आजचे दिनवैशिष्ट्य - १३
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.
---
Taxonomy upgrade extras
संशोधन
तुमचा खवचटपणा अजिबात अस्थानी नाही.
मात्र संशोधनात साधारण एकाच वेळी, दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी वा संस्थांनी, साधारण एकसारख्या तंत्राचा शोध लावल्याची बरीच उदाहरणं आहेत. अॅपल-सॅमसंगच्या अनेक कॉपीराईट मारामाऱ्यांबद्दलही हेच वाचनात आलं आहे. अर्थात, अशा मारामाऱ्यांत काही वेळा एकच इंजिनियर एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत गेली आणि तंत्रज्ञान इकडून तिकडे गेलं, अशा गोष्टीही आहेत.
पुण्यस्मरण : शंकर-जयकिशन
पुण्यस्मरण : शंकर-जयकिशन यांच्यापैकी शंकर सिंग रघुवंशी (१९८७)
.
यांनी अक्षरश: डझनावारी नव्हे शेकडो गोड गाण्यांना संगीत दिलं.
.
पटरानी या चित्रपटात ... लताबाईंनी एक गाणं गायलंय यांच्यासाठी. "कभी तो आ कभी तो कभी तो आ" असे बोल आहेत त्या गाण्याचे. त्याच्या सुरुवातीचा आलाप फक्त ऐकावा व नंतर गाणं बंद करून टाकावं - इतका झक्कास आलाप आहे तो. लताबाईंची कमाल.
.
.
.
.
ॲबनॉर्मल घंटा
आज नॉर्मल दिवस आहे. गाऊसचा वाढदिवस. ३० एप्रिल.
मग घंटा वाजवा त्यानिमित्त.
माहितीवर्धक खुस्पटं
असला कसला नॉर्मल..! या गाउशाला कितीही फूरिएफूस लावली तरी मूळ स्वभाव घंटा बदलत नाही! असं अभ्रष्ट राहणं आजच्या जमान्यात ॲबनॉर्मलच!
केंद्राच्या मुळाशी नॉर्मलच.
सगळ्या विभागणीचं मूळ नॉर्मलच आहे. तुम्ही घंटा म्हणा, करवतीचे दात काढा, किंवा 'मेरे मन को भाया' छापाचे पट्टे फिरवा.
हॅप्पी बड्डे : श्रीनिवास खळे
हॅप्पी बड्डे : श्रीनिवास खळे (जन्म : ३० एप्रिल १९२६)
.
"जाहल्या काही चुका" - निर्णयन मंडल, तुम्हाला माझ्यातर्फे टेकिलाचे ३ शॉट्स् सप्रेम भेट.
३ शॉट्स मारून झाल्यानंतर आणखी ४ शॉट्स मारावेसे वाटले तर त्याला सुद्धा माझी तयारी आहे.
.
.
खळे यांनी संगीत दिलेली अनेक उच्च गाणी आहेत मराठीत. "आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी" हे त्यातलेच एक उच्च.
.
१ मे
अमेरिकेत राहणारा, स्वतःला अमेरिका-खंडी मानणारा, कॅनडात जन्मलेला इसम मला सांगत होता - इतिहास साक्ष आहे, उत्तर कोरीया आणि इराण उद्या अणूबाँब टाकू शकेल.
मी त्याला विचारलं - कोणता इतिहास? तोच का, ज्यात आत्तापर्यंत एकाच देशानं दुसऱ्या देशावर अणूबाँब टाकलेला आहे.
तो म्हणाला - पण आमच्या मित्रदेशाशेजारून ते मिसाईल चालवतात. आम्हाला अधिकार आहे, त्यांच्यावर बंधनं आणण्याचा!
मी - अधिकार आणि ताकद यांच्यात फरक काय? स्वतः हजारो अणूबाँब आणि लाखो मिसाईल्सवर बसून इतरांना सल्ले देण्याचा हक्क मिळतो, का ताकद?
तो - अमेरिकेत येऊन उदारमतवादाचं कूलेड प्यायलेलं आहेस तू!
मी - हा तुझा अमेरिकी गैरसमज आहे. हजारो वर्षांच्या उदारमतवादाची भारतीय परंपरा माझ्यामागे आहे. पण तू फक्त (चुत्या) उजव्या हिंदू लोकांचा बकवास ऐकून भारत म्हणजे काय याबद्दल मतं बनवतोस. त्याला माझा इलाज नाही. अडाणीपणा दूर करण्यासाठी इंजेक्शन मिळत नाही.
मग त्याला कामाची आठवण झाली. मला कामाचा कंटाळा आलाय. एका ठिकाणी अडकल्ये सध्या. मी चावून घेतलं.
हा इसम आमच्या कंपनीचा सी.ई.ओ. आणि मी कामगार.
ओके.
ओके.
तुमचा मूळ प्रतिसाद पुन्हा एकदा वाचला.
आता खालील माहीती पहा.
(१) अमेरिकेचा जपान बरोबर करार आहे ज्याद्वारे अमेरिका ही जपान चे रक्षण करण्यास वचनबद्ध आहे.
(२) हा करार १९५१ मधे केला गेला होता. कराराचा तपशील इथे
(३) करारानुसार अमेरिकेला बलप्रयोगाचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याबद्दलचा मजकूर कराराच्या वरील दस्तावेजातून उचलून खाली डकवत आहे.
(४) उत्तर कोरियाने जपान वर क्षेपणास्त्रे डागली होती (२०१७ मधे) - पुरावा
(४) Charter of the United Nations; June 26, 1945 च्या ५१ व्या परिशिष्टानुसार सर्व देशांना कलेक्टिव्ह डिफेन्स चा अधिकार आहे.
(५) उत्तर कोरिया ला या अमेरिका-जपान कराराबद्दलची पूर्वकल्पना नक्कीच आहे.
(६) सबब जपान वर आक्रमण करण्याचा उपद्व्याप करणाऱ्या देशावर (या केस मधे उत्तर कोरियावर) अमेरिकेला बलप्रयोगाचा कायदेशीर अधिकार आहे.
(७) तुम्ही "अधिकार विरुद्ध ताकद" चे जे द्वंद्व उभे केलेले आहे ते तुमच्या स्वत:च्या उजवे विरोधक बनण्याच्या प्रतिमाबांधणीकार्यक्रमा प्रमाणेच तकलादू आहे.
--------
ARTICLE I
Japan grants, and the United States of America accepts, the right, upon the coming into force of the Treaty of Peace and of this Treaty, to dispose United States land, air and sea forces in and about Japan. Such forces may be utilized to contribute to the maintenance of international peace and security in the Far East and to the security of Japan against armed attack from without, including assistance given at the express request of the Japanese Government to put down largescale internal riots and disturbances in Japan, caused through instigation or intervention by an outside power or powers.
खरंका ?
आता हाच लेख पहा. अगदी पहिल्या धारेचा आहे. ___ लेखक : खासदार डी राजा, CPI.
.
B R Ambedkar, who wrote Buddha or Karl Marx, championed the cause of social justice and annihilation of caste in Indian society. The vision of Ambedkar is not different from the vision of Karl Marx.
.
.
किमान मार्क्स हा मार्क्सवादी होता असं म्हंटलंत तरी मी तुम्हाला मुर्गीपार्टी देतो.
.
पुण्यस्मरण : संगीतकार नौशाद
पुण्यस्मरण : संगीतकार नौशाद अली (२००६)
.
.
शकील ची शायरी, नौशाद चं संगीत, लताबाईंचा अतिकोमल आवाज, आणि पडद्यावर मधुबाला. अजून काय हवं ?
.
-------
.
या गाण्यात साधना काय झक्कास दिसते, यारो !
.
शकील ची शायरी, नौशाद चं संगीत, आणि लताबाईंचा आवाज.
.
.
------
.
अजून एक नौशाद चं गाणं. तलत चा मखमली आवाज.
.
आयला, हे बरे आहे!
बोले तो, तलतचा मी फॅन आहे, नव्हे भक्त आहे, हे ठीकच, परंतु म्हणून काय तलतच्या जयंती-बारसे-पुण्यतिथीचा (झालेच तर प्रत्येक सॉलोमन-ग्रण्डी-फ़ेज़चा) ट्रॅक ठेवून त्या-त्या दिवशी काहीतरी पोष्टविण्याचा मी मक्ता घेतला आहे काय?
(आणि तसेही, तलत आपला सर्वांचा नव्हे काय? मग इतरांनाही हातभार लावू द्या की जरा!)
परंतु तरीही, केवळ तुम्ही म्हणता म्हणून, हे घ्या. (तलतने 'तपनकुमार' या नावाने गायलेल्या बंगाली गाण्यांशी मी परिचित नसल्याकारणाने, तेवढी मात्र डकवू शकत नाही; क्षमस्व.)
कलेजा नव्हे हो!
ग़रेबाँ/ग़िरेबाँ.
बोले तो, संन्याशाची (काळी) वस्त्रे, असा कायसासा अर्थ होतो, असे कायसेसे मागे कधी कोठेसे वाचले होते. (चूभूद्याघ्या.)
(आणि तर्क़ केली, म्हणजे त्यागली, सोडून दिली बहुधा. पुन्हा चूभूद्याघ्या.)
(काळीज कोण कशाला शिवेल?)
ये जहर भी पी लिया मैने
ये जहर भी नव्हे. जहर ये भी.
शब्दक्रमाला महत्त्व आहे. कॉम्रेड साहिरच्या आत्म्याला काय वाटेल?
:-)
चिडलेला स्थितप्रद्न्य आठवला.
:-)
उलटपक्षी, कॉम्रेड साहिर भले ही आत्म्याचे अस्तित्व मानत नसेल. पण म्हणून त्याच्या आत्म्याने असू नये काय? किंबहुना, साहिरच्या आत्म्याने असावे की नसावे हे ठरविणारा साहिर कोण? तो सर्वस्वी साहिरच्या आत्म्याचा प्रश्न अत एव अधिकार असावा, साहिरचा नव्हे, नाही काय?
उलटपक्षी, कॉम्रेड साहिर भले
उलटपक्षी, कॉम्रेड साहिर भले ही आत्म्याचे अस्तित्व मानत नसेल. पण म्हणून त्याच्या आत्म्याने असू नये काय? किंबहुना, साहिरच्या आत्म्याने असावे की नसावे हे ठरविणारा साहिर कोण? तो सर्वस्वी साहिरच्या आत्म्याचा प्रश्न अत एव अधिकार असावा, साहिरचा नव्हे, नाही काय?
.
.
निरीश्वरवादी मंडळी परमेश्वराचे अस्तित्व मानत नसतीलही. पण म्हणून परमेश्वराने असू नये काय ?
.
१९९८ : पोखरण येथे भारताची
१९९८ : पोखरण येथे भारताची अणुचाचणी. अमेरिकेसह अनेक देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादले. २८ मे रोजी पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून अणुचाचणी केली.
हा लेख छाने.
https://theprint.in/opinion/pokhran-anniv-vajpayees-secretary-recalls-m…
बड्डे : वाढत्या लोकसंख्येशी
बड्डे : वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२)
.
यांचे काही क्वोट्स (१९६५ ते १९७० च्या दरम्यानचे खाली देत आहे). लोकसंख्येचा विस्फोट अशा शीर्षकाचं पुस्तक लिहिलं होतं यांनी.
.
"Population will inevitably and completely outstrip whatever small increases in food supplies we make. The death rate will increase until at least 100-200 million people per year will be starving to death during the next ten years."
.
"Most of the people who are going to die in the greatest cataclysm in the history of man have already been born… [By 1975] some experts feel that food shortages will have escalated the present level of world hunger and starvation into famines of unbelievable proportions. Other experts, more optimistic, think the ultimate food-population collision will not occur until the decade of the 1980s."
.
"In ten years all important animal life in the sea will be extinct. Large areas of coastline will have to be evacuated because of the stench of dead fish."
________ Ehrlich on the first Earth Day, April 22, 1970
.
+/-
सदैव चेहऱ्यावर अपराधीपणाचे, दुष्काळातून आल्यासारखे भाव असायचे त्याच्या.
+
(इन जनरलच मला असले भाव असणारी मंडळी लुच्ची, चालू, डँबिस वाटतात.)
पण गाणीगिणी बरी बनवायचा.
होय आणि नाही. सुरुवातीसुरुवातीची बरी होती. (बरसात, आवारा, श्री ४२०, चोरी चोरी, अगदी आह-पर्यंतसुद्धा. विच डझ नॉट से मच अबौट द मूव्हीज़ देमसेल्व्ह्ज़. मेरा नाम जोकरची गाणी ठीकठीक होती, परंतु (१) नंतरनंतर त्यांचा कंटाळा येऊ लागला, (२) नंतरनंतर एकंदरीत गेंगाणा मुकेश या प्रकाराचाच कंटाळा येऊ लागला, आणि (३) तो पिक्चर तसाही महाटॉर्चर होता. असो.)
(तसेही, त्या बऱ्या गाण्यांत ह्याचे श्रेय कितीसे?)
बाकी सोशॅलिस्ट-कम्युनिस्ट टेंडन्सीज वाला तर दिलीप पण होता/आहे. राज पेक्षा जरा जास्तच.
दिलीपकुमार मला आवडतो, असा दावा मी नक्की कधी केला?
दिलीपकुमार मला आवडतो, असा
दिलीपकुमार मला आवडतो, असा दावा मी नक्की कधी केला?
नाय नाय. मी फक्त उदाहरण दिले की चॉईस कमी होता. राज व दिलीप हे दोघेही स्टालवर्ट्स साम्यवादाच्या दिशेने जाणारे होते.
.
"मेरा नाम राजू घराना अनाम" - हे शैलेंद्र चं गाणं कस्काय वाट्टं ??
.
देव साहेबांचं - माहीती नाही.
.
हॅप्पी बड्डे : जन्मदिवस :
हॅप्पी बड्डे : जन्मदिवस : नूतन (४ जून १९३६)
.
बोर्डावर "तेरा जाना.... दिल के अरमानोंका लुट जाना" हे गाणं लावल्याबद्दल निर्णयन मंडलाचे मायंदाळ आभार.
.
मै रो कर रह जाऊंगी
दिल जब जिद पर आएगा
दिल को कौन मनाएगा
.
व्यक्ती आणि तिचे मन यात "फोडा आणि झोडा" करणारे अनेक शायर. शैलेंद्र हे त्यापैकीच एक.
.
जोडीला हे पण ऐका. आयमीन तुम्ही ऐकलं असेलच पण तरीही....
.
जरा रोताड आहे पण लताबाईंसाठी ऐका. हे शिरिष कणेकरांचं सुद्धा आवडतं गाणं आहे.
.
.
.
सावन का महीना पवन करे शोर, ये राते ये मौसम, चंदन सा बदन, छोड दे सारी दुनिया किसीके लिये, माना जनाब ने, मै तुलसी तेरे आंगनकी - वगैरे ऐकून ऐकून घिसीपिटी झालेली आहेत.
.
भौतिकशास्त्रज्ञ, रेडिओ
एका क्लायंटच्या हापिसात जाताना गुग्लीएल्मो मार्कोनीने बिनतारी संदेशवहनाचा जाहीर प्रयोग करून दाखवला ती जागा दिसली.
ठिकाण: न्यूगेट स्ट्रीट, लंडन.
फोटो जालावरून.