महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा
नमस्कार,
सर्व ऐसीअक्षरेकरांना सस्नेह निमंत्रण.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या
'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब
पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला
उपस्थित राहणार आहेत.

- Read more about महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा
- 3 comments
- Log in or register to post comments
रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक
Taxonomy upgrade extras
रिटेल क्षेत्रात ५१ टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी देणारा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्यावर मोठाच गदारोळ उठला आहे. त्याबाबत त्यात इन्वॉल्व असलेल्या स्टेकहोल्डर्सच्या दृष्टीकोनातून काय परिणाम होतील हे मांडले आहे.
- Read more about रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुक
- 78 comments
- Log in or register to post comments
आठवणीतले गाव- मनमाड...!!
अगदी रखरखीत उन्हाळ्यात आम्ही मनमाडला आलो
फुफाट्यातून नागड्या पायाने चालता चालता तळपाय भाजल्याची अजूनही आठवण आहे
मनमाडला कसे आलो तर फारसे आठवत नाही .
परंतु आम्हाला छत्रे हायस्कूल मध्ये टाकले एवढे आठवते.
छान ईमारत होती. दगडी ईमारत. नि पुढे भव्य पटांगण.
तेव्हा त्या शाळेत सुत-कताई होती.
सुत कताई कशाशी खातात काहीच माहित नव्हते.
कापसाचा चेंडू एवढा बोळा देऊन टकळीने त्यातून सुत कातायचे असे काहीतरी होते.
ते सगळे बघून जाम बोर झालो. कंटाळून गेलो .
शाळा बदलली नि मला वाटते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झालो .
मला आठवतेय ती शाळा रेल्वे स्टेशनजवळ होती
- Read more about आठवणीतले गाव- मनमाड...!!
- 6 comments
- Log in or register to post comments
डाऊन वुइथ नॉस्टाल्जिया !
Taxonomy upgrade extras
"गेले ते दिन गेले ! किंवा 'काय घोर कलियुग आले' या दोन्ही वाक्यांमधे तसं काही तथ्य नाही. प्रत्येक काळाचं काही अधिक-उणं असतंच. पण ते दिसण्यासाठी भूतकाळात गाडलेली नजर वर्तमानाकडे वळवायला तर हवी. आपल्याकडे मात्र सगळे उमाळे-उसासे जुन्या काळासाठीच राखून ठेवणारी मंडळीच जास्त. त्यांच्यासाठी स्मरणरंजन हेच मनोरंजन ! पण कोणतीही रेकॉर्ड जेव्हा "गतस्मृतिंना उजाळा" देण्याकरताच बनवली जाते तेव्हा तिच्यात "गुणवत्तेशी अपरिहार्य तडजोड" केलेली असणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही कितीही "अहाहा, ओहोहो" करा हो , अशा रेकॉर्डीतून फक्त 'खरखरच' ऐकायला येते हे त्रिवार सत्य आहे. "
- Read more about डाऊन वुइथ नॉस्टाल्जिया !
- 52 comments
- Log in or register to post comments
विदेशी थेट गुंतवणुक...
Taxonomy upgrade extras
केंद्रीय मंत्रिमंडळाने रिटेल व्यापार क्षेत्रात ५१% परदेशी गुंतवणुक करण्यास मान्यता दिल्यामुळे सद्ध्या आपल्या देशात या योजनेच्या दुरगामी परिणामांची चर्चा चालु आहे..
दोन्ही बाजुच्या बाबी लक्षात घेता काही विचार करण्यासारख्या गोष्टी
१) मोठया प्रमाणात गुंतवणुक आल्यामूळे देशातील पायाभूत सुविधा मध्ये वाढ, शीत केंद्र, गोदाम बांधणी
२) स्पर्धेमुळे भाव वाढ नियंत्रण
३) छोट्या शहरातील व्यापारी संरक्षण
४) सरकारी कर रुपी उत्पन्न
विरोधी मुद्दे
१) व्यापारी म्हणुन येणार राज्यकर्ते बनणार
२) संस्क्रुति अतिक्रमण
३) छोटे व्यापारी यांचा असुरक्षित
४) स्थानिक उद्योग धोक्यात
- Read more about विदेशी थेट गुंतवणुक...
- 5 comments
- Log in or register to post comments
गोटीपुअ
हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे.
या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ".
हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार?
- Read more about गोटीपुअ
- 5 comments
- Log in or register to post comments
मेघमल्हार
कोसळला नभीचा भार
बरसला अवचित मेघमल्हार...
शमला प्रखर रवीअंगार
पुसली ग्रीष्म - कोरडी खार
दाटला गगनी घन:श्याम
थांबला दाहक संहार
दरवळला मृदगंधार
बरसला बघ मेघमल्हार
बळीराजाचे अवसान
पेरले घर्मबिंदूंचे बियाणं
वर्षले दैवाचे वरदान
आले आनंदास उधाण
जाहले पुन्हा संजीवन पान
बरसला पहा मेघमल्हार
नभीचा हलका भार
बरसला मेघमल्हार
धावे कशी लगबग ती नार
तिची चपळ चंचल चाल
ओढी कपडे दोरीवरुनी, सुकवी कोप-याआड
वाहत्या पवनावर, उधळीत वस्त्रे
सावरीत केश संभार
बरसला पहा मेघमल्हार
लपला सूर्य ढगाआड,
गर्जला पुन्हा मेघमल्हार
डोईवर छिद्रांकित छत्र
गोंधळ अत्र तत्र सर्वत्र
- Read more about मेघमल्हार
- 2 comments
- Log in or register to post comments
मीही कवि होणार!
अलिकडे 'आव आव, झटपट कवि बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! बर्याच दिवसापासून वाटतोय तिटकारा उठसूट प्रसवणार्या काव्यमक्षिकांचा. पण आज 'प्रेयसी'मुळे कहर झाला!
होणार, मीही कवि होणार,
छंद नको मज, नकोत वृत्ते
अलंकारही नकोत भलते
गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि
मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार!
यमक तेवढे ठाऊक मजला
तितके पुरते कवी व्हायला
अंत्यपदे जुळवुनी, बाकिचा
कचरा मी भरणार.. मीही कवि होणार
कविता म्हणजे हवीच प्रीती
द्विपुएव सर्वनाम चित्ती
विशेषणांच्या खिरापतीने
- Read more about मीही कवि होणार!
- 14 comments
- Log in or register to post comments
सिंदबाद
सिंदबाद...
एक वेडा खलाशी.समुद्रावर जातो म्हणून खलाशी म्हणायचं. वृत्ती तीच, भटक्याची,प्रवाशाची.
अमुक ठिकाणी "पोचणं" हे त्याचं उद्दिष्टच नसतं. त्याला फक्त तिथं "जाण्यात" मजा असते म्हणून जायचं असतं.
हरेक सफरीत काहितरी वेगळं सापडेल म्हणून थेट नौका अथांग समुद्रात फेकणारा तो सिंदबाद. इतर खलाशी "बाप रे वादळ येतय" असं म्हणताना हा "अरे व्वा! वादळ येतय " म्हणत शिडांच्या जुळजुळवीला अफाट उत्साहाने लागणारा पठ्ठया.
- Read more about सिंदबाद
- 69 comments
- Log in or register to post comments
व्याख्यानमाला -
ब्राह्मण संस्कृती मंडळ, स्वामी विवेकानंदनगर ( बेलापूर , नवी मुंबई ) यांच्या तर्फॅ २ ते ४ डिसेंबर या कालावधीत
श्री विवेक घळसासी यांची व्याख्यानमाला आयोजीत केली आहे.
हा कार्यक्रम संध्याकाळी ७ ते ९ या कालावधीत आहे.
स्थळ : अंबीका योग कुटीर
सेक्टर ९, बेलापूर, कोकन भवन ( नवी मुंबई)
व्याख्यानमालेतील विषय
१) आर्य चाणाक्यची राजनिती
२) आर्य चाणाक्यची अर्थनिती
३) स्वामी विवेकानंद - युवा मनाची प्रेरणा
इच्छुकांनी अवश्य या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा
अमोल केळकर
- Read more about व्याख्यानमाला -
- 2 comments
- Log in or register to post comments