ह्या खिडकीतून...[part-2]
ध्यान तर लागले.डोळेपण मिटून गेले.झोपेने आपले पाश आवळले.
मग मध्येच जाग आली. डोळे किलकिले करून सहज बघून घेतले.
उंच आभाळात आमचे विमान तरंगत होते.
बाहेर जांभूळ रंगाचा प्रकाश पसरलेला
विमानात हवाई सुंदरीची लगबग चालू होती. ट्राल्या घेऊन काहीकाही देणे सुरु होते...
चहा ,कॉफी ,थंड पेय
मग हलके हलके बाहेर आभाळाचे रंग बदलू लागले .जांभूळ रंग बदलू लागला .तांबूस छटा आभाळात मिसळू लागल्या
मग कधीतरी हलकेच खिडकीची झडप उघडली.
नि भळकन प्रकाश खिडकीतून घुसला .डोळे दिपून गेले. सगळे झोपेत होते.
हवाई सुंदरी लगबगीने जवळ आली. मंजुळ आवाजात किंचाळली -
"नका उघडू खिडकी. सगळे झोपलेत..!"
- Read more about ह्या खिडकीतून...[part-2]
- 4 comments
- Log in or register to post comments
- 5771 views
साडेसाती
Taxonomy upgrade extras
मला साडेसाती या विषयावरील अनुभव जाणून घेण्याची जिज्ञासा आहे म्हणून हा धागा. शिवाय लिंबूटिंबू यांच्या राशींच्या धाग्यावर कोणीतरी ज्योतिषाला अंधश्रद्धा म्हटले असल्याने वाईट वाटूनही हा धागा काढला गेला आहेच (खोटं कशाला बोलू). ज्या ज्या गोष्टी सहज सिद्ध करता येत नाहीत त्यांची लगेच अंधश्रद्धेत बोळवण होऊ नये. यावर जर कोणी विचारेल की - ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध कर तर मी आत्ताच हार मानते पण माझे काही अनुभव आहेत त्यावरून मी या शास्त्रावर श्रद्धा ठेवते.
आता मूळ मुद्द्याकडे ,साडेसाती बद्दल थोडेसे -
- Read more about साडेसाती
- 56 comments
- Log in or register to post comments
- 87314 views
आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?
Taxonomy upgrade extras
आभासी दुनिया ही काही नवीन कल्पना नाही. लहानपणी मायावी राक्षस, सुंदर पर्या, चेटकिणी आणि जादुगार यांच्या सोबतीने आपण या दुनियेत प्रवेश करतो. पुढे जसजसे मोठे होतो, तसतसे आपल्याला दोन्हीतल्या फरकाची जाणीव होते, आणि वास्तव व आभास यांच्यातली सीमारेखा आपण आपल्यापुरती निश्चित करतो ...किंवा करायचो असे म्हणूया. आंतरजाल आणि फेसबुक यांमुळे वाढत्या वयातली नवीन आभासी दुनिया तयार होत आहे. या दुनियेत प्रत्येकजण जादुगार आहे, स्वता:चे व्यंग, वय, दोष लपवून स्वता:हाला हवे तसे रंगवून स्वता:ची विक्री करण्याचे स्वातंत्र आहे. शिवाय ही जादू वापरून, मैत्री एकदम जोडता किंवा तोडताही येते.
- Read more about आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी?
- 40 comments
- Log in or register to post comments
- 32389 views
तुझ्यात मी
मी तुझ्या पावली
नाद जणु पैंजणी
चकोर मी अन्
तू शुक्राची चांदणी
मी तुझ्या डोळ्यात
एक थेँब पाण्याचा
गोड तुझ्या ओठात
मिच हसू यौवनाचा
मी तुझ्या गोडव्यात
गालावरची लाली
भव्य तुझ्या ललाटी
मी ऐटबाज टिकली
मी तुझ्या स्वप्नात
तुला कवेत घेताना
मी तुझ्या रडूत
प्रेमाने कुरवाळताना
मी कुठे नाही?
मिच ठायी तुझ्यात
नसानसात मी तुझ्या
मिच तुझ्या अणुरेणूत
मी न कधी एकला
तुझ्याविना पूर्ण होतो
तुझ्यात रमलेला मी
तुझ्यातच पूर्ण होतो...
- Read more about तुझ्यात मी
- 6 comments
- Log in or register to post comments
- 5339 views
सरणार कधी रण..?
सरणार कधी रण.... (येथे ऐका)
बाजीप्रभू उवाच - हे देवा, हे परमेश्वरा, कधी रे सरणार हे युद्ध..? अजून माझ्या शिरावर किती घाव बसणार आहेत ते तरी सांग एकदा..!
- Read more about सरणार कधी रण..?
- 8 comments
- Log in or register to post comments
- 9041 views
Partial Existence
Fantasy land मधे जेव्हा भुकंप होतात...
तेव्हा तोकडया झग्यातली एक किरीस्ताव म्हातारी,
माझ्या पायथ्याशी आशाळभुतपणे येऊन उभी रहाते!
माझ्यातलं काहीतरी काढुन नेते
काळ्या पिशवीत grams मधे ....
मी स्वताशीच हसतो
आणि शिव्या वगळुन sonnets गात रहातो
Macbeth च्या आवाजात....
जुन्या डायरीच्या आत दडवलेलं
गुलाबी symbolic असत्य
चोरट्या नजरेने उराशी कवटाळुन
मी fantasy land ची वाट धरतो...
वेशीपाशी दिसते अवजड विटांची भिंत!
त्यावर लटकलेली असंख्य घड्याळं.....
काळाला नागवु पहाणारी,
त्यांची स्थितप्रद्न्य निर्ल्लज्ज भुतावळ
वेड्या आशेने मी घेतॊही अंगावर ....
आधारासाठी चाचपडताना हाती लागतो,
- Read more about Partial Existence
- 14 comments
- Log in or register to post comments
- 10561 views
"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन अमेरिकन स्वामी"
तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं. असं असूनही 'द जर्नी होम' या नावाचं एक इंग्लिश पुस्तक माझ्या हाती पडलं आणि माझ्या उपरोल्लेखित वैशिष्ठ्याला न जागता मी या पुस्तकाचा अगदी फडशा पाडला.
"मुखपृष्ठ"
- Read more about "द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अॅन अमेरिकन स्वामी"
- 3 comments
- Log in or register to post comments
- 8157 views
अरे थिएटर थिएटर
कार्यालयीन कामाची काही पूर्तता आणि तत्संबंधीचे गुप्तता अहवाल देण्यासाठी कलेक्टर ऑफिसकडे चाललो होतो. कोल्हापुरातील रस्त्यांची दुर्दशा या विषयावर एका प्रबंधाइतपत लिखाण होऊ शकेल याची खात्री असल्याने ऑफिसची गाडी न घेता स्वतःच्याच होंडा पॅशनवरून त्या गर्दीच्या रस्त्याने अगदी स्नेल स्पीड म्हणावे अशारितीने जात होतो. मागे बसलेल्या सहकार्याकडे अहवाल-दप्तर होते. संभाजी पूल ओलांडल्यावर पुढे एस.टी.स्टॅण्डच्या दिशेने जाणारी के.एम.टी.ची बस होती. तिच्यामागूनच पॅशन चालली होती. वाटेत पुढचा बस स्टॉप होत.
- Read more about अरे थिएटर थिएटर
- 23 comments
- Log in or register to post comments
- 21903 views
'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार
सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- Read more about 'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार
- 21 comments
- Log in or register to post comments
- 27619 views
वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?
राम राम मंडळी,
मासिक धर्म सुरू होणं ही कुठल्याही मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना. निसर्गाने तिला बहाल केलेलं ते सन्माननीय स्त्रीत्व. आजच्या काळात मासिक धर्म सुरू होऊन जेव्हा एखादी मुलगी वयात येते, ते तिच्या आईशिवाय कुणालाच फारसं कळत नाही. फार तर तिच्या वडिलांना किंवा मोठ्या ताईला हे कळणं शक्य आहे. या व्यतिरिक्त ती घटना फारशी कुणाला कळावी किंवा तिचा गाजावाजा व्हावा असं त्यात विशेष काही नाही. ती एक नैर्सर्गिक गोष्ट आहे.
- Read more about वाजंत्री वाजतात, वाड्यात काय झालं?
- 13 comments
- Log in or register to post comments
- 12662 views