दिवाळी अंक २०१२

आजचं सपाट जग आणि भारतीय सिनेमा

तंत्रज्ञान आणि कला यांचा परस्परसंबंध वेगवेगळ्या अंगांनी पाहता येतो. कलाविष्कारांना आपल्यापर्यंत आणण्यात तंत्रज्ञानाची मदत होते ही त्यांपैकी एक बाजू झाली; कलाविष्काराच्या तंत्रामध्ये फरक झाल्यामुळे कलेच्या निर्मितीत फरक पडतो ही आणखी एक बाजू झाली; तर जगण्यामध्ये तंत्रज्ञानामुळे फरक पडतो आणि त्याचं प्रतिबिंब कलाविष्कारात पडतं ही त्यांहून भिन्न बाजू आहे. आजच्या भारतीय सिनेमाच्या संदर्भात हे मुद्दे कसे लावून पाहता येतील?

कलाविष्काराच्या तंत्रामध्ये फरक झाल्यामुळे कलेच्या निर्मितीत पडलेला फरक :

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3.75
Average: 3.8 (4 votes)

स्मरणकळा!

सारखं सारखं नॉस्टॅल्जिक होणं आम्हांला मंजूर नाही. लोकांना 'ते दिवस' आठवून खूप काय काय होतं असतं. आपली शाळा, शाळेतले मित्र वगैरे आठवून ते भावुक होत असतात. शाळा सोडल्यानंतरच्या दुसऱ्या वर्षातही आम्हांला असलं काही झालं नव्हतं. शाळेत असताना ज्यांनी जखमा केल्या अशा काही मुली मात्र आठवत राहिल्या काही दिवस. पण तो फारच व्यक्तिगत - 'पर्सनलाइज्ड नॉस्टॅल्जिया' झाला. (शब्द कमाल आहे!) शिवाय बालपणी नदीत पोहणं, सूरपारंब्या, विहीर आणि विहिरीतलं पोहणं इ. हिट प्रकार न केल्याने नॉस्टॅल्जिया म्हणावा तसा खमंग झालाच नाही.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.5
Average: 4.5 (6 votes)

पांढरू

"दूध गरम आहे म्हणून बाहेर ठेवलं आहे. बाहेर जाशील तेव्हा आठवणीनं फ्रीजमधे टाकून जा" अशा मातोश्रींकडून येणाऱ्या सूचना त्या काळात नवीन नव्हत्या. दोनेक तासांनी दूध फ्रीजमधे टाकायला स्वयंपाकघरात गेल्यावर अजब दृश्य दिसलं. दुधाच्या पातेल्यावर चाळणी उपडी टाकली होती आणि चाळणीवर वरवंटा होता. "आता दूध काय पळून जाणारे का? आई पण ना ... ", आईला मनमुराद हसण्याचा बालकधर्म मी पाळला. संध्याकाळी विचारल्यावर उलगडा झाला. अलीकडेच एक गलेलठ्ठ मांजर आमच्या घरात अतिक्रमण करायला लागलं होतं. रात्री जेवताना आई-बाबांच्या भांडणाचा विषय 'मी भाजी खाते का नाही' याऐवजी या नवीन घटनेला 'घुसखोरी' म्हणावे की 'भूतदया' असा होता.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4.333335
Average: 4.3 (9 votes)

सरलं दळण...

आमचं घर अगदीच टिपिकल शेतकर्‍याचं नसलं तरी लहान गांवात राहिल्याने अगदीच फटकूनही नव्हतं. सतत ऊस लावल्यास जमिनीचा कस कमी होतो म्हणून प्रत्येक खोडव्यानंतर खपली गहू पेरला जायचा, तूरडाळ विकत घेण्याऐवजी थेट आख्खी तूर विकत घेतली जायची, ज्वारी-गहू सोडून इतर धान्य क्वचितच गिरणीत दळायला नेलं जायचं, वर्षभराचं तिखट डंकावर करून आणलं असलं तरी उपवासाचं तांबडं तिखट घरीच बनवलं जायचं. नंतर यंत्रं आली तरी कित्येक दिवस चव चांगली लागत नाही म्हणून दाण्याचं कूट,मिरचीचा ठेचा उखळ-खलबत्त्यातच व्हायचा आणि पुरणयंत्र "मेरा नंबर कब आयेगा" म्हणून अजूनही आ वासून पडलं आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Average: 4 (2 votes)

पाने

Subscribe to RSS - दिवाळी अंक २०१२