Skip to main content

चाफा

जोजवितो कवितेला सृजन पाळणा
शब्द जन्मखुणा, अर्थ प्रसवाच्या वेणा

शेषामाथी पृथ्वी तसा कवितेचा तोल
शब्द केवळ कल्लोळ, अर्थ डोह खोल

भूल घाली कवितेची अविरत साद
पावश्याची हाक शब्द, अर्थ मेघनाद

ध्यानी मनी कवितेचा चाफा लपलेला
शब्द पानोपानी गेला, अर्थ दर्वळला

पत्र लिहीण्यास कारण की ...



 श्री० नरेन्द्र मोदी
पंतप्रधान
भारतीय संघराज्य

 

स० न० वि० वि०

 

 

पत्र लिहीण्यास कारण की सध्या देश ज्या मुद्द्यावर ढवळून निघाला आहे ते मुद्दे असे आहेत-


१. स्मार्ट मीटर
२. एथेनॉलयुक्त स्मार्ट पेट्रोल
३. राममंदिर दक्षिणेची चोरी
४. नीट परीक्षेतील गोंधळ
५. महाराष्ट्रातील भेसळ विरोधी कारवाई

नांगर

नांगर
===

- राजीव उपाध्ये


उषेने आपल्या पापण्या अजून पूर्ण उघडल्या नव्हत्या. दुरवर शुक्राची चांदणी अजुनही लुकलुकत होती. जणू ती पहाटेला निरोप देण्यासाठी थांबली होती.

डोंगरांच्या कुशीत झुळझुळणार्‍या नदीला धुक्याने अलगद मिठी मारली होती. पाण्यावर आकाशाचा फिकट निळा श्वास तरंगत होता. मधूनच एखादा बगळ्यांचा थवा शांतपणे पाण्याच्या आरशावरून सरकून जात होता.

त्या गूढरम्य शांततेत गुरु क्योमो आणि त्यांचा शिष्य त्सुकी लाकडी होडी नदीत उतरवत होते.

दोन सूक्ष्म कथा

दोन सूक्ष्म कथा 
=========

-राजीव उपाध्ये


कलाकार - युवाल रॉबिचेक

क्र०२


लेक बराच वेळ शांतपणे फोनमध्ये गढून गेली होती. 
तिला एक-दोनदा हाक मारली पण तरी तिने उत्तर दिले नाही
तेव्हा मी तिच्याजवळ जाऊन फोनमध्ये डोकावले

तर मॅडम मला लाईव्ह लोकेशन ट्रॅकींग करताना दिसल्या
ते पण उबेरवर 
फ्लाईट असती तर गोष्ट वेगळी होती

शेवटी मी न राहवून तिला विचारले
"हा काय नवा वेडपटपणा?"

तेव्हा मॅडम उसळून म्हणाल्या,

त्सुकीच्या निर्वाणाची गोष्ट

त्सुकीच्या निर्वाणाची गोष्ट
==============

- राजीव उपाध्ये

गर्द हिरव्या पर्वतराजींनी वेढलेल्या एका शांत दरीत, उंच बांबूंच्या बेटांमध्ये गुरु *क्योमो* यांचा लहानसा आश्रम विसावला होता. पहाटेचे धुके अजून विरळ झाले नव्हते. दूरवरून करकोच्यांची जोडी नदीवरून संथ उडत होती. पाण्याच्या प्रवाहाशिवाय दुसरा कोणताही आवाज नव्हता.


ध्यानाला बसण्यापूर्वी गुरु क्योमो म्हणाले,

"त्सुकी, नदीवरून पाणी घेऊन ये."

कायापालट

"रॅमसेचा शो बघितलायेस का?" चायनीज भेलचा बकाणा भरत मह्यानी विचारलं.

"ते जुने हाॅरर मूव्ही?"

"नाही रे. गाॅर्डन रॅमसेचा शो. म्हणजे हाॅरर इन इट्स ओन वे. हाॅटेलमधे शिळ्या भाज्या आहेत, नाहीतर माशा उडतायेत, असं कायतरी भेंजो. मग रॅमसे मालकाला आणि स्टाफला शिव्या घालतो, आणि हाॅटेलचा कायापालट करतो असं."

"पण ते आत्ता का आठवलं?"

"भेंजो या सद्गुरू स्टाॅलचा कायापालट करायला पाहिजे ना कोणीतरी!" मह्या सात्विक संतापाने बोलला.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील नवे पर्व

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील नवे पर्व

राजीव उपाध्ये

संदर्भ -https://www.scientificamerican.com/article/chatgpt-just-proved-another-…

भारतीयांची अस्मिता आणि उत्पादकता : चिंताजनक नातेसंबंध


*भारतीयांची अस्मिता आणि उत्पादकता : चिंताजनक नातेसंबंध*


-राजीव उपाध्ये

म०टा० पुणे चे संपादक श्री० श्रीधर लोणी यांचे नवे पुस्तक -  सत्योत्तर जगाची खबर - वाचनात आल्यावर एक विचार पुन:पुन: अस्वस्थ करू लागला - "भारतीयांची अस्मिता त्यांच्या उत्पादकतेच्या व्यस्त प्रमाणात जागृत झाली आहे का?"

कुंभमेळा असाही एक

कुंभमेळा असाही एक

https://www.youtube.com/watch?v=Qly3TOg0sWU

आजच सकाळी ही बातमी वाचल्यावर आपल्या कुंभमेळ्याची आठवण झाली. काही प्रथा जगभर/सार्वत्रिक असतात, फक्त तपशीलात थोडाफार फरक

एल एल एम

मी आणि प्रकाश त्याला आम्ही पक्या म्हणतो जिवा भावाचे मैतर. माणसाचे सावलीशी जे नाते तेच आमचे पण, कधी तो सावली तर कधी मी सावली.
पक्या म्हणजे आडमाप माणूस, आम्ही दोघेही कसेबसे. कसेबसे जगणारे, आमचे सगळे कसेबसे. कशीबशी परीक्षा पास करणारे. कशीबशी पदवी मिळवली. नोकरी धरसोड करत अखेर एका ठिकाणी बूड स्थिरावले.