गद्य

तपश्चर्या ऑउटसौर्स – कथा सत्यव्रताची

आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. सौप्या भाषेत, आपली कामे दुसर्या कडून करवून घेणे म्हणजे ऑउटसौर्स. जगाला नवीन असली तरी आपल्या देश्यात ऑउटसौर्सची परंपरा फार जुनी आहे. पण ऑउटसौर्सचा कधी कधी काय परिणाम होतो....

ललित लेखनाचा प्रकार: 

स्वच्छतेचा चष्मा- एक रूपक कथा

सिंहासनावर विराजमान अवंती नरेश विक्रमादित्यचे डोके भडकलेले होते, ते रागाने राजसभेत बसलेल्या सभासदांवर डाफरत होते, आज सकाळी राजवाड्या बाहेर फिरायला गेलो होतो. सहज म्हणून अवंती नगरीचा फेरफटका मारला. नगरात जागो-जागी कचर्याचे ढिगारे आणि घाणीचा उग्र वास पसरलेला होता. कसे राहतात आपले प्रजाजन डुक्करांसारखे या घाणीत, सहन होत नाही मला, आता असे चालणार नाही. काही ही करा मला पुन्हा कधी नगरीत घाण दिसता कामा नये. पण एक लक्ष्यात ठेवा, प्रजेला आर्थिक स्वरूपाचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि सरकारी तिजोरीला ही फटका बसला नाही पाहिजे. प्रधानमंत्री म्हणाले असेच होईल महाराज.

ललित लेखनाचा प्रकार: 

चंदाची प्रेम कहाणी

चंदाचे ऑफिस नवी दिल्लीत कश्मीर हाउसच्या जवळ होते. चंदाला चांगलेच आठवते, तो शुक्रवारचा दिवस होता. त्याचाच कार्यालायातली ती म्हणजे चांदनी पहिल्यांदाच त्याच्या केबिनमध्ये त्याला भेटायला आली. चांदनीला ऑफिसमध्ये सर्व ऐश्वर्या राय म्हणायचे, मध्यम बांधा, गोरा रंग, मोठे डोळे, सोनेरी लांबसडक केस आणि माधुरी दीक्षित टाईप कोलगेट स्माईल. कोण फिदा नाही होणार तिच्यावर. त्याच्या सारखे कित्येक तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करायचे. पण ती कुणालाच भाव द्यायची नाही. तिला पाहताच चंदाच्या हृदयाचे ठोक वाढले. त्याच्या तोंडून एवढेच निघाले, काय सेवा करू आपली.

ललित लेखनाचा प्रकार: 

समलिंगी विवाहास मान्यतेचा निर्णय - शुभेच्छुकांचे आभार

जून २६, २०१५ तारखेला यू. एस. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला. कोर्ट म्हणाले, की दोन व्यक्ती एकाच लिंगाच्या असल्या तरी त्यांना कायदेशीर विवाह करण्याचा हक्क आहे. असे विवाह जरी पारंपरिक नसले, तरी विवाहाची चौकट सदैव बदलत आहे हे कोर्टाने लक्षात घेतले. या बदलत्या चौकटीला कोर्टाने घटनेतच स्पष्ट सांगितलेले मूलभूत हक्क लागू केले. त्या आधारावर कोर्टाने निर्णय दिला.

ललित लेखनाचा प्रकार: 

रामायण कथा - वाली पत्नी तारा -एक कुशल राजनीतीज्ञ

वाली पत्नी तारा, रामायणातील एक प्रखर व्यक्तित्व आहे. किष्किंधा नगरीची सम्राज्ञी तारा सौंदर्यवती तर होतीच, पण त्याच बरोबर वाकपटू आणि कुशल राजनीतीज्ञ ही होती. म्हणूनच वाल्मीकि ऋषींनी तिला रामायणातल्या सर्व स्त्रियांत सर्वात जास्त महत्व दिले आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

सॅन अँटॉनिओ - गुरुद्वारा - अनुभव

पिडा यांनी अदितीच्या धाग्यावरती हा सुंदर प्रतिसाद दिलेला वाचला अन टेक्सासमधील काही स्मृतींना उजाळा मिळाला. तो या धाग्यात मांडते आहे.
.

ललित लेखनाचा प्रकार: 

मी आणि परी

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी.

ललित लेखनाचा प्रकार: 

टेक्सासात एका रविवारी

गेला महिनाभर मध्य टेक्ससच्या वाळवंटाला पावसाने झोडपून काढल्यावर आमच्या शहराला पाणी पुरवणाऱ्या एका तलावाची उंची ३८ फूटांनी वाढली. ते वाढलेलं पाणी बघणं हे करदात्या, परदेशी रहिवाश्याचं आद्य कर्तव्य समजून बऱ्या अर्ध्याने शुक्रवारी प्रस्ताव मांडला; "या रविवारी लेक ट्रॅव्हिसला जाऊया पाणी बघायला?" उनाडायचं म्हटल्यावर मी लगेचच होकार दिला, "पण सकाळी लवकर जाऊया. बारा वाजेपर्यंत परत आलेलं बरं."

ललित लेखनाचा प्रकार: 

पालकत्व!

उन्हाळी-दिवाळीच्या सुट्टीत, शाळकरी ५वी ते ८-९वीतील सगळ्या भावंडांनी कुणा एका घरी एकत्र जमायचे, मज्जा करायची व नंतर पुढले घर गाठायचे त्या दिवसांतील ही गोष्ट! आमच्या शेजारी रहाणारे काही काका बिड्या फुंकत असत. संभाजी छाप असं त्यातील एक नाव व गुलाबी कागद गुंडाळलेली बिड्यांची पुडी - विमकोची काडेपेटी अशी जोडी आठवते. त्यांचा वास आजही नाकात भरलेला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

शतशब्द कथा - दोन किनारे

एका दुसर्याच्या हातात-हात गुंफून हसत-खेळत, पाण्यात भिजत, दोन किनारे पाण्यासहित समुद्राला जाऊन सहज भेटले असते. पण दोन्ही किनारे श्रेष्ठत्वाच्या वाळवीने ग्रसित होते. डाव्या किनाऱ्याला वाटायचे, त्यालाच समुद्राकडे जाणारा रस्ता माहित आहे. उजव्या किनाऱ्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्याला वाटायचे, सोपा सरळ मार्ग त्यालाच माहित आहे. त्यांच्या आपसातला विवाद आणि कलह शिगेला पोहचला. एक किनारा पूर्वीकडे वळला तर दुसरा किनारा पश्चिमेकडे. पाणी मृगमरीचीकेत हरवले.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य