आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?
मानवी अस्तित्वाच्या अंताबद्दल भाकीत करताना आपल्या विश्वाचा मृत्यूसुद्धा त्यास कारणीभूत ठरू शकेल असे म्हणावे लागते. हे विश्व कशाप्रकारे कोसळून जाईल याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुळात यांची चाचणी कशी घ्यावी, त्यांची शहानिशा कशी करावी याबद्दलच अनेक शंकाकुशंका आहेत. उत्सुकता शमवण्यापोटीच हा मुद्दा उपस्थित केला जातो असेही वाटण्याची शक्यता आहे. हे विश्व पूर्णपणे गोठून जाईल (deep freeze), की कृष्णविवरात नाहीसे होईल की अस्टेरॉइड्सच्या माऱ्यामुळे तुकडे तुकडे होऊन ब्रह्मांडात सामावून जाईल की….आणखी काही तरी ?
सुदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या घटनेबद्दल आताच्या सिद्धान्तावरून काही अंदाज बांधता येतील. आपल्या विश्वाचे प्रसरण होत आहे, या प्रसरणाचा वेगही वाढत आहे व कृष्ण-ऊर्जा त्याचा ताबा घेत आहे, याबद्दल तरी दुमत असण्याचे कारण नाही. ज्याप्रकारे हे विश्व फुगत चालले आहे त्यावरून तरी हा अंत भयानक असेल याची खात्री पटत आहे. अवकाशाचा बहुतांश भाग अंधारात गडप होऊन दीर्घिकांचे समूह एकाकी पडत जातील. ताऱ्यांचा ऱ्हास होईल. या घटनाक्रमामुळे वस्तूंधील प्रोटॉन्स नष्ट होऊ लागतील. त्याचा परिणाम म्हणून वस्तूंचे रूपांतर परमाणुयुक्त ध्रुवलयी वायूत होईल. कदाचित यापेक्षाही भयानक असे काही तरी घडेल.
आपल्याला अजूनही कृष्ण ऊर्जा म्हणजे काय याचा नेमका अंदाज आलेला नाही. त्यामुळे भविष्यकाळात ती ऊर्जा स्थिर राहील की अस्थिर याचाही नीटसा अंदाज येत नाही. अपकर्षण वाढत गेल्यामुळे विश्वप्रसरणाचा वेगही वाढत जाईल. ही फँटम ऊर्जा खरोखरच वाढत वाढत गेल्यास विश्वात हलकल्लोळ माजू शकेल. यच्चयावत सगळ्याच गोष्टींची चिरफाड होत राहील. ग्रहांचे, उपग्रहांचे तुकडे तुकडे पडतील. अवकाशातील आवरण नष्ट होत जातील. परमाणूंच्या ठिकऱ्या उडतील. त्यानंतर पुन्हा एकदा आकर्षण करू शकणारे वैश्विक बळ जोर धरून अपकर्षणावर मात करील. त्यामुळे दीर्घिकांचे पुनरागमन होईल. पुन्हा एकदा महापाताची (big crunch) अवस्था ब्रह्मांडात येईल. फक्त या गोष्टी इतक्या लवकर होणार नाहीत हे आपले सुदैव ठरेल. अशा प्रकारचा महापात किंवा ग्रहांचा समूळ नाश काही हजारो कोटी वर्षांनंतर होण्याची शक्यता आहे.
अजून एक भयानक शक्यता नजीकच्या काळात होऊ घातलेली आहे, असे या क्षेत्रातील अभ्यासकांना वाटत आहे. काळाचे व अवकाशाचे स्वरूपच अस्थिर होईल. तंतुसिद्धान्तानुसार विश्वातील निर्वात पोकळी भरकटल्यामुळे एका प्रकारची संभ्रमावस्था निर्माण होईल. कण बदलतील; बल बदलतील; एवढेच नव्हे तर मिती बदलतील. आपल्या आताच्या स्थिर स्थितीचा ऱ्हास होऊन तिला कमी ऊर्जेचे स्वरूप प्राप्त होईल. आपल्या पायाखालची जमीन उखडून जाईल. आपले अस्तित्व नष्ट होईल.
निर्वात पोकळीचा ऱ्हास होत असल्यास त्याची सुरुवात अवकाशात कुठून तरी होईल. त्याचा वेग वाढत वाढत shock front चे गोल तयार होऊन जवळपास प्रकाशाइतक्या वेगाने प्रवास करू लागतील. तात्त्विकदृष्ट्या प्रलयाच्या जवळ जाताना या धोक्याची पूर्वसूचना आपल्याला मिळेलही. परंतु ती अगदी कमी मुदतीची, केवळ काही मायक्रोसेकंद एवढाच दिल्यामुळे ते पुरेसे ठरणार नाही. कदाचित या क्षणी या भयानक ऱ्हासाची सुरुवातही झाली असेल. आपला चंद्र ectoplasm मध्ये बदलून पृथ्वीकडे चालही करत असेल. अशा प्रकारचा अंत आपल्याला टाळता येणार नाही. हे टाळण्यासाठी एखाद्या big rip निर्वात पोकळीला गिळून त्याला ऋण ऊर्जेच्या स्थितीला पोचावे लागेल. त्यानंतर अवकाश स्वतःमधील शक्तिशाली वापर करून विशाला महापातापासून वाचवू शकेल.
आपल्या विश्वाचा मृत्यू अशा प्रकारेच होईल असे ठामपणे सांगता येणार नाही. आपले विश्व बहुविश्वाचा एक भाग असेल व ब्रह्मांडातील विश्वाचे आयुष्य निर्दिष्ट असेल तर ब्रह्मांड काही प्रमाणातातील वैश्विक बदलांना सहन करू शकेल. त्यामुळे आपले हे स्थानिक विश्व यातून सहीसलामत सुटूही शकेल. मात्र आपले भौतिक सिद्धान्त व नियम महापात वा big rip अवस्थेसमोर कोसळतील. विश्व गोठण्याच्या अवस्थेत गेल्यास quantum fluctuations साठी वेळ मिळून अजून एक महास्फोट होऊ शकेल. या सर्व शक्याशक्यतांचा विचार करता, आपल्या अस्तित्वाला नजीकच्या काळात कुठलीही भीती नाही एवढे मात्र आपण ठामपणे सांगू शकतो.
एखाद्या सर्वस्वी वेगळ्या प्रकारची जीवोत्पत्ती करूच शकणार नाही असे ठाम विधान आपण कसे काय करू शकतो?
एक मात्र खरे की फाइन ट्यूनिंगची कल्पना आपण इतक्या सहजासहजी धुडकावूनही लावू शकत नाही. उदाहरणार्थ, कृष्ण ऊर्जेमुळे (dark energy) विश्वाचे प्रसरण होत आहे, हे आपण नाकारू शकत नाही. क्वांटम सिद्धांतानुसार ही विस्मयकारक ऊर्जा आपण गृहित धरत होतो त्यापेक्षा 10120 पट जास्त आहे. जर कृष्ण ऊर्जा खरोखरच इतकी नसती तर अवकाशातील दीर्घिकांची निर्मिती झाली नसती. व आपणही अस्तित्वात आलो नसतो. त्यामुळे कृष्ण ऊर्जा योग्य प्रमाणात असल्यामुळेच आपले अस्तित्व आहे हे मान्य करायला हवे.
परंतु हीच कृष्ण ऊर्जा बहुविश्वाच्या संकल्पनेला पुष्टी देत आहे, हे विसरता येत नाही. त्यामुळे इतर वैश्विक स्थिरांकाचे फाइन ट्युनिंग झाले असावे याला मात्र काही पुरावा नाही.
संदर्भः न्यू सायंटिस्ट, सायंटिफिक अमेरिकन
समाप्त
या पूर्वीचे
मानवी अस्तित्वाविषयीचे काही प्रश्न (1) , प्रश्न (2), प्रश्न (3), प्रश्न (4), प्रश्न (5) प्रश्न(6) , प्रश्न (7), प्रश्न (8) , प्रश्न (9), प्रश्न (10) व प्रश्न (11)
इतके सर्व घडण्याची काय गरज आहे
पृथ्वी वर असलेली जिवसृष्टी नष्ट होण्यासाठी लेखात वर्णन केलेल्या घटना घडण्याची काही गरज नाही.
अतिशय शुल्लक प्रति ची जिवसृष्टी पृथ्वी वर आहे.
तीन वर्ष पाऊस नाही पडला तरी ती नष्ट होईल.
किंवा एकदा virus, bacteria पण ही जिवसृष्टी दोन चार महिन्यात नष्ट करेल.
त्या साठी ब्रह्माण्ड मध्ये उलट palat होण्याची काही गरज nahi
(केवळ (अपग्रेडनंतर) जुने प्रतिसाद दिसण्याकरिता…)
माकडा, माकडा, हुप
तुझ्या शेपटीला शेरभर तूप
Bot द्वारे सर्व धाग्यांवर…
Bot द्वारे सर्व धाग्यांवर लूप मध्ये एकेक hello world प्रतिसाद टाकता येईल का? ;-))
हे आत्ताच केले तर ठीक. धागे वर येण्याची पद्धत सुरू झाल्यास अशा युक्तीने फारच घुसळण होईल आणि प्रत्येक धागा वर येईल.