तुझ्यात मी

मी तुझ्या पावली
नाद जणु पैंजणी
चकोर मी अन्
तू शुक्राची चांदणी

मी तुझ्या डोळ्यात
एक थेँब पाण्याचा
गोड तुझ्या ओठात
मिच हसू यौवनाचा

मी तुझ्या गोडव्यात
गालावरची लाली
भव्य तुझ्या ललाटी
मी ऐटबाज टिकली

मी तुझ्या स्वप्नात
तुला कवेत घेताना
मी तुझ्या रडूत
प्रेमाने कुरवाळताना

मी कुठे नाही?
मिच ठायी तुझ्यात
नसानसात मी तुझ्या
मिच तुझ्या अणुरेणूत

मी न कधी एकला
तुझ्याविना पूर्ण होतो
तुझ्यात रमलेला मी
तुझ्यातच पूर्ण होतो...

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (4 votes)

प्रतिक्रिया

अशा प्रकारच्या कविता इकडचा तिकडचा बदल होऊन खूप पूर्वीपासून ढकलपत्रांद्वारे फिरत आहेत तेव्हा ही स्वतंत्र रचना मानण्यास कितपत सोयीचे असा विचार करतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

आशय शोधावा लागला मिळाला नाहीच....एकतर्फी प्रेमिक स्क्रिझोफेनिया झाल्यावर जी काही वायफळ बडबड करतो तसे काहीसे असावे... मला नुसती जुळवा जुळव दिसतेय....अर्थहिन काव्य...त्यात व्याकरणाच्या चुका (मिच आणि यौवनाचे नसुन यौवनाचा) यमक जुळवण्यासाठी धडपड...तुम्हाला स्वचिंतनाची गरज आहे. (मनावर घेऊ नका ,पण पुन्हा एकवार विचार करा काव्य सापडेल.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान कविता. जीयो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आशय समजला नाही. समजावुन सांगता आला तर कृपया सांगणे. मुख्यत शेवटच्या कडव्याचा अर्थ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“I am alone in the midst of these happy, reasonable voices. All these creatures spend their time explaining, realizing happily that they agree with each other. In Heaven's name, why is it so important to think the same things all together. ”
― Sartre

कविता वाचुन (आणखीन) वेडा झालो! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0