ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
Why your middle-class salary is better than you might think
"so much of day is spent doing things that didn't exist [in 1980] that it's hard to believe the numbers fully account for new products."
फेसबुक सारख्या बाबी ज्यांना फक्त फॅड वाटतात व त्यांच्यामुळे काही "व्हॅल्यु अॅड" होत नाही, समाजात काहीही फरक पडत नाही - असा आरडाओरडा जो चाललेला असतो त्यांना हा लेख वाचायला द्यायला हवा.
अर्थात वाचून झाला तरी मर्म समजेलच याची शाश्वती नाही.