करोना

कोविड काळातली काही निरीक्षणं, अनुभव

करोनाचे परिणाम अनेक क्षेत्रांत दिसत आहेत. पत्रकारिता, शिक्षण, नोकरी, अशा विविध क्षेत्रांत काही लोकांना आलेले हे अनुभव.

करोनाकाळातील वस्त्रहरण

“Torture the data, and it will confess to anything.” – Ronald Coase (British Economist and author)
आंतरजालीय माहितीचा विस्फोट झाल्यानंतर आलेली पहिली साथ म्हणून आपण या कोरोनाच्या साथीकडे बघू शकतो. त्यामुळे कोरोना आणि माहिती अशा दोन साथींना आपल्याला एकत्रित तोंड द्यावे लागते आहे. अशा प्रसंगी अधिकृत व विश्वासार्ह माहिती देणाऱ्या स्रोतांचे वस्त्रहरण कसे झाले ते सांगताहेत डॉ. अनिल जोशी.

करोना : आज ‘मास्क’वर बोलू काही...

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जात आहेत तेव्हाच सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अनेक कारणांनी मास्क वापराच्या संदर्भात उलटसुलट मतप्रवाह प्रसृत झाले आहेत. प्रस्तुत लेखात मास्कचं महत्त्व सोप्या शब्दांत मांडायचा प्रयत्न केला आहे.

पत्रकारांच्या नोकऱ्या जाताहेत

गेल्या तीन महिन्यांत दैनिकांची छपाईच बंद झाली, त्यामुळे खप नाही, जाहिराती नाहीत आणि उत्पन्न नाही म्हणून खर्च कमी करा हे धोरण राबवले जात आहे. लॉकडाउन संपल्यावर ताबडतोब दैनिकांचे उत्पन्न पुन्हा मूळपदावर येईल, अशी शक्यता नाही परंतु म्हणून अशी कत्तल करणे, हे मात्र माणुसकीला धरून नाही.

सवाल-जवाब करोनाचा, विथ वऱ्हाडी ठेचा!

करोनाविषयी लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. अशाच काही प्रश्नांची खुमासदार उत्तरं खास विदर्भाच्या ठसक्यासह! लिहिली आहेत 'मालामाल वीकली' आणि 'भूलभुलैय्या' सारख्या गाजलेल्या सिनेमांच्या लेखिका मनीषा कोरडे यांनी.

Taxonomy upgrade extras: 

डीकोडिंग स्पॅनिश फ्लू (भाग २)

‘स्पॅनिश फ्लू’चा विषाणू इतका जहाल कसा बनला, त्याने इतका विध्वंस कसा केला, असे अनेक प्रश्न संशोधकांना भेडसावत होते. त्यातूनच एक अफलातून कल्पना बाहेर आली. ती प्रत्यक्षातसुद्धा उतरली, पण त्यासाठी तब्बल ८० वर्षे उलटावी लागली. काय होती ही कल्पना?
लिहिताहेत, राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेतील (NCCS) वरिष्ठ संशोधक प्रा. योगेश शौचे.

सरकारी खाक्या शेतकऱ्याच्या मुळावर...

सध्या पुणे, मुंबई आणि अन्य शहरांतून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. यातील एखादा जरी करोनाबाधित सापडला की सायरन वाजवत गाड्या गावात घुसतात. बाधिताला उचलतात आणि गावात येणारे सगळे रस्ते सील करतात. अख्ख्या गावाला घरात बसायला सांगितलं जातं. करोनावर ‘लॉकडाउन’ हा सरकारी उतारा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात असल्याने गावंच्या गावं जेरबंद होताहेत. खरीपाचे काउंटडाउन सुरू असताना असं घरात बसून राहणं शेतकऱ्यांना प्रचंड त्रासदायक ठरत आहे. अशा काळात योग्य नियोजन केलं नाही तर यंदाची शेतीही महापुरासारखी पाण्यात जाण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियात करोना - एक टाईमलाईन

मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. त्यांच्याकडून मिळालेली एक रोचक टाईमलाईन -

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर...?

फार थोड्या ठिकाणी नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसते आहे. किंबहुना बहुतेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल होणं, आणि रुग्णसंख्या वाढणं हे बरोबरीने होत आहे. देश ‘खुला’ करून आपण व्हायरसच्या आगीत तेल ओतणार आहोत. आपल्याला आवडो न आवडो, हे घडणारच आहे. त्यामुळे धोका कमी कसा करायचा यासंबंधी मार्गदर्शन करायचा इथे प्रयत्न केला आहे.

पाने

Subscribe to RSS - करोना