमान नसावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे असले प्रतिसाद म्हणजे पाल्हाळ आहे नुसता. एखाद्या गोष्टीचं समर्थन करायचं ठरवलच आहे म्हणून शेंबूड, घाम काहीही म्हणजे काहीही उपटून काढायचं आणि त्यावर बोलायचं. असे प्रतिसाद देणारे उद्या चालून घाम पुसणार नाहीत की त्याचा वास येऊ नये म्हणून डिओ वापरणार नाहीत? की महत्वाच्या मिटींगमधे शेंबडं नाक घेऊन बोलताना ते न पूसता क्लायंट समोर "बघा मी शेंबूड पूसत नाहीये तरी काही फरक पडत नाही" म्हणणार? किरण गांधीप्रमाणे काही करणं ही खूप पुढची गोष्टं! पण असो ज्यांच्या मते फक्तं बोलणं महत्वाचं; कृती नाही केली तरी चालते (म्हाणजे ती करणं हे दुसर्‍यांचं कर्तव्य) तेव्हा काय बोलणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

रुमाल बांधल्याने श्रम वाढतीलच याबद्दल शंका वर्तवलीये. त्यावर फुका अडचणीचा हेत्वारोप कशाला? जे प्रश्न ट्रू/फॉल्स अशा थाटाचे आहेत त्याला राईट/राँग कडे नेण्यात काय अर्थ आहे ते समजत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पॅड वगैरे घालून धावणे हा ऑप्शनच नव्हता असे तर म्हणायचे नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फेसबुकवर दोन पोस्ट्स वाचनात आल्या. ही पहिली -

पाळी मिळी गुपचिळी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३ मो.क्र.९८२२०१०३४९

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ शोधत मी त्यांचे बोलणे या कानानी ऐकत होतो आणि त्या कानानी सोडून देत होतो. फार गांभीर्याने ऐकावं असं त्या पोपटपंचीत नसतंच काही. पण इतक्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “आता सणाचे दिवस जवळ आले डॉक्टर, आता खूप बायका पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला येतील. तेव्हा लक्षात असू दया आमच्याच कंपनीच्या गोळ्या दया. प्लीज सर!! सणासुदीच्या दिवसांमुळे कंपनीने टार्गेट वाढवून दिले आहे; आणि तुम्ही मनावर घेतल्या शिवाय ते मला गाठता येणार नाही.” एवढं बोलून गोळ्यांचं एक नमुना पाकीट माझ्या टेबलावर ठेवत तो निघाला सुद्धा. माझा अहं कुरवाळून आपला काम सफाईदारपणे करून तो निघून गेला. मी मात्र अचंबित झालो.
एका लहानश्या गावातल्या एका लहानश्या डॉक्टरपर्यंत आवर्जून आर्जवं करणे कंपनीला सहजपणे परवडत होतं, म्हणजे हे पाळी पुढे ढकलण्याचे मार्केट किती प्रचंड लाभदायी आहे बघा! औषध कंपन्या आपला माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे माहीत होतं, पण त्या हे ही टोक गाठतील असं माझ्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पाळी या प्रकाराबद्दल भारतीय समाजमनाची नस बरोब्बर हेरून योग्य वेळी त्यांनी आपला माल पुढे केला होता. मला कौतुकच वाटलं त्या कंपनीचं.

खरं तर ही मागणी नेहेमिचीच, पूजा, सत्यनारायण, तीर्थयात्रा, उत्सव, सण वगैरे निमित्ताने केली जाणारी. क्वचित प्रवास, परीक्षा वगैरे कारणेही असतात, पण ती अपवादानेच. किती साधी सोपी रुटीन गोष्ट होती ही. बायकांनी यायचं, पाळी पुढे जायच्या गोळ्या मागायच्या आणि चार जुजबी प्रश्न विचारून आम्ही त्या द्यायच्या. माझी चिठ्ठीही नेहेमीचीच. मुकाटपणे दिली जाणारी. पण मनातल्या मनात मी वैतागतो, चरफडतो. म्हणतो, ‘काय मूर्ख बायका आहेत या! शुद्धाशुद्धतेच्या कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून आहेत.’
वेळ असला की माझ्यातला कर्ता सुधारक बोलता होतो. एरवी मागताक्षणी चिठ्ठी लिहून देणारा मी, समोरच्या स्त्रीला प्रश्न विचारतो, ‘काय शिक्षण झाले आहे तुमचे?’
‘क्ष’
क्ष ची किंमत अशिक्षित पासून डॉक्टरेट पर्यंत काहीही असू शकते.
‘आलीच जर पाळी, तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’
‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.
‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.
पाळी आलेल्या स्त्रीला अस्वच्छ अपवित्र समजणे याची पाळेमुळे पार खोलवर रुजलेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या, निसर्गनेमाने घडणाऱ्या, एका अत्यंत शारीर कार्याला धर्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक धुमारे फुटले आहेत. कुठून येतात या कल्पना? अगदी लहानपणापासून मनात कोरल्या जातात त्या. आई, मोठ्या बहिणी, शेजारी पाजारी सगळीकडे असतात त्या. आपण फक्त मनानं स्पंज सारख्या त्या टिपून घ्यायच्या.

शाळेत कधी कधी जायचा प्रसंग येतो. मुला-मुलींसमोर ‘वयात येताना’ या विषयावर बोलायला. सगळ्या मुली पाळीला सर्रास ‘प्रॉब्लेम’ असा शब्द वापरतात. प्रॉब्लेम आला/ गेला/ येणार वगैरे. मी गमतीने म्हणतो, ‘अहो पाळी ठरल्यावेळी न येणं, हा खरा प्रॉब्लेम! पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा?’ मुलींना मी सांगतो, प्रॉब्लेम शब्द वापरू नका. पाळी आली असं म्हणा. मराठीत बोलणे फारच गावठी वाटत असेल तर एम.सी. म्हणा, मेंन्सेस म्हणा; आणखी इंग्रजी फाडायचं असेल तर चम म्हणा; पण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रीयेविषयी मनात नकारात्मक भावना नाही का निर्माण होतं? पण हा प्रश्न गैरलागूच म्हणायचा. प्रॉब्लेममुळे नकारात्मक भावना नसून; मुळातल्या नकारात्मक भावनेपोटी हा शब्द वापरला जातो. काहीही असो पण हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. यामुळे मुळातली नकारात्मकता आणखी गडद होते. त्यावर लोकमान्यतेच्या पसंतीची मोहोर उमटते.

ह्या मुळातल्या गैरसमजाचे पडसाद इतरही सर्वमान्य शब्दांमध्ये दिसतात. काही कारणाने पाळीचा त्रास झाला तर पिशवी धुतात/साफ करतात. याचा वैद्यकीय अर्थ पिशवीच्या आतलं अस्तर खरवडून काढून टाकतात. हेतू हा की रक्तस्त्राव थांबावा, तपासणीसाठी अस्तराचा तुकडा मिळावा आणि नव्याने तयार होणारे अस्तर एकसाथ, एकसमान तयार व्हावे. पण हे सारे व्यक्त करणारा शब्दच नाहीये. क्युरेटींग हा इंग्रजी शब्द रूढ आहे पण त्यामागचा हा भाव कुणालाच कळत नाही. सर्रास पिशवी धुणे /साफ करणे वगैरे चालू असतं.

एकदा पाळी हा प्रॉब्लेम ठरला की पुढे सगळे ओघानेच येतं. पाळी म्हणजे शरीरात महीनाभर साठलेली घाण बाहेर टाकण्याची एक क्रिया, हे ही मग पटकन पटते. समाजानी पाळी आणि अपावित्र्याचा संबंध जोडला आहे, यात काही आश्चर्य नाही. मलमूत्राच्या वाटेशेजारीच पाळीची वाट आहे. मलमूत्रविसर्जन ही तर निश्चितच उत्सर्जक क्रिया आहे. चक्क शरीरातील घाण वेळोवेळी बाहेर टाकणारी क्रिया. अज्ञानापोटी समाजाने पाळीलाही तेच लेबल लावलं. खरंतर शरीरातील पेशी सातत्याने मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. आपली त्वचा झडते, पुन्हा येते, केस झडतात पुन्हा येतात, लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असतं; तसंच काहीसं हे आहे. गर्भपिशवीचे अस्तर ठराविक काळ गर्भधारणेला आधार ठरू शकते. मग ते निरुपयोगी ठरतं. बाहेर टाकलं जातं, पाळी येते. पुन्हा नव्यानं अस्तर तयार होतं. (मासिक चक्रं). मुद्दा एव्हढाच की मासिक पाळी ही उत्सर्जक क्रिया नाही. पण कित्येक स्त्रियांना आणि पुरुषांना असं वाटतं की महिनाभराची सगळी घाण गर्भपिशवीत साठते आणि ती महिनाअखेरीस बाहेर टाकली जाते.

अशा बायकांसाठी वेगळी झोपडी, वेगळी जागा, वेगळं अन्न चार दिवस बाहेर बसणं, पूजाअर्चा, देवळात जाणं बंद, पाचव्या दिवशी अंघोळ करणं, पाळीच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी न होणं या सगळ्या रूढी आणि परंपरा याचाच परीपाक आहेत. जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो याबाबतीत सर्व धर्म भलतेच समान आहेत.
पाळीच्या या चार दिवस विश्रांतीचं समर्थन करणारीही जनता आहे. ‘तेवढंच त्या बाईला जरा सूख, जराशी विश्रांती...’ वगैरे. म्हणजे एरवी श्वास घ्यायलाही फुरसत नाही एवढा कामाचा रामरगाडा! अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती; आदरभावातून, ऋणभावनेने मिळालेली नाही ही. घराला विटाळ होऊ नये म्हणून ही बाकी घरानी केलेली तडजोड आहे. त्या बाईप्रती आदर, तिच्या कामाप्रती कृतज्ञता, तिच्या घरातील सहभागाचा सन्मान कुठे आहे इथे? नकोच असली विश्रांती. हे बक्षीस नाही, बक्षिसी आहे ही! उपकार केल्यासारखी दिलेली ही बक्षिसी बाईनी नाकारायला हवी.
का होतं, कसं होत वगैरे काहीही जीवशास्त्र माहीत नसताना पाळी हा प्रकार भलताच गोंधळात टाकणारा होता, आदिमानवाला आणि त्याच्या टोळीतल्या स्त्रियांना. महिन्याच्या महिन्याला रक्तस्त्राव होतो, चांद्रमासाप्रमाणेच की हे, निश्चितच दैवी अतिमानवी योजना ही. जखम-बिखम काही नाही, वयात आल्यावर स्त्राव होतो, म्हातारपणी थांबतो, गरोदरपणी थांबतो...! किती प्रश्न, किती गूढ, किती कोडी. पण म्हणून आजही आपण आदिमानवाचीच री ओढायची म्हणजे जरा जास्तच होतंय!

पाळी येण्यामागचं विज्ञान समजलं, पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्याही निघाल्या. पण आपण याचा उपयोग सजगपणे करणार नाही. आपण या गोळ्या आपल्या शरीराबद्दलच्या, पाळीच्या अपावित्र्याच्या पारंपारिक कल्पना दृढ करण्यासाठी वापरणार! वा रे आपली प्रगती! वा रे आपली वैज्ञानिक दृष्टी!
पण समाजानं जरी अपावित्र्य चिकटंवलं असलं तरी ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं थोडंच आहे? निसर्गधर्मानुसार आलेली पाळी चालत नाही आणि औषध घेऊन पुढे गेलेली चालते, हे ठरवलं कोणी? ही बंधनं विचारपूर्वक नाकारायला नकोत? ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला; सोवळा तो झाला कवण धर्म? विटाळा वाचून उत्पतीचे स्थान, कोण देह निर्माण, नाही जगी’ असं संत सोयराबाईनी विचारलं आहे.

हे असलं काही बोललं की प्रतिपक्षाची दोन उत्तरं असतात. एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात; आणि दुसरं समजा घेतल्या गोळ्या आणि ढकलली पाळी पुढे तर बिघडलं कुठं?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की ही समाजरचना अमान्य करण्याचे पहिलं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघा. गोष्ट साधीशीच आहे. ठामपणे सांगीतल तर पटणारी आहे. स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.
‘घेतल्या गोळ्या तर बिघडतं काय?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो! आई करते म्हणून थोरली करते आणि ताई करते म्हणून धाकटी! डोकं चालवायचंच नाही असं नकळत आणि आपोआप होत जातं
हे सारं कुठेतरी थांबायला हवं. स्वताःच्या आणि परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टीने स्त्री-पुरुषांना पहाता यायला हवं. कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करायला हवी.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
जि. सातारा.
पिन ४१२ ८०३
मो.क्र.९८२२०१०३४९

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!

हे वाक्य अनेकजणींच्या ओठावर येऊन पोटात जात असणार. कारण घरचा दबाव. घरातलं फाटकं आपण नाही लपवणार तर दुसरं कोण लपवणार अशा प्रकारचे समज आणी त्यातून आलेला गुळमुळीतपणा व चक्क ढोंग.
.

एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात;

असंच नसतं आत राग खदखदत असतो. पुरुषी वर्चस्व मान्य नसतं. पण सांगणार कोणाला? तोंड दाबून बुक्क्यांचा मार असेही असू शकते.
.

स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.

अधोरेखित वाक्य हे मिथ आहे.
स्वतःला पटणार्‍या गोष्टी बर्‍याच असतात. पण त्याविरुद्ध पोहायचे धैर्य कदाचित दुर्मिळ असते.
___________
बाकी पोस्ट खूप आवडली. शेअर करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वाक्य अनेकजणींच्या ओठावर येऊन पोटात जात असणार. कारण घरचा दबाव. घरातलं फाटकं आपण नाही लपवणार तर दुसरं कोण लपवणार अशा प्रकारचे समज आणी त्यातून आलेला गुळमुळीतपणा व चक्क ढोंग.

माझ्या आजुबाजुच्या आणि नातेवाईकांच्या मधे उलटा प्रकार आहे. पुरुषांकडुन हा सर्व प्रकार मूर्खात काढला जातो आणि अजिबात पाळु नका असे सांगितले जाते पण बायकाच मनापासुन हे सर्व पाळतात असे माझ्या बघण्यात आहे.

ह्या वर "माझ्यावर घेट्टोत रहातेस, तुला काय जग माहीती" हा आरोप होइल, मला हे असले जग नकोच आहे , ह्या अश्याच कारणासाठी मला माझा घेट्टो प्रिय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य आहे.
मला पण येऊ दे तुझ्या घेट्टोत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आजुबाजुच्या आणि नातेवाईकांच्या मधे उलटा प्रकार आहे. पुरुषांकडुन हा सर्व प्रकार मूर्खात काढला जातो आणि अजिबात पाळु नका असे सांगितले जाते पण बायकाच मनापासुन हे सर्व पाळतात असे माझ्या बघण्यात आहे.

हम्म खरय ! सर्व नसेल तरी देवघर आणि मंदिरातील भेटी टाळणे असेही होते. पाळी प्रकार सोडून इतरवेळीही नारळ न फोडणे, दह्यास विरजण न लावणे अशाही श्रद्धा दिसतात. नरहर कुरुंदकरांच एक वाक्य माझ्या डोक्या बाहेर जात नाही ते म्हणजे स्वातंत्र्य संस्कृतीसिद्ध असते. पिंजर्‍याच्या मालकाने स्वतःहून पिंजर्‍याचे दार उघडे ठेवले तरी नको असलेले स्वातंत्र्य देण्याबद्दल पिंजर्‍यातला पोपट स्वतः येऊन पिंजर्‍याच्या मालकाला डाफरू शकतोच. ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

>>‘आलीच जर पाळी, तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’
‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.
‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.

आमच्या घरी नाही चालत, आमचं काही नाही....., ही दोन विधाने "मला पटत नाही पण..." याच अर्थाची आहेत ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.
‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.

जे बोलूनचालून धर्मनिष्ठ किंवा धर्माबद्दल वगैरे सहानुभूती इ. बाळगून आहेत त्यांचे तर सोडूनच सोडा, पण तथाकथित लिबरलही असेच बोलत असतील तर मज्जाच आहे नुस्ती. की अशी विधाने करून समाजाच्या मतांना किंमत देतो असे इम्प्रेषन क्रिएट करायचे असते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण तथाकथित लिबरलही असेच बोलत असतील तर मज्जाच आहे नुस्ती. की अशी विधाने करून समाजाच्या मतांना किंमत देतो असे इम्प्रेषन क्रिएट करायचे असते?

वेल कर्मठ असोत अथवा पुरोगामी अथवा अजून कुठल्या दृष्टीकोणाचे कुठेही दुहेरी भूमीका या टिकेस पात्र ठरतात याबद्दल वाद नाही. पण शेवटी मानवी व्यक्तीगत व्यवहार आणि भूमिका दोन्हीही दुरुन न्याहाळणार्‍या त्रयस्थांसाठी म्हणून बनतात असे निश्चितपणे सांगता येईल अथवा तसे करावे किंवा कसे.

काही स्वप्रसिद्धीलोलूप लोक केवळ प्रसिद्धीसाठी स्वतःचे चित्रण अमूक तमूक करू शकतील पण सर्वसामान्य समाजातील सर्वसामान्य व्यक्ती सर्वसामान्यपणे कधी आपुलकीने कधी आडला नारायण उक्तीप्रमाणे तडजोडकरत जगत असते, काळाच्या ओघात विचारही बदलत जातात, कधी मते जुळत नसतानाही दुसर्‍या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर ठेवावयाचा असतो, याचा अर्थ प्रत्येक वेळेस चमकोगिरीचाच उद्देश असेल असे नव्हे. म्हणून या संदर्भाने निष्कर्ष घाई अथवा सरसकटीकरण वृथा असेल किंवा कसे.

(बाकी उपरोक्त नितीन-ब्यटमन संवादास त्यांचे आपापसातील पुर्वसंदर्भ असल्यास चर्चेत मध्येच डोके टाकण्याबद्दल क्षमस्व Smile)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

बाकी काही असो, निव्वळ "हे माझ्या मनाविरुद्ध आहे" हेही कबूल का करवत नसेल ह्याचे कोडेच आहे. बहुधा समोरचा काय म्हणेल याची भीती. एकीकडे समाजाला फाट्यावर मारूनही त्याच्या मताची काळजी आहेच, हे फार फार उद्बोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकीकडे समाजाला फाट्यावर मारूनही त्याच्या मताची काळजी आहेच, हे फार फार उद्बोचक आहे.

या वाक्या प्रमाणे माझ्यास्वतःच्या बाबतीतही असे होते. मला माझ्या विचारांच स्वातंत्र्यही जपायच असत निर्णय लॉजीकली घेण्याबाबत आग्रही असतो आणि तरीही कुणालाही नाही म्हणून दुखवायला मला स्वतःला फार अवघड जाते. भावुक होणे आणि संवेदनशील असणे यात अंशतःफरक आहे. लॉजीकली विचार करणारी माणसे विशीष्ट विचारांमुळे न पटणार्‍या कृतीशी भावनेने जोडली जातील असे नव्हे पण स्वतःची संवेदनशीलता जपण्यासाठी न पटणारी गोष्टही करू शकतात. (अवांतर; कॉर्पोरेट इंटरव्ह्युज मध्ये मला स्वत:च्या व्यक्तीमत्वाच्या मर्यादा विचारल्या नंतर नाही म्हणून दुखवायला मला स्वतःला फार अवघड जाते हे मी आधी मनमोकळेपणाने सांगायला शिकलो तेव्हा माझे प्रश्न मला जरासे हलके व्हावयास लागले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

एकीकडे असे म्हणायचे आणि दुसरीकडे धर्म पाळणार्‍यांना किंवा 'पुरेसे सेकुलर/अश्रद्ध' नसणार्‍यांना शिव्याही घालायच्या हेही खूप उद्बोचक आहे. समाजात राहण्यासाठी जी तात्त्विक तडजोड स्वतःला अलाउड आहे तीच दुसर्‍या पक्षाला मात्र दिली जात नाही, सबब हेतूबद्दल शंका उपस्थित होते- बाकी कै नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

ही दुसरी पोस्ट.

पत्रकारितेत field वर काम करत असताना आलेला सगळ्यात वाईट अनुभव(2006) - Etv ला लोक पत्र लिहून आपल्या समस्या सांगायचे..मदत करा..एका शनिवारी असं एक पत्र सरांनी दिल, सांगितल बघ काय story होते का? मी पत्र लिहिणाऱ्यांना फोन केला,पत्ता घेतला.. त्यांच्या घरी गेले..त्यांच्या घरी आत जाणार तेवढ्यात दरवाजात त्या माणसाने मला विचारलं " तुम्हांला पाळी आहे का आज? आम्ही देवीच खूप पाळतो..चालत नाही म्हणून.." अचानक आलेल्या ह्या प्रश्नाला काय उत्तर द्यायच, सुचलं नाही.. "नाही" असं बोलून घरात गेले..तो माणूस त्याची समस्या सांगत होता, पण माझं डोक सटकलेलं की कोणी आपल्याला असा प्रश्न विचारू कसा शकतो.. हा अपमान आहे..तरी बाईट घेतला, visuals घेतले..ऑफिसला येऊन सरांना घडलेला प्रसंग सांगितला..ते म्हणाले, "तू तिथे थांबायला नव्हतं पाहिजे..तिथेच त्याला बोलून दाखवायच होत.. त्याची story पण करू नकोस..पण अस ऐकून घ्यायच नाही.". हे ऐकल्यावर इतकं हायस वाटलं.. आपले सर आपल्या बाजूने उभे राहिले.. काही दिवसांनी त्याच माणसाने आमच्या सरांना पत्र लिहून माझ्यावर आरोप केला की मी story करायला आले..पण दाखवली नाही.. मी पैसे खाले..हे पत्र पण सरांनी मला दाखवलं... कीव आली त्या माणसाची! हसू पण आलं...पण तेव्हा साठे सर होते ज्यांनी ह्या पलीकडे जाऊन आपण काम करत रहायचं हे शिकवलं...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही पोस्टदेखील आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या चतुरंगात स्वस्त सॅनिटरी नॅपाकिन्स बनावणाऱ्या गृहस्थांवर लेख आहे. इंट्रेष्टिंग.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

स्मृती इराणींमुळे ही जुनी चर्चा पुन्हा आठवली.

Will you take sanitary napkins soaked in blood to a friend’s home: Smriti Irani on Sabarimala row

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरोखरंच स्मृती इराणी काही आक्षेपार्ह बोलल्या आहेत का?

"Would you take sanitary napkins steeped in menstrual blood and walk into a friend’s home."

या विधानावरून, ते नॅपकिन्स,
१. योनीवर लावलेल्या अवस्थेत की
२. एखाद्या कॅरीबॅगेत घालून
मित्र/मैत्रीणीकडे जायचं, हे स्पष्ट होत नाही.

"सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे." हे मात्र आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी 'न'वी बाजू असते तर, सॅनिटरी नॅपकिन योनीवर लावत नाहीत, याबद्दल मोठा निबंध पाडला असते.
टिळक असते तर, मी शेंगा-टरफलं दृष्टांत दिला असता.
आंजावर नवखी असते तर तुमच्या प्रतिसादाच्या दहा तास वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिनच्या जशा चिंध्या होतात, तशा चिंध्या केल्या असत्या.

पण मी मी आहे, त्यामुळे शर्मिला कलगुटकरांचं उत्तर खाली डकवलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मादाम स्म्रृतीजी म्हणाल्या steeped in menstrual blood and walk into a friend’s home

आणि

आणि वामनजी विचारत आहेत एखाद्या कॅरीबॅगेत घालून

म्हणजे असंही करतात लोक? कॅरिबॅग? हे तर टू मच च्या पुढचं झालं. कलियुग बरंका कलियुग. "घरी येणाऱ्या- जाणाऱ्यांच्या पिशव्या चेक करा" असा नियम /कायदा करायला हरकत नाही मनुक्षबळ विकास (???) मंत्रालयाने.

"संसद लोकतंत्र का पवित्र मंदिर है" असं लैदा ऐकलंय. मादाम स्म्रृतीजी जे बोलतात तसं वागतात की ... ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर देवळात सरसकट जननक्षम वयाच्या स्त्रियांना बंदी होती. ह्या एकंदर स्त्रियांना कमअस्सल मनुष्य मानण्याच्या पुरुषी वर्चस्ववादी दृष्टिकोणाबद्दल काहीही न बोलता स्मृती बाईसाहेबांनी सवंग प्रतिक्रिया दिली हे दिसतेच आहे.
या निमित्ताने मला माझ्या आजीची आठवण आली. (१९१०-१९७९) ती अर्थात तिच्या काळानुरुप बाजूला बसणे हेच योग्य वाटणारी होती. आणि अत्यंत धार्मिक होती. तिच्या हयातीत तिच्या सुना "पाळत" - एकत्र राहणाऱ्याच नव्हे, विभक्त राहणाऱ्याही आणि आजी त्यांना डबा पाठवे. आईची पाळी असताना आई माहेरी जाणे टाळे, तीही येत नसे. पण तिच्या बोलण्यात एकदा आले होते की जर एखाद्या बाईला त्या तीन दिवसांत भगवंताच्या - ती नेहमी देव न म्हणता भगवंतच म्हणायची - सेवेत खंड पडतो याची रुखरुख लागत असेल तर तिने खुशाल देवळात जावे. पण खरोखर भगवंताच्या दर्शनाची तळमळ तिला रोज असली पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन-चार दिवसांपूर्वी फेसबुकवर लिहिलं होतं, "माझ्यासारख्या ओवाळून टाकलेल्या लोकांनी या विषयावर बोलू नये." त्याचं समर्थन सापडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिच्या बोलण्यात एकदा आले होते की जर एखाद्या बाईला त्या तीन दिवसांत भगवंताच्या - ती नेहमी देव न म्हणता भगवंतच म्हणायची - सेवेत खंड पडतो याची रुखरुख लागत असेल तर तिने खुशाल देवळात जावे. पण खरोखर भगवंताच्या दर्शनाची तळमळ तिला रोज असली पाहिजे.

+१ मी स्तोत्रे म्हणते. मला तेवढाही खंड आवडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे माझ्या व्यायामासारखं झालं. सोमवार ते शुक्रवार मला व्यायाम येतो, मी करते.

अनेक आयुर्वेदिक लोक 'त्या दिवसांत' व्यायाम करू नये, याची कारणं सांगत फिरतात. मला उलट व्यायामामुळे कंबरदुखीवर उतार पडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

म्हणजे बाई पाळी चालू असताना स्वतः मित्र-मैत्रिणींकडे/नातेवाईकांकडे/समारंभांना/ सभांना जात नाहीत की काय? यांच्या बोलण्यावरून वाटेल की बाया वापरलेले सॅनिटरी नॅपकिन हातात घेऊन फिरतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणा कार्यकर्त्रीनं म्हटलं की ती भरलेला नॅपकीन घेऊन देवळात जाईल. नंतर ती कार्यकर्त्री म्हणाली, मी असं म्हटलंच नाही. आता दिसतंय की भाजपच्या आयटी सेलनं पसरवलेली अफवा आहे.

आणि या अफवेला खर्रखर्र आंदोलन समजत स्मृतीबाईंनी तारे तोडले. त्यातही, तारे तोडले तेव्हा त्यांना या विशिष्ट संदर्भात प्रश्न विचारला नव्हताच; स्त्रियांना त्या देवळात प्रवेश द्यावा का, याबद्दल सर्वसाधारण प्रश्न विचारला होता.

तर असल्या स्मृतीबाईंना घेऊन मी माझ्या मित्रमैत्रिणींच्या घरी जाणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उजव्या बायकांइतक्या बायकांच्या शत्रू त्रिभुवनात दुसऱ्या नसतील. हे वैश्विक सत्य आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते म्हणतात. तद्वत, जगात यशस्वी उजव्या पॅट्रियार्कीमागे उजव्या बायका ठाम उभ्या असतात.

ही शिक्षणाने दूर होऊ शकणारी कीड नाही. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शर्मिला कलगुटकर यांनी स्मृती इराणी यांना दिलेलं उत्तर (फेसबुकचा दुवा)-

---

मॅडम,

नमस्कार. काही वर्षांपूर्वी आम्हाला मासिक पाळी येते, त्यामुळे पोटात , कंबरेत जबर दुखते. पायातून क्रॅम्प जातात. ओटीपोटातून कळा येतात. भयंकर ब्लिडिंग होतेय, हे मित्रांना सांगण्याची हिंमत नव्हती. आम्हाला त्यात लाज वाटायची. पण आमच्या या शारिरिक क्रियेकडे विटाळ म्हणून न पाहता ती नैसर्गिक प्रक्रिया म्हणून पाहा, हे सांगण्याचा सहजपणा आम्ही जाणीवपूर्वक मिळवला आहे. आमच्या सहकार्य़ांना, मित्रांना प्रसंगी त्रास होत असेल तेव्हा तो मोकळेपणाने सांगण्याचं धाडस आमच्याकडे आता आहे. मासिक पाळी असताना रक्ताने भरलेले पॅड घेऊन शेकडो बाया या शहरात, देशात काम करत असतात. पोटाची भ्रांत मिटवण्यासाठी डोक्यावर रणरणत्या उन्हात ओझी वाहतात. बाळाला दूध पाजतात. दणकून फिल्डवर्क करतात.धावत्या गाड्या पकडतात.रात्रीची जागरण प्रवास करतात. रांधतात, राबतात. डेडलाईनवर काम करतात. तुमच्या तोडीस तोड काम करत असतात. त्यामुळे त्या शेकडो हजारो ठिकाणी या पॅडससह जातात. तुम्ही ज्या हिडीस शब्दांत शंका उपस्थित केली तेवढी मात्र त्या करत नाहीत.

अशा शेकडो महिलांना या पॅडस् मध्ये वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे जंतुसंसर्ग होतो. तो गर्भाशयापर्यंत जातो. सातत्याने मूत्रमार्गाचा संसर्ग होऊन या देशातील साडे अकरा टक्के महिलांची गर्भाशय काढावी लागतात. याची तुम्हाला कल्पना आहे काय, त्यासाठी तुम्ही काय केलंय..मासिक पाळीच्या काळात घरगुती हिंसा, बलात्काराला सातत्याे तोंड देणाऱ्या बायांशी तुम्ही कधी बोलला आहात. या देशातल्या अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक शौचालये नाही. पॅड बदलण्यासाठी जागा नाही, उपलब्धता नाही. जी शौचालये आहेत तिथे कचरा टाकण्याची जागा नसल्याने सॅनेटरी नॅपकिन त्याच ठिकाणी फेकले जातात. त्या रक्ताळलेल्या पॅडस काढण्याचं काम याच देशातल्या कचरावेचक महिला करतात हे तुम्हाला माहित आहे का.

मासिक पाळी हा केवळ लैंगिकतेशी, प्रजननक्षमतेशी जोडलेला मुद्दा नाही. त्याच्याशी अनुषंगाने असलेल्या शेकडो गोष्टी या स्त्रियांच्या आत्मसन्मानाशी निगडित आहे याची तुम्हाला कल्पना आहे का..
आजही पॅड वापरण ही या देशातल्या मोठ्या वर्गातल्या महिलांसाठी चैनेची बाब आहे. कारण 260 रुपयांचे पॅड महिन्याला वापरण्याइतका पैका त्यांच्याक़डे नाही. शेकडो आश्रमशाळांमध्ये वयात येणाऱ्या मुलींना महिन्याला देण्यात येणारे चार पॅड त्या पाच दिवसाला एक या हिशेबाने वापरतात. यात अनेकींच्या शाळा सुटतात. पोटातल्या वेदनांनी कळवणार्या मुली, महिला पेनकिलर खाऊन कामंकरतात. त्यातून वंधत्वापासून गर्भाशय निकामी होण्यापर्यंतच्या शेकडो शारिरिक तक्रारी उद्भवतात. आज जे पॅड परदेशातून येतात त्यांची विल्हेवाट लावण्याची कोणतीही व्यवस्था या शहरात नाही. कचर्याच्या गाड्यातून डम्पिंगवर जाणाऱ्या पॅ़डस हाताने वेगळ्या करणाऱ्या बाया खरजेने भरलेल्या आहेत. परदेशातून येणाऱ्या या पॅडच्या किंमती आजही अवास्तव आहे. जीएसटी रद्द व्हावा यासाठी उपोषण करावं लागतं हे दुर्देव...

या देशातल्या कोणत्याही ठिकाणी निर्भिडपणे, सन्मानाने, एकटं, कुणाही सोबत जाण्याचा, संवाद साधण्याचा,सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळवण्याचा हक्क हा संविधानाने दिलेला आहे. तरीही तो अनेक वर्ष नाकारण्यात आला. मंदिरात कुणी जावे कुणी जाऊ नये, कसे जावे, कोणते कपडे घालावे, कसे घालू नये हा पूर्ण संपूर्ण वैयक्तिक प्रश्न आहे ते स्वातंत्र्य ज्याचं तिला, त्याला असायलाचं हवं..पॅ़ड घेऊन मित्राच्या घरी जाणाऱ्याही शेकडो स्त्रिया आहेत. तुमच्या बोलण्याचा अर्थ मी सरळ लावला आहे (बिटविन दि लाईन )मध्ये याचा एक वेगळा अर्थही निघतोच.

यापुर्वी वेळोवळी तुम्ही उधळलेली मुक्ताफळं अनुभवल्यानंतर तुम्ही म्हणता ते खरंच आहे.
हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है !

आवरा ! Happytobleedmindwell

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

देवाला तुम्ही भेटायला का जायचं? त्यानेच तुम्हाला भेटायला नको का?
हा वात्रट विनोद सोडून द्या.
--
या शारिरीक वैशिष्ट्यावर बोलायला मी सक्षम नाही. तोही मुद्दा बाद.
------
केरळमध्ये अनेक देवळं आहेत,ती बरीच शहरांत/ गावांत खालीच आहेत. तिथे कोणतेही प्रवेश निर्बंध नाहीत. कारण शुचिर्भूत होऊन वगैरे एकदोन तासात दर्शन करून परत येणं शक्य असते. सबरीमलै डोंगरावर सहा-आठ किमी पायपिटीनंतर वर आहे. दोन दिवसांचा पूर्ण वेळ लागतो. भौगोलिक कारण पाहता कुणाला येऊ नको सांगण्याची गरज नाही.

कन्याकुमारीजवळ १३ किमीवर सुचिंद्रम ( तसं तमिळनाड राज्यात) देवळात परदेशी पर्यटकही जाऊ शकतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या देशांत, केवळ निवडून येऊ शकणारे, या क्रायटेरियावर, राजकीय पक्षांनी, कुठल्याही माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या व्यक्तींना निवडून आणले. त्यामुळे अशा व्यक्ती उच्च पदावर जाऊन बसल्यावर त्यांचे पितळ उघडे पडणारच! त्यांचे नेते त्यांना कमी बोलायला सांगतात, पण ह्या व्यक्ती, त्यांचेसुद्धा ऐकत नाहीत. अर्थातच मग, त्यांच्या बौद्धिक कुवतीप्रमाणे ते तारे तोडत रहतात. काही मोजक्या लोकांनी केलेल्या टीकेचा त्यांच्यावर उलटाच परिणाम होतो. त्यांना त्याची पर्वाही नसते. कारण मासेसपर्यंत, या चर्चा कधी पोचतच नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0