Skip to main content

‘दॉइशऽ वॉइशऽ

अकरावी बारावी झाली तसा रुढार्थाने ज्याला अभ्यास म्हणतात त्या गोष्टींशी संबंध सुटलाच. पानेच पाने भरवून वह्यांच्या खरेदीला निमित्त करायचे पण थांबले. बारावीपर्यंतच्या पेपरांच्या वेळी "सर पुरवणी" (काही हुच्चभ्रु गाबडे 'सब्लिमेंट' असे म्हणायचे पण त्या शब्दाचा योग्य उच्चार वा अर्थ हुडकायचेही कष्ट आम्ही कधी घेतले नाहीत.) असे पुकारा करत पेपर संपेपर्यंत कागदाच्या ढिगांना दोऱ्यात ओवायचे. आम्हाला फार आदर असल्या स्कॉलरांचा. लांबच ठेवायचो आदरापोटी त्यांना... असो.

ओळखलंत मला?

मला ओळखलंत?

आपलं पवित्र वगैरे कर्तव्य पार पाडून ज्याने सांड निवडून दिला होता त्या वळूनं परवा गोठा बदलला बघा..
..तो कर्तव्यदक्ष निवडकर्ता मीच

रात्रीचा दिवस करून, मर मर अभ्यास करून परीक्षा देऊन सुस्कारा सोडताना ज्याने फेर परीक्षेची सुवार्ता ऐकली बघा...
...तो सहनशील मीच

परवाच्या पावसात मुंबई स्पिरीटचा उद्धार करत तुम्बईतून जाताना धरणीने मॅनहोलमधून ज्याला पोटात घेतले बघा..
...तो स्पिरिटेड मीच

समूळ काँक्रिटलेले झाड धाराशायी होत असताना जो मध्ये तडफडला बघा...
..तो वृक्ष-सोयरा मीच

आरसा आणि माकडे

आरसा आणि माकडे
==============

लेखक  - चॅट्जीपीटी आणि डीपसिक

(टीप - मानवी मेंदूचा योग्य वापर केल्यास ए०आय० कडून दर्जेदार आशय/साहित्य निर्माण करून घेता येते, हे सिध्द करण्याचा हा एक प्रयत्न आहे.)
 

सौरव गांगुली : भारतीय क्रिकेटला छातीठोक आत्मविश्वास देणारा दादा

काही खेळाडू फक्त धावा करतात. काही सामने जिंकवतात. पण काही खेळाडू संपूर्ण पिढीची मानसिकता बदलून टाकतात. सौरव गांगुली हे अशाच दुर्मिळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक. आज त्यांच्या ५४व्या वाढदिवसानिमित्त “दादा”चा विचार केला की डोळ्यासमोर फक्त ऑफ साइडवरचे सुंदर फटके येत नाहीत; डोळ्यासमोर येतो तो एक असा कर्णधार, ज्याने भारतीय क्रिकेटला आत्मसन्मानाने जगायला शिकवले. वाढदिवसानिमित्त समस्त हत्ती परिवाराकडून सौरव गांगुलीला हार्दिक शुभेच्छा.

ए०आय० वंचितांची ऐशी तैशी

ए०आय० वंचितांची ऐशी तैशी
===============

सन २०३८...

अचानक शासनाने "मानवी स्वावलंबन (तात्पुरती कृत्रिम बुद्धिमत्ता विश्रांती) अधिनियम" जाहीर केला. अधिसूचनेत नमूद केले होते की नागरिकांनी सलग तीन महिने कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावयाचा नाही. कारण कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबित्वाची घंटाकृती वितरणरेषा (Bell Curve) अपेक्षित मध्यबिंदूपासून विचलित झाल्याचे केंद्रीय सांख्यिकी संचालनालयाच्या निदर्शनास आले होते. ती डावी कडे झुकणे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने चिंतेची बाब होती.

चतुर उपाय

'काॅर्न टिक्की' तराफा डागडुजीसाठी दिल्याने सिंधुआज्जींना विमानप्रवास करणे क्रमप्राप्त होते. त्या सुयोग्य वेळेत विमानतळावर आल्या, आणि सुरक्षारक्षकांची तपासणी करून आपल्या विवक्षित फाटकाजवळ पोहोचल्या.

तिथे अंमळ गर्दी होती आणि कोणाचाही पायपोस कोणाच्याही हातात नव्हता. तीनचार रांगा आपापसात पंधरा अंशांचा कोन करून निर्माण झाल्या होत्या. विद्युल्लतापात होताना जैसे भडभुंजे लाह्या भाजतात तसा एकच कलकलाट जाहला होता.

"सबूर!" सिंधुआज्जींनी सर्वांना दटावले. "काय झालं? तुमची गाऱ्हाणी मला सांगा," त्या कनवाळूपणे म्हणाल्या.

नास्तिकतेच्या पलीकडे

आस्तिकता-नास्तिकता या नेहमीच्या विचारव्यूहापलीकडे जाऊन स्वतः उन्नत होत समाजपरिवर्तनाच्या मूल्यांशी कसे जोडून घ्यावे याबद्दल केलेले मुक्तचिंतन.

"मुखवट्यांच्या मागे हरवलेली माणसं"

जगात जगण्यासाठी आपल्याला मुखवटा घालावाच लागतो. हा मुखवटा म्हणजे फसवणूक नाही, तर एक सामाजिक गरज आहे. मुखवटा आत्मसंरक्षणाची कवच-कुंडले आहेत. रंगमंचावर आणि सिनेमात काम करणारे कलाकार तर रोजच वेगवेगळे मुखवटे घालतात—कधी राजा, कधी भिकारी, कधी खलनायक, कधी देवता. पण हे मुखवटे केवळ अभिनयापुरते मर्यादित नाहीत. खऱ्या आयुष्यातही प्रत्येकजण मुखवटे घालून अभिनय करत असतो.

जनकवी पी. सावळाराम : मराठी मनाच्या घराघरांत पोहोचलेला गीतकार

मराठी भावगीतांच्या विश्वात काही नावे अशी आहेत की ती केवळ साहित्याच्या इतिहासात नाही, तर लोकांच्या मनात, स्मृतीत आणि दैनंदिन भावविश्वात कायमची वसलेली आहेत. पी. सावळाराम हे असेच एक तेजस्वी नाव. त्यांचे मूळ नाव निवृत्तीनाथ रावजी पाटील. ते गीतकार, भावकवी, समाजशील व्यक्तिमत्त्व आणि ठाण्याच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचे नाव होते. मराठी माणसाच्या आनंदात, विरहात, संसारात, आई-मुलीच्या नात्यात, भक्तीत आणि जीवनातील कोमल भावनांत त्यांच्या गीतांनी एक वेगळाच स्पर्श दिला. कुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ म्हणून गौरविले, ही गोष्ट त्यांच्या कवितेच्या लोकमान्यतेची मोठी साक्ष आहे.