करोना

जंतूंचा नायनाट का त्यांच्याशी अटळ सह-अस्तित्व?

आपल्या जन्मापासून वेगवेगळ्या प्रकारचे विषाणू, जिवाणू यांची आपल्याला लागण होत असते आणि आपले शरीर त्यांचा मुकाबला करत असते. पण अनेकदा हे आपल्या नकळत होते. बहुतांश वेळा जंतुलागणीमुळे आपल्याला त्रास किंवा आजार होत नाही. आपल्या नकळतच शरीर त्यांचा बंदोबस्त करते, आपले संरक्षण करते. मग जंतूंचा नायनाट करण्याची कितपत गरज आहे?

साद प्रतिष्ठान : करोना टाळेबंदीत अन्नवाटप

टाळेबंदीच्या काळात काही लोक अत्यंत निरपेक्ष आणि निरलस वृत्तीने स्थलांतरित कामगारांच्या सोबत काम करत होते. ‘साद प्रतिष्ठान ट्रस्ट, पुणे’ यांच्या कामाची ओळख करून घेण्यासाठी 'ऐसी अक्षरे'ने त्यांची मुलाखत घेतली.

व्हायरस, करोनाव्हायरस, आणि इतर काही – डॉ. योगेश शौचे

व्हायरसविषयी संशोधन करणारे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांच्याशी 'ऐसी अक्षरे'ने करोनाव्हायरसच्या निमित्ताने संवाद साधला. व्हायरसविषयी, विशेषतः करोनाव्हायरस आणि सध्याच्या साथीविषयी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. योगेश शौचे यांनी सोप्या शब्दांत, विद्वत्तापूर्ण आणि दिलखुलास उत्तरं दिली.

बखर....कोरोनाची (भाग ७)

इतिहास घडतोय, आपल्यासमोर... वेगाने, इतक्या की गेल्या महिन्यात काय होते हे आपण आज कदाचित विसरणार आहोत. म्हणून आज घडणारा इतिहास, आपल्याला दिसेल तसा इथे नोंदवत जाऊयात का? हिस्टरी ऑफ द प्रेझेंट लिहुयात ? इथेच, या धाग्यावर? बखर वगैरे म्हणजे काय असतं ? हेच ना? चला, जशी दिसेल तशी, कळेल तशी ,कुठल्याही विषयावर कोरोना साथीमुळे झालेल्या बदलांची नोंद करूयात आणि लिहुयात.

करोनाव्हायरस, लस आणि आपण सगळे - डॉ. राजीव ढेरे (भाग १)

सीरम इन्स्टिट्यूट जगातली व्हॅक्सिन तयार करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. सर्वसामान्य माणसाच्या मनात ज्याची उत्सुकता मोठ्या प्रमाणावर आहे तो प्रश्न म्हणजे कोरोनाची लस सर्वसामान्य लोकांच्याकरता बाजारात कधी उपलब्ध होणार? या आणि इतर तांत्रिक प्रश्नांची उत्तरं देत आहेत सीरम इन्स्टिट्यूटचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर डॉ. राजीव ढेरे.

करोना आणि धारावीची गोष्ट - डॉ. अवनी वाळके

धारावीत मार्चअखेरीलाच कोरोनाच्या धोक्याची घंटा वाजू लागल्यावर महापालिकेचा मास्टर प्लान तयार होऊ लागला. धारावीतला एक-एक माणूस तपासता यावा याकरता ‘स्क्रिनिंग टीम्स’ (तपास गट) बनवायचं ठरवलं. या स्क्रिनिंग टीममध्ये सहभागी आणि धारावीत प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर अवनी वाळके यांचा अनुभव.

लॉकडाऊनसे क्या होता है? - कल्याण-डोंबिवलीचे उदाहरण भाग १

Taxonomy upgrade extras: 

लॉकडाऊनचा कोव्हिड-केसेसच्या आकड्यांवर होणाऱ्या परिणामाचं विश्लेषण.

कल्याण-डोंबिवलीत २ जुलैपासून सुरू असलेले लॉकडाऊन १९ जुलैला संपणार आहे. ह्याआधी ते १२ जुलैला संपणार होते. पण ११ जुलैला ते अजून सात दिवस वाढवले गेले. ११ आणि १२ जुलैला अनुक्रमे ६१५ आणि ६६१ केसेस आल्याने हा निर्णय योग्यच वाटला. त्यानंतर २ दिवस, सोमवार १३ जुलै, मंगळवार १४ जुलै, केसेस पडत्या होत्या, अनुक्रमे ४२७ आणि ३३६. मग मग २ दिवस त्या परत वाढत आहेत. शुक्रवार-शनिवारी (१७-१८ जुलै) महानगरपालिका लॉकडाऊन वाढवायचा कि नाही हा निर्णय घेईल.

करोना साथीचे मध्यम वर्गावरील परिणाम

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे विविध समाजगटांवर आणि व्यवसायांवर होणारे परिणाम यांचा अनेक लोक अभ्यास करत आहेत आणि करोनोत्तर जगात काय बदल होतील याचाही अंदाज करण्याचा प्रयत्न चालू आहेत. मध्यमवर्गीयांची आयुष्यातली गृहीतके आणि त्यात करोना मुळे होत असलेले बदल काय आहेत?

१५ ऑगस्टला करोना लस उपलब्ध? - डॉ. मृदुला बेळे

आपली ‘स्वदेशी’ लस स्वातंत्र्यदिनाला येणार म्हणून जनता कृतकृत्य झाली आहे. तर अनेक डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ मात्र इतक्या कमी कालावधीत ही लस येणं अशक्य आहे, असं म्हणत आहेत. या पार्श्वभूमीवर जरा या दाव्यांची सत्यासत्यता तपासून पाहण्यासाठी हा लेखप्रपंच.

कोविड काळातली निरीक्षणं, अनुभव (भाग २)

WFH

मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात भारतात टाळेबंदी घोषित झाली आणि घराघरांमध्ये उलथापालथ झाली. सकाळी उठून डबा घेऊन नोकरीवर/शाळेला जाणे अचानक बंद झाले. घरातील सगळे सदस्य २४ तास घरात राहू लागले. याचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा परिणाम झाला.

पाने

Subscribe to RSS - करोना