दिवाळी अंक २०१२

... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: फराळ आणि मी

खरं तर दिवाळीचा फराळ नि माझं लफडं तितकंसं सुरस नि रंगतदार नव्हे.

"आमच्याकडे सगळ्यांना साट्याच्याच करंज्या आवडतात. होतो खरा व्याप. पण मुलांसाठी...",
"मला नै बै विकत आणायला आवडत फराळ. मी घर्री करते सगळं. संस्कृती आहे ती आपली...",
किंवा

विशेषांक प्रकार: 

बुद्धिबळं


वसंत कानेटकरांच्या 'गाठ आहे माझ्याशी' या नाटकातला एक प्रवेश. विश्वजित हा एक नामांकित वकिल आणि त्याच्या घरातला जुना नोकर पठ्ठे ही दोन पात्रं स्टेजवर आहेत. या दोघांनी सकाळीच बुद्धिबळं खेळायला सुरुवात केली होती, पण त्यानंतर डाव अर्धवट टाकून विश्वजित कोर्टात गेला होता. आता तो संध्याकाळी परतलेला आहे, आणि खेळ पुन्हा सुरू होण्याच्या बेतात आहे.

पठ्ठे: (गडबडून) डाव पुढे चालू करायचा साहेब?

विश्वजित: मग? मी काय तुझ्यापुढं आरती ओवाळून घ्यायला बसलोय?

विशेषांक प्रकार: 

बाळूगुप्ते

बाळूगुप्ते आमच्या चाळीत रहायचा. चाळ चांगली मोठी होती आणि आमचं बिऱ्हाड त्यांच्यापासून तसं लांबचंच. रोज ज्यांच्या घरांतून मुक्तपणे फिरायचं, रोज जे लायनीत भेटतात, ज्यांच्याकडे वाटीभर साखर उसनी घ्यायला जायचं किंवा 'कोण आलंय त्यांच्याकडे' म्हणून कान टवकारायचे त्या शेजारपाजाऱ्यांपलिकडे. बराच पलिकडे. बरखा ग्राउंडवर क्रिकेट खेळायला जाताना अमोघला बोलवायचं असेल तेव्हा कधी गॅलरीत दिसायचा. पण तरीही त्याच्याविषयीच्या काही आठवणी ताज्या आहेत. विशेषतः त्याने माझे दोन भ्रमनिरास केले, ते तर मी कधीच विसरू शकणार नाही. त्यातल्या पहिल्यातून मला निदान काहीतरी शिकायला तरी मिळालं.

विशेषांक प्रकार: 

अभिवाचन - बरेच काही उगवून आलेले

लेखक - नंदन
अभिवाचन - ऋषिकेश

विशेषांक प्रकार: 

माध्यमांचा बदलता नकाशा

ग्युटेनबर्ग. आधुनिक छपाईचा जन्मदाता. १४३९ किंवा त्या आसपास कधीतरी, आपलेच अनेक वेगवेगळे शोध एकत्र करून मोठ्या प्रमाणावर छापील पुस्तकांचं उत्पादन करायला सुरूवात केली. आणि जगाला ज्ञानाच्या आणि मनोरंजनाच्या महाप्रचंड दालनाचं दार प्रथम उघडून दिलं.

विशेषांक प्रकार: 

सिनेमा आणि संगीतातील डिजिटल क्रांती

सिनेमाच्या बाबतीत एकंदरीत तंत्रज्ञानामुळे झालेला बदल प्रचंड आहे. एके काळी सिनेमा बघण्याचा आणि दाखवण्याचा फॉर्म्युला खूपच सोपा होता. ३५ एमेम फिल्मची रिळं थिएटरमध्ये पोचवायची, खेळ लावायचा आणि लोकं बघायची. टीव्ही आल्यावर त्यात थोडा बदल झाला. म्हणजे सिनेमा काढला की आधी थिएटरमध्ये आणि नंतर तो टीव्हीवर सादर करायचा. त्यानंतर स्टोअरेज मीडियाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. व्हिडियो कॅसेट्स आल्या. त्यानंतरचा प्रवास कॅसेट, व्हीसीडी, डीव्हीडी, ब्लूरेज ते ऑनलाइन. टीव्हीचंही माध्यम बदललं. एके काळी दूरदर्शन किंवा प्रादेशिक टीव्ही होता. तो जाऊन सॅटेलाइट टीव्ही आला.

विशेषांक प्रकार: 

ही पोरंच आम्हाला फरफटवत पुढे नेणार!

मी वृत्तपत्र व्यवसायात, पत्रकार म्हणून आले तेव्हा काँप्यूटर, इंटरनेट या गोष्टी दृष्टिपथात नव्हत्या. गेल्या दहाबारा वर्षांत जो बदल झाला त्याची मी साक्षीदार. दहा वर्षांपूर्वी जे होतं त्यापेक्षा जमीन अस्मानाचा फरक झाला आहे. विशेषतः स्थानिक वर्तमानपत्रांसाठी. मोठ्या वर्तमानपत्रांच्या बाबतीत त्यांचा वाचकवर्ग पटकन ऑनलाइन आला. लोकमतच्या बाबतीत ४० ते ४५ टक्के लोकांकडे इंटरनेट नाही. हा फरक काही साध्या गोष्टींतून दिसून येतो. उदाहरणार्थ, वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये लेखकाशी संपर्कासाठी इमेल देण्याची पद्धत असते. पण नुसतं तेवढं करून पुरेसं ठरत नाही हे आमच्या लक्षात आलं.

विशेषांक प्रकार: 

छायाचित्रे

कंदील - सर्वसाक्षी
विशेषांक प्रकार: 

"कंटेंट राहतोच, फॉर्म बदलतो" - कुमार केतकर

ऐसी अक्षरेः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माध्यमांचा स्फोट झालेला आहे. यामुळे संपूर्ण माध्यमांचं विश्व, त्याचा नकाशा सतत बदलता राहिलेला आहे. या बदलत्या चित्राचा एकंदरीत परिणाम काय झाला आहे?

विशेषांक प्रकार: 

सामसूम एक वाट


वाचकासह रचलेली तीनोळी :

सुरुवात करण्यास "*" वर टिचकी द्यावी. पहिली ओळ दिसेल. ओळीतील भावलेल्या कुठल्याही शब्दावर टिचकी द्यावी. त्या शब्दाच्या निवडीनुसार पुढची ओळ दिसेल. मग नव्या ओळीतील भावलेल्या कुठल्याही शब्दावर टिचकी मारून निवडीनुसार अखेरची ओळ दिसेल. कुठल्याही टप्प्यावरून पुन्हा पहिल्या ओळी कडे जायचे असल्यास "*" वर टिचकी मारावी.)
*


विशेषांक प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - दिवाळी अंक २०१२