मीही कवि होणार!

अलिकडे 'आव आव, झटपट कवि बन जाव' असली काही मोहीम चालू असलेली दिसते. इथं असं नव्हे एकूणच सगळीकडे. तेंव्हा म्हटलं त्याच भूमिकेत शिरून त्याच भूमिकेचा जरा समाचार घ्यावा! बर्‍याच दिवसापासून वाटतोय तिटकारा उठसूट प्रसवणार्‍या काव्यमक्षिकांचा. पण आज 'प्रेयसी'मुळे कहर झाला!

होणार, मीही कवि होणार,

छंद नको मज, नकोत वृत्ते
अलंकारही नकोत भलते
गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि
मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार!

यमक तेवढे ठाऊक मजला
तितके पुरते कवी व्हायला
अंत्यपदे जुळवुनी, बाकिचा
कचरा मी भरणार.. मीही कवि होणार

कविता म्हणजे हवीच प्रीती
द्विपुएव सर्वनाम चित्ती
विशेषणांच्या खिरापतीने
तुझे पोट भरणार.. मीही कवि होणार!

हात घेतला जेव्हा हाती,
पाऊस पडता ओली माती
हाती माती साथी घेउनि
काव्यशिल्प घडणार, मीही कवि होणार!

प्रेमासह जर निसर्ग असला
डब्बल ज्याक्पॉट नक्कि लागला
रूपक नि चेतनागुणोक्ति
बोनसमधि मिळणार.. मीही कवि होणार!

रोज एक या फ्रीक्वेन्सीने
कविता पाडीन जलदगतीने
प्रतिसादाच्या शून्या पाहून
नाही डगमगणार.. मीही कवि होणार!

कविता माझ्या नसतील भारी
लोकांना ना आवडल्या तरी
विडंबकांना मुबलक कच्चा
माल मी पुरवीणार.. मीही कवि होणार!

चर्चा व्हावी अशी आशाअपेक्षा आहे! Wink

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (4 votes)

प्रतिक्रिया

उत्तम!
मुक्तछंद लिहिणे बरेच कठिण असते. पण गद्यामध्ये ओळी पाडून छंद मुक्त होतो, अशा प्रकारचा गैरसमज कधीकधी दिसतो खरा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विशेषणांच्या खिरापतीने
तुझे पोट भरणार..

हे मस्त आहे.

या अशा चान चान प्रतिसादाऐवजी तुम्हाला गंभीर चर्चा अपेक्षित असेल तर विचारतो, ही कहर करणारी प्रेयसी नक्की कोण? तुमची की दुसऱ्या कोणाची तरी?

तुम्हाला काव्यमक्षिकांचा तिटकारा येतो तसा कवींना काव्यसमीक्षकांचा येत नसेल का? त्यांच्या भावनांचा काही विचार? तुमच्यासारख्या टीका करणाऱ्यांना एक विचारावंसं वाटतं की तुम्ही समीक्षक आहात ना म्हणे? जगभरचं वाचलय ना म्हणे? मग वेळ तक्रारी करण्यापेक्षा योगदान देण्यात लावा की. स्वतःची अशी काही प्रतिभा शिरवाडकरांच्या तोडीची सगळ्यांनाच मिळते असे नाही, हे मान्य. पण जे उत्तमोत्तम सापडलय, ते जमेल तितके प्रभावीपणे पोचवा की....Mainstream जे काही आहे ते कसे भिकार, उथळ इ.इ. हे सांगण्यासाठी शब्दांचा कापूस लीलया पिंजणार्‍या तुमच्यासारख्या प्रजातीला स्वतःच्या म्हणून काऊचिऊच्या कवितादेखील लिहिता येत नाहीत. लिहिणारे लिहिताहेत, वाचणारे वाचताहेत, नाही आवडले तर सोडून देताहेत. तुमची जमात मात्र सदैव काठावर उभी राहून विडंबनाच्या पिंका टाकत राहणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चान चान प्रतिसाद नकोच आहेत! हेच हवंय. मी कवी नाही, काव्यसमीक्षक नाही, जगभरचं वाचलंय असाही दावा केलेला नाही. हे तुमचे गैरसमज आहेत. आता तुम्ही म्हणाल मग तुला अधिकार कुणी दिला ही अशी टीका करण्याचा? तर काव्य या गोष्टीचे काही प्रोटोकॉल्स आहेत, नियम आहेत एवढं मला कळतं. ते प्रोटोकॉल्स, नियम पाळले जावेत असं मनापासून वाटतं आणि अलिकडे बरेचसे जण त्याची तमा बाळगत नसल्याने वाईट वाटतंय म्हणून हे मतप्रदर्शन.
लिहिण्याला नकार नाही. लिहा.. खुशाल लिहा! वास्तविक लिहावंच, त्याशिवाय इव्हॉल्व्ह कसं होणार? पण अलिकडे कुणीही उठतो, काहीही लिहितो आणि स्वतःला कवी म्हणून मिरवू पाहतो. आक्षेप या कुणीही स्वतःला कवी म्हणवून घेण्याला आहे. अरे काय त्याला नाद, लय, छंद, अलंकरण? बरं हे सगळं नाही तरी निदान आशय? काहीकाहींकडे तर त्याचंही दुर्भिक्ष असतं! बरं विषय काय? प्रेम, प्रेयसी, निसर्ग, माझी तू, तू अशी, तू तशी.. अरे काय चाललंय?! माणूस प्रेमात पडला की कविता करतो हे खरंय! पण त्याला 'कविता' कशाला म्हणतात हे ठाऊक असलं तर बरं! उगाचंच काहीतरी "तू तशी आहेस तू अशी आहेस, तू हेच करतेस नि तू तेच करतेस" अशी नेहमीच्या साच्यातली वाक्यं लिहून "मी कवी आहे" म्हणून मिरवणं हे आपल्याला पटत नाही. अरे इतकं सोपं असतं का कविता करणं? मी नसता एखादा काव्यसंग्रह पाडला मग?

आणि ही प्रेयसी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरं विषय काय? प्रेम, प्रेयसी, निसर्ग, माझी तू, तू अशी, तू तशी.. अरे काय चाललंय?!

आता काय बोलणार? एकाही कवीने स्पर्श न केलेला विषय तुम्हीच सुचवा की! नुसते दोष दाखवायला काय झालंय? तसं भंकस कवितांची चेष्टा करणं हे तुम्ही विडंबक म्हणून काही नवं करताय का? आत्तापर्यंत भंपक कवींची चेष्टा कमी झाली आहे का? आयला नुसते भंपक कविता, दारू, बायको, जाडेपणा या परीघापलिकडे न जाणारी विडंबन कविता लिहून वर तुम्ही ही तक्रार करताय?

जसा जसा मोठा मोठा होतोय तसे तसे असे नुसतेच विडंबन करणारे लोक अनेक भेटतात. त्यांचे म्हणणे एकच
"छ्या.. हे काय लिखाण आहे. हे असं नको".
"अरे प्राण्या, असं नको" म्हणण्यापेक्षा "कसं हवं" ते सांग ना.
उप्लब्ध साहित्यापैकी मला जे उत्तम वाटेल तेच मी घेणार ना. "हे वाईट, तर मग कसं हवं" ते विचारल्यावर मग "तसं म्हणजे मराठित काहिच नाही." असे हे सांगतात.
हे म्हणजे देशात "देशी दारुचे गुत्ते प्रचंड झालेत. थोडी दर्जेदार इथे असायला हवी." अशी तक्रार करण्यासारखे आहे. अरे तक्रार असेल तर तूच यथाशक्ती काही कर ना रे बाबा. शंख करून त्रास कशाल द्यायलास?

कॉलिंग मन आणि खवचट खान... मला जरा सपोर्ट द्याहो... (आत्तापर्यंत तुमचे आधीच लिहिलेले शब्द वापरले, पण आता ताजं काहीतरी हवं. दाखवून देऊया या क्षुद्र टीकाकारांना त्यांची जागा!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद कुणीही वैयक्तिक घेवू नये.

आले जरी न मन अन खान
तुमच्या मदतीला येई पाषाण

असो.

कवी जमात नेहमी टिकेच्या आहारी जाणारी असते. राजेश यांचे दोन्ही प्रतिसाद पटले. निसर्ग, प्रेयसी, आजूबाजूचे वातावरण आदी गोष्टी सोडल्या तर कवितेला कोणता विषय असतो? जे आपण अनुभवतो, आपल्या भोवती जे जे घडते तेच तर साहित्यात येते. खरे म्हणजे कविता तर त्याही पलिकडे जाते व जे न देखे रवि सारखी अनुभुती मिळते. सगळ्याच कविंच्या सगळ्याच कविता मंदार यांना पाहिजे तशा उतरणार नाही. आपल्यासमोर गाजलेल्या कविंच्या गाजलेल्याच कविता येतात. त्यांच्या इतरही दोन कवितांमध्ये एकच प्रतिमा असू शकते किंवा एकच प्रतिमा/ प्रतिक निरनिराळे साध्य घेवून समोर येवू शकते. सर्वात महत्वाचे म्हणजे कवि हा समिक्षक नसतो अन समिक्षक हा कवि होवू शकत नाही. कविने केवळ विचार करायचे काम करायचे ह्या मताचा मी आहे. समिक्षा हे त्याचे क्षेत्र नव्हे. एखादे घर बांधणे महत्वाचे. घर बांधल्यानंतर हे येथे चुकीचे आहे, अमुक अमुक येथे नको, माळा फार उंच झालाय, जिना वाकडाच चांगला होता असे सांगणारे पुष्कळ असतात. मान्य आहे ते त्यांच्या त्यांच्या (समिक्षेच्या) भुमिकेत मास्टर असतात व ते तेथे योग्यच असतात, म्हणून कविचे अन त्याने केलेल्या कवितेचे महत्व कमी होत नाही. कविता आहेत म्हणून समिक्षक आहेत.

मंदार यांनी त्यांचे विचार एका कवितेतूनच व्यक्त केले यातच कवितेचे महत्व प्रगट होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

फक्त चांगलंच हवं असा अट्टाहास नाही. कुणी लिहू नये असंही म्हणणं नाही. आपल्यासमोर गाजलेल्या कविंच्या केवळ चांगल्याच कविता आल्या/येत होत्या हाच तर मुद्दा आहे! पलिकडे "प्रसिद्ध होणारी कविता ही संस्करणानंतर प्रसिद्ध होत असावी" असा विचार चित्राताईंनी मांडला. तेच नेमकं आता होत नाहीये हाच कळीचा मुद्दा आहे. आता कविता प्रसिद्ध करणं विनामूल्य उपलब्ध असल्यानं जो तो करू शकतो. तेव्हा ती जी संस्करणाची पायरी आहे या अख्ख्या प्रोसेसमधली ती आता कवीनं स्वतःच करायची आहे! झाली कविता की टाक आंतरजालावर असं धोरण येथे कामाचं नाही! आक्षेप या गोष्टीवर आहे! अशानं लोकांना फिल्टरिंग करावं लागतं. मग "हल्ली काय कवितांचा दर्जाच खालावला आहे तेव्हा कशाला उगाच ते धागे उघडा आणि अपेक्षाभंग करून घ्या" अशी लोकांची वृत्ती होते (असं कित्येक जणांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे - माझे इमले नाहीत हे) त्यामुळे चांगल्या कविता दुर्लक्षित राहतात. (उदाहरण द्यायचं झालं तर तुमचंच घ्या. तुमच्याच कित्येक चांगल्या चांगल्या कविता उपेक्षितच राहिल्यात हे पटतंय ना तुम्हाला?) तेंव्हा हे फिल्टरिंग लिहिणार्‍यानं स्वतःच करायला हवं आहे. शिवाय मुळात जे अलिखित (आणि लिखितही) नियम आहेत त्यांची लिहिणार्‍याला जाण असायला हवी - अन्यथा ते फिल्टरिंग आणि फाईन ट्युनिंग जमणारच नाही. आणि याच गोष्टीचा तर अभाव जाणवतो या बल्कमध्ये पडणार्‍या कवितांमध्ये.
मी कुणा एकावर सरसकट आरोप केलेला नाही हे प्लीज लक्षात घ्यावं. मी एका समीक्षकाच्या नव्हे तर सामान्य वाचकाच्या भूमिकेतून विचार मांडले आहेत. समीक्षा मी कोण करणार? ते फक्त क्रिकेटमध्ये चालतं - एखाद्या व्यक्तीला क्रिकेटवर हक्कानं बोलायला त्यानं उभ्या जन्मात बॅटही हातात घेतलेली नसली तरी चालून जातं! तसं कवितांचं थोडंच आहे?!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रोसेसच बदलली आहे हे तुमचं म्हणणं साफ बरोबर आहे. प्रसिद्ध करण्याआधी पूर्वीचे कवीदेखील आपल्या खास दहा-बारा मित्रांना वाचून दाखवत असतील. कदाचित ज्या मासिकात प्रसिद्धीसाठी पाठवत त्याचा संपादक काही सूचना करत असेल. म्हणजे हे संस्करण पूर्वी सामान्य वाचकाच्या दृष्टीआडच्या सृष्टीत व्हायचं. पण संस्थळांवर एखादी कविता प्रसिद्ध झाली की ती त्याच पातळीला असते. आपले माहितीतले, मित्रमंडळी, व ज्यांच्या मतांबद्दल आपल्याला आदर वाटतो अशांसमोर ती सादर करणं असतं. तेव्हा तुम्ही इथे खरं तर सामान्य वाचक नाही आहात. तुमची जबाबदारी त्या कवीला सुधारण्याची असते. आणि कवीची जबाबदारी या प्रतिसादांतून शिकून घेऊन कविता सुधारण्याची असते. किमानपक्षी पुढच्या कवितांमध्ये हे दोष कमी होतील याची काळजी घेण्याची असते. या प्रक्रियेचा फायदा कवींना दर्जा सुधारायला होतो, त्यामुळे वाचकवर्गाला अधिक सकस कविता मिळतील अशी आशा करता येते.

ऐसीअक्षरेवर जेव्हा महिन्याच्या सर्वोत्तम, निवडक लेखनाचं आर्काइव्ह केलं जाईल त्याची तुलना सर्वसाधारण मासिकात येणाऱ्या, पूर्वसंस्कारित लेखनाशी करायला हरकत नाही. मुख्य बोर्डावर येणाऱ्या लेखनाकडे समीक्षकांनी असंस्कारित व अप्रसिद्ध कवितेकडे बघतात तसं बघावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वारी हां गुर्जी, तुमचे आवाहन जरा उशीराच वाचले. पण आमी नाय बॉ सपोर्ट देणार! आम्ही तसे तोंडाचे फटकळ. आमचे एखादेच वाक्य समोरच्याच्या इतके वर्मी बसते की तो नंतर श्वानासारखा आमच्या मागून येत गुरगुरत राहतो, बरे समोर येऊन चावा घ्यायचीही त्याची हिंमत रहात नाही, असे इतरत्र पाहिले आहे. तेव्हा सध्या 'डोण्ट फीड द ट्रोल्स' हे धोरण आहे! समजून घ्येवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(घाईत प्रतिसाद वाचला आहे. प्रतिसादातील मजकूर उलट्या अर्थाने असेल, तर अर्थातच माझा उपप्रतिसाद बाद आहे. "... ना म्हणे" पालुपदाच्या वाक्यांनी कदाचित प्रतिसाद टंग-इन-चीक आहे, असे सांगितलेले असावे. पण स्पष्ट नाही.)

तुमच्यासारख्या प्रजातीला स्वतःच्या म्हणून काऊचिऊच्या कवितादेखील लिहिता येत नाहीत. ... तुमची जमात मात्र सदैव काठावर उभी राहून विडंबनाच्या पिंका टाकत राहणार.

सदस्य मंदार कविता बांधण्यात कुशल आहेत, हे स्पष्टच आहे. इतपत कौशल्य फक्त काठावर उभे राहून कमावता येणार आही, असा माझा कयास आहे.

वृत्ताची निवड प्रभावी आहे. लय गुंतागुंतीची आहे, आणि ती निवड पेलून धरलेली आहे. तरी कौशल्य बेमालूम वापरलेले आहे - कविता वाचताना आशयच थेट येत असल्यासारखा भास होतो.

हे कुठल्यातरी कवितेचे विडंबन आहे, हेच मला पटलेले नाही. म्हणजे बेढब मुक्तछंदाची टीका म्हणून कविता बेढब मुक्तछंदात लिहिलेली नाही. कविता ही कवीची मूळ कल्पना आहे. या विषयाबाबत कवीची चीड प्रामाणिक आहे, असे कवितेतून जाणवते आहे. त्यामुळे वरील बहुतेक प्रश्न अस्थानी वाटतात.

अर्थात प्रतिसाद म्हणजे अकुशल कवीच्या चिडचिडीचे विडंबन असेल, आणि मुळात सदस्य मंदार यांचे समर्थन करायचे असेल, तर माझा हा उपप्रतिसाद अस्थानी आहे. फक्त अधोरेखित भाग विचारात घ्यावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयला कोण कोणाचा शिखंडी करून कोणावर शरसंधान करतोय हेच कळेनासं झालंय!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मंदार, जमलंय! तू बहुदा तिमाहीत एकदा लिहीतोस. पण लिहीतोस ते मस्तच! उच्चभ्रू मराठीबरोबरच फ्रीक्वेन्सी, डब्बल ज्याक्पॉट, एण्टर पेरणे हे शब्दप्रयोग आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मंदार, लय भारी!
तु लिहित रहा.. जास्त फ्रिक्वेंटली*!

*(आता म्हणे मिंग्लिशही अधिकृत होणार आहे Wink ):)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गद्यामध्ये 'एण्टर' पेरुनि
मुक्तछंद लिहिणार.. मीही कवि होणार!

बेश्ट! 'प्रेयसी' ही कविता म्हणजे कहर आहे. काही वर्षांपूर्वी '...तो मुलगा/मुलगी मराठी असतो/ते' ह्या ध्रुवपदाच्या काही दिव्य कविता ओर्कुटवर किंवा ढकलपत्रातून येत असत. त्या सर्वश्रेष्ठ उच्छादाची आठवण झाली Smile

उदा. एक्झिबिट १, एक्झिबिट २

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0