गद्य

वजाबाकी

आज परत तिची तीव्रतेने आठवण येत होती. आयुष्याच्या या वळणावर आपण किती एकटे आहोत हे स्वत: ला जाणवत होते. आयुष्य सगळे द्वेष करण्यात गेले. पैसे असले तर सगळे साथ देतात पण पैसे नसल्या वर माणसाची खरी किंमत कळते.

ललित लेखनाचा प्रकार: 

जंटलमन्स गेम ३ - इंडेक्स फिंगर!

क्रिकेट हा खेळ जसा बॅट्समन, बॉलर्स आणि फिल्डर्सचा आहे तितकाच, कदाचित किंचीतसा जास्तं असा अंपायर्सचा आहे. अंपायरच्या वर केलेल्या किंवा न केलेल्या बोटामुळे अनेक मॅचचे रिझल्ट्स पूर्णपणे बदलू शकतात! आजच्या डीआरएस च्या जमान्यात तंत्रज्ञान इतक्या उच्चकोटीला गेलेलं असतानाही अंपायर्सविना क्रिकेटच्या खेळाची कल्पना करणं निव्वळ अशक्यंच आहे. अर्थात आता तंत्रज्ञानामुळे अनेकदा अंपायरची अगदी मोहरीच्या दाण्याइतकी क्षुल्लकशी चूकही भोपळ्याएवढी मोठी करुन त्याच्या पदरात घातली जात असली तरी अखेर अंपायर हा देखील माणूसच आहे आणि कधीतरी तो देखील चुकू शकतो हे मात्रं सोईस्कररित्या विसरलं जातं.

ललित लेखनाचा प्रकार: 

वडखळ, पळी, कोर्लई, तिसऱ्या आणि सासवने

'वरच्या' कोंकणात मित्रांना घेऊन जायचे कबूल करून दशके लोटली. एवढ्याएवढ्यात मी एकटाच काही खाजगी कामांनिमित्त पनवेल-पेण-रोहा-पाली-माणगांव अशा चकरा मारतोय म्हणताना गेली एकतीस वर्षे मला झेलणारा उमेश चेकाळला. नुकताच त्याने इनोव्हा नामक मिनि-ट्रक खरेदी केला होता.
"हे बघ, फॅमिलीला नळस्टॉपला नेण्यासाठी इनोव्हा घेतलेली नाहीय्ये. तू भोसडिच्च्या एकटाएकटाच जाऊन येतोस तर पुढच्या वेळेला मीपण येणार. सकाळी चारला निघायचं का, तर तसं सांग. झोपायलाच ये रात्री माझ्याकडे. सेलमध्ये तीन बर्मुडा घेतल्या आहेत त्यातल्या दोन तशाच कोऱ्या आहेत. त्यातली एक वापर, दुसरी घेऊन जा" उम्या बरसला.

ललित लेखनाचा प्रकार: 

संकटकालिन खिडक्या...

पडद्यावर चित्रपट सुरू आहे, पण प्रेक्षकांना काही देणंघेणं दिसत नाहीये... थिएटरमध्ये गच्च काळोख भरून राहिला आहे... कुणी ओळखीचा माणूस प्रेक्षकांमध्ये असला तर त्याने आपल्याला ओळखू नये, यासाठी तो अंधार महत्त्वाचा भूमिका बजावतो आहे... थोडक्यात, अंधारामुळे तोंड लपवून फिरण्याची गरज नाहीये. सोबतीला एक अगम्य कुबट वास. पडदा पण फाटलेला... हजर असलेले प्रेक्षक कोपऱ्याच्या ‘सीटा’ पकडून आहेत... त्यात आपल्या शारीरिक गरजांचे काय करावं, हे न समजून तिथे आलेले काही टीनएजर्स, कचरा वेचणारे लोक आणि तत्सम खालच्या आर्थिक वर्गातून आलेले लोक यांचाच मुख्यत्वे प्रेक्षकांमध्ये समावेश आहे...

ललित लेखनाचा प्रकार: 

सल

आज आनंदी बाई खुपच गडबडीत होत्या. कारण त्यांच्या पिऊचा आज वाढदिवस होता. जोरात तयारी चालली होती. सुषमा त्यांना सूचना देत होती. घराची सजावट पूर्ण होत आली होती. तेव्हड्यात पिऊ धावत आली. आनंदी बाई ने तिला कडेवर उचलले. पिऊ लगेच त्यांना बिलगली. संध्याकाळी 6 ला कार्यक्रम सुरू झाला. सुषमा-अजय अगत्याने सगळी कडे लक्ष्य देत होती. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सोसायटीतील लहान मुले आणि मुली आली होती. केक कटिंग, गेम्स झाल्या नंतर छोटासा फराळ होता. आनंदी बाई किचन मध्ये काम करत ओळखीच्या लोकांना भेटत होत्या. पिऊचे सर्व आवडते लोक आनंदी बाईच्या सुध्दा आवडीचे होते.

ललित लेखनाचा प्रकार: 

टॉम ग्रेव्हनी - महा 'हलकट' माणूस!

१९५१ सालचा डिसेंबर महिना...

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडीयमवर भारत - इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती...

ललित लेखनाचा प्रकार: 

देव्यपराधक्षमापन स्तोत्र

आदि शंकराचार्यांचे देव्यपराधक्षमापन स्तोत्र वाचल्यानंतर बराच वेळ मनात हे विचार येत राहिले.
.
न मंत्र नो यंत्रं तदपि न जाने स्तुतिमहो,
न चाव्हानं ध्यानं तदपि च न जाने स्तुति कथाः।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं,
परं जाने मात्स्तवदनुसरणं क्लेशहरणं॥१॥
.
(हे माते, मला ना मंत्रांचे ना तंत्रांचे ज्ञान आहे. तुझी स्तुती, आवाहन किंवा ध्यान कसे करावे याविषयी मी अनभिज्ञ आहे. ना मला योगमुद्रा येतात ना विलाप करून, टाहो फोडून, आरतीने तुला बोलविता येते. पण मला एक नक्की समजते की तुला अनुसरले, तुझ्या मागे मागे , तुझ्या पावलावर पाऊल टाकून फिरले की माझे क्लेश दूर होतात. )
.

ललित लेखनाचा प्रकार: 

जीपीएस-माता

"आयुष्याला काही दिशा असली पाहिजे. आजचा दिवस नोकरी आणि कॅफेत गेला. कालचा दिवसही तसाच गेला, उद्याही तसाच असणार आहे. पण महिनोन्‌महिने हेच करायचं आणि साठ वर्षं झाल्यावर घरी बसून त्या दिवसांच्या आठवणींचे कढ काढत बसायचं. हे असं तुमचं आयुष्य आहे, आणि असेल. तुम्ही लोक तुमचं आयुष्य फुकट घालवता हे मला अजिबात बघवत नाही. तुमचा मित्र म्हणून माझीही काही जबाबदारी आहे…." रोहन बराच वेळ बोलत होता. आम्ही कॅफेत बसलो होतो. समीर नेहेमीप्रमाणे शून्यात नजर लावून बघत होता. रोहनच्या डोक्याच्या मागे, काचेआड मला पाय दिसत होता. अॅपल पाय.

ललित लेखनाचा प्रकार: 

जोड्याची ताटातूट

मधुराच्या घराची बेल दाबायची म्हणजे का कोण जाणे नेहेमी माझा हात क्षणभर अडखळतो. तसा आजही तो अडखळला. तिच्या घरात शिरलं की माझी चेष्टा, मानहानी करणं असले प्रकार ती करते. त्यामुळे मी बेल वाजवली की आज ती काय म्हणणार असा प्रश्न पडलाच होता. त्याचं उत्तर लवकरच मिळालं.

ललित लेखनाचा प्रकार: 

बलात्कार

एक काळ होता - जेव्हा सुंदर स्त्रीला "विधुमुखी" म्हटले जायचे, तो काळ उलटला. कविंच्या हृदयाला प्रेयसी ही "माहताब", "शशीमुखी" वाटायची. तिचे प्रेमात तेजाळणे या वेड्या कविंना नभोदीपाची, चंद्राची आठवण करुन द्यायचे. चंद्रावर कलंक आहे डाग आहे जो तुझ्या मुखावर नाही असे काव्य रचले जायचे.
.
तो काळ होता जेव्हा चंद्र हा लहान मुलांचा "मामा" होता.
"चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !" गाणे प्रत्येक मराठी लहान मुलाने एके काळी ऐकलेले-गायलेले असायचे.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य