ऑस्ट्रेलियात करोना - एक टाईमलाईन

मूळच्या पुण्याच्या आणि आता सिडनीवासी असलेल्या योगिनी लेले यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे व त्याच क्षेत्रात काम करतात. त्यांच्याकडून मिळालेली एक रोचक टाईमलाईन -

तारीख घटना
१२ डिसेंबर २०१९ वूहानमधे नॉव्हेल व्हायरसची पहिली केस
७ जानेवारी २०२० नवीन व्हायरसची चीनकडून अधिकृत घोषणा, नवीन व्हायरसचे नाव २०१९-nCoV.
९ जानेवारी कोरोना व्हायरससंबंधी पहिल्या मृत्यूची नोंद , वूहानमधील एक ६१ वर्षीय पुरुष.
२० जानेवारी चीनकडून अधिकृत माहिती प्रसारित : व्हायरस अत्यंत संसर्गजन्य. महासाथ पसरू शकते.
२० जानेवारी ऑस्ट्रेलियाच्या बायोसिक्युरिटी ॲक्ट (२०१५) मध्ये नॉव्हेल कोरोना व्हायरसची नोंद . यामुळे ऑस्ट्रेलियाला आपल्या देशांत येणाऱ्या परदेशी प्रवाशांबद्दल वेगळे नियम बनविणे शक्य
२३ जानेवारी वूहानबद्दल लेव्हल तीनची प्रवाससूचना. "अत्यंत गरजेचे असल्याशिवाय वूहानला प्रवास करू नका "
मास स्क्रिनिंग आणि तापमान चाचणी स्क्रिनिंगचा (रोगप्रसार रोखण्यास) उपयोग होतो अशी नक्की आणि पुरेशी माहिती / पुरावा पुढे न आल्यामुळे एअरपोर्टवर मास स्क्रिनिंग आणि तापमान चाचणी सुरू नाही
२४ जानेवारी लेव्हल चारची प्रवाससूचना : "वूहानला आणि हुबेई प्रांताला प्रवास करू नये"
२५ जानेवारी ऑस्ट्रेलियातील पहिल्या कोरोना व्हायरससंबंधित पेशंटची नोंद. वूहानमधून १९ जानेवारीला मेलबोर्नमध्ये आलेला प्रवासी.
अजून तीन केसेसची सिडनीमधे नोंद. तिघेही वूहानवरून सिडनीला अनुक्रमे ६ जानेवारी, १९ जानेवारी आणि २० जानेवारीला आले होते.
२७ जानेवारी न्यू साऊथ वेल्समध्ये अजून एक पेशंट. ऑस्ट्रेलियातील एकूण पाचवा पेशंट.
नवीन रोग किती संसर्गजन्य आहे याबद्दल हुबेईमधून नक्की माहिती/पुरावे मिळत नसल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांचे विलगीकरण नाही. फक्त पेशंटच्या संपर्कात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना १४ दिवस सक्तीची सुट्टी.
२८ जानेवारी ऑस्ट्रेलियात रोगप्रसार / संसर्ग झाला आहे किंवा कसे याबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे मास्क वापरणे बंधनकारक नाही.
सद्यस्थितीत विलगीकरण करणे गरजेचे नाही असा समज
प्रवासी सूचना : "चीनला जायचे असेल तर : पुनर्विचार करा"
२९ जानेवारी कोरोना पॉझिटिव्ह केसेसच्या संपर्कात आलेल्यांना १४ दिवस होम क्वारंटाईन असा निर्णय
मात्र (हुबेई सोडून उर्वरित) चीन किंवा जगाच्या इतर भागांतून येणाऱ्या प्रवाशांना स्व-क्वारंटाईन सक्तीचे नाही.
३१ जानेवारी WHOने 'कोरोनाची जागतिक महासाथ आली आहे' अशी घोषणा केली. महासाथ अत्यंत गंभीर असे प्रतिपादन.
१ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियन नागरिक वगळता चीन मधून येणाऱ्या इतर कोणाही प्रवाशाला ऑस्ट्रलियात येण्यास बंदी. प्रवास सूचना चार बदलली. ऑस्ट्रेलियन नागरिकांना चीनमध्ये प्रवास करण्यास बंदी.चीनमधून परत येणाऱ्या प्रवाशांचे १४ दिवस विलगीकरण सक्तीचे.
२ फेब्रुवारी ऑस्ट्रेलियात एकूण १४ पेशंट्सची नोंद. (जागतिक स्तरावर १४५६१ केसेस, ३०५ मृत्यू. २.०९ % मृत्युदर )
३ फेब्रुवारी वूहानमधे अडकलेल्या २४३ ऑस्ट्रेलियन नागरिकनांना मायदेशी आणण्यासाठी रवाना झालेल्या क्वांटासच्या फ्लाईटचे आगमन.
४ फेब्रुवारी चीनवरून येणाऱ्या सर्व फ्लाईट्स फ्लाईट्स रद्द
२९ फेब्रुवारी फेब्रुवारीत १३ नवीन केसेसची नोंद
१ मार्च इराणवरून येणाऱ्या सर्व फ्लाईट्सना बंदी
२ मार्च ऑस्ट्रेलियात कोरोनासंबंधित रोगामुळे पहिला मृत्यू
११ मार्च इटलीहून येणाऱ्या सर्व फ्लाईट्सवर बंदी
१६ मार्च पाचशेहून जास्त लोकांना (आऊटडोअर कार्यक्रमानिमित्त) एकत्र येण्यावर निर्बंध
१७ मार्च परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना स्व विलगीकरण करणे बंधनकारक. क्रूझ शिप्सना कुठल्याही ऑस्ट्रेलियन बंदरात येण्यास तीस दिवस बंदी. इनडोअर कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त १०० लोकांना एकत्र येण्याची मर्यादा.
२० मार्च ऑस्ट्रेलियात येण्यास बिगर-ऑस्ट्रेलियन लोकांना बंदी
२४ मार्च पब्स, क्लब्स बंद. रेस्टॉरंट्समध्ये फक्त 'टेक अवे'ला परवानगी.
२५ मार्च ऑस्ट्रेलियन नागरिकांना परदेशी जाण्यास मनाई.
२६ मार्च चाचण्या करण्याचा निकष बदलला (ज्यायोगे जास्त चाचण्या करता येतील)
२८ मार्च बाहेरून आलेल्या सर्व प्रवाशांचे हॉटेल्स मध्ये सक्तीचे विलगीकरण
३० मार्च फक्त दोन लोकांना एकत्र येण्यास परवानगी (जसे आपल्याकडे १४४ कलम लागू केले की ही मर्यादा चार लोकांची असते)
फक्त गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे निर्देश
३१ मार्च मार्च महिन्यात ४,६७९ नवीन केसेस, २० मृत्यू
३० एप्रिल एप्रिल महिन्यात २,०५२ नवीन केसेस
८ मे निर्बंध सैल : एका वेळी एका(च) कुटुंबाला दुसऱ्याच्या घरी जाण्यास आणि भेटण्यास परवानगी
१० मे ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी कोरोनामुक्त असे जाहीर.
१५ मे साऊथ ऑस्ट्रेलिया कोरोनामुक्त. निर्बंध सैल. रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये जास्तीत जास्त दहा लोकांना परवानगी . सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक.
आऊटडोअर : दहा लोकांपर्यंत लोकांना एकत्र येण्यास परवानगी. इनडोअर : जास्तीत जास्त पाच लोकांना एकत्र येण्यास परवानगी. लग्न समारंभ असेल तर दहा निमंत्रित लोकांना परवानगी.
मृत्यू / अंत्यदर्शन / अंत्यसंस्कार यासाठी इनडोअर २० आणि आऊटडोअर ३० लोकांना एकत्र येण्यास परवानगी. चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम असेल तर दहा लोकांपर्यंत एकत्र येण्यास परवानगी.
२१ मे २१ मे अखेरपर्यंत : ७०९५ केसेसची नोंद , १०१ मृत्युमुखी, २२८ पेशंट्स हॉस्पिटलमध्ये, २८ पेशंट्स व्हेंटिलेटरवर, ६४७९ रोगी बरे झाले. एकूण चाचण्या : ११,७०,६८२
ऑस्ट्रेलियात कोरोना
field_vote: 
0
No votes yet