Skip to main content

ही बातमी समजली का? - ८५

गब्बर सिंग Mon, 17/08/2015 - 06:28

औषधांचे ब्रँड निवडण्यावरच बंधने

आता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जेनेरिक नावे लिहिण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याला काही डॉक्टरांचा विरोध आहे. यामुळे औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना मिळणारा 'कट' जाणार आहे. पण त्याचबरोबर समाजात नसलेल्या औषधभानाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेच विक्रेत्याने दिली आहेत याबाबतही अनेकांना इतरांकडून चाचपणी करून घ्यावी लागते तिथे एकाच औषधाची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्या, त्यांचे दर आणि विश्वासार्हता या बाबी पडताळून पाहणाऱ्यांची संख्या अगदीच थोडी असेल.

तथाकथित शोषक डॉक्टर होता. आता तो फार्मासिस्ट असणारे.

---------------------

Greenpeace used the study for fundraising under the slogan, “You’re not half the man your father was.”

Remember the great penis scare of the 1990s?

Due to environmental toxins, sperm counts were in free fall, and the world was doomed.

Scandinavian researchers discovered that a nearly 50% decline in sperm counts had taken place over the last 50 years, probably because of “endocrine disruptors” that are everywhere in our poisonous, chemical-infested modern world, and Greenpeace used the study for fundraising under the slogan, “You’re not half the man your father was.”

हे सगळं खरं आहे का ???? याचं पुढे काय झालं ??

हे प्रश्न मी का विचारतोय ?? उत्तर खाली -

Environmentalist groups are, of course, in the same business as the folks who brought you the “Saw” movies. Their fundraising depends on it, and the media rarely go back to fact-check past predictions, instead blustering ahead with the next dire warning.

आडकित्ता Wed, 19/08/2015 - 20:40

In reply to by गब्बर सिंग

आता केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जेनेरिक नावे लिहिण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याला काही डॉक्टरांचा विरोध आहे. यामुळे औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना मिळणारा 'कट' जाणार आहे. पण त्याचबरोबर समाजात नसलेल्या औषधभानाचा मुद्दाही ऐरणीवर आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेच विक्रेत्याने दिली आहेत याबाबतही अनेकांना इतरांकडून चाचपणी करून घ्यावी लागते तिथे एकाच औषधाची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्या, त्यांचे दर आणि विश्वासार्हता या बाबी पडताळून पाहणाऱ्यांची संख्या अगदीच थोडी असेल.

तथाकथित शोषक डॉक्टर होता. आता तो फार्मासिस्ट असणारे.

जेनेरिक नांवे डिस्पेन्सिंगमधे घोळ होऊ नये म्हणून लिहायची आहेत. त्यापुढे कंसात हव्या त्या ब्रँडचे नांव लिहिल्यास ते औषध केमिस्टने देणे बंधनकारक आहे. उदा. Tab. Paracetamol (Crocin) (ही माझी माहिती आहे, व ऑथेंटिक सोर्सकडून परंतू तोंडी मिळालेली आहे.)

हे जर झाले नाही, तर केमिस्टना हाती धरून हवा तो ब्रँड पुश करणे कंपन्यांना सोपे जाईल. फार्मा कंपन्यांकडून 'गिफ्ट्स' घेणे डॉक्टरांना अलाऊड नाही, ते याचसाठी. पण केमिस्ट लोकांना अशी गिफ्ट्स, कॅश व स्कीम्स घेता येतात, व ते घेतात.

जेनेरिक व ब्रँडेड बद्दल थोडे:

१. जेनेरिक नावाने नामवंत कंपन्याही औषधे बाजारात आणतात. उदा रोश कंपनीचे अ जीवनसत्व पूर्वी अरुव्हिट नामक सुंदर चवीच्या च्युएबल टॅबलेट रूपात उपलब्ध होते. तेच आता जेनेरिक नावाने, तसेच, फक्त ९० पैशत एक गोळी या भावात उपलब्ध आहे. अर्थात, टॅक्ससह १० रुपयांत एक कोर्स होतो.

परंतू, या बदल्यात अनेक केमिस्ट कॉड लिव्हर ऑईलच्या गोळ्या खपवतात, ज्या अधिक महाग आहेतच, शिवाय कमअस्सल आहेत.

२. "बॉम्बे मार्केट" नावाने फेमस असलेल्या फ्लाय बाय नाईट कंपन्यांनी बनवलेली औषधे, ज्यात लेबलवर छापलेल्या प्रमाणात, व अपेक्षित शुद्धतेत मूळ औषध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. कंट्रोलर ऑफ ड्रग्जचा काहीही कंट्रोल यावर नाही. हा एक व्हॅलिड व गंभीर आक्षेप जेनेरिक औषधांवर घेतला जातो.

३. काही औषधे जीवनावश्यक म्हणून घोषित केली जातात. ज्यामुळे ब्रँडेड असले, तरी त्यांची किंमत अत्यंत कमी ठेवावी लागते. अर्थात यात तोटा नसतो, पण फायदा कमी असतो. कंपन्या अशी औषधे बनवतच नाहीत, त्याऐवजी सिमिलर औषधे पुश करतात. उदा, डेक्सामिथाझोन ऐजवी बीटामिथाझोन. अशा औषधांचे अनेक ब्रँड्स बंद पडले आहेत, व नाईलाजाने १० रुपयांऐवजी १०० रुपयांचे औषध वापरावे लागते.

४. ब्रँडेड औषधे महाग असण्याची किंवा काही कंपन्यांची ब्रँडेड औषधे महाग व काही स्वस्त असण्याची कारणे : पहिले, व कॉमन कारण सरळ सरळ नफेखोरी हे असले, तरी समजा एक अल्बेंडाझोलची गोळी १० पैशांना मिळते. तिला प्रचंड घाण वास व कडू चव असते. चव गोड करायची तर गोळी एक रुपयाला मिळते. वास घालवायचा तर तिचीच किंमत ३ रुपये होते. साधे कारण टेक्नॉलॉजी बदलते.
निमेसुलाईडची गोळी पोटात घ्यायची ती स्वस्त मिळेल. पण तिचा इफेक्ट उशीरा येईल व अ‍ॅसिडिटी होईल. तीच तोंडात वितळून इंजेक्शनच्या वेगाने काम करणारी हवी असेल तर महाग होते. सस्टेन्ड रिलिज उर्फ २४ तास हळूहळू काम करत राहणारी हवी असेल तर किंमत बदलेल.

ब्रँडेड औषध लिहिताना या बाबींचा विचार केला जात असतो. पेशंटला कोणते औषध जास्त सहन होईल त्यानुसार ते लिहिले जाते.

अर्थात पहिले "नफेखोरी" क्रायटेरियाही वापरलेला जात असू शकतोच, पण अशा बाबी नेहेमीच व प्रत्येक व्यवसायात दिसतील.

***

रच्याकने :

आयुर्वेद व होमिओपथीवाल्यांना हापिशली अ‍ॅलोपथिक औषधे लिहिण्याची परवानगी देण्यापाठी कंपन्यांचे मार्केट वाढवणे हा एक मोठा उद्देश आहे. यामुळे फार्मा लॉबीकडून यासाठी भरपूर 'हातभार' लावला गेला असे ऐकून आहे.

गब्बर सिंग Thu, 20/08/2015 - 01:39

In reply to by आडकित्ता

संपूर्ण प्रतिसाद संग्रही ठेवावा असा. आडकित्ता, माझ्यातर्फे पार्टी तुम्हास.

तुमचा हा प्रतिसाद मित्राला पाठवलेला आहे. incisive विश्लेषणाचा उत्तम नमुना असं सांगून. तुमचे नाव देऊन पाठवलाय.

----

३. काही औषधे जीवनावश्यक म्हणून घोषित केली जातात. ज्यामुळे ब्रँडेड असले, तरी त्यांची किंमत अत्यंत कमी ठेवावी लागते. अर्थात यात तोटा नसतो, पण फायदा कमी असतो. कंपन्या अशी औषधे बनवतच नाहीत, त्याऐवजी सिमिलर औषधे पुश करतात. उदा, डेक्सामिथाझोन ऐजवी बीटामिथाझोन. अशा औषधांचे अनेक ब्रँड्स बंद पडले आहेत, व नाईलाजाने १० रुपयांऐवजी १०० रुपयांचे औषध वापरावे लागते.

Unintended consequences चे यापेक्षा चांगले उदाहरण कुठले असेल ??

through the workings of an entire system, effects may be very different from, and even opposed to, intentions ____ Kenneth Arrow

-----

२. "बॉम्बे मार्केट" नावाने फेमस असलेल्या फ्लाय बाय नाईट कंपन्यांनी बनवलेली औषधे, ज्यात लेबलवर छापलेल्या प्रमाणात, व अपेक्षित शुद्धतेत मूळ औषध असण्याची शक्यता पडताळून पाहण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. कंट्रोलर ऑफ ड्रग्जचा काहीही कंट्रोल यावर नाही. हा एक व्हॅलिड व गंभीर आक्षेप जेनेरिक औषधांवर घेतला जातो.

शॉल्लेट. याला म्हणतात "न्याय".

फार्मा कंपन्या ह्या नफेखोर असतात व त्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून पॉलीसी बनवणारा राजकीय नेता हा "जनकल्याणाधिष्ठित" जे निर्णय घेतो ते खरोखर तसे असतात - या गृहितकातची सुमधुर फले आहेत ही.

चिंतातुर जंतू Mon, 17/08/2015 - 14:36

फेसबुकवर पाहिलेला एक फोटो (फोटोशॉप वगैरे असला तर माहीत नाही.)

तेरा ध्यान किधर है ? ये तेरा हीरो इधर है.

Posted by Iqbal Abhimanyu on Sunday, August 16, 2015

कॅप्शन : तेरा ध्यान किधर है ? ये तेरा हीरो इधर है.
स्रोत

(कृ.ह.घ्या.)

अनुप ढेरे Mon, 17/08/2015 - 14:58

In reply to by चिंतातुर जंतू

हा हा, मी वेगळ्या क्याप्शनने पाहिला होता.
'अबे बीसी, दुल्हा इधर है, बरातियोंके फोटो क्यों खीच रहा है बे'

(रच्याकने, जंतू ह.घ्या. वगैरे सूचना टाकायला कधीपासून लागले? हेच काय ते अच्छे दिन?)

बॅटमॅन Mon, 17/08/2015 - 15:03

In reply to by अनुप ढेरे

(रच्याकने, जंतू ह.घ्या. वगैरे सूचना टाकायला कधीपासून लागले? हेच काय ते अच्छे दिन?)

असे लिहायला लागते म्हणजे काळ मोठा कठीण आहे, असे न वाटण्याइतपत सुरक्षितता येईल तो सुदिन, इ.इ. असे सूचित करावयाचे असेल हो.

बॅटमॅन Mon, 17/08/2015 - 16:00

आग्रा, दि. १८ ऑगस्ट १६६६.

परकालदास टु कल्याणदास. (मिर्झाराजे जयसिंगाच्या पदरीचे कारकून)

"......अठे ठीक छे अपरंच सेवोजी अठास्यो भागो...."

(जदुनाथ सरकार, Shivaji's visit to Aurangzeb at Agra).

गब्बर सिंग Tue, 18/08/2015 - 03:14

In reply to by चिंतातुर जंतू

भाजपा वाले लगेच - हे आपल्या संस्कृति च्या (सांस्कृतिक मूल्ये वगैरे) दृष्टिकोनातून बघितलं पायजे असा "युक्तिवाद" करतील. उदा. इथे पहा.. (विवाहबाह्य संबंध व सेन्सॉरशिप हे भिन्न विषय आहेत पण कल्चरल नॅशनलिस्ट्स/प्युरिस्ट्स लोकांना स्त्रीपुरुष संबंध फक्त सांस्कृतिक दृष्टिकोनातूनच पाहिले जावेत असे वाटत असते. आजच्या पिढीत नवीन कल्चर बनवण्याची क्षमता सोडाच पण कल्चर बदलण्याची सुद्धा क्षमता नसते व त्याला लागणारी "विचारीक बैठक" (whatever that sh** is) तर त्याहून नसते - असा दृढ विश्वास असावा कल्चरल प्युरिस्ट्स मंडळींचा. )

.शुचि. Tue, 18/08/2015 - 10:59

In reply to by गब्बर सिंग

कल्चरल प्युरीस्टांना मुलं कशी काय होतात हे मला कधीही न उलगडलेलं कोडं आहे.

बागेतल्या कोपऱ्यामध्ये कोणी घट्ट बिलगून बसतच ना ..
आणि गालाला गाल लाऊन गुलगुल करीत असतंच ना ...
असं काही दिसलं की ह्यांचं डोकं सणकलच ...
आणि ह्यांच्या अध्यात्म्याच गळू अवघड जागी ठणकलच ..
नैतिक सामर्थ्याच ह्यांच्या .. वेगवान घोडं असतं ...

=)) =))

गब्बर सिंग Tue, 18/08/2015 - 03:17

किरण नगरकर आता अँटी सेन्सॉरशीप फंड स्थापित करणारेत.

किरण नगरकरांची लेटेष्ट मुलाखत.

You also want to start an anti-censorship fund, I believe?

Yes, when I was in Bangalore recently, I talked about it and people in the auditorium came up to give me money for it. I forgot to do it at the Delhi launch of Rest in Peace. I wish I’d remembered. Not just ordinary people and readers of books, but publishers too, need to chip in so that we can hire big lawyers and fight these censorship cases in court.

------------

प्रश्न - Housing is a central issue in the plot. It’s not just about escaping the chawls anymore, it’s about privacy. And now the police even raid hotels…

उत्तर - Absolutely. There’s a garden outside the house I live in, the Bombay version of a garden, you know. There are couples waiting there for sunset, for 7 o’clock, so they can start smooching. And my heart goes out to them! I’ve written about such an episode in Saat Sakkam Trechalis (Seven Sixes are Forty-Three) and it comes up again and again in my work. So many of those young people’s lives could get difficult now. They’re going to be in dire trouble at home because of the “shame” they’ve brought upon their families. I really hope the parents file incredible suits for crores of rupees against the police for defaming their children.

ऋषिकेश Tue, 18/08/2015 - 10:05

लोकसत्तातील या लेखात पी.चिदंबरम यांनी केंद्र सरकारने गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी दिलेली आश्वासने आणि त्यांची सद्य स्थिती यांचा मोठा वेधक आढावा घेतला आहे.

ऋषिकेश Tue, 18/08/2015 - 14:09

In reply to by नितिन थत्ते

मग? पॉइंट काये?

चिदंबरम ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारचे काम छान छान असते / लोकांना आवडले असते तर विरोधात बसून असे लिहायची वेळ येती ना. पण त्यांच्या कामाची पावती लोकांनी त्यांना दिलीये. आता त्यांनी सद्य सरकारच्या तृटी दाखवल्यावर त्यांनी केलेल्या चुका होत्या/नव्हत्या/कोणत्या यांचा काय संबंध?
का आपले उगाच?

अनु राव Tue, 18/08/2015 - 14:23

In reply to by ऋषिकेश

कदाचित थत्तेकाकांचा पॉईंट हा असावा की, ज्याने आधीच फार काही केले नाहीये संधी असताना त्याने दुसर्‍यांवर टिका का करावी?

जो लोग शीशो़ंके घरोंमे रहते है .... असे काहीतरी.

चिदंबरम नी अशी काहीतरी टिका करणे हे भाजपच्या पथ्यावरच आहे. त्यांना लगेच तू काय केलेस असे विचारता येते

ऋषिकेश Tue, 18/08/2015 - 14:27

In reply to by अनु राव

पण त्यांनी जे काही केले किंवा केले नाही त्याचा हिशोब जनतेने निवडणुकीच्या दरम्यान चुकता केला आहे.
तेव्हा सद्य सरकारचे मुल्यमापन करताना त्याचा संबंध येतोच कुठे?

==

दुसरे असे की हा लेख एका वर्षातील कामगिरीचा आढावा नसून मोदींनीच दिलेल्या आश्वासनांची सद्यस्थिती वर्णन करणारा आहे.
"मी काम करवून घेईन" या त्यांच्या प्रचारावर लोकांनी मते दिली असताना विरोधकांनी असे मुद्देसुदपणे "बघा याला काही करवून घेणे जमत नाहीये" असा दावा करणे मला योग्य वाटते.
चिदंबरम यांचा हा दावा चुकीचा असेल तर तो कसा चुकीचा आहे असा प्रतिवाद अपेक्षित आहे.

नितिन थत्ते Tue, 18/08/2015 - 15:07

In reply to by ऋषिकेश

>>विरोधकांनी असे मुद्देसुदपणे "बघा याला काही करवून घेणे जमत नाहीये" असा दावा करणे मला योग्य वाटते.

हे बरोबर आहे. पण ते लगेच एक वर्षात म्हटले तर उपयोगाचे नाही.

[२६ नोव्हेंबरनंतर चिदंबरम यांना अर्थ मंत्रालयातून गृहमंत्रालयात जावे लागले. त्याच वेळी अर्थव्यवस्था ढासळू लागली. चिदंबरम यांची पुनर्स्थापना अर्थ खात्यात झाल्यावर त्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा बरीचशी रुळावर आणली असा दावा त्यांना करता येईल].

अनुप ढेरे Tue, 18/08/2015 - 14:46

In reply to by ऋषिकेश

१. जनधन, किंवा शाळांमध्ये स्वच्छतागृह ही आश्वासनं फोल आहेत किंवा या योजना फेल आहेत हे काहीच म्हटलेलं नाही. उलट त्या लेखातल्या आकड्यांने या योजना उत्तम चालू आहेत अस वाटतं. मोघम कहितरी म्हटलय चिदूने.

२. नक्की कुठल्या योजनांना नक्की किती बजेट कपात झाली आहे हे दिलं नाहीये. नुसतच "महिला, बालक, दलित आणि मागासवर्गीय यांच्या कल्याणासाठीच्या महत्त्वपूर्ण योजनांसाठीच्या तरतुदीत मोठी कपात वर्षभरात झाली". (रस्त्यांना जास्तं अ‍ॅलोकेशन हे यांच्या कल्याणाचं कसं नाही हे मला समजत नाही पण ते जाउदे)

३. मुंबैतील मॉरल पोलिसिंग, गोमांस मुद्दा हे राज्यसरकारने काढले आहे हे चिदंबरम यांना माहिती नसावं?

४. नीती आयोग तर चांग्लाय की. नियोजन आयोगात राज्यांना प्रतिनिधीत्व नव्हतं (बहुधा). इथे डायरेक सगळे मुख्यमंत्री आहेत की सदस्य. (कॉग्रेसी मुख्यमंत्री नियोजन आयोगाच्या बैठकींना न जाता इफ्तार पार्ट्यांना जातात हा बहुधा मोदींचा दोष नसावा.)

५. निर्यातेचा मुद्दा बरोबर असावा. पण त्याच बरोबर हेही दिसतं.

त्यामुळे या लेखाला 'आश्वासनांची पिसे' असलं काही म्हणणं गम्मतशीर वाटतं.

बॅटमॅन Tue, 18/08/2015 - 14:49

In reply to by अनुप ढेरे

मुंबैतील मॉरल पोलिसिंग, गोमांस मुद्दा हे राज्यसरकारने काढले आहे हे चिदंबरम यांना माहिती नसावं?

ते दोन्हीकडे एकाच पक्षाचं सरकार असल्याने खापर फोडणे सोपे अन सोयीस्कर जात असावे बहुधा.

बाकी "मोदीवर टीका करणे" ही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची नेसेसरी व सफिशियंट कंडिशन मानणार्‍यांना एकूणच तारतम्याचे काय म्हणा. लेखाचे शीर्षक 'तारतम्याची पिसे' असेही शोभून दिसावे.

ऋषिकेश Tue, 18/08/2015 - 15:00

In reply to by अनुप ढेरे

'पिसे' म्हणसे काढलेली पिसे नव्हेत, आश्वासने ही पिसे लाऊन उडून गेली असे काहिसे डोक्यात होते. पंख लिहायला हवे होते - पटकन नै सुचलं :) ते असो.
---
प्रतिवाद आवडला

१. शक्य आहे. मलाही लेख वाचताना असंच वाटलेलं
२. योजना कोणत्या रद्द झाल्या हे दिलेलं नाही हे खरेच पण आकडे बरेच मोठे आहेत. ते खरंच असतील तर याचा अर्थ सरकारला यांचे कल्याण करायचे नाही असा होत नाही तर त्याला कमी प्राधान्य आहे असा होतो. जीएसटी विधेयकापेक्षा सरकारने या महत्त्वाच्या मुद्द्यांना मागे टाकणं योग्य/अयोग्य हा पर्स्पेक्टिव्ह झाला पण बोलकं आहे हे मान्य व्हावे!

रस्त्यांना जास्तं अ‍ॅलोकेशन हे यांच्या कल्याणाचं कसं नाही हे मला समजत नाही पण ते जाउदे

हे रस्ते वगैरे स्पेसिफिकली शाळेत जाणार्‍या मुलांसाठी किंवा महिलांना सुरक्षित चालता यावं म्हणून बांधले जाताहेत का? बहुदा नाही. मग हे महिला/बाल किंवा पुरूष कल्याण असे विभागता येणार नाहीत. ते जनकल्याण झाले. त्याबद्दल घोषणा ऐकल्या आहेत पण गेल्या वर्षीच्या भाषणात ते नसल्याने त्याच्या सद्यस्थितीचा परामर्श चिद्दुंनी घेतला नसावा.

३. मुंबैतील मॉरल पोलिसिंग, गोमांस मुद्दा हे राज्यसरकारने काढले आहे हे चिदंबरम यांना माहिती नसावं?

पोलिसांच मॉरल पुलिसिंग देशभरात चालु आहे (आधीही होतं). गोमांसाबद्दल केंद्रीय स्तरावरही चर्चा सुरू होती अशा बातम्या होत्या. याव्यतिरिक्त चिद्दुंची यादी मोठी आहे.

४. नीती आयोग तर चांग्लाय की. नियोजन आयोगात राज्यांना प्रतिनिधीत्व नव्हतं (बहुधा). इथे डायरेक सगळे मुख्यमंत्री आहेत की सदस्य. (कॉग्रेसी मुख्यमंत्री नियोजन आयोगाच्या बैठकींना न जाता इफ्तार पार्ट्यांना जातात हा बहुधा मोदींचा दोष नसावा.)

प्रश्न निती आयोग कसाय हा नसून त्याचे कामकाज कधी चालणार, नक्की कार्यकक्षा काय? त्यांचे अधिकार काय आहेत वगैरे आहे. त्याबद्दल मोठा असमंजस आहे.

५. ही दोन्ही एकाच हत्तीची दोन टोकं आहेत असं माझं मत. गब्बर सारखे आळशी ( ;) ) त्यातून खरे चित्र चितारू शकतात पण .. असो ;)

गब्बर सिंग Tue, 18/08/2015 - 20:10

In reply to by ऋषिकेश

पूर्तता : नियोजन आयोग रद्दबातल करण्यात आला. मग प्रदीर्घ कालावधीनंतर नीती आयोग स्थापन करण्यात आला. मात्र, नियोजन आयोगाला असलेले अधिकार या आयोगाला देण्यात आलेले नाहीत. राज्यांमधील सरकारे आणि केंद्र सरकारची खाती यांच्यासाठी निधीची तरतूद करण्याचे अधिकार आधीच्या आयोगाला होते; नव्या आयोगापासून ते हिरावून घेण्यात आले आहेत.
सध्याची पंचवार्षिक योजना २०१७ मध्ये संपुष्टात येईल. त्यानंतरच्या पाच वर्षांसाठी योजनेची आखणी करण्यात येईल की नाही याबद्दल कोणतीही स्पष्टता नाही. समजा अशी योजना अस्तित्वात आली तर तिची आखणी कोण करणार आणि तिच्यासाठीच्या निधीची तरतूद कोण करणार, याचाही अंदाज कोणाला नाही.

यातले प्रत्येक वाक्य खरे आहे असे मानू.

मला नेमके हेच हवे आहे.

१) राज्यांमधील सरकारे आणि केंद्र सरकारची खाती यांच्यासाठी निधीची तरतूद करण्याचे अधिकार - हेच सेंट्रल प्लॅनिंग आहे. नीती आयोग सुद्धा बरखास्त केला जावा. अशा प्रकारचा आयोग अस्तित्वातच न आणण्याबद्दल कायदेशीर तरतूद केली जावी.
२) पंचवार्षिक योजना ही संकल्पना बेकायदेशीर आहे असे घोषित करावे.
३) योजना भवन ची इमारत एखाद्या डान्स बार ला आंदण म्हणून दिली जावी. Let people come to know that this Govt is deeply hostile to the very concept of Central Planning.
४) नियोजन आयोग हा राज्यपातळीवर सुद्धा अस्तित्वात आणण्यावर बंदी घालावी.
५) भारताची व्याख्या - Sovereign Socialist Secular Democratic Republic - अशी आहे. त्यातून सोशॅलिस्ट हा शब्द वगळला जावा. घटनादुरु...

बिटकॉइनजी बाळा Tue, 18/08/2015 - 17:05

आनंद गांधींनी जवळपास ३४ तासांचे फूटेज ओपन सोर्स केले आहे.(बातमी जुनी असावी तरीही!)
हा त्याचा दुवा. असं फिल्म्स मध्ये पहिल्यांदाच होत असावं.

चिंतातुर जंतू Tue, 18/08/2015 - 19:19

Another caged bird: how the government cracked down on All India Radio
याकूब मेमनच्या फाशीच्या कव्हरेजबद्दल सरकारनं तीन टीव्ही चॅनल्सना 'कारणे दाखवा' नोटीस पाठवली. एडिटर्स गिल्डनं सरकारच्या ह्या निर्णयावर टीका केली. रेडिओवर ह्याची बातमी आली. तर आता सरकारनं रेडिओला कारणे दाखवा म्हटलंय. जाम मजा आहे.

उदय. Wed, 19/08/2015 - 00:34

In reply to by अनुप ढेरे

The students of Film and Television Institute of India, or FTII, who have been protesting against the appointment of Gajendra Chauhan as the Chairman of the institute, have been on strike for the last 68 days.

या सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू देऊ नये.

On August 5, the Director had circulated a notice for students of the 2008 batch, asking them to vacate the hostel.

२००८ सालाचे विद्यार्थी अजून हॉस्टेलमध्ये राहातात. मज्जाच आहे सगळी.

चिंतातुर जंतू Wed, 19/08/2015 - 13:43

In reply to by उदय.

>> या सर्व विद्यार्थ्यांना परिक्षेला बसू देऊ नये.

>> २००८ सालाचे विद्यार्थी अजून हॉस्टेलमध्ये राहातात. मज्जाच आहे सगळी.

मुळात संस्थेकडे पुरेशी सामग्री नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रकल्प वेळेवर पूर्ण करता येत नाहीत हे संस्थेत सगळ्यांना माहीत आहे. हा बॅकलॉग क्लिअर करण्यासाठी अधूनमधून एखादं वर्ष 'झीरो यर' घोषित होतं. त्या वर्षी नवे विद्यार्थी घेतले जात नाहीत आणि फक्त बॅकलॉग क्लिअर करायला प्राधान्य दिलं जातं. ह्यापूर्वी २००९च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांचे प्रकल्प पुरे करण्यात आले होते, त्यामुळे २००८चे विद्यार्थी मागे राहिले. हा प्रशासकीय निर्णय असल्यामुळे त्याची जबाबदारी प्रशासनावर येते. आता सरकारतर्फे विद्यार्थ्यांचं दमन करण्यासाठी हा २००८च्या विद्यार्थ्यांचा मुद्दा अशा प्रकारे समोर आणला जातोय, की चूक विद्यार्थ्यांचीच आहे असं सकृतदर्शनी वाटावं. मात्र, खरं काय आहे, ते संस्थेतले शिक्षक जाणून आहेत. विद्यार्थ्यांना साहाय्य करणारे कंत्राटी कामगार घरी बसवले आहेत, त्यामुळे अपूर्ण प्रकल्प पुढे नेता येणार नाहीत. आता सरकार शिक्षकांवर आणि संचालकांवर दबाव आणून ह्या अपूर्ण प्रकल्पांचं मूल्यमापन करायला त्यांना भाग पाडतं आहे, पण ते अतिशय निरर्थक आहे. ज्या फिल्मवर पोस्ट-प्रॉडक्शन झालेलंच नाही, त्याच्या संकलनाचं किंवा ध्वनिमुद्रणाचं मूल्यमापन 'आहे त्या स्थितीत' कसं करता येईल? अपात्र माणसांची नियुक्ती मागे घ्यायला हटवादी सरकार तयार नाही; शिवाय, अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्यांची नालस्ती सुरू आहे. चालला आहे तो सगळा प्रकार खूपच उद्वेगजनक आहे.

चिंतातुर जंतू Wed, 19/08/2015 - 14:14

In reply to by आदूबाळ

>> हे २००८ पासून संस्थेत शिकणारे विद्यार्थी पोटापाण्याची काय सोय करून असतात?

सगळ्यांबाबत सरसकट विधान करता येणार नाही, पण निदान काही जण हळू हळू शॉर्ट फिल्म वगैरे छोटी कामं घेऊ लागतात. (छोटी कामंच घेता येतात, कारण पदवी अद्याप मिळालेली नसते.) त्यांना काही राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर पारितोषिकं वगैरे मिळाली, तर अर्थात अधिक कामं मिळतात.

बिटकॉइनजी बाळा Thu, 20/08/2015 - 01:30

In reply to by चिंतातुर जंतू

>> विद्यार्थ्यांना साहाय्य करणारे कंत्राटी कामगार घरी बसवले आहेत, त्यामुळे अपूर्ण प्रकल्प पुढे नेता येणार नाहीत.

कामगरांवर इतके अवलंबन असते हे पटत नाही. विद्यार्थी क्राउडफंडिंग सारखे अनेक मार्ग वापरतात का? एकेका ट्रेडच्या ११-१२ जणांचे प्रोजेक्ट्स पूर्ण होत नाहीत हे चिंताजनक आहे. त्यातही तुम्ही म्हणता तशी ही मुले क्रीम ऑफ़ प्रकारची असतात.
सचिन कुंडलकर सारखे दिग्दर्शक या संस्थांचे ड्रॉप आउट आहेत.

चिंतातुर जंतू Thu, 20/08/2015 - 14:09

In reply to by बिटकॉइनजी बाळा

>> कामगरांवर इतके अवलंबन असते हे पटत नाही. विद्यार्थी क्राउडफंडिंग सारखे अनेक मार्ग वापरतात का? एकेका ट्रेडच्या ११-१२ जणांचे प्रोजेक्ट्स पूर्ण होत नाहीत हे चिंताजनक आहे. त्यातही तुम्ही म्हणता तशी ही मुले क्रीम ऑफ़ प्रकारची असतात.

संस्थेची बस चालवत चित्रीकरणाच्या स्थळी नेणं, बोजड यंत्रणा बसवर चढवणं / उतरवणं, चित्रीकरणाच्या स्थळी ती गरजेनुसार हलवणं किंवा इतर (ऑफिस बॉय करतील तशा प्रकारची) कामं हे कामगार करतात. एका डिप्लोमा फिल्मच्या वेगवेगळ्या अंगांवर काम करणारे बरेच विद्यार्थी असतात. त्यामुळे एक फिल्म अडकली की खूप जणांचा डिप्लोमा अडकतो.

>>सचिन कुंडलकर सारखे दिग्दर्शक या संस्थांचे ड्रॉप आउट आहेत.

बहुधा डिप्लोमा फिल्म वेळात पूर्ण होईना म्हणून कंटाळून अखेर त्यानं संस्था सोडली आणि आपलं काम सुरू केलं. त्याला आधीपासून सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर वगैरेंबरोबर काम करण्याचा अनुभव होता, ओळखी होत्या. प्रत्येक विद्यार्थ्याला हे शक्य होईल असं नाही.

अनुप ढेरे Wed, 19/08/2015 - 10:35

In reply to by अनुप ढेरे

यातल्या काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे काल रात्री. हा पोलिसांचा मूर्खपणा आहे.

http://www.hindustantimes.com/india-news/kejriwal-to-ftii-students-run-…

गब्बर सिंग Thu, 20/08/2015 - 06:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख आवडला हो. मस्त लिहिलाय. शेवटचे ३ प्यारे अत्युत्कृष्ठ.

-

The Dalit community to which he belongs has no stake in the new economy. Sugar cooperatives benefited only farmers with large land holdings, predominantly Marathas. Dalits had very little land, if any. In the earlier rural economy they had been marginalised socially for their caste. Sugar cooperatives, which promised so much to so many, marginalised them economically as well.

हॅ हॅ हॅ

अतिशहाणा Tue, 18/08/2015 - 22:19

अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांच्या वर्क-लाईफ प्रॅक्टिसबद्दल बरीच चर्चा सुरु आहे. जेफ बेझोनेही वादात उडी घेऊन काही अन्याय होत असल्यास थेट त्यालाच कळवा असं सांगितलंय.

संदर्भः हा लेख http://www.nytimes.com/2015/08/16/technology/inside-amazon-wrestling-bi…

लेख वाचनीय आहे. अवश्य वाचा. पण अॅमेझॉनला सिंगलआऊट केल्यासारखा वाटला. अॅपलसारख्या महाकाय कंपनीपासून टिंडरसारख्या स्टार्टपपर्यंत बहुतेक कंपन्यांचे वर्क कल्चर वेगळे नाही. (मायक्रोसॉफ्टबद्दल मात्र चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत)

लेखातील काही रोचक वाक्ये.

“The joke in the office was that when it came to work/life balance, work came first, life came second, and trying to find the balance came last.”

"Amazon is where overachievers go to feel bad about themselves.”

“Nearly every person I worked with, I saw cry at their desk.”

“I would see people practically combust.”

“I was so addicted to wanting to be successful there. For those of us who went to work there, it was like a drug that we could get self-worth from.”

When you have so much turnover, the risk is that people are seen as fungible. You know that tomorrow you’re going to look around and some people are going to have left the company or been managed out.”

गब्बर सिंग Tue, 18/08/2015 - 22:47

In reply to by अतिशहाणा

वाचतोय. अ‍ॅपल/अ‍ॅमेझॉन मधली नोकरी पसंद नसेल तर दुसरीकडे नोकरी शोधायला संधी असतेच ना ? विशेषतः अ‍ॅमेझॉन/अ‍ॅपल चा अनुभव असल्यानंतर तर नक्की असते. निमरोड हुफियन चा क्वोट हेच सांगतो.

न्युयॉर्क टाईम्स चे धोरण - म्हंजे जे लोक (रीड: कंपन्या, उद्योजक) यशस्वी आहेत त्यांची शक्य तितकी अतिकठोर स्क्रुटीनी करून "बिचार्‍या" कर्मचार्‍यांचे शोषण होत आहे असे जगाला भासवून आपण कसे त्यांच्या बाजूचे आहोत असे दाखवायचा यत्न करणारे वृत्तपत्र. थोडक्यात काला पत्थर मधली अनिता बनायचा यत्न करणारे. बार्गेनिंग पॉवर ही अस्तित्वातच नसायला हवी व असलीच तर ती सरकारने "cut down to size" करावी अशा स्वरूपाचा युक्तीवाद करणारे.

अतिशहाणा Tue, 18/08/2015 - 23:16

In reply to by गब्बर सिंग

संधी असते. शिवाय अॅमेझॉन कर्मचाऱ्यांनी इतर (कमी लाभ देणारे?) पर्याय असतानाही स्वतःहून केलेली निवड आहे. (अॅमेझॉनच्या गोदामांमध्ये एसी देण्याऐवजी उन्हाळ्यात बेशुद्ध पडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केवळ अॅम्ब्युलन्स देणे मात्र खटकले)

.शुचि. Wed, 19/08/2015 - 00:48

In reply to by गब्बर सिंग

विशेषतः अ‍ॅमेझॉन/अ‍ॅपल चा अनुभव असल्यानंतर तर नक्की असते. निमरोड हुफियन चा क्वोट हेच सांगतो.

येस्स्स Why can't people use Amazon. थोडी वर्षे कळ काढून टाटा करुन फेसबुक्/गुगल वगैरे कंपनीत जायचे.
.
कसे काय तुम्ही नकारात्मक स्थितीतही संधी शोधता गब्बर :) I envy that spin.

गब्बर सिंग Wed, 19/08/2015 - 00:59

In reply to by .शुचि.

कसे काय तुम्ही नकारात्मक स्थितीतही संधी शोधता

धन्यवाद.

तुमच्या स्तुतीमुळे मी हुरळून गेलेलो आहेच (खरोख्खर, मनापासून सांगतो). तेव्हा त्याचे निमित्त करून जरा थोडास्सा आगाऊपणा करतोच. ही डायग्रॅम बघाच. स्त्रीवाद्यांना गैरसोयीची वाटणारी व्हेन डायग्रॅम आहे. मी तुमचे लक्ष निळ्या वर्तुळाकडे खेचू इच्छितो. त्याबद्दल जो मजकूर लिहिलेला आहे त्यात खरी insight दडलेली आहे. नकारात्मक स्थितीतही संधी शोधण्याच्या माझ्या वृत्तीमागे माझे प्रेरणास्थान हेच आहे.

.शुचि. Wed, 19/08/2015 - 01:50

In reply to by गब्बर सिंग

गब्बर यांना अभिप्रेत विरोधाभास कळला मला-

जर स्त्रिया खरच २३% कमी पेड आहेत + खरच कंपन्या नफाखोर आहेत => सर्व नफाखोर कंपन्या फक्त स्त्री कर्मचारी ठेवतील.

पण तसे दिसत नाही => एक तर स्त्रिया २३% अंडरपेड नाहीत किंवा कंपन्या फक्त नफाखोर नाहीत

काहीतरी एक बोला. दोन्हीकडून ढोल बडवू नका.

आडकित्ता Thu, 20/08/2015 - 21:38

In reply to by .शुचि.

त्यांनी काऊन हा शब्द "काम्हून" अर्थात प्रतिसाद काय म्हणून काढून टाकलात अशा अर्थाने लिहिलेला आहे. कावणे या क्रियापदाचे रूप म्हणून नव्हे असे दिसते.

अस्वल Tue, 18/08/2015 - 22:53

In reply to by अतिशहाणा

मूळ लेख खूपच एकतर्फी वाटला.
अ‍ॅमेझॉन लोकांना राबवून घेते, त्यांच्यात work life balance हा प्रकार फारसा नाही किंवा त्यांची targets फारच आक्रमकरित्या आखलेली असतात इ. गोष्टी लोकांकडून ऐकल्या होत्या.
पण लेखात वर्णन केलेली open hostility, दोन टीममधला उघड् संघर्ष, एकमेकांना लागेल असल्या भाषेत बोलणं - हे सार्वत्रीकरण केल्यासारखं आहे.
वैयक्तिक बाबींमुळे कामातील रेटिंग कमी मिळणं इथवर ठीक आहे, पण बाकी सगळं शितावरून भाताची परीक्षा केल्यासारखं वाटलं.
.
बाकी अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन इ. राबवून घेणार्‍या कंपन्या म्हणून प्रसिद्ध आहेतच. मायक्रोसॉफ्ट, फेसबुक , गूगल इ. आपल्या लोकांची काळजी घेतात आणि work life balance वगैरे वर लक्षही देतात.

अतिशहाणा Tue, 18/08/2015 - 23:02

In reply to by अस्वल

मलाही लेख खूपच एकतर्फी वाटला. विशेषतः कॅन्सर पेशंट, जन्मतः दगावलेले बाळ, आजारी वडिलांची काळजी वगैरे उदाहरणे घेऊन लेख खूपच मेलोड्रामाटिक केलाय. लेखावरील प्रतिक्रियाही चांगल्या आहेत. अनेकांना अशी गळेकापू स्पर्धा, बदललेली कार्यसंस्कृतीही हे वास्तव स्वीकारायला जड जातंय.

मात्र २ दिवसांत शिपिंग / २५ मिनिटांत सेम-डे शिपिंग / १०० डॉलर प्रतिवर्षाच्या दरात स्वतःची वेबसाईट वगैरे 'सामान्य ग्राहकाला' अ‍ाकर्षित करणाऱ्या गोष्टीमागची ही एक सत्यकथा आहे. (वॉलमार्ट-अॅपल-फॉक्सकॉन यांच्या चीनमधील ब्लू कॉलर कर्मचाऱ्यांची अवस्थातर याहूनही बिकट आहे.)

जेफ बेझोची प्रतिक्रिया इथे http://www.nytimes.com/2015/08/18/technology/amazon-bezos-workplace-man…

एका अॅमेझॉन कर्मचाऱ्याचे प्रत्युत्तर वाचले.
https://www.linkedin.com/pulse/amazonians-response-inside-amazon-wrestl…

एक्स अॅमेझॉन कर्मचाऱ्याची प्रतिक्रियाही मनोरंजक
https://www.linkedin.com/pulse/ex-amazonians-reply-all-those-amazonian-…

.शुचि. Tue, 18/08/2015 - 23:05

In reply to by अतिशहाणा

बाप रे! प्रचंड पिळवणूक चालते असे या लेखावरुन वाटते. न्यु यॉर्क टाइम्स ला झोंबेल असं काहीतरी अ‍ॅमॅझॉनने केलेले दिसते. एकदम पेटूनच हा लेख टाकलाय.
एकांगीच वाटला मलाही.

गब्बर सिंग Tue, 18/08/2015 - 23:22

In reply to by .शुचि.

न्यु यॉर्क टाइम्स ला झोंबेल असं काहीतरी अ‍ॅमॅझॉनने केलेले दिसते.

तुमच्या प्रश्नाचे नेमके उत्तर इथे आहे

.शुचि. Tue, 18/08/2015 - 23:26

In reply to by गब्बर सिंग

ओहो! शक्य आहे.

The Internet has radically disrupted traditional newspapers. The world is completely changed, and advertisers have tons of options on how to reach people in local areas.”

बेझोस ने काहीतरी करुन कागदी वर्तमानपत्रांना पुनरज्जीवन द्यावं. सध्या किंमती फार वाढल्यात वृत्तपत्रांच्या.

अतिशहाणा Tue, 18/08/2015 - 23:26

In reply to by .शुचि.

न्यूयॉर्क टाईम्समधल्या कुणीतरी प्रभावशाली व्यक्तीच्या शेपटावर अॅमेझॉनने पाय दिलेला दिसतोय. (एखादी वस्तू उशीरा डिलीवर झाली की काय?)

गब्बर सिंग Tue, 18/08/2015 - 23:48

In reply to by अतिशहाणा

न्युयॉर्क टाईम्स चे अ‍ॅमेझॉन शी असलेले युद्ध बरेच दिवस चालू आहे.

हे आश्चर्यजनक नाही व नसावे. स्पर्धक आहेत. एकमेकांना ठोकायचा प्रयत्न करणारच.

अतिशहाणा Wed, 19/08/2015 - 01:31

In reply to by उदय.

मस्त कमेंट्स आहेत. न्यूयॉर्क टाईम्सचे हितसंबंध दुखावल्यामुळे असा लेख आलाय की काय अशी शंका आली. माझे कॉलेजमधले दोन सीनियर आणि एक एक्स कलीग गेल्या सात-आठ वर्षांपासून तिथे काम करताहेत. त्यांच्याशी सहज बोललो तर त्यांना लेखात दाखवलंय इतकं विचित्र वातावरण जाणवलं नाही. अॅमेझॉनचे एकूण दीड लाख कर्मचारी आहेत. केवळ ४०-५० जणांशी बोलून इतकं प्रचंड जनरलायझेशन करणं चुकीचं वाटलं.

चिंतातुर जंतू Thu, 20/08/2015 - 14:19

In reply to by अतिशहाणा

>> Amazon is where overachievers go to feel bad about themselves.”

>>“Nearly every person I worked with, I saw cry at their desk.”

माझ्या एका माजी अ‍ॅमेझॉनियन मित्राची ह्या वादावरची प्रतिक्रिया (तो ओव्हरअचिव्हर होता आणि प्रचंड फ्रस्ट्रेट होऊन त्यानं अ‍ॅमेझॉन सोडली) -
मी कुणाला रडताना कधी पाहिलं नाही, पण लोक रडत असत हे खरं आहे. वातावरणात प्रचंड ताण असे. नोकरीला लागल्यावर जवळपास लगेचच मला झालेला साक्षात्कार - आपले इथे कधीही कुणीही मित्र होऊ शकणार नाहीत (इतकी चुरस आहे).

गब्बर सिंग Fri, 21/08/2015 - 07:02

In reply to by अतिशहाणा

सुविख्यात व्हेंचर कॅपिटलिस्ट मार्क अँड्रीसन यांची रीट्वीट. अ‍ॅमेझॉन मधल्या "वर्क लाईफ बॅलन्स" बद्दल चाललेला आरडाओरडा कसा मजेशीर आहे त्याबद्दल -
.

Tech is taking away all the work
image hosting no sign up

================================================================

अ‍ॅमेझॉन ची स्टॉक प्राईस चा चार्ट -

माझ्या माहीतीनुसार अ‍ॅमेझॉन मधे इसॉप/Amazon Restricted Stock Units आहे.

गेल्या दहा वर्षांत स्टॉक प्राईस दहापट गेलेली आहे.
.
.

Amazon Stock Price for 10 years
screen capture windows

गब्बर सिंग Sat, 22/08/2015 - 08:51

In reply to by नंदन

ह्या लेखाचा संदेश - return to the goal of efficiency in work—fulfilling whatever needs we have, as a society

हा लेख या संदेशाच्या विपरीत आहे. या लेखात शून्य इफिशियन्सी आहे. कोणतीही नवीन insight पुढे न आणता १०४४ शब्दांचा ढीग रचणारा लेख.
-----

The antidote is simple to prescribe but hard to achieve: it is a return to the goal of efficiency in work—fulfilling whatever needs we have, as a society, with the minimal effort required, while leaving the option of more work as a hobby for those who happen to love it.

Those who happen to love it, do join Amazon and when they realize that the internal environment is not conducive they LEAVE and join some other organization.

ज्यांना हे असे वर्क एन्व्हिरॉनमेंट आवडत नाही ते इतरत्र नोकरी पाहतात.

----

अगदी मारुनमुटकून insight काढायचीच म्हंटले तर ह्यात - त्याने - whatever needs we have, as a society - असा सामाजिक बांधिलकीचा उच्च संदेश देऊन टाकलेला आहे.

नंदन Sat, 22/08/2015 - 12:34

In reply to by गब्बर सिंग

Those who happen to love it, do join Amazon and when they realize that the internal environment is not conducive they LEAVE and join some other organization.
ज्यांना हे असे वर्क एन्व्हिरॉनमेंट आवडत नाही ते इतरत्र नोकरी पाहतात.

हे असलं बायनरी ("र्‍हायचंय तर र्‍हा, नायतर चालू लागा") संकेतस्थळीय सुलभीकरण झालं. प्रत्यक्षात असा माज कुठल्या कंपनीला सातत्याने परवडेल असं वाटत नाही. (उदा.) जेफ बेझोसनेही टाईम्समधल्या लेखाची घेतलेली दखल, हे याचेच किंचित उदाहरण म्हणता येईल.

हा लेख या संदेशाच्या विपरीत आहे. या लेखात शून्य इफिशियन्सी आहे. कोणतीही नवीन insight पुढे न आणता १०४४ शब्दांचा ढीग रचणारा लेख.

तसा संदेश लेखात दिसला नाही. शिवाय प्रत्येक लेखाने सुलभ उत्तराचा पेढा आयता पुढे केलेल्या हातावर ठेवायला हवा, असं थोडंच आहे? (याच लेखात, एलिझाबेथ कोल्बर्टच्या लेखाकडे आणि पर्यायाने “Overwhelmed: Work, Love, and Play When No One Has the Time” या पुस्तकाकडे निर्देश आहे.) एखाद्या गोष्टीच्या अनेक पैलूंपैकी एकाकडे निर्देश करण्यासाठी हजार शब्द फार नसावेत.

गब्बर सिंग Sat, 22/08/2015 - 12:52

In reply to by नंदन

हे असलं बायनरी ("र्‍हायचंय तर र्‍हा, नायतर चालू लागा") संकेतस्थळीय सुलभीकरण झालं. प्रत्यक्षात असा माज कुठल्या कंपनीला सातत्याने परवडेल असं वाटत नाही. (उदा.) जेफ बेझोसनेही टाईम्समधल्या लेखाची घेतलेली दखल, हे याचेच किंचित उदाहरण म्हणता येईल.

प्रत्यक्षात असा माज कुठल्या कंपनीला सातत्याने परवडेल असं वाटत नाही. - हेच सत्य आहे. न परवडण्यामागे स्पर्धा प्रक्रिया हे एक (एकमेव नव्हे) कारण आहे.

म्हणूनच तर म्हणतो की बायनरी हा तुम्ही निर्माण केलेला जुमला आहे. वस्तुतः निर्णय हा बहुपर्यायीच आहे. फक्त तुम्ही तो विनाकारण बायनरी आहे असे भासवता आहात.

--------

तसा संदेश लेखात दिसला नाही. शिवाय प्रत्येक लेखाने सुलभ उत्तराचा पेढा आयता पुढे केलेल्या हातावर ठेवायला हवा, असं थोडंच आहे? (याच लेखात, एलिझाबेथ कोल्बर्टच्या लेखाकडे आणि पर्यायाने “Overwhelmed: Work, Love, and Play When No One Has the Time” या पुस्तकाकडे निर्देश आहे.) एखाद्या गोष्टीच्या अनेक पैलूंपैकी एकाकडे निर्देश करण्यासाठी हजार शब्द फार नसावेत.

थेट संदेश नाही.

पण लेखात कै दम नाही.

बाकी एलिझाबेथ कोल्बर्ट च्या पुस्तकाचे वाचन केले की मत व्यक्त करेन.

नंदन Sun, 23/08/2015 - 16:21

In reply to by गब्बर सिंग

बायनरी हा तुम्ही निर्माण केलेला जुमला आहे. वस्तुतः निर्णय हा बहुपर्यायीच आहे. फक्त तुम्ही तो विनाकारण बायनरी आहे असे भासवता आहात.

उल्टी मायनिंग इंडस्ट्री ई.पी.ए. को डाँटे? :). आपल्या प्रतिक्रियांतील सरसकटीकरण, सुलभीकरण, बायनरी विधानं आणि अ‍ॅड होमिनेमगिरी यांची उदाहरणं इथे देत बसत नाही, कारण चर्चेचा मुद्दा वेगळा आहे.

बाकी एलिझाबेथ कोल्बर्ट च्या पुस्तकाचे वाचन केले की मत व्यक्त करेन.

वाढलं की नाही अनावश्यक काम? ;)

गब्बर सिंग Sun, 23/08/2015 - 22:30

In reply to by नंदन

आपल्या प्रतिक्रियांतील सरसकटीकरण, सुलभीकरण, बायनरी विधानं आणि अ‍ॅड होमिनेमगिरी यांची उदाहरणं इथे देत बसत नाही, कारण चर्चेचा मुद्दा वेगळा आहे.

चर्चेचा मुद्दा माझ्या मते हा आहे की - अ‍ॅमेझॉन मधे वर्क एन्व्हायन्मेंट खूप प्रचंड प्रेशर असलेले आहे व ते समस्याजनक आहे - असे अनेकांचे म्हणणे आहे.

अ‍ॅमेझॉन मधे काम करणे अथवा न करणे हे बायनेरी नाही. १) काँट्रॅक्ट जॉब करणे (ज्यात कामाचे तास फक्त ८ असतील व पगार प्रतिघंटा रेट ने दिला जाईल, पण स्टॉक ऑप्शन्स मिळणार नाहीत), २) प्रदीर्घ काल फुल्लटाईम-एम्प्लॉयी (यात खूप प्रेशर असेल हे मान्य पण अ‍ॅमेझॉन स्टॉक ऑप्शन देते. व कर्मचारी ते घेतात व कमवतात सुद्धा.), ३) पार्ट टाईम काम करणे, ४) अ‍ॅमेझॉन मधे चार/पाच वर्षे (अत्यंत प्रेशर असलेले असूनही) काम करणे, (तसेच स्टॉक ऑप्शन्स चा लाभ चार/पाच वर्षांसाठी मर्यादित प्रमाणावर घेणे) अनुभव मिळवणे व नंतर दुसरीकडे नोकरी पाहणे, ५) अ‍ॅमेझॉन ही काही एकमेव एम्प्लॉयर नाही जगात. अनेक कंपन्या अशा आहेत की जिथे कामाचे वातावरण नॉर्मल्/प्रोफेशनल आहे - तिथे नोकरी पाहणे.

मूळ मुद्दा हा आहे की कर्मचार्‍याच्या प्रेशर घेण्याच्या आवडीनुसार व कुवती नुसार त्याने नोकरी मिळवावी व विश्लेषण करताना कर्मचार्‍याचे / संभाव्य कर्मचार्‍याचे रियलिस्टिक आल्टर्नेटिव्ह्ज लक्षात घेतले जावेत. विश्लेषण करणार्‍याने आपले प्रेफरन्सेस व अ‍ॅमेझॉन च्या कर्मचार्‍याचे प्रेफरन्सेस एकच आहेत असे समजू नये. जर त्या लोकांवर कोणतीही बळजबरी होत नसेल तर ते तिथे का जातील ???

मला फक्त हे सांगा की अ‍ॅमेझॉन मधे नोकरी करणे हे कसे बहुपर्यायी आहे हे जे मी वर विशद केलेय ते रियलिस्टिक आहे की नाही ?? का बायनेरी असूनही गब्बर ते बहुपर्यायी आहे असे दाखवतोय ??

------

प्रत्यक्षात असा माज कुठल्या कंपनीला सातत्याने परवडेल असं वाटत नाही.

- हे सत्य आहे हे मी मान्य केलेले आहेच. त्यामुळे Amazon will be forced to compete for workers in the labor market and as that competition becomes more and more real - it will have to change its practices in order to arrest potential attrition.

.शुचि. Sat, 22/08/2015 - 10:58

In reply to by नंदन

"Tech is taking away all the work!" "Tech is making us work too much!"

येस्स्स हीच विसंगती नंदन तुमच्या लेखात दाखवलेली आहे.
.
लेखात वेगळाच दृष्टीकोन मांडला आहे, अनेक अदृष्य घटक विचारात घेऊन एक वेगळी इनसाइट दिली आहे. उदा - खरं तर टेक्नॉलॉजीमुळे काम कमी झालेली असूनही, जितकं काम आपण लोकांकडून करवुन घेऊ शकू तितके आपण यशस्वी ...... ही सूजवट कल्पना. सूजवट कारण मूळात एक्स्ट्रा तासांची गरज आहे की नाही या उद्देशालाच पलटी दिली आहे.
.
हाय टेक्नॉलॉजीमुळे सर्व कर्मचारी हे २४ तास रीचेबल असणे - हा एक दैत्य
.
तीसरं साक्षात कर्मचार्‍यांची सुजवट कल्पना की अरे मी जास्त तास काम करतो = मी खूप बिझी आहे = मी यशस्वी आहे.
.
असे काही आऊट ऑफ बॉक्स मुद्दे जे हार्डली कोणी विचारात घेतो, या लेखात मांडले आहेत.
__________

The fact that employees are now always reachable eliminates what was once a natural barrier of sorts, the idea that work was something that happened during office hours or at the physical office. With no limits, work becomes like a football game where the whistle is never blown.

नंदन, हा हायलाइटेड अ‍ॅनॅलिसिस तर ऑन्साइट-ऑफशोअर मॉडेलच्या बाबतीत इतका चपखल खरा आहे ना की अक्षरक्षः स्क्वेअर पेग इन स्क्वेअर होल.

अतिशहाणा Wed, 19/08/2015 - 18:46

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान.

मात्र एकंदरीत पुरस्कारावरुन सुरु झालेल्या रणधुमाळीत अत्यंत मजा आली. शिवाजीमहाराजांची हिंदुत्त्ववाद्यांना सोयीस्कर ठरेल अशी सावरकरांनी मांडलेली गोब्राम्हणप्रतिपालक प्रतिमा उभी करणाऱ्या पुरंदरेंना सुरुवातीला आव्हाडासारख्यांनी विरोध केल्यामुळे, विरोध करणारे सगळेच लोक, पुरंदरेंना जातीमुळे विरोध करत आहेत अशी आवई उठली. गिरीश कुबेरसारख्यांनी त्यातल्या त्यात जमेल तसे पुरोगाम्यांना झोडपून घेतले. वास्तविक पहिला पुरस्कार मिळालेल्या पु.ल. देशपांड्यांपासून प्रामुख्याने ब्राम्हणांनाच हा पुरस्कार मिळाला आहे याकडे दुर्लक्ष करुन पुरंदरे ब्राम्हण असल्यामुळेच त्यांना पुरस्कार देण्याला 'तथाकथित' पुरोगाम्यांकडून विरोध होतोय अशीही हाकाटी सुरु झाली. (गंमत म्हणजे हिंदुत्त्ववाद्यांचे मेरुमणी ठाकरे यांनी पु.लं.ना जसाकाय स्वतःच्या खिशातूनच पुरस्कार दिलाय अशा थाटात 'झक मारली' असा अपमानही केला होता. त्यावेळीही हे शिंचे पुरोगामीच पु.लं.ची पाठराखण करत होते.) असं ध्रुवीकरण होणं भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी सगळ्यांच्याच सोयीचं असल्याने नावापुरती थोडी झटापट झाली. वास्तविक शिवाजीच्या राज्यस्थापनेमागची प्रेरणा, मलिक अंबर, शहाजी, मराठेशाहीचे एकंदर स्वरुप, शिवाजीच्या सैन्यात आणि एकंदर राज्यात (मुसलमानांसकट) अठरापगड जातींचे योगदान अशी संपूर्ण सांगोपांग चर्चा होण्याऐवजी केवळ संकेतस्थळीय चर्चा झाल्याने प्रचंड मनोरंजन झाले.

अखेरीस पुरस्कार सोहळा आजरोजी संपन्न झाला. पुरंदरे यांचे अभिनंदन.

सुधीर Thu, 20/08/2015 - 10:03

In reply to by अतिशहाणा

पुरंदरेंना पुरस्कार मिळाल्याचा आनंदच आहे. हा त्यांच्या कार्याचा यथोचित सत्कार आहे.

मला वाटतं 'काहिंसाठी' महाराजांना वेगवेगळ्या रंगात रंगविल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आमची भूमिका जातीय नाही - मुक्ता दाभोलकर

दाभोलकर\पानसरे यांच्या मते शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष आहेत. त्यांचा मुद्दा "शिवाजी महाराज मुसलमानांचा द्वेष करणारे नसून, हिंदूंचे राज्य निर्माण करणे हा त्यांच्या स्वराज्यनिर्मितीचा हेतू नव्हता.....शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शाहिरीतून निर्माण झालेली शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या राजकारणासाठी वापरता येईल हे जोखून, ही शाहिरी प्रतिमा म्हणजे शिवाजी महाराजांच्या वास्तवातील राजकीय भूमिका आहेत, असे भासवून त्या आधारे महाराष्ट्रात जे राजकारण केले गेले व जात आहे त्याला आमचा विरोध आहे..... शिवाजी महाराजांची मुसलमानविरोधी प्रतिमा रंगवून त्याचा राजकारणासाठी वापर करणे हे आमच्यासाठी जसे निषेधार्ह आहे तसेच समाजातील जातीय तेढ वाढविण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणे हेही आमच्यादृष्टीने निषेधार्ह आहे."

या सगळ्यात कुरुंदकरांनी रंगवलेले महाराज मला जास्त आवडतात. त्यात 'शिवाजी' एकेरी येतो. त्यात नाटकीय रुपांतरणाला थारा नसतो, तिथे शिवाजी नुसताच गनिमिकावा करणारा नसतो पण दगाफटका करणारा धूर्त पण असतो आणि सर्वात जास्त आवडलं ते, शिवाजी आपला (नायक) आणि औरंगजेब त्यांचा (खलनायक) अशी विभागणी नसते तर शिवाजी एका प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारा नायक असतो तर औरंगजेब दुसर्‍या प्रवाहाचं नेतृत्व करणारा नायक असतो. अशा तिसर्‍याच नजरेतून ओळख करून दिलेला शिवाजी मला अजून उठून दिसतो. कारण तो माणसासारखा माणूस असतो. भवानीमातेने तलवार दिलेला जादुगार नसतो. पानसरेंच्या दाव्यानुसार शिवाजी महाराज कदाचित मुसलमानांचा द्वेष करणारे नसतीलही पण त्याची कारणं राजकीय असली पाहिजेत. (एकाचवेळी निजामशाही, कुतुबशाही आणि मोघलाईंना आव्हान देणे व्यावहारीक पण नसावे) पण त्यांचे राज्य हिंदवी होते हे नाकारण्यात अर्थ नाही. ह्याचे स्पष्टीकरणही (गोब्राह्मण प्रतिपालक) कुरुंदकरांनी दिले आहे. कुरुंदकरांनी हेही म्हटलं आहे की, महाराज पण काळाची निर्मिती होती. त्यांच्या काळात स्त्रियांचे हक्क, अस्पृष्यता निर्मूलन असे प्रश्न येत नसतात. त्या मर्यादा दाखवूनही कुरुंदकारांनी रंगविलेली प्रतिमा खूप मोठी वाटते.

अतिशहाणा Thu, 20/08/2015 - 17:47

In reply to by सुधीर

पानसरे यांची 'शिवाजी कोण होता' ही छोटेखानी पुस्तिका जिज्ञासूंसाठी खालील दुव्यावर उपलब्ध आहे. 'गोब्राह्मणप्रतिपालक', शिवाजी आणि मुसलमान आदी मुद्द्यांवर पानसरे यांची मते पुरंदरेंपेक्षा खूपच वेगळी आहेत.

https://drive.google.com/file/d/0B0KVaFAoUh0MUHhUZ3F3dDJFVHc/view

सुधीर Fri, 21/08/2015 - 00:33

In reply to by अतिशहाणा

पुस्तक वाचायचा विचार होताच. तुम्ही फुकटात उपलब्ध करून दिलेत. अघाशासारखे चाळले. पान नं २३ ते ४३ (पिडीएफ ३० ते ४९) "धर्मश्रद्ध पण धर्मद्वेष्ठा नव्हे" ह्या पाठातल्या विचारांचे खंडन करणे कठिण आहे. किंबहूना तो दृष्टिकोन योग्य असावा. असं आता वाटू लागलं आहे. विचारांचा प्रतिवाद करता आला नाही म्हणून त्यांचा बळी गेला का? :(

बॅटमॅन Fri, 21/08/2015 - 03:01

In reply to by सुधीर

टोलविरोधी आंदोलनाची बातमी पहा.

अन असे पुस्तक लिहिल्याने गोळी घातली असेल तर इतकी वर्षे गोळ्याघालू लोक्स झोपले होते का?

गब्बर सिंग Fri, 21/08/2015 - 03:14

In reply to by बॅटमॅन

अन असे पुस्तक लिहिल्याने गोळी घातली असेल तर इतकी वर्षे गोळ्याघालू लोक्स झोपले होते का?

शॉल्लेट.

१९८८ ते २०१० या कालात अनेक आवृत्त्या निघाल्या त्या पुस्तकाच्या - असे पुस्तकातील पृष्ठ क्र. ४ वरून दिसते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 21/08/2015 - 03:28

In reply to by बॅटमॅन

अन असे पुस्तक लिहिल्याने गोळी घातली असेल तर इतकी वर्षे गोळ्याघालू लोक्स झोपले होते का?

पानसऱ्यांच्या बाबतीत ही शक्यता कमीच असावी. पण हुसेनच्या चित्रांच्या बाबतीत सनातनी लोक्स झोपलेच होते.

बॅटमॅन Fri, 21/08/2015 - 12:43

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नेमका मुद्दाम हुसेनचा मुद्दा इथे उकरून काढलाच आहात तर मग मुलायमबद्दल काही बोलल्याने किणकिणीची किंचाळी होऊ नये, कसे? नै म्हणजे एकच गोष्ट आपण केल्यावर अन दुसर्‍याने केल्यावरचा वेगळा न्याय, बाकी काही नाही.

सुधीर Fri, 21/08/2015 - 08:27

In reply to by बॅटमॅन

टोल विरोधी आंदोकलनाने बळी गेला आसेलही. काही कल्पना नाही. पुस्तकाचे पहिले प्रकाशन १९८८ मधले आहे ही बाब अनवधानाने पहायची राहून गेली.

मेघना भुस्कुटे Fri, 21/08/2015 - 09:27

In reply to by अतिशहाणा

अशोक राजवाडे नामक गृहस्थांचं आज लोकसत्तेत आलेलं पत्र:

इतिहासाचं आपलं आकलन कसं असावं?
बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासकार नाहीत याबद्दल टीकाकारांना कधीच शंका नव्हती. कारण इतिहासाची साधनं शोधून/ तपासून त्यांच्या आधाराने सत्यान्वेषण करण्याऐवजी शाहिरी करणं हा पुरंदरेंचा ध्यास आहे. आपण इतिहासकार नसून शाहीर आहोत हे स्वत: बाबासाहेब प्रामाणिकपणे मान्य करतात. शिवाजीची लोकप्रियता वाढवणं आणि त्याला ्रूल्ल बनवणं हे काम अनेक र्वष मोठय़ा निष्ठेने बाबासाहेबांनी केलं; पण यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीत नेमकी काय भर पडली हे कोणी समजावून सांगेल काय? उलट शिवाजीच्या नावाचा (गर)वापर करून ज्या संघटना इथे निर्माण झाल्या त्यांनी देशपातळीवर आपण अधिकच बदनाम झालो. उद्दाम, आडदांड आणि फॅसिझम प्रेरित संघटना हे जर अशा प्रयत्नांचं फलित असेल, तर आपलं मुळातच काही तरी चुकतं आहे असं म्हणावं लागेल. पुरंदरेना हात लावला तर मी तांडव करीन, हे राज ठाकरे यांचे उद्गार अशाच संस्कृतीचं फलित आहे. शिवाजीचं योग्य आणि परखड मूल्यमापन करूनही त्याला आदराचं स्थान देणाऱ्यांची (उदा. शेजवलकर) आपल्याकडे कमतरता नाही, तर दुसरीकडे सर जदुनाथ सरकार यांच्यासारख्यांनी शिवाजीबद्दल फारसे कौतुकाचे उद्गार काढलेले नाहीत आणि त्याबद्दल अनेक टीकाकारांनी त्यांना धारेवर धरलं आहे.
वाईट भाग असा की, शिवाजीचं नाव घेऊन ज्या काही (आणखी नव्या) आडदांड, जातीयवादी, खुन्नसप्रमुख आणि मोडतोडप्रधान संघटना इथे जन्माला आल्या त्यांच्याकडे लक्ष वेधून घाऊक प्रमाणात 'पुरोगामी' नावाच्या एका सबगोलंकारी समूहावर निशाणा साधण्याचं काम पुढे सुरू आहे. ही घटना राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या प्रक्रियेचा एक महाराष्ट्रीय आविष्कार आहे. सुदर्शन राव, गजेंद्र चौहान, दीनानाथ बात्रा यांना जसं 'पुरस्कृत' केलं जातंय तसं दुसरीकडे बाबासाहेब पुरंदरे वा तत्सम शिवकीर्तनकारांना मानमरातब बहाल करून ते 'जणू काही' इतिहासकार आहेत अशी आभासी वातावरणनिर्मिती सुरू आहे. ऐतिहासिक कालखंडाबद्दल सामान्य कादंबऱ्या आपल्याकडे निर्माण झाल्या आहेत आणि त्यांना मोठी मान्यता आहे. (इतिहासाच्या विषयावर कादंबरी कशी लिहावी याचा उत्तम वस्तुपाठ 'अंताजीची बखर' या नंदा खरे लिखित कादंबरीत आहे; पण अशी उदाहरणं दुर्मीळ.) प्रगत देशांतल्याप्रमाणे जनतेचा इतिहास लिहिण्याच्या परंपरा आपल्याकडे नाहीत हे दुर्दैव आहे. अन्यथा चित्र वेगळं दिसलं असतं आणि इतिहासाला किती चित्रविचित्र आणि वेगळे कंगोरे असतात हे समजलं असतं. अर्थातच असं होण्यात काहींना अजिबात रस नाही. काहींना शिवाजी नावाचा एक 'गोब्राह्मण प्रतिपालक' हवा आहे, तर दुसऱ्या काहींना तो 'क्षत्रिय कुलावतंस' हवा आहे. एकुणात शिवाजी नावाचा एक 'िहदू महापुरुष' हवा आहे आणि अशा साच्यात शिवाजीला बसवण्यात त्यांना रस आहे. शिवाजीवर याहून मोठा अन्याय दुसरा नसेल.
दुर्दैवाने या वादाला जातीय स्वरूप आलेलं आहे ही गोष्ट गंभीर आहे; पण पुरंदरेंच्या एकूण शाहिरीला होणारा विरोध हा नुसताच जातीय पातळीवरचा नाही. एकूणच इतिहासाचं आपलं आकलन कसं असावं याविषयी काही गंभीर मुद्दे त्यात आहेत.
अशोक राजवाडे, मुंबई

घाटावरचे भट Fri, 21/08/2015 - 10:01

In reply to by मेघना भुस्कुटे

पत्रलेखकाचा दृष्टिकोन रोचक आहे. पण -
१. फक्त मनाला येईल त्या गोष्टी शिवाजी महाराजांविषयी खपवून शाहिरीच करायची असती तर बाबासाहेब कशाला भारतीय इतिहास संशोधक मंडळात काम करत असते? किंवा जुनी कागदपत्र मिळवायला कशाला हिंडले असते? त्यांचा शिवरायांबद्दल त्यांनी गोळा केलेल्या ऐतिहासिक माहितीचा/दस्तैवजांचा वापर करण्याबद्दलचा दृष्टिकोन कसा आणि काय होता याबद्दल मतमतांतरे असू शकतात, पण डायरेक्ट 'कारण इतिहासाची साधनं शोधून/ तपासून त्यांच्या आधाराने सत्यान्वेषण करण्याऐवजी शाहिरी करणं हा पुरंदरेंचा ध्यास आहे.'?
२. नंतरच्या पब्लिकने शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर केला ह्यात बाबासाहेबांचा दोष काय आहे हे समजलं नाही.
३. आणि शिवचरित्रापासून जितके लोकं अस्मितांच्या राजकारणाला लागले त्यापेक्षा कितीतरी जास्त लोक थोडे तरी चांगल्या प्रकारे इन्स्पायर झाले असतील असं म्हणायला वाव आहे.
४. शिवाय 'आपल्या संस्कृतीत काय भर पडली?' हा प्रश्नही हास्यास्पद आहे. एखाद्या प्रदेशातले महापुरुष त्या त्या प्रदेशातील संस्कृतीचाच भाग नसतात काय? आणि मग अशा कर्तृत्ववान लोकांच्या कार्याची लोकांना शाहिरी पद्धतीने का होईना ओळख करून द्यायचं काम मोठं नाही का?

मेघना भुस्कुटे Fri, 21/08/2015 - 10:28

In reply to by घाटावरचे भट

हे फक्त तुम्हांला उद्देशून नाही. गैरसमज नसावा. पण हल्ली असं वाटतं की कोणत्याही गोष्टीच्या काही भागाला आपला विरोध आहे आणि काही विशिष्ट अंगाना पाठिंबा आहे किंवा आपलं त्याबाबत विशेष मत नाही - या प्रकारची गुंतागुंत समजून घेण्याच्या परिस्थितीतच कुणी नाही. हे किंवा ते. आमच्यासोबत नसाल, तर आमच्याविरोधात. त्याला विरोध करता, म्हणजे तुम्ही अमुक.

असं का होतं आहे?

शाहिरीचं काम कमी महत्त्वाचं नाही. योग्य त्या ऐतिहासिक पुराव्यांचा शोध घेऊन जबाबदारीनं केलेली शाहिरी तर अतिशय आवश्यक आणि महत्त्वाची आहे. कारण संशोधन - विचारमंथन - विश्लेषण जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते समाजातल्या प्रत्येक थरापर्यंत योग्य त्या अविकृत स्वरूपात पोहोचवणंही महत्त्वाचं आहे. पण शाहिरी आणि इतिहासाभ्यासक या दोन भूमिकांमध्ये (किंवा रसिकमान्य दिग्दर्शक आणि लोकप्रिय दिग्दर्शक, किंवा योगासनासारखा आरोग्यपूर्ण व्यायामप्रकार आणि भारतीय संस्कृतीचा एकमेवाद्वितीय हिंदू वारसा) जेव्हा गल्लत सुरू होते, तेव्हा ते हेतुपुरस्सर आहे का, जर तसं असेलच तर हे हेतू कोणते, त्यांना विरोध करणार्‍याचं कोणत्या पातळीवर जाऊन हनन करण्यात येणार आहे, त्याची विरोधाची भूमिका किमान ऐकून तरी - समजून तर जाऊच दे - घेतली जाणार आहे की नाही, असे प्रश्न उभे राहतात.

निष्कर्षांवर न पोचता आपण हे प्रश्न का ऐकत नाही आहोत?

घाटावरचे भट Fri, 21/08/2015 - 13:18

In reply to by मेघना भुस्कुटे

हे किंवा ते. आमच्यासोबत नसाल, तर आमच्याविरोधात. त्याला विरोध करता, म्हणजे तुम्ही अमुक.

असं वाटत नाही. तुम्ही म्हणताय तितकं ध्रुवीकरण तर अज्जिबातच झालेलं दिसत नाही (निदान सुशिक्षित समाजात तरी). नाहीतर ऐसीवरच प्रतिसादांची संख्या आणि पर्यायाने संपादकांचा व्याप कितीतरी वाढला असता.

पण हल्ली असं वाटतं की कोणत्याही गोष्टीच्या काही भागाला आपला विरोध आहे आणि काही विशिष्ट अंगाना पाठिंबा आहे किंवा आपलं त्याबाबत विशेष मत नाही - या प्रकारची गुंतागुंत समजून घेण्याच्या परिस्थितीतच कुणी नाही.

बर्‍याचदा आपलं काही मत नाही म्हणून बरेच (निदान माझ्यासारखे तरी) लोक गप्प बसत असावेत असं वाटतं (माझ्याजवळ विदा नाही). बाकी गजेंद्र चौहान, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या ध्रुवीकरण होऊ शकणार्‍या विषयांबद्दलही सम्यक मते असणारे अनेक लोक माझ्या माहितीत आहेत. तुमचा सँपलसेट तपासून पाहा बॉ एकदा ;-)

बॅटमॅन Fri, 21/08/2015 - 13:56

In reply to by घाटावरचे भट

बाकी गजेंद्र चौहान, बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या ध्रुवीकरण होऊ शकणार्‍या विषयांबद्दलही सम्यक मते असणारे अनेक लोक माझ्या माहितीत आहेत. तुमचा सँपलसेट तपासून पाहा बॉ एकदा

कसली लोहारकी आहे ही!

किंवा

अतिशय सहमत.

मेघना भुस्कुटे Fri, 21/08/2015 - 15:41

In reply to by घाटावरचे भट

इतक्या सुमार कर्तृत्वाचा माणूस महत्त्वाच्या पदी आणून बसवल्यावर त्याला साहजिक विरोध होतो आणि ती नेमणूक गपचूप मागे घेण्याऐवजी त्यावर इतकी घमासान / कंटाळवाणी / संतापजनक चर्चा होते... अजून ध्रुवीकरणाचे काय निराळे पुरावे हवेत? खुद्द खोपकरांसारख्या शहाण्या माणसानंही असली भडक भाषा वापरावी, सर्वसामान्यांकडून काय अपेक्षा ठेवणार म्हणा... वाईट चाललं आहे जे चाललं आहे ते. :(

घाटावरचे भट Fri, 21/08/2015 - 16:12

In reply to by मेघना भुस्कुटे

वाईट चाललं आहे जे चाललं आहे ते.

अहो पण मूळ प्रतिसाद (किंवा ते उद्धृत केलेलं पत्र) बाबासाहेब पुरंदर्‍यांविषयी होतं ना? मग त्यात गजेंद्र कुठे आला मधेच? शिवाय इतका वेळ मी धर्मराजमुटके गजेंद्रमोक्षासाठी धावून आले असं समजून हा विषय संपला असं मानत होतो. तुम्ही परत त्याला जिवंत केलंत.;-)

असो. तुमच्या क्वोटातील भावनेशी एकंदर सहमत आहे.

बॅटमॅन Fri, 21/08/2015 - 12:45

In reply to by मेघना भुस्कुटे

ओहो, म्हणजे अणुबाँबचा वापर निरपराध लोकांविरुद्ध करण्यात आल्याने त्याचे तंत्रज्ञान शोधणारे शास्त्रज्ञ दोषी ठरतात तर!!!!!!

या राजवाड्यांचे आकलन पाहून तुफान करमणूक झाली.

अतिशहाणा Fri, 21/08/2015 - 18:13

In reply to by बॅटमॅन

ओहो, म्हणजे अणुबाँबचा वापर निरपराध लोकांविरुद्ध करण्यात आल्याने त्याचे तंत्रज्ञान शोधणारे शास्त्रज्ञ दोषी ठरतात तर!!!!!!

या राजवाड्यांचे आकलन पाहून तुफान करमणूक झाली.

ही अॅनालॉजी चुकीची वाटते. अणुशक्तीचा वापर फक्त बॉम्ब म्हणूनच कसा करता येतो हे दाखवणाऱ्या शास्त्रज्ञांना दोष दिलाय असं म्हटलं तर ते सत्याच्या थोडं जवळ जाऊ शकेल.

गब्बर सिंग Thu, 20/08/2015 - 06:07

madaari who can fool even God

"Modi has only one quality of fooling people. He can fool every one. He can befool even God," Lalu said

लालूंचे हे वाक्य ऐकून मला आठवलेली गाणी

१) कैसा जादू बलम तूने डाला
२) जादुगर तेरे नैना ... दिल जाएगा बचके कहा ?
३) दिल लूटने वाले जादूगर अब मैने तुझे पहचाना है
४) आग पानी मे लगाते हुए तिलिस्मात की रात ... जिंदगी भर नही भूलेगी वो ...
५) जादूगर कातिल हाजिर है मेरा दिल
६) जा रे जादूगर देखी तेरी जादुगरी

वगैरे वगैरे....

मोदींची स्तुती करायची तर स्तुती करा ना ....

अनु राव Thu, 20/08/2015 - 13:50

In reply to by घाटावरचे भट

ह्या बँकांमुळे डीपॉझिटर्स ना काय फायदा होणार आहे ते विचार करुन पण कळले नाही.
मला जर नविन अकाउंट उघडायचे असेल किंवा मुदत ठेव करायची असेल तर मी ह्या बँकाकडे का जावे?

ह्या बँकांना लास्ट माईल पर्यंत जाणे म्हणे शक्य होइल, मग सध्याच्या बँकांना का होत नाही?

प्रसन्ना१६११ Thu, 20/08/2015 - 13:35

समाजवादी पार्टी प्रमुख मुलायमसिंग यांचे बलात्कारावर अजून एक धक्कादायक विधान
मुलायमसिंग यांचे मते 'गँगरेप अशक्य असतो. ते प्रॅक्टीकली शक्य नाही! एक जण बलात्कार करतो आणि इतर ३ जणांना त्यात गोवण्यात येते'.
मुलायम सिंगांसारख्या वयाने मोठ्या राजकीय नेत्याच्या असल्या विधानाचे काय अर्थ होतात?
- त्यांची बुद्धी भ्रष्ट होतेय?
- उत्तर प्रदेशातील रेपचे गुन्हे झालेलेच नाहीत; ते सर्व सपा सरकारच्या बदनामीचे कुभांड आहे असे त्यांना सांगायचे असेल?
- यापूर्वीची त्यांची या विषयावरील मते (मुक्ताफळे) 'बच्चे है, उनसे गलतीयां होती रहती है.." किंवा "लडकी- लडके की दोस्ती होती है, फिर उनकी आपस में नही बनती, तो रेप का केस डाल दिया जाता है.." इ. पाहता हा कांही पॅटर्न आहे का? बलात्काराला ते फारसा गंभीर गुन्हा मानत नसावेत का?
- मुलायम सिंग यांनी व्यक्त केलेले मत किती लोकांना पटण्यासारखे आहे?

बॅटमॅन Thu, 20/08/2015 - 16:36

In reply to by प्रसन्ना१६११

हे वाक्य हिंदुत्ववादी नेत्याकडून आले असते तर अख्खा मीडिया नवचैतन्याने कामाला लागला असता.

संभाव्य आक्षेपः आयडिऑलॉजीच्या नावाखाली बलात्काराचे ट्रिव्हियलायझेशन होतेय हे.

उत्तरः ज्यांनी ट्रिव्हिअलायझेशन केले त्यांच्याकडे सिलेक्टिव्हली दुर्लक्ष करणार्‍यांना असे बोलायचा मॉरल हक्क नाही.

अनु राव Thu, 20/08/2015 - 16:53

In reply to by बॅटमॅन

हे वाक्य हिंदुत्ववादी नेत्याकडून आले असते तर अख्खा मीडिया नवचैतन्याने कामाला लागला असता.

बरोबरच आहे. मुलायमसिंग सारख्या लोहीयाच्या चेल्याला, जेपींच्या भाल्याला आणि पक्षाचे नाव सुद्धा समाजवादी ठेवणार्‍या थोर्थोर समाजवादी जे काही बोलेल ते बरोबरच असणार.

काही महान लोकांना गज्जुभाऊ फारच टोचतात अगदी टोळधाड आली असे वाटते पण त्यांनी कधी लालू आणि मुलायल मुख्यमंत्री कसे झाले ह्या बद्दल पत्रप्रपंच केला नाही. युपी बिहार फार लांब राहीले, भली भली थोर मंडळी राज्याचा गाडा चालवत होते, तेंव्हा सुद्धा त्यांना काही बोचले नाही आणि कधी त्यांनी उघडीवाघडी पत्र लिहीली नाहीत.

प्रसन्ना१६११ Thu, 20/08/2015 - 18:43

In reply to by अनु राव

बरोबरच आहे. मुलायमसिंग सारख्या लोहीयाच्या चेल्याला, जेपींच्या भाल्याला आणि पक्षाचे नाव सुद्धा समाजवादी ठेवणार्‍या थोर्थोर समाजवादी जे काही बोलेल ते बरोबरच असणार.

एकदम खतरा! (फार छान यासाठी खास लातूरी शब्द)
माजवादी लोकांनी काहीही बोलले तरी झोला/बिंदी/मेणबत्ती कँपातून कोणीच टीका कशी करीत नाहीत?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 20/08/2015 - 18:47

In reply to by प्रसन्ना१६११

पळीपंचत्रपात्री खडखडायला लागली की झोले, बिंद्या, मेणबत्त्यांचे आवाज दबून जात असणार.

प्रसन्ना१६११ Thu, 20/08/2015 - 19:01

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पळीपंचत्रपात्री खडखडायला लागली की झोले, बिंद्या, मेणबत्त्यांचे आवाज दबून जात असणार.

पळीपंचपात्रांचा कधीकाळी असलेला इंटलेक्चुअलिटीचा मक्ता झोले, बिन्द्या आणि मेणबत्त्यानी घेऊन बरीच युगं लोटली की आता! बर्‍याचदा रिकाम्यारानी हाकारे पिटणारे हे सगळे, मुलायम आजोबांची जीभ आणि बुद्धी चळलीय तरी त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत- ते वैचारिक सोयरिक असल्याने की काय?

अतिशहाणा Thu, 20/08/2015 - 18:51

In reply to by बॅटमॅन

मी जितक्या बातम्या वाचल्या तिथं सर्वांनी निषेधच केला आहे. मीही इथे निषेध करतो. मुलायमसिंग यांचे नेहमीसारखे अत्यंत हास्यास्पद विधान.

ऋषिकेश Thu, 20/08/2015 - 21:14

In reply to by प्रसन्ना१६११

अत्यंत हास्यास्पदच नव्हे तर संतापजनक विधान!

गेल्या ३-४ सरकारांपैकी उत्तरप्रदेशने मायावतींच्या राज्यात सर्वात चांगली कायदा सुव्यवस्था बघितली असे अनेक जण म्हणणारे भेटायचे तो योगायोग आहे का अशी शंका होती. मात्र अशी बेताल वक्तव्ये बघून ते खरंच असावेसे वाटतेय

माहितगार Thu, 20/08/2015 - 13:55

कालच्या आणि आजच्या 'न्यूयॉर्क टाइम्स'मध्ये भारताविषयी दोन बातम्या आल्या आहेत -
तीस्ता सीतलवड आणि सीबीआय -
Longtime Critic of Modi Is Now a Target

'कोब्रापोस्ट'च्या स्टिंगविषयी -
When Killers Talk, Few in India Seem to Care
यातले काही तपशील धक्कादायक आहेत. तसेच, फुटकळ वादांवर माध्यमे जो वेळ आणि जागा खर्च करतात, आणि अशा बातम्यांकडे जे दुर्लक्ष करतात त्यामागच्या कारणमीमांसेविषयीची टिप्पणीही रोचक आहे.

.शुचि. Fri, 21/08/2015 - 06:36

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

छान बातमी आहे. हा प्रश्न चूकीचाही असेल पण ढगाळ हवेत (पावसाळा) ते विमानतळ कसे चालेल?