संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष

अनेक लोक अनेक वेळा अनेक ठिकाणी काहीतरी निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्खपणाची विधानं करतात. कधीकधी या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणांपायी नसताना हातापायीही होते. कधी हे प्रकरण तिथेच न थांबता दंगे होतात, ऑफिसं तोडली जातात, हल्ले होतात, बसेस जाळल्या जातात, खूनही पडतात. आजकाल या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणा करण्यात हिंदुत्ववादी, संस्कृतीरक्षक, कट्टर राष्ट्रवादी संघटनांना, आणि मोदीभक्तांना ऊत आलेला आहे. तर हा धागा अशांची विधानं, कृत्यं, घोषणा वगैरेंची चेष्टा किंवा निषेध यांचं एकत्रित संकलन करण्यासाठी काढलेला आहे. यात काही काळ जुन्या बातम्याही चालतील - गेल्या दोनतीन वर्षांतल्या - पण अगदीच काहीतरी अनमोल रत्न असल्याशिवाय त्यामागे जाऊ नये.

प्रेस्टिट्यूट्स, सिक्युलर, विचारजंती, मोदीद्वेष्टे वगैरेंनी केलेल्या 'निरर्थक, चक्रम, विक्षिप्त आणि मूर्ख'पणाबद्दलच्या बातम्या इथे मांडू नये, त्यासाठी स्वतंत्र धागा काढलेला आहे.

सुरूवात मी करून देतो. नुकतंच मुस्लिम राष्ट्रीय मंचाने 'गायीच्या शेणामुळे अणुबॉंबचा प्रतिकार करता येऊ शकतो' असं म्हटलं आहे. कदाचित बाटगे अधिक कडवे असतात हे खरं आहेसं दिसतंय.

4
Your rating: None Average: 4 (1 vote)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

“आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

परदेशी पर्यटक महिलांनी भारतात

परदेशी पर्यटक महिलांनी भारतात वावरताना स्कर्ट घालू नये. इति केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा. म्हणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्वाचे आहे.

+१. ट्रॅफिकच्या दृष्टीने

+१.
ट्रॅफिकच्या दृष्टीने धोकादायक असते ते !!! (जीभ दाखवत)

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

'न'वा इतिहास

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रम्या

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

हँसनेके दिन भी मैंने रो के गुजारे
भोर भी आँसकी किरन ना लायी |

विकास घडवताना संस्कृतिचे

विकास घडवताना संस्कृतिचे बलिदान नको - इति सुमित्रा महाजन

आमच्या संस्कृतित यंव व्हायचं अन त्यंव होत असे. आणि म्हणून विकास घडवताना सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवला पायजे वगैरे वगैरे वगैरे. मोदींनी फर्ग्युसन कॉलेजात भाशान ठोकताना "मॉडर्नायझेशन विदाऊट वेस्टर्नायझेशन" चा नारा दिला होता तो ह्याचाच बाप.

गोरक्षकांचा भस्मासुर

हिंदू जागरण वेदिकेच्या गोरक्षकांनी भाजपाच्याच कार्यकर्त्याला मारले.
http://www.thehindu.com/news/national/karnataka/hindu-jagrana-vedike-act...

उत्तम झाले!

The more, the merrier!!!

!

जीव घेतला!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

:(

गौरक्षकांना आवरायला हवं वेळीच.

गर्दीतला दर्दी

राधासुतांचा धर्म!

वेळीच??????

म्हणजे, वेळ अजून यायचीच आहे की काय? की आत्ता आली?

बोले तो, त्या मुहंमद अखलाकाला मारले, तेव्हा वेळ नव्हती काय?

की तो मुसलमान होता, नि मुसलमानांनाच मारत होते, तोवर ठीकच होते, पण आता तर हिंदूंनाही मारू लागले आहेत, तेव्हा अबब, तोबा तोबा, असे काही?

छे! वेळ तेव्हा होती. आता आहे तो फक्त प्रघात! आता पायंडा पडलेला आहे, रादर स्वखुशीने पाडून घेतलेला आहे. हे 'अच्छे दिन' यायचेच होते. किंबहुना, यांचिसाठी केला होता अट्टाहास!

('तेव्हा' काहीही न केल्यावर आता केवळ 'आपल्यां'वर उलटू लागले असता कृतिशील होणे हा त्या मुहंमद अखलाकावर - आणि एकंतरीतच 'मुहंमद अखलाक' मंडळींवर - अन्याय तर आहेच, परंतु त्यापेक्षासुद्धा, 'मुहंमद अखलाक' मंडळी ही 'आपली' नव्हेत, या भावनेचे - आणि एका प्रकारे 'टू नेशन थियरी'चे - अधोरेखन आहे. आणि हे जर योग्य वा इष्ट असेल, तर मग पाकिस्तान - भले कितीही भिकारचोट असले तरी - झिंदाबाद!)

>>किंबहुना, यांचिसाठी केला

>>किंबहुना, यांचिसाठी केला होता अट्टाहास!

बिंगो.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

वेळीच ??????

न. बा. तुम्ही जे म्हणताय ते बरोबरच आहे. फक्त माझ्या म्हणण्याचा तुम्ही विपर्यास केलात. अखलाकच्या वेळीच गौरक्षकांना आवरले पाहिजे हे मला मान्यच आहे. मी लिहिलेल्या वाक्यातल्या 'वेळीच' चा अर्थ अजूनही वेळ गेलेली नाही असा होता. गौरक्षक दिवसेंदिवस जास्तीच आक्रमक आणि हिंसक होत चाललेत. जे चिंताजनक आहे.
' गौ में ही गोविंद समाये, फिर काहे गौसेवा ना भाये' अश्या निरुपद्रवी घोषणांनी आता 'गौमाता करे पुकार, कहाँ गई हिंदू तलवार' असं रूप घेतलंय.

गर्दीतला दर्दी

पण

पण प्रधानसेवक फार कल्पकतेने आणि काळजीपूर्वक विधाने करतात असं गृहीत धरलं तर....

आतासुद्धा प्रधानसेवकांनी फक्त "दलितांना मारण्याविषयीच" नाराजी व्यक्त केली आहे.

मला मारा पण मुसलमानांना मारू नका (किंवा दलितांना आणि मुसलमानांना मारू नका) असं ते म्हणालेले नाहीत.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मोदी मुस्लिमांना चेचणारे खमके

मोदी मुस्लिमांना चेचणारे खमके नेते अशी इमेज आहे मोदीभक्तांच्या बर्र्याच मोठ्या ग्रुपमधे. ते त्यासाठी मोदींना पार चाटून वल्लं करत असतात. मोदींनी दलित आणि मुसलमान बांधव म्हंटलं रे म्हंटलं की या चाटू मोदीभक्तांच्या जिभा लाकडासारख्या होणार. मोदी अशी रिस्क घेणार नाय.

अवांतर : 'मला मारा' या डायलॉगवर एक फोटो पाहिला नुकताच फेसबुकवर-

हिटलर भाषण देतोय आणि फोटोवर लिहिलं होतं " पाहिजे तर मला मारा पण माझ्या ज्यू बांधवांना मारू नका" (स्माईल)

गर्दीतला दर्दी

>>की तो मुसलमान होता, नि

>>की तो मुसलमान होता, नि मुसलमानांनाच मारत होते, तोवर ठीकच होते, पण आता तर हिंदूंनाही मारू लागले आहेत, तेव्हा अबब, तोबा तोबा, असे काही?

प्रधानसेवकसुद्धा दलितांना मारण्याबद्दलच फक्त बोलले आहेत. इतरांना न मारण्याविषयी त्यांनी काही सांगितलेले नाही.

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

सल्ला

"मुहंमद अखलाक हा मुसलमान नव्हताच" असा अहवाल येऊ द्या, म्हणजे वरील प्रकारच्या चिल्लर आरोपांमधली सगळी हवाच निघून जाईल असा सल्ला आम्ही संबंधितांना देऊ इच्छितो.

अमित
लिपिक, मूषक निवारण विभाग,
म न पा, पुणे

बाकी सर्व सहमत... पण फक्त

बाकी सर्व सहमत... पण फक्त भिकारचोट असलं तरी पाकिस्तान झिंदाबाद अस म्हणता याच कारण काय कळलं नाही. ( मी हे ते मुस्लिम राष्ट्र आहे ,किंवा ते शत्रू वगैरे राष्ट्र आहे म्हणून म्हणत नाहीये , पण पाकिस्तान इतकी धार्मिक , तसेच जातीय असहिष्णुता इतर कुठे नसावी ....म्हणून .. )

उत्तर

पाकिस्तान इतकी धार्मिक , तसेच जातीय असहिष्णुता इतर कुठे नसावी

पाकिस्तान (अ‍ॅज़ इट एक्झिस्ट्स) भिकारचोट आहे, हे आगाऊ मान्य केलेलेच आहे. मुद्दा तो नाही.

मुहंमद अखलाकाच्या वेळेस मूग गिळल्यानंतर आता केवळ हिंदूंना (आणि त्यातही भाजपवाल्यांनासुद्धा) मारू लागल्यावर त्याबद्दल जागे/सक्रिय होणे हे जर योग्य असेल, तर '(या देशात हिंदू आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत, सबब) उपखंडातल्या मुसलमानांना राहण्याकरिता स्वतंत्र देशाची गरज आहे' या पाकिस्तानमागच्या raison d'etreचे ते अधोरेखन आहे, म्हणून 'पाकिस्तान झिंदाबाद' म्हटले, इतकेच.

विचारधन

विचारधन

women instead of fighting for their rights should focus on their duties.....
.
.
.
.

what are woman's duties, matrutva, netrutva and kartutva
( मातृत्व हेच कर्तुत्व असेल तर नेतृत्व गाजवायचं कुठे?)
.
.
.

Devi sita protected herself with aatmabal ( मग तलवारबाजी का शिकवतात बरे?)
.
.
.
.

In these days girls run away with men for merely recharging their phones.
(काय्च्याकाय)
.
.
.

हे काही मासले. संपूर्ण भाषण शोधतेय.
हे शिकून आलेल्या स्त्रीयांना भेटायची इच्छा आहे.

In these days girls run away

In these days girls run away with men for merely recharging their phones.

हे metaphor नसेल तर थोर वाक्य आहे!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

In these days girls run away

In these days girls run away with men for merely recharging their phones.

हे metaphor नसेल तर थोर वाक्य आहे!

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

गोबरपुराण

Cellphones suck energy, just put some cow dung: RSS ideologue

प्रश्न - Why do you have gobar on your phone?
उत्तर - It is fresh cow dung. I have put it to save myself from the harmful radiations of the cellphone. It works, believe me.

निळ्या रंगात रंगवलेले शब्द कुठेतरी ऐकल्यासारखे वाटतात. नै ?

...

आणखी -

We make pregnant women eat cow dung and urine paste to ensure a normal delivery. We treat all deadly diseases with cow dung. But the gobar should be of our Indian desi cow and not western monsters like Jersey or Holstein. Their dung and milk are nothing but poison.

संजीवनी बूटी

संजीवनी बूटी शोधण्यासाठी उत्तराखंड राज्याने २५ कोटी रुपयांची तरतूद केली. बातमीचा दुवा

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरंच आहे की. एकदा संजीवनी

बरंच आहे की. एकदा संजीवनी बूटी सापडली की मग या फारिनच्या कंपन्यांच्या औषधांची गरजच पडणार नाही. आणि पंचवीस कोटीत जर हे होणार असेल तर उत्तमच.

आधीच लोकसंख्या, प्रदूषण,

आधीच लोकसंख्या, प्रदूषण, अन्नाची उपलब्धता असे प्रश्न आहेत; त्यावर तुम्ही आणखी काही नतद्रष्ट बूट्या शोधा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी सहमत आहे. लोकसंख्यचा

मी सहमत आहे. लोकसंख्यचा प्रश्न बिकट होइल. लोक मरणारच नाहीत Sad

अगदी!

फडतूसांना गोळ्या घातल्या पाहिजेत!

नबाssssssssssssssss आप भी???

(स्माईल) नबाssssssssssssssss आप भी??? Sad (डोळा मारत)

तिरकसपणा.

त्यांनी ट्रंपकाकांकडून एवढ्यापुरतं प्रशिक्षण घेऊन तिरकसपणा केलेला असण्याची शक्यता लक्षात घ्या.

. नवी बाजूंना ट्रंपकाकांकडून प्रशिक्षण घेण्याची गरज नाही ह्याची जाणीव आहे. पण जाता जाता, ट्रंपोबांना लाथा झाडता येत असतील तर संधी का सोडा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

(अतिअवांतर)

ट्रम्पकाका हे डेमोक्रॅटिक प्लांट असावेत, असा आम्हांस दाट संशय आहे. (तेवढे कोणास बोलू नका, हं!)

हाण्ण!!

हाण्ण!! (लोळून हसत)

If you can't beat them...

...parody them.

(No subject)

(स्माईल)

लौले लौला: लौलम

लौले लौला: लौलम

या अशा बातम्या

या अशा बातम्या हेरायला/ओळखायला खरच चाणाक्ष नजर लागते.

सिंधू नदीकाठचे झाडच ओ ते.

सिंधू नदीकाठचे झाडच ओ ते. सिंधू-सरस्वती नद्यांच्या काठी हडप्पा संस्कृती होती आणि तिथे अनेक प्रकारचे उद्योगधंदे चालायचे म्हणून ते इंडस-ट्री या नावाने ख्यातकीर्त झाले.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

?

खरच का?
असेल तर काही सन्दर्भ देता का?
आसाराम बापू व सँघाची पूस्तके सोडून

प्रेमविषय अपरंपार ।
सूक्ष्म-रुप भव्याकार ॥
निरभिलाष तन्मयता ती ।
दिव्य प्रेमाची जाति ॥
कौतुक, विस्मय आश्चर्य ।
शून्यवृत्ति किंवा सभय ॥
अनेक परिची
त्या प्रेमाची
रुपें साचीं
आविष्करणीं जाणविती ।
दिव्य प्रेमाची जाति ॥6॥

अशा व्युत्पत्त्या सुचायच्या

अशा व्युत्पत्त्या सुचायच्या म्हणजे सोपं काम नव्हे. त्यासाठी पुनादेव ओकेश्वरांची उपासना करावी लागते.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

Hard-line Indian Hindu Group

Hard-line Indian Hindu Group Prayerfully Endorses Donald Trump

दिल कि तपिश आज है आफताब !!!

माझे काही फार ऑब्जेक्शन नाही.

माझे काही फार ऑब्जेक्शन नाही. तसेही नेहरूंचा खूप उदोउदो झाला होता. समाजवादाचे खूळ १९३५ पासून भारतात रुजवणारे व त्यामुळे सर्वसाधारण माणसाचे सगळे कॅरॅक्टरच बदलून टाकणारे प्रधानमंत्री.

( याचा अर्थ आरेसेस चा नेहरूद्वेष वैध आहे असं नाही. आरेसेस चे लोक नेहरूंबद्दल अत्यंत डिस्गस्टिंग टीका करतात. )

"चीन चा खरा मित्र" असे

"चीन चा खरा मित्र" असे आदरार्थी वर्णन चीनी अभ्यासक्रमात आहे असे ऐकले जाते. एक मोठ्ठा धडा आहे म्हणे.
त्या धड्याच्या शेवटी असे अनेक सपूत भारत मातेनी जन्माला घालावेत अशी प्रार्थना पण आहे.

नक्को मला तुमचा नोबेल पुरस्कार

श्री. श्री. रविशंकर यांनी नोबेल पुरस्कार नाकारला (म्हणे!)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नोबेल पुरस्कार देणाऱ्यांच्या

नोबेल पुरस्कार देणाऱ्यांच्या निषेधार्थ मीही पुढची दहा वर्षं तो पुरस्कार नाकारत आहे. नोबेल पुरस्कार समितीतले लोक ऐसी वाचत असतीलच, तेव्हा त्यांना वेगळी वॉर्निंग देण्याची गरज नाही. जर माझा पवित्रा मी बदलला तर मी ऐसीवरच ते जाहीर करेन.

तुमचा राग कोणावर?

त्यांचा मलाला युसुफजईवर राग आहे, तुमचा कोणावर? ओबामावर का शेजारच्या संस्थळावर?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राग? छे छे. केवळ श्री.

राग? छे छे. केवळ श्री. श्रीं.नी नोबेल पुरस्कार-वापसी केली म्हणून मीही करतोय. याला मी प्रीएम्टीव्ह पुरस्कार वापसी म्हणेन.

आयुर्वेदाव्यतिरिक्त औषध

आयुर्वेदाव्यतिरिक्त औषध देणारे वैद्य देशद्रोही/देशविरोधी वगैरे वगैरे. हे वक्तव्य आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचं. या बातमीत हेही म्हटलेलं आहे की आयुर्वेदाचं शिक्षण आता संस्कृतमध्ये देण्याचा विचार आहे.

जर्मण लोक हे आर्यच असल्याने

जर्मण लोक हे आर्यच असल्याने होमेपदीची औषधे देणे हा राष्ट्रद्रोह नसावा.....

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

फचेपल्म!

फचेपल्म! Sad

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मनसो रञ्जनायैषः भो

मनसो रञ्जनायैषः भो विचारोऽस्ति गालिब!!!!!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

साधु!

का वार्ता! सुभान आगत:, मक्षिका अपि आगता:|

(संस्कृत जमले काय? विशेषेकरून ते संधी वगैरे? बरोबर साधले काय?)

साध्यम्, बाढं साध्यम्!

साध्यम्, बाढं साध्यम्!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

>>मनसो रञ्जनायैषः भो

>>मनसो रञ्जनायैषः भो विचारोऽस्ति गालिब!!!!!
'मनसो रञ्जनायैषः सुविचारोऽस्ति गालिब!!!!!' असे हवे का? की 'भो' चा अर्थ चांगला असाही होतो?

क्या बात है भटोबा. तुमची

क्या बात है भटोबा. तुमची सुचवणी एकदम जच गयी है. नक्कीच जास्त सूटेबल आहे. भो = अरे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

आता संघ सुद्धा जयंती

आता संघ सुद्धा जयंती पाश्चिमत्य कॅलेंडर प्रमाणे साजर्‍या करणार, पूर्वी तिथी प्रमाणे करायचे म्हणे. आज बातमी आहे कुठल्यातरी पेपरात.

पँट ची उंची वाढली तर थेट डोक्यावर परीणाम?

हे

संपूर्ण जगाने भारत माता की जय म्हणण्यासाठी आपण त्यांच्यापुढे मूल्यांचा आदर्श ठेवला पाहिजे - इति मोहनराव भागवत.

मोहनराव, असा कोणता देश आहे की जिथे दुसर्‍या देशाचा स्वयंस्फूर्तपणे एवढा सन्मान केला जातो ? मूल्ये व त्यांचे पालन हे कष्टप्रद नाहिये का ? साधे सेक्युलरिझम सारखे मूल्य की जे सेक्युलरिस्ट्स आणि अँटि-सेक्युलरिस्ट्स दोघांच्याही मते भारतीय जनतेत आधीच रुजलेले आहे. मूळचेच आहे. (असं दोन्ही बाजू म्हणतात. अडवाणी, अर्धेंदु बार्दन, एम्जे अकबर ह्या मंडळींनी तसे अनेकदा व्यक्त केलेले आहे.) ते सुद्धा पालन करताना कुरकुरत केले जाते. सोयिस्कररित्या केले जाते, किंवा अजिबात पालन न करता थेट उल्लंघन केले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही जनतेला आणखी उच्च मूल्ये पाळायला प्रेरित करत आहात !!! हे परवडणारे आहे का ?

( जाताजाता मोहनरावांना हे वाचायला द्यावेसे वाटते. की मूल्ये ही रिव्हर्सल च्या वाटेवर सुद्धा लागू शकतात. )

मोहनरावांना

मोहनरावांना पुलं.चा हा ही एक लेख वाचायला द्यावासा वाटतो.
http://cooldeepak.blogspot.com/2007/04/blog-post_3309.html

विशेषतः खालील ओळ ही सर्व संघिष्ठांनी घोकून पाठ करणे आवश्यक आहे.

'बोल होतोस की नाही भारतीय!' असं दरडावून विचारलं तर मी देखील'नाही होत जा' म्हणेन!

असा कोणता देश आहे की जिथे

असा कोणता देश आहे की जिथे दुसर्‍या देशाचा स्वयंस्फूर्तपणे एवढा सन्मान केला जातो ?

आपल्याकडे कित्येक जणांना मी इस्रायलचे गोडवे गाताना ऐकतो. अगदी त्यांना भरतेच येत असते!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपल्याकडे कित्येक जणांना मी

आपल्याकडे कित्येक जणांना मी इस्रायलचे गोडवे गाताना ऐकतो. अगदी त्यांना भरतेच येत असते!

मी स्वतः गातो ना इस्रायलचे गोडवे. इस्रायल कसा क्रूर पणे पॅलेस्टाईन ला ठोकून काढतो त्याचा मी फॅन आहे. इस्रायली नागरिक शांतपणे खुर्च्या टाकून टीव्ही बघावा तसे बघत बसतात पॅलिस्टिनी मारले जाताना. दुसरे म्हंजे वर बॅट्या ने म्हंटल्याप्रमाणे आर्थिक बाबतीत मोठी मजल मारणारा देश (इतक्या समस्या असूनही). आर्थिक मदत तर इजिप्त ला सूद्धा दिली गेली. इतर अरब देशांनाही दिली गेली. पण त्यांना इस्रायल सारखं करायला जमलं नाही. स्टार्टप नेशन म्हणतात इस्रायल ला ते उगीच नाही. आज इस्रायल हा शस्त्रं निर्यातीतही पुढे आहे.

पॅलेस्टाईन दहशतवाद्यांकडून कडून स्फूर्ती मिळाली होती पाकी मुजाहिद्दीनांना.

पण मोहन रावांना जे अभिप्रेत आहे ते काही वेगळेच व जरा जास्तच उत्कट आहे. एखाद्या देशाच्या एखाददोन बाबींचा फॅन असणं वेगळं ... आणि त्या देशाला आपल्या मातेचा दर्जा देणं, त्याचा जयजयकार करणं वेगळं.

युरोप-अमेरिकेचे गोडवे

युरोप-अमेरिकेचे गोडवे गाणारेही कमी नाहीत हो.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मी आहे एक त्यातली. इस्त्राईल

मी आहे एक त्यातली.

इस्त्राईल चे गोडवे पण ते दुष्ट रानटी लोकांनी घेरलेले राष्ट्र आहे म्हणुन गायले जातात.

त्याबद्दल नव्हे तर दुष्ट

त्याबद्दल नव्हे तर दुष्ट रानटी लोकांच्या छाताडावर पाय रोवून नाचणारे, इतकेच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या वगैरेही एकदम पावरफुल असणारे राष्ट्र म्हणून गोडवे गायले जातात.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मला म्हणायचे होते की कोणी

मला म्हणायचे होते की कोणी प्रॉब्लेम मधे असले की त्याच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो जनरली.

पण प्रॉब्लेममध्ये कोण आहे

पण प्रॉब्लेममध्ये कोण आहे त्यावर ते खूपदा अवलंबून असते. आता उद्या सौदीतलं तेल संपल्यावर त्यांना नक्कीच प्रॉब्लेम येईल, पण म्हणून त्यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर वगैरे डिव्हेलप होईल का?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

"त्यांच्या" बद्दल सहानभुती

"त्यांच्या" बद्दल सहानभुती कदापि शक्य नाही.

प्रिस्साईजलि.

प्रिस्साईजलि.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

भारतानी जर खरच प्रगती वगैरे

भारतानी जर खरच प्रगती वगैरे केली ( कुठल्याही बाबतीत ) तर त्याचे शत्रु च वाढतील. ( उदा हाम्रीका ).

उलट भारत जर आहे तसा दीनवाणा राहीला तर दुसर्‍या देशांमधल्या काही लोकांना दये पोटी भारताचे थोडे भले व्हावेसे वाटेल.

भारतानी जर खरच प्रगती वगैरे

भारतानी जर खरच प्रगती वगैरे केली ( कुठल्याही बाबतीत ) तर त्याचे शत्रु च वाढतील. ( उदा हाम्रीका ).

उदा. जपान ? कॅनडा ? दक्षिण कोरिया ? ब्रिटन ? जर्मनी ? सिंगापूर ?

विश्व हिंदू परिषदेने धोनीला

विश्व हिंदू परिषदेने धोनीला कोर्टात खेचलेलं आहे. का? तर त्याचा फोटो बिझनेस टुडेच्या मुखपृष्ठावर विष्णूच्या रूपात आला म्हणून. कोर्टानेही नॉन बेलेबल वॉरंट काढलेलं आहे.

हा तो फोटो.
धोनी विष्णू

काहीही! हा! हे विष्णुचं रूप

काहीही! हा! हे विष्णुचं रूप नाही हे थोडाही विष्णुरुपाचा अभ्यास केलेली व्यक्ती सांगेल
विष्णु प्रतिमेला ६ हात असतात? शिवाय त्याचं गंध नुसतं दुभंगलेलं नसतं - त्यात बहुधा सूर्यचिन्ह असतं. बाकी काही नाही तरी सुदर्शनचक्र मँडेटरी आहे.

===

अर्थात हे विष्णुचं रुप आहे असे समजले तरी ही घटना रोचक आहेच आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची थोडीतरी बुज असणार्‍यांचा थरकाप उडवणारीही!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहा नाही, आठ हात आहेत. मला

सहा नाही, आठ हात आहेत. मला वाटतं चित्र काढणारांनी विशिष्ट देवाचं चित्र काढण्याऐवजी सर्वसाधारण हिंदू देवाचं चित्र काढलेलं आहे. त्यातही धोनीचा चेहेरा फोटोशॉप करून बसवला आहे हे शेंबड्या पोरालाही कळेल. पण विश्व हिंदू परिषदेची लोकं म्हणजे काही शेंबडी पोरं नव्हेत.

पण हो, असं चित्र काढल्याने कोर्टात खेचलं जाऊ शकतं हे भीतीदायक आहे.

मुळात हे चित्र हिंदू

मुळात हे चित्र हिंदू देवदेवतांचा अपमान करणारं आहे हेच मला पटत नाही. या नियतकालिकाचे बहुसंख्य वाचक, साधारण, मध्यमवर्गीय, धार्मिक/देव मानणारे भारतीय लोक चंगळवादी(!) आहेत किंवा भरपूर वस्तू विकत घेतात आणि क्रिकेटपटूंचे मोठे फॅन्स आहेत असं हे चित्र सुचवत आहे असं मला वाटतं. या वर्णनामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जातात? का हा मुद्दाम 'आ बैल मुझे मार' छापाचा प्रसिद्धस्टंट आहे?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि धोनीला का कोर्टात खेचलं?

आणि धोनीला का कोर्टात खेचलं? फार तर मासिकाच्या प्रकाशकांना खेचायचं !!

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

मंडळ भावना दुखावण्यास जबाबदार नाही.

आपापल्या जबाबदारीवर दुवा उघडणे.
No One Murdered Because Of This Image ही बातमी खरी(!) म्हणायची. कोणाला मारलं बिरलं थोडीच!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गुजरातच्या शाळांमध्ये मुलांना

गुजरातच्या शाळांमध्ये मुलांना 'महाभारत काळात स्टेम सेल टेक्नॉलॉजी होती' आणि 'वैदिक काळात मोटर कार्स होत्या' असं शिकवलं जातंय. धन्य आहे.

बीफ पुन्हा चर्चेत

केंद्रीय सत्ताधारी भाजपाची पक्षचिन्हासह छापलेली अधिकृत जाहिरात. आज भारतात बीफ हा कदाचित सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे असे दिसते.

बीफ

http://indianexpress.com/article/india/india-news-india/irked-by-bjp-adv...

दैव देतं आणि कर्म नेतं या

दैव देतं आणि कर्म नेतं या म्हणीचा प्रत्यय भाजपा पुन्हा पुन्हा देतय.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

+१

इतके दिवस गोमातेबद्दलची वक्तव्ये आणि कृती ही पक्ष आणि (रा.स्व.) संघटनेतील फ्रिंज इलेमेंट्स करत होते. पक्षाचा किंवा संघटनेचा त्यांना व्यापक पाठिंबा नाही असा सोयीस्कर गैरसमज पसरवला जात होता. तो या जाहिरातीच्या निमित्ताने दूर होईल.

निराधार आशावाद

पब्लिक मेमरी इज़ शॉर्ट.

हे ही खरंय

बाकी जाहिरातीत दिलेली लालू प्रसाद यादव आणि रघुवंश प्रसाद यांची वक्तव्ये सेन्सिबल वाटताहेत हे आश्चर्यकारक आहे.

हुशार दिसण्यासाठी काय कराल?

हुशार दिसण्यासाठी काय कराल? वाय. सुदर्शन राव यांच्या शेजारी माणूस उभा राहिल्यास हुशार दिसतो; हा उधारउसनवारीचा विनोद आता खराच ठरल्यासारखा दिसतोय. वाय. सुदर्शन राव यांच्याजागी सगळेच भाजपेयी-राजकारणी एवढाच काय तो फरक.

आज हे चित्र फेसबुकवर फिरताना सापडलं.
वाघ गोमांस खातो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहो, वाघाचं काय घेऊन बसलाहात?

अहो, वाघाचं काय घेऊन बसलाहात? भारतात १७०६ वाघ आहेत! अजून किती हवेत? तेव्हा आता गायच राष्ट्रीय प्राणी होणार बघा. त्यांची संख्या फक्त साडेचार कोटी आहे.

हा हा हा

आता हे चित्र इनव्हॅलिड होणार

राष्ट्रीय प्राणी असला तरी त्याला बीफ खायची परवानगी नाही म्हणजे नाही.........

http://timesofindia.indiatimes.com/india/Beef-row-Bhilai-Steel-Plant-can...

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

जेएनयू पुढचे एफटीआयआय होण्याच्या मार्गावर ?

जेएनयू पुढचे एफटीआयआय होण्याच्या मार्गावर ?

जेएनयूवर पांचजन्यचा हा अंक वाचण्यासारखा आहे.

ऐसीवर एक विशिष्ट प्रकारचे वातावरण आहे हे मला जाणवले असले तरी दुसर्‍या बाजूकडेही काहीतरी सांगण्यासारखे असते आणि ते ऐकून घेणे ही सुद्धा एक प्रकारची 'सहिष्णुता' असते असे वाटते.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

पाञ्चजन्य संघाचा असो अगर नसो,

पाञ्चजन्य संघाचा असो अगर नसो, दुसरा विचार वाचायला ना नाही.

एक पान वाचायचा प्रयत्न केला; पण हिंदी, विशेषतः औपचारिक, वाचण्यासाठी फार कष्ट करावे लागतात असं (पुन्हा एकदा) लक्षात आलं. गेल्या २२-२३ वर्षांत हिंदी क्वचितच वाचलं असेल. (शिवाय फोन, व्हॉट्सअॅप, जीटॉक, फेसबुक, थोडक्यात जिथे जिथे संपर्क करता येईल अशा सगळ्या ठिकाणी ठिकठिकाणचे लोक काहीतरी म्हणत होते. सगळी डिस्ट्रॅक्शन्स धडाधड आदळत होती.) इंग्लिश किंवा मराठीत काही आहे का? हिंदीतला ऑडीओही चालेल. किंवा थोडक्यात त्यांचं म्हणणं काय ते मांडाल का? ५०-१०० शब्दही चालतील.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडक्यात त्यांचे म्हणणे

थोडक्यात त्यांचे म्हणणे असे
०१. जेएनयूत विविध प्रकारचे व्यवस्थाविरोधी व विशेषत: फुटीरतावादी (माओवादी, काश्मीर स्वतंत्रतावादी,मूलनिवासी-आर्य-अनार्यवादी इ.इ.)यांना उघड आणि क्रियाशील (नुसता मौखिक नव्हे) पाठिंबा मिळतो.
०२. जेएनयूचे अभ्यासक्रम,अभ्यासने, अध्यापन इ.इ. डाव्या लोकांनी आपल्या सोयीनुसार बनवून घेतले आहेत.थोडक्यात विद्यार्थ्यांचे वैचारिक ब्रेनवाशिंग चालते.
०३.काही महत्वाच्या प्रकरणात उदा.अफजल गुरू, प्रो.साईबाबा (हे जेएनयूचेच प्रोफेसर)इ.इ.मध्ये जेएनयूतील काही प्राध्यापक व विदयार्थ्यांच्या भूमिका संशयास्पद होत्या असे पांचजन्यचे म्हणणे आहे.
०४.आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ साप्ताहिकाने तेथे वेळोवेळी लागलेली पोस्टर्स, निघालेले जुलूस -सभा इत्यादींची सचित्र माहिती दिली आहे.
०५.विशेष म्हणजे जेएनयूचा पक्ष मांडताना तिथल्या कुलगुरूंनी आपल्या विद्यापीठात अशा गोष्टी घडतच नाहीत असे सपशेल नाकारले वगैरे नाही.काही तत्वे तशी असली तरी संपूर्ण जेएनयूच फुटीरतावादी आहे असे म्हणता येणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे.
०६.छद्म इसाई व नव-वामपंथी हे या लेखातले दोन नवे शब्द.
०७.या नव वामपंथीयांनी 'नव्वदोत्तरी' मार्क्सवादाच्या जागतिक अपयशानंतर आपल्या मांडणीत आता आर्थिक परिमाणात मोजला जाणारा वर्गभेद सोडून हिंदूंमधला जातिभेद हाच खरा वर्गभेद आहे अशी नवी आयडीयलॉजिकल शिफ्ट घेतली आहे असे लेखकाचे निरीक्षण आहे. यालाच लेखक नव-वामपंथ म्हणतो.

तर हे असे आहे.

अवांतर: सध्या स्यूडो-सेक्युलर हा शब्द जुना झाला असून 'मल्टी-कम्यूनल' हा नवा शब्द बाजारात आलेला आहे.

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

ऐकीव माहिती

माझी एक मैत्रीण सध्या जेएनयूमध्ये राज्यशास्त्रातील उच्चशिक्षण घेत आहे. तिथे असे काही खरंच चालते का असे विचारले असता उत्तर होकारार्थी मिळाले. शिवाय तुम्ही विद्यापीठाच्या वसतीगृहात राहायला आलात की डाव्या विचारांचे लोक तुम्हाला स्वतःहून भेटायला येतात, तुमच्या खोलीत दास कॅपिटल वगैरे ठोकळे तुम्हाला न विचारता आणून ठेवले जातात, तुम्हाला डाव्या विचारांचे रीतसर शिक्षण देऊन इंडक्ट करण्याचा प्रयत्न होतो, वृंदा-प्रकाशादि नेत्यांचं विद्यापीठात नेहेमीचं येणं-जाणं आणि विद्यार्थ्यांचं त्यांच्या बरोबर फर्स्ट-नेम टर्म्सवर असणं वगैरे मजेदार गोष्टी ऐकायला मिळाल्या. याशिवाय अभाविपच्या सदस्यांचाही थोड्याफार प्रमाणात दंगा चालतो असेही ऐकायला मिळाले.