शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, भाषांतर वगैरे - भाग ४
व्यवस्थापकः
आधीचा धागा लांबल्यामुळे पुढील धागा काढला आहे.
या आधीचे धागे: भाग १ | भाग २ | भाग ३
----
"सुमार" ह्या शब्दाचा मराठी मधे अर्थ average ह्या अर्थी घ्यायचा की below average ह्या अर्थी घ्यायचा.
मी तरी दुसरा अर्थ वापरते.
हा उर्दु/फारसी वगैरेतुन आलेला दिसतो शब्द ( बेसुमार मधला हाच सुमार असला तर ), पण सध्या तिथे तो वापरात आहे का?
मोल्सवर्थमध्ये सुमारचा अर्थ
मोल्सवर्थमध्ये सुमारचा अर्थ मोजणीशी संबंधित असा दिला आहे. त्यावरुन खानेसुमारी, बेसुमार वगैरेंचा अर्थही लागतो.
Number, numerical amount. Of this sense, although the proper sense, the use is restricted. It occurs in such examples as the following when the number is to be stated of things mentioned; and only in accounts, notes, or other writings: (ex. आंबे सु0 शंभर, रुपये सु0 तीन, गडी सु0 पंचवीस:) and in applications involving the idea of absence of number, i. e. of excessiveness, immoderateness, incalculableness
http://dsalsrv02.uchicago.edu/cgi-bin/romadict.pl?query=%E0%A4%B8%E0%A5…
परवा आईंनी एक शब्द वापरलेला -
परवा आईंनी एक शब्द वापरलेला - हं पोळ्या जरा सुरमटच भाज अन फक्त त्या शब्दावरुन अन एकंदर अविर्भावावरुन मला कळले की खरपूस भाज म्हणायचय त्यांना.
कुणी सुरमट हा शब्द ऐकला होता का?
____
कलिंंगडाला एक प्रकारचे टेक्श्चर असले की आम्ही त्याला रवाळ कलिंगड म्हणतो. अजुन कोणाला माहीत आहे का हा शब्द?
घरात कढवलेलं लोणकढं तूपही रवाळ असतं.
___
गुरगुट्या भात हादेखील असाच टेक्श्चर दर्शक शब्द.
____
आंबट-चिंबट्/आंबट ढाण - चवदर्शक शब्द. लगेच तोंडाअत ती चव येतेच.
गोडमिट्टं कॉफी.
@ऋता - छेकापह्नुति
छेकापन्हुती (छेकापह्नुति) हा एक शब्दालंकार आहे. शब्दश: अर्थ - चतुरपणे ठकविणे, चकविणे, फसविणे.
या अलंकारात शब्दरचना अशी केली जाते की ऐकणा/वाचणारा एक (अपेक्षित) अर्थ लावतो पण अर्थ दुसराच नि योग्य असल्याचे दाखवून चकित केले जाते. ढोबळ मानाने द्व्यर्थी शब्द्/वाक्यरचना.
शाहिर रामजोशी यांची 'किती चतुर बायका, रसिकहो, छेकापन्हुती आयका!' ही रचना प्रसिद्ध उदाहरण आहे. आंतरजालावर सहज सापडेल. यात प्रत्येक कडव्यात एक प्रश्न विचारला जातो. दिलेले उत्तर चावट असते पण विचारणारा 'मी त्या गावचाच नाही' असे म्हणत दुसरे चपखल बसणारे (न-चावट) उत्तर देतो.
महामहोपाध्याय श्री. बट्टमण्ण यांनी संतपंततंत कवी नि 'गाळीव इतिहास' यावर पीयच्डी केली असल्याने त्यांचेकडून विस्तृतविवेचन येईलच.
+१
छेकापन्हुति = छेक + अपह्नुति (मराठीत न आणि ह चा वर्णविपर्यय झाला) = चलाखपणे उपमेचा वेगळ्या प्रकारे वापर, चलाखपणे आहे ती परिस्थिती झाकणे, इ.इ.
दोन्ही शब्दांच्या अर्थाकरिता स्रोत इथे.
अमुकचंद्ररावजीसो| यांनी बरोबर सांगितल्याप्रमाणे रामजोश्यांची लावणी तर आहेच. त्यातले एक प्रसिद्ध उदा.
मज शीतळ करितो श्रमी होवुनिया भला | तो कृष्ण काय? नव्हे गे, व्यजन सुवंशातला |
सासुसासरा पति यांदेखत अधरामृतमाधुरी | घेतसे काय वदावे तरी?
तो नंदाचा मूल काय गे, सांग कन्हैया हरी? नव्हे गं हा मधुकर पंकज हरी!!
अर्थ वेगळा सांगायची गरज नसावी.
गाळीव इतिहासातले उदा. म्हणजे 'अंबरगत परि पयोधरांते रगडुनि पळतो दूरी | काय हा धीट म्हणावा तरी' हे वाक्य आहे.
"पुढे मोरोपंतांनी सांगितल्यावर उपरती झाली आणि डफ फोडला. (पहा- रामजोशी पिच्चर) आणि "अंबरगत परि" वगैरे पब्लिकला न कळणारे छेकापन्हुति वगैरे लिहू लागले." इ.इ.
अंबर = आकाश, वस्त्र. पय = दूध, पाणी.
हा अलंकार कवी भूषणाच्या काव्यातही सापडतो. शिवबावनीतले नेमके उदाहरण आज रात्री किंवा उद्यापर्यंत टंकतो. संस्कृतातही याची उदाहरणे आहेत, इन फॅक्ट काही प्रसिद्ध सिनेगीत/भावगीत/गझल इ. मध्येही याचे उदा. आहे असे आमच्या एका मित्रवर्यांनी सांगितले होते. ते पाहिले पाहिजे.
>>थँक्स अमुक आणि बॅटमॅन
>>थँक्स अमुक आणि बॅटमॅन इतक्या सविस्तर अर्थ सांगितल्या बद्द्ल आणि संदर्भां बद्द्ल.>>खरंच.
मराठी शाळाच बंद झाल्या , केका आणि श्रावणमासी मेरीचं कोकरू खाऊन टाकतंय. दादांच्या मेंढरांचाही कॅापीराइटने गळा दाबलाय.बॅटमॅन गुर्जी छेकापन्हौतीची पोतडी लवकर सोडा इथेतरी.-
-मागच्या बाकावरचा अचरट ( आपला नम्र वगैरे आहेच.)
आपण ब्लास्फेमीसाठी 'पाखंडी
आपण ब्लास्फेमीसाठी 'पाखंडी वर्तन' / 'पाखंडीपणा' सररास वापरतो.
शिवाय, मला वाटतं, 'ब्लास्फेमी' बराच तीव्र आहे. खाली दिलेल्या उदाहरणाला 'ब्लास्फेमी' लागू व्हायचा नाही. तिथे बहुतेक 'जुनाट वळणाच्या हिंदू घरात जाऊन देवघरात अंडी फोडणे / गाय कापणे' असलं काहीतरी भयभीषण केलं, तर 'ब्लास्फेमी' चालेल. अजून एक म्हणजे 'ब्लास्फेमी' हा शब्द कर्त्याच्या कृत्याला उद्देशून वापरत असावेत. 'स्कॅण्डलाइज' होतात ते या कृत्याचा परिणाम पाहणारे / भोगणारे (रिसिविंग एन्डला असणारे) लोक.
की माझा गैरसमज होतो आहे?
अं... उदाहरण देते. "काहीशा
अं... उदाहरण देते.
"काहीशा जुन्या वळणाच्या त्या सोज्ज्वळ कुटुंबात शिरल्या शिरल्या मी मोठ्या आवाजात मासिक पाळीबद्दल काहीतरी मूर्तिभंजक बडबड केल्यामुळे घरातले सारे जण स्कॅण्डलाइज झाले."
१) इथे स्कॅण्डलाइज या शब्दाचा वापर बरोबर आहे का?
२) असल्यास, तिथे 'सनसनाटणे'चा वापर कसा करणार?
अनैतिक इ कृत्य करणारा व्यक्ति
अनैतिक इ कृत्य करणारा व्यक्ति स्कँडलाइज करतो. अशा कृतिमुळे ज्यांना धक्का इ बसतो ते काय करतात याचा त्या क्रियापदाशी संबंध नाही. म्हणून हबकणे इ अर्थ चूक आहे.
Asaram scandalized his devotees.
आसारामने भक्तांना (आपल्या दुर्वतनाने) धक्का दिला.
scandalize = धक्का देणे. शरम करायला लावणे. राग आणणे.
हे ऑक्सफर्ड देतो: Shock or
हे ऑक्सफर्ड देतो:
Shock or horrify (someone) by a real or imagined violation of propriety or morality. (their lack of manners scandalized their hosts.)
MORE EXAMPLES:
Australia's continuing loss of defence capability would scandalise the Australian people if the whole truth were to be revealed.
When I came to pick up the order, I was scandalized by the seemingly outrageous price and refused to accept them.
One of my earliest convictions in becoming Catholic is that the Faith scandalizes us (different people in different ways) and that the scandal is a judgment on us, not on the Faith.
SYNONYMS:
shock, appal, outrage, horrify, disgust, revolt, repel, sicken, nauseate; offend, give offence to, affront, insult, cause raised eyebrows
हबकणे सगळ्यांत जवळचा आहे खरा. पण परिपूर्ण नाही. परिपूर्ण एकच एक शब्द मिळायचा नाही बहुतेक. एकाहून अधिक क्रियापदं योजावी लागतील.
शिवाय अजो म्हणताहेत ते बरोबर आहे. टू स्कॅण्डलाइज आणि टू बी स्कॅण्डलाइज्ड (ड फारच अस्पष्ट) हे दोन निराळे प्रकार आहेत. (शक्य आणि प्रयोजक क्रियापद?) सवडीने अजून खरडीन. तूर्तास गडबड.
सेल्फ-डाउट फॉर कपॅबिलिटी इ.इ.
सेल्फ-डाउट फॉर कपॅबिलिटी इ.इ. = न्यूनगंड चालून जावा. "न्यूनगंडाने पछाडल्यामुळे तिला स्वतःबद्दल शंका वाटू लागली" वगैरे.
फिलिस्टीनच्या अर्थाकरिता मराठीत औरंगजेब हा शब्द तसा अनेकजण वापरतात. अरसिक हाही शब्द चालून जावा, पण त्यापेक्षा औरंगजेब म्हटले की अर्थ चपखल बसतो असे वाटते.
"कलेच्या प्रांतात मात्र ती औरंगजेबच होती, तिला साहित्यादि कलांचे अंगच नव्हते / कदरच नव्हती (कदर वगैरे अॅथॉरिटीच्या पोझिशनमध्ये असलेल्यांसाठी जास्त वापरतात)" वगैरे.
१) racy narrative कसे
१) racy narrative कसे म्हणायचे - "his specialty is a racy narrative full of complicated events, colourful characters, and rapid turns in plot."
२) dystopia ("an imaginary community or society that is undesirable or frightening. It is literally translated as "not-good place", an antonym of utopia.) ला मराठीत शब्द आहे का?
ता. क.
३) He frowned on the idea of wiping one's bum with paper = "wipe bum" सभ्य मराठीत कसे म्हणायचे? :-)
१. रेसी = उत्तेजक +
१. रेसी = उत्तेजक + उत्कंठावर्धक.
'his specialty is a racy narrative full of complicated events, colourful characters, and rapid turns in plot."
>> रंगीबेरंगी पात्रे, गुंतागुंतीच्या घटना आणि कथावस्तूमध्ये वेगाने घडणारे बदल इ. नी युक्त अशी उत्तेजक, उत्कंठावर्धक लेखनशैली वगैरे.
२. डिस्टोपिया साठी एकच एक शब्द नाही - किमान मला माहिती नाही.
३. wipe bum इ.इ. = प्रातर्विधीकरिता कागद वापरण्याला त्याने नाके मुरडली वगैरे.
१) मी 'रेसी'ला 'चटपटीत' असा
१) मी 'रेसी'ला 'चटपटीत' असा शब्द वापरीन. त्यात वेगाचंही सूचन आहे आणि थोडी सवंगाईही.
२) 'यूटोपिया'ला मराठीत शब्द 'अस्थितादर्श'. नंदा खरे यांनी सुचवलेला शब्द 'न-स्थान'. मग तो यूटोपिया असेल तर 'सुनस्थान'. 'डिस्टोपिया' असेल तर 'कुनस्थान'. पण रुळलेले दोन्हीही (तिन्हीही) नाहीत. मला हे सगळेच फार कृत्रिम वाटतात. 'स्वप्ननगरी' आणि 'दु:स्वप्ननगरी' असे दोन मी वापरले असते. (पण शब्द 'घडवायचे' म्हणताना, सगळेच कमीअधिक शेर! शेवटी रुळेल हवा तरी 'डिस्टोपिया' नि 'यूटोपिया'च!)
३) एका आदिवासी जमातीला या सवयीवरून 'पानपुशे गोंड' असं नाव पडल्याचं वाचलं आहे. पण हे केवळ आठवलं म्हणून. एरवी सभ्य मराठीत हे इतक्या थेट कुणी म्हणणारच नाही. "'त्या' कामासाठी कागद? ई! कसंतरीच वाटतं, नाही?" असं चोरट्या आवाजात म्हणून भागवतील फार तर.
कुला साभार
मोल्सवर्थमधून साभार -
कुला (p. 175) [ kulā ] m A buttock. Pr. रिकामा सुतार कुलेतासी. कुला बाहेर पडला A covert or delicate way of speaking about prolapsus ani (i. e. something in the neighborhood of कुला). कुले थोपटणें To clap the buttocks in triumph or in joy. कुल्यावर कुला येणें To get fat. मातीचे कुले कोठें लावल्यानें लागतात? Can any acquirement or adventitious good sit as appropriately as an endowment or excellency of nature?
शब्द-प्रतिशब्द, व्याकरण, इ.
शब्द-प्रतिशब्द, व्याकरण, इ. बद्दलच्या चर्चेला अनुसरून एक धमाल व्हिडिओ इथे पहावा. बर्याच लोकांना शाळेची आठवण होणार हे निच्छीत!
होय अनु, below average अर्थ
होय अनु, below average अर्थ आहे.
दुसर्याचे उत्तर माहीत नाही.