Skip to main content

प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलर - बातम्या

अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलरना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे. यात काही काळ जुन्या बातम्याही चालतील - गेल्या दोनतीन वर्षांतल्या - पण अगदीच काहीतरी अनमोल रत्न असल्याशिवाय त्यामागे जाऊ नये.

हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्त वगैरेंनी केलेल्या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणाबद्दलच्या बातम्या इथे मांडू नये, त्यासाठी स्वतंत्र धागा काढलेला आहे.

सुरूवात करायला मला चटकन बातमी सुचत नाहीये, पण दोन्ही लेख एकाच वेळी प्रसिद्ध व्हावे यासाठी मी हा धागा लवकर प्रकाशित करतो आहे. इतर लोक यावर सुरूवात करून भर घालू शकतील याची खात्री आहे.

अनुप ढेरे Tue, 29/03/2016 - 11:49

In reply to by चिंतातुर जंतू

फॉर अ चेंज जंतूंशी समहत आहे. पुण्यात भा.ज.यु.मो. सारखे अक्कलशुन्य लोक त्याला विरोध करून अजून प्रसिद्धी देत आहेत.

आदूबाळ Wed, 30/03/2016 - 01:52

कदाचित धागा चुकला असेल - पण भाजयुमो आणि अभाविप मध्ये नक्की काय फरक आहे? तसाच प्रश्न विहिंप - बजरंग दल - पतित पावन संघटना? पूर्वी (म्हणजे नव्वदीच्या दशकात) पुण्यात जागोजागी बजरंग दलाचे बोर्ड दिसायचे. आता ते सगळे लोक कुठे असतात?

नितिन थत्ते Wed, 30/03/2016 - 09:11

In reply to by आदूबाळ

असो.....

पण युवा नेते विद्यार्थी असतीलच असे नाही. म्हणून वेगळी संघटना. एनएसयूआय ही काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे पण यूथ काँग्रेस नावाची वेगळी संघटना आहे.

>>तसाच प्रश्न विहिंप - बजरंग दल - पतित पावन संघटना?

विहिंप आणि बजरंगदल यात काय फरक आहे हे मोहन भागवत सुद्धा सांगू शकणार नाहीत. पतितपावन संघटना ही बहुधा सावरकरी विचारांच्या लोकांची संघटना आहे. [फॉर द बिगिनर्स - सावरकर आणि संघ हे एक नव्हेत. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हता/नाही. वैचारिक दृष्ट्या दोघे बरेच दूर होते].

अनुप ढेरे Wed, 30/03/2016 - 09:32

In reply to by नितिन थत्ते

पण युवा नेते विद्यार्थी असतीलच असे नाही.

राहुल गांधी आत्ताआत्तापर्यंत युवा नेते होते.

बाळ सप्रे Wed, 30/03/2016 - 11:00

In reply to by अनुप ढेरे

राहुल गांधी आत्ताआत्तापर्यंत युवा नेते होते

ते युवानेते होते.. आत्ताही आहेत.. आणि अखंड युवा नेते रहातील... (तुम्हाला वाटतं ते कधी मोठे होतील? :-) )

गब्बर सिंग Wed, 30/03/2016 - 21:13

In reply to by बाळ सप्रे

जिस बच्चे को कभी बडा होने ही नही दिया जाएगा ... तो बडा होगा कैसे ? मोठे होण्यासाठी त्यांना किमान पक्षांतर्गत इलेक्शन्स ना सामोरे जावे लागेल. ते सुद्धा अनेक वेळा. त्यातून तावून सुलाखून जर वर चढले तर ते मोठे होतीलच. मी काहीही केले (अथवा केले नाही) तरी माझे स्थान अबाधित आहे/राहील हे जर त्यांना पक्के माहीती असेल तर ते काहीही का करतील ?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/03/2016 - 21:30

In reply to by गब्बर सिंग

गब्बर, चांगल्या विनोदाची स्पष्टीकरणं देऊ नयेत. फडतूस विनोदांच्या हव्या तशा चिंध्या कर, काहीही आक्षेप नाही.

चिंतातुर जंतू Tue, 12/04/2016 - 13:52

In reply to by अनुप ढेरे

हयात 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा काय आहे? आणि त्यात 'प्रेस्टिट्यूट्स, मोदीद्वेष्टे, विचारजंती, सिक्युलर लोकांना आलेला ऊत' कसा दिसतो ते कळलं नाही.

अनुप ढेरे Tue, 12/04/2016 - 14:02

In reply to by चिंतातुर जंतू

ह्म्म्म. मुद्द्यात दम आहे. अलिकडे (डोकाऊन) काय पाहिलत असा धागा सुरू झाला तर तिथे हलवता येईल हा प्रतिसाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 12/04/2016 - 18:28

In reply to by अनुप ढेरे

या जोडप्याचा विषय इथे निघालाच आहे तर -

काल एनबीसीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये देवळात फटाक्यांमुळे लागलेली आग, जीवितहानी याबद्दल बोलत होते. त्या बातमीच्या शेवटी विल्यम आणि केटच्या या दुर्घटनेबद्दल असलेल्या प्रतिक्रियाही दाखवल्या. बातमीबद्दल पत्रकार जेवढा वेळ बोलले त्याच्या ८०% वेळ या जोडप्याच्या प्रतिक्रियेसाठी! अमेरिकन माध्यमं, पर्यायाने लोकही या ब्रिटीश जोडप्याला एवढा भाव देतात हे बघून ड्वाले पानावले.

.शुचि. Tue, 19/04/2016 - 20:27

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ब्रिटीशांची कार्टी अन त्यांचं हगणं - मुतणं याच्या नको तितक्या चर्चा होतात. गेले खड्ड्यात साले.